ज्ञानातील अंतर

31
2013
May
बंगलोर, भारत

‘प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्'. (९.२)

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘हे ज्ञान असे आहे कि तुम्हाला लगेच याचा अनुभव येईल. असे नाही कि तुम्ही जर आज त्याचे अनुगमन केले तर काही वर्षांनी तुम्हाला याचा फायदा होईल. नाही! या ज्ञानाची फळे तुम्हाला लगेच दिसू लागतील. कसे काय? तुम्हाला स्व:ताला त्याचा अनुभव घेता येईल. ज्या प्रमाणे तुम्ही भूक, दु:ख अनुभवता त्याच प्रमाणे.

जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारता का कि, ‘मला झोप येत आहे का?’

जर तुमचे पाय दुखत असतील तर दुसऱ्या कोणा व्यक्तीला विचारायची गरज नाही कि माझे पाय खरच दुखत आहे का? हे उघड सत्य आहे.

त्याच प्रमाणे, तुम्ही पाहू शकाल कि हे ज्ञान स्वत:स्पष्ट आहे आणि तत्क्षणी तुम्हाला त्याचा अनुभव येईल.

आता, तुम्ही सर्वजण सुदर्शन क्रिया, प्राणायम, ध्यान रोज करता. तुम्हाला याचा फायदा होतो कि नाही हे तुम्ही दुसऱ्या कोणाला कधी विचारले आहे का?

तुम्ही जेव्हा ध्यान करता, तुम्हाला त्यातून काय मिळाले हे तुम्हाला लगेच कळते. तुम्ही सुदर्शन क्रिया केल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव लगेच त्याचा फायदा अनुभवायला मिळतो, हो कि नाही? त्याच प्रमाणे ज्यावेळी तुम्हाला भूक लागते, त्याची जाणीव तुम्हाला लगेच होते.

ज्या वेळी तुम्ही ध्यान करता, तत्क्षणी तुम्हाला आनंद आणि शांततेचा अनुभव येतो. त्या क्षणी तुमचे मन एकदम शांत होते.

त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘ तुम्ही स्व:तासाठी या ज्ञानाचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकता. या ज्ञानाने तुमच्या आयुष्य आनंदी होईल आणि तुम्ही दु:खा पासून मुक्तता. या ज्ञानाचे अनुसरण करणे फायदेमंद आहे. हे ज्ञान समजण्यास आणि अनुसरण करण्यास सोपे आहे, आणि हे ज्ञान अनंत आणि कधीही न बदलणारे आहे.’ 

तुम्हीं एकदा जरी ध्यान केले तर त्याचे फळ तुम्हाला जे मिळेल ते अनंत आणि कायम स्थायी आहे.

तुम्ही जर एखादे चांगले कर्म केले तर त्याचे पुण्य कायम तुमच्या बरोबर राहते. म्हणून हे ज्ञान अनंत आणि कायम स्थायी आहे.

तुम्ही जर का एकदा हे ज्ञान आत्मसात केले तर ते तुमच्या जवळ आयुष्यभर राहते. ज्या प्रमाणे तुम्ही सायकल चालवायला शिकता त्यानंतर ती आयुष्यभर तुम्हाला येते. तुम्हाला ती परत ती वारंवार शिकण्याची गरज नाही. त्याच प्रमाणे एकदा जर तुम्ही हलवा ( एक भारतीय गोड पदार्थ) बनवायला शिकलात तर तो वारंवार शिकण्याची गरज नाही.

म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला आता हे ज्ञान जे देणार आहे ते अनंत आणि अजरामर आहे.’

पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । 
अप्राप्य मां निवर्तंते मृत्युसंसारवर्त्मनि’॥ (९.३) 

ते म्हणतात, ‘हे सर्वोच्च ज्ञान जे मी तुला सांगणार आहे त्याच्यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर ते मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत.’

ह्याचा अर्थ म्हणजे असे व्यक्ती स्व:ताला कधीही ओळखू शकणार नाहीत. 

 म्हणून हे म्हणतात, ‘असे नास्तिक व्यक्ती मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत आणि ते जन्म मृत्यू च्या विळख्यात अडकून राहतील.’

हे पहा जो व्यक्ती या ज्ञानाच्या मार्गावर येत नाही तो या जगाच्या व्यग्रता मध्ये अडकून राहतो. हे खरे आहे कि नाही? तो रोजच्या जीवनातील संघर्षा मध्ये अडकून राहतो. त्याच त्या तक्रारी, त्याच त्या अडचणी, त्याच त्या गोष्टी वारंवार येत राहतात.

जो ज्ञान विरहीत आहे, ज्याची दृष्टी पारिभाषिक नाही, किंवा ज्याचा जीवनात मोठे उद्दिष्ट नाही असा जीवनात काहीही कमवू शकणार नाही. 

असे व्यक्ती काय करतात? ते इच्छा आणि परावृत्ती मध्ये जखडून जातात. असे व्यक्ती, त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्याशीच भांडतात आणि त्यांच्या बरोबर जे भांडतात त्यांच्यावर ते प्रेम करतात. ह्या मुळे त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांचे शत्रू बनतात आणि त्यांचे जे शत्रू आहेत ते त्यांचे मित्र होतात.

तुम्ही पाहिले असेल कि तुम्ही जर कुणाचे वाईट केले नसले तरी काही लोक तुमचे शत्रू बनतात. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? (प्रेक्षका मध्ये बरेचजण हात उंचावतात) 

पहा, बहुतांश जण हात उंचावत आहेत!

