फक्त बुद्धिमान व्यक्तीच ध्यान करतात

21
2012
Dec
बंगलोर, भारत
प्रश्न : प्रिय गुरुजी, असे म्हणतात की नेहमी आनंदी राहणे ही भक्ती असण्याचे चिन्ह आहे. मग सहसा भक्त जेव्हा वेदना, दु:ख किंवा विरह यामुळे व्याकुळ होऊन रडू लागतो तेव्हाच देव प्रतिसाद कां देतो ? मी गोंधळून गेलो आहे. माझ्या रडण्याविनाही देव माझ्याकडे लक्ष देईल कां ? एखाद्या आनंदी भाक्ताकडेही देव तेवढेच लक्ष देईल कां ?

श्री श्री : अगदी नक्की ! देवाला, रडक्या भक्ताकडे लक्ष देणे अटळ असते आणि आनंदी भक्ताकडे लक्ष देणे हे आनंदाचे काम असते.

प्रश्न : गुरुदेव, एका वाईट घटनेने सगळा देश हादरून जातो पण चांगल्या गोष्टी मात्र एखादा तरंगही न उठता दुर्लक्षितच रहातात. असे कां ?

श्री श्री : लोकांचा क्षोभ होण्यासाठी काहीतरी वाईट घटना घडावी लागते. क्षोभाने चळवळ करायला लोक अगदी सहज तयार असतात. याचे कारण म्हणजे मनात तणाव आधीपासून असतोच त्याला बाहेर पडायला वाट हवी असते. त्यामुळे चळवळ करणे ही सोपी गोष्ट होऊन जाते. जर चळवळीसाठी लोकांना बोलावले तर सगळे सहभागी होतील पण ध्यानासाठी फक्त बुद्धीमानीच सहभागी होतील.

पण मला वाटते, काळ बदलत चाललाय. आपण जिथे जाऊ तिथे आपल्याकडे चळवळीपेक्षा ध्यानाला जास्त गर्दी होते.

म्हणूनच मी म्हटले की समाजात सकारात्मक बदल होत आहेत. प्रसारमाध्यमालाच चळवळ सर्वात जास्त आवडते. बघा आपण हजारो लोक इथे बसलो आहोत. आणि टाऊन हॉलमध्ये घोषणा देऊन चळवळ करणारे याच्या एक चतुर्थांशही लोक नसतील. पण तिथे जेमतेम पाचशे लोकच असे तरी प्रसारमाध्यमांना त्या घटनेतच जास्त रुची असते. प्रसारमाध्यमे नकारात्मक बातम्या जास्त चांगल्याप्रकारे आणि जोशात प्रसिद्ध करतात.

प्रश्न : गुरुदेव, एक तरुण म्हणून, तुमच्या भोवती असलेली शांतता आणि स्थिरचित्तता याकडे मी ओढला जातो आणि जग नेमके याच्या उलट आहे असे दिसते. मी जर जगापासून अलग होऊन सन्यास घेतला तर मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून पळून जातो आहे असा अर्थ होईल कां ?

श्री श्री : सन्यास घेणे म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे नव्हे तर जास्त जबाबदारी घेणे. हे संपर्ण जगाची जबाबदारी घेण्यासारखे आहे. सन्यासाचा हा अर्थ आहे. आताच मी आपल्या आश्रमवासिंना सांगत होतो की आपण इथे एका रेझॉर्ट मध्ये राहत आहोत. आपण गावात जायला हवे, जिथे काही तरी कृती घडतेयं. मला सगळे युवक आणि गुण इथे आश्रमात अडकवून ठेवायचे नाहीयेत. मला, तुम्ही सगळ्यांनी तिकडे बाहेर, समाजात काही तरी कार्य करत रहायला हवे आहे.

जिथे शांततेची गरज आहे तिथे आपणच जाऊन शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की, “अरे वा, इथे किती शांत वाटते आहे. मी इथेच राहतो.” अर्थात इथे येणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल अधून मधून चार्ज करावाच लागतो. पण तो सारखाच चार्जिंग वर ठेऊन चालत नाही. नाही तर तुम्ही तो वापरणार कसा ? मग तो ‘मोबाईल’ ( सगळीकडे नेता येणारा) राहणार नाही. तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करता आणि मग चार्जर मधून तो बाहेर काढता. तो सतत चार्जरवर अडकवून ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला तिकडे काम करायला हवे, आणि तुम्हाला इकडेही यायला हवे ; दोन्हीही !

प्रश्न : गुरुदेव, विवाह सोहोळ्याचे महत्व काय ? जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करत असतील आणि एकमेकांचा आदर करत असतील तर ते नुसते एकत्र रहाण्याचा निर्णय घेऊ शकतात कां ?

श्री श्री : विवाह सोहळा ही एक बांधिलकी आहे. तुम्ही बांधिलकीने एकत्र राहता. जेव्हा बांधिलकी असते तेव्हाच तुमचा एकमेकावर पूर्ण विश्वास असतो. तुमच्या आयुष्यातील एक बाजू पक्की झाली. तोच विवाह आहे.

नाही तर मन जोडीदाराला शोधत राहते. विवाहामुळे जोडीदाराला शोधत रहाण्याची बाब थांबते. , ‘चला, मला माझा जोडीदार मिळाला, मी स्थिर झालो.’ मग तुम्ही दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. बांधिलकी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते.

प्रश्न : गुरुदेव, आयुष्यात ज्यांचे चांगले जमत नाही ते एकत्र अडकतात आणि ज्यांचे चांगले जमते त्यांची जोडी होत नाही. हा देवाची योजना आहे कां ? तो ते मुद्दाम करतोय कां ?

श्री श्री : तुम्ही लग्नाबद्दल म्हणताय कां ? हे बघा, जेव्हा तुमचे चांगले जमत नाही तेव्हा तुम्ही, तुमचे खूप चांगले जमत होते ते दिवस विसरता. मग जेव्हा तुमचे जमत नाही तेव्हा तुम्हाला वाटते की, ‘आपले सुरवातीपासूनच जमले नाही.’

लग्नाला ४० वर्षे झालेले एक अमेरिकन जोडपे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांना घटस्फोट हवा आहे. त्या बाई म्हणाल्या, “गुरुदेव, तुम्हाला महिती आहे कां, आमच्या लग्नाला ४० वर्षे झाली पण आमचे एक दिवसही पटले नाही !“

मी म्हणालो, तुम्ही चाळीस वर्षे एकत्र राहिलात आणि एक दिवशी तुमचे जमले नाही, असे कसे होईल ? ते आताच ६० आणि ७० वर्षांचे आहेत.त्यांचे गेली चाळीस वर्षे पटले नाही आणि अजूनही ते एकत्र रहताहेत. अमेरिकन समाजात सहसा असे होत नाही. जर दोन लोकांचे जमले नाही, तर मग झालेच, ते अजिबात एकत्र राहत नाहीत. अचानक तुमच्या मनात येते की, पूर्वीसुद्धा आपले कधीच पटले नाही. जग असेच आहे. ज्या लोकांच्या बरोबर चांगले जमेल असे वाटते त्यांच्या बरोबर चांगले जमेलच याची काही खात्री नाही. दुसऱ्यांची हिरवळ नेहमीच जास्त हिरवी वाटते.

प्रश्न : गुरुदेव, अष्ट गणपती बद्दल कृपया सांगाल कां ?

श्री श्री : आठ हा आकडा आठ प्रकारच्या प्रकृतींशी संबंधित आहे. अष्ट प्रकृती. असत प्रकृती काय आहेत ? पृथ्वी,आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. हे सगळे आपल्यात असते. कोणा एका महात्म्याने म्हटले, ‘ या प्रत्येक प्रकृतीसाठी एक गणपती असावा’ इतकेच.

या सगळ्यात पडू नका. बारा ज्योतिर्लिंगे कां, अष्ट गणपती कां ? प्राचीन काळी समाजाला एकत्र आणण्याचे काही मार्ग होते. प्राचीन काळी लोकांना सगळ्या समाजाला एकत्र आणायचे होते कारण या देशात, दर ६०० किलोमीटरवर भाषा आणि संस्कृती बदलते. दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम यांच्यात काहीच सारखेपणा नाहिये. तर मग देशाला एकत्र कसे आणायचे ? मग त्यांनी सांगितले की, ‘बारा ज्योतिर्लिंगांना जा. काशीला जा, रामेश्वरला आज, त्र्यंबकेश्वरला जा’ वगैरे. अशाप्रकारे त्यांनी एकप्रकारची आध्यात्मिक यात्रा करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रोत्साहन दिले, इतकेच.

अष्टगणपतींचेही असेच. लोकांनी महाराष्ट्रातल्या निनिराळ्या ठिकाणी जावे ही कल्पना होती. त्यांना लोकांना एकत्र आणायचे होते म्हणून मग त्यांना तीर्थक्षेत्रांच्या भोवती फिरवायचे. त्याकाळी इतर काही कारणाने प्रवास, सुट्टीवर जाणे वगैरे नव्हते. यात्रा हाच प्रवास होता. जेव्हा एखाद्या पवित्र स्थानाचा प्रवास असतो, तेव्हा लोक म्हणतात, ‘मला गेले पाहिजे.’ म्हणून त्यांनी ही सगळी वेगवेगळी देवळे निर्माण केली जेणेकरून लोक दर्शनाच्या निमित्ताने तिथे जातील.

प्रश्न : गुरुदेव, क्रिया झाल्यानंतर बरेच वेळा मी नकळत हसतो आहे असे मला दिसते. मी एकटा असतो तेव्हाही मी हसत असतो. मला कळत नसते की मी हसतो आहे. सगळ्यांना वाटते की माझ्यात काहीतरी गडबड आहे.मी त्यांना काय सांगू ?

श्री श्री : जर सगळ्यांनाच वाटत असेल की तुमच्यात काहीतरी गडबड आहे तर तुम्ही ते गंभीरपणे घेतले पाहिजे. तुम्ही गंभीरपणे बघितलेच पाहिजे. जर सगळेजणच तसे म्हणत असतील तर मग ते ठीक नाहिये. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा विचार करायला हवा. इथे मी असे म्हणणार नाही की ‘ दुसऱ्यांच्या मताचा फुटबॉल बनू नका.’ तुम्हाला काय वाटते ही एक गोष्ट आणि तुम्ही ती कशी व्यक्त करता ही दुसरी गोष्ट. तुम्हाला अगदी शांत आणि आनंदी वाटत असेल पण जेव्हा तुम्ही ते व्यक्त करता तेव्हा तुम्ही हे बघायला हवे की तुम्ही ते कसे व्यक्त करताय आणि कुठे व्यक्त करायला हवे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, तुमच्या काही आवडत्या गोष्टी आहेत कां ? तुमची आवडती व्यक्ती कोण आहे ? तुमचा आवडता राग कोणता आहे आणि तुमचा आवडता खेळ कोणता आहे ?

श्री श्री : मी यापैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण तसे काहीच नाहिये. खूप पूर्वी मी एकदा इंग्लंड मध्ये होतो, आणि एका बाईनी मला विचारले, ‘ गुरुदेव, मी तुमच्यासाठी नाश्त्या ला काय बनवू ?’ मी म्हटले,’ काहीही बनव, तुला जे आवडते ते बनव.’ मग ती म्हणाली, ‘ मी ढोकळा बनवू कां ?’ मी म्हटले, ‘हं, ढोकळा चालेल.’ तिने मला विचारले, ‘ तुम्हाला आवडतो नां ?’ मी म्हटले, ‘ हो’. मग तिने ढोकळा बनवला. आणि मग तिने सगळ्याना बोलावून सांगितले की, ‘गुरुजींना ढोकळा आवडतो. कल्पना करा काय झाले असेल. त्यानंतर पुढचे पंधरा दिवस मी जिथे जाईन तिथे नास्ता, सकाळचे जेवण, रात्रीचे जेवण सगळ्याला फक्त ढोकळे!

प्रश्न : गुरुदेव, तुमच्यासारखी विनोद बुद्धी माझ्यात कशी येईल ?

श्री श्री : तुमच्यात ती आहेच. निवांत रहा. कुणावर छाप पाडण्याचा प्रयास करू नका. तुम्ही आहात तसेच राहा. जे लोक विनोदी व्हायचा प्रयास करतात त्यांचे मला वाईट वाटते. स्वत:ला विनोदवीर म्हणवणारे लोक रोज, लोकांना हसवण्यासाठी नवीन नवीन विनोदांच्या शोधात असतात. आणि ते इतके कृत्रिम हसू असते.

विनोद करणारे ते सगळे विनोदवीर अगदी दयनीय असतात. त्यात काहीच विनोदी नसते. त्यांच्याकडे पाहून रडावेसे वाटते.

तुम्ही सदाबहार आहात !!

25
2012
Dec
बैड एंटोगस्त, जर्मनी
जगातील सर्वजण इथे जमले आहेत, हे खूप चांगले आहे.

हे आपल्या परिवाराचे पुनर्मिलन आहे. जगातील सर्वजण मिळून आपण इथे ख्रिसमस साजरा करीत आहोत.

हे इथले ख्रिसमस चे झाड तुम्हाला सांगत आहे कि, ‘ तुम्ही माझ्या सारखे व्हा, सदाबहार, प्रकाशमय, भरपूर भेट वस्तू घेवून’.

तुम्ही इथे प्रत्येक जण क्रिसमस च्या झाडा सारखे, लखलखणाऱ्या भरपूर भेट वस्तू घेवून, प्रकाशमय आणि सदाबहार!

पुढील वर्षी आणखी बरेच जण या अध्यात्मिक मार्गावर दिसतील आणि हा मार्ग आणखीनच बहरेल. २०१३ मध्ये आम्ही दोन प्रकारच्या नवीन क्रिया शिकविणार आहोत ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि छान आहेत.

प्रश्न: या नवीन काळा बद्दल काही सांगू शकाल का? स्त्रियांची या मध्ये मोठी भूमिका असेल का?

