दूरदृष्टी परिपूर्ण हवी

31
2013
May
बंगलोर, भारत


भगवतगीतेमधील नवव्या अध्यायला राज-विद्या योग  किंवा राज-गुह्या विद्या  ( अत्यंत सर्वश्रेष्ठ गोपनीय ज्ञान) असे म्हटले जाते.

एक राजा कुठल्या गोष्टी साठी खूप सारे प्रयत्न करीत नाही. तुम्ही कधी कुठल्या राजाला एखाद्या गोष्टी साठी प्रयत्न करताना पहिले आहे का? म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि, एखादा व्यक्ती हे ज्ञान प्रयत्न न करता घेवू शकतो.

भगवान श्री कृष्ण याला राज गुह्या विद्या  म्हणतात. म्हणजे हे ज्ञान गोपनीय आहे.

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात,

  ‘इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । 
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसे‌ शुभात् ॥‘(९.१) 

ते म्हणतात, ‘हे अर्जुना! तू अनुसया आहेस (ज्याच्या मध्ये मत्सर, नकारात्मकता नाही), म्हणून मी तुला एक मोठे गुपीत सांगतो.’

अनुसया म्हणजे काय? जो प्रत्येक गोष्टींमध्ये अवगुण शोधत नाही त्याला अनुसया म्हणतात. असूया कुणाला म्हणतात? ज्याला आपल्या आवतीभोवती सतत अवगुण दिसतात त्याला असूया म्हणतात. एखाद्याची दृष्टी विकृत आणि अपरिपूर्ण आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये अवगुण पाहतो. असा व्यक्ती ज्याला प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण दिसतात त्याला असूया  म्हणतात.

म्हणजे असूया म्हणजे ज्याची दृष्टी विकृत आहे. अनुसया म्हणजे ज्याची दृष्टी विकृती आणि नकारात्मकते पासून मुक्त आहे. 

उदा: जर एका दुखी व्यक्तीला कोणी जर काही सांगितले तर त्याला वाटते कि तो व्यक्ती त्याची चेष्टा करत आहे. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे?

एखाद्या अस्वस्थ व्यक्तीची तुम्ही जरी स्तुती केली तरी त्याला वाटते कि तुम्ही त्याची चेष्टा करत आहात. तुम्ही त्याचे काही चांगले केले तरी त्याला त्याच्या मध्ये अवगुण दिसतात.

तुम्ही जर एखादी गोष्ट चांगल्या उद्दिष्टेने केली तरी असे व्यक्ती त्या मध्ये काही ना काही तरी अवगुण काढतात. असे व्यक्ती ज्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहण्याची प्रवृत्ती असते त्यांना असूया  म्हणतात.

अनुसया  म्हणजे ज्यांची दृष्टी विकृत नाही. असे व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अपरिपूर्णता न पाहता त्यांचा आहे तसा स्वीकार करतात.

मग तुम्हीं सर्वात गुप्त गोष्ट कुणाला सांगू शकाल? जो अनुसया आहे त्याला.

तुम्ही एखादी गुप्त गोष्ट त्याला सांगू शकता जो त्याच्या मध्ये अवगुण शोधणार नाही आणि ज्याची दृष्टी विकृत नाही.

असूया व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहतो मग तो कोठे हि असो. असे व्यक्ती आपल्या मनातील नकारात्मकता बाहेरील जगात टाकतात, आणि मग ते दुसऱ्यांना दोषी ठरवतात. ज्या व्यक्तीची दृष्टी विकृत आहे, त्याला स्वत:ची अपरिपूर्णता दिसत नाही. तो दुसऱ्यांमध्ये अपरिपूर्णता आणि वाईट गुण बघतो.  तो अवतीभोवती असणाऱ्या व्यक्ती मध्ये जास्तीत जास्त अपरिपूर्णता पाहतो. असा व्यक्ती असूया आहे. अशा व्यक्तींचा कोणीही स्वीकार करत नाही, जरी गुरु ने स्वीकार केला तरी तो गुरूच्या शिकवणी मध्ये चूक काढतो. तो म्हणतो कि, ‘गुरुदेव तुम्ही हे सांगितले खरे पण ते चुकीचे आहे’.

असा व्यक्ती गुरुचे ज्ञान काय आत्मसात करेल जो गुरूच्या शिकवणी मध्ये चुका काढतो? त्याला काहीच आत्मसात करता येणार नाही. ह्या मुळेच म्हटले आहे कि आपल्या गुरु कडे मर्यादित बुद्धीने पाहू नका, ज्ञाना बद्दलची आपली दृष्टी विस्तीर्ण ठेवा. 

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘तुझी दूरदृष्टी ही विकृतीहीन आहे म्हणून मी तुला एक थक्क करणारे गुप्त ज्ञान देवू इच्छितो. हे ज्ञान जाणल्याने तू तुझ्या सर्व दु:ख आणि नकारात्मकता पासून मुक्त होशील. हे ज्ञान पारिभाषिक (विज्ञान) आणि अलौकिक (ज्ञान) आहे.

