जेंव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तेंव्हा आयुष्य जगण्यायोग्य होते

इस्लामाबाद, पाकिस्तान
१३ मार्च २०१२

इथे तुमच्या बरोबर येऊन खूप छान वाटतय.
पहिल्यांदा ज्या शिक्षक आणि स्वयंसेवकांनी याचे आयोजन केले त्या सगळ्यांचे अभिनंदन. ज्या लोकांनी या साठी परिश्रम घेतले त्यांचे कौतुक आणि अनेक शुभेच्छा. काही वर्षापूर्वी सिंध प्रांतात आलेल्या पुरात YLTP  च्या तरुणांनी पुरग्रस्तांना मदत केली. ते काम चालू असताना मी त्यातील काहींशी फोनवर बोललो, पण आता मला त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन करायचे आहे. १ लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी पीडितांना आधार दिला, शिबिरे घेतली, जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, आणि घरे बांधली. संपूर्ण जगातून आर्ट ऑफ लिविंग च्या परिवाराने मदतीचा हात पुढे केला, सगळ्या जगातून त्यांना सहकार्य मिळाले. यातून आपण इथे दाखवून दिले की आपण एकटे नाही तर संपूर्ण जग आपले कुटुंब आहे. याचे एक वास्तव उदाहरण घालून दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी आर्ट ऑफ लिविंग शिक्षक बनावे आणि प्रत्येक अश्रूचे हास्यात रुपांतर करावे.