श्री श्री: या जगामध्ये स्त्रियांना खूप मोठी भूमिका करावी लागेल. सध्याची त्यांची भूमिका मोठीच आहे, पण या पुढे याच्या पेक्षा जास्त मोठी असेल.

तुम्हाला माहीत आहे २१ डिसेंबर विषयी लोक किती चिंता ग्रस्त होते.

लोकांनी तर अशी अफवा उठवली कि २१ डिसेंबर ला हे विश्व संपुष्टात येणार.

काही जणांनी तर तळघरात अन्नाचा साठा करून ठेवला. काही जणांनी आपले घर देश सोडून कुठेतरी पर्वतावर वास्तव्य केले. हे विश्व संपणार आहे हा विचार करून बरेचजण आश्रमात आले कारण त्यांना वाटले कि आपण इथेच सुरक्षित राहू शकतो.

मी आधी पासूनच सांगत आलो आहे कि हि अफवा आहे. या जगामध्ये अशी काही लोक आहेत ज्यांना अशी अफवा उठवायला मजा येते. त्यांना काही गोष्टी विकायच्या असतात म्हणून ते अशा अफवा पसरवतात. अशा प्रकारच्या अफवा एकून लोक बाजारात जावून रोजच्या लागणाऱ्या गोष्टींचा साठा करतात. ह्या सर्व युक्त्या आहेत.

मी म्हणाले होतो कि असे काही होणार नाही. आज २५ तारीख आहे आणि काहीही झाले नाही, सर्व काही ब्यवस्थित चालले आहे. असे फक्त अमेरिकन चित्रपटातच होते आणि दाखविण्यात येते कि हे जग संपुष्टात आले.

आपण एकच गोष्ट केली पाहिजे, आपल्याला जे काही देवाने दिले आहे त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत. आणि भविष्यात आपल्याला जे काही मिळणार आहे ते मिळेलच. याचा आपल्याला विश्वास असायला हवा.

आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

तुम्हाला जेव्हा सेवा करावयाची असेल, त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे कि, ‘मला अजून सेवा करायला हवी, मी अजून काही सेवा केली नाही’. 

तुम्ही जर असा विचार केला कि, ‘ मी खूप सेवा केली आहे आणि मला त्या नुसार त्याचा मोबदला मिळाला नाही’, तर दु:खी होण्याचे हे एक रहस्य आहे. तुम्हाला जर दु:खी व्हायचे असेल तर तुम्ही मागणी करा, ‘ मला जे मिळायला हवे ते मला मिळाले नाही’.

तुमच्याकडे जे नाही त्याची मागणी केल्याने तुम्ही दु:खी होता.

आपण जर असा विचार केला कि, ‘ मी आता पर्यंत खूप काही केले आहे, आता आणखीन जास्त करायची गरज नाही’ तरी पण आपण दु:खी होतो. खरंतर ही एका निराश, क्रोधित आणि दु:खी मनाची चिन्ह आहेत.

तुम्हाला जे काही करायचे आहे, त्या वेळेस तुम्ही असा विचार करा, ‘ मला कशा पद्धतीने आणखीन जास्त सेवा करता येईल? हे विश्व सुंदर कसे बनविता येईल? मी कोणत्या पद्धतीने हातभार लावू शकेन? अशी आपली विचार सरणी हवी.

आणि ज्या वेळेस तुम्ही मोबदल्याचा विचार कराल, तुम्ही कृतज्ञता दर्शवत विचार केला पाहिजे कि, ‘ मला जे काही हवे आहे ते मला मिळाले आहे आणि भविष्यात जे काही लागेल ते मला मिळणारच आहे. मला जे काही मिळणार आहे ते निर्सगा कडूनच मिळणार आहे!’

हा आत्मविश्वास तुम्हाला आनंद देतो आणि ‘ मला या विश्वा साठी काही तरी जास्त करायचे आहे’ ही मनोवृत्ती तुम्हाला त्या दिशेने जाण्याची स्फूर्ती देते.

सज्जन लोकांचे मौन

20
2012
Dec
बंगलोर, भारत.

प्रश्न: जेंव्हा मी या मानवी जगाकडे बघतो, तेंव्हा असे लक्षात येते कि हि हे जग माझी किंवा लोकांची काळजी घेत नाही. त्यांच्यात चांगुलपणा आहे पण त्यापेक्षा त्यांच्यातील सशक्तपणाचा अभाव, लालसा आणि असुरक्षितता हे त्या चांगुलपणावर मत करतांना दिसून येतात.

ज्यापद्धतीने लोक या पृथ्वीचे हाल करीत आहेत, एकमेकांशी असलेले संबंध बघता कोणीही याच्याशी सहमत होईल. जेंव्हा तुम्ही म्हणता हे सर्व प्रेमातून तयार झाले आहे तेंव्हा मी सहजच त्याच्याशी सहमत होतो पण काहीवेळा जगात जे काही चालले आहे त्याबद्धल सहानभूती दाखवणे अवघड होते.

या सर्वातून एक घृणा उत्पन्न होते आणि मग कोणी अतिरेकी होतो, किंवा मग कोणी दुसऱ्याला मारायला धावतो, किंवा कोणा निष्पाप मुलीवर बलात्कार होतो. मी या जगाविषयी काळजी कशी बाळगावी?

श्री श्री : कोणत्याही प्रश्नाचे एकाच योग्य उत्तर असू शकते. त्याची दोन योग्य उत्तरे असू शकत नाहीत.

आणि हा जर प्रश्न असेल तर या प्रश्नाचे तुम्ही उत्तर शोधत राहावे असे मला वाटते.

पण जर प्रश्न विचारायचे सोडून तुम्ही जर या मार्गावर चालायचे ठरविले तर प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन उत्तर सापडेल.

आता तुम्ही त्याचे सामान्यीकरण करू नका! या जगात लोक प्रेमळ किंवा दयाळू नाहीत असे समजणे चुकीचे होईल. प्रत्येक जण हा स्वार्थी आहे असे समजणे चुकीचे होईल. अनेक लोक निस्वार्थीपणे या समाजाची सेवा करीत आहेत. तुम्ही सर्वांना भ्रष्टाचारी असे म्हणणे योग्य नाही.

मी तुम्हाला आमच्या गुजरात मधील एक शिक्षक जे पूर्वी एक मोठे अधिकारी होते त्यांच्या विषयी सांगू इच्छितो. ते अधिकारी असतांना त्यांना एक कारखानदाराने सुमारे ५१ कोटी रुपये एका सहीसाठी देऊ केले होते. ते कारखानदार जी जमीन वापरीत होते ती त्यांच्या नावावर करण्यासाठी फक्त एका सहीची गरज होती.

त्यांनी तसे केले असते तर त्यांना ते उचितपणे समजावून सांगता असले असते “ काही नाही हि तर प्रक्रिया आहे” किंवा त्यांनी असे पण म्हटले असते कि “ मी हे ५१ कोटी गरिबांना वाटून टाकणार आहे”. अशी अनेक स्पष्टीकरणे मनात येतील पण ते ठामपणे म्हणाले कि नाही मी ते घेणार नाही.

५१ कोटी काही थोडी रक्कम नव्हे, त्यांनी जरी तीन आयुष्यभर सरकारी नोकरी केली तरी ते शक्य नव्हते. पण त्यांनी ठामपणे त्याला नकार दिला. अशी अनेक लोक आज आपल्यात आहेत.

जो पर्यंत लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळणार नाहीत तो पर्यंत ते संवेदनशील किंवा त्यांच्यात उच्च दर्जाची संवेदनशीलता येणार नाही. एखादी व्यक्ती संवेदनशील होणे किंवा तिच्यात संवेदनशीलता येणे या दोन्ही साठी ध्यान आणि ज्ञान याची गरज असते.

मी ज्याप्रमाणे म्हणालो कि जग हे वाईट लोकांमुळे वाईट नाहीये तर ते सज्जन लोकांच्या मौनामुळे वाईट आहे.

मी तुम्हाला असे सांगू इच्छितो कि दुसऱ्याला जोखू नका, कारण तो कसा आहे ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही स्वतःला तरी पूर्ण ओळखिले आहे काय? तुम्ही केंव्हा दयाळू होता आणि केंव्हा कठोर होता हे तुम्ही पण सांगू शकत नाही.

काहीवेळा लोकांशी तुम्ही कठोर वागता आणि तुम्ही त्या कठोर वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता कि त्यांची तशीच लायकी आहे. तुम्हाला तसे वाटते कि नाही?

आणि काही वेळा तुम्ही दयाळू होता आणि त्याचे पण तुम्ही समर्थन करता, होय कि नाही? 

तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना आणि वागणूक समजत नाही तर तुम्ही दुसऱ्याला कसे जोखू शकता किंवा इतर सर्वांना कसे जोखू शकता?

“हे जग निर्दयी, भ्रष्टाचारी आणि वाईट लोकांनी भरलेले आहे” ते सर्व वाईट लोक आहेत असे तुम्हाला का वाटते? नाही! ते तसे नाहीये. 

तुम्ही तुमचे विधान एकदा परत तपासून बघा.

तुम्हाला स्वतः विषयी चांगले वाटत आहे काय? तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला वाटते आहे काय?

तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला वाटते, पण जे तुमच्या सहवासात आले आहेत त्यांना तुमच्याविषयी काय वाटते हे विचारा. ते तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटते त्यापेक्षा वेगळे असेल.

तुम्ही स्वार्थी आहात असे जर तुम्हाला इतर कोणी सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?

अगदी आतमध्ये तुम्हाला तुम्ही स्वार्थी नाही असे वाटत असले आणि जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वार्थी आहात असे म्हणाले किंवा तुमच्यात इतर काही वाईट प्रवृत्ती आहेत असे म्हणाले तर तुम्ही काय म्हणाल “ हे बघा माझ्यात काही चांगले गुण सुद्धा आहेत” असे तुम्ही त्यांना सांगाल कि नाही?

जो चांगला नाही किंवा सहृदय नाही असा माणूस जगात सापडणे कठीण आहे.

फक्त असे लक्षात ठेवा कि सहृदयपणापासून वंचित आहे असा कोणीही माणूस या जगात नाही. काहीवेळा हा सहृदयपणा हा तणाव आणि अज्ञान यात दडलेला असतो.

ज्यांनी महिलांवर अत्याचार केले आहेत, ते आता म्हणत आहेत कि “ मी अविचारी कृत्य केले आहे मला फाशी द्या”.

ते काही काळ जागरूकपणा विसरुन गेले होते. त्याबद्धल त्यांना आता खूप पश्चात्ताप होत असणार. किती हा अपराधीपणा आणि पीडा!

जेंव्हा तुम्ही तुमचे दृष्टी क्षेत्र विस्तारीत करता तेंव्हा मग अपराध्याबद्धल पण तुमच्या मनात अनुकंपा निर्माण होते.

असे पहा कि भूतकाळात तुम्ही काही चुका केल्या असतील. पण जर कोणी त्या सारख्या उगाळत बसले तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला ते आवडणार नाही. तुम्ही म्हणाल कि ते विसरुन जा आणि पुढे चला.

असे तुम्ही म्हणाल कि नाही? तुम्ही या सच्चाइला सामोरे जायला पाहिजे!

तुम्ही जगाकडे कसे पाहता हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून असते. तुम्हाला सर्व जण जर गुन्हेगार वाटत असतील तर तुमची वागणूक हि सर्वाशी असभ्य आणि अप्रिय अशीच राहील आणि तुम्ही त्याचा एक भाग असाल. म्हणून असे म्हटले आहे कि “यथा दृष्टी तथा सृष्टी”. तुम्ही जशी कल्पना करता तशी सृष्टी तुम्हाला दिसते.

प्रश्न: महाभारतात भिष्मसारखे हुशार लोक संवेदनशील प्रश्नांवर शांत राहून दुर्योधानासारख्या व्यक्तीबरोबर राहून त्याच्या बाजूने कसे लढू शकतात?

श्री श्री: मी महाभारताविषयी बोलावे असे तुम्हाला का वाटत आहे? भीष्म या बाबतीत आधीच बोललेले आहेत , त्यांना त्याबद्धल खूप उपकृत झाल्याचे वाटत होते.

दुर्योधन हा एक उच्च पदस्थ होता आणि चांगले लोक या उच्च पदस्थ व्यक्तींबरोबर फसतात. हा खरा प्रश्न आहे.

चांगले लोक हे वाईट पक्षात आणि वाईट व्यक्ती पक्षाध्यक्ष असलेल्या पक्षात आहेत. आणि काही चांगल्या पक्षाध्यक्ष असलेल्या पक्षात काही वाईट व्यक्ती पण आहेत. हे सर्वत्र होत आहे त्याला तुम्ही काय करणार? प्रत्येक पक्ष हा गुन्हेगार व्यक्तींना निवडणुकीसाठी उभे करीत आहे. तुम्हाला का ते माहित आहे? कारण त्यांच्याकडे एक गठ्ठा मते आहेत. या गुन्हेगारांकडे पैसा आणि बाहुबल असल्याने त्या जोरावर ते उभे राहून निवडून येतात. लोकशाहीत हा सर्व आकड्यांचा खेळ असतो. असे लोक निवडून येतात कारण चांगले लोक घरात बसून राहतात आणि मतदान करीत नाहीत. ते म्हणतात कि कशाला मतदान करायचे, सर्वजण भ्रष्टाचारी असून सर्व पक्ष हे निराशाजनक आहेत.

या बाबतीत सर्वत्र उदासीनता दिसून येते आणि ते मतदान करीत नाहीत हे खरे कारण आहे. 

खरे तर चांगल्यालोकांनी आपले एक गठ्ठा मत तयार करायला पाहिजे मग कोणताच पक्ष गुन्हेगार किंवा भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांना उमेदवार करणार नाही. आणि मग त्यांना सेवाभावी लोक उमेदवार म्हणून उभे करावे लागतील.

प्रश्न:  गुरुदेव, दिल्लीतील घटनेमुळे लोकांमध्ये खूप राग आहे. त्यासाठी फाशी मागणे योग्य आहे काय? त्याभितीने अशा घटना घडायचे कमी होईल काय?