लोक जीवनात एका पाठोपाठ एका अशा घटनातून जात असतात आणि शेवटी ते मृत्यू ला सामोरे जातात. त्यांना या जन्म मृत्यू च्या विळक्ख्यात बरेच दु:खे भोगावे लागतात, आणि त्यांना सु:ख मिळत नाही. या भौतिक जगात खरा आनंद, सु:ख मिळणे फार कठीण आहे. आणि तुम्ही जर जास्त त्याचा शोध घेत राहिलात तर तुम्हाला जास्त दु:खे भोगावे लागतील. 

ज्याचा या ज्ञानावर विश्वास नाही आणि ज्याचे जीवन भक्ती विरहीत आहे अशा व्यक्तीच्या जीवनात काय असून शकेल?

जीवनातील प्रत्येक गोष्टी वर हे जीवन अर्पण करणाऱ्या या भव्य शक्ती वर जर कुणाचा विश्वास नसेल, जी शक्ती या प्रेमाचा अविष्कार आहे, तर त्याच्या जीवनात काय उरेल? त्याचे जीवन किती कंटाळवाणे असेल.

असा व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ती साठी धडपडत असतो आणि सारखे काही तरी नवीन मागत असतो. त्याला जेव्हा ते मिळत नाही तेव्हा तो दु:खी असतो, आणि ते मिळाल्यावर सुद्धा तो दु:खी असतो. यालाच मृत्यू संसार  म्हणतात (हे भौतिक जगताच्या संदर्भात आहे जिथे सर्व काही अस्थायी आहे, अखंडपणे बदलते आहे आणि मृत्यू च्या आधीन आहे).

म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘असे लोक ज्यांचे जीवन विश्वास आणि भक्ती विरहीत आहे मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत. असे लोक अखंड देवत्व म्हणजेच मला प्राप्त करण्यास अपयशी ठरतील, आणि ते या मृत्यू लोकात येत राहतील (बदलते भौतिक विश्व)’.

पुढच्या दोन श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । 
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः‘॥ (९.४) 

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । 
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः’॥ (९.५) 

भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हे अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी म्हणजे माझा अविष्कार आहे. तरी पण मी निराकार आणि अव्यक्त आहे. ही संपूर्ण सृष्टी (ज्याच्या मध्ये आकार आहे) मी निर्माण केली आहे (सुक्ष्म निराकार ईश्वरत्व). तू जे काही या सृष्टी मध्ये पहात आहेस त्याची मिर्मिती मी केली आहे. सर्व पाच भूत: ( सृष्टी चे पाच मुलतत्वे) – पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, आणि वायू माझ्या मध्ये समाविष्ट आहेत आणि माझ्या पासून त्याची निर्मिती होते. पण त्यांच्या मध्ये मी समाविष्ट नाही.

हे म्हणजे ‘हा कपडा माझा आहे पण मी त्या कपड्यात नाही’ असे म्हटल्यासारखे आहे.

पहा, तुम्ही तुमच्या कपड्या मध्ये आहात आणि त्या कपड्या मध्ये तुम्ही झाकले गेले आहात, तरी पण तुम्ही म्हणजे तो कपडा नाही जो तुम्ही घातलेला आहे. त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हया पंच महाभूतांचा जन्म माझ्यापासून झाला आहे, ते माझ्या मध्ये समाविष्ट आहेत तरी पण मी त्यांच्या मध्ये नाही (ह्याचा अर्थ म्हणजे ईश्वर म्हणजेच दिव्य चेतना ही पंच महाभूतांसाठी मर्यादित नाही जरी त्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी)’. 

हेच भगवान श्री कृष्ण इथे सांगतात, आणि हेच मोठे गुपीत आहे.

या ठिकाणी ते म्हणतात की, ‘मी एक निराकार पैलू आहे जो कोणालाही दिसत नाही आणि तुम्ही जे काही पाहता त्याच्या पलीकडे आहे.’

उदा: एक झाड आहे आणि त्याच्या खोडामध्ये मधुरस आहे. पनू तुम्ही फक्त झाड पाहू शकता पण त्यातील मधुरस नाही.

म्हणून इथे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तो (ईश्वर) मधुरस आहे जो या सृष्टीमध्ये विविधतेचा उत्कर्ष करतो. सर्व झाडे, त्यावरील पाने, त्यांची फळे या सर्वांच्या मागचे कारण मी आहे. त्याच प्रमाणे तुम्ही व्यक्तीला पाहू शकता पण त्याच्या आत्म्याला नाही. आत्मा हा निराकार आहे आणि तो आत्मा म्हणजे मी आहे.’

प्राणशक्ती हि आपल्या शरीराच्या प्रत्येक कणा कणा मध्ये असते. ज्या क्षणी हि प्राणशक्ती शरीर सोडून जाते त्या क्षणी तो व्यक्ती मृत म्हणून जाहीर केला जातो.

उदा: जेव्हा तुमच्या शरीरावरील काही त्वचे बाग भाजला जातो, काही काळानंतर त्या भागावर तुम्हाला काही वेदना होत नाहीत. तुम्हाला त्या भागावर काही झाले तरी कळत नाही कारण त्या भागातील प्राणशक्ती नष्ट झालेली असते.

या सृष्टी मध्ये चेतने मुळे जीवन आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘तुमच्या चेतनेला आधार देण्यासाठी मी या सृष्टी मध्ये सर्वत्र आहे. हे मोठे गुपीत आहे जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे.’