मानवी जीवन अतिशय मौल्यवान आहे

27
2013
Apr
नुसा डुआ, बाली

 

जीवनात तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात : उत्कटता, वैराग्य आणि करुणा. 

जीवनात उत्कटता असणे आवश्यक आहे. उत्कटता असेल तरच तुम्ही कोणतेही काम करू शकता काहीतरी साध्य करू शकता. त्यामुळे आपल्याकडे उत्कटता असणे गरजेचे आहे.

उत्कटते बरोबरच वैराग्य सुद्धा गरजेचे आहे. फक्त उत्कटता असून भागणार नाही. असे लोक आहेत की ज्यांच्यात खूप उत्कटता आहेपण त्याने ते थकून जातात, पटकन दमून जातात.लवकरच त्यांची दमछाक होते आणि कधी कधी त्यांना नैराश्यही येते. कारण त्यांच्या उत्कटता खूप असते पण त्यांना हवे तसे परिणाम दिसत नाहीत.

म्हणूनच उत्कटते बरोबरच तुमच्यात वैराग्य असण्याचीही गरज आहे. ते सुरक्षा वॉल्व सारखे असते. त्याने तुमच्यात समजूतदारपणा येतो आणि तुम्ही स्वस्थ चित्त रहाता. हे असे आहे की, श्वास आंत घेणे म्हणजे उत्कटता आणि बाहेर सोडणे म्हणजे वैराग्य. 

उत्कटता आणि वैराग्याबरोबारच करुणेचीही आवश्यकता असते. वैराग्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते, उत्कटतेमुळे तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे साध्य करू शकता आणि करुणेने तुमचे व्यक्तिमत्व चमकून दिसेल. आपल्याकडे उत्कटता, वैराग्य आणि करुणा तिन्ही असायला हवे. जीवनात या तिन्हीचा समतोल असणे ही मूलभूत गरज आहे.

त्यानंतर तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की कुठे आणि किती करुणा असायला हवी. जर तुमचे मूळ शाळेत जायचे नाही म्हणून रडत असेल तर तुम्ही करुणामय होऊन असे म्हणू शकत नाही की, ‘ मी किती करुणामय आहे,मुलाला शाळेत नको जाउदे, घरीच राहू दे.’ नाही !

जर कुणी चुकीच्या गोष्टी करत असेल, कुणी अंमली पदार्थांच्या, दारुच्या व्यसनात अडकून स्वत:चे आयुष्य बरबाद करून घेत असेल तर तुम्ही असे म्हणू शकत नाही की, ‘मला त्यांच्याबद्दल किती करुणा वाटते आहे.’ इथे तुमची करुणा म्हणजे तुमचा मनाच्या खंबीरपणा. तुम्ही खंबीर रहायला हवे.

तर, आपण लोकांशी कश्याप्रकारे वागावे याबद्दलचे, जीवनाचे हेच सूत्र आहे.

हे प्रसंग, या घटना आणि हे जीवन यापेक्षाही श्रेष्ठ असे काही तरी आहे. याहूनही खूप जास्त गूढ असे काहीतरी आहे. जे खरे जग वाटते त्यापेक्षाही खूप जास्त वास्तव असे काही तरी. हे स्वीकारल्याने जीवनाला एक व्यापक असा दृष्टीकोन प्राप्त होतो. तुमची नजर दररोजच्या ठरलेल्या साचेबंद भौतिक जीवनाकडून जास्त उच्च अशा सत्याकडे जाते.

कल्पना करा, हा चंद्र अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वात आहे. ही पृथ्वी १९ अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आणि तुम्ही इथे कधीपासून आहात ? अगदी थोड्या काळापासून. विचार करा, ५० वर्षे, ६० वर्षे किंवा ३० वर्षे ? आणि आणखी किती काळ इथे रहाल ? आणखी ३०,४० वर्षे, बास ! संपलं ! तरीही आपले मन म्हणत असते, ‘ नाही, मी तर इथे कायमचाच आहे !’ 

