कचराकुंडीतील हिरा

27
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना


जीवन हा एक उत्सव आहे. तो साजरा करण्यासाठी मिळणारी प्रत्येक संधी पकड आणि ती वापरा आणि कृतज्ञ रहा.

उत्सव कसा साजरा होईल? केवळ फुले आणि फुगे लावून उत्सव साजर होत नाही; त्याच्यासाठी आतून भावना असल्या पाहिजे. उत्सव साजरा होणे हे घडून येण्याकरिता कोणती कौशल्ये आणि परिस्थिती असणे आवश्यक आहे? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का?

(श्रोते : कृतज्ञ वाटणे, आनंदी वाटणे) 

हे तर इकडे आड तिकडे विहीर असे झाले,जर तुम्ही उत्सव साजरा करता तर तुम्ही आनंदी आहात;जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्ही उत्सव साजरा करता.

(श्रोते : समाधान, चांगली सांगत, उत्सव साजरा करण्याकरिता कोणी सोबत असणे, घरच्यासारखे वाटणे,सुरक्षिततेची भावना असणे) 

होय, जर तुम्ही भेदरलेले असाल तर तुम्ही उत्सव साजरा करू शकत नाही. प्रेमात असणे; तद्भावितेची भावना असणे!

(श्रोते : चांगले अन्न) 

निश्चितच, अन्न हा उत्सव साजरा करण्याचा भाग आहे. जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही उत्सव साजरा नाही करू शकत!

(श्रोते : अन्न आणि पेय यांची देवाणघेवाण) 

ऐका, अन्न आणि पेय यांची देवाणघेवाण करणारी माणसे यांना तुम्ही खरोखर आनंदी असे पाहता का? किंवा ते उत्सव साजरा करीत आहेत असे वाटते का? त्यांच्या चेहऱ्यांकडे पहा!

नंतर आपल्याला पाहिजे पवित्रातेची भावना. 

जेव्हा तुम्हाला शुद्ध वाटते तेव्हा तुम्ही उत्सव साजरा करू शकता. जेव्हा तुम्हाला घाण वाटत असते तेव्हा तुम्ही साजरा करू शकता का? जर तुम्ही जलःनिसारणाचे काम करीत आहात आणि तुम्हाला कोणीतरी बोलावून म्हणाले, ‘चला, आपण उत्सव साजरा करू या’, तुम्ही म्हणाल, ‘नाही, मी घाण आहे. मला अंघोळ करू दे, नंतर मी येईन आणि साजरा करीन’. असे नाही का तुम्ही म्हणत?

तर तुम्हाला साजरा करण्यासाठी काय पाहिजे? पवित्रातेची भावना; स्वच्छता. उत्सव साजरा तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला आतून आणि बाहेरून स्वच्छ वाटते. जे लोक स्वतःला सर्वात वाईट पापी समजतात ते उत्सव साजरा करू शकत नाही कारण अपराधीपणाची भावना आणि पाप त्यांना आतून खात असते. म्हणून आतून आणि बाहेरून पवित्रातेची भावना.

या गुरु पौर्णिमेला मला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवून पाहिजे, तुम्ही एक हिरा आहात; कदाचित सध्या एका कचराकुंडीत असाल!

म्हणून, जेव्हा तुम्हाला अपवित्र वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही एक हिरा आहात. तो एका कचराकुंडीत असू शकतो पण एक हिरा कधीही अपवित्र असू शकत नाही.

जर कचराकुंडीत हिरा असेल तर तुम्ही तो फेकून देणार का? नाही, तुम्ही तो उचलाल आणि तो धुवून घ्याल. हे सर्व सराव तुम्ही करता ते असते हिऱ्याचे धुणे, बस्स!

तुम्हाला हिरा धुण्यासाठी किती अवधी लागतो? तुम्हाला तो घासावा लागतो का? नाही, केवळ थोडेसे पाही, कदाचित चिमुटभर साबण. त्याचप्रमाणे, सोsहम सोsहम, बस्स इतकेच, आणि तो हिरा पुन्हा पवित्र होतो.

जेव्हा तुम्हाला हे कळेल की नित्य शुद्धोहम  म्हणजेच मी नेहमीच पवित्र आहे,  तेव्हा तुमच्या जीवनातील उत्सव साजरा होणे कधीही थांबणार नाही.