आज ज्या वेगाने नैराश्य, कँन्सर, हृदय विकार वाढतायत, रक्तदाब, शारीरिक रोग, सामाजिक विवाद, दहशतवाद  ही सगळी आपण अध्यात्मीक क्षेत्रात कमी पडल्याची लक्षणे आहेत. कुठेतरी ती आपुलकीची भावना कमी आहे. म्हणूनच आर्ट ऑफ लिविंग समाजात ती आपुलकीची भावना निर्माण करणे, निरोगी शरीर, मानसिक आनंद, हृदयात सगळ्याबद्दल अपार प्रेम जागृत करण्यासाठी कटीबद्ध आहे.
मी नेहेमी म्हणतो हिंसाचार-मुक्त समाज, रोगमुक्त शरीर, तणावमुक्त मन, दडपणमुक्त बुद्धी, आघातमुक्त स्मुती आणि दुखः मुक्त चित्त हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
आपली बुद्धी दडपणाखाली असते. बरेचदा लोकांकडे खूप कल्पना असतात, पण ते दडपतात. आपल्याला दडपणापासून मुक्त व्हायचे आहे. आपल्याला असा अहंकार जपायचा आहे जो सगळ्यांना सामावून घेईल, फक्त “मी” नव्हे तर “आपण, या जगातील लोक”. हिंसाचारमुक्त समाज आणि रोगमुक्त शरीर ही कल्पना समोर ठेवून आर्ट ऑफ लिविंग ने जे काम केले आहे त्यामुळे एकीकडे खूप आनंद आहे पण त्याच बरोबर लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचायची आणि त्यांना शांतता आणि आनंद देण्याची एक मोठी जबाबदारी पण आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे काम कराल. जेंव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तेंव्हा आयुष्य जगण्यायोग्य होते. वस्तू किंवा पदार्थ देऊन केलेली मदत हा एक प्रकार, पण तो फार काळ टिकत नाही. दुसऱ्यांना आपले मन, भावना आणि त्यांचे अंतरंग अधिक चांगले कसे होईल यासाठी ज्ञान देणे ही मोठी मदत होईल. हे म्हणजे कोणाला तरी मासेमारी शिकवण्यापेक्षा मासे देण्यासारखे आहे. या अर्थाचे एक सुभाषित आहे.
आर्ट ऑफ लिविंग हेच करत आहे – लोकांना त्यांचे मन, भावना, त्यांच्या कल्पना, त्यांच्या मर्यादा, त्या मर्यादान्मधून बाहेर पडणे यांचे व्यवस्थापन शिकवते. लोकांचा, परिस्थितीचा जसे आहेत तसा स्वीकार करा, आणि त्यांना चांगल्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करा.
संपूर्ण दक्षिण आशिया, अमेरिका आणि अगदी युरोप मधे सुद्धा आज भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठ्ठा प्रश्न आहे. भारतात आर्ट ऑफ लिविंग च्या स्वयंसेवकांनी छान काम केले आहे. त्यांनी ३ स्तरावर काम केले आहे.
त्यांनी मोठ मोठे सत्संग आयोजित केले, त्यात मी लोकांना शपथ घ्यायला लावली की ते लाच देणार नाहीत किंवा स्वीकारणार नाहीत.
दुसरी गोष्ट त्यांनी केली ती “मी लाच घेणार नाही” अशी स्टीकर अधिकाऱ्यांच्या टेबलावर लावली. कोणीही असे म्हणू शकणार नाही की “मी हे स्टीकर लावणार नाही”, आणि जर स्टीकर असेल तर त्यांना कोणी लाच देणार नाही. तर असे काही आपण करू शकतो, नाहीतर मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला, सगळ्यांसाठी लाच द्यावी लागते. विजेची जोडणी करण्यासाठी मोठी लाच द्यावी लागते.
तिसरी गोष्ट आम्ही खासदारांना सांगत आहोत की त्यांनी भ्रष्ट्राचार निर्मुलनासाठी एक कडक कायदा करावा आणि दोषींवर कारवाई करावी.
इथे पाकिस्तानात सुद्धा अशीच भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लाट तयार होत आहे, कारण त्याची गरज आहे. याच प्रकारच्या गोष्टी रशिया, आणि आफ्रिकेत केल्या. सभ्य समाजाने बंड करून भ्रष्टाचाराचा बिमोड केला पाहिजे. फक्त कायदा आणि नियम यांनी हा प्रश्न सुटणार नाही, जेंव्हा लोकांमधे अध्यात्मीक बदल होईल, आपुलकीची भावना निर्माण होईल तेंव्हाच हा प्रश्न सुटेल. जेंव्हा आपुलकीची भावना संपते तेंव्हा भ्रष्ट्राचार सुरु होतो, या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे.
परस्पर विश्वास आणि सुसंवाद विविधतेला एकत्र राहू देतात. हे शिक्षण आपण लोकांना दिले पाहिजे. इस्लाम चे वेगवेगळे गट आहेत, सुन्नी, शिया याच प्रमाणे काही ख्रिश्चन असतील, काही हिंदू, काही शिख. परस्पर विश्वास, विवेक आणि सुसंवाद यांचा हा पुष्पगुच्छ आहे – आर्ट ऑफ लिविंग चा हाच उदेश्य आहे आणि आपण याला प्रोत्चाहन दिले पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हसत राहा, काहीही झाले तरी हास्य लोपू देऊ नका !!

प्रश्न: गुरुजी, तुमची या वेळची भेट आणि मागच्या वेळची भेट यात काय फरक आहे?
श्री श्री: मागच्या वेळी माझ्या भोवती सुरक्षा सैनिकांचे कडे होते आणि मी फक्त होटेल मधे बांधला गेलो होतो. पण या वेळी मी लोकांबरोबर आहे, मी काल FCC  कॉलेजच्या ९०० तरुणांना भेटलो, आणि त्यांच्या बरोबर संवाद साधला. त्यांना माझ्या बद्दल आणि मला त्यांच्या बद्दल खूप प्रेम वाटले. छान कार्यक्रम झाला. मला वाटते पूर्वी पेक्षा आता जास्त शांतता आहे.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही FCC कॉलेज मधून गेल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये खूप सकारात्मक प्रतिक्रिया होती. ते खूप खुश होते आणि ज्ञान मिळून प्रबोधन झाल्यासारखे वाटत होते. आंम्ही आपले त्या बद्दल आभारी आहोत.
श्री श्री:  मला इथल्या आणि भारतातल्या विद्यार्थ्याच्या उत्साहात काहीही फरक वाटला नाही, तो सारखाच होता.  इतका उत्साह आणि जाणून घेण्याची वृत्ती, आणि शिकायची इच्छा बघून कुतूहल वाटले.

