आशीर्वाद त्यांनाच मिळतात जे काही प्रयत्न करतात !!

१ एप्रिल २०१२
जेव्हा तुम्ही मेणबत्ती उलटी करता, तरी ज्योत वरतीच जाते. तसेच आयुष्यात असे किती तरी प्रसंग येतात जेव्हा तुमचा उत्साह कमी होतो, चैतन्य कमी होतं. तेव्हा विचार करा की ‘तुम्ही मेणबत्ती सारखे आहात, आणि तुम्ही त्यातून बाहेर याल. काही झालं तरी माझं चैतन्य आणि उत्साह मी कमी होऊ देणार नाही’. तशी तुम्ही पुढे वाटचाल करा. जीवन शक्ती तशीच पुढे जात राहिल. म्हणूनच हिंदू आणि बुद्ध परंपरांमध्ये आरती केली जाते. एक दिवा पेटवून अवती भवती नेला जातो, ‘एका वाती सारखे राहा आणि पुढे वाढत राहा, दैवत्वाकडे ज्ञाना कडे’. मग थोड कुंकूम कपाळावर लावून म्हणतात, ‘ज्ञान नेमही तुमच्या बरोबर राहो’.
सगळ्यात उत्तम भेट म्हणजे ज्ञान आहे.
प्रश्न: गुरुजी, आमच्या कडे ३० वर्षे अजून आहेत आणि ती संपून जातील, एका झटक्यात. आम्ही जोवर  इथे आहोत तोवर त्याला एक दिशा असली पाहिजे. असं काही केलं पाहिजे ज्या मुळे समाधान मिळेल. मला ते अजून मिळालं नाहीये आणि मी ते अजून शोधतोय.
श्री श्री: नक्कीच! ते तुम्हाला मिळेल. आता तुम्ही ध्यान केलत तेव्हा तुम्हाला शांती मिळाली? ते महत्तवाच आहे. आपल्यला त्या आतल्या शांततेला आणि जवळच्या लोकांना आनंदात ठेवायचं आहे. काही तरी सेवा कार्य हाती घेतलं पाहिजे.
प्रश्न: प्रिय गुरुजी, आम्हाला २०१२ बद्दल काही तरी सांगा, कोणते नवीन गुण घेवून ह्या नव्या पृथ्वीकडे यावं?
श्री श्री: पृथ्वी हि केवळ अमेरिकन चित्रपटांमध्ये गायब होईल, वास्तवात नव्हे. तुम्हाला फक्त हेच माहित करून घ्याचे आहे कि ह्या नव्या युगात, लोकं जास्ती अध्यात्मिक आणि दयाळू होतील. लोभ, द्वेष, गुन्हेगारी सगळं कमी होईल. लोकं जास्त मायाळू आणि अध्यात्मिक होतील, हेच पुढे होणार आहे. चिनी कॅलेंडर च्या मते हे वर्षे ‘ड्रगन’ चं आहे म्हणजे अतिशय शुभ मानलं गेलं आहे. हिंदू कॅलेंडर च्या मते हे वर्ष नंद आहे म्हणजे परमानंद. आणि तुम्हाला त्याची सुरुवात करण्याची गरज नाही, ते आधीच सुरु झालं आहे.
प्रश्न: कर्तव्य आणि अपेक्षा मध्ये फरक कसा करावा?
श्री श्री: कर्तव्य म्हणजे ते जे तुमचं मन तुम्हाला सांगतय, ‘हे मला करायचं आहे’. अपेक्षा म्हणजे जे दुसऱ्यांची अपेक्षा आहे तुम्ही करावं. दोघांन मध्ये एक समतोल असणं गरजेचं आहे. कधी कधी तुम्ही दुसऱ्यांची अपेक्षा पूर्ण करता, पण तुमच्या कर्तव्याप्रती तुम्ही जास्त सजग राहिलं पाहिजे.
प्रश्न: मी प्राणायाम आणि क्रिया दररोज ४० मिनिटे नियमाने करतो, आणि त्यामुळे मन शांत होऊन तुमच्या कडे वळत. अजून पुढे वाढण्यासाठी पुढे काय केलं पाहिजे हे सांगाल काय?
श्री श्री: ४-६ महिन्यातून एकदा एक अॅड़व्हांस कोर्स केला पाहिजे. ते तुमचं ध्यान अजून खोल करेल. वर्षातून दोन वेळा तरी हा अॅड़व्हांस कोर्स करावा. जसे तुम्ही कार सर्विस करता तसेच शरीर, मन आणि आत्मा तीन दिवसांच्या मौना मध्ये, ध्याना मध्ये आणि योगासनांमुळे उत्साही आणि आनंदित होऊन जातं.
