दूरगामी विचार केल्यास चांगुलपणाचे बक्षिस मिळतेच

२७ मार्च २०१२

प्रश्न: तुम्ही एक आहात तरी प्रत्येकाला वाटते कि तुम्ही त्यांच्याशी बोलत आहात. तुम्ही यासाठी कोणती वाय-फाय यंत्रणा वापरता ?
श्री श्री: सूर्य एकच आहे पण तो सगळ्या खिडक्यातून पूर्णतः प्रकाशतो.

प्रश्न: जुगाराचे परिणाम काय आहेत आणि ते मनावर कसा प्रभाव टाकतात?
श्री श्री: महाभारतावरून आपण धडा घ्यावा.

प्रश्न: गुरुजी, प्रत्येक आकार (रूप) हे शक्ती आहे आणि निराकार शिव आहे, तर श्वास हा कशाचा प्रतिनिधी आहे?
श्री श्री: श्वास हा दोन्हीचे मिश्रण आहे, तो दोघांना जोडतो.

प्रश्न: गुरुजी, मी तुमच्या बरोबर आहे या बद्दल कृतज्ञ आहे. कृपया मला सांगा तुम्ही मला कसे निवडले?
श्री श्री: कारण तुम्ही त्या योग्य आहात!!

प्रश्न:गुरुजी, भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील संबंध मजबूत कसे करता येतील? एक तरुण म्हणून आम्ही काय करावे? मला वाटते ही दुश्मनी फक्त क्रिकेट पुरती मर्यादित असावी.
श्री श्री: भारत आणि पाकिस्तान यातील मैत्री वाढायला हवी. दोन्ही देशातील जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांना भेटले पाहिजे, आणि दोन्ही देशांनी सहनशक्ती वाढवायला हवी, तर संबंध सुधारतील.

प्रश्न: देवाचे नामस्मरण करून सुद्धा मन समाधानी आणि आनंदी नाही, काय करावे?
श्री श्री: म्हणूनच आपल्याकडे आर्ट ऑफ लिविंग चा कोर्स आहे. जेंव्हा तुम्ही सुदर्शन क्रिया कराल तेंव्हा पहिल्या क्रीयेतच तुम्हाला समाधानी असल्याचा आणि मन शांत झाल्याचा अनुभव येईल. पाकिस्तानात हजारो मुस्लिमांनी हा कोर्स केला आणि मग मला तिकडे बोलावले. कारण, त्यांनी सुदर्शन क्रिया केली आणि जोडले गेल्याची भावना निर्माण झाली. त्यांना खूप चांगले वाटले, आणि आयुष्यात एक परिपूर्णता जाणवून बदल घडला. त्यामुळे तुम्ही सुद्धा क्रिया करा.

प्रश्न: गुरुजी, जपमाळेचे काय महत्व आहे?
श्री श्री: जेंव्हा कोणी प्रेमात असते तेंव्हा ते त्यांचे नाव सतत घेत राहतात. त्यांचे नाव सगळीकडे लिहितात, दगडावर, भिंतीवर, तुम्ही बघितले आहे ना? माझ्या माहितीत एक मुलगा, एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याने सगळ्या खोलीत तिचे नाव भिंतींवर लिहिले. का? यालाच जप म्हणतात. जेंव्हा कोणी पत्र लिहिते तेंव्हा ते लिहितात ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे’ इतक्या वेळा, का? त्यांनी एकदा लिहिले तर चालेल, पण ते पुरेसे नसते. मनाला ते पुन:पुन्हा करावेसे वाटते. त्याच प्रमाणे जेंव्हा तुम्ही दैवत्वाच्या प्रेमात असता तेंव्हा तुम्ही म्हणता ‘ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय’ आणि असेच पुनपुन्हा म्हणत राहता.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही ७ चक्रांबद्दल आणि त्यांच्यावर पंचमहाभूतांचा परिणाम यावर सांगाल का?
श्री श्री: पंचमहाभूतांचा परिणाम सगळ्या चक्रांवर होतो. पोट अग्नीशी जोडले आहे. स्वाधीष्ठान चक्र पाण्याशी जोडले आहे. हृदय वायूशी जोडले आहे, घसा आकाशाशी जोडले आहे, आणि मूलाधार चक्र धरणीशी जोडले आहे.

प्रश्न: गुरुजी, आपण आपली मौलिकता जपली पाहिजे, असे म्हणताना मी नेहमी ऐकले आहे. मी काही गोष्टींची यादी केली आहे ज्यांची नक्कल केली जाते. आपण आपल्या कृतीत सहजता (नैसर्गिकता) कशी आणावी?
श्री श्री: विश्राम करा आणि तुम्ही जसे आहात तसे राहा. ध्यान करा. ध्यान हे निर्मिती क्षमतेचे उगम आहे.

प्रश्न: जे लोक धार्मिक आहेत आणि धर्माचे पालन करतात त्यांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात?
श्री श्री: कधी कधी हे घडते, पण काही काळ संयम ठेवा. सगळे ठीक होईल आणि तुम्ही पुढे वाटचाल करू लागाल.

