सर्वांशी मिळून मिसळून वागणे हे भारतीयांच्या स्वभावातच आहे !

१८ मार्च २०१२

विश्वास,श्रद्धेला जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. श्रद्धेचे तीन स्तर आहेत : पाहिलं म्हणजे स्वत: वर विश्वास असणे, म्हणजेच आत्मविश्वास. दुसरं म्हणजे समाजात चांगली लोक आहेत असा विश्वास असायला हवा. समाजाच्या नियमांवर विश्वास असायला हवा. आणि तिसरा व महत्वाचा जो विश्वास ठेवायला अवघड आहे पण तसं सोपा आहे तो म्हणजे दैवी शक्ती. दैवी शक्ती आपल्या सर्वामध्ये असतेच. एकेकाळी दैवी शक्ती होती आणि आता नाही असे काही नाही. हा गैरसमज आहे. आपण म्हणतो कि जे संत, महात्मा होवून गेले किवा जे अवतार होवून गेले त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती, पण तसे काही नाही. दैवी शक्ती हि आपल्या सर्वामध्ये या क्षणी आहे.
आपल्या प्रत्येका मध्ये हि दैवी शक्ती असते, हेच तुम्हाला आठवण करून द्यायला मी इथे आलो आहे. आपल्या आई वडिलां वरील प्रेमापेक्षा शंभर पटीने दैवी शक्ती सशक्त आहे. हाच विश्वास तुमच्यात जागृत करण्यासाठी मी इथे आलो आहे. ह्यासाठी मी तुम्हाला कोऱ्या कागदावर सही करून द्यायला तयार आहे.
काही क्षणासाठी एके ठिकाणी शांतपणे बसा, जगातील कुठल्याही घटनां, गोष्टींचा विचार करू नका. आणि आपल्या चेतना कडे पहा तुम्हाला प्रकाश दिसेल!!!!! आणि जाणवेल कि हीच ती गोष्ट आहे ज्याला आपण शोधत आहोत. ज्या देवाने हि पृथ्वी घडवली तोच माझ्यामध्ये आहे. हे सत्य जाणल्यावर जे स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर येईल ते या जगात कोणीही हिरावून नेवू शकणार नाही. तुम्हाला मग धर्म जातिची भांडणे नाटकी वाटू लागतील.
तिसऱ्या विश्वासाच्या बाबतीत आपल्या मनात थोडा जरी अंश आला तरी आपली आयुष्य बदलू शकते. मी जगाच्या पाठीवर १५२ देशात प्रवास केला आहे सर्व प्रकारच्या लोकांना मी भेटलो आहे पण मला कोणीही अपरिचित वाटले नाही कि ज्यांना मी भेटलो त्यांना मी अपरिचित वाटलो नाही. कोणत्याही देशात मी गेलो, तर मी कोणाकडे अनोळखी म्हणून पहात नाही, ना माझ्याकडे कोणी अनोळखी म्हणून पहात नाही. जर हा पूर्ण संसार एकाच देवाने बनविला आहे तर आपण एकमेकांकडे अनोळखी म्हणून का बघायचे?
म्हणूनच मी म्हणतो कि हि जीवन जगण्याची कला आहे. मी हि संस्था सुरु करून आज ३० वर्षे झाली आहेत. तुम्ही जर उत्तर धृवावर गेलात जिथे सूर्य दोन महिने उगवत नाही तिथे तुम्हाला लोकं सुदर्शन क्रिया करताना दिसतील. दक्षिण धृवावर आणि ह्या जगातील कोणत्याही कोपर्यात गेलात तर श्वासाव्दारे मनाला शांत करण्याची साधी कला सर्वांना येते.
तुम्ही कोणत्याही जातीजमातीचे असा, तुम्ही कोणतेही धर्मग्रंथ वाचून ज्ञानी असाल, पण एकच गोष्ट विसरता कामा नये कि आपण सर्वजण मानव आहोत आणि अमुल्य आहोत. हेच मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये बोलत असतो.

तर!!! तीन प्रकारचे विश्वास. पहिला म्हणजे आत्मविश्वास. जर कोणी म्हणत असेल कि माझा कशावर विश्वास नाही. हे फक्त तोच म्हणू शकेल ज्याचा स्वत:वर आत्मविश्वास आहे. ज्याचा आत्मविश्वास नाही तो तर एक पाउल पण पुढे टाकू शकणार नाही. आजच्या घडीला आपण गरीबामध्ये आत्मविश्वास उंचावला पाहिजे. ह्या मार्गाने आपण गरीबी कमी करू शकतो.  ‘मला कोणी मदत करेल’ या पेक्षा मी काही करू शकतो हि मनोवृत्ती सर्वामध्ये आली पाहिजे.

