शब्दांविना संवाद

09
2013
Mar
बंगलोर, भारत

आपल्या मनात येणारे विचार आपण बघणे आणि निरीक्षण करणे जरुरी आहे, ते सगळे विचार निरुपयोगी आहेत.

मनातील प्रत्येक विचार हा भूतकाळाबद्दल आहे. हे मनात उठणारे विचार हे चेतानेवर भूतकाळाचे प्रक्षेपण असते. भूतकाळात जे काही झाले त्याचेच प्रक्षेपण आपण भविष्यकाळावर करीत असतो. तर भूतकाळाचे विचार मनात सतत येत असतात. ‘हे ठीक आहे, ते ठीक नाही. मला अमुक आवडते,मला तमुक आवडत नाही’.

तुम्ही काय करणे जरुरी आहे तर या विचारांची मोळी बांधा आणि त्यांना बाहेर फेकून द्या. हे सगळे विचार निरुपयोगी आहेत हे केवळ लक्षात घेतल्याने तुमचे मन मुक्त होते. 

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

आज, इथे बसलेल्या तुमच्यापैकी काही जणांना याचा अनुभव येत आहे. याला म्हणतात मौन संवाद. जेव्हा तुम्ही मौनामध्ये खोलवर जाता तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येतो.

हे काय आहे? विचारांव्यतिरिक्त संवादाचा तुम्हाला अनुभव येतो; काहीही न बोलता तुम्हाला समजते की तुम्हाला काय सांगितले जात आहे. तेव्हाच तुमच्या मनातील सगळे प्रश्न नाहीसे होतात.

प्रश्न हे इष्ट स्थळी पोहचण्याची गाडी आहे. प्रश्नांची उत्तरे ही गाडीच्या इंधानाप्रमाणे आहेत. म्हणून जेव्हा प्रश्नाला उत्तर मेलाते तेव्हा गाडी आगेकूच करणे सुरु करते. अर्थात प्रश्नोत्तराचा उपयोग न करता  तुमच्या इष्टस्थानी परस्पर पोहोचणेसुद्धा शक्य आहे. कसे? मौनामध्ये बसून. मौनाचे हे महत्व आहे. जेव्हा तुम्ही मौनामध्ये बसता आणि एखादा प्रश्न मनात येतो तेव्हा त्याचे उत्तरसुद्धा त्याप्रश्नासोबत येते. तुमच्याबरोबर असे घडले आहे का? तुमच्यापैकी कितीजणांना याचा अनुभव आला आहे? ( अनेक जण त्याचे हात वर करतात ) 

मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे; जुनीच तरीसुद्धा नवीन गोष्ट. हे सगळे प्रश्न आणि उत्तरे हे सगळे विचार आहेत; आणि इतर जे काय विचार तुमच्या मनात आहेत त्यांची मोळी बांधा आणि फेकून द्या. केवळ मौन धरा! आणि मगच उत्सव साजरा करणे शक्य होईल. नंतर उत्साह संचारेल आणि मग चैतन्य फुलून येईल.

नाहीतर मग तुम्ही जितके विचारांच्या विळख्यात अडकाल तितके तुमचे चैतन्य जडत्वाच्या दिशेने सरकेल.

जे कोणी विचारांच्या विळख्यात अतिप्रमाणात अडकते त्यांच्या जडत्व किंवा अचेतना येते; याचा अर्थ असा की त्यांच्यात अजिबात उत्साह नसतो.

लहान मुलांकडे पहा,त्यांच्याकडे काय असते? त्यांच्याकडे उत्साह असतो, उत्सव साजरा करण्याची भावना असते, प्रेम आणि आतून एक प्रकारची चमक असते. त्यांना फार कमी विचार असतात, नाही का? जेव्हा जेव्हा तुम्ही लहान मुलांना पाहता तेव्हा असे भासते की जसे काही त्यांचे चैतन्य हे ( आनंदाने) ओसंडून जात आहे.

महाशिवरात्र यासारख्या सर्व सणांचे साजरे करणे हे याकरिताच असते. तुम्ही बाकी सर्व सोडून देण्याकरिता!

बाकीचे सर्व टाकून द्या आणि शिव तत्त्वामध्ये चिंब भिजा. शिवासारखे व्हा, याचा अर्थ असा के त्या निरागसतेच्या भावनेला अनुभवा. निरागसता म्हणजे काय? विचारांच्या विळख्यात न अडकणे, केवळ साधे आणि नैसर्गिक असणे, आणि स्वयंमध्ये आकंठ बुडून जाणे. थोड्या वेळाकरिता संगीतामध्ये स्वतःला चिंब करा.