श्री श्री: असे पहा कि आज अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनविल्यानंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. त्याचप्रमाणे अनेक अतिरेकी हे सुद्धा फाशीची शिक्षा सुनविल्यानंतर त्याची वाट बघत तुरुंगात खितपत पडलेले आहेत.

कसाबला जरी फाशी दिले असले तरी त्याच्यावर ३१ कोटी रुपये एवढा खर्च केला आणि मग त्याला फाशी दिले. एका अतिरेक्यावर ३१ कोटी रुपये खर्च केला आहे!

या ३१ कोटींमध्ये किती खेडी विकसित केली असती? किती रस्ते बनविले असते आणि किती घरात दिवे लागले असते?

या साठी फक्त कायदा असून उपयोगाचे नाही तर त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे , त्यासाठी आपण सामाजिक बदल घडवून आणायला पाहिजे आणि त्यातून राज्यकर्त्यांच्या आणि कायदे बनविणाऱ्या लोकांच्या मनात बदल होऊ शकतो.

प्रश्न: मी अशा एका व्यक्ती बरोबर नातेसंबंधात आहे कि जी फार मोजून मापून व्यवहार करते. त्याव्यक्तीला असे वाटते कि या नातेसंबंधामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण होईल. असा विचार करणे योग्य आहे काय?

श्री श्री : कोणाला तुम्ही त्यांचे तुमच्याबाबतीतचे प्रेम सिद्ध करायला सांगू नका. तसे झाले तर मग असे विचार सुरु होतात.

तुम्ही जर एखाद्याविषयी खूप प्रेम व्यक्त केले तर ते कसे परत करायचे किंवा त्याला कसा प्रतिसाद द्यायचा या बाबतीत ते संभ्रमात पडतात.

असे अनेक लोक आहेत कि ज्यांना प्रेम कसे मिळवायचे हे माहित नाही तर प्रेम व्यक्त करणे हि तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो कि तुम्ही या भानगडीत पडू नका. विश्राम करा आणि आनंदी रहा, असे गृहीत धरा कि मी सर्वांवर प्रेम करतो आणि सर्वजण माझ्यावर प्रेम करतात. 

मग जे काही व्यक्त करायचे आहे ते अगदी सहजपणे घडून येईल.

जेंव्हा कोणी असे म्हणतो कि मला बंधनाची भीती वाटते तेंव्हा खरे तर ते बंधनात आधीच अडकलेले असतात. म्हणून लोक म्हणतात ते त्याच्या अंकित मूल्यावर स्वीकारू नका. जे अस्तित्वात आहे त्याच्या पेक्षा काहीतरी दुसरे, लोक सांगत असतात.

असे पहा कि जेंव्हा तुम्ही शब्दांच्या पलीकडे जाऊन लोकांना समजावून घेता तेंव्हा नातेसंबंध तयार व्हायला मदत होते. पण जेंव्हा तुम्ही फक्त शब्दात अडकता तेंव्हा ते फार वरवरच्या पातळीवर जाऊन मग नातेसंबंध तयार होणे थोडेसे अवघड होते.

म्हणून नातेसंबंध हे शब्दांच्या पलीकडे आणि भावनांच्या पलीकडे गेले तरच टिकून राहू शकतात कारण शब्द आणि भावना हे नेहमी बदलत असतात. नातेसंबंध कोणत्याही प्रकारचे असोत, मग ती साधी मैत्री असो किंवा विवाह असो , भावनांच्या पलीकडे गेले तरच ते टिकू शकतात.

जेंव्हा तुम्ही शब्द किंवा विचारांचा कोणताही प्रवाह आणि भावनेचा कोणताही स्तर स्वीकारू शकलात तर तुम्ही एका अशा पातळीवर पोहोचता कि मग ते नातेसंबंध टिकून राहू शकतात.

प्रश्न: गुरुदेव, घटस्फोट हा आध्यात्मिक प्रगतीत अडथळा होऊ शकतो काय? लग्नानंतर मी आयुष्यात खूप वैफल्यग्रस्त झालो आहे.

श्री श्री : असे पहा कि तुम्ही शतप्रतिशत प्रयत्न करा. त्यातून जर तुमचे लग्न वाचले तर चांगलेच आहे. जर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही आणि तुम्हा दोघांनाही जर अभागी वाटत असेल तर मग अशा अवस्थेत एकत्र राहणे काही बरोबर नाही. मग सामंजस्याने तुम्ही दोघांनी एकमेकांना असे सांगावे कि “ आता आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत, पण आपण एकमेकांचे मित्र म्हणून राहू शकतो”.

मी आधी जसे सांगितले तसे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून ठरवा कि तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे आहे ते.

प्रश्न: असे म्हणतात कि स्वर्गात प्रेम नाही आणि ते प्रेम अनुभवण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलो आहोत.मग प्रत्येकाला स्वर्गात का जायचे असते?

श्री श्री : कारण त्यांना प्रेम म्हणजे काय तेच माहित नाही. ते फक्त प्रेम या संकल्पनेच्या भोवती फिरत असतात पण प्रेमाचा अनुभव त्यांनी घेतलेला नसतो. जेंव्हा ते या दैवी प्रेमाची अनुभूती घेतील तेंव्हा ते एका विशाल संतोषाचा अनुभव घेतील.

नारद भक्तीसूत्रात नारद म्हणतात “ तृप्तो भवती”, दैवी प्रेमाच्या अनुभूतीने तृप्त होऊन जा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, काल तुम्ही म्हणालात कि समभावाने लढा द्या. हे कसे करावे?

श्री श्री : तुम्ही फक्त त्या इराद्याने सुरवात करा म्हणजे ते व्हायला सुरवात होईल.

जेंव्हा तुम्ही काही कारणासाठी लढा देत असता, द्वेषभावाने नव्हे, तेंव्हा तुमचे मन आणि मेंदू सजग राहतील.

जेंव्हा लोक राग आणि द्वेषाने भांडतात, तेंव्हा त्यांचा मेंदू काम करीत नाही किंवा मग तो चुकीच्या दिशेने काम करीत असतो.

प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा कोणी इमानदारीने प्रार्थना करतो, तेंव्हा आतून उत्तरे यायला सुरवात होते. पण मग त्याची कल्पनाशक्ती कोणती आणि खरे उत्तर कोणते हे कसे ओळखावे?

श्री श्री : जस जसे तुम्ही यात अधिक वेळ व्यतीत कराल तसे ते तुमच्या लक्षात येईल.

प्रश्न: गुरुदेव, मी नुकतीच स्पर्धात्मक एम.टेक. परीक्षा दिली. पण मग मला मनाजोगते महाविद्यालय मिळाले नाही तर काय? त्याने माझे आयुष्य बरबाद होईल.मला चांगले महाविद्यालय नाही मिळाले तरी मी आयुष्यात यशस्वी होईन काय?

श्री श्री : खात्रीने! मी तुम्हाला सांगतो कि तुमचे यश हे असे आयुष्याच्या छोट्या घटनांवर अवलंबून नसते.

आयुष्याच्या एखाद्या भागात जरी अपयश आले तरी आयुष्य यशस्वी होऊ शकते.

प्रश्न: गुरुदेव, मी जरी नवीन विषय शिकण्यात रुची ठेवत असलो तरी माझा उत्साह हा अर्ध्यावरच संपून जातो. परिणामी मला जरी सर्व माहिती असली तरी मी कोठल्याही विषयात तरबेज नाही. मी तुमच्यासारखा सर्व विषयात तरबेज कसा होऊ?

श्री श्री : न थांबता सतत प्रयत्न करीत रहा.

आयुष्य हा एक प्रयत्न आणि विश्राम यांचा मिलाप आहे. दिवसातील थोडा वेळ का होईना विश्राम घेत चला- विश्राम म्हणजे ध्यान- आणि मग शत प्रतिशत प्रत्यत्न करीत रहा.गहरा आराम आणि गतिशील सक्रियता यांचा हा मिलाप होय.

जर तुम्ही आराम केला नाहीत तर तुमची क्रियाशीलता हि गतिशील होणार नाही. तुमच्यात जर वैराग्य नसेल तर तुम्ही आवेशपूर्ण पण होऊ शकत नाही. म्हणजेच आयुष्य हा एक विरुद्ध गोष्टींचा मिलाप आहे वैराग्य आणि आवेशपूर्ण, आराम आणि गतिशील सक्रियता. 

प्रश्न: चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती, काहीजण पैसा आणि सत्ता यांच्या भोवती फिरतात. मी आता तुमच्या भोवती फिरत आहे. या फेऱ्या घालण्याचे प्रयोजन काय? 

श्री श्री : आता जर तुम्ही काय करीत आहात हे तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्हीच असे करण्याचे प्रयोजन सांगा.

मला असे वाटते कि पृथ्वीला सूर्याबद्धल आणि चंद्राला पृथ्वी विषयी असलेले आकर्षण हे याचा हेतू असावा.

प्रश्न: शिष्याने गुरू बरोबर कसे राहावे जेणे करून त्याला गुरुंचे पूर्ण ज्ञान होऊन ते सांगतील ते सर्व त्याच्या लक्षात येईल?

श्री श्री : नैसर्गिक सहजतेने राहून. तुम्ही जसे तुमच्या जवळच्या व्यक्ती बरोबर जसे राहता तसेच अगदी नैसर्गिक सहजतेने गुरूबरोबर राहिले पाहिजे.

अन्यायाविरुद्ध लढा देणे हे तुमचे कर्तव्यच आहे

19
2012
Dec
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला रणभूमीवरच शंकानिरसन करण्यास का सांगितले जेव्हा की युद्ध सुरु होण्याआधी त्याला श्रीकृष्णाबरोबर भरपूर वेळ मिळाला होता?

श्री श्री : हे बघा,अर्जुनाने कोणतीही शंका विचारली नाही, त्याने तर केवळ ,"मला युद्ध करावयाचे नाही", इतकेच म्हटले बस्स.

ते तर भगवान श्रीकृष्ण होते ज्यांनी प्रथम प्रश्न केला. ते म्हणाले,'अर्जुना, तू दुःखीकष्टी आहेस, ज्यासाठी तू रडायला नाही पाहिजे अशा गोष्टींसाठी अश्रू ढळतो आहेस, आणि तुझे बोलणे तर एका पंडिताला शोभेल असे आहे'. भगवान कृष्ण म्हणाले, ' अशोच्यानन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासूनगतासुंश्च नानुशोचन्ति पंडिताः ' , (भगवद गीता अध्याय २,श्लोक ११ )

अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने भगवद गीतेचा आरंभ केला आहे.

ते म्हणतात, ' ज्या गोष्टीचा तू अजिबात शोक करता कामा नये अशा गोष्टीसाठी तू शोक करीत बसलेला आहेस.' असे पहा, जर तुम्ही लष्करामधील जवान आहात किंवा तुम्ही पोलीसदलात आहात तर तुम्ही तुमचे कर्तव्य हे केलेच पाहिजे.

आज दिल्लीमध्ये भव्य मेळावा आहे.

काल आर्ट ऑफ लिविंगच्या (Volunteer for A Better India ) हजारो कार्यकर्त्यांनी इंडिया गेट इथे मेणबत्तीच्या प्रकाशात मोठी पदयात्रा काढली आणि आज अनेक लोक त्यात सहभागी होत आहेत.

जे एन यु ( जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय) सहभागी झाले, आयआयटी ( इंडियन इनस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) सहभागी झाले, दिल्ली विश्वविद्यालय सहभागी झाले. या सर्वाना केवळ कोणीतरी पहिले पाऊल पुढे करून पाहिजे होते. काल सकाळी,दिल्लीच्या शिक्षकांनी मला विचारले,'गुरुदेव,आम्हाला मेणबत्तीच्या प्रकाशातील प्रार्थनेची पदयात्रा काढायची आहे.' तिथे घोषणांची नारेबाजी नव्हती,कोणाला दुषणे देणे नव्हते, कोणावर ओरडाआरडा नव्हता, तर सगळे तिथे केवळ शांतपणे गेले आणि बसले. त्यांनी काहीवेळ ध्यान केले, मेणबत्त्या पेटवल्या आणि महिला सुरक्षित असायला पाहिजे ही जागरूकता केवळ निर्माण केली.

ऐक काळ असा होता की या देशात महिला इतक्या सुरक्षित होत्या,परंतु आता चित्र बदलून ही काही निराळीच जागा बनत चालली आहे.

म्हणूनच आर्ट ऑफ लिविंगच्या आपल्या कार्यकर्त्यांनी आणि शिक्षकांनी मेणबत्तीच्या प्रकाशात पदयात्रा आणि प्रार्थना करण्याचा हा निर्णय काल दुपारीच घेतला, आणि ६ वाजेपर्यंत सगळ्या भागातून लोक पोहोचलेसुद्धा.

ज्यांना आंतरिक शांततेची किंवा आंतरिक विश्वाची किंचीतशी झलक मिळाली आहे अशा लोकांमध्ये आणि ज्या लोकांना आपल्या भावना समजत नाही किंवा ज्यांना मनःशांती मिळालेली नाही, यामध्ये मला फार मोठा फरक जाणवतो. जेव्हा असे लोक एखादे काम घेतात तेव्हा ते क्षोभित, आक्रमक होतात आणि सगळे विस्कळीत करतात.

मी काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे की जर एका पोलिसाने म्हटले, ' मला कायदा आणि सुवावस्था याची जबाबदारी घ्यायची नाही ' , तर काय होईल?

तर अर्जुन हा असाच होता. तो एक योद्धा होता आणि अन्यायाविरुद्ध लोकांचे संरक्षण करणे हे त्याचे काम होते, आणि तो म्हणत होता ,'मला अन्यायाविरुद्ध कोणचेही संरक्षण करायचे नाही.'

म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' तू ज्ञानी माणसाप्रमाणे बोलतो आहेस परंतु नागरिकांचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीपासून तू पळ काढीत आहेस.'