तर हे झाले आत्मविश्वासाबद्दल . दुसर म्हणजे या जगात खूप चांगली लोकं आहेत – थोडे नाही पण भरपूर. पण ह्या चांगल्या लोकांनी मौन बाळगल्याने ह्या जगाचे तीन तेरा झालेत. आपला ह्या चांगल्या लोकांवर विश्वास असायला पाहिजे.
आपण कोणत्या गोष्टींवर नेहमी संशय घेतो? संशय हा प्रामाणिकतेवर केला जातो अप्रामाणिकतेवर आपण विश्वास ठेवतो. एखाद्या प्रामाणिक व्यक्तीने थोडीही अप्रामाणिकता दाखविली तरी आपण त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय घेतो. आपल्याला जर कोणी म्हटले कि माझे तुझ्यावर प्रेम आहे तर आपण त्याच्यावर संशय घेतो आणि जर का कुणी म्हटले कि मी तुझा तिरस्कार करतो तर आपण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. संशय हा नेहमी सत्य आणि चांगुलपणावर केला जातो. त्यामुळेच आपण देवावर संशय घेतो कारण ते सत्य आहे. म्हणून समाजात जे चांगले गुणी व्यक्ती आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा. ‘ह्या समाजात कोणीही चांगले नाहीत हा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही एक पाउल पण पुढे टाकू शकणार नाही.
समाजाचा आराखडा हा विश्वासावरच उभारलेला आहे. टेलिफोन कंपनी, विद्युत कंपनी तुम्हाला सेवा देतात कारण त्यांचा विश्वास आहे कि महिना अखेर तुम्ही त्यांचे जे काही बिल आहे ते तुम्ही भरणार. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत तुम्ही जिकूंन देता कारण तुमचा विश्वास असतो कि तो तुम्हाला न्याय मिळवून देईल. हे सर्व आयुष्य विश्वासावरच चालले आहे. हा झाला दुसऱ्या प्रकारचा विश्वास.
मी तिसऱ्या विश्वासा बद्दल बोललो आहे. एक अशी शक्ती, अस्तित्व आहे कि जे आपल्या सर्वाची काळजी घेते. आता पहा आपण ज्यावेळेस लहान होतो – तसा मी अजून पण लहानच आहे; पण आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस काही संकट आल्यास काय करायचो? आईच्या कुशीत जावून रडायचो. थोडे मोठे झाल्यावर वडीलांच्या कुशीत जावून रडायचो. ज्या ज्यावेळेस आपल्यावर संकट, अडचणी आल्या त्या त्या वेळेस आपण आई किवा वडिलांना सांगून मोकळे व्हायचो आणि आपल्या चेहऱ्यावर रडणे थांबून स्मितहास्य यायचे. आपल्या शाळा कॉलेजच्या दिवसात आपल्यावर काही अडचणी आल्यास ज्या आपण आई वडिलांना सांगू शकत नाही त्या आपण आपल्या शिक्षक किवा गुरुना सांगायचो आणि आपले  मन हलके व्हायचे. आज आपण हे सर्व विसरून चाललो आहोत. ह्यानंतर देव, ज्याच्यावर आपला विश्वास आहे तिथे जावून आपण आपले दुख: समर्पण करून हलके होतो.
ह्या ज्या काही रुढी पूर्वकालीन समाजात आहेत कि तुमच्यावर काही अडचणी, संकट आले तर तुम्ही आई, वडील, गुरु, देव ह्यच्याकडे जावून त्यांना समर्पण करून मन मोकळे करा आणि हसत रहा. सरते शेवटी सर्व धर्मांचे हेच ध्येय आहे कि तुम्ही हसतमुख रहा.ह्यालाच अध्यात्म पण म्हणू शकता.अध्यात्म म्हणजे काय? एखाद्या कोपऱ्यात बसून काहीतरी करत राहणे म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म म्हणजे तद्भाविता, आपलेपणा.
जिथे आपलेपणा संपतो तिथून भ्रष्टाचार सुरु होतो. आपल्या जवळच्या माणसात भ्रष्टाचार कुणी करत नाही. एकट्या कायद्याच्या सहाय्याने भ्रष्टाचार कमी होईल असे मला नाही वाटत. कायदा हा आवश्यक आहे, पण त्याच बरोबर आपलेपणा पण पाहिजे. सर्वाचा स्वीकार करून एकत्रित राहण्याची अलौकिक कला फक्त भारतातच आहे. मध्यंतरी काही काळापूर्वी आपण हि संस्कृती हरवून बसलो. पण अजूनही खेडे गावामध्ये हि संस्कृती आहे.