सहसा असे दिसते की, मुले मोठी होताना तुम्हाला दिसतात पण तरीही तुम्हाला वाटत असते की तुम्ही तसेच आहात. तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आहे ? ‘मुलं व्यवस्थित मोठी झाली आहेत आणि मी तसाच आहे, माझं वय वाढलच नाहिये.’

हे खरे आहे. तुमच्यात असे काही तरी आहे जे स्वीकारत नाही की तुम्ही जन्मलात किंवा तुम्ही मरणार आहात. तुमच्या आत्म्यात, मनात तुमच्यात खोलवर कुठेतरी – आत्मा, जो कधीही वयस्क होत नाही, अजिबात बदलत नाही, मग तुमच्या आसपासचे सगळे काही बदलले तरीही. आणि या जन्माच्या आधीही हा आत्मा होताच.

आणि हा काही एकच जन्म नाहिये. अनेकानेक जन्मात इथे होतोच.

जर कुणाला एकावेळी एकच दिवस लक्षात राहिला. दुसऱ्या दिवशी त्यांना लक्षात राहिले नाही की ते आदल्या दिवशी काय होते. किंवा कल्पना करा की कुणाची कल्पनाशक्ती इतकी कमी आहे की त्यांना फक्त सकाळपासून रात्री पर्यंतचेच लक्षात राहते; त्यांना आदल्या दिवशीचे काहीच लक्षात रहात नाही किंवा उद्याचा दिवस असेल हेही त्यांच्या लक्षात येत नाही.

हे म्हणजे स्मृती भ्रंश झालेल्या लोकांसारखे झाले, ज्यांना काहीच आठवत नाही. आपली सर्वांची अशीच मनस्थिती आहे. जेव्हा कुणी भरपूर दारू ढोसली असेल तेव्हा तेसागलेच विसरतात. त्यांना काहीच आठवत नाही. त्याचं प्रमाणे आपल्यालाही आठवत नाही की आपण याआधीही इथे होतो आणि यानंतरही इथे असणार आहोत आणि अजारो वर्षे आपले अस्तित्व असणार आहे. या सत्याकडे आपण बघायला हवे. मग जीवनाबद्दलचा एक खूप व्यापक दृष्टीकोन मिळतो.

इथे बालीमध्ये ही सगळी देवळं तुम्ही बघितलीत. या देवळांमध्ये देवाची मूर्तीच नसते. तुम्हाला माहित आहे, असे कां ? कारण ते आपल्या पूर्वजांसाठी असते. पूर्वजांच्या आत्म्यासाठी ते योग्य जागा ठेवतात.

देवांसाठीपण देवळे आहेत. इतके सारे देव आहेत. ते येतात, इथे बसतात, तुम्हाला आशिर्वाद देतात आणि तुमची काळजी घेतात. असा इथे विश्वास आहे. खरे म्हणजे हा नुसता विश्वास नाही ते वास्तवही (सत्यही) आहे.

वास्तवाचे (सत्याचे) अनेक स्तर आहेत.

सर्वात पहिला आहे प्रकाश, सर्वश्रेष्ठ, एक देव, अनेक देव नाही, फक्त एकच, जो परमात्मा आहे. परमात्म्याच्या खाली अनेक निरनिराळ्या शक्ती किंवा देवदूत किंवा देव आणि देवी आहेत.

या शक्तींच्या, देवदूतांच्या किंवा देवांच्या खाली अनेक मृतात्मे आहेत.

आणि या मृतात्म्यांच्या खाली आपल्याला जे दिसते ते व्यक्त जग आहे.

तर, आपल्याला दिसते ते हे अभिव्यक्त जग आहे. मग, काही सूक्ष्म शक्ती आहेत ज्या चांगल्या आणि वाईट आहेत. त्यावर देव, पूर्वज आहेत आणि त्यानंतर परमात्मा, दिव्यत्व, देव किंवा त्याला तुम्ही जे काही म्हणत असाल ते आहे.