अंगभूतरित्या आपण सगळे स्वभावाने पवित्रच आहोत; परंतु ज्या क्षणी तुम्हाला हे जाणवते, की तुम्ही पवित्र आहात, तुमचे हृदय पवित्र आहे, तुम्ही या ग्रहावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर कोणचेही वाईट चिंतीत नाही, तेव्हा तुम्ही प्रेम असता. 

जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही पवित्र आहात तेव्हा तुम्ही प्रेम असता आणि तुम्ही फुलून येता. आणि मग तुमच्या आत एक प्रकारची जागरुकता असते, जागेपणा असतो.

तुम्ही नेहमीच पवित्र होतात, आणि मौन हे या पवित्रतेचा सुवास असतो. मौन, आणि ही जाणीव की मी नेहमी पवित्र आहे, यामुळे तुमचे जीवन हे एक उत्सव बनते. मौनातून निर्माण होणारा उत्सव हा खरा उत्सव असतो कारण तो गहनतेमधून निर्माण होतो.

आता तुम्ही साबण आणि पाणी आणि सर्व काही वापरले आहे हिरा साफ करायला (आर्ट ऑफ लिविंगच्या मौनाच्या शिबिराला उल्लेखून), आता हिरा चमकतो आहे, आणि तो उत्सव आहे साजरा करणे. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक सच्चेपणा आहे; तुमचे हास्य हे सच्चे आहे.

काही लोकांचे हास्य तुम्ही पहिले आहे का? ते हास्य आतून येत नाही; ते कृत्रिम हास्य असते. लोक म्हणतात, ‘तुमचे स्वागत आहे’, पण ते इतके कृतीम स्वागत असते.

लोक म्हणतात, ‘अनेक धन्यवाद’,पण ते धन्यवाद इतके कृत्रिम असते. ते केवळ वरवरचे असते, कारण आतून तिथे मौन नसते, तिथे असते क्षुब्धता, अपवित्रातेची भावना, पापाची भावना; हे सर्व आतून खदखदत असते.

मानवी जीवन हे उत्सव साजरा करण्याच्या लायकीचे आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या आत जे काही भरतो त्यापासून सुटका करण्यायोग्य ते आहे.

आपण काय करतो तर दागिन्यांच्या डब्यामध्ये आपण कचरा भरून ठेवतो. कचराकुंडीमध्ये दागिन्यांचा डबा नसतो तर आपण दागिन्यांच्या डब्यामध्ये कचरा टाकणे चालू ठेवतो. आपल्याला केवळ तो कचरा काढून टाकायचा आहे.

तुम्ही शुद्ध प्रेम आहात हे लक्षात घ्या. आपण पाप केले आहे आणि आपण पापी आहोत असा विचार करण्याची आपल्याला सवय लावल्यामुळे आपण आपल्या स्वतःवर इतके कडक असतो. आणि आपण स्वतःवर इतके कडक असतो म्हणून आपल्याजवळील सुंदर गुण, आपल्याला मिळालेले वरदान यांना आपण ओळखत नाही.

या सुंदर ग्रहावर आलेला प्रत्येक जण भरपूर सुंदर गुण घेऊन आलेला आहे; आपण या ना त्याप्रकारे हे केवळ ओळखत नाही.

गुरु पौर्णिमा ही तुम्ही सुंदर आहात हे तुम्ही ओळखण्याचा उत्सव साजरा करणे आहे. जेव्हा तुम्ही ही सुंदरता आणि तुम्हाला मिळालेले वरदान ओळखता केवळ तेव्हाच तुम्हाला कृतज्ञ वाटेल. ती कृतज्ञता गुरु परंपरेप्रती व्यक्त करणे म्हणजेच गुरु पौर्णिमा होय. 

ते खरे साजरा करणे होय.

आपण मौनातून बाहेर आलो आहोत (आर्ट ऑफ लिविंगच्या मौनाच्या शिबिराला उल्लेखून), परंतु आपण तरीसुद्धा आपल्या आत मौन घेऊन चालत आहोत. आता हे ओळख की तुम्ही हिरा आहात; कदाचित कचराकुंडीतील,पण हरकत नाही.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही उदास व्हावे, तुम्ही क्रोधीत होऊ नका, तुम्ही ते सगळे करू नका जे तुम्ही करत आहात. किंवा तुम्ही सदैव गोड गोड असा आणि कोणावरही वैतागू नका; नाही, तुम्ही हे सर्व करू शकता!तुम्हाला दैनंदिन जीवनात जे काही करणे आवश्यक आहे ते तुम्ही सर्व करा. तरीपण हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कृती करीत आहात त्याच्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुमच्या आजूबाजूला जे प्रसंग आहेत, तुमचे विचार, तुमची भावनिक रचना आहे त्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही स्वतःबद्दल जो विचार करता त्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. पुनःपुन्हा हे ओळख, ‘मी एक हिरा आहे, पण दुर्दैवाने, मी कचराकुंडीत पडलेलो आहे. आता मी त्याच्यातून बाहेर पडत आहे आणि स्वतःला स्वच्छ धुवून काढत आहे!’ 