मी नेहमी म्हणत असतो कि आपल्याला या विश्वात खूप काही शिकण्यासारखं आहे. हे विश्वच आपले कुटुंब आहे. प्रत्येकांकडूनकाही शिकण्यासारख आहे. जपानी लोकांकडून आपण काय शिकू शकतो? एकत्रित काम पद्धती. त्यांच्याकडून हेच शिकण्यासारखं आहे. ते  सर्व एकत्रित येऊन खूप छान काम करतात.
त्याचप्रमाणे जर्मन लोकाकडून अचूक कार्य पद्धती शिकायला हवं. ते जे काही करतात त्यात चूक काढणे फार अवघड असते. ते जे मशीन बनवतात त्यात चूक काढणे फार अवघड असते एवढे अचूक काम ते करतात. वेळेच बंधन त्यांच्याकडून शिकावं
माझा एकदा जर्मनी मध्ये एक कार्यक्रम ७ वाजता होता. तर मी १० मिनिटे आधी पोहचलो पाहतो तो काय? संपूर्ण हॉल रिकामा होता. कार्यक्रम आयोजकांना मी विचारलं कि कोणीच नाही? माझा हा पहिला अनुभव होता कि मी इथे आहे आणि कोणीच नाही. तर आयोजक म्हणाले कि गुरुजी अजून कार्यक्रमाला सुरु व्हायला ७ मिनिटे कमी आहेत. आणि पाहता पाहता सात वाजायला १ मिनिट कमी असताना सर्व हॉल भरून गेला. सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. वेळेचे बंधन हे त्यांच्याकडूनच शिकायला हवं.
ब्रिटिशां कडून काय शिकता येईल? तर शिष्टाचार, सभ्यता आणि सौजन्य. ते खूप सौजन्यपूर्ण लोकं आहे. सभ्यता सौजन्य हे त्यांच्याकडून शिकावी.
अमेरिकन लोकांकडून काय शिकता येईल?कोणतीही वस्तू विकायची कौशल्य कला. पौर्णिमेदिवशी ते चंद्र पण विकतील. काही अस्तित्वात नसेल तर ते तयार करून विकण्याची कला त्यांच्याकडे आहे.
त्याचप्रमाणे भारतीयांकडून काय शिकता येईल तर ते म्हणजे माणुसकी आणि आपुलकीपणा.  देशाच्या कोणत्याही खेडे गावात जावा, त्यांच्याकडे जर एक ग्लास लस्सी असेल तर ते त्यातील आर्धा ग्लास तुम्हाला देतील. अशा भावना अशी आपुलकीपणा फक्त आपल्याकडेच भारतात आहे. वरिष्ठांना आदर हा तर एक वेगळा वैशिष्ठपूर्ण स्वभाव आहे. हे फक्त आपल्या भारतातच आहे.
परदेशात वरिष्ठ लोकांना कोणी विचारत नाही. कधीतरी त्यांना कार्ड पाठवितात म्हणजे मदर्स डे किंवा फादर्स डे दिवशी. वरिष्ठांना आदर हि तर आपली संस्कृती आहे. आपल्या कडे सर्व धर्मात मग तो हिंदू असो, मुस्लीम असो, कि आणि कुठल्या धर्माचा असो वरिष्ठ लोकांना आदर देणे हि आपली संस्कृती आहे.
ह्यच्या मागे शास्त्रीय कारण आहे तुम्हाला माहित आहे का?
घरात लग्न कार्य असेल तर आपण सर्वात जेष्ठ लोकांकडून आशीर्वाद घेतो. का माहीत आहे का? त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि कोण आशीर्वाद देवू शकतात? ज्यांना स्वत: साठी काही नको असते म्हणजे स्वत:साठी काही इच्छा नसतात तेच इतरांना आशीर्वाद देवू शकतात. मनुष्याचे वय जेवढे जास्त असते तेवढा तो तृप्त असतो. त्याच्या सर्व इच्छा तृप्त झालेल्या असतात, तो सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झालेला असतो. तोच व्यक्ती आशीर्वाद देवू शकतो.
ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही म्हातारपणा पर्यंत तृप्त होणार नाही, मला असे अजिबात म्हणायचे नाही. जेव्हा तुमच्या तरुणपणी तुम्ही तृप्त होता, तेंव्हा तुमच्या मध्ये एक अद्वितीय अशी शक्ती येते कि ज्याच्यामुळे तुमच्याच नाही तर इतरांच्या पण इच्छा पूर्ण होवू लागतात. म्हणजे तुम्ही जर कुणाला आशीर्वाद देत असाल तर १००% त्यांचे काम होणारच.
तुमचे मन आनंदी, तृप्त असले पाहिजे. मनात मतभेद नसावेत , कुणाबद्दल राग नसावा. ह्या सर्व छोट्या नगण्य गोष्टी आहेत. आता पर्यंतच्या माझ्या ५५ वर्षांच्या आयुष्यात मी कधीही खराब, कटू शब्द उच्चारलेला नाही. आता पर्यंत माझ्याकडे कुणाचाही एक शाप देखील आलेला नाही कारण ते माझ्या स्वभावातच नाही. तुम्ही ज्यावेळेस कटू, रुक्ष शब्द बोलण्याचे बंद कराल त्या वेळेस तुमच्यामध्ये इतरांना आशीर्वाद देण्याची शक्ती येते.
तसे पाहता वाढत्या वयानुसार आपण तृप्त झाले पाहिजे. पण आता ते पाहायला मिळत नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्याचे मन तिजोरीच्या किल्ल्यामध्ये अडकलेले असते. ते आपल्या मुलांनापण देत नाहीत. बँकेत धन संपत्ती ठेवून ते मरून जातात आणि त्यांच्या मागे त्यांची मुले भांडत राहतात. हे बदलायला हवं. मी ह्यासाठी तरुणांना आवाहन करतो.
उत्तर प्रदेश चे मुख्य मंत्री तरुणपिढीचे आहेत हे एकून मला खूप आनंद झाला, आता तिथल्या लोकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. मी आत्ताच तिथल्या १६ जिल्ह्याचा दौरा करून आलो, तिथे खेड्यात खुपच गरिबी आहे. लोकांना आशा आहेत कि असा काही बदलाव येईल कि ज्याच्यामुळे सर्व राज्य देश बदलून जाईल. सर्व जातीच्या लोकांना अपेक्षा आहेत कि त्यांना न्याय मिळेल. आणि मला विश्वास आहे कि तरुण पिढीचे मुख्य मंत्री मंडळ ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील. मी प्रार्थना करून आशीर्वाद देतो कि ते उत्तर प्रदेश राज्याला खूप पुढे घेवून जावे.
समाजातून भ्रष्टाचार, अहिंसा कमी झाल्या पाहिजेत. समाजात कुठल्याही प्रकारे अहिंसा होता काम नये. स्त्रियांवरील अत्याचार थांबविले पाहिजेत. या सर्वांचे मूळ कारण उदासीनता आहे. जर आपण उदासीनता कमी करून समाजात शांतता आणली तर प्रत्येकाचे मन शांत होईल आणि त्यांचे आयुष्य फुलून येईल आणि सामाजिक आजार कमी होतील. एवढेच मला सांगायचे आहे.
आता तुम्हाला कळले कि आशीर्वाद कसे घ्यायचे आणि द्यायचे? जेव्हा तुम्ही तृप्त असाल तेंव्हा.
मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. आज रात्री तुम्ही एक यादी करा - तुमच्या अपेक्षा आणि तुम्ही घेतलेल्या  सामाजिक जबाबदारी किंवा तुमच्या जीवनातील जबाबदारी. जर तुमची जबाबदाऱ्यांची यादी अपेक्षा यादी पेक्षा मोठी असेल तर तुमचे जीवन सुखमय आहे. पण जर का तुमची अपेक्षा यादी जबाबदारी यादी पेक्षा मोठी असेल तर तुमचे जीवन दुख:मय वाटेवर आहे असे समजा. जो कोणी अपेक्षा न करता समाजाची सर्व जबाबदारी घेतो तो खरा नेता, सामाजिक कार्यकर्ता असू शकतो आणि तोच राजकारणात येवू शकतो, ज्याला स्वत:साठी काही अपेक्षा नाहीत आणि फक्त समाजाच्या भल्याचा विचार करतो.
