2 April 2012


पैसे मिळवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही
जागतिक व्यापार नीतिमूल्ये परिषद
सिंगापूर, २ एप्रिल २०१२


आज आदर्श व्यक्ती असणे फार गरजेचे आहे. तरुण उद्योजकांसमोर आदर्श असायला हवेत, उद्योग जे नीतीमत्येने काम करतात, जे न्यायी आणि सामाजिक जाणीव असणारे आहेत. असे बरेच उद्योग आहेत जे आचारसंहिता पाळून, आणि नीतीमत्येने वाढलेले आहेत, त्यामुळे हे व्हायला हवे. या परिषदेचा मुख्य हेतू ही बाब अधोरेखित करणे हेच आहे, असे उद्योग अधोरेखित करणे, जे पुढच्या पिढीसाठी नीतीमूल्य आचरणात आणण्यासाठी आदर्श असतील. 
तुम्हाला माहित आहे, पैसे मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत, पण चांगली झोप बऱ्याच मार्गाने मिळवता येत नाही. जेंव्हा सगळे निर्मळ आणि सरळसोट वाटते, जेंव्हा पारदर्शकता, स्पष्टता, सरळता असते तेंव्हा चांगली झोप आणि आतून समाधान मिळते.
मी सामान्यतः सगळ्यांना, कंपन्यांमध्ये, कारखान्यात दुपारी ध्यान करायला सांगतो. १० ते २० मिनिटे ध्यान आणि नंतर एकत्र जेवण करायला सांगतो. तुम्हाला दिसेल की त्या समूहात सुसंवाद, सुसूत्रता येते. तुम्हाला एकत्र काम करावेसे वाटते, संघभावना वाढीस लागते, नवनवीन कल्पना सुचतात. त्यामुळे एकत्र जेवण करणे नेहेमीच चांगले.
बस!! माझा कमी बोलणे आणि जास्त काम करणे यावर विश्वास आहे. मला जे बोलायचे होते ते झाले, आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा..

प्रश्न: या आधी आम्ही ‘स्वहिताची पुनव्याख्या’ या विषयावर चर्चा करत होतो. तुम्ही या बद्दल परत सांगाल का?
श्री श्री: होय, स्वहित खूप महत्वाचे आहे. दुरगामी विचार केल्यास तुम्हाला एक गोष्ट माहित असायला हवी की तुम्ही जर प्रत्येक गोष्ट अनैतिक मार्गाने करत गेलात तर त्याचे परिणाम वाईटच होतील. याचा अर्थ तुम्ही स्वहित जपत नाही, तर तो विनाश आहे. ते स्वहित आहे असा फक्त भास होतो पण तो विनाश असतो.
अजून एक दृष्टीकोन म्हणजे तुमच्यात अनेक लोकांना, समाजाला सामावून घ्या. जेंव्हा तुम्ही ‘मी’ असा विचार करता, तेंव्हा तुम्ही स्वतः, तुमचे कर्मचारी, तुमची कंपनी एवढाच विचार करता. समाजात जोपर्यंत एक पोषक वाढ नसेल तोपर्यंत तुमची कंपनी राहू शकणार नाही. जोपर्यंत खरेदीदार नसेल तोपर्यंत इतक्या गोष्टी बनवून काय उपयोग? अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्या “मी” मधे लोकांची खरेदी करायची ताकद सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या उत्पादन शक्ती बरोबरच लोकांची खरेदी करायची शक्ती वाढवणे हे तुमच्याच हिताचे आहे. आपले स्वहित समाजाच्या हितात बघण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

प्रश्न: मी सार्वजनिक नेतृत्वाचे प्रशिक्षण देतो. जे लोक फळवाद आणि भ्रष्ट्राचारामुळे पिडीत आहेत त्यांना निर्णय कसे घ्यावेत यासाठी मदत करायला मला आवडते. मोठ्या स्तरावर निर्णय कसे घ्यावेत, आणि स्वतः समाधानी कसे राहावे? लोकांना फळवाद असो किंवा आंतरिक समाधान असो, हे निर्णय घ्यायला कशी मदत करावी?

