फक्त जागे व्हा !

21
2013
Jul
मोन्त्रेअल, कॅनडा.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही आम्हाला या आयुष्यात भेटलात. मला असे वाटते कि तुम्ही पृथ्वीवर क्वचित येता, तेंव्हा जो पर्यंत आपली पुढच्या कोणत्यातरी जन्मात भेट होत नाही तोपर्यंत आमचे काय होते? आम्ही हे सर्व विसरून जाणार काय ? आम्ही ज्ञान ग्रहण करीत राहणार काय ?

श्री श्री : तुम्ही हे ज्ञान विसरणार नाही!

म्हणून तर जेंव्हा आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो, तेंव्हा आपण आपली किती प्रगती झाली ते बघतो आणि आपण सर्व ज्ञान विसरलो नाही ते बघतो.

तुम्ही जर १० पावले पुढे गेलात तर असे वाटेल कि तुम्ही ८ पावले मागे आलात, पण सर्व १० पावले मागे जाणार नाही. तसेच तुम्हाला जी आठ पावले वाट आहेत ती चार-पाच किंवा तीन-चार पावले असतील. त्याचा फारसा विचार करू नका, मी ते फारसे लक्षात घेत नाही, तुम्ही पण ते मनावर घेऊ नका!

आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे, ' आपल्या मनासारखे होवो किंवा न होवो, मी आनंदी राहणे सोडणार नाही. मी नेहमी आनंदी राहणार !'

तुम्ही दुखी राहून ज्या होणार आहेत त्या गोष्टी बदलणार नाहीत. तुम्ही काही मोठे काम करायला घेता, आणि का कोणास ठाऊक ते काही पूर्ण होत नाही. पण मग ते पूर्ण झाले नाही तरी तुमच्याकडे जे आहे ते कशाला घालवायला पाहिजे. तुमचा जो काही आनंद आहे तो त्यामुळे वाया घालवू नका. तुम्ही एवढे जरी लक्षात ठेवले तरी ते पुरेसे आहे !

साधनेचा काय अर्थ आहे ते तुम्हाला माहित आहे काय? साधना म्हणजे एक अशी अनुभूती कि ' मी देवाच्या जवळ आहे.मी वैश्विक चेतनेच्या जवळ आहे. मी त्या परमात्म्याशी संबंधित आहे.' हा एवढा संबंध पुरेसा आहे. तुम्ही एवढे लक्षात ठेवले तरी तुम्ही तुमच्या साधनेत यशस्वी व्हाल आणि मग इतर काही करण्याची गरज नाही.

मी तुम्हाला ध्यान सोडायला सांगत आहे असा याचा अर्थ काढू नका. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे ध्यान, प्राणायाम वगैरे सर्वकाही चालू ठेवा. पण अध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला ते माहित पाहिजे आणि तुम्ही त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे.

त्यासाठी तुम्हाला असे वाटले पाहिजे कि, ' मी त्या परमात्म्याशी संबंधित आहे, मी देवाच्या संबंधित आहे, मी गुरूच्या संबंधित आहे. हे सर्व एकच आहे. मी माझ्याशी संबंधित आहे.

मनाला काही गोष्टी पटतात आणि काही पटत नाहीत.

काही वेळा बुद्धीला असे वाटते कि मी बरोबर आहे, ते तसे असू शकते, पण त्याचा फार विचार न करता ते बाजूला ठेवा. कृतीच्या मर्यादित क्षेत्रात काही कृती या इतर कृतींपेक्षा चांगया असतील. काजी वेळा या कृती चांगल्या वाटतील तर कधी त्या कृती चांगल्या वाटतील. सर्व कृतींमध्ये काही त्रुटी असतात, काही मर्यादा असतात आणि सर्व कृतींना फायदे असतात. जी सर्वांगाने उत्तम असेल अशी एकपण कृती नाहीये. असे काही वेळा वाटते, पण वाटणे आणि असणे यात फरक असतोच !