आपण कधी याचा विचार करत नाही. पण शांतपणे बसून ह्या गोष्टीचा विचार करायला हवी. मी अस म्हणत नाही कि सर्वजण संत बना कि जो म्हणेल “मला काही नको” ते ठीक आहे. जे काही तुम्हाला हवं आहे त्याची तुम्ही एक यादी बनवा आणि पहा तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. तुम्ही कोणत्या जबाबदारी घेता? स्वत: ची, आपली कुटुंबाची , आपल्या समाजाची. आता ह्या जबाबदारी वाढवा. हे खूप महत्वाचे आहे.
बरेचजणांना आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे हे माहीतच नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे? ह्याच्या बद्दल आम्हाला सांगा असे बऱ्याच लोकांच्या मनात चालले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे पाच मूलतत्वे आहेत. फक्त पाच.
जीवनात सुख दु:ख येत राहतात. ह्या दोन्ही अवस्थेत स्वत:चा मनावर ताबा ठेवणे महत्वाचे आहे. हाच पहिला धडा आहे. जीवनात विरुद्धार्थी गोष्टी होत राहतात, कधी हार तर कधी जिंकणे, कधी नफा तर कधी तोटा, कधी सुख तर कधी दु:ख. ह्या गोष्टी ये जात राहतात, पण अशावेळी आपला आपल्या मनावरचा ताबा सुटता कामा नये, जे असे झाले तर आपण काहीच करू शकणार नाही. अशा अवस्थेत मनावर ताबा मिळवणे हाच आर्ट ऑफ लिव्हिंग चा पहिला धडा आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग चा दुसरा धडा म्हणजे समोरचा व्यक्ती जसा आहे तसा त्याला स्वीकारणे. आपल्याला वाटते कि सगळेजण माझ्यासारखेच असावेत अशी आपण अपेक्षा करतो. पण तसे कसे शक्य होईल.? सासूला वाटते सून माझ्यासारखी असावी. मी जे काही सांगेन ते तिने ऐकल्याच हवे. आपल्या मुलाने आपल्या सारखेच वागावे असे वडिलांना वाटते. ह्या कारणामुळेच घरांघरा मध्ये समाजामध्ये संघर्ष निर्माण होतात.म्हणून मी म्हणतो कि समोरचा व्यक्ती जसा आहे तसा त्याला स्वीकार करा.
दुसरे तुमच्या बद्दल काय विचार करतात हे तुम्ही विचार करू नका. या जगात प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे,प्रत्येकाचे मत वेगळे आहे. दुसऱ्यांना तुमच्याबद्दल काय विचारकरायचा आहे तो करू देत. तुम्ही त्याची काळजी करू नका. दुसरे आपल्या बद्दल दुसरे काय विचार करतात हा विचार आपण करून आपणच उदास होतो. इथे कितीजण दुसऱ्यांचे मत एकून उदास होतात? हे निव्वळ निरर्थक आहे. आपला वेळ  आयुष्य वाया घालविण्या सारखे आहे. जीवन हे अमूल्य आहे. त्यासाठी मी म्हणतो कि तुम्हीदुसऱ्यांसाठी फुटबॉल होवू नका. हा आहे तिसरा धडा.
चौथा धडा म्हणजे, जेव्हा आपल्या कडून काही चूक झाल्यास आपण म्हणतो कि माझ्या कडून चूक झाली आहे, मी काय करू? पण तीच चूक दुसऱ्या कडून झाल्यास आपण म्हणतो कि त्याने ती मुद्दाम केली. असा विचार करू नका. क्षमा करायला शिका. दुसऱ्याने माफी मागण्याची वाट पाहू नका. त्याने माफी मागितली किवा नाही मागितली तरी तुम्ही त्याला क्षमा करून आपले मन हलके करा. त्यामुळे आपण आनंदी राही शकू. नाहीतर काय होईल ज्याच्या बद्दल आपल्याला राग आहे, दिवस रात्र आपल्या मनात त्याचाच विचार चालू असतो. त्यासाठी मी म्हणतो कि कुणी चूक केल्यास त्याने माफी जरी नाही मागितली तरी तुम्ही त्याला क्षमा करा. क्षमा करणे हि फार मोठ्या मनाची लक्षण आहे. जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर क्षमा करणे हे रोजच्याआ आयुष्यात आणले पाहिजे.
ऋषी अष्टावक्र म्हणतात कि तुम्हला जर मुक्ती हवी असेल तर तुम्ही करुणा, क्षमा, खरेपणा, तृप्ती ह्या गोष्टींचा रोजच्या जीवनात अभ्यास केला पाहिजे. हे जीवनातील मधुर रस आहेत.
