कामाच्या ठिकाणी नेहमी थकलेले?

15
2013
Apr
रेजिना, कॅनडा

इथे फार मस्त वाटते!

रेजिना ही शांत डोके आणि प्रेमळ हृदय असलेल्या लोकांची जागा असल्याचे दिसून येत आहे. नेहमी, मोठ्या शहरांमध्ये लोक हे दगडी हृदय आणि गरम डोक्याची असतात. छोट्या शहरांमध्ये एकोपा असतो, लोक एकत्र येतात. आपल्याला ही प्रेम पसरण्याची संस्कृती जपली पाहिजे.

हिंसा-मुक्त समाज, आजार-रहित शरीर, गोंधळ-विरहित मन, निरोधन-मुक्त बुद्धी, आघात-रहित स्मृती आणि दुःख-रहित आत्मा हे प्रयेक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहेत. दि आर्ट ऑफ लिविंग संस्था हेच तर काम करते; बंधुभावाची भावना निर्माण करणे. आपण सगळे एक मानवीय परिवाराचे सदस्य आहोत.

आपण ज्याप्रकारे पूजा करतो त्यात फरक असेल, ज्याप्रकारे आपण जीवनोत्सव साजरा करतो त्यात वेगळेपणा असेल, परंतु आपण सगळे एकाच मानवीय परिवाराचे सदस्य आहोत. जेव्हा आपण हे विसरतो तेव्हा मानवजात विनाशाकडे जाते.

जगात काय चालले आहे ते बघितले? वर्गांमधून हिंसाचार घडत आहे. लोकांना मुलांना शाळेत पाठवायलासुद्धा असुरक्षित वाटते. जेव्हा मी ऐकले की एका वर्षात युनियटेड स्टेट्समध्ये १० मिलियन हिंसाचाराच्या घटना घडल्या तेव्हा मला प्रत्येक एका हिंसाचाराच्या कृत्याकरिता एक बिलियन अहिंसेच्या कृती  ही कल्पना सुचली. आपल्याला ही परिस्थिती बदलली पाहिजे; याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती करायला पाहिजे. प्रत्येक एका हिंसात्मक कृतीचा बदला आपण शेकडो अहिंसेच्या कृतींनी चुकवायला पाहिजे. 

जेव्हा मी काँनेक्टीकटयेथील दुर्दैवी घटनेबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले, मी सगळीकडे प्रवास करतो आणि सगळ्यांबरोबर बोलतो, त्यांना शपथ घ्यायला लावतो, वचन द्यायला लावतो की आपण सगळे बघूया की हिंसाचार कसा काय कमी होईल. तुम्ही काय म्हणता?

निराशा, घरगुती हिंसाचार आणि सामाजिक हिंसाचार या सगळ्या समस्या संपूर्ण जगभर आहेत. याचे कारण आहे की आपण आपल्या स्वतःबरोबर आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांबरोबर जोडायला विसरलेलो आहे. ही एकच गोष्ट आहे ज्यामुळे जीवन जगण्यायोग्य होते.

जीवन जगण्यायोग्य तेव्हाच होते जेव्हा त्यात प्रेम असते.  प्रेम, अनुकंपा आणि आपलेपणाची भावना नसलेल्या जीवनाची केवळ कल्पना करून पहा. मनुष्यजात निराश होऊन जाईल. आपल्याला समाजात आणि परिवारात उत्सव साजरा करण्याची आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याची गरज आहे. (प्रत्येक एका हिंसाचाराच्या कृत्याकरिता एक बिलियन अहिंसेच्या कृती हा ) कार्यक्रम आम्ही याच उद्देश्याने सुरु केला. तुरुंग, शाळा, आणि वर्ग अशा ठिकाणी या कार्यक्रमाने स्पर्श केला जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज होती. मी खूपच आनंदात आहे कारण इतक्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या कार्यक्रमामध्ये झोकून दिलेले आहे.

दि आर्ट ऑफ लिविंग हे पाच तत्वांवर आधारित आहे :

१. परस्परविरोधी मुल्ये ही एकमेकांना पूरक असतात : जीवनात, सर्व काही आपल्याला पाहिजे तसे घडत नाही, कधी कधी चुकीच्या गोष्टी घडतात. आपण ते स्वीकारायला पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे, आणि पुढे जात राहिले पाहिजे. प्रसंग चांगला असो वा वाईट, आपण मनाची संयमशीलता राखली पाहिजे. हे मुलभूत तत्वांपैकी एक आहे जे मानवजातीमध्ये असले पाहिजे असे मी सुचवू इच्छितो.

कोणत्याही परिस्थितीत आपण आपली बुद्धी आणि तारतम्य शाबूत ठेवले पाहिजे.