हे तर त्याप्रमाणेच झाले ज्याप्रमाणे दिल्ली पोलीस म्हणालेत, 'हे माझे काम नाही' किंवा राजकारणी म्हणतात ,'हे पाहणे काही आमचा व्यवसाय नाही.'

एक प्रकारे मी त्यांच्याबरोबर सहमत आहे, कारण जोपर्यंत मानवतावादी मुल्ये लोकांमध्ये जोपासल्या जात नाहीत तोपर्यंत केवळ काही थोड्या पोलिसांकडून काय होणार ? पण तरीसुद्धा!

तुम्हाला माहिती आहे, कित्येक वेळा पोलीसदलाचे मनोधैर्य हरण होते. हे असे का तुम्हाला माहिती आहे?

पोलीस आपला जीव धोक्यात घालून अपराध्याचा पाठलाग करतात आणि त्याला कैद करून घेऊन येतात आणि राजकारणी लोकांचा एक फोन येतो की , 'नाही, या व्यक्ती विरुद्द कोणतीही तक्रार नोंदवू नका, त्याला सोडून द्या' , आणि पोलिसांना त्याला सोडून द्यावेच लागते.

जेव्हा तुम्ही एका माणसाला अशाप्रकारे सोडून देता तेव्हा तो माणूस तुमच्या मागे लागतो, आणि अशा प्रकारे मनोधैर्यहरण होते. हा तर अधर्म आहे ( ते जे कायद्याला धरून नाही ). 

आरक्षणावरील बिल हे देखील एकप्रकारचा अधर्म आहे.

मी तर म्हणेन की कोणालाही आरक्षण मिळणे हे चुकीचे आहे.

नोकरी मिळण्यात आरक्षण असेल तर ते ठीक आहे परंतु बढतीमध्ये आरक्षण असणे हे बरोबर नाही. हे पहा एक व्यवस्थापक आहे आणि त्याच्या हाताखाली क्लार्क आहे. आता केवळ तो क्लार्क कुठल्या एका ठराविक जातीचा आहे म्हणून तीन वर्षानंतर जर तो वरच्या पदावर गेला तर व्यवस्थापकाच्या मनोधैर्याचे काय होईल.

या देशाचे संपूर्ण प्रशासनाचे अधःपतन होईल. जर कनिष्ट पातळीच्या लोकांना वरीष्टांचे वरिष्ठ केले तर प्रशासनाचा संपूर्ण ऱ्हास होईल.

असा विचार करून बघा की तुम्ही पर्यवेक्षक आहात आणि थोड्या वर्षानंतर तुमच्यापेक्षा कनिष्ठ असलेला माणूस तुमचा वरिष्ठ होईल आणि त्याने जे काही केले त्याबद्दल तुम्ही त्याला जबाबदार धरू शकाल का? सर्वात प्रथम तर नाही! आणि दुसरे म्हणजे समजा की तुम्ही तुमचा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहात आणि उद्या तुमचा कनिष्ठ असलेला तुमचा वरिष्ठ झाला आणि त्याने तुमच्यावर सूड उगवला तर हे सर्व किती अपमानास्पद होईल.

जेव्हा हाताखालचा कनिष्ठ कोणत्याही विभागाचा वरिष्ठ होतो तेव्हा तर लोकांना हे तसेच फार अपमानास्पद असते. यामुळे विभागीय रचनाच संपुष्टात येईल.

ही तर देशासाठी अतिशय दयनीय स्तिथी आहे.

सकाळपासून मी अनेक लोकांना बोलावले आणि मी त्यांना सांगितले की हे अर्थशून्य आहे. राज्यसभा तर या देशातील बुद्धिमान लोकांचे सभागृह आहे. या देशाच्या बुद्धीमान लोकांच्या सभागृहाने असा कसा हा कायदा बनवला? हा धोकादायक आहे. भविष्यकाळात लोक त्यांना याकरिता माफ करणार नाहीत.

हे जातीविषयी नाहीये. तुमचे कनिष्ठ असलेल्या एका गटातील लोकांना बढती देण्यात येऊन त्यांना तुमचे वरिष्ठ केले जाते केवळ या कारणाकरिता की ते एका विशिष्ठ जातीचे आहेत,हे असे करणे योग्य नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने याआधीच हा कायदा दोनदा काढून टाकला आहे, आणि तरीसुद्धा ही माणसे असा कायदा बनवीत आहेत. हे तर संपूर्णपणे अस्वीकार्य आहे.

जर कायद्याचे न्यायालय सांगत आहे की हा अन्याय आहे आणि ही सबंध प्रक्रिया आम्ही वर्ज्य करू पाहत आहोत, तर असे करणे बरोबर नाही. आणि आपण लोकांनी डोळे बंद करून स्वस्थ बसता कामा नये.

शिक्षणामध्ये आरक्षण, नोकरी मिळवण्यात आरक्षण इथपर्यंत ठीक आहे, परंतु बढतीमध्ये आरक्षण केले तर त्यामुळे प्रशासन व्यवस्था ढासळून जाईल. हा एकदम गंभीर मुद्दा आहे. तुम्हाला नाही का असे वाटत? तुमच्यापैकी किती लोकांना असे वाटते? ( सगळे हात वर करतात )

म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' दुर्योधन इतका हाहाकार करीत आहे आणि तुला डोळे बंद करून केवळ स्वस्थ बसायचे आहे. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. चल उठ.'

आणि जेव्हा तो युद्धाला तयार झाला तेव्हा भगवान कृष्णाने त्याला ज्ञान दिले, 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय', ( भगवद्गीता अध्याय २, श्लोक ४८ )

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ' सर्वप्रथम स्वतःच्या आत जा आणि स्वतःची शुद्धी कर. तिरस्काराबरोबर दोन हात करू नको, तर न्यायाकरिता युद्ध कर,हे युद्ध संयमशीलतेसहित कर.

जर तुम्ही त्वेषाने आणि संतापाने लढा द्याल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात कारण तुम्ही त्वेषात आणि भावनातिरेकाच्या लाटेवर स्वार आहात आणि तुमचे मन आणि बुद्धी नीटपणे कार्यरत नाहीत.

याकरिताच तुमचे मन शांत असणे सर्वात प्रथम गरजेचे आहे. जेव्हा मन शांत आणि धीरगंभीर असते तेव्हा न्याय होईल, योग्य विचार येतील आणि तुमच्या कल्पना जास्त सृजनशील, फलदायी आणि सकारात्मक असतील. जेव्हा तुम्ही संतापलेले असता तेव्हाच नकारात्मक कल्पना येतात. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा शांत आणि सकारात्मक सृजनशील कल्पना तुम्हाला सुचतात. भगवद्गीतेचे हेच सार आहे.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात , 'युध्यस्व विगत-ज्वरः.'

ज्वरः याचा अर्थ तो क्षोभ, तो क्रोध आणि तिरस्कार; याला सर्वात आधी सोडून द्या आणि नंतर लढा द्या.

भगवद्गीता ही वर्तमान स्थितीला किती लागू पडते हे पहा. हे तर उघड आहे.

ज्या कार्यकर्त्यांनी कालचा आणि आजचा दिवस इंडिया गेटला जाऊन आणि जागरुकता निर्माण करण्यात आणि संपूर्ण देशात मोठी लाट निर्माण करण्यात खर्ची घातला त्या सर्वांकरिता मी फार खुश आहे.आपल्या आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यकर्त्यांनी जे काही काल दिल्लीमध्ये केले ते आज संपूर्ण देशात पसरले आहे. सगळीकडे मेणबत्तीच्या प्रकाशात पदयात्रा निघत आहेत आणि लोक पुढे येत आहेत आणि महिलांवरील हिंसाचाराच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. हे अतिशय स्वागतार्ह आहे.

स्वतःच्या शक्तीला कमी लिखू नका असे मी सतत सांगत राहतो. आपल्यात जी शक्ती आहे त्याने परिस्थिती बदलते. इथे असलेली प्रत्येक व्यक्ती ही एक नेता आहे, आणि तुम्ही प्रत्येकजण समाजात मोठा बदल घडवून आणू शकता. जर तुम्ही एकत्र आलात आणि काहीतरी केले तर या देशात बदल घडतील आणि इथले लोक बदलतील. हे असे घडणार हे नक्कीच कारण प्रत्येकामध्ये एक दुर्दम्य प्रबोधन हे.

प्रत्येकाने जबाबदारी घेणे हे फार महत्वाचे आहे. आपण केवळ एका माणसाकडे बोट दाखवू शकत नाही आणि केवळ त्यांनाच जबाबदार धरू शकत नाही. देशाची लोकसंख्या केवढी मोठी आहे,या एका पोलिसाने त्याचे काम केले नाही असे म्हणणे आपल्याला परवडण्यासारखे नाही.

लोकांनी जबाबदारी पत्करणे सुरु केले पाहिजे आणि तसे प्रत्यक्ष घडताना दिसत आहे ही एक फार चांगली बातमी आहे.

प्रश्न : आपली मृत्यूची तिथी ही पूर्वनिर्धारित असते का अथवा ती आपल्या हयातीत ती बदलू शकते?

श्री श्री : होय, ती बदलू शकते.

हे तर एखाद्या महामार्गाप्रमाणे आहे, महामार्गामध्ये तुम्हाला मुख्य रस्ता सोडण्याचे काही निर्गम द्वार येतात, हो कि नाही?! त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्येसुद्धा असे काही निर्गम क्षण येतात. जर तुम्ही एका जागी चुकलात तर मग तुम्हाला पुढच्या निर्गम द्वाराकडे जावे लागते.

एक नवी सुरवात

12
2012
Dec
बंगलोर, भारत

जेंव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते तेंव्हा त्याला तपस्या ( शरीर शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले केंद्रित प्रयत्न) म्हणतात. पण जेंव्हाजगातील अनेक लोक एकत्र येऊन ध्यान करतात तेंव्हा त्याला यज्ञ म्हणतात आणि त्यातून एक सात्विक बंधुभाव तयार होतो त्याला एक खास महत्व प्राप्त होते कारण आज जगाला त्याची गरज आहे. म्हणून हे एका नव्या सुरवातीसाठी फार सुंदर आणि फार पवित्र असे आहे.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जी म्हणजे कि आपण प्राचीन असून सुद्धा आपण आधुनिक आहोत.

त्यासूर्याकडे पहा, तो जसा प्राचीन असून सुद्धा आज अगदी ताजातवाना दिसतोय! त्याचे किरण ताजे दिसताहेत, हवा पण अगदी ताजी आहे, झाडे पण ताजी दिसत आहेत, जुनी झाडे पण नवीन ताजी पाने! म्हणून तुम्ही पण अगदी ताजे आहात.

तुम्ही अगदी असेच जगायला पाहिजे- प्राचीन तरीसुद्धा आधुनिक, कालातीत आणि चीरतरुण!

तुम्हाला असेच खूप ताजे आणि नवीन वाटायला लागले कि मग बघा तक्रारी आणि पश्चातापाची भावना कशी पळून जाते ते! आतमधून स्वीकृतीला सुरवात होऊन, मग गतिशीलता आयुष्यात प्रवेश करून सामंजस्य प्रत्येक स्तरावर वाढीला लागते.

आयुष्यात तीन गोष्टींची तुम्हाला गरज असते त्या म्हणजे- करुणा, जिद्द आणि वैराग्य. 

जेंव्हा तुम्हाला तुम्ही अभागी आहात असे वाटायला लागेल तेंव्हा वैराग्याचा विचार करा, जेंव्हा आनंदी असाल तेंव्हा जिद्द बाळगा.आयुष्यात काही जिद्द असायला पाहिजे आणि सेवा करायची जिद्द हि सर्वात चांगली, ती तर प्रत्येकाने बाळगायला पाहिजे.

तर जेंव्हा आनंदी असाल तेंव्हा सेवा करायची जिद्द ठेवा, अभागी वाटायला लागले तर वैराग्याचा विचार पाहिजे आणि करुणा तर कायम असायला पाहिजे!

प्रश्न: गुरुदेव, आजच्या आर्थिक मंदीच्या काळात भौतिकवादी लोकांना ध्यानाचे महत्व आणि गरज कशी पटवून द्यावी?

 श्री श्री : येथे काही जुन्या आठवणी कामी येतील.

असे पहा कि दुसऱ्या जागतिक युद्धाच्या सुमारास जगात अगदी संकटाची परिस्थिती निर्माण झाली होती. युद्धामुळे झालेल्या सर्वानाशामुळे लोकांना खायला अन्न कमी होते आणि इतर अनेक वस्तूंची टंचाई होती तरीसुद्धा लोक त्यातून बाहेर पडले.

या भूतलावर अनेक वाईटप्रसंग आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर अनेक संकटांनी या देशाला घेरले होते. त्या अनेक तऱ्हेच्या संकटात दुष्काळ, पूर, अन्न-टंचाई, एक मोठा प्लेग वगैरे सामील होते. पण त्या सर्व संकटातून आपण तरून गेलो होतो. सध्या परिस्थिती हि त्या संकटाइतकी वाईट नाहीये, आपण जर त्या वाईट काळातून तरलो तर यातून सुद्धा सहज तरून जाऊ.

सध्या आपण मानवी मुल्यांची वृद्धी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे, आहे ते एकमेकांमध्ये योग्य तऱ्हेने वाटून एकत्र राहायला पाहिजे. आपण एकमेकांबरोबर संवाद वाढवायला पाहिजे. मानवी संबंध हे आपल्याला या संकटातून तरून जायला मदत करतील.

जेंव्हा तुम्हाला असे लक्षात येईल कि काही लोक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला मदत करीत आहेत तर मग त्या संकटांना घाबरायला कशाला पाहिजे?

तुमचा जर दैवावर विश्वास असेल, तुमच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास असेल तर ते निश्चितच तुमच्या पाठीशी आहेत तर मग तुम्ही असे मलूल का?