तुम्ही आता हे करू शकाल? ज्या व्यक्ती बद्दल तुम्हाला द्वेष, राग आहे त्या व्यक्तीला आत्ता ताबडतोब क्षमा करा. १ मिनिट पण लागत नाही. करू शकाल तुम्ही? कितीजण करू शकताल?
बघा क्षमा केल्याने आपण किती आनंदी होतो. आपल्याला वाटते कि क्षमा करणे फार अवघड आहे. मी तुम्हाला आणखी एक मार्ग सांगतो. जेव्हा गुरु तुमच्या शहरात येतात, त्यावेळेस तुमचे काय कर्तव्य आहे? गुरुदक्षिणा द्यावी.  मी तुमच्याकडून दोन गोष्टींची गुरुदक्षिणा मागेन, एक म्हणजे तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल राग, द्वेष असेल तर ते मला गुरुदक्षिणा समजून द्या. तुम्ही आपापसात मिठाई देवून आपले नाते जपा. दुसरे म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीची काळजी, चिंता असेल तर ती मला गुरुदक्षिणा समजून द्या आणि तुम्ही हसत रहा, चिंतामुक्त रहा. समाजात काही सेवा कार्यामध्ये सहभाग घ्या. हीच देवाची सेवा आहे.

‘अने कने प्रकारीना यस्य कश्यपी देहिनासंतोषम जनेत प्रज्ञा तेदेश्व्र्र पुजानाम’
ईश्वर भक्ती म्हणजे काय? प्रत्येकाचे जीवन आनंदमय करणे, तृप्ती बद्दलची भावना जागृत करणे हिच खरी सर्वात मोठी  ईश्वर भक्ती आहे. किती छान सांगितलंय आपल्या पूर्वजांनी !
पाचवा धडा, आर्ट ऑफ लिव्हिंग चे पाचवे तत्व म्हणजे तुम्ही नेहमी वर्तमान काळात रहा. हा क्षण! या क्षणी!
भूतकाळ कसाही असला असो आपण त्याच्या वर विचार केला तरी काही हाती लागणार नाही. विनाकारण वेळ वाया घालवू नका. आपण ७० ते ८० % वेळ भूतकाळात काय झाले, कसे झाले, का झाले? हा विचार करण्यात घालवितो. गेलेल्या भूतकाळावर विचार करणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्याच्यापेक्षा त्याच्यातून चांगला धडा शिकून वर्तमानात राहणे शहाणपणा आहे.
हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे.
आता तुम्ही म्हणताल कि ‘गुरुजी हे सर्व ऐकण्यास चांगले वाटते पण प्रत्यक्ष जीवनात असे वागण्यास खूप अवघड आहे. मग मी म्हणेन कि तुम्ही रोज सुदर्शन क्रिया, प्राणायाम करत रहा आणि पहा तुमचे जीवन कसे बदलून जाईल. आज जगात सर्वजण हे करत आहेत आणि त्याच्या जीवनात मोठे परिवर्तन आले आहे.

मी इराकला तीन वेळा गेलो आहे. सर्वजण म्हणायचे कि ‘हे धोक्याचे क्षेत्र आहे तुम्ही तिथे जाऊ नका’. इराक सरकारने माझ्या सुरक्षिततेसाठी १२ वहाने, २ रणगाडे दिली होती. १ रणगाडा पुढे आणि एक माझ्या गाडीच्या मागे. आजूबाजूला संरक्षक दलाच्या गाडया. मी म्हणालो ‘ मी इथे जनसामांन्यान्या भेटायला आलो आहे, सुरक्षा साखळीत बसायला आलो नाही.
मी त्यांना म्हटले कि ‘ तुम्ही जो काही धोक्याचे क्षेत्र आहे असे म्हणता मला तिथे  जायचे आहे.’ ते म्हणाले कि तिथे खूप मोठा धोका आहे, तुम्ही तिथे जाऊ नाक. आम्ही तुम्हाला तिथे जायची परवानगी देवू शकत नाही. पण मी तिथे जायचा खूप आग्रह धरला. कधी कधी आग्रह चांगला असतो. सरतेशेवटी त्यांनी मला जायची परवानगी दिली. मी त्या धोक्याच्या क्षेत्रात गेलो आणि तिथल्या शिया गावाच्या नगराध्यक्षाला भेटलो. त्यांनी माझे चांगले स्वागत केले. मी तिथल्या जमातीच्या लोकांना भेटलो. ते म्हणाले ‘गुरुजी हे तुमचेच घर आहे, तुम्ही इथेच रहा, तुम्ही आम्हाला सोडून जावू नका’. किती प्रेमाने त्यांनी माझे स्वागत केले.