प्रश्न: गुरुजी, खूप लोक आहेत कि त्यांनी कोर्स केला आणि काही कारणाने ते बाहेर पडले. असा काही मार्ग आहे की जेणेकरून ते या मार्गावर राहतील ?

श्री श्री: मला वाटते कि जर इथे केंद्र (आर्ट ऑफ लिविंग चे ) असेल तर लोक येत राहतील. जर काही पुस्तके किंवा ज्ञानाच्या टेप असतील आणि जर सेवेचे काही उपक्रम असतील तर लोक येणे सुरु होईल.

प्रश्न: गुरुजी, आपण जरी जगाच्या वेगळ्या भागातून आलो असलो तरी आपली मुलभूत तत्वे एकच आहेत. आपल्या सर्वाना शांतता, सुख-समाधान हवे आहे. पण मला वाटते की आपण फक्त वरवर बघतो, मूळ मुद्दांकडे लक्ष देत नाही.
श्री श्री: पहिल्यांदा आपल्याला मूळ मुद्धे कोणते ते शोधावे लागतील. जगाच्या वेगवेगळया भागात ते वेगळे असतात. कुठे गरिबी, कुठे चुकीचे सिद्धांत, कुठे लोकांना चांगल्या संधी उपलब्ध नसणे, कुठे थोड्या लोकांचा स्वार्थ ज्यामुळे ते संपूर्ण जनतेला वेठीस धरतात. पण या सगळ्यात एक गोष्ट सारखी आहे आणि ते म्हणजे मानवी मूल्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष. जर लोकांमध्ये मानावियता असेल तर कोणीही हिंसा करणार नाही, कोणीही भ्रष्टाचार करणार नाही, कोणीहि सामान्य लोकांची निर्दयी हत्या करणार नाही. त्यामुळे समाजात मूळ मानवी मूल्यांचे रोपण करावे लागेल. मला माहित आहे की हे अवघड काम आहे, पण अशक्य नाही. कमीतकमी मला तरी ते अशक्य वाटत नाही.
आपण आपल्याकडून हा सेतू बांधायचा प्रयत्न करायचा, बाकी सगळे देवावर सोडावे.

प्रश्न: गुरुजी, आर्ट ऑफ लिविंग मधे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त का आहेत?
श्री श्री: मला वाटते ते सारख्या संख्येने आहेत, आज मला ते सारखे वाटतात. आर्ट ऑफ लिविंग चा स्त्री शक्ती वर विश्वास आहे. त्या काही गोष्टी चांगल्या करू शकतात, पुरुषांनी तसे म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते !!