प्रश्न: द्विधृवी रोग असणाऱ्या लोकांनी सुदर्शन क्रिया किंवा मौन कोर्स केला पाहिजे?
श्री श्री: मौन कोर्स नाही पण बेसिक कोर्स करू शकतात आणि सुदर्शन क्रिया सोडून बाकी सगळं काही करू शकतात. ध्यान, प्राणायाम आणि योग त्यांच्या साठी उत्तम आहे आणि त्यांनी श्री श्री योग केलं पाहिजे.
प्रश्न: जर आम्हाला करिअर किंवा जीवनात काही हवं असेल तर काय करायला हवं?
श्री श्री: तुम्ही तुमची शक्ती लावा आणि आशीर्वाद मागा. आशीर्वादांमुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी मागू शकता. दोन्ही महत्वाचे आहेत आशीर्वाद आणि तुमचा प्रयत्न. जसा सूर्यही आहे आणि खिडकी उघडी आहे. जर तुमची इच्छा आहे कि सूर्य तुमच्या घरात येवो तर तुम्हाला खिडकी उघडून पडदे पण उघडावे लागतील. पण जर भरल्या रात्री तुम्ही पडदे उघडलेत तर मग सूर्य कसा येईल, त्यासाठी तुम्हाला थांबाव लागेल.
प्रश्न: जर तुम्हाला काही गोष्टींमध्ये अपयश मिळाले आणि तरी जगात राहून आनंदी राहून खोटे हसू कसे आणावं?
श्री श्री: कधीच असं विचार नका करू की तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये मध्ये अपयशी ठराल. अपयश आलं कारण विचार अपयशी ठरले. विचार अपयशी ठरले कारण अति महत्वाकांक्षा. जेव्हा तुम्ही अती उत्कंठित किंवा खूप महत्वाकांक्षी असाल तेव्हा तुमच्या मनातले विचार बरोबर होत नाहीत. नकारात्मक शक्तीमुळे अंत: प्रेरणेचा सुद्धा असर कमी होतो. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा सुद्धा तुमचे विचार सकारात्मक होतात. संस्कृत मध्ये एक म्हण आहे, ‘यश हे जास्त सत्त्व मुळे येतं आणि आंत मधल्या शांती मुळे येतं’. तुमच्या शस्त्रांमुळे नव्हे. तुमची स्मितहास्य बिलकुल सोडू नका. तुमचं स्मितहास्य गेलं तर दुप्पट अपयश येईल, एक अपयश मिळालं आहे काही हरकत नाही दुसर तरी नको.
प्रश्न: माझ्या सारख्या युवकांमध्ये २० ते ३० वर्षांच्या आयुष्यात, जेव्हा आम्ही काम करतो आणि स्वत:च्या संसारिक ध्येयाकडे बघतोय तेंव्हा अध्यात्मिकता कशी आणली पाहिजे?
श्री श्री: ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत असं नका समजू. व्यापार नीतीने केलं जाऊ शकतो. स्वत:च्या कामात सचोटीने काम करून तुम्ही प्रगती शकता. युक्तीने आणि कसबीने तुम्ही पुढे वाढू शकता. जेव्हा आशिया खंड आध्यात्मिकतेच्या उंचीवर होतं तेव्हा खूप भरभराट होती. भारत, श्रीलंका आणि सिंगापूर हे जगातल्या १२ व्या शतकात, १/३ उत्पादनांचे घटक होते. भारतात आलेल्या अनेक लोकांपैकी मेकोले ह्यांनी २०० वर्षपूर्वी असं लिहिले आहे कि, ‘मी भारताच्या आणि आशिया खंडाच्या सर्व दिशेने फिरलोय आणि मी एक भिकारी, एक गरीब माणूस आणि एक अस्वस्थ व्यक्ती बघितली नाही’. म्हणून जेव्हा अध्यात्म उंचीवर होतं तेव्हा भरभराटी होती.     
प्रश्न: चेतना आणि प्राण ह्यांना काय जोडतं?
श्री श्री: शरीर आणि मन ज्या प्रकारे जोडले आहेत तसेच ते सुद्धा जोडले आहेत. वेगळे आहेत तरी जोडलेले आहेत. शरीर, मन, प्राण, श्वास आणि चेतना ह्या सगळ्या वेगळ्या स्तरांमध्ये विभागल्या जाऊ शकतात.
प्रश्न: आपल्या शरीरामध्ये ‘आत्मा राम’ जे आपल्या चेतनेचे सुद्धा घर आणि आपले लहान स्वरूप आहे त्याची काय विशेषता आहे?