८००० शिया परिवार गावातून बाहेर गेले आहेत. मग मी सुन्नी इमाम बरोबर शिया गावात गेलो. दोन्ही गटातील लोकांना एकमेकासमोर बसवून संगनमत केले. त काय बोलतात ते कळत नव्हते कारण ते अरेबिक भाषा बोलत होते. मी तिथे भाषा आनुवादका बरोबर बसलो आणि पुन्हा तिथे शांती प्रस्तापित झाली. सगळे परिवार परत गावात येवून राहिले.
मी त्यांना सांगितले कि तुम्ही जर एकाच ईश्वरात विश्वास ठेवता तर मग एकमेकात संघर्ष कशाला करता?
इराक मध्ये सात लाख महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्याकडे बघितल्यावर कुणाचे हि हृदय भरून येईल. त्यानंतर इराकहून ५० नवयुवक बंगलोर आश्रमात आले आणि त्यांनी शांतीदूत होण्याचे प्रशिक्षण घेतले. इराक सरकारनेच सांगितले कि गुरुजी ह्या ५० नवयुवकांना तुम्ही शांतीदूत बनवा. आम्हला फक्त आर्ट ऑफ डाईंगच माहीत आहे. आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल शिकायचे आहे. त्यानंतर तिथली परिस्थिती एकदम बदललेली आहे.अर्थात आम्ही जे काही केल ते एका थेंबां पेक्षा हि कमी आहे, पण एक थेंब खूप मोठे काम करून जातो.
त्यासाठीच मी म्हणत असतो कि आपल्या रक्तात शांती, मित्रत्व, सगळ्यांना एकत्रित घेवून जाणे हे सर्व भिनलेले आहे. आपण त्या गोष्टीला फार महत्व दिले पाहिजे. आपल्या देशात शांती टिकवून ठेवली पाहिजे.
आठ वर्षापूर्वी मी लखनऊला आलो होतो. आणि इथूनच पाकिस्तानला गेलो होतो. या वर्षी मी पाकिस्तानला भेट देवून लखनऊला आलो आहे. पाकिस्तानमध्ये हि लोकांनी माझे चांगले स्वागत केले. तिथे तीन केंद्र स्थापित केले आहेत. आणि त्यामुळे हजारो लोकांनी प्राणायम, योगासने आणि सुदर्शन क्रिया शिकून मुक्ततेचा आणि मनशांतीचा अनुभव केला आहे. मी तिथे तिथल्या धर्माच्या लोकांची बातचीत केली आणि त्यांनी पण माझे चांगले स्वागत केले. मला आपण कुठे बाहेरच्या देशात आहे असे वाटलेच नाही. तिथले लोक म्हणत होती कि गुरुजी तुम्ही आमचेच आहात आणि आम्ही तुमचेच.
या भावना आपल्या अंगात जन्मजात असतात. ह्याचा अर्थ असा नाही कि आपल्या मध्ये देशभक्ती नाही. देशभक्ती हि आपल्या मध्ये असलीच पाहिजे. त्यासाठीच म्हणतात कि देशभक्ती आणि अध्यात्म बरोबर जातात.
जर तुम्हाला देशभक्ती व्यक्त करायची असेल तर स्वत:ला सेवेत झोकून द्या. आज इथे लाखो जण एकत्रित झाले आहात. जर आपण दोन तास लखनऊ स्वच्छते साठी दिलेत तर येणाऱ्या दिवसात लखनऊ एकदम झगझगलेली दिसेल. हे फक्त म्युन्सिपाल्टीचे एकट्याचे काम नाही. आपण सगळ्यांनी मिळून हि मोहीम हाती घेतली पाहिजे. कराल का तुम्ही?
पुढच्या रविवारी सकाळी ८ ते १० पर्यंत सर्वजण आपापल्या क्षेत्रात येवून स्वच्छता करा. तुम्ही करू शकाल का?
आपली घरे, रस्ते स्वच्छ ठेवा. आतील आणि बाहेरील स्वच्छता हे आपले काम आणि जबाबदारी आहे. अस्वच्छता च्या विरुद्ध आपण उभे राहिले पाहिजे.