म्हणून तुम्ही येणाऱ्या अशा प्रत्येक संकटाचा सामना करतांना मानवी मूल्यांकडे, दैवावादाकडे, आणि आत्म तत्वाकडे वळण्याची संधी सोडता कामा नये.

प्रश्न: गुरुदेव, कोणत्याही परिस्थितीत नवीन आणि चिरतरुण कसे राहावे? उदाहरणार्थ, जेंव्हा आपण कोणाला भेटतो तेंव्हा त्यांच्याबरोबरच्या आधीच्या भेटीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळत असते.

श्री श्री : अर्थातच, म्हणून मी तुम्ही प्राचीन आणि आधुनिक आहात असे सांगतोय. तुम्ही नवीन आहात याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही कोणाचेतरी नाव विसरुन गेला आहात.प्रत्येक वेळी तुम्ही कोणाला भेटता तेंव्हा प्रत्येक वेळी नाव विचारीत नाही.

तुम्ही नवीन आहात याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही सर्व विसरुन जायची तुम्हाला मुभा आहे.तुमची स्मृती नक्कीच काम करीत राहील पण त्यात काहीसा ताजेपणा असेल. आत्म्याच्या नवीन पणाची त्यातएक झलक दिसेल.

हे सर्व समजावून सांगणे अवघड आहे पण हे असे आहे. म्हणून नवीन म्हणजे जुने सर्व विसरुन जायची मुभा नव्हे!

प्रश्न: गुरुदेव, ध्यान केल्यामुळे बौद्धिक गुणांक वाढतो काय? तसे होत असेल तर ध्यानाने बुद्धिमत्तेत वाढ कशी होते?

श्री श्री : ध्यानामुळे मेंदू आणि मन यांना आवश्यक ती विश्रांती मिळते. विश्रांती आणि मौन यातूनच क्रियाशीलता आणि बुद्धिमत्ता उदयास येते.असा तऱ्हेने बुद्धीत वाढ होते.

प्रश्न: असे म्हटले जाते कि आपण आपले सर्व आयुष्य हे ध्यान म्हणून व्यतीत करू शकतो. माझे आयुष्य हे ध्यान कसे होऊ शकते?

श्री श्री : प्रत्येक क्षण हि एक नवी सुरवात असते.

तुम्ही जागे व्हा आणि म्हणा “ हि एक नवी सुरवात आहे!” बस, हे असे आहे!

येथे “ कसे” ला काही जागा नाही! होऊन जाउद्यात नवी सुरवात!

प्रश्न: गुरुदेव, वैदिक ज्ञानाचा जगाला कसा उपयोग होऊ शकतो ते आम्हाला सांगा

श्री श्री : याचा निश्चितच फायदा होत आहे- योग, ध्यान, श्वासाचे व्यायाम, आयुर्वेद-हे सारे वैदिक ज्ञान आहे.

वेद म्हणजे ज्ञान प्राचीन आणि आधुनिक. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान याचं प्रत्येकाचे एक असे मुल्य आहे. समाजात काही हवे असणारे बदल घडवून आणण्यासाठी ते एकत्र काम करीत आहेत.

प्रश्न: धर्म हा लोकांना एकत्र आणण्यासाठी असताना मात्र असे दिसून येते कि त्याचा वापर हा एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी किंवा फोडण्यासाठी केला जातोय.

श्री श्री : जिथे अहंकार प्रवेश करतो, तेंव्हा धर्मात संघर्षाला सुरवात होते. केवळ धर्म म्हणून नव्हे तर हा माझा धर्म आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे.

येथे ”मी”  हे संघर्षाचे मूळ कारण असते, धर्म नव्हे. आपण धर्म एक कारण म्हणून समजतो, जगात संघर्ष घडवून आणायला ते एक निमित्त होत आहे, होय कि नाही?

परमेश्वरापर्यंत पोहोचायचे धर्म हे एक साधन आहे हा विचार रुजायला पाहिजे तरच त्याचा आध्यात्मिक उपयोग होऊ शकतो, त्याचा राजकीय उपयोग नव्हे.

प्रश्न: गुरुदेव, आम्ही ज्याच्यावर भरवसा करावा, जे कधीच ढळू शकत नाही असे काय आहे?

श्री श्री : स्वयं.

तुम्ही कशावर भरवसा का करायला पाहिजे? फक्त विश्राम करा.

या विश्राम स्थितीत सर्व गोष्टी आपोआप जुळून येतील.

तुम्हाला जर एखादी चिंता सातवीत असेल तर ती मला द्या, होय मी तुमच्या बरोबर आहे. 

प्रश्न: मला विफलतेची नेहमी काळजी वाटत असेत, ते सुद्धा कोणतेही महत्वाचे काम करीत असताना. त्यामुळे माझी कार्य कुशलता कमी होत आहे. मी यातून बाहेर कसा येऊ?

श्री श्री : एक नवी सुरवात करून.

भूतकाळ विसरुन जा. तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत यावर विश्वास ठेवा.

तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे ती हि कि तुम्ही तुम्हाला पुरते ओळखत नाही.

जेंव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळाकडे बघता किंवा तुमच्या कमतरता लक्षात घेता, तेंव्हा आत्मविश्वास येण्यासाठी असे लक्षात घ्या कि तुम्ही तुम्हाला पुरते ओळखत नाही.

जेंव्हा तुम्हाला असे वाटते कि तुम्ही स्वतःला पूर्ण ओळखता तेंव्हाच तुम्ही स्वतःला नकारात्मक घटनाविषयी दुषणे देता. पण जेंव्हा तुम्ही जागे होऊन असे म्हणताकि “ मी तर मला पुरते ओळखत नाही”, तेंव्हा ती एक नवी सुरवात असते.

तेंव्हा तुमच्या असे लक्षात येईल कि तुमच्यातील अनेक गुण असून सुद्धा ते तुमच्या परिचयाचे नाहीत.

प्रश्न: कोणत्याही अपेक्षा आणि बंधने न ठेवता मी मुक्तपणे प्रेम कसे कार्य शकतो?

श्री श्री : तुम्हाला प्रेमात सुरक्षितता पाहिजे मात्र त्याचवेळी कोणतीही बंधने नको आहेत. अशा तऱ्हेने अनेक भावनांचा कल्लोळ तुमच्या मनात तयार होऊन संभ्रम उडालाय.

जेंव्हा प्रेमात असा संभ्रम तयार होतो तेंव्हा फक्त विश्राम करा आणि जास्त ध्यान करा. सर्व गोष्टी आपोआप सुरळीत होतील.

प्रश्न: गुरुदेव, प्राचीन आणि आधुनिक यात काय आहे?

श्री श्री : मी स्वतः!

महान भारताकरिता कार्यकर्ता

05
2012
Dec
नवी दिल्ली
मी दीप प्रज्वलित करीत होतो परंतु त्याला किंचित वेळ लागत होता. मी म्हणालो,'दिव्यातील तेलाला अग्नी लागण्यास अवधी लागतो पण एकदा का त्याने पेट घेतला की ते जळतच राहते.'

हेच आपल्या देशातील लोकांच्याबाबतीतसुद्धा लागू पडते. सुरुवातीला त्यांची गती मंद असते पण एकदा का ते चालू पडले की मग ते थांबतच नाहीत.

तुम्हाला माहिती आहे की जिथे आपुलकी संपते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो.

कोणीही त्यांचा परिवार किंवा मित्र अथवा ज्या लोकांना तो आपला मानतो यांच्या आवाक्यात तो भ्रष्ट नसतो.

जेव्हा आपुलकीची भावना संपुष्टात येते, त्या सीमारेषेपासून भ्रष्टाचार सुरु होतो.

दि आर्ट ऑफ लिविंग मध्ये कार्यकर्ते, शिक्षक आणि इतर हेच तर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते म्हणजे आपुलकीच्या भावनेचा विस्तार करणे- सकल विश्वच आपले आहे.

प्रत्येक समाज, प्रत्येक श्रद्धा, सर्व वयोमानातील माणसे, शहरी किंवा ग्रामीण- हे सगळे आपलाच भाग आहेत आणि हे सगळे आपले आहेत.

समस्त मानवजात एक परिवार असल्याची, सगळे आपलेच असल्याची भावना नीतीपूर्ण आणि न्यायप्रिय समाजाच्या निर्माणा करिता फार जरुरी आहे.

हे जरी कल्पनेच्या नंदनवनासारखे भासत असले तरीसुद्धा आपण हे स्वप्न सोडून देता कामा नये. आपण असा समज निर्माण करण्याचे स्वप्न पाहायला पाहिजे आणि ते सत्यात आणण्यासाठी झटायला पाहिजे.

योग्य दिशेकडे उचलेले एक छोटे पाऊल आपल्याला लांबचा पल्ला गाठायला मदत करेल आणि आपण असे घडताना बघितले आहे.

अपराध आणि भ्रष्टाचार यावर स्वार असलेला समाज जगण्याकरिता कोणासाठीही सुरक्षित नसतो. लोक असुरक्षित असतील, अशी भीती आणि अन्यायकारक प्रथांचा भडीमार असा आपला देश असता कामा नये.

इथे लोकांना नेहमीच निर्भय वाटले आहे. प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती, प्रत्येक भाषेला इथे या जमिनीवर आश्रय मिळालेला आहे. परंतु लोक आज निरनिराळ्या भीतीनी ग्रासलेले आहेत असे वेगळेच चित्र आज दिसत आहे. महिला आणि मुले यांच्याबरोबर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना सुरक्षित आणि निर्धास्त बनवणे यादिशेने आपल्याला पाऊल उचलणे जरुरी झाले आहे.

काल मी ७५६ गुन्हेगारांना संबोधित केले. त्यांना हुल्लडबाज, गुंडे, डाकू असे म्हंटले जाते. 

आम्ही त्यांना 'कर्णधर' असे निराळे नाव दिले. नवीन प्रकाशाची मशाल, असा 'कर्णधर'  चा अर्थ आहे.

(दि आर्ट ऑफ लिविंग चे YLTP शिबीरामध्ये उपस्थित राहिल्यानंतर) जेव्हा आम्ही हे ऐकले की केवळ एका आठवड्यात त्यांचे जीवन कसे बदलले तेव्हा आमच्या आशेचे पाखरू आभाळात पोचले.

जे झोपडपट्टीत छोटे मोठे गुन्हे करतात जर त्यांचे मन आणि हृदय परिवर्तन होत असेल तर आपल्याला खूप आशा आहे. याने केवळ आशाच नाही तर आपल्यावर भरपूर जबाबदारी येते.

जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण काही करू शकतो तर आपण ते केले पाहिजे. आपण स्वथ बसता कामा नये.

बेहतर (सरस) भारताकरिता कार्यकर्ता हा एक सुंदर उपक्रम आहे. मला खात्री आहे की इथे हजर असलेले तुम्ही प्रत्येक गुणित होऊन हजारो कार्यकर्त्यांचे गट बनाल आणि गुन्हे रहित, भ्रष्टाचार रहित आणि न्याय्य भारत निर्माण करण्याचा संदेश घेऊन जाल.

काय म्हणता तुम्ही?! ( सर्व श्रोते 'हो' म्हणतात ).

१ मार्च २००९ ला, मला आठवते आहे की ते तुम्ही कार्यकर्ते आणि Yes + चे विद्यार्थीच होतात ज्यांनी India Against Terrorism (आतंकवादाविरुद्ध भारत ) याची सर्व प्रथम सुरुवात केली, कारण २००८ या साली भारताने १२ महिन्यात १३ अतिरेकी हल्ले पाहिले, आणि या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला.

हे फार दुःखद आहे. या अशा घटना आपल्याला पाहाव्या लागल्या हे फारच दुःखद आहे. आणि ते तुम्हीच होतात, या इथले दिल्लीचे युवक, जे या विरुद्ध उभे राहिले आणि या चळवळीची सुरुवात केली आणि किरण बेदी,केजरीवाल आणि इतरांना आमंत्रित केले. हीच ती चळवळ होती जिने India Against Terrorism (आतंकवादाविरुद्ध भारत ) या २०१० च्या चळवळीचे बी पेरले. म्हणून तर कार्यकर्ते खूप काही करू शकतात आणि तुम्हीच खरे प्रेरणा स्थान आहात.

जर भारताचे तरुण पुढे आले आणि त्यांनी स्त्री भ्रूणहत्या, मादक द्रव्य व्यसन मुक्ती, मद्यपान व्यसन मुक्ती, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कृती हे आणि असे मुद्दे उचलून धरले तर तुम्ही संपूर्ण चित्र पालटू शकता.

स्वतःच्या ताकदीला कमी लेखू नका. मी तर म्हणतो की तुम्ही चमत्कार घडवू शकता. तुम्ही परिस्थिती १८० अंशाच्या कोनात बदलू शकता.या देशाच्या तरुण पिढी आणि तरुणांनो, शक्ती ही तुमच्याचकडे आहे.

जेव्हा मी तरुण म्हणतो तेव्हा इथे असलेले अनेक वयस्क तरुणसुद्धा यात सामील आहेत ( हंशा ).

यापैकी एका तरुणाने लग्नाचा ५६ वा वाढदिवस नुकताच काल साजरा केला.हे जोडप, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षात आहे परंतु त्यांच्यातील उत्साह आणि जोम इतका सळसळता आहे की विश्वास बसणार नाही. ही आंतरिक उर्जा आहे.

सचोटी आणि अंतःप्रेरणा तेव्हाच येऊ शकते जेव्हा आंतरिक उर्जा उपस्थित असते.

आंतरिक उर्जा म्हणजे जीवनाला एका मोठ्या दुष्टीकोनांतून प्रेम आणि मायेने बघायचे. या ग्रहावर आपण थोडा काळ व्यतीत करणार आहोत या वृत्तीने जीवनाकडे बघायचे आणि त्यानुसार गोष्टींना प्राधान्य द्यायचे.