हे आपण कसे काय करू शकतो?

आम्ही अनेक श्वासाची तंत्रे आणि व्यायाम संकल्पित केलेले आहेत ज्याने मनाचा तणाव दूर होतो आणि ते वर्तमान क्षणात जगू लागते.

२. लोक आणि परिस्थिती यांचा आहे तसा स्वीकार करा : आपण जरी स्वीकार नाही केला तरी गोष्टी बदलणार नाहीयेत, बरोबर? जेव्हा तुम्ही किमानपक्षी त्याचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही अधिक केंद्रित होता. मग, तुम्ही बदल घडवण्यास मदत करता.

३. इतर लोकांच्या चुकांच्या मागे त्यांचे उद्देश्य पाहू नका : सर्वात वाईट गुन्हेगारामध्येसुद्धा तुम्हाला दुर्दैवी बळी ठरलेली व्यक्ती दिसेल जी मदतीची याचना करीत असेल. जेव्हा तुम्हाला असे दिसेल तेव्हा तुम्हाला अनुकंपा वाटेल, तिरस्कार वाटणार नाही.

४. इतरांच्या मताचा फुटबॉल बनू नका.

५. वर्तमान क्षणात जगा.

ही अतिशय मुलभूत तत्वे आहेत जी मला वाटते की आपल्या जीवनात आणि परिवारात शांतता आणण्यासाठी फार महत्वाची आहेत, हो ना? आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटते त्याप्रमाणे बरोबरच होऊन पाहिजे असते. परंतु असे नेहमी घडतेच असे नाही. आपल्याला इतरांच्या मतांचा स्विकार करावा लागतो. हे साध्य करण्यासाठी श्वास हे महत्वाचे साधन आहे. प्रत्येक भावनेसाठी श्वासाचा विशिष्ट ताल असतो. 

प्राचीन काळामध्ये हे ज्ञान अत्यंत संरक्षित गुपित होते. हे ज्ञान केवळ शाही आणि काही खास लोकानांच प्रदान केल्या जायचे. मी विचार केला की मोबाईल फोनप्रमाणेच, हे ज्ञान समस्त लोकसंख्येला उपलब्ध करून दिले पाहिजे. आपण सर्वांना त्यांचे मन कसे हाताळावे हे शिकवायला पाहिजे; याची गरज आहे. आणि आम्ही हे गेल्या ३२ वर्षांपासून करीत आहोत. 

आज आपण हिंसाचार मुक्त समाज निर्माण करण्याचे मनावर घेऊ या.

आपण आपली संस्कृती, खेळ, व्यवसाय आणि आपले श्रद्धेवर आधारित कार्यक्रम या सर्वांमध्ये हे अहिंसेचे ज्ञान संमेलीत करणे जरुरी आहे. त्या सर्वाना याची गरज आहे. आपण क्षुब्ध असताना आपले मन शांत कसे करावे हे आपण शिकणे जरुरी आहे.

आता आपण असे म्हणू, ‘ होय, हे सर्व माझ्या डोक्यात आहे, परंतु हे माझ्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष व्यवहारात कसे अणु. मला माहिती आहे की रागावणे, वैतागाने किंवा निराश होणे हे वाईट आहे. मी ते कसे काय थांबवू?’

इथेच ध्यान आणि श्वासाची तंत्रे मदतीला धावून येतात. ही ती उपकरणे आहेत जी तुमचे मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि तुम्हाला आतून आनंदी वाटते. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही केवळ तेच करता जे सर्वांकरिता चांगले असते.

जे असंतुष्ट असतात ते त्याच गोष्टी करतात ज्या त्यांच्या स्वतःसाठी आणि इतर सगळ्यांसाठी वाईट असतात. हेच काय ते होते. जर कोणी असंतुष्ट असेल तर मग त्यांचा हेतू असो किंवा नसो, जीवनाला पोषक नसणारे कृत्य त्यांच्याकडून घडणारच. हे माझे निरीक्षण आहे.

आनंदी असणे हा आपला खरा स्वभाव आहे. आपल्याला आनंदाच्या लाटा निर्माण करायच्या आहेत. हे केवळ संपत्तीने होऊ शकत नाही.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा कधी मी एखाद्या क्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवू पाहतो तेव्हा मला अतिशय तणावाचा अनुभव येतो उदाहरणार्थ नोकरीमध्ये. मला सतत तणाव राहतो. याला मी चुकवू शकत नाही कारण मला झोप लागत नाही. शांतात कशी प्राप्त करावी?

श्री श्री : तुम्हाला तणाव म्हणजे काय ते माहिती आहे? करायला भरपूर काम, वेळेचा अभाव आणि उर्जा नसणे, यालाच तणाव म्हणतात. 

