जर तुम्ही स्वत:बरोबर सहज असाल तर सगळेच तुमच्याबरोबर सहज असतील


एप्रिल२०१२-इंडोनेशिया बाली दिन

समाधान आणि आनंद हे फार महत्वाचे आहेत. बाकीच्या गोष्टी येतात आणि जातात.
आपण या ग्रहावर किती वेळा आलेलो आहे, आपण पुन्हा येणार आहोत. जीवन हे चालूच राहते; येणे आणि जाणे,येणे आणि जाणे चालूच राहते.

प्रश्न: मी माझी हिम्मत बांधलेली कशी ठेऊ?
श्री श्री रविशंकर: जेव्हा कधी तुम्ही काळजीत असता तेव्हा लक्षात ठेवा कि हे छोट्या छोट्या कारणांमुळे आहे आणि सगळ काही ठीक होणार आहे याची मनात घट्ट गाठ बांधून ठेवा.
या अडचणी येताना आणि जाताना तुम्ही बघता आणि मग तुम्ही म्हणता,"मी याने विचलित होणार नाही. मी याच्यापेक्षा मोठा आहे." वा!
केवळ एवढाच विचार -मी याच्यापेक्षा मोठा आहे.यामुळे हिम्मतीला बळ मिळते. मी देह नाही; देहामध्ये सतत बदल होत असतात. मला कधी थकवा येतो,कधी बलवान वाटते. मी देहापेक्षा मोठा आहे.
लोकांना वाटते की मन देहाच्या आत आहे, हे चुकीचे आहे, देह मनाच्या आत आहे. मन हे मेणबत्तीप्रमाणे आहे,त्यात वात आहे आणि वातीच्या वर ज्योत आहे. जर तुम्ही मेणबत्तीला झाकून बंदिस्त करून ठेवले तर ऑक्सिजन असेपर्यंतच ती जळेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्याला खोलीत डांबून ठेवले तर तो ऑक्सिजन असेपर्यंतच जिवंत राहील. तर मग मन हे ऑक्सिजनवर जगणाऱ्या ज्योतीच्या प्रभेसारखे मन हे चेतानेवर जगणारे आहे. तर सर्वप्रथम देह आणि नंतर मन असते,हे मन बरेच मोठे आहे. जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता की मन ज्योतीप्रमाणे आहे आणि ते बरेच मोठे आहे तेव्हा शांततेचा लाभ होतो. तरीदेखील काही चिंता सतावत असेल तर श्वसन (सुदर्शन क्रिया) करा. जलद श्वसन आणि भस्त्रिका याने खूप चांगला फरक येईल.

प्रश्न: गुरुजी,नात्यांमुळे स्वातंत्र्य का संपुष्टात येते?
श्री श्री रविशंकर: जर नात्यांमध्ये विवेक असेल, तर ते नाते स्वातंत्र्य हिरावून घेत नाही. जर विवेक नसेल, तर मग त्या नात्यात स्वातंत्र्य उरत नाही. नात्यामुळे स्वातंत्र्य मिळते किंवा संपुष्टात येते, असे  नाही. तर ते विवेकाच्या अभावाने होते.

प्रश्न: प्रिया गुरुजी,माझे कर्तव्य काय आहे?
श्री श्री रविशंकर: तुमच्या अंतरात्म्याचे ऐका. तुमचा अंतरात्मा तुम्हाला तुमचे कर्तव्य काय ते 
सांगेल.

प्रश्न: जय गुरुदेव, आपल्या जीवनातील वाईट गोष्टीदेखील ईशकृपा आहे का?
श्री श्री रविशंकर: जर तुम्ही मोठ्या दृष्टीकोनातून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की दु:खद प्रसंगांमुळे तुम्हाला एक प्रकारची गहनता आणि परिपक्वता मिळाला आहे.
जेव्हा कधी तुम्ही दुःखी असता तेव्हा समर्पण करा. सामान्यतः तुम्ही चिडलात कि म्हणता, "मी हात टेकले!"
दुःखी असताना सर्व त्यागण्याची शक्ती आणि सुखात असताना सेवा करण्याची शक्ती तुमच्यात असली पाहिजे. सुखात सेवा आणि दुःखात त्याग.