त्याच प्रमाणे आपण आपल्या उणीवा जाणल्या पाहिजेत. सर्व बेरोजगार युवक आपल्या देशात उद्योजक होवू शकतात. ते खूप काही करू शकतात. आपल्या देशातील बराचसा उद्योग हा चीन मध्ये स्थलांतरित होतोय, का? आपण आपला उद्योजकपणा कुठेतरी हरवून बसलो आहे. सरकार आपल्याला नोकरी देईल असा आपण विचार करतो, पण सरकार तरी कितीजणांना नोकरी देणार? तुम्ही तुमच्या पायावर उभे रहा. मला माहित आहे यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल. आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या व्यक्ती विकास केंद्र हि संस्था प्रशिक्षण देवू शकेल. युवकांना प्रशिक्षण दिले जाईल.

आपल्या देशात आपण जे पतंग उडवितो, गणपतीची मूर्ती ह्या सर्व गोष्टी चीन मधून आणल्या जातात. आपण हे इथे बनवू शकतो.
या देशात प्रत्येक शहराची काही खासियत आहे. उदारणार्थ लखनऊ चे कुर्ते हे फार पूर्वी पासून प्रसिद्ध आहेत. बनारसी साड्या, काश्मिरी शाल, हिमाचलचे सफरचंद हे सर्व परिचित आहेत. अशा राज्यातील शहरांच्या खासियातेला आपण बढावा दिला पाहिजे.
चीन मध्ये एका गावामध्ये एकच वस्तू बनविली जाते. एका गावात सुई निर्माण केली जाते तर एका गावात फक्त बटन बनविले जातात. हा कल देशाच्या आर्थिक व्यवस्थेला चांगली चालना देवू शकतो. आपण हे करू शकतो.
पुढे, पर्यटन व्यवसाय खूप चांगला आहे. आपल्या भारतातील खूप प्रसिद्ध ऋषी मुनी ह्या उत्तर प्रदेश मध्ये जन्मले आहेत. त्यांनी हि जागा का निवडली देवाला माहीत. श्री राम, श्री कृष्ण, संत कबीर दास इथेच जन्मले. भगवान बुद्ध खूप वर्षे इथे राहिले आहेत. पण आता हि तीर्थ क्षेत्र प्रदुषित आणि घाण झाली आहेत. हे सर्व सुशोभित करायला आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतील. जर आपण हे केले तर हे आंतरराष्टीय पर्यटन स्थळ होईल.
आपण अन्यायाविरुद्ध उभे रहायचे आहे. मी या आधी पण म्हटले होते कि आपण भ्रष्टाचारच्या विरोधात उभे रहायचे आहे. आपण सर्वजण हात उंचावून शपथ घेवूया कि आपण कधीही लाच घेणार नाही आणि कधीही लाच देणार नाही. इथे बसलेल्यांपैकी बरेचजण नाखुशीने लाच स्वीकारत असतील. मी तुम्हाला आवाहन करतो कि तुम्ही एका वर्षीसाठी लाच घेवू नका. त्यानंतर काय होईल ते आपण नंतर पाहूया. पुढच्या वर्षी मी परत येवूल शपथ घ्यायला सांगेन. पण आज तुम्ही सर्वजण शपथ घ्या कि तुम्ही लाच घेणार नाही. लाच न घेता तुम्ही तुमचे काम कराल. तुम्हाला लाच घ्यायची नसेल पण समोरचा व्यक्ती टेबलाखालून देत असेल तर काय करायचे? मी सांगेन कि इथे जर YES+ केलेले युवक असतील तर त्यांनी ‘मी लाच घेत नाही’ असे बोर्ड लावावेत. जेव्हा हे सर्वजण वाचतील त्यानंतर लाच द्यायची कुणाची हि हिंमत होणार नाही. हे काम आपणच केले पाहिजे.

आपण जातीय भेदभाव चा त्याग केला पाहिजे. यामुळे आपल्या देशाची खूप पीछेहट झाली आहे. आपले सर्व संत ऋषी मुनी वेगवेगळ्या धर्म पंथाचे होते. म्हणूनच मी सांगतो कि आपण पण जातीय भेदभाव थांबविला पाहिजे. फक्त एकच धर्म आपण जाणतो आणि तो म्हणजे ‘मानवता’.
आपण अज्ञानाच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे. आपल्या मध्ये अंधश्रद्धा, अज्ञान अजिबात नकोय. आपण ह्यच्या विरुद्ध उभे राहिले पाहिजे.
आता आपण काही वेळ ध्यान करुया. जेव्हा खूप लोक मिळून ध्यान करतात त्याला यज्ञ म्हणतात आणि याचे तुम्हाला लगेच फळ मिळेल. तुमची कोणतीही एक इच्छा पूर्ण होईल.




The Art of living
© The Art of Living Foundation