प्रश्न: आमचा देश आज एका कठीण परिस्थितीतून जात आहे. आर्ट ऑफ लिविंग चे लोक म्हणून हे ज्वलंत प्रश्न आम्ही कसे सोडवावेत, विशेष करून आमच्या शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध. आम्हाला आमच्या शेजारी राष्ट्र, भारत, अफगाणिस्तान आणि अगदी इराण बरोबरचे संबंध दृढ करायचे आहेत. आर्ट ऑफ लिविंग ने हे जे चैतन्य तयार केले आहे त्याची काही मदत होऊ शकेल का?
श्री श्री: राज्यकर्ते शांत आणि सुजाण हवेत. जर निर्णय घेणारे लोक तणावाखाली असतील, त्यांच्या मनात राग असेल तर त्यांच्या निर्णयातही तेच दिसेल.
त्यामुळे राज्यकर्त्यांनी विशेष करून जेंव्हा अनेक लोकांच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय त्यांना करायचे असतील तेंव्हा ध्यान करावे, शांत राहावे. त्यांनी शांत आणि प्रसन्न चित्ताने विचार करावा. सल्लागार फक्त तर्कानुसार सल्ला देतात आणि निर्णय घेणारे त्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात. त्यामुळे सल्लागारांनी आणि निर्णय घेणाऱ्यांनी अंतरमुखी व्हावे. असे केल्याने निर्णय योग्य आणि मानवी मुल्यांना धरून होतील.
दुसरी गोष्ट बरेचदा त्रास हा बोलघेवड्यानमुळे होतो ते एक भीती निर्माण करतात ‘ओह इथे धोका आहे, तिथे धोका आहे’ काही लोकांना असे करण्यात मोठेपणा वाटतो. त्यांनी हे थांबवले पाहिजे, त्यांनी लोकांना उमेद दिली पाहिजे. भविष्य अंधारी असल्याचे चित्र रंगवण्या पेक्षा, त्यांना भविष्याबद्दल उमेद द्या, त्यानेही तणाव बराच दूर होईल. आर्ट ऑफ लिविंग ने लोकांना शिक्षित करून जिथे तंटा असेल तिथे तो सोडवण्यात मदत करावी. मी या आधी म्हणल्याप्रमाणे, मी तालिबानशी बोलायला तयार आहे, त्यांच्याशी बोलून, त्यांना समजून घेऊन त्यांना माझे म्हणणे सांगायला मी तयार आहे. आपण नक्कीच बदल घडवू शकतो, आणि आपण पुनःपुन्हा प्रयत्न करायला हवेत. आपल्याला १०० वेळा जरी प्रयत्न करावे लागले तरी आपण सोडू नये.  
प्रश्न: गुरुजी, काही काळ तुम्ही TM (Transcendental Meditation) शी निगडीत होतात. त्यानंतर ८० मधे आर्ट ऑफ लिविंग सुरु झाले. तुम्हाला आर्ट ऑफ लिविंग ची सुरुवात का करावीशी वाटली?
श्री श्री: होय, TM (Transcendental Meditation) सुद्धा ध्यान शिकवतात आणि जागतिक शांततेबद्दल बोलतात. मी किशोरवयीन होतो तेंव्हा तिथे व्याखान देत असे. मी जेंव्हा २४ वर्षाचा होतो तेंव्हा आर्ट ऑफ लिविंग सुरु केले. आर्ट ऑफ लिविंग अधिक सार्वत्रिक आहे, त्याचा पाया श्वास आहे, काही बाबतीत ते TM पेक्षा वेगळे आहे.  अर्थात आर्ट ऑफ लिविंग मधे सहज समाधी आहे जे TM सारखे आहे. आर्ट ऑफ लिविंग मधे आपण सामाजिक कार्यात कार्यरत आहोत जे TM मधे नाही, त्यानंतर संगीत/भजन सांस्कृतिक कार्यक्रम हे वेगळे आहे. TM चा कल शास्त्रीय संशोधनाकडे जास्त आहे. आर्ट ऑफ लिविंग आणि TM च्या तंत्रात काहीही विरोधाभास नाही, कारण आर्ट ऑफ लिविंग पाण्यासारखे आहे ज्या भांड्यात घालाल त्याचा आकार घेईल. त्यामुळे ध्यानाचा कुठलाही मार्ग सहज स्वीकारता येतो.
प्रश्न: आर्ट ऑफ लिविंग च्या उद्देश्याचा प्रसार करण्यात माध्यमे काय भूमिका करू शकतात.  
श्री श्री: होय, माध्यमे खूप काही करू शकतात.
आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स लोकांना नैराश्यातून बाहेर काढू शकतात, घरातील संघर्ष मिटवू शकतात, लोकांना एकत्र आणू शकतात, ही गोष्ट माध्यमे अधोरेखित करू शकतात. यात आरोग्यासाठी फायदे आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फायदे आहेत, यामुळे भावनिक स्थर्य