प्रश्न: गुरुजी, मला या जगात मोठा बदल घडवून आणायचा आहे. बदल आणण्याचा मार्ग मी कसा शोधू?
श्री श्री रविशंकर: जगात मोठा बदल घडवून आणण्याची मनीषा असणारे तुमच्यासारखे लोक मला पाहिजे आहेत. माझ्याकडे या आणि मी तुम्हाला वेगवेगळया जागी पाठवीन, जिथे जाऊन तुम्ही खूप काही काम करू शकाल. तुमच्याकडे आयते व्यासपीठ आहे. श्रीगणेशा करून त्यावरच पुढची तीस वर्षे वाया घालवण्याची तुम्हाला गरज नाहीतुमच्याकडे आयते व्यासपीठ आहे, इथे स्वतःला झोकून द्या आणि बदल घडवून  आणा.
मला काही करायचे आहे हे एक आणि जगात कशाची गरज आहे ते आपण केले पाहिजे हे दुसरे. मला बदल घडवायचा आहे हे आणि आपल्याला बदल घडवायचा आहे या दोन्हीत फरक आहे. जगाकरिता काय जरुरी आहे ते आपण करुया.हि भावना आपल्यामध्ये असली पाहिजे.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी भयगंडाने पछाडलेला आहे. काय करू?
श्री श्री रविशंकर: मी असताना भीती कशाची! तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्याबरोबर कोणी नाही तेव्हा तुम्हाला भीती वाटते.
जेव्हा तुम्हाला जोडलेले वाटत नाही, एकटेपणा वाटतो त्यामूळे भय वाटते. शीर्षासन केलेले प्रेम   म्हणजे भय. जाऊ द्या,जरा उज्जयी श्वास घ्या, सत्संगाला जा आणि मग बदल होईल.

प्रश्न: गुरुजी,मला कामुकतेचा चाळा लागला आहे. कामवासने बाबत मी माझे संपूर्ण नियंत्रण हरवून बसलो आहे. मी खूप प्रयत्न करतो पण मी स्वतःला आवरू शकत नाही.
श्री श्री रविशंकर: मला वाटते की तुमच्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे. जर तुम्ही कार्यमग्न असाल आणि मेहनत करत कराल आणि इतके थकलात कि घरी येऊन कधी एकदा बिछान्यावर अंग टाकतो आणि अंग टाकल्यावर एका मिनिटात झोपेच्या अधीन व्हाल.
एक तर तुमच्याकडे पुष्कळ मोकळा वेळ आहे किंवा मग तुम्ही जास्त आहार सेवन करीत आहात,यामुळे असे चाळे,व्यसने आणि भावातीरेक लागतात. अतिरेकी आहार आणि अतिरेकी कामवासना हे एकमेकांशी जोडलेले आहे.