तुमचे मुख्य लक्ष म्हणजे ज्ञान मिळवणे आणि ते घोकून पाठ करणे होय. म्हणून, तो आनंद जपून ठेवा! हे सांगायला खूप सोपे आहे हे मला माहित आहे. तुम्ही असे म्हणू शकता, ' गुरुदेव, तुमच्यासाठी ते सोपे असेल , पण माझ्यासाठी ते सोपे नाहीये, तर अवघड आहे.' 

मला हे चांगले माहित आहे, पण काही झाले तरी तो आनंद सोडू नका, असे तुम्हाला सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाही !

तुम्ही तुमचे नातेसंबध हरवून बसला असाल, पण तुमचे स्मित-हास्य हरवू नका.

तुमचे एक नाते हरवून बसला असाल, पण काही हरकत नाही, तुमच्यासाठी सात कोटी लोक आहेत ! दुसरे कोणीतरी येईल आणि तुम्हाला शोधून काढील. तुम्ही जर तुमचे स्मित-हास्य शाबूत ठेवले तर तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी येईल. नाहीतर उदास माणसाबरोबर मैत्री करायला कोण येणार? तुम्ही जर निराश झाले असाल, किंवा हताश दिसत असाल, तर तुम्हाला दुसरा मित्र किंवा मैत्रीण कशी मिळणार! तुमच्याकडे कोणी बघणार नाही आणि लांब चेहरा करून बसलेल्या माणसाकडे कोण आकर्षित होणार.

तुम्ही जेंव्हा जोडीदार शोधात असता तेंव्हा उत्साह आणि स्मित हास्य यांची गरज असते. 

आता तुम्हाला जर नोकरी नसेल तर ते ठीक आहे.

लांब चेहरा केलेल्या आणि निराश झालेल्या माणसाला कोण नोकरी देणार? असे पहा कि आयुष्य चालू राहील. तुम्ही काही उपाशी राहून मारणार नाही. तुम्हाला सर्व काही मिळेल ! तुम्ही परमात्म्याशी, वैश्विक चेतनेशी संबधित असे आहात. तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर आहात.

'काहीही झाले तरी मी चालत राहणार आहे ! नोकरी मला शोधात माझ्या दाराशी येईल. तरीसुद्धा मी ती शोधात राहिले पाहिजे!'

तुम्ही जर असे केले तर आर्ट ऑफ लिविंग चे उदिष्ट साध्य झाले असे म्हणावे लागेल ! 

समजा तुमचे घरातील कोणाशी जर भांडण झाले तर तुमच्या चेहऱ्यावर हसू परत यायला फारसा वेळ लागत नाही. तुमचे भांडण हे भ्रमण ध्वनीच्या एखाद्या सोई सारखे असावे, म्हणजे, ऑडीओ, विडीयो, कॅमेरा. तुमचा भ्रमण ध्वनी काही फार वेळ कॅमेरा या सोयीत राहू शकत नाही, तो लवकरच इतर सोई वापरू शकला पाहिजे, होय कि नाही ?

त्याप्रमाणे मन हे भांडणाच्या अवस्थेत असायला हरकत नाही पण पुढच्या मिनिटात हि अवस्था बदलायला पाहिजे !

तुमच्यातील काहींना सुटका झाल्यासारखे वाटत असेल, गुरुदेवांनी भांडणाला परवानगी दिली आहे! मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले असेल!

काही काळजी करू नका , तुम्हाला जर भांडायचे असेल तर जरूर भांडा, पण लगेच हास्य चेहऱ्यावर परत येऊ देत. बदल व्हायला पाहिजे! तुमच्यात ती क्षमता आहे! मला तुम्ही भाजीपाल्यासारखे झालेले आवडणार नाही , फक्त होयबा असलेली कमकुवत मनाची माणसे मला आवडत नाहीत.

मला तुम्ही मजबूत आणि हसरे, मजबूत आणि सूक्ष्म, समजदार आणि संवेदनशील असे हवे आहात, पण सर्व एका वेळी.