‘हे काय आहे?’ हे जाणून घेणे म्हणजे विज्ञान ( परिमंडळ ज्ञानाच्या संदर्भात), आणि ‘मी कोण आहे’? हे जाणून घेणे म्हणजे अध्यात्म (स्व च्या अलौकिक ज्ञानाच्या संदर्भात). म्हणून ते म्हणतात की, ‘ या ज्ञानामुळे तुझी सर्व अमंगल गोष्टी पासून मुक्तता होईल आणि तुझ्या आसपास नकारात्मकता राहणार नाही. हे ज्ञान जाणल्याने तुला कसलीही इजा होणार नाही किंवा तुला कुठलेही दु:ख भोगावे लागणार नाही.

पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । 
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥(९.२) 

ते म्हणतात, ‘मी तुला अशी कोणतीही गोष्ट सांगणार नाही जी तुला समजणार नाही किंवा ज्याचा तुला सराव करावा लागणार नाही.’

समजा गुरु ने एखादी गोष्ट आपल्या भक्ताला सांगितली आणि ती जर त्याला करता आली नाही, तर त्याचा काय उपयोग? जर गुरु आपल्या भक्ताला उच्च आणि कठीण ज्ञान देत असेल जे त्या भक्ताला समजत नसेल तर त्याचा काय उपयोग?

एकदा एका ज्ञानी ऋषींचे प्रवचन ऐकण्यास एक सद्गृहस्थ गेले होते. प्रवचन ऐकून आल्यावर त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले की, ‘प्रवचन खूप छान होते. ऋषींनी अद्भुत ज्ञान दिले.’

त्यातील एका मित्राने विचारले, ‘आम्हाला पण सांग ऋषीजी कोणत्या विषयावर बोलत होते.’

ते सद्गृहस्थ म्हणाले, ‘ज्ञान खूप उच्च दर्जाचे होते, ते माझ्या डोक्यावरून गेले.’

जर त्याला त्यातील काहीच समजले नाही तर अशा उच्च दर्जाचे ज्ञान ऐकून त्याला काय मिळाले. आणि जरी एखाद्या व्यक्तीला ते कळले तरी जो पर्यंत तो त्याचा सराव करून त्याचे अनुगमन करीत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही.

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला असे कोणतेही ज्ञान सांगणार नाही जे तुला समजणार नाही अथवा तू त्याचा सराव करू शकणार नाही. मी तुला जे ज्ञान देत आहे ते सर्व ज्ञानापैकी अधिपती आहे. हे सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय आहे; ते सर्व ज्ञाना मध्ये परम आणि पवित्र आहे.’

जर ज्ञान हे शाही आणि दिव्य असून पवित्र नसेल तर त्याचा काय उपयोग? ते सर्वश्रेष्ठ गुप्त असेल, पण त्याच्या मध्ये काही पवित्रता नसेल, तर कोणालाही या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. कुठलीही लज्जित करणारी गोष्ट गुप्त ठेवली जायची नाही. मोठमोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी जे काही लागते त्या गोष्टी गुप्त ठेवल्या जायच्या. या साठीच या ज्ञानाला राजगुह्यं  म्हटले आहे म्हणजेच सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय ज्ञान.

भारताची विशेषता ही आहे कि इथे गुप्तता आणि पवित्रता एकमेकाच्या हातात हात घालून जातात. भक्ताला मंत्र हा गोपनीय पद्धतीने दिला जायचा. शिष्याला दिक्षा देताना, गायत्री मंत्र जो सर्व मंत्रामध्ये पवित्र आहे, त्याच्या कानात गुप्त पद्धतीने सांगितला जायचा. आणि शिष्याला तो मंत्र गुपीत ठेवायला सांगितले जायचे, ज्या मुळे तो मंत्र त्याच्या मध्ये एका बीजा प्रमाणे राहील. ज्या प्रमाणे बीज हे माती च्या खाली पेरले जाते. बीज हे मातीत पेरल्या मुळेच त्याला अंकुर फुटतो आणि त्याचे रुपांतर मोठ्या झाडा मध्ये होते. म्हणून गुप्तता ही एका बीजा प्रमाणेच आहे.

गुप्तता हि अशी आहे कि जिच्या मुळे जीवनात पवित्रता येते आणि जीवन एकदम सुंदर, अद्भुत होते.

म्हणून श्री कृष्ण म्हणतात कि हे ज्ञान सर्वश्रेष्ठ गोपनीय आहे. ते क्षुल्ल्क किंवा निरर्थक नाही. ह्या ज्ञानात लाज वाटेल किंवा गुप्त ठेवण्या सारखे काही नाही. हे ज्ञान जो कोणी जाणून घेईल तो आनंदी होईल आणि त्याला फायदा होईलच. या ज्ञानाला जो कोणी स्व:तला अर्पण करतो त्याची सर्व गोष्टीतून मुक्तता होते.