श्री श्री:तुम्हाला फक्त त्यांचा दृष्टीकोन विशाल करावा लागेल, त्यांना सांगा “तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही ठरवा. तुम्ही या वर्षी कर चुकवून पुढच्या वर्षी पकडले जाऊ शकता. त्यावेळी तुम्हाला दंड भरावाच लागेल. त्यापेक्षा आज कर भरा आणि पुढे चला” त्यांना हा दृष्टीकोन समजावला पाहिजे. जेंव्हा तुम्हाला आतून निर्मळ वाटते तेंव्हाच पोषक विकास आणि पोषक वाढ होऊ शकते.
दुसरे म्हणजे पैसे मिळवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, हा मुद्दा उद्योगपतीसमोर, विशेषतः तरुण उद्योगापतींसमोर सतत मांडावा लागेल. त्यांना झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग हवा असतो. त्यात रसातळाला जाण्याचा मोठा धोका आहे, याची जाणीव द्यायला हवी.
मला आज समाजात, लोकांच्या दृष्टीकोनात मागच्या ५ ते १० वर्षापूर्वीपेक्षा मोठा बदल झालेला दिसतो. आज बऱ्याच कंपन्यांमध्ये, बरेच उद्योजक जलद मोठे झालेत आणि कोसळलेत. आज कोणालाही त्या यादीत आले नाव नको आहे. ही उदाहरणे लोकांना या चुकीच्या मार्गाने न जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

प्रश्न: या तणाव, हिंसा आणि भ्रष्ट्राचार युक्त जगात, जे तरुण व्यवसाय सुरु करत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
श्री श्री:संपूर्ण जग भ्रष्टनाही हे लक्षात घ्या. काही थोडे लोक भ्रष्टाच्रारात बरबटलेले आहेत.
जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्ट्राचार सुरु होतो, हे लक्षात घ्या. ज्यांच्या बरोबर आपलेपणा वाटतो त्यांचाबरोबर आपण भ्रष्टाचार करत नाही. जिथे आपुलकी आहे तिथे भ्रष्टाचार अशक्य आहे. जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्ट्राचार सुरु होतो. आपल्याला लोकांना मूल्ये शिकवावी लागतील जेणेकरून ही आपुलकी वाढेल. यालाच मी अध्यात्म म्हणेन. अध्यात्म म्हणजे लोकांमध्ये आपुलकीची भावना वाढीस लागणे, जिथे प्रामाणीकपणा, एकमेकांची कदर करणे हे नैसर्गिकरित्या होईल. या परिस्थितीत भ्रष्टाचार अशक्य होईल.

