सगळ्याच्या पलीकडे जायला पाहिजे

30
2012
Dec
बॅड अॅनटोगस्ट, जर्मनी
तुम्हाला तुम्हा सर्वांना आनंदी आणि ज्ञानामध्ये प्रगती करीत आहात हे पाहून फारच आनंद होतो आहे. जर तुम्ही सर्वच्या सर्व ज्ञानामध्ये प्रगती कराल तर त्याने अमाप आनंद मिळेल! ज्ञान अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये तुम्ही भक्कम, निश्चल आणि सुहास्य असता. 

प्रश्न : समलिंगी असणे हा केवळ मनाचा ठसा आहे का?

श्री श्री : होय, असू शकतो किंवा ते जीवशास्त्रीयसुद्धा असू शकते.

तुम्ही नर आणि मादी या दोन्ही गुणसूत्राने बनलेले आहात. जर तुमच्यामध्ये मादी गुणसूत्रे क्रियाशील असतील,परंतु शरीर हे पुरुषाचे असेल तर मग प्रवृत्त्यांमध्ये बदल घडू शकतो.परंतु हे जन्मभर असे राहत नाही. या प्रवृत्ती थोड्या अवधीकारिता येतात आणि नंतर नाहीशा होतात. तुम्ही बघू शकता की बरेचजण जे विषमलिंगी असतात ते अचानक समलिंगी होतात. आणि अनेकजण जे बराच काळ समलिंगी असतात ते लग्न करू लागतात. लोकांच्या मनाच्या अनेक वृत्ती आणि प्रवृत्तीचे सगळे प्रकार मी बघितले आहेत. म्हणून स्वतःला कोणतेही लेबल चिटकवू नका. अनेकवेळा एखाद्या गटाच्या लायक बनण्यासाठी लोक आपल्या मनाविरुद्ध वागतात. ते म्हणतात,’मी समरती-स्त्री आहे,ठीक आहे’, किंवा ‘मी समरती-पुरुष आहे’, आणि मग जेव्हा प्रवृत्तीमध्ये बदल घडतो तेव्हा मागाहून ते आतून तुटून जातात. कित्येकवेळा त्यांना समलिंगीविषयी मनात इतकी चीड बसते की अशा प्रवृत्ती असलेल्यांचा ते तिरस्कार करू लागतात,जी चांगली गोष्ट नाही.

शरीराच्या प्रवृत्तीमुळे स्वतःला लेबल लावण्याची सवय सोडा हा माझा सल्ला आहे.तुम्ही चैतन्य आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रेम आहात. तुम्ही सळसळती उर्जा आहात. तुम्ही स्वतःला शरीराच्या प्रवृत्तीनुसार ओळखणे आणि त्यानुसार स्वतःला लेबल लावणे यापेक्षा तुम्ही स्वतःला उर्जा म्हणून,प्रेम म्हणून आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून ओळखणे हे फार फार चांगले आहे.

जेव्हा अशा प्रवृत्ती निर्माण होतात तेव्हा तुम्ही वाईट,अपराध्याप्रमाणे किंवा आणखी काही वाटून घेऊ नका. त्या तशाच असतात. त्यांचा स्वीकार करा. ती निसर्गाची करामत आहे-नर आणि मादी अशा वेगवेगळ्या प्रवृत्ती, किंवा भावना किंवा आकर्षणे तुमच्यात उद्भवत असतात. त्यात चुकीचे काही नाही. तुम्हाला सगळ्याच्या पलीकडे जायला पाहिजे! सगळ्याच्या पलीकडे आत्मा आहे.

आत्म्याला लिंग नसते,तो लिंगाच्या पलीकडे असतो. आत्मा म्हणजे प्रेम आणि तेच तर तुम्ही आहात. जेव्हा तुम्हाला हे समजते तेव्हा तुम्ही एकदम भक्कम बनता.

प्रश्न : प्रिय गुरुदेव,माझ्यावर प्रत्येकबाबतीत चीडणाऱ्या महिलेला मी कसे हाताळू? कृपा करून मदत करा, माझे तिचे फार प्रेम आहे.

श्री श्री : याबाबतीत मी अननुभवी आहे! तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न करीत आहात! तुमचे प्रेम असलेल्या परंतु तुमच्यावर रागावणाऱ्या माणसाचे काय करायचे? मला वाटते की तुमचे जसे आहे तसे स्वीकार करून पुढे जात राहिले पाहिजे.

पत्नीने छळणार्या सद्गृहस्थाची गोष्ट आहे. ती जे काही म्हणेल त्याच्या बरोबर विरुद्ध त्याला करावेसे वाटायचे. जर त्याने म्हंटले, ‘मला आज शेवया खायच्या नाहीयेत’, तर ती त्या दिवशी शेवयाच बनवायची.