म्हणून, एक तर तुम्ही तुमची उर्जा वाढवा किंवा कामाचा ताण कमी करा. अर्थात तुम्ही कामाचा तणाव कमी करू शकत नाही किंवा वेळ वाढवू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या उर्जेची पातळी वाढवू शकता. जर तुमच्या उर्जेची पातळी उंचावली तर तुम्ही तुमचे काम सहजपणे करू शकता. श्वासाची सर्व तंत्रे ही उर्जेची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. सकाळी केवळ दहा मिनिटे प्राणायाम करा आणि मग जा आणि कोणतेही काम करा. जेव्हा तुम्ही कामावरून परत याल तेव्हा पुन्हा दहा मिनिटे करा.

प्रश्न : गुरुदेव, हिवाळ्यात उर्जेची पातळी वाढवण्यासाठी आम्ही काय करू शकतो?

श्री श्री : हिवाळ्यात तुम्ही नक्कीच प्राणायाम आणि श्वासाचे व्यायाम करू शकता. असे म्हणतात की शरीरात इतकी उर्जा आहे की त्याने संपूर्ण न्यूयॉर्क शहराला सहा महिने अखंडित वीज पुरवठा होई. ती उर्जा आणण्याकरिता आपल्याला केवळ प्राणायाम ; भस्त्रिका करणे जरुरी आहे. 

तुम्हाला तुमच्या हाताच्या अंगठ्याचे गुपित ठावूक आहे का?

जेव्हा थंडी असते तेव्हा सर्व जगभरातील लोकांना आपले हाताचे अंगठे काखेत किंवा खिशात लपवताना तुम्ही पहिले आहे? ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तुमच्या शरीराला गरम वाटते, संपूर्णपणे नाही,जवळजवळ ६० टक्के, जेव्हा तुम्ही तुमचे अंगठे गरम ठेवता.

आदि मुद्रा  ( अंगठा मुडपून करंगळीच्या तळाला लागलेला आणि इतर चार बोटे त्याच्यावर मुडपून मुठ वळलेली ) घेऊन जन्मलेली मुले असतात. जर तुम्ही एका बाळाला जन्मल्यापासून ते तीन वर्षाचा होईपर्यंत जर निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की तो सर्व योग आसने करतो. तुम्हाला योगाच्या शिक्षकाची गरज नाही; तुम्हाला केवळ त्या मुलाला बघितले पाहिजे.

तुम्ही नवजात शिशूला झोपलेले पहिले आहे? ते चीन मुद्रेमध्ये  ( तर्जनी अंगठ्याला हलकेच स्पर्शून असते आणि इतर तीन बोटे अंगठ्याला समांतर असतात ). या मुद्रेमध्ये, चैतन्य जागृत असते आणि प्राण, जीव शक्ती, ही हृदय परिसरात असते. मुले चीन मुद्रा अथवा चिन्मयी मुद्रा  (तर्जनी अंगठ्याला हलकेच स्पर्शून असते आणि इतर तीन बोटे मुडपून हाताच्या तळव्याला स्पर्श करुन असतात ) यामध्ये झोपतात.

जेव्हा तुम्हाला अतिशय थंडी वाजत असते तेव्हा तुम्हाला आदि मुद्रेमुळे मदत होईल. या अवस्थेमध्ये काही काळ श्वसन करा.

थंडीच्या दिवसांमध्ये केवळ तुमचा लँपटाँप किंवा काँम्प्यूटर घेऊन आभासी जगात जाऊन बसू नका. आपापल्या घरांमधून बाहेर या, २०-४० जणांचा गट बनवा, गा आणि उत्सव साजरा करा. मग तुम्हाल हताश किंवा निराश वाटणे शक्यच नाही. मला वाटते की याची गरज आहे. प्राचीन काळी लोकांनी हेच तर केले. ते शेकोटी पेटवायचे, गप्पा मारायचे, आणि कूटाळकी करायचे.

थंड हवामान हे ध्यानाकरिता फार चांगले आहे. मन एकदम स्थिर होते कारण निसर्गसुद्धा स्थिर असतो म्हणून.

लोक हिमालयात ध्यान धारणेकरिता जायचे कारण निसर्ग शांत आणि निरव आहे. मुक्त उर्जाभाग अवतीर्ण होतो, चुका घडून येत नाहीत. मन एकदम शांत होते, आतून फार छान वाटते.

प्रश्न : आपण जन्माला का आलो आहोत? आपण खातो, पितो,झोपतो; एका नात्यातून दुसऱ्या नात्यात अडकतो. जीवनाचा अर्थ काय आहे?