हे जग म्हणजे सत्याचे स्तरावर स्तर, स्तरावर स्तर, स्तरावर स्तर आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही या देहाचा त्याग करता तेव्हा तुमचा आत्मा बाहेर पडतो आणि बराच काळ दुसऱ्या एका परिमंडलात रहातो, जोपर्यंत त्याला परत येण्यासाठी दुसरे शरिर मिळत नाही. हे जीवन, आपले मानवी जीवन अतिशय मौल्यवान आहे कारण या जीवनातून तुम्ही प्रकाशात विलीन होणार आहात. या जीवनात तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता. मानवी शरिर अतिशय मौल्यवान आहे.

मी म्हटले त्याप्रमाणे इथे ही जी सगळी देवळे आहेत. हे असे सांगण्यासाठी की दैवत्व निराकार आहे पण त्याचे अस्तित्व आपल्याला इथे जाणवते.त्यामुळेच असे म्हटले आहे की, अस्तित्व जाणवणे. अगदी आठवणींसारखेच. जे पैलतीरावर पोहोचले आहेत अशा आई, वडील, आजी- आजोबा हे नेहमीच टीमच्या मनात असतात, हो की नाही ? त्यांचे अस्तित्व जाणवू शकते, आपल्या आठवणीत ते जाणवतात. त्याचप्रमाणे विविध देवता, देवदूत किंवा देव, देवी आपल्या शरीराच्या निरनिराळ्या भागांसाठी अस्तित्वात असतात.

शरीराचा प्रत्येक भाग विशिष्ठ देवतेच्या हुकमती खाली असतो. आपण जशी त्यांची आठवण करतो तस् तसे ते हजर होतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व जाणवते.

जगातील जवळ जवळ सर्वच परंपरांमध्ये हा विश्वास आहे. अगदी मेक्सिको,दक्षिण अमेरिका ते मंगोलिया. तरीही विश्वास असून भागत नाही.

तुम्ही ध्यान करता तेव्हा काय होते माहित आहे कां ? तुम्ही वास्तवाच्या इतर परिमंडलांशी चांगला संबंध जोडत असता. 

जेव्हा मन स्थिर असते, ध्यान लागलेले असते तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीचे शुद्धीकरण करत नसता तर, तुम्ही तुमच्या सर्व सभोवताली सकारात्मक ऊर्जा पसरवत असता. हे जग सोडून पैलतीरावर गेलेल्या लोकांनाही तुमचे ध्यान शांती आणि आनंद मिळवून देतो आणि हे फार फार महत्वाचे आहे. तुम्ही जेव्हा मौनात शांत असता तेव्हा जगातील गोष्टी तुम्ही तुमच्या मनात शिरू देत नसता , तुम्ही स्वत:ला मुक्त होऊ देऊन, शरीराची, मनाची शुद्धी होऊ देत असता. या काळात काही विचारांचा तुमच्यावर भडीमार सुरु असतो. काही जुन्या गोष्टी मनात येऊन तुम्हाला त्रास देऊ शकतात. काही हरकत नाही. घाबरून जाऊ नका. तुम्ही बसला आहात हेच खूप चांगले आहे. जे छोटे ते सगळे चांगल्यासाठीच.

जर जुने विचार मनात येऊन तुम्हाला त्रास देत असतील तरी हरकत नाही, ते येतात आणि जातात. तरीही, मौनात रहाणे हे खूप मौल्यवान आहे, फक्त तुमच्यासाठी नाही तर सूक्ष्म सृष्टीसाठीही. आणि जगासाठीसुद्धा कारण तुम्ही तुमच्या दर मिनिटाच्या ध्यानात, दर मिनिटाला अशा काही सकारात्मक लहरी निर्माण करत असता की बास !

त्याशिवाय, पूर्णचंद्र, समुद्र आणि ध्यान सगळे अगदी छान जुळून येते.

मन अति जास्त क्रियेमध्ये गुंतले की ते क्षोभीत होते. अधून मधून तुम्ही कामातून बाहेर येता तसे क्षोभ नाहीसा होतो आणि ध्यान होऊ लागते.