मी आता एक उदाहरण देतो. दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिक्षकांपैकी एक गुजरातमध्ये आय ए एस अधिकारी आहे. आता या सदगृहस्थाला एका कागदावर सही करण्याकरिता ५१ करोडचा प्रस्ताव दिल्या गेला होता. ५१ करोड! एक अधिकारी त्याच्या आयुष्यात ५१ करोड मिळवायचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. एका आयुष्याचे विसरा. त्याने तीन जन्म जरी काम केले तरी तो ५१ करोड नाही कमवू शकत.

मी कोणत्याही अधिकाऱ्याला ५१ करोड म्हणजेच १० मिलियन डॉलर कमावलेले पाहिलेले नाही.

तर या गृहस्थाला ५१ करोडचा प्रस्ताव ठेवला गेला आणि तो म्हणाला, 'नाही. मी सही करणार नाही.' आणि त्यांने जरी सही केली असती तरी कोणाच्या लक्षातदेखील आले नसते. ते पैसे घेण्याकरिता त्याला अनेक प्रकारे सफाई देता आली असती. तो असे म्हणू शकला असता , ' अरे ,मी हे पैसे घेतो आणि गरीबांना दान देऊन टाकतो, किंवा मी समाजाच्या भल्याकरिता काही तरी काम करतो.'

१० मिलियन डॉलर ही फार मोठी रक्कम होते, पण या माणसाचा प्रामाणिकपणा पहा. त्याने याला नाही म्हटले. मला या भल्या गृहस्थाचा इतका अभिमान वाटतो.

आता तुम्हाला आंतरिक उर्जा कशामुळे प्राप्त होऊ शकते?

त्याकरिता तुम्हाला संन्यासी असण्याची आवश्यकता नाही, अर्थात संन्याशाकडे ती असते. परंतु एका गृहस्थाश्रमी व्यक्तीला इतके मोठे प्रलोभन टाळणे सोपे नसते, जर त्याच्याकडे आंतरिक उर्जा आणि समाधान नसेल तर.

समाधान, अनुकंपा, प्रामाणिकपणा, अंतःप्रेरणा, ही सगळी मुल्ये तुमच्या आतूनच उमलून येतात. आणि ज्या गोष्टीने ही मुल्ये तुमच्या जीवनात उमलून येतात त्या गोष्टीला मी अध्यात्म  म्हणतो.

हाच अर्थ आहे खऱ्या श्रद्धेचा; स्वतःमधील श्रद्धा आणि आपल्या सभोवतीच्या लोकांच्या चांगुलपणावर श्रद्धा.

सगळेच्या सगळे वाईट आहेत नी मी एकटा समाजाला कसा सुधारू? असा विचार करण्यातच आपला निम्मा वेळ खर्च होतो. जेव्हा तुम्ही सगळेच वाईट आहेत असे पाहता तेव्हा मनातल्या मनात तुम्ही भ्रष्टाचार स्वीकार करता याचे स्वतःचे स्वतःला समर्थन करता. तुम्ही विचार करता, ' ठीक आहे, हीच जीवनाची पद्धत आहे, आपल्याला प्रवाहाबरोबर जाणे भाग आहे.'

या गोष्टी तुमच्या जीवन-मरणाच्या गोष्टी ठरतात.

याविरुद्ध तुम्हाला उभे ठाकायाचे असेल तर तुम्हाला आंतरिक उर्जेची आवश्यकता आहे आणि हेच समग्र तर ध्यानाचे उद्देश्य आहे. ध्यानामुळे तुम्हाला आंतरिक उर्जा मिळते, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सचोटी,प्रामाणिकपणा येतो आणि तुमच्यात अगोदरपासून असलेल्या अंतःप्रेरणेला आविष्कृती मिळते. मला तर वाटते की हे अतिशय महत्वाचे आहे.

तर मी सांगत होतो की जेव्हा मी या अपराधी घटकांसोबत देवाण घेवाण करीत होतो; खरे पाहता त्यांना अपराधी घटक असे संबोधता कामा नये; हे दिशाभूल झालेले तरुण, मला त्या प्रत्येकामध्ये सौंदर्य दिसले. त्यांच्या तणावापासून आणि त्यांच्या गैरसमजापासून सुटका करून घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही येवढेच. त्यांची काळजी आणि तणाव यापासुन त्यांना मुक्तता मिळवण्याची, आणि समाजात पुरेसे प्रेम आहे, आणि या ग्रहावर चांगले लोक आहेत, आणि जेव्हा ते संकटात असतील तर त्यांच्या मदतीला धावणारे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे चांगले लोक शेजारी आहेत हे ओळखण्याची त्यांना संधी दिली गेली नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमची साथ देणारे, तुम्हाला मदत करणारे लोक आहेत. असा समाजाच्या चांगुलपणा विषयीचा विश्वास पुनर्निर्माण होणे जरुरी आहे. जर असे झाले नाही तर समाजामध्ये नितीमुल्ये टिकून राहणार नाहीत. जर मानवतावादी मुल्यांवर विश्वास नसेल, किंवा लोकांना आपापसात आणि समाजांना एकमेकांवर विश्वास नसेल तर समाजात नीतिमूल्ये फुलून येत नाहीत किंवा टिकाव धरू शकत नाहीत. म्हणून स्वतःवर, लोकांच्या चांगुलपणावर आणि त्या कधीही न बघितलेल्या, ज्याच्याबद्दल कधीही ऐकले नाही आणि जो पूर्णपणे अनोळखी आहे अशा तुम्हाला मदत करणाऱ्या मदतीच्या हातावर विश्वास ठेवा. 

याला तुम्ही देवावरचा, निसर्गावरील आणि महाशक्तीवरील विश्वास म्हणू शकता. एका न्यायी, मुक्त आणि आनंदी समाजाकरिता हे फार महत्वाचे आहे.

म्हणून बेहतर (सरस) भारताकरिता कार्यकर्ता  याने समाजातील सर्व वाईट, अभद्र स्वच्छ होऊन जाईल असे नाही, त्याला जास्त महत्वाचे कार्य करायचे आहे आणि ते म्हणजे आनंदाच्या लहरी निर्माण करणे होय. 

आज युनायटेड नेशन्स यांनी जी डी एच (Gross Domestic Happiness) अर्थात स्थूल एत्तदेशीय आनंद या संदर्भात बोलयाचे सुरु केले आहे. आणि पूर्वीसारखे आता जी डी पी (Gross Domestic Product) अर्थात स्थूल एत्तदेशीय उत्पादन याविषयी बोलत नाहीत. 

तुम्हाला माहिती आहे की आपले शेजारील राष्ट्र भूतान याचे जी डी एच सर्वोच्च आहे. त्यांचा अगदी अलीकडेपर्यंत एकदम नियंत्रित समाज होता तरीसुद्धा त्यांनी आपला आनंद टिकवून ठेवला आहे.

आजसुद्धा ग्रामीण भारतात, लोक अधिक आनंदी असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे केवळ एक भांडभर ताक असेल तरीसुद्धा ते तुमच्यासोबत वाटून घेतील. त्यांच्यात किती अनुकंपा आणि एक दुसऱ्यांकरिता तद्भावभाविता आहे. ते तुमच्या पार्श्वभूमीविषयी विचारत नाही किंवा तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमची पात्रता काय आहे, किंवा तुमचे नाव काय आहे असे काहीसुद्धा विचारत नाही. ते सर्वात आधी म्हणतील, 'या आणि एक कप चहा किंवा एक भांड ताक घ्या.' आणि नंतर मग ते विचारपूस करतील की तुम्ही कुठून आलात, तुम्ही काय करता. अशा प्रकारे ते सर्वात प्रथम त्यांचा हात पुढे करतात आणि त्यांचेकडे जे काही आहे ते तुमच्याबरोबर वाटून घेतात आणि बाकी प्रश्नांची सरबत्ती नंतर करतात.

दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरांमध्ये तर आपल्याला आपले शेजारी कोण हेसुद्धा माहिती नसते. अशा सगळ्या अडथळ्यांना, निर्बंधना बेहतर भारताकरिता कार्यकर्ता  तोडेल आणि शेजारी एक होतील आणि विविध समाज एक होतील. विविध समाजांनी एकत्र काम करणे ही तर फार मोठी आनंदाची बाब आहे. केवळ स्त्री भ्रूणहत्या, भ्रष्टाचार मुक्त समाज इतक्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित न राहता ते एक अशी आनंदाची लहर आणतील की ही आनंदाची लाट अतिशय जोमाने बळावणाऱ्या आजार अर्थात निराशा यावर लसीकरण करेल.

या शब्दांनी मी परब्रम्हाकडे प्रार्थना करतो की तो तुम्हाला बेहतर भारताकरिता कार्यकर्ता याचे कार्य पुढे चालू ठेवण्याकरिता भरपूर सामर्थ्य आणि जोश देवो.

दि आर्ट ऑफ लिविंग ही केवळ एक बिन सरकारी संस्था आहे. मला दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये अडकून पडल्यासारखे वाटत नाही. ही तर अनेक संस्थांपैकी एक संस्था आहे आणि मी अनेक संस्थांचा घटक आहे. केवळ दि आर्ट ऑफ लिविंगचा नाही. मला आशा आहे की तुम्हालासुद्धा असेच वाटते. आणि इथे उपस्थित असलेल्या इतर बिन सरकारी संस्थाना माझे हेच सांगणे आहे की आपण सगळे एकाच मानवीय परिवाराचे सदस्य आहोत आणि आपले उद्देश्यसुद्धा एकच आहे आणि ते म्हणजे अधिक आनंद आणि अधिक हास्य या ग्रहावर पसरवणे.

धन्यवाद!

साधनेचे सार

01
2012
Dec
बंगलोर, भारत


श्रोते : गुरुदेव, आज कनकदास जयंती आहे.

भारतात एक महान संत होऊन गेले. १२ व्या दशकात कर्नाटक मध्ये ते एक धनगर होते. त्यांचे नाव कनकदास होते. १२ वे शतक हा असा काळ होता जेव्हा भक्तीची लाट आली होती भारतभर, खरेतर संपूर्ण जगात पसरली. मला वाटते, फ्रान्सिस्को डी’असिसी (असिसी चे सेंट फ्रान्सिस, इटालीअन सेंट)हे सर्व त्याच काळात होऊन गेले, १२ व्या नि १५ व्या शतकाच्या दरम्यान.

कनकदास हे श्रीकृष्णाचे महान भक्त होते. त्यांनी कन्नड मध्ये अनेक सुंदर भजने लिहिली आहेत. त्यामुळे कर्नाटकात सर्वांना ही गाणी माहित आहेत.

त्यांची गोष्ट अशी आहे की ते खालच्या जातीचे आणि गरीब होते त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. ते बाहेरच बसून प्रार्थना करीत कारण ते मंदिर मुख्यत: श्रीमंत आणि वरच्या वर्गाच्या लोकांसाठी होते. तर काय झाले की त्या मंदिराची भिंतच पडली आणि श्रीकृष्णाने कनकदासांना दर्शन दिले. आणि दुसऱ्या बाजूला जे पुजारी पूजा करत होते ते आश्चर्य चकित झाले. ही इथली अगदी सुप्रसिद्ध घटना आहे.

आजही उडुपिच्या कृष्ण मंदिरात गेलात तर तुम्हाला दिसेल की मूर्तीचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे. तिथे एक पडकी भिंत आहे, त्यातूनच दर्शन घ्यावे लागते. हिलाच कनकदासांची खिडकी असे म्हणतात, जिथे उभे राहून त्यांनी प्रार्थना केली.असे म्हणतात की तेव्हापासून जात आणि वर्ण यांचा भेद करणे बंद झाले.

बऱ्याच लोकांनी जात आणि वर्णभेदाच्या विरोधात लढा दिला. ते त्यांच्यापैकीच एक होते. आणि ते सर्वांचे आवडते होते. अशी गोष्ट आहे.

प्रश्न : गुरुदेव हिंदू धर्मात कितीतरी प्रार्थना (स्तोत्रे) आहेत.काही देवीची तर काही विष्णूची प्रत्येका बद्दल हेच म्हटले जाते की त्याचे रोज पारायण करण्याने फायदा होईल. आता प्रत्येक स्तोत्राबद्दल हेच म्हटले जाते. मग कुठले म्हणायचे हे आम्हाला कसे कळावे ?

श्री श्री : सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देव एक आहे. मग तुम्ही त्याला कोणत्याही नावाने हाक मारत असाल. तो एकच आहे ही पहिली गोष्ट.

दुसरे म्हणजे देवाची स्तुती केल्याने (स्तुतीपर भजने किंवा स्तोत्रे) तो खुश होते हे खरे नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या घराच्या खिडक्या उघडता तेव्हा सूर्यप्रकाश आंत येतोच. हो की नाही ? 

जर तुम्ही घराच्या खिडक्या बंद ठेवल्या तर सूर्य तुमच्यावर रागवेल कां ? असे केले तर सूर्य प्रकाश द्यायचे अचानक थांबवेल कां ? नाही !

आपण ज्या काही प्रार्थना करतो, स्तोत्रे म्हणतो ते सर्व आपल्या आनंदासाठी.आपल्या स्वत:च्या विकासासाठी आपण प्रार्थना म्हणतो. आपण देवाला खुश करण्यासाठी म्हणत नाही. ज्यांना असे वाटते की उपास करुन ते देवाला खुश करत आहेत तर ते मूर्ख आहेत. हे केवळ अज्ञान आहे.

असे समजू नका की तुम्ही देवाची पूजा केली आराधना केली तर देव तुम्हाला काही तरी खास भेट देईल. हं, तुम्ही प्राथना केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल कारण तसा निसर्ग नियम आहे. अगदी तसेच, जसे खडकी उघडल्यावर सूर्य प्रकाश आंत येणारच. आणि सूर्य प्रकाश आंत आला की तुम्हाला त्याचा फायदा मिळणारच.

हे बघा, देव आपल्यावर नेहमीच खूप प्रेम करत असतो.पण देव तुमच्यावर जितके प्रेम करतो तितकेच तुम्ही त्याच्यावर करण्याइतके मोठे व्हा, तीच खरी भक्ती आहे, हेच प्रार्थनेचे सार आहे.