श्री श्री: तुमच्या पैकी किती लोकांना ‘राम’ ह्या शब्दाचा अर्थ माहित आहे? इंग्रजी शब्द Rays हा संस्कृत शब्द ‘रश्मी’ मधून घेतला आहे. ‘रा’ म्हणजे प्रकाश, ‘’म’ म्हणजे मी. राम म्हणजे आपल्या हृदयातला प्रकाश.
दशरथ म्हणजे दहा रथ असणारा किंवा दहा इंद्रिय असणार. ५ इंद्रिय अनुभव करण्यासाठी आणि इतर ५ कृती करण्यासाठी. म्हणून आपलं शरीर हा एक रथ आहे ५ इंद्रिय अनुभव करण्यासाठी आणि बघण्यासाठी. कौशल्य म्हणजे कुशलतापुर्वक काम करणारा. दहा इंद्रीयाचा शरीर रथ (नाक, कान, डोळे..) कुशलपूर्वक जो आत्म्याजवळ आणतो, ती शांत चेतना म्हणजे राम. म्हणून रामायण हे दररोज आपल्या शरीर मध्ये घडतं, आणि आज राम नवमी आहे (रामाचा जन्म).
प्रश्न: एक मुल आपल्या आई वडिलांना कसा माफ करू शकतो त्याच्या विरुद्ध केलेल्या वर्तणुकी बद्दल? आई वडिलांची कोणती मौलिक जबादारी आहे?
श्री श्री: ऐका, त्यांनी जर काही चूक केली असेल तर जास्ती न शिकल्यामुळे किंवा चांगली संधी न मिळाल्यामुळे. त्यांना त्यांच्या भावना, त्याचं मन कसं आवरावं हे माहित नव्हतं. दुर्दैव असल्यामुळे असं झालं. म्हणून त्यांना माफ करण्यामुळे तुम्हाला शांती मिळेल. जर ते अध्यात्मिक आणि ज्ञानाच्या मार्गावर असते तर त्यांनी असं केलं नसतं. ते त्यांनी अज्ञानात केलं. जर तुम्ही त्यांना माफ केल नाहीत तर तुमचं मन दुखी: राहिल आणि मनात विष निर्माण होईल. मन नकारात्मक असेल तर हे वाढत जाईल. ह्याच्या मुळे किती कर्करोगासारखे किती तरी भयानक रोग होतात. म्हणून सगळ्यांना माफ करा ज्याने तुम्ही स्वत: आनंदात असाल.
प्रश्न: जेव्हा आयुष्यात खूप आव्हानं असतील तेंव्हा नेहमी चेहऱ्यावर हास्य कसं ठेवावं.
श्री श्री: असं जेव्हा वाटेल तेव्हा ते मला देऊन टाका, मी तुमच्या बरोबर आहे. कोणतेही आव्हान असले तर माझी आठवण करा. मला ते देऊन टाका आणि इतका विचार करा की तुम्ही एकटे नाही. कठीण काळात सुद्धा तुम्ही तरुन जाल हे मी तुम्हाला नक्की आश्वासन देतो. एकटे जरा कठीण होईल. सगळ बरोबर असेल तेव्हा सगळेच हसतात. खरी ताकद तेव्हा आहे जेव्हा गोष्टी सुरळीत नसतील तरी सुद्धा तुम्ही पुढे जाताय. सगळं बरोबर नसताना सुद्धा तुम्ही हसताय तर मग तुम्ही खरे आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते आहात. मग तुम्ही ज्ञानात आहात.
प्रश्न: तुम्हाला तत्त्व म्हणून कसं अनुभवू? २४/७ वेळा मी तुमच्या बरोबर कसा राहू आणि प्रेम करू? मला ह्या जन्माची संधी सोडायची नाहीये?
श्री श्री: फक्त विश्राम करा! प्रेम ही कृती नाहीये. कोणावर प्रेम करण्याचा प्रयत्न करू नका. प्रेम आहे हे समजून फक्त विश्राम करा.
प्रश्न: काही लोकं धुम्रपान आणि नशा सारख्या वाईट सवयीतून कसे काय गुरफटत जातात?
श्री श्री: तुम्हाला जेव्हा असं वाटतं कि तुम्हाला त्यातून काही आनंद मिळणार आहे तेव्हा तुम्ही त्यात गुरफटून जाता. ध्यान केल्याने ह्या सवयींपासून तुम्ही बाहेर येता.
प्रश्न: आपण मनुष्य काळातल्या शेवटच्या वसाहती मध्ये आहोत काय?
श्री श्री: अजिबात नाही! जसं मी आधी म्हटलं आहे हे फक्त चित्रपटांमध्ये होतं.