ही वार्षिक धुलाई असेल किंवा वर्षातून दोनदा धुलाई असेल, मग तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही स्वतःचे समजून घट्ट कवटाळून बसला होतात ते तुमचे नव्हतेच. तुम्ही सदैव पवित्र होतात.

हे ओळखणे किंवा याच्यावर विश्वास ठेवणे इतके कठीण आहे का? तुम्ही पवित्र आहात आणि काहीतरी खूप सुंदर आहात केवळ हे ओळखण्यासाठीच आपण सुदर्शन क्रिया आणि इतर सगळे सोपस्कार करतो.

तुम्ही एक हिरा आहात, सदैव पवित्र आहात याच्यावर विश्वास ठेवणे तुमच्यापैकी कितीजणांना अवघड वाटते? (श्रोत्यांपैकी काहीजण हात वर करतात)

अरे, तुम्हाला अवघड वाटते? तुम्हाला अजून दोनेक मौनाचे शिबीर करायला पाहिजे; कदाचित केवळ एकानेच काम बनेल. तुमच्यापैकी कितीजणांना त्याच्याबरोबर जोडता आले, हात वर करा? (श्रोत्यांपैकी काही जण हात वर करतात)

अरे व्वा, मला थोडे बरे वाटले!तुमच्यापैकी निदान थोड्यांना तरी कळते आहे की मी काय म्हणतो आहे ते. मस्त!

गुरु पूजेच्या सुरुवातीला आपण मंत्रोच्चार करतो :

‘अपवित्रः पवित्रो वा सर्ववस्थान गतो पि वा. या स्मरेत पुंडरीककाशं, स बाह्य अभ्यंतरा सूची हि.’

पवित्र किंवा अपवित्र, तुम्ही कसेही असा (तुमचे इतके अधःपतन झाले असेल कि तुम्ही दलदलीमध्ये एकदम खोलात असाल) तरीसुद्धा हे लक्षात ठेवा की तुम्ही कमळ (कमळाचे फुल हे चिखलात फुलते पण त्याला कधीच चिखल लागलेला नसतो किंवा ते त्या चिखलात अडकून नसते.) आहात. सत् हे कमलाप्रमाणे फुलून आलेले आहे. (पुंडरीक चा अर्थ आहे कमलाप्रमाणे फुलणे). 

सत् हे साक्षीदार आहे; जेव्हा तुम्हाला माहिती असते की तुम्ही साक्षीदार आहात तेव्हा तुम्हाला आंतरिक आणि बाह्य पवित्रता ताबडतोब मिळते (स बाह्य अभ्यंतरा).

या स्मरेत पुंडरीककाशं;  हे म्हणजे केवळ कमलनयन असलेल्याची आठवण करणे असे नाही.

इथे दोन गोष्टी आहेत; आकाशं (डोळा) म्हणजे साक्षीदारसुद्धा होय. पुंडरीक  (कमळ) म्हणजे फुलणेसुद्धा, तरीसुद्धा चिखलाने ना बरबटलेले ना चिखलाचे डाग पडलेले.

म्हणून, जेव्हा चैतन्य फुलून येते तेव्हा ते डागरहित आणि अस्पर्शित असते, त्याच वेळी ते साक्षीदार असते आणि ते जागृत चैतन्य असते. 

जागृत चैतन्याच्या नुसत्या आठवणीने तुम्हाला पवित्र वाटते.