पूजा म्हणजे ते जे पूर्णपणातून आणि पूर्णत्वाने जन्माला आले आहे.आपले हृदय कृतज्ञतेने आणि आनंदाने कसे भरून आले आहे हे व्यक्त करण्यासाठी आपण पूजा करतो. ‘ प्रिय प्रभो मी इतका कृतज्ञ आणि आशिर्वाद असलेला आहे. तुम्ही मला इतके सगळे भरभरून दिले आहे.’ ही भावना व्यक्त करण्यासाठी, आपण पूजा करतो. जेव्हा आपल्यात अशी भावना निर्माण होते तेव्हा त्याच्या बरोबर एखादी कृती नक्कीच जोडली जाते. कृतज्ञतेची गहिरी भावना एखाद्या कृतीशी किंवा कर्म कांडाशी जोडण्याचा मोह कुणीच आवरु शकत नाही. 

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखद्या जवळच्या मित्राला भेटता तेव्हा जिव्हाळ्याने त्याच्याशी हात मिळवता आणि त्याची पाठ थोपटता.पंजाबमध्ये हे अगदी नेहमी दिसते. (भारताच्या उत्तरेकडील एक राज्य.) कधी कधी पाठीवर इतकी जोराची थाप मिळते की दुखल्यामुळे ओरडाल ! ( हशा) तर अशा प्रकारे एकमेकांबद्दलचे प्रेम आपण अशी एखादी तरी कृती करून व्यक्त करतो. अशाच प्रकाराने भक्त जेव्हा भक्तीरसात इतका बुडून गेलेला असतो तेव्हा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक प्रतिक म्हणून काही तरी करावेसे वाटते. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी तरतऱ्हेचे विधी आणि पूजा करण्याच्या पद्धती सुरु केल्या.

पूजेमध्ये देवाने तुमच्यासाठी जे केले त्याचीच तुम्हाला नक्कल करायची असते आणि परतफेड करायची असते. देवाने तुम्हाला फुले दिली, ‘आमची हृदये देखील त्याच्यासाठी अशीच फुलू देत’ अशी प्रार्थना करत तीच फुले तुम्ही परत देवाला वहाता. देवाने आपल्याला पाणी दिले, आपणही आपणही पाण्यासारखेच नम्र व्हावे आणि सर्वांमध्ये अशीच शीतलता यावी या भावनेने, पूजेच्यावेळी देवाला पाणी वहातो. पाण्याप्रमाणेच आपल्यालाही एक मूलभूत पाया असावा. म्हणून आपण प्रार्थना करतो की आपले जीवनही असेच व्हावे.

आपण देवाला अक्षतही वाहतो, कारण ते एक न संपणाऱ्या समृद्धतेचे प्रतिक आहे. तांदुळाच्या अक्षतांचा कधी तुकडा झालेला नसतो. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जडवस्तू आणि ऊर्जा कधीही नष्ट होत नाही आणि धक्का पोहोचत नाही. जेव्हा आपण भात खातो तेव्हा आपल्याला ऊर्जा आणि पोषण मिळते आणि ते शरीराकडून शोषून घेतले जाते. आणि जेव्हा आपण मारतो तेव्हा आपले शरीर दहन केले जाते आणि परत पृथ्वी तत्वात विलीन होते. त्या मातीतून पुन्हा तोच तांदूळ पिकतो आणि खाण्यासाठी अन्न तयार होते. जेव्हा शरीराचे राखेत रुपांतर होते ती राख अनेक माशांसाठी अन्न बनते आणि तेच मासे पुन्हा अनेक माणसाचे अन्न बनते. तर हे निसर्गात परत परत होत असते. जेव्हा तुम्ही प्रेत जमिनीत पुरता तेव्हा शरीर पंचतत्वात विलीन होते.

तसेच तुम्ही देवाला चंदन लावता ते अशा भावनेने की त्याचा सुगंध सगळीकडे पसरू दे. आपली पाचही ज्ञानेंद्रिये जी आपल्याला इंद्रिय अनुभव आणि सुख देत असतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्यात काही तरी जाणीव होण्याचे कार्य आणि त्याच्याशी जोडलेल्या काही गोष्टी असतात. तर या पाच ज्ञानेंद्रियांनां आनंद आणि सुख देणाऱ्या सर्व गोष्टी आणि वस्तू देखील पूजेच्या वेळी वाहण्यासाठी वापरल्या जातात.पूजेच्यावेळी आपण घंटा वाजवतो कारण त्याने निर्माण होणाऱ्या नादामुळे इथल्या तिथल्या विचारांपासून मुक्त होतो आणि वर्तमान क्षणात स्थिर होतो. मग पूजेच्यावेळी होणाऱ्या त्यां एकमेव आवाजाशी त्या नादाशी मनाची एकतानता होते.म्हणूनच मनाची एकाग्रता येण्यासाठी पूजेच्या वेळी अनेक ढोल, सनई, चौघडे आणि झांजा यांचा गजर केला जातो. इतक्या मोठ्या आवाजामुळे मन वर्तमान क्षणात येते.

आरतीच्या वेळी कापूर लावला जातो. जसे देव तुमच्या भोवती सूर्य चंद्र यांना फिरवतो अगदी तसेच, तुम्ही आनंद मिळण्यासाठी कापराचा छोटा दिवा देवासमोर फिरवता. हे देखील अशी प्रार्थना व्यक्त करण्यासाठी की आपल्या जीवनातील प्रकाश कधीही देवापासून दूर जाऊ नये. तो नेहमी केंद्रित आणि देवाभोवती फिरणारा रहावा. याच गहिऱ्या भावनेने तुम्ही आरती करता. भारतभर सगळीकडे लोक आरती करतात पण त्यांना त्यातला खोलवर दडलेला अर्थ माहित नाही.

आरती म्हणजे सर्वात उच्चतम आणि महान असा परमानंद. देव हा आनंदाचा सर्वात महान स्रोत आहे याचे ते प्रतीक आहे. जेव्हा तुमच्या हृदायातून असे तीव्र प्रेम आणि भक्ती ओसंडून वाहू लागते की तुमच्या शरीराचा कान अन् कान त्यात चिंब भिजून जातो तेव्हा तीच खरी आरती. आरती तीच जी तुम्हाला संपूर्ण समाधान देते. आरती या शब्दाचे दोन भाग आहेत. ‘आ’ आणि ‘रती’ . ‘रती’ म्हणजे आनंद, परमानंद आणि अत्यानंद. तर जेव्हा आपण अशाप्रकारच्या भक्ती आणि परमानंदाने परिपूर्ण असतो तेव्हा त्याला ‘आरती’ म्हणतात. म्हणून आपण अशा प्रार्थनेने आरती करतो की आपले जीवनही असेच अत्यानंदाने आणि आणि भक्तीने भरून जावे जेणे करून जिथे पाहू तिथे आपल्याला देवच दिसेल. याला पूजा म्हणतात. पूजा ही कधीच देवाला खुश करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी केली जात नाही.

पण आपल्या देशात लोक मूर्तीच्या तोंडातही मिठाई भरवत असतात, इतके की त्यां मूर्तीचे तोंड अगदी घाण होऊन जाते. मग तुम्हाला मूर्तीचे डोळे,नाक किंवा तोंडही दिसत नाही. इतकेच नाही तर, भीतीपोटी ते देवाच्या प्रत्येक फोटोला आणि मूर्तीला फुल वाहातात कारण जर त्यांनी हनुमानाला फुल वाहिले आणि शंकराला वाहिले नाही तर शंकर त्यांच्यावर रागावेल आणि शिक्षा करेल. मनात अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माण होतात. म्हणूनच असे म्हटले आहे की तुमची एकाच इष्ट देवता असावी. बाकी सर्व देव त्याच देवाची रूपे आहेत. त्याचे सार हे आहे की सर्वात एक देव आहे आणि प्रत्येकात दैवत्व आहे हे जाणणे. हे असे आहे.

प्रश्न : गुरुदेव, ऋषी महिलांच्या बद्दल सांगाल कां ?

श्री श्री :  होय. काही ऋषी स्त्रिया आहेत आणि आणखी येण्याचीही शक्यता आहे. अगदी थोड्या स्त्रिया ऋषी आहेत, जास्त नाही.

मीरा त्यापैकीच एक भक्त होती. तामिळनाडू मध्ये एक स्त्री होती. तिचे नाव अवैयार होते. आणि ती तामिळ साहित्याची जननी म्हणून ओळखली जाते. जो कोणी तामिळचा अभ्यास करतो तो अवैयारला चुकवू शकत नाही. हो नां ? इथे किती तामिळी आहेत ? ( श्रोत्यांपैकी काही जण हात वर करतात. )

( श्रोत्यांपैकी एक जण ‘आथी चुडी’ या आवैयार च्या रचनेचा उल्लेख करतो.)

‘आथी चुडी’? ही मुळाअक्षरे आहेत नां ? जसे ‘ ए फॉर अॅपाल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट’ असते तसे तिने प्रत्येक मुळाक्षरासाठी काहीतरी आध्यात्मिक बनवले आहे.म्हणजे लहानपणापासून मूल्यांसोबत मुळाक्षरे शिकवली जातात. या हुशार स्त्रीने, आईने बघा कसे केले.

तिची गोष्ट खूप रंजक आहे. ती एक सुंदर तरुण स्त्री होती. आणि तिच्या आई वडिलांना तिचे लग्न करुन द्यायचे होते पण तिला करायचे नव्हते. राजाने तिला बघितले आणि त्याला ती आवडली. तुम्हाला माहित आहे नां ? त्याकाळी राजाला सर्वात उत्तम तेच मिळण्याचे सौभाग्य होते. आणि ती इतकी चांगली होती. त्यामुळे राजाला तिच्याशी लग्न करारायचे होते. आणि राजाने विचारले म्हटल्यावर कुणी ‘नाही’ म्हणू शकत नाही. आणि मग पुढे असे होते की ती गणेश भक्त होती त्यामुळे तिने गणेशाची प्रार्थना केली.

भारतात तुम्ही तुमचा स्वत:ला हवा तो देव पुजू शकता. देव जरी एकाच असला तरी प्रत्येकाची एक इष्ट देवता असते. ( मनात भरलेली, आवडलेली देवता) प्रत्येकाचा त्यांच्या आवडीच्या रूपातला देव असू शकतो. बघा, देव एकाच आहे. एक अल्ला, एक परमात्मा. पण त्यां देवासाठी तुम्ही एक नाव, फक्त तुमच्यासाठी निवडू शकता. आणि मग तुमचे त्या नावाशी एक व्यक्तिगत खास असे नाते जुळते.

तिची इष्ट देवता होती गणेश आणि तिने त्याची प्रार्थना केली की ‘ मी म्हातारी दिसू दे.’ आणि असे म्हणतात की लगेचच तिचे केस पांढरे झाले आणि ती म्हातारी दिसू लागली. मग राजा आला आणि त्याने तिच्याशी लग्न केले नाही. अशी आहे तीची गोष्ट.

प्रश्न: गुरुदेव, समर्पणावर काही सांगाल कां ? मला वाटते की समर्पणामुळे मी जरा अंधश्रद्धाळू / अज्ञानी होतोय. मी जेव्हा मागे वळून भूतकाळाकडे बघतो, तेव्हा मला असे दिसते की जेव्हा मला काही निर्णय घ्यायचा असायचा किंवा काही करायचे असायचे तेव्हा सगळं गुरुजीच घडवून आणतात तर मग तेच सगळं करतील. त्यामुळे त्या त्या प्रसंगात मी जे करणे अपेक्षित असायचे ते करायचे सोडून, मी विचार करायचो की जे व्हायचे ते आपोआपच होईल. तर मला कृपया साला द्या की मी कोणत्या प्रकारच्या समर्पणात असावे जेणेकरून मी अज्ञानात / अंधश्रद्धाळू रहाणार नाही.

श्री श्री: संकल्प आणि समर्पण दोन्ही एकत्र जातात. एकदा तुम्ही तुमचे १०० % दिलेत आणि आता काहीही करण्यासारखे शिल्लक राहिले नाही की मग समर्पण करा. तुमचे काम् तुम्ही केलेत की मग तुम्ही तुमच्या कर्माच्या फळाच्या इच्छेचे समर्पण करु शकता. पण काहीच न करण्याने काहीच साध्य होणार नाही. जे आपण करायला हवे ते १०० % करायलाच हवे आणि नंतर आपल्या कर्माच्या फळाची कामना देवाला समर्पण करायची. ‘माझ्यासाठी जे उत्तम आहे तेच मला मिळो’, ही भावना मनात ठेऊनच समर्पण करावे. आपण आपल्यापरीने सर्व कष्ट करावे आणि मग त्या कर्माच्या फलाची इछा देवाला अर्पण करावी. तुम्हाला कळतयं कां मी काय म्हणतोय ते ?

तुम्ही नुसते स्वस्थ बसून असा विचार करता कामा नये की, ‘ मी समर्पण केले आहे, आता सगळे आपोआप होईल.’

तशी सिद्धावस्था हळू हळू येते, त्याला वेळ लागतो. तुम्ही तुमच्या साधनेत जेव्हा अगदी सामर्थ्यवान बनाल, तुमच्यात कुठलीही वासना किंवा तिरस्कार शिल्लक राहणार नाही, कोणत्याही इच्छा रहाणार नाहीत, तेव्हा त्या स्थितीला ‘नैशकर्म सिद्धी’ म्हणतात. ( कुठलेही कर्म केल्याशिवाय काही मिळवण्याची क्षमता.) अशी स्थिती की ज्यात काहीही प्रयास न करता तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तशी स्थिती येईपर्यंत आपण, कार्य, आपले काम करत रहायला हवे.

सिद्धावस्थेमध्ये भक्तीत इतके खोलवर जाता की तुम्हाला कशासाठीही काही प्रयास, मेहनत करावी लागत नाही. विचार करायच्या आधीच इच्छा पूर्ण होतात. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आहे ? ( श्रोत्यांपैकी बरेच भक्त हात वर करतात.) बघा, असे होतेच आहे.