जर तो म्हणाला, ‘ मला निळी पँन्ट आवडत नाही’, तर ती त्या दिवशी निळी पँन्टच घालायची. त्याने जे काही म्हंटले ती त्याच्या बरोबर उलटे करायची. जर तो म्हणाला ,’मला आज बाहेर जायचे नाही’, तर ती म्हणायची,’नाही,मला बाहेर जायचे आहे!’ जेव्हा त्याला बाहेर जायचे असेल, ती म्हणायची,’मला घराबाहेर पाऊल ठेवायचे नाही!’

त्याला याचा त्रास व्हायचा,त्याला काळजी वाटायची आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासी असायची.

एक दिवस तो फिरायला गेला तेव्हा त्याची गाठ एका गुरुबरोबर झाली. गुरूने त्याला विचारले,’माझ्या बाळा,तू आनंदात आहेस ना? तू प्रसन्न दिसत नाहीस. तुला काही हवे आहे का?’

तो माणूस म्हणाला,’माझ्यापुढे फार मोठी समस्या आहे. मी जे काही म्हणेन माझी पत्नी त्याच्या बरोबर विरुद्ध करते.’ तेव्हा त्या ज्ञानी माणसाने त्या सद्गृहस्थाच्या कानात एक गुपित सांगितले. तीन महिन्यानंतर तो सद्गृहस्थ आनंदाने रस्त्याने जात होता तेव्हा त्याची त्या गुरूबरोबर पुन्हा गाठ पडली. गुरु म्हणाला,’अरे,तू फार आनंदी दिसतो आहेस!’

तो म्हणाला,’ होय, तुमच्या क्ल्रुप्तीने काम झाले.’

आता ते क्लृप्ती काय होती?

गुरूने त्याला सल्ला दिला,’तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या पत्नीला सांगू नको. तुला जे पाहिजे त्याच्या विरुद्ध तू सांग. जर तुला बाहेर जायचे असेल तर तू तिला सांग की तुला घराबाहेर पाय ठेवायचा नाही. जर तुला सफरचंदाचा शिरा खायचा असेल तर तो बनवू नको असे तिला सांग. जर तुला ती निळी पँन्ट घालून नाही पाहिजे तर त्या दिवशी तू तिला तीच घालायला सांग.’

तो सद्गृहस्थ गुरूला म्हणाला,’तुम्ही जसे सांगितले मी तसेच केले आणि काम बनले. मला जे पाहिजे त्याच्या बरोबर उलटे मी तिला सांगतो आणि आम्ही आता आनंदात आहोत.’

त्याचप्रमाणे तुम्ही शोधून काढा की ती कशाने आनंदित होईल, आणि तिची चिडचिड थांबेल. कित्येकवेळा चिडणे हा लोकांचा स्वभावच बनून जातो. आणि काहीसुद्धा केले तरीसुद्धा ते तक्रार करीतच राहतात. तुम्ही कितीही काहीही केले तरी त्यांना कटकट करायला काहीतरी मिळतेच. खासकरून जेव्हा ते ७०-८० वयाचे होतात तेव्हा तर अतीच करतात. कारण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या मनाला आणि मेंदूला तसे वळण लावले- तक्रार,कटकट,तक्रार,तक्रार. मग तो त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनून जातो.

तुम्हाला हे गपचूप गिळण्यापलीकडे काहीही उपाय नाही. आणि त्यांना खुश करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका.

तुमची सर्वात मोठी समस्या ही आहे की तुम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करता,जेव्हा की त्या लोकांना तक्रार करण्याची सवय पडलेली आहे. तुम्ही त्यांना बदलण्याचा प्रयत्न करता,त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करता, आणि त्याने काम बनत नाही! तुम्ही त्यांना काय करायचेआहे ते करू द्या, पण त्यांच्या तक्रारी मनाला लावून घेऊ नका. ते तक्रार करतात अशी तक्रार तुम्ही करू नका. कळले? कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाला जपा.

जर इतर तक्रार करीत असतील तर करू द्यात! जर तुम्ही त्यांना सुधारू शकत नाही तर त्यांना केवळ स्वीकार करा आणि पुढे जात राहा.