प्रश्न: विसरून आणि क्षमा करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग काय आहे?
श्री श्री: मला द्या आणि सोडून द्या! कोणालाही ज्यांना तुम्ही क्षमा करू शकत नाही जे तुम्हाला त्रास देतय ते सगळं मी घ्यायला तयार आहे. गुरु तुमचे त्रास घेण्यासाठीच आहे. ते सगळं इथे सरकवून द्या.  
प्रश्न: जीवनाच्या सुरुवाती वर काही तरी बोला.
श्री श्री: जेव्हा आपण एक रेषेत विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं कि एके ठिकाणी सुरुवात होते आणि एके ठिकाणी अंत होतो. आपण चहुबाजूने विचार केलं पाहिजे.
तुम्ही मला एका टेनिस चेंडूची सुरुवात दाखवू शकाल काय? नाही! मग जेव्हा तुम्ही एका टेनिस चेंडूची सुरुवात नाही शोधू शकत तेव्हा ह्या विश्वाची सुरुवात कशाला शोधायला बघता? हे गणित चुकीच आहे. दोन प्रकारची विचार सरणी आहे सरळ आणि चोहोकडची. विशवाची सुरुवात आणि अंत दोन्ही नाहीयेत ह्याला चोहोकडची विचार सरणी म्हणतात आणि ह्यालाच वैदिक पद्धती म्हणतात. वैदिक पद्धतीमध्ये ३ गोष्टी अनंत आहेत विश्व, दैव, आणि जीवन.
प्रश्न: मला अध्यात्मिक मार्गावर चालायला आशीर्वादाची गरज आहे.
श्री श्री: मी आशीर्वाद देण्यात कंजूष नाहीये, मी भरपूर देतो. सगळ्यांना खूप आशीर्वाद आहेत. वर्षातून ४-५ दिवस काढा आणि ध्यानात बसा आणि अॅड़व्हांस कोर्स करा, तुम्हाला खूप मजा येईल. दिनदर्शिकेवर काही दिवस अधात्मिकते साठी काढा मग इथे जे काही शिकला आहे ते सगळं अजून मजबूत होईल.
प्रश्न: मध्य-आयु मधले त्रास, ५० च्या पुढे जीवन जगण्यात कसा रस वाटून घेऊ?
श्री श्री: फक्त माझ्या कडे बघा. मला तुमची गरज आहे, या आणि माझ्या बरोबर राहा. आपण सगळं जग फिरू आणि खूप काम करू शकतो. मला अजून लोकांची गरज आहे. जर तुम्ही ५० च्या पुढचे असाल तर मग तुम्ही जीवनात सगळं काही केलं आहे, मुलांची जबादारी असेल तर मग ती झाल्यावर या. जरी तुम्ही स्थिर नसाल तर मग १-२ महिने सुट्टी काढून फिरा. आम्हाला जास्त शिक्षकांची गरज आहे. तुम्ही जाऊन इतरांना सांगू शकता कि कसं शांत आणि एकाग्र व्हावं. जे काही तुमच्या कडे ज्ञान आहे ते तुम्ही दुसर्याना देऊ शकता. शिकण्यासाठी किती तरी आहे आणि तुम्ही अजून ध्यानात खोल जाऊ शकता. मी म्हणतो चमत्कारांचा पाऊस पडेल, ह्या गोष्टींची कमतरता आर्ट ऑफ लिविंग मध्ये अजिबात नाहीये.
प्रश्न: जेव्हा आयुष्य खूप कंटाळवाणं होतं तेव्हा काय करावं?
श्री श्री: व्यस्त व्हा! आपल्या कडे एक आर्ट ऑफ लिविंग सेंटर आहे तिथे जा आणि काही काळ बसा. त्या ठिकाणी ध्यानात बसा, तिथे सगळ्यांनी जाऊन बसल्याने शक्ती वाढेल.
प्रश्न: गुरुजी, क्षमा कशी करावी हे सांगा?
श्री श्री: जेव्हा तुम्हाला कोणी गुन्हेगार दिसेल तर मग त्यांना एका मोठ्या दृष्टीकोनातून बघा. ते स्वत:च बळी बनलेले आहेत. ते अज्ञानी आहेत, ज्ञानात नाहीयेत आणि त्यांच्या हृदयात जखमा आहेत. त्यांच्या कडे ज्ञानाचा अभाव होता. त्यांच्या वर दया दाखवा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गुन्हेगारांमध्ये एक बळी दिसेल तेव्हा तुम्ही त्याला क्षमा करू शकाल. ह्या कारणासाठी तुम्ही कारागृहांमध्ये भेट द्यायला हवी. तिथे जाऊन त्या लोकांशी बोला तेव्हा त्यांच्या बद्दल दया दाखवू शकाल. त्यांनी केलेल्या सगळ्या चुका तुम्ही माफ कराल. त्यांना कोणीही रस्ता दाखवण्यसाठी नव्हतं. काही मदत नाही आणि कोणी बरोबर नसल्याने आयुष्यात प्रेम नसल्याने असं झालं.