हे साधण्याकरिता संगीत, प्रार्थना, मंत्रांचा जप, भक्ती, श्रद्धा ही सर्व माध्यमे आहेत. गुरु एक माध्यम आहे. पूजा ही एक माध्यम आहे. हे सर्व आपल्याला आपल्या स्वयंबद्दल जागरूक करतात.

प्रश्न : गुरुदेव, भगवद्गीता म्हणते की आपण कर्ता नाही. आपल्यामार्फत कोणीतरी काम करीत आहे, आपण माध्यम आहोत. आपण म्हणतो की भविष्य हे इच्छास्वातंत्र्यनुसार आहे आणि भूतकाळ हे दैवानुसार आहे. मला यात थोडा विरोधाभास वाटतो. कृपा करून याचे स्पष्टीकरण द्या.

श्री श्री : दोन गोष्टी आहेत; एक आहे कर्ता आणि दुसरा आहे मझा घेणारा. जर तुम्ही कर्ता आहात तर तुम्ही मझा घेणारेसुद्धा आहात. जर तुम्ही कर्ता नाही तर मग तुम्ही मझा घेणारेसुद्धा नाहीत.

म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता,’मी ते केलेले नाही’, तेव्हा तुमच्यातील एक भाग आहे जो त्याचे परिणाम आणि त्या कृतीने प्रभावित होत नाही. आणि तुमच्यातील दुसरा भाग आहे जो सगळे काही करतो आहे आणि त्याचे परिणाम भोगतो आहे अथवा त्याची मझा लुटतो आहे. तर तुमच्यात दोन बाजू आहेत.

उपनिषदामध्ये सुंदर सादृश्य आहे.

याविश्वाच्या वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत. एक कृतीच्या परिणामांची मझा लुटतो आहे तर दुसरा केवळ त्याचा साक्षीदार आहे. ही तत्त्वज्ञानाची गहनता आहे.

जस जसे तुम्ही ध्यानामध्ये खोल जाऊ लागतात आणि अधिकाधिक समजून घेऊ लागता तास तसे तुम्हाला असे घडताना आढळून येऊ लागेल. केलेले काम अतिशय उत्तम असो अथवा सर्वात वाईट असो, कुठेतरी आत तुम्हाला जाणवेल की मी ते केले नाही, ते तर आपोआप घडले. 

तुम्हाला असे जाणवले आहे? माझ्याकडून ते घडले, मी ते केलेले नाही.  तेच तर आहे. तेच तर आहे जे गोष्टी घडवून अनंते. आणि दुसरी गोष्ट आहे मी कर्ता नाही ही भावना. हा ‘न-कर्ता ‘ दिग्दर्शक आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मी सांख्य योगा बद्दल वाचले आहे परंतु मला ते समजू शकले नाही. कृपा करून समजावा. संसारिक कार्यांमध्ये गुंतलेले असताना आम्ही त्याचे अनुसरण करू शकतो का हेसुद्धा समजावा.

श्री श्री : हो, निश्चितच तुम्ही अनुसरण करू शकता. सांख्य योग म्हणजे जागे होणे आणि पाहणे की हे सगळे अस्तित्वात नाही. केवळ एकच अस्तितवात आहे, आणि सर्व काही त्याच्यामार्फत चालते. हेच पहा ना विचारसुद्धा काही नसतात, सर्व काही केवळ तरंग लाहिरी असतात.

सांख्य योग म्हणजे आत्मा अमर आहे. माझ्यामध्ये असा अंश आहे जो नष्ट पावत नाही, कमी होत नाही किंवा वृद्ध होत नाही हे समजणे. मी म्हणजे हे शरीर नाही  हे जाणून घ्या आणि आरामात रहा. केवळ हे जाणून, आणि स्वयंमध्ये आराम करणे यालाच सांख्य योग म्हणतात.

प्रश्न : गुरुदेव, गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते कसे सुरु होते आणि त्याची प्रगती कशी होते हे कृपा करून समजावा.

श्री श्री : तुमचे स्वतःबरोबर नाते काय आहे? तुम्ही स्वतःपासून काही लपवता का? नाही, त्याचप्रमाणे गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते आहे. तुम्ही स्वतःच्या स्वयंचे काय आहात? तुम्ही पुत्र आहात, वडील आहात किंवा भाऊ आहात? तुम्ही स्वतःच्या स्वयंचे काय आहात?