अशी काही माणसे असतात कि जी समजदार असतात पण ते एखाद्याचा मुर्खपणा सहन करू शकत नाहीत. जेंव्हा तुम्ही मुर्खपणा सहन करू शकत नाही तेंव्हा तुमची संवेदनशीलता घालवून बसता, होय कि नाही?

असे पण काही लोक असतात कि जे संवेदनशील असतात पण समजूतदार नसतात. ते एवढे संवेदनशील असतात कि ते बोलत असताना जर कोणी जांभई दिली तर ते म्हणतील, ' बघा, मी जे सांगतो आहे त्यात त्यांना काहीच रस नाहीये!

तुम्हाला माहित आहे कि काही ठिकाणी जांभई हे घटस्फोटाचे कारण झाले आहे?

पत्नी म्हणाली, ' जेंव्हा मी माझ्या पतीशी बोलायला लागते तेंव्हा ते जांभया द्यायला सुरवात करतात, त्यांना माझ्या बोलण्यात काही रुची नाहीये. हा खरे तर माझा अपमान आहे. प्रत्येक वेळी मी जेंव्हा त्यांच्याशी बोलायला जाते तेंव्हा ते जांभया द्यायला लागतात.'

म्हणून, जे लोक फार संवेदनशील असतात ते समजूतदार नसतात. तुम्ही संवेदनशील आणि समजूतदार असे दोन्ही झालेले मला पाहिजे आहे.

आता परत पाहिल्यासारखे म्हणू नका, ' अरे, मी समजदार आहे आणि संवेदनशील नाही' किंवा 'मी समजदार नाही पण संवेदनशील आहे.'

परत तसे म्हणू नका. हे तुमच्या मनात ठेवा , बघा ते कसे तिथे राहते.

आत्म-ज्ञान कसे मिळविले जाते? त्याला संस्कृतमध्ये प्रत्याभिज्ना असे म्हणतात.( हा एक असा सुंदर शब्द आहे कि ज्याच्यासारखा शब्द इतर भाषेत सापडत नाही.)

प्रत्याभिज्ना म्हणजे जाणून घेणे. प्रत्याभिज्ना हृदयं म्हणजे हृदयाने स्वतःला जाणून, उमजून घेणे. हे ज्ञान म्हणजे एवढेच आहे. हे संतुलन, हे ध्यान, आपण ज्या तीन गोष्टी शिकलो ते, म्हणजेच उत्साह , दया आणि वैराग्य. ज्ञान हे कोणत्याही कृतीने नव्हे तर फक्त जाणून घेण्याने मिळते.

उदाहरणार्थ, लोक आपला चष्मा डोक्यावर सरकवून ठेवतात आणि मग सगळीकडे शोध सुरु करतात कि चष्मा कोठे ठेवला.

मग कोणीतरी त्यांना सांगते, ' अरे, तो तर तुमच्या डोक्यावर आहे.'

मग त्यांच्या लक्षात येते, ' अरे खरच कि.'

म्हणजे, ज्ञान लगेच फळ देते. तुम्ही काही करायची आवश्यकता नाही, कोठले कर्म किंवा कोणती कृती यांची गरज नाही.

तुम्ही चष्मा शोधत होता आणि अचानक तुमच्या लक्षात येते कि तो तेथे आहे. म्हणजे तुमचे चष्म्याबद्धलचे ज्ञान हे चष्म्याबरोबर येते.तुम्हाला तो मिळाला कारण तो तेथेच होता. ज्ञान आणि ज्ञानाची जाणीव यात काहीच अंतर नाही.

मी आता हे अजून सोपे करून सांगतो. असे समजा कि तुम्हाला सफरचंदाच्या पाय विषयी माहिती आहे, पण तुमची त्याविषयी माहिती आणि ती सफरचंदाची पाय, म्हणजे ती मिळवून खाण्यात यात खूप अंतर आहे. पण चष्मा तुमची डोक्यावर आहे यात हे ज्ञान म्हणजेच त्याचे फळ होय. या ज्ञानाचा निकाल आपल्याला लगेच प्राप्त झाला. कारण त्याच्यामध्ये कोणतीही कृती नव्हती.