प्रश्न: गुरुजी, बरेचदा दुष्टांना शासन होत नाही, आणि चांगल्याना त्यांचे फळ मिळत नाही, असे का?
श्री श्री: आपल्याला असे वाटते, कि दुष्टांना शासन होत नाही, आणि चांगल्याना त्यांचे फळ मिळत नाही. आपल्याला फक्त असे वाटते प्रत्यक्षात असे नसते. दुरगामी विचार केल्यास चांगल्याना त्यांचे फळ मिळतेच, आणि दुष्टांना शिक्षा होतेच.

प्रश्न: माझ्या परिवारातील कोणीतरी मृत्युशैय्येवर वर आहे. त्यांनी या वेळी काय केले पाहिजे?
श्री श्री: तुम्ही त्यांचासाठी नामस्मरण करा, आणि त्यांना आशीर्वाद द्या.

प्रश्न: गुरुजी, मला सतत ओळख, मान्यता हवी असते, मी हे कसे सोडून देऊ?
श्री श्री: पहिली गोष्ट तुम्हाला सतत ओळख, मान्यता हवी असते याची जाणीव झाली आहे. दुसरी गोष्ट तुम्ही हे आपोआप सोडून द्याल, हे होईल.

प्रश्न:गुरुजी, तुम्ही असतानाही काळ्या जादूचे अस्तित्व अजून कसे? कृपया याचे समूळ उच्चाटन करा.
श्री श्री: तुम्ही सगळे ओम नम: शिवाय चा जप करा, तुमच्यावर कुठल्याही काळ्या जादूचा परिणाम होणार नाही, सगळे नीट होईल.

प्रश्न: या मार्च पासून आनंदाचे वर्ष सुरु होत आहे, असे म्हंटले जाते, चांगल्या गोष्टी घडतील. कृपया या बद्दल सांगाल का?
श्री श्री:होय, प्रत्येक वेळी काही चांगल्या आणि काही फारश्या चांगल्या नसलेल्या गोष्टी घडत असतात. फक्त वाईटच काळ कधी नसतो. काळाचा आपल्यावर प्रभाव नसतो. हे चांगले वर्ष आहे. त्यामुळे आनंदाने आणि उत्साहात सेवा करा, साधना आणि सत्संग करा आणि आयुष्यात पुढे चला. जेंव्हा तुम्ही आनंदी असाल तेंव्हा सेवा करा आणि कष्टी असाल तेंव्हा समर्पण करा.

प्रश्न: गुरुजी, महमूद गझनी ने गुजरात मधे सोमनाथ मंदिरावर जेंव्हा हल्ला केला तेंव्हा मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की भगवान शिव आपले रक्षण करेल, लढायची गरज नाही. सगळ्या सैनिकांनी शस्त्रे टाकली, पण त्यांचा पराभव झाला. मग परम देव कोण?
श्री श्री: असे बघा त्यांनी जे केले ते चूक होते. शिव तर आहेच, पण अन्यायविरुद्ध लढण्याचे तुमचे कर्तव्य (धर्म) तो करायला सांगतो. नाहीतर मग शिवाच्या हातात त्रिशूल का असेल? तुम्ही बघितले असेल सर्व देव-देवतांच्या हातात शस्त्र असतात. त्यांच्याकडे शस्त्रे का असतील? कारण हेतू आणि कृती बरोबरीने असल्या पाहिजेत. भगवान कृष्ण ज्ञान देत होते आणि त्यांच्याकडे  सुदर्शन चक्र सुद्धा होते. त्यामुळे देव हाच अंतिम आहे, कारण त्याच्या शिवाय काहीही नाही.
मला पाकिस्तानात हेच विचारले ‘इतक्या मूर्तीची पूजा का केली जाते?’ मी सांगितले ‘भारतात सुद्धा आम्ही एकाच देवाला मानतो, पण त्याच देवाच्या विविध रूपांना, विविध प्रकारे पुजले जाते’. एकच देव वेगवेगळया पोशाखात येतो. देव सैन्यात नाही; सैन्यात सदैव एकाच पोशाख परिधान करतात. देव वेगवेगळ्या नावात आणि रुपात येतो, पण दैवत्व एकच आहे. एक मूर्ती, एक शिवलिंग किंवा एक शालीग्राम पुरेसा आहे. तुम्ही देवघरात सुद्धा खूप मूर्ती ठेवत नाही, त्या सगळ्या एकाच दैवत्वाचे रूप आहेत. मुळात हिंदू संस्कृतीमध्ये पूजा फक्त अग्नी आणि कलशाची करत असत. पण जेंव्हा जैन धर्म आला आणि त्यांनी सुंदर मुर्त्यांची पूजा सुरु केली तेंव्हा हिंदुना वाटले कि आपणही असेच करावे. त्यानंतर हिंदुनी वेगवेगळ्या मूर्ती बनवायला सुरुवात केली, त्या आधी फक्त शिवलिंग होते. 

प्रश्न: मी देव आणि संसारात अडकलो आहे. संसारातून बाहेर पडून देव कसा प्राप्त करावा?
श्री श्री: देव तुमच्या पासून दूर नाही. तुम्ही विश्राम करा. विश्रामातच देव आहे. समर्पण करा आणि शांत राहा. जेंव्हा तुम्हाला काम करण्या पूर्वी आणि नंतर विश्राम कसा करावा हे कळले की तुमचे ध्यान चांगले लागेल, आणि दैवात्वाशी तुम्ही जोडले जाल.



The Art of living
© The Art of Living Foundation