प्रश्न: अध्यात्मायाच्या मार्गात विवाह करणे आणि संतान होणे हे वाईट आहे का?
श्री श्री रविशंकर: नाही. तुम्ही लग्न करू शकता आणि तुम्हाला मुले झालेली चालेल.
त्यासाठीच मी Sri Sri Matrimony याची सुरुवात केली आहे,म्हणजे मग अविवाहित मुली आणि मुले त्यांचे नाव इथे नोंदवू शकतील आणि एक दिवस आपण "स्वयंवर" ठेवू या. मग तुम्हाला कोणाबरोबर लग्न करायचे त्याची निवड करू शकता.
आम्ही याची सुरुवात आधीच केली आहे,आता त्याचा विस्तार करायचा आहे. जो जोड्या उत्तमप्रकारे जुळवू शकतो अशा कोणीतरी यात थोडे लक्ष घातले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी,एवढ्या वर्षांनंतरदेखील मी अजून संघर्ष करतो आहे,का? तुमच्यावर खूप प्रेम आहे गुरुजी!
श्री श्री रविशंकर: तुमचे माझ्यावर प्रेम आहे आणि तरीदेखील तुम्ही संघर्ष करीत आहात. कशाकरिता संघर्ष चालू आहे?
जर तुम्ही पैशाकरिता संघर्ष करीत असाल तर बसून स्वप्नरंजन करू नका. मेहनत करा. जर एक धंदा चालला नाही तर दुसरा धंदा निवडा आणि तो करा.
व्यवसाय किंवा नातेसंबंध या दोन बाबतीतच तुमचा संघर्ष असू शकतो.
जर तुमचे लग्न होत नसेल तर याचा अर्थ कि तुम्ही निवड करताना चोखंदळपणा करीत आहात आणि म्हणून ते काम होत नाही. आणि जर तुमचे नाते नीट नाही आणि तुम्ही ते टिकवायला संघर्ष करीत असाल तर अर्थात लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा हे ज्ञान इथे उपयोगी पडेल. तर मग तुम्ही त्यांचा जास्तीत जास्त स्वीकार करण्याचा प्रयत्न करता परंतु तुमचे मन नकार देते. ज्ञानामुळे तुम्ही टिकून आहात आणि जिवंत आहात हे जाणून घ्या. तुम्हाला समजते आहे का मी काय म्हणतो आहे ते? तुम्ही कसेही करून सगळे जमवता आहात.
तर मग असे समजू नका कि तुम्हाला काहीच जमत नाही. मला नाही वाटत कि हे खरे आहे.
आरोग्य ही तिसरी समस्या असू शकते. आणि चौथी समस्या असणे शक्य नाही. आणि दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये आल्यानंतर या तीन समस्या हाताळण्यात तुम्हाला मदत मिळते.
बसून स्वप्नरंजन करू नका आणि चमत्कार होण्याबद्दल विचार करत राहू नका. चमत्कार होतात पण जर तुम्ही चमत्काराची लालसा धरून बसलात तर चमत्कार लोप पावतील. निसर्गाला तुम्ही चैतन्यपूर्ण पाहिजे आहात.
"गुरुजी,कृपा करून मला लॉटरीचे क्रमांक सांगा.मला लॉटरी जिंकायची आहे म्हणजे मला बाकी काही करायची जरुरत नाही. पूर्ण वेळ केवळ साधना करायची आणि काही सेवा करायची." असे मला विचारणारे लोक आहेत. माझे उत्तर आहे,"बिलकुल नाही!"
सर्वात प्रथम तुम्हाला जीवनाकडून काय पाहिजे ते ठरवा.
संघर्ष कशाचा? पैशाचा?!
पैसा अशी गोष्ट आहे जी लोकांकडे नेहमीच कमी असते हे जाणून घ्या. नेहमीच! उदाहरणार्थ अमेरिका,जगातील सर्वात संपन्न राष्ट्र,आपल्या ग्रहावरील महासत्ता मोठ्या कर्जखाली आहे,अब्जावधी डॉलरचे कर्ज. मोठ्या कंपन्या घ्या,त्यातल्या बऱ्याच कर्जबाजारी आहेत.
धनवान माणूस जेवढे कमावतो तेवढा जास्त खर्च त्याला करावा लागतो. त्याचवेळी तुम्हाला गरीब माणसे धर्मादायाकरिता पैसे देताना,देवा करता दानधर्म करताना दिसतात जे आश्चर्यकारक आहे. त्यांना एवढी विपुलता वाटते.
परवा एक सद्गृहस्थ माझ्याकडे आला. त्याचे एक छोटेसे दुकान आहे,एक टपरी आणि त्याला दोन भूखंड वारसा हक्काने मिळाले. तर तो माझ्याकडे येऊन त्याल्तील एक भूखंड मला देण्याचा प्रस्ताव त्याने केला. "मला हा भूखंड तुम्हाला द्यायचा आहे,"तो म्हणाला,त्याने आग्रहच धरला. त्याची आई,पत्नी अशा त्याच्या संपूर्ण परिवाराबरोबर आला होता आणि म्हणाला,"माझ्यकडे दोन आहेत,त्यातील एक मला दान करायचा आहे आणि दुसरा ठेवायचा आहे"
भूखंड शहरातील महागड्या ठिकाणी होता आणि तो त्याने विकला असता तर त्याचे नशिब उघडले असते. पण त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाकडे बघा.
मी म्हणालो,"ठीक आहे.मी तो घेईन पण तो तुझ्याच नावावर राहील. माझ्याकरिता तू तो सांभाळून ठेव आणि तू तिथे दुकान बनव. दुसरा भूखंड विक आणि त्याच्या पैशाने धंदा चालू कर." मी घेणार नाही असे त्याला स्पष्ट म्हणू शकलो नाही कारण तो दुखावला गेला असता,म्हणून मी म्हणालो,"हो,तो माझा असेल पण तुझ्या नावावर राहील आणि तुझीच मालकी असेल."
या माणसाच्या मनाच्या मोठेपणाकडे बघा.
आणखी एका दिवशी एक महिला माझ्याकडे आली,आणि तिच्याकडे केवळ एक सोन्याची साखळी जी तिला वारसा हक्काने मिळाली, ती होती.मी गाडीकडे चाललो होतो आणि ती धावत आली आणि तिने एक पाकिट माझ्या हातात ठेवले.
लोक नेहमी त्यांच्या समस्या सांगणारी पत्रे मला पाकिटातून देतात. म्हणून मी ते पाकीट  घेऊन घेतले,आणि मला त्यात मिळाली सोन्याची साखळी.मग मी काही लोकांना ह्या महिलेचा शोध घेण्यास पाठविले आणि ती साखळी परत देऊन तिला कळविले की गुरुजींचे आशीर्वाद दिले आहेत.
तुम्हाला माहिती आहे,आपल्या रौप्यमहोत्सवाच्या वेळेस एक सुंदर घटना घडली! शेवटच्या दिवशी मी पायऱ्या उतरून येत होतो आणि एक छोटा मुलगा धावत माझ्याकडे आला,त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने मला एक पाकीट दिले. मी पाकीट घेतले आणि त्यात होते रु.५०००. मी त्या मुलाकडे बघितले आणि विचारले,"तू काय करतो?"
तो म्हणाला तो एक मजूर होता.
त्याने त्या पाकिटात जे पैसे दिले ती त्याची दोन महिन्याची कमाई होती,आणि तो म्हणाला,"कृपा करून हे घ्या."
तो म्हणाला,"मी सांगू शकत नाही कि माझ्या आयुष्यात किती अमुलाग्र बदल झाला आहे.कृपा करून याचा स्वीकार करा."
मी त्यातून केवळ रु.१०० घेतले आणि बाकीचे रु.४९०० परत केले. मी त्याला म्हणालो,हे रु.१०० माझ्य्कारिता खूप मौल्यवान आहेत,तेवढेच पुरे आहेत.ते मी घेतो.
दोन महिन्याची कमाई;तेसुद्धा एक माजुराकडून जो काबाडकष्ट करतो,तो येतो आणि अर्पण करतो. लोकांचे हृदय किती मोठे आहे!
माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्हीदेखील विपुलता अनुभव.त्याकरिता तुम्ही धनवान असणे जरुरी नाही.खरे तर बऱ्याच श्रीमंत लोकांना विपुलता अनुभवता येत नाही,त्यांना कमतरता वाटत राहते. त्यांना औदार्य वाटत नाही.परंतु गरीब लोक नेहमी उदार असतात;त्यांच्याकडे त्या भावना असतात,ती कला असते.
अश्या काही प्रसंगाची कल्पना करू नका कि तुम्ही एक दिवशी भरपूर श्रीमंत होणार आहात आणि मग तुम्ही काही सेवा सुरु कराल,मनही,तसे काही नाही. तुम्ही विपुलतेचा अनुभव कोणत्याही क्षणी घेऊ शकता. आणि ज्या क्षणी तुम्ही विपुलता अनुभवाने सुरु कराल,त्या क्षणी सगळ काही अधिक चांगले होऊन जाईल,समजले!
त्याचप्रमाणे नाते संबंधांच्या बाबतीत उतावळे होऊ नका,आरामात राहा आणि तुम्ही बघाल के तुमचे लोकांबरोबरचे नाते अधिक चांगले होऊ लागले आहे. जर तुम्ही एखाद्या जळूप्रमाणे एखाद्या नात्यातील व्यक्तीला घट्ट चिटकून राहिलात आणि त्यांना संतप्त करू लागलात,तर मग तुम्ही जरी त्यांच्याशी चांगल्या शब्दात बोललात तरी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर पळून जाईल, कारण ती हे हाताळू शकणार नाही.
प्रेम देणे हा एक पैलू आहे आणि प्रेम कसे हाताळावे ,प्रेम कसे स्वीकारावे हा दुसरा पैलू आहे. त्याकरिता संतुलित साक्षात्कारी व्यक्तीची गरज आहे. अशी वागणूक प्रत्येकाकडून अपेक्षित करू नका.
तुम्हाला स्वतःसोबत सहज असणे जरुरी आहे.जर तुम्ही स्वःताबरोबर सहज असाल तर सगळेच तुमच्याबरोबर सहज असतील

