श्री श्री यांची ज्ञान विहार विश्वविद्यालयाला भेट

२१ फेब्रुवारी,२०१२

माननीय मुख्य मार्गदर्शक, विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि विभागांचे सदस्य, तुम्ही मला प्रदान केलेली पदवी मी नम्रपणे स्वीकार करतो.
बघा ना मी आज एक स्वीकार केली परंतु मी कित्येक देऊ केल्या आहेत. हेच तर शिक्षणाने केले पाहिजे. जे आपल्याला मिळाले ते परत समाजाला देऊ केले पाहिजे, आणि एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला केवढे ज्ञान मिळत आहे,ते तुम्ही आयुष्यात कसे वापरू शकता ते पाहूया. शिक्षणाचा अभाव ही आजच्या जगातील समस्या नाही आहे तर शिक्षणाचा विपर्यास, अयोग्य वापर आणि शिक्षणाबद्दल गैरसमज या कारणाने समस्या आहेत. आपल्याला या तीन गोष्टी साफ करणे गरजेचे आहे. आपल्याला "माहितीची गोळी" बनवणे हे शिक्षणाचे उद्देश्य नसून उच्च नैतिकमूल्ये असलेले ज्वलंत उदाहरण बनवणे हे आहे. शांतता पसरवणारे ,समाजात उन्नती आणणारे आणि प्रेम आणि करुणेचा फैलाव करणारे सशक्त व्यक्तिमत्व तयार करणे हेच शिक्षण आहे. माझ्या यावर गाढ विश्वास आहे. तर मग आपल्याला स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना शिक्षण देणे याची फार गरज आहे.
असे व्यक्तिमत्व जे टीकेला तोंड देऊ शकेल आणि प्रसंगी रचनात्मक समीक्षण देऊ शकेल असे प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजेच शिक्षण होय. सगळीकडे मित्रता निर्माण करणारे, ज्याच्याकडे विनोदबुद्धी आहे आणि याचबरोबर तद्भाविता असणारे व्यक्तिमत्व याच्याच तर शोधात आज जग आहे.
जेव्हा माणसाला वैचारिक स्वातंत्र्य मिळते तेव्हा त्याच्यात सृजनता येते. आणि या ग्रहावर प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे. दुर्दैवाने तसे नाहीये. आपण ठराविक चाकोरीतच विचार करतो...एक ठराविक चाकोरी; आपल्याला यातून बाहेर पडायला पाहिजे. आपण स्वतंत्रपणे विचार केला पहिजे आणि संकुचित कल्पनांपासून आपले मन मुक्त ठेवले पाहिजे.
तुमच्यातील चमक दाखवून देण्याची  ज्ञान विहार विश्वविद्यालयाने तुम्हाला जयपूरमध्ये अशी संधी उपलब्ध करून दिली याचा मला फार आनंद होतो आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमचा देश आणि तुमचे विश्वविद्यालय यांना तुमचा गर्व वाटेल असे काही कराल.
व्यवस्थापन, कुलगुरू, सभाध्यक्ष आणि विभागांचे प्रमुख आणि तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आता मी तुमचाच एक भाग झालो आहे आणि आता तर मी विश्वविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी बनलो आहे.
मानवतावाद आणि विज्ञान या दोन्हीमध्ये तुम्ही चांगले शिक्षित व्हावे अशी माझी इच्छा आहे. कला हृदयाचा विषय आहे आणि विज्ञान हा डोक्याचा विषय आहे,आणि आपल्याला दोन्हीची गरज आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की बुद्धी आणि भाव (भावना) हे दोन्ही महत्वाचे आहे...हेच भगवद गीतेचे सार आहे.
हृदय आणि मन दोन्हीची प्रगती होणे जरुरी आहे. तसे झाले तरच तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती होऊ शकता.
तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळो ही माझी शुभेच्छा आणि समाजाच्या प्रति सेवा भाव ठेवा आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि मौजमजा असू दे.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही म्हणालात की "स्व"बद्दलचे ज्ञान हे सर्वात महत्वाचे आहे तर मग ते असे गुपित आणि मिळायला अवघड असे का आहे?
श्री श्री रवीशंकर: खर तर आता ते एवढे गुपित राहिलेले नाही. दुर्दैवाने भूतकाळात लोकांनी जे काही मौल्यवान,खूप चांगले आणि सर्वांकरिता उपयोगी होते ते स्वतःच्या स्वार्थापोटी लपवून ठेवले. पण आता ते सगळ्यांसाठी उघड झाले आहे. पूर्वी सगळ्यांना प्राणायाम शिकवले जात नसे, फार थोड्यांना शिकवल्या जायचा.ही आपल्या देशाची दुर्दैवी कथा आहे. परंतु आता तर तुम्हाला सगळे उपलब्ध केलेले आहे.

प्रश्न : गुरुजी, अनुभवातून खरे शिक्षण मिळते तर मग कॉलेजात जाण्याची काय गरज?
श्री श्री रवीशंकर: कॉलेज खुपच छान असते, मस्त असते! तुम्ही बराच शिकता. कॉलेजात काही अर्थ नाही असे समजू नका, कॉलेज जीवन हे जीवन आहे कारण तुम्ही खूप काही शिकता. बरयाचदा तुम्ही प्रेमात पडता, तुमचा हृदय तुटत आणि जोडल्यादेखील जात. कितीतरी गोष्टी तिथे घडतात.

प्रश्न : तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?
श्री श्री रवीशंकर: जे बोलतो तसे वागतो आणि जे वागतो तेच बोलतो!

प्रश्न : जर सगळ काही प्रारब्धानुसार घडत असत तर मग प्रार्थनेची शक्ती काय आहे?
श्री श्री रवीशंकर: सगळ काही पक्क ठरवलेले नाही. काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि काही नाही आणि प्रार्थना या दोन्हीमधील दुआ आहे.

प्रश्न : जर पैसा सगळा काही नाही आहे तर मग सगळे यशस्वी लोक श्रीमंत का आहेत?
श्री श्री रवीशंकर: श्रीमंत लोक कायम सुखी नसतात. माझ्यामते बँकेत पैसा असणे म्हणजे यश नव्हे. माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास म्हणजे यश.


The Art of living
© The Art of Living Foundation