हे पहा आपल्याकडे जास्त वेळ नाहीये! सगळे काही अंतिम शेवटच्या दिशेने जात आहे; आपण सगळे मृत्यूच्या दिशेने जात आहोत. तुम्ही कोणाला शांत करण्याचा किती प्रयत्न करणार आहात? याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांबरोबर उद्धटपणे वागा. तुम्ही लोकांबरोबर चांगली वागणूक ठेवा पण त्यात अडकून पडू नका ,’अरे,ते वैतागले आहेत,मी काय करू?’ तुम्ही जास्त काही करू शकत नाही! पुढे चालणे सुरूच ठेवा!

मला ही समस्या सगळीकडे दिसते,अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात. जवळजवळ प्रत्येक घरात अशी एक व्यक्ती असते जी सगळ्यांवर वैतागलेली असते आणि सगळे कोणावर तरी वैतागलेले असतात.मग शाब्दिक चकमकी होतात. म्हणूनच मी म्हणालो हे जग असे आहे! म्हणूनच याला माया म्हणतात,काहीतरी आहे असा भास होतो आणि वास्तवामामध्ये तसे नसते.

प्रश्न : मला माझ्या आणि माझ्या स्वकीयांच्या मृत्यूचे अतिशय भय वाटते. या भयापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही सुचवा.

श्री श्री : काहीही नाही! या भयासोबत राहा, आणि पहा ते कसे अदृश्य होते. ते बुडबुड्याप्रमाणे आहे. तुम्ही भयापासून सुटकारा मिळवू पाहता आणि ते वाढतच जाते. केवळ श्वास घ्या. क्रिया आणि ध्यान हे पुरेसे आहे. आणि हे सर्व ज्ञान तुम्हाला यातून बाहेर काढण्यास उत्तम आहे.

प्रश्न : आपल्याला आणि आपल्या नाते संबंधाना तापदायी ठरणाऱ्या भौतिक इच्छांपासून सुटकारा कसा मिळवू शकतो?

श्री श्री : तुमची प्राणशक्ती सशक्त करून.

जिथे कुठे लोभ असतो तिथे हस्तगत करण्याची भावना असते. जेव्हा प्रेम उपस्थित असते तेव्हा देण्याची भावना असते.

लोभाचे रूपांत प्रेमामध्ये कसे करायचे? आपल्या प्रणालीमधील उर्जेची पातळी उंचावून.जेव्हा उर्जा खालच्या चक्रामध्ये ( कण्याच्या शेवटच्या टोकाच्या दोन-तीन इंच वर ) अडकते तेव्हा लोभ उत्पन्न होतो. आणि जेव्हा उर्जेचे द्वार वरच्या दिशेने उघडतात तेव्हा उर्जा उंचावते. मग अधिक प्रेम, अनुकंपा, जागरूकता निर्माण होते. आणि इतर सुंदर तरल भावनासुद्धा उत्पन्न होतात. तेव्हा प्रणालीमधून हिंसाचार नाहीसा होतो.

प्रश्न : केव्हा आणि कुठे आत्मसाक्षात्कार घडेल?

श्री श्री : आत्मसाक्षात्काराचे अनुभूती ही आताच्या आता इथे आहे!

जेव्हा मी म्हणतो ‘डोळे बंद करा’, आणि आपण ध्यान धरतो, त्या क्षणाला तुम्हाला तुमची ओळख असते का? तुम्ही पुरुष आहात, महिला आहात किंवा प्राध्यापक आहात? तुम्हाला तुमचे वय ठावूक असते का? तुम्ही कालातीत आहात हे तुम्हाला दिसते का? तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाच्या, काळाच्या पलीकडे आहात. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. हळू हळू, पायरी पायरीने तुम्ही त्या दिशेने जाता. मग तुमच्या लक्षात येते,’मी केवळ हे शरीर नाहीये, मी शुद्ध उर्जा आहे.’

हे तुमचे पहिले अँडवान्स शिबीर आहे का? तुम्हाला अजून दोनेक अँडवान्स शिबिरांची आवश्यकता आहे. काही हरकत नाही. तुमच्या लक्षात आले का पहिल्या दिवशी तुमचे मन सगळीकडे सैरभैर होते? दुसऱ्या दिवसापासून ते शांत व्हायला लागले. आणि आज तिसऱ्या दिवशी ध्यान धारणा चांगली झाली. तर हळू हळू तुम्ही त्या दिशे पुढे जाल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, जेव्हा कधी मी ज्ञानाच्या दोन गोष्टी ऐकतो तेव्हा माझ्या आत काहीतरी कंपायमान होते. ते कंपायमान होणारे काय आहे?

श्री श्री : तीच तर शक्ती आहे, खरी उर्जा, वास्तविक तुम्ही. तुमच्यात हलणारे, ती उर्जा यालाच चैतन्य म्हणतात. तुम्ही त्या उर्जेने बनलेले आहात.