( उत्तर : मी सर्वस्व आहे. )

हो,मग तेच गुरूच्याबाबतीतसुद्धा लागू पडते.

प्रश्न : गुरुदेव, मी माझे आंतरिक अंतिम स्थळ, माझे खरे ध्येय कसे शोधू? किंवा मी शोधणे सोडून देऊ?

श्री श्री : मला वाटते की ही फार चांगली कल्पना आहे, शोधणे सोडून द्या आणि आराम करा. स्वयंमध्ये खोलवर जा.

हे बघा, मनाचा स्वभाव आहे की नितनवीन गोष्टींच्या मागे धावण्याचा. नवनवीन गोष्टी या नेहमी बाहेर असतात,म्हणून मन सतत बाहेरच्या दिशने धावत राहते. अर्थात,जेव्हा मन आतल्या दिशेने प्रवास सुरु करते तेव्हा ते नवीन गोष्टीनासुद्धा जुन्या गोष्टी म्हणून ओळखू लागते.

तुम्हाला नवीन अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा तो नवीन भासत नाही परंतु खूप ओळखीचा आणि जुना वाटतो. म्हणून त्याला नित्य नूतन  म्हणतात ज्याचा अर्थ आहे सदोदित नवीन, आणि तरीसुद्धा सनातन ज्याचा अर्थ आहे कालातीत अविस्मरणीय.

आत्मा, चेतना ही नित्य नूतन आहे ( सदोदित नवीन ). प्रत्येक क्षणी ती नवीन असते आणि तरीसुद्धा ती सूर्याप्रमाणे सर्वात प्राचीन आहे.

आज सूर्य एकदम नवीन आहे. ताजीतवानी सूर्यकिरणे येत आहेत. तुम्हाला जुनी, शिळी किंवा पुरातन किरणे मिळत नाहीयेत. तरीपण सूर्य नवीन आहे का? नाही, सूर्य प्राचीन आहे. 

चंद्र प्राचीन आहे आणि तरीसुद्धा चंद्राची किरणे कायम ताजी असतात.

आपल्या आत्म्याचे, स्वयंचे सुद्धा हेच आहे. तो नित्य नूतन; सदोदित नवीन आणि तरीसुद्धा प्राचीन. हे परस्परविरोधी आहे; सदोदित नवीन आणि तरीसुद्धा प्राचीन.

प्रश्न : गुरुदेव, मी माझ्या कुटुंबासोबत राहत नाही. माझे वय आता ७६ वर्षे आहे. मला तुमची काहीतरी वस्तू पाहिजे जी मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःजवळ ठेवेन. तुम्ही मला काहीतरी दिलेच पाहिजे! तुम्ही काय देणार?

श्री श्री : ही सगळे लोक माझे कुटुंब आहेत, आता ते तुमचेसुद्धा झालेत. आता तर तुमच्याकडे संपूर्ण विश्वच आहे.

हे पहा, वस्तू गोळा करीत राहू नका. जे ज्ञान प्रदान केल्या जात आहे त्याचे ग्रहण करा. कपड्याचा एखादा तुकडा, किंवा माझी एखादी वस्तू गोळा करण्याच्या फंदात पडू नका. हे सर्व सोडून द्या. इतके गहन ज्ञान दिल्या जात आहे. हे ज्ञान ग्रहण करा कारण ते जन्मोजन्म तुमच्यासोबत राहील.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, आर्ट ऑफ लिविंगचे जे शिक्षक आहेत ते तुमच्याबरोबर इतकी जवळीक साधू शकतात आणि तुम्हाला वरचेवर भेटू शकतात. आम्ही जे शिक्षक नाहीत त्यांच्यापेक्षा ते जास्त भाग्यवान आहेत, नाही का?

श्री श्री : हे बघा, जे शिक्षक आहेत ते माझ्या जवळ येऊ शकतात म्हणून शिक्षक नसलेल्यांपेक्षा भाग्यवान आहेत असा विचार करू नका. इथे असलेला प्रत्येकजण भाग्यवान आहे. काहीजण जवळ राहतात तर काही दूर राहतात. त्याचा अर्थ असा नाही की इतरांपेक्षा काहीजण केवळ भाग्यवान. सगळेच्या सगळे माझेच आहेत.