प्रश्न: गुरुजी, आपण मूल्ये, नैतिकताआणि स्वहित याबद्दल चर्चा केली. माझ्या मते प्रत्येक मनुष्यात काही प्रमाणात अध्यात्मिकता असणे गरजेचे आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असलात तरी तुमच्या मनात काही मुद्दे हे धर्म किंवा अध्यात्मिकतेमुळे दृढ झालेले असतात. पण जेंव्हा तुम्ही नैतिकता किंवा मुल्यांचा विचार करतो तेंव्हा सगळे नीट आणि न्यायी वाटते. माझा दृष्टीकोन हा असा आहे, तुम्हाला काय वाटते?
श्री श्री:मला तुम्हाला एक उदाहरण देतो.ज्या ठिकाणी गर्दी असते तिथे चोऱ्या होत असतात, जसे भारतासारखे देश. जिथे मोठी गर्दी तिथे चोऱ्या होतात. पण जेंव्हा कुंभमेळा होतो, ३ कोटी लोक एकत्र जमतात पण एकही चोरीची तक्रार नसते. का? कारण तिथे एक पवित्रता, एक धार्मिकता, भाव असतो ‘मी इथे यात्रे साठी आलो आहे’ लोक त्यांच्या चीजवस्तू, लॅपटॉप ठेवून फिरत असतात, आणि कोणीही ते चोरत नाही, हे अविश्वसनीय आहे.
एरव्ही तुम्ही ठेवलेला जुना चष्मा सुद्धा चोरीला जातो, तुमच्या चपला चोरी होतात आणि कुंभमेळ्यात तुमचा , लॅपटॉप सुद्धा चोरला जात नाही. हे विस्मयकारक आहे.
इतरांना देण्यात, सहाय्य करण्याने तुमची वृध्दीच होते. मी तुम्हला एक गोष्ट सांगतो एकदा जानेवारी महिन्यात जवळपास ० डीग्री तापमान होते एका रात्री ५० स्वयंसेवकसह मी घोंगडी वाटायला गेलो. तेथे खूप गरीब लोक होते ते खूप लांबून यात्रेसाठी, गंगेतस्नान करायला आले होते त्यांच्याकडे फार काही नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांना घोंगडी देत होतो.
एक २०-२२ वर्षांचा मुलगा पुलाखाली कुडकुडत उभा होता. ज्यावेळी आम्ही त्यांना घोंगडी देऊ केली तेंव्हा तो म्हणाला ‘मला आज रात्री घोंगडी नको, मी आजची रात्र तशीच काढीन. तिथे पलीकडे काही वृद्ध स्त्रिया आहेत, त्यांना त्याचा जास्त फायदा होईल, कृपया तुम्ही त्यांना द्या.’ त्याने आम्हाला दाखवले आणि म्हणाला ‘तिथे ५०० मीटर वर काही वृद्ध लोक आहे, त्यांना या घोंगडीचा जास्त उपयोग होईल, मी तरुण आहे मी आजची वेळ निभावून नेईन’. त्या तरुणाची ती आपुलकी बघून मी भारावून गेलो. तो तरुण फक्त टी-शर्ट वर होता आणि तो ही कुडकुडत होता पण तो म्हणाला ‘नाही! पहिल्यांदा त्यांना द्या. जर काही उरले तर मी घेईन’. हा एकमेकांची कदर करण्याचा गुण खास आहे आणि विशेषतः गरीबांमध्ये तो दिसून येतो.
मूल्ये आणि अध्यात्म तुमच्यातील मानविय मूल्ये, हे चांगले गुण बाहेर आणतात. हे गुण आपल्यात असतातच फक्त ते बाहेर आणावे लागतात. मूल्ये आणि अध्यात्म हेच काम करतात.
३ महिन्यापूर्वी उत्तर-पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी आमच्या एका शिक्षकाला बोलावले. त्यांनी सांगितले तिथे जवळपास ३५० गुंड आहेत, जे चोऱ्यामाऱ्या, आणि इतर समाजविघातक कृत्ये करत आहेत, त्यांना तुम्ही लगेच जेल मधे टाकू शकत नाही पण त्यांच्या मुळे त्रास मात्र होतो आहे. आयुक्तांनी त्या ३५० जणांना बोलावले आणि आमच्या शिक्षकांना त्यांच्या साठी काहीतरी करायला सांगितले. त्यांना मूल्ये आणि आध्यात्मिकते बद्दल काही सांगता येईल का ते विचारले. त्या लोकांना सांभाळणे कठीण होते, पण ६ दिवसात त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला. आम्ही त्यांच्या बरोबर रोज २-३ तास घालवले, काही मिनिटांचे ध्यान, प्राणायाम, ज्ञान, आणि ६ दिवसानंतर त्यांचात पूर्ण बदल झाला होता. तेच समाजविघातक लोक स्वच्छता मोहीम, आरोग्याबद्दल जागरुकता अशी कामे करू लागली, उत्तर-पश्चिम दिल्लीतला गुन्हेगारीचा दर ९०% ने खाली आला. पोलीस आयुक्त स्वाभाविकच अचंबित होते, ते म्हणाले ‘आपण हे सगळीकडे का करत नाही’ आम्ही त्यांना सांगितले ‘आम्ही केंव्हाही तयार आहोत’ 
तणाव मुक्त कसे जगावे हे आपल्याला कोणीही शिकवत नाही. फक्त बोलण्याने किंवा सल्ले देण्याने तो जात नाही. त्यांना काही तंत्र, काही साधने काही कार्यतंत्र शिकवावे जेणेकरून त्यांना आपले मन शांत करता येईल. त्यांना शांत आणि संकलित मनाने विचार करता यायला हवा. आम्ही हीच गोष्ट पनामा मधे सुद्धा केली.
शिकागो मधे, जिथे शाळेत हिंसाचाराचे प्रमाण खूप जास्त होते तिथे आम्ही प्राणायाम, ध्यान शिकवले. आम्ही हे वर्ग घेतल्यानंतर तिथे हिंसाचाराच्या घटना २६८ वरून ६० वर आल्या.
शिक्षण खाते खूप अचंबित झाले. अखेर आम्ही हिंसा आणि तणावमुक्ती साठी काहीतरी करू शकलो.
मला वाटते आपल्या शैक्षणिक पद्धतीत तणावमुक्त राहण्याचे शिक्षण अंतर्भूत असायला हवे. तणाव हा आजकाल नेहेमीचा झाला आहे, त्यामुळे मानसिक शुद्धता असायला हवी. आपण दातांचे आरोग्य शिकवतो पण मनाचे आरोग्य राखायचे शिकवायला विसरतो. आपण मुलांना शाळेत, महाविद्यालयात असल्यापासून आपले मन स्वच्छ आणि शहाणे ठेवायला शिकवले पाहिजे, तणाव आणि काळजीने ते भ्रमिष्ट होता कामा नये.
युरोपातील ३०% लोक नैराश्याने ग्रासले आहेत, सिंगापूर मधे ते किती आहे मला माहित नाही, कदाचीत इतके जास्त नसेल, कदाचित २०% असेल. काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. आपण आर्थिकदृष्ट्या बलवान होत असताना असे व्हायला नको, पण वास्तविक तसे होते आहे, म्हणूनच आपल्याला लोकांना अध्यात्मीक मूल्ये शिकवली पाहिजेत, तुम्हाला काय वाटते?
अध्यात्म तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला मदत करते. अध्यात्म म्हणजे नुसते बसून धार्मिक कर्मकांड करणे नव्हे, तर आयुष्याकडे एका विशाल दृष्टीकोनातून बघणे होय. धर्म हा तुमच्या आयुष्याचा एक भाग निश्चित आहे, पण अध्यात्म थोडे वेगळे आहे. अध्यात्म म्हणजे मूल्ये आणि विशाल दृष्टीकोनातून बघणे