गुरु-वाणी, म्हणजे ज्ञानाचे शब्द, म्हणजे तुम्ही ते शब्द ऐकता (ज्ञानाचे) आणि ते लगेच तुम्हाला प्राप्त होतात. त्यासाठी वेगळे काही करावयाची गरज नसते.

असे पहा कि तुम्ही सुंदर आहात. पण तुम्ही सुंदर आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नसते. आले लक्षात?

आता पर्यंत मी तुम्हाला हे सर्व करायला सांगत होतो, प्राणायाम, सत्संग, भजन, भक्ति करा. पण आता मी तुम्हाला पूर्णपणे वेगळी गोष्ट करायला सांगणार आहे, ती काय? तर फक्त जागे व्हा!

तुम्ही जागे कसे होता? हा काही प्रश्न नव्हे. तुम्ही माझे बोलणे ऐकले आहे , आणि तुम्ही जागे झाले आहात.

जर कोणी झोपले असेल तर तुम्ही म्हणता, 'अरे, जागा हो!'

पण जेंव्हा ते तुमचे जागे करणे ऐकतात, तेंव्हा ते जागे झालेले असतात, होय कि नाही ? हेच तर ते आहे, तात्काळ ! सिद्धी माहित असणे, ती मिळविणे आणि त्याबद्धल माहिती असणे यात काहीच अंतर नाही. हेच तर ते!

आता पहा, तुम्हाला आतून किती बरे वाटत असेल ते! अचानक तुम्ही म्हणता कि, ' मला आता काही करायची गरज नाही.'

कोणी जर म्हणाले कि तुम्ही सुंदर आहात, तर आता तुम्हाला सौंदर्यप्रसाधने वापरायची गरज नाही, कारण तुम्ही सुंदर आहात , यावर फक्त विश्वास ठेवा.

आता तुम्ही असे म्हणू शकता , ' नाही, मी सुंदर नाही, पहा माझे नाक कसे वाकडे आहे ते, माझ्या भुवया खूप छोट्या आहेत. मला हाताच्या, पायाच्या निगेची गरज आहे ? माझ्या या भुवया काढून घ्या आणि मला चांगले दिसण्यासाठी काहीतरी करा.'

मी म्हणेन, ' अरे, तुम्ही खरोखरच सुंदर आहात.' यातच सगळे आले.तुम्ही काही वेगळे सौदर्य प्रसाधन वापरण्याची गरज नाही !

पण तुम्हाला जर असे वाटत असेल कि तुम्ही सुंदर नाही आणि तुम्हाला सौंदर्य वाढविण्यासाठी सौंदर्य-तज्ञांकडे जाऊन फौंडेशन लावून, त्यावर तुमचे गाल लाल दिसण्यासाठी गुलाबी रंग लावायचा असेल, आणि इकडे थोडा हिरवा, तिकडे थोडा निळा, डोळ्यांवर काही चकाकणारे लावल्यानंतर तुम्ही सुंदर दिसत असे वाटत असेल तर मी काय म्हणणार?

ठीक आहे, तसे करा!

असे पहा कि लोकांच्या मनाची आज अगदी अशीच स्थिती आहे. काही करण्याविषयी त्यांचे विचार इतके ठाम आहेत कि कोणी त्यांना सांगितले कि तुम्ही सुंदर आहात तरी त्यांचा त्यावर विश्वास नाही.

यावर ते म्हणतील, ' नाही, पहिल्या प्रथम मला माझे केस कापायला पाहिजेत, मग मी तो टाय घालीन, आणि मग काहीतरी चमकणारे घालून मग मी छान दिसेन.'

तुम्ही त्या सर्व गोष्टी करू नयेत असे मला म्हणायचे नाही. पण तुम्हाला वरून छान आणि मृदू दिसण्यासाठी त्या गोष्टी वापरायच्या असतील तर एक लक्षात ठेवा कि तुम्ही आतून पण खूप मृदू आणि छान आहात.