जेव्हा साक्षात्कारी गुरु परंपरेबरोबर तुम्हाला जोडलेले वाटते तेव्हा अचानकपणे पावित्र्य उदय पावते. जेव्हा तुम्ही अतिशय प्रेम करीत असलेल्या व्यक्तीबद्दल विचार करता तेव्हा तुमच्यात प्रेम जागृत होते. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूचा किंवा तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीचा विचार करता तेव्हा एक अप्रिय संवेदना तुमच्या शरीरात उठते; तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी क्षोभित होऊन उठते. ज्याचा कशाचा किंवा ज्याचा कोणाचा आपण विचार करतो, ते आपल्या शरीरात घडते. म्हणून, जेव्हा तुम्ही साक्षात्कारी लोकांबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यात एक पावित्र्याची भावना उदय पावत आहे.

जर तुम्ही कोणा अतिशय लोभी किंवा महत्वाकांक्षी व्यक्तीचा विचार करता तेव्हा त्याप्रकारची कंपने तुमच्यात उठतील. जर तुम्ही कोणा अतिशय शांत किंवा आनंदी व्यक्तीचा विचार कराल तर तुम्हाला तशीच कंपने जाणवतील. तुमचे चैतन्य आनंदाची तीच भावना पकडेल.

तुम्ही कोणाचा तिरस्कार का करता कामा नये? याचे कारण असे की तुम्ही ज्याचा कोणाचा तिरस्कार करता ती व्यक्ती तुमच्या चैतन्याच्या मोठ्या भागाला अडवून बसते.

ज्याचा कोणाचा तुम्ही विचार करता, तुम्ही त्याचे गुण स्वतःमध्ये आत्मसात करता.  म्हणून, जेव्हा तुम्ही फुललेल्या, साक्षीदार असलेल्या उच्चकोटीच्या परंपरेच्या चैतन्याचा विचार करता तेव्हा अचानक तुम्हाला स्वतःच्या आत आणि आपल्या आजूबाजूला पावित्र्य जाणवते. हे इतके वैज्ञानिक आणि खरे आहे.

ध्यान करताना भगवान बुद्ध यांच्या मूर्ती का ठेवल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहे?

जेव्हा बुद्ध देह सोडून गेले तेव्हा त्यांनी बुद्धांच्या मूर्ती ठेवणे सुरु केले. जेव्हा तुम्ही बुद्धाच्या मूर्ती समोर बसतो तेव्हा तुम्ही बुद्धाप्रमाणे बसणे सुरु करता. तुम्ही तुमचे डोळे बंद करता आणि तुम्हाला जाणवते की तुम्ही ती स्तब्धता आत्मसात करीत आहात. बुद्धाची मूर्ती ठेवण्यामागे ही अस्सल कल्पना होती. आज, मोठ्या, महागड्या मुर्त्या ठेवणे याची केवळ टूम निघालेली आहे.

महत्व मूर्तीला नाहीये तर तुम्ही मूर्तीप्रमाणे,तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवून बसणे याला आहे. शिथिल व्हा, तुम्ही उगीचच ज्याला पकडून बसले आहात त्याला सोडून द्या. लक्षात घ्या, ‘मी हिरा आहे, सदैव पवित्र.’ मग तुम्ही ते गुण तुमच्यात आत्मसात कराल.

प्रत्येकाचे चैतन्य हे समृद्ध आहे आणि चांगल्या गुणांनी युक्त आहे. तुम्हाला बाहेरून उसने घेण्याची गरज नाही, ते तिथे आधीपासूनच आहे. त्याला केवळ थोड्याफार पोषणाची गरज आहे. कमळाच्या फुलाप्रमाणे; सगळ्या पाकळ्या आधीपासून तिथे आहेत, त्याला केवळ उमलण्याची,उघडण्याची आणि स्वतःचे ऐश्वर्य दाखवण्याची गरज आहे,  त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण आहेत.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी, वर्षातून एकदा, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ही सुंदर मुल्ये आत्मसात केली, आणि कृतज्ञ राहा. जितके अधिक कृतज्ञ तुम्ही राहत तितके अधिक वरदान तुमच्या जीवनात प्राप्त होईल.

म्हणून, मौनामध्ये उत्सव साजरा होतो, एका पवित्रतेच्या भावनेने, आणि सहभागीपणाच्या भावनेने.

सेवा टीममधील लोक हे सेवा केल्यामुळे त्यांना किती चांगले वाटते हे वाटून घेत होते. जेव्हा तुम्ही वाटून घेता तेव्हा मिळणारा आनंद हा निराळाच असतो, आणि तेच साजरा करणे असते.

जर अजून काही असेल तर मला सांगा, आपण ते जोडू.

(श्रोते : हो, देवाबरोबरसुद्धा उत्सव साजरा करणे)