श्री श्री : हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला याचे उत्तर माहिती आहे तो तुम्हाला सांगणार नाही. जो तुम्हाला याचे उत्तर सांगेल त्याला ते माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? याचे कारण असे की हा प्रश्नच एक वाहन आहे जे तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाईल. ‘जीवनाचा अर्थ काय? जीवनाचा हेतू काय? ' असे तुम्ही जेव्हा पुनःपुन्हा विचाराल तेव्हा असंबंधित असलेल्या सर्व गोष्टी निघून जातील, आणि आयुष्यात पुढे जाण्याकरिता वस्तुस्थिती स्पष्ट होईल. म्हणून, मी उत्तर न देणे हेच बरे आहे, परंतु हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे.

हाच तो प्रश्न आहे ज्याने तुमचा जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु होतो. याच्याआधी तुम्ही केवळ अस्तित्वात असतात, परंतु या प्रश्नाने तुम्ही अध्यात्मिक मार्गावर चालू पडता.

प्रश्न : आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नामध्ये सुधारणा केल्याने आणि तुम्ही श्वासोत्श्वास आणि ध्यान केल्याने तुम्ही स्वप्ने अधिक स्पष्ट होत जातात काय?

श्री श्री : हो. स्वप्नांची प्रत नक्कीच सुधारते.

प्रश्न : कित्येकवेळा आपल्याला आपली स्वप्ने लक्षात का राहत नाही? हे आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नाचा परिणाम आहे का मग आपण ध्यान करीत नाही म्हणून?

श्री श्री : आपल्याला आपली सर्व स्वप्ने लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे चांगले आहे की आपल्याला ती लक्षात राहत नाहीत. तसे झाल्याने, आपण अधिक वर्तमान क्षणात असतो. स्वप्न हे स्वप्न आहे, ते गेले तर गेले.

प्रश्न : आपल्या बघण्यात अनेक मुळे आहेत ज्यांना अॅलर्जी आहे आणि ज्यांची प्रतिकार शक्ती क्षीण आहे. लहान मुलांना तर तणाव नसतो. त्यांच्या भल्याकरिता आपल्या जीवन शैलीत काही फरक आपण आणू शकतो काय?

श्री श्री : नक्कीच. मुलांना टीव्ही समोर अथवा व्हिडिओ गेम समोर फार वेळ सोडू नका. त्यांच्या प्रभावाचा मारा मुलांच्या लहानश्या मेंदूवर फार काळ होतो. त्याने त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो; त्यांच्यात लक्ष केंद्रित न होण्याचा आजार बळावतो, आणि इतर गोष्टी. 

म्हणून मुलांनी फार काळ टीव्ही समोर घालवू नये,जास्तीत जास्त दिवसाचा एक तास. आजकाल तर मुले उठल्या उठल्या टीव्ही लावल्या जातो आणि ते बसून कार्टून बघत बसतात. ते शाळेत जातात आणि आल्यानंतर पुन्हा ते कार्टून समोर बसतात. जेवतानासुद्धा सगळे लक्ष कार्टूनवरच असते. मी बरोबर बोलतो आहे ना?

आपल्या मुलांच्या भल्याकरिता आपण हे टाळले पाहिजे. हे माझे मत आहे, आणि मुलांचे अनेक डॉक्टर माझ्याबरोबर सहमत होतील.

प्रश्न : गुरुदेव, मुलांनी व्हिडिओ गेम खेळू नये असे तुमचे म्हणणे आहे का?

श्री श्री : त्यांनी कधीच व्हिडिओ गेम खेळू नये असे माझे म्हणणे नाही.

मेंदूला चालना देणारे अनेक खेळ आहेत जे मुले खेळू शकतात. हिंसात्मक व्हिडिओ गेम आपण टाळावे येवढेच मी सुचवू इच्छितो. त्यांच्या इवल्याश्या मनांना आभासी जग आणि खरे जग यातील फरक काळात नाही. आभासी जगतात त्यांनी कितीही जरी गोळ्या झाडल्या तरीसुद्धा लोक पुन्हा उठून उभे राहतात. म्हणून त्यांना वाटत की खऱ्या जगातसुद्धा, आभासी जगाप्रमाणेच, लोक पुन्हा उठून उभे राहतील जर त्यांनी लोकांना गोळ्या झाडल्या तरी. अनेक गुन्हे घडतात कारण त्यांच्या वैचारिक प्रक्रीयेमध्ये खरे जग आणि आभासी जग यातील फरक अदृश्य होऊन जातो.

मी खेळांच्या बाजूने आहे. मुलांनी खेळ शिकले पाहिजे. मी मुलांनी व्हिडिओ गेम खेळायच्या किंवा टीव्ही बघण्याच्या विरुद्ध नाहीये, परंतु यात खूप वेळ घालवू नये; रोजचा केवळ एक तास.