प्रश्न: गुरुजी,मला पूर्णपणे तुमच्यापाशी समर्पण करायचे आहे.
श्री श्री रविशंकर: नाही,नाही,असे काही करू नका. तुम्हाला समर्पण का करायचे आहे? तुम्हाला समर्पण करण्याची काय गरज आहे? काही नाही. आराम करा!
तुमचे समर्पण करणे हे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता फार मोठे काम होते...मोठी डोकेदुखी! तुम्हाला समर्पण करण्याची काही आवश्यकता नाही,आराम करा. तुम्ही कशाचे समर्पण कराल? तुमचे हृदय,मन आणि आत्मा? शक्यच नाही,ते आधीच माझे झाले आहे. सगळे काही माझेच आहे.
"अरे तुम्ही माझे हृदय चोरले" असे कोणी तरी गात होते. जे आधीपासूनच माझे आहे ते मी चोरण्याची काय गरज? मी तुमचे हृदय का चोरवे? या ग्रहावरचे सगळेच्या सगळे माझेच आहेत, असे मला वाटते,कळले का!
मला चोरण्याची आणि तुम्हाला समर्पण करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही माझे आहातच. तर मग आराम करा...स्वस्थ बसा!
जेव्हा तुमच्या डोक्यावर नकारात्मकतेचे ओझे असते तेव्हा "शरण येण्या"ने मदत होते. जर तुमच्यात नकारात्मकता किंवा तिरस्कार असेल तेव्हा तुम्ही ते समर्पण करा. तुमचे चांगले गुण किंवा जे काही सुरेख आहे ते समर्पण करण्याची आवश्यकता नाही, कारण ते आधीच माझे आहे. जे काही नकारात्मक आहे ते माझे नाहीये आणि जर ते तुमच्याकडे असेल तर ते मला देऊन टाका.


The Art of living
© The Art of Living Foundation