प्रश्न:जगातील बरेच देश लालच ही चांगली संस्कृती मानतात. सिंगापुरमध्ये आम्ही खूप नशीबवान आहोत कारण सरकार मध्यस्ती करून गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करत आहे, पण इतर देशात असे होताना दिसत नाही. गुरुजी, आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवक म्हणून आणि तुमच्या शिकवणुकीनुसार आम्ही यात भाग घेऊ शकतो.  समाजात, जिथे लालच, नफेखोरी, अब्जापती बनणे हीच मानवाच्या अस्तित्वाची मूल्ये बनली आहेत तिथे हे मोठे आव्हान आहे. कृपया आम्हाला तुमचे मौलिक मार्गदर्शन करावे.

श्री श्री:असे बघा, उद्योजगातिका आणि स्पर्धा चांगली आहे. समाजात ती असणे गरजेचे आहे. पण खेळाचे नियम डावलून, त्यांना धाब्यावर बसवून खेळ जिंकायचा प्रयत्न करणे धोकादायक आहे. एखादा माणूस इच्छित फळासाठी लालची असू शकतो पण ते कोणतीही किंमत देऊन नसावे. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतोय? तुम्हाला माहित असते की जितकी खूप असेल तितकेच खावे. तुम्हाला खावे वाटले तर खा, पण बुलीमियाला बळी पडू नका, जिथे तुम्ही उलटी करता आणि जाऊन परत खाता. बुलीमिया हा आजार याचे उत्तम उदाहरण आहे.  मी उद्योगांच्यात्यांनी खूप नफा कमावण्याच्या विरुद्ध नाही. तुम्ही जितका नफा कमवायचा तितका कमवा, पण नैतिकतेने. जितका जास्त नफा तुम्ही कमवाल तितके जास्त तुम्ही CSR (उद्योगांची सामाजिक जबाबदारी) मधे गुंतवा, सामाजिक कार्य करा. जर तुम्ही असे कराल जर तुम्ही सुरु केलेला उद्योग सुरु राहील आणि वाढेल, अन्यथा तो उद्योग जलद वाढेल आणि तिथ्याच लवकर खाली येईल. मागील काही वर्षात लोकांना हाच धडा मिळाला आहे. आज लोकांना त्याची जाण आहे.


The Art of living
© The Art of Living Foundation