प्रश्न: काय चूक काय बरोबर हे आपल्यला माहित असतं. पण नेहमीच बरोबर करणे फार कठीण आहे.
श्री श्री: नेहमी नाही जमलं तरी काही वेळा तरी करा.
प्रश्न: श्रोत्यामधून प्रश्न ऐकू आला नाही.
श्री श्री: आपण वेगळे नाही. मी तुमचा एक भाग आहे आणि तुम्ही माझे एक अंग आहात. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल की सगळे एक आहेत आणि जोडलेले आहेत, मग कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. मी असं म्हणू शकत नाही माझ्या उजव्या हाताची मदत करायला माझ्या डाव्या हातावर अवलंबून आहे.  
प्रश्न: श्रोत्यामधून प्रश्न ऐकू आला नाही.
श्री श्री: तर्कशुन्य ते आहे जे तुम्ही समजू शकत नाही. तर्क ही एक सीमा आहे. असीमित तर्क असं काही नसतं. तर्क म्हणजे तुम्हाला काही माहित आहे आणि काही समजा मधून तुम्ही दुसरं काही समजण्याचा प्रयत्न करता. त्याची पण एक जागा आहे. तुमचे कान टी.व्ही. बघताना महत्त्वाचे आहेत, पण त्या बरोबर तुमचे डोळे पण महत्त्वाचे आहेत, ते एका वेगळ्या मिती मध्ये आहेत.
तर्कसुसंगत असणे हे तुमच्या मेंदूचा एक भाग आहे आणि तो महत्त्वाचा आहे. पूर्वेकडे आपण असे कधीच म्हटले नाही की तर्क वाईट आहे, पण असं म्हटलं आहे की तर्क संपूर्ण नसून संपूर्णतेचा एक भाग आहे. भावना, इच्छा, संवेदना, दोघांची गरज आहे आणि दोन्ही घेऊन पुढे चला. जेव्हा तुम्ही संगीत ऐकता तेव्हा तुम्ही तर्क लावून ऐकू शकत नाही. ही ओळ १० वेळा कशाला परत परत म्हटली गेली आहे असे नाही विचारू शकत. त्या वेळेस त्या धुंदी मध्ये मग्न व्हा. फक्त जेव्हा तुम्ही काही हिशोब करत असाल आणि कोणी ५ वेळा एक बिल वाचून दाखवले तेव्हा तुम्ही त्याला विचाराल कि हे ५ वेळा का वाचलसं. पण संगीत ऐकताना असं होत नाही. म्हणून जीवन हे एक कठीण गणित आहे आणि ते सरळ गणित नाहीये. तर्काच्या पुढे सुद्धा काही तरी जीवनात लागतं आणि वेगळ्या ठिकाणी ह्या वेगळ्या आवाहने येतात आणि अशा वस्तू आयुष्यात येत राहतात आणि त्यांना उत्स्पुतपणे दाद देणे हेच बरोबर आहे.
प्रश्न: एकदा तुम्ही म्हटलं होतं की आपण धुळीच्या कणासारखे आहोत आणि मग तुम्ही म्हणालात की आपण किती तरी वेळा आव्हाने पार केली आहेत, सामोरे गेलो आहोत. तुमच्यासाठी नेहमी एक मदतीचा हात पुढे होता. प्रश्न हा आहे जर आपण महत्त्वाचे नाही आहोत तर मग आपल्या मदतीचा हात येतो कुठून आणि मग जर दैवी शक्तीची मदत होत असेल तर मग आपण मूल्य निम्न आहोत.
श्री श्री: जोवर तुम्हाला माहित नाही की एक मदतीचा हात पुढे येतोय तोवर तुम्ही खरच मूल्य निम्न आहात. पण जेव्हा तुम्हाला कळत की मदतीचा एक हात आहे तेव्हा तुम्ही महत्त्वाचे बनता. कोळसा आणि हिरा हे एकाच वस्तूने बनले असतात. कोळशाची काही किंमत नाही पण हिरा बनल्यावर त्याची किमत वाढते. सत्य हे नेहमी विसंगत असतं.


The Art of living

© The Art of Living Foundation