तर मग आपल्याला अशी स्थिती मिळवता येईल कां ? आपण आध्यात्मिक मार्गावर जितके जास्त खोलवर जाऊ तितके आपण समाधानी होत जातो. आपण जितके जास्त समाधानी होत जातो तितक्या जास्त आपण सिद्धी प्राप्त करू शकू.

सिद्धी प्राप्त करणे भूतकाळ किंवा भविष्यकाळाची गोष्ट नाहिये. ती शी गोष्ट आहे जी वर्तमानातच मिळू शकते. तरीही सध्या त्या क्षमतांवर पडदा पडलेला आहे. हळू हळू तो पडदा दूर होईल.हा पडदा जसजसा दूर होईल तसतशा या क्षमता आपल्यात विनासायास दिसून येतील.

प्रश्न : गुरुदेव, मी अनेक ग्रंथांमध्ये वाचले आहे की ‘सगळे काही एकच चेतना आहे आणि आपण त्या चेतनेचाच भाग आहोत. मग असे असताना समर्पण म्हणजे तुम्ही काय सांगाल ? आपण कशाला समर्पित होतो ? सर्व एकाच चेतना आहे तर मग, असे काय आहे की ज्याला आपण समर्पण करतो आपण कोणाला समर्पण करतो ?

श्री श्री : होय, खरे आहे. खरे म्हणजे समर्पण करावे असे काही नाही. पण जेव्हा तुमच्या मनाला वाटते की , ‘मी वेगळा आहे, निराला आहे, मी एकटा आहे तेव्हा समर्पण करा आणि निवांत रहा. ‘आई घरी आहे’ ही जी भावना आहे, तसे हे आहे. ‘आई घरी आहे’ ही भावना निर्माण होण्यासाठी काळजी सोडून देण्याची जी भावना आहे त्याला समर्पण म्हणतात. इतकेच. असे काही नाही की तुम्ही समर्पण करायलाच हवे. कळले ? म्हणूनच तीन निरनिराळे मार्ग आहेत. ( कर्म योग, भक्ती योग आणि ज्ञान योग ).

ज्ञानयोगाचा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणवते सर्व एकाच गोष्टीपासून बनले आहे
( अद्वैत) दोन असे काही नाहीच. ( अद्वैत) तेव्हा तो ज्ञानयोग आहे.

पण जेव्हा तुम्ही हे विसरता आणि तुम्हाला असे वाटते की दोन आहेत आणि तुम्ही काही तरी धरून ठवले आहे आणि ज्याचे ओझे तुम्हाला आता सहन होत नाही तेव्हा तुम्ही म्हणता की, ‘ आता मात्र मी हे टाकून देतो, तेव्हा त्यालाच समर्पण म्हणतात.

याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, तुम्ही ट्रेनमध्ये बसला आहात आणि तुमचे सामान अजूनही खांद्यावरच आहे. तुमचे आसन जरी आरामशीर आहे तरी तुम्ही तुमचे सामान अजूनही खांद्यावर , डोक्यावरच ठेवले आहे आणि तुम्हाला अस्वस्थ वाटते आहे. मग कुणीतरी येते आणि म्हणते, ‘अरे, चल सामान खाली ठेव. असेही, ही ट्रेन तुझे सामान वाहून नेतेच आहे. आरामशीर बस. तुम्हाला संपूर्ण निवांतपणा देणारी भावना म्हणजे शरणागती. 

प्रश्न : गुरुदेव, जर माझी निवड रुळलेल्या मार्गापेक्षा निराळी असेल तर काय करावे ? लोक म्हणतात, ‘तू लग्न करावेस मुले होऊ द्याविस, संपत्ती गोळा करावीस वगैरे’ जी रुळलेली वाट आहे. जर मला या पेक्षा वेगळे काही करायचे असेल तर मला सारखे सांगितले जाते की, ‘ तू चुकतो आहेस.’ मला ते चूक वाटत नाही कारण ती माझी निवड आहे. मला निवडण्याची संधी असली पाहिजे. अशावेळी काय करावे ? कुटुंबियांच्या, समाजाच्या विरोधात कसे जावे आणि तरीही ठाम राहून आनंदी राहून स्वत: स्वत:ची निवड कशी करावी ?

श्री श्री  : होय, असे करणे खूप कठीण आहे. तुमहला तुमच्या पालकांना पटवून द्यावे लागेल की सगळे करतात ते तुम्हाला करायचे नाहिये. तुम्हला माहितीये ? या सर्व गोष्टींचा खुल्या दिलाने विचार करणे सर्वात उत्तम. एकदम आखडू राहू नका. मला वाटते खुल्या दिलाने राहा आणि बघा काय होते ते. मला वाटतं याकडे बघण्याचा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. 

तुम्हला माहित आहे की लग्न आणि कुटुंब यात नेहमीच काही तरी तडजोड करावी लागते. ‘ फक्त मी म्हणेन तसेच’ असेच म्हणता येत नाही. काही तरी मधला मार्ग स्वीकारवा लागतो. तुमच्या जोडीदाराचेही मत विचारात घ्यावे लागते. तर जीवनात नेहमीच तडजोड करावी लागते. त्यामुळे खुल्या दिलाने रहा.

काहीही झाले तरी तुमचा आनंद आणि खुशी घालवू नका. काही लोक असे आहेत जे एकटे आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही आणि ते खुशही नाहीयेत. आणि लग्न झालेले लोकही आहेत जे खुश नाहीयेत. ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. मी म्हणेन की तुम्ही लग्न करा किंवा नका करू, पण जसे असाल तसे आनंदी राहा. ते गरजेचे आहे.

ज्या लोकांना मुले नाहीत ते रात्रंदिवस रडत असतात आणि खुश नसतात. असेही लोक आहेत ज्यांना मुले आहेत आणि ते खुश नाहीयेत. तर, तुमच्या आनंद, परिस्थिती आणि प्रसंग यांच्यापासून अलग करायला हवा. असे समजू नका की, ‘ मी सुंदर दिसलो तर मी आनंदी होईन.मी म्हातारा व्हायला लागलो तर मी आनंदी असणार नाही.’ नाही ! एक गोष्ट नक्की करा की, ‘ काहीही झाले तरी मी आनंदी आणि सामाधानीच रहाणार’

प्रश्न : गुरुदेव, मला एक घटना तुम्हाला सांगायची आहे. मी कुठेतरी जात होतो आणि मी दोन केळी विकत घेतली.मी एक केळे खाल्ले आणि दुसरे ठेऊन दिले. रस्त्यात मला एक भिकारी दिसला आणि आणि मनात विचार आला की ते केले त्याला देऊन टाकावे. पण मनात असाही विचार आला की ते नंतर खाण्यासाठी ठेऊन द्यावे. मी ते ठेऊन दिले. मी चूक केली कां ? मी त्यां भुकेल्या माणसाला ते केळे द्यायला हवे होते कां ?

श्री श्री : मी तुम्हाला सांगतो, नेमके असेच होते. लोक केवढे तरी अन्न विकत आणतात आणि मग फ्रीजमध्ये ठेवतात. काही काळाने त्यांच्या लक्षात येते की ते खराब होतेय आणि मग ते फेकून देतात. तुमच्यापैकी किती जण असे करतात ? फ्रीजमध्ये अन्न ठेऊन मग ते फेकून देतात. ( श्रोत्यांपैकी काही लोक हात वर करतात. ) जगभरातल्या लोकांची ही सवय आहे. तुम्हाला माहित आहे कां ? टाकून दिलेल्या अन्नापैकी १ / ३ अन्न फ्रीजमधले आसते. आणि जवळ जवळ १ / ४ इतके टाकून दिलेले अन्न दुकानातले असते कारण त्यावरची मुदतीत विकण्याची तारीख उलटून गेलेली असते. ही साठा करुन ठेवण्याची वृत्ती जगभर आहे. मी म्हणतो उत्स्फूर्त रहा.जर ठेवावेसे वाटले तर ठेवा. जर कुणी भुकेला दिसला आणि त्याला द्यावेसे वाटले तर द्या. एकाच निर्णयावर ठाम राहू नका. ‘ मी केले नेहमी स्वत:कडेच ठेवायला पाहिजे. देऊन टाकता कामा नये.’ हे चांगले नाही. असाही विचार करायला नाकी की, ‘ मी नेहमी देऊनच टाकायला हवे.’ हे ही चांगले नाही. सहज राहा, स्वाभाविक राहा आणि कधी असे करा तर कधी तसे करा.

प्रश्न : गुरुदेव, काल मला एक बाई भेटल्या. त्यांनी मला सांगितले की जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी त्यांचे गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले की समाजाचे रक्षण करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. या स्वप्नामुळे प्रोत्साहित होऊन त्या भारतीय पोलिस खात्यात (IPS) भारती झाल्या, जरी त्या कधीही खेळाडू वगैरे नव्हत्या. त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रशिक्षणात त्यांच्या गुरूंनी त्यांना मदत केली आणि आज त्या भारतातल्या एक करारी पोलिस अधिकारी आहेत. असे काही खरेच होऊ शकते कां ? अशी काही शक्ती आहे कां , जी एखाद्या व्यक्तीला इथपर्यंत नेऊ शकते ?

श्री श्री : तुम्हाला माहिती आहे कां ? पाच प्रकारची स्वप्ने असतात. पहिल्या प्रकारचे स्वप्न हे तुमच्या स्वत:चेच प्रगटीकरण असते. तुमच्या स्वत:च्या इच्छा, भीती हे स्वप्न म्हणून येते. 

दुसऱ्या प्रकारची स्वप्ने असतात ती तुम्ही पूर्वी अनुभवलेल्याच गोष्टी स्वप्न म्हणून येतात.

तिसऱ्या प्रकारचे स्वप्न अंत:प्रेरणा असलेले स्वप्न असते. भविष्यात जे होणार आहे तेच स्वप्न पडते.

चौथ्या प्रकारचे स्वप्न असते त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसतो तर तुम्ही जिथे राहत असता त्याच्याशी असतो. समजा तुम्ही ओरिसा मधल्या एखाद्या हॉटेल मध्ये गेलात किंवा कुणाच्यातरी घरी गेलात तर तुमच्या स्वप्नात तुम्हाला ओरिया भाषा ऐकू येईल. तुम्हाला असा अनुभव आला आहे कां ? तुम्ही जर बंगालमध्ये गेलाआसाल आणि झोपलात तर स्वप्नात तुमच्या तोंडी बंगाली शब्द येतील. तर हा झाला चौथा प्रकार.

पाचव्या प्रकारात ह्या सगळ्यातले थोडे थोडे मिसळलेले असते. ती सरमिसळ असते. आपल्या स्व्प्नांपैकी ९० % स्वप्ने यांच प्रकारची असतात. त्यात थोडेसे अंतर्ज्ञान, थोडेसे हे थोडेसे ते असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्वप्नांवर जास्त अवलंबून राहू नये.

काही अंतर्ज्ञान असलेली स्वप्ने असतील. नक्कीच. पण कधी कधी तुमच्या स्वत:च्या भीती महत्वाकांक्षा सुद्धा त्या स्वरुपात येऊ शकतात. मी काय म्हणतोय ते कळतयं नां ? तुम्ही ते पूर्णपणे झिडकारू शकत नाही आणि त्याचबरोबर पूर्णपणे स्वीकारही करू शकत नाही. तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. याला योग माया म्हणतात. साधकाच्या बाबतीत या गोष्टी होतात. तेही त्याना जेव्हा सल्ल्याची गरज असेल तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता आणि ज्ञान मार्गावर असता तेव्हा या सर्वातून बाहेर पडू शकता.

प्रश्न : गुरुदेव, रुपाकडून अरुपाकडे प्रवास आहे.तर मग गुरु बरोबर असण्याचे किती महत्व आहे ? अगदी जेष्ठ लोकांनाही गुरुच्या मागे धावताना आपण बघतो. तर आम्ही केवळ ज्ञानात राहायचे, की अस्तित्व जाणवून घ्यायचे की तुमच्या मागे धावायचे ?

श्री श्री : हे बघा, माझ्या मागे कुणीही नाही. सगळे माझ्या पुढे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा. मला काहीच हवे आहे असे नाही. तुम्ही एका जागी राहिलात आणि समाधानी असलात तर चांगलेच आहे. आणि अपराधी वाटून घेऊ नका. मला तुम्हाला आणखी समस्यांमध्ये टाकायचे नाहिये. जेव्हा तुमचे मन हृदय म्हणते पळ आणि बुद्धी म्हणते पळू नको, तुम्ही आधीच एका द्विधा मन:स्थितीत आहात. मी तुमच्या ह्र्दयाची बाजूही घेणार नाही आणि बुद्धीचीही नाही कारण दोन्ही महत्वाचे आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे. कधी एकाला जिंकू द्या तर कधी दुसऱ्याला. कधी डोक्याने जिंकावे तर कधी हृदयाने, हेच जीवन आहे.

इतकेच जाणा की एक शक्ती आहे आणि चमत्कार होतात. चमत्कार होण्यासाठी थोडी जागा ठेवा.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आम्हाला म्हणता की ‘ निवड तुमची, आशिर्वाद माझा.’ जर आम्ही निवडलेली गोष्ट तुमच्या मोठ्या दृष्टी नुसार नीट झाली नाही तर आम्हाला कसे कळेल आणि ती आम्ही सुधरावी ? आम्हाला पुन्हा मार्गावर आणण्याची जबाबदारी तुम्ही घ्याल कां ?

श्री श्री : ( हसतात) प्रत्येक मार्ग माझाच आहे. मी तुमच्या साठी उत्तम तेच चिंततो आणि ते तुम्ही निवडावे हे मला आवडेल. मी तुमच्यासाठी ठरवतो असे नाही. मला तुम्ही निवडायला हवे आहे कारण प्रत्येक वेळी तुम्ही निवड केल्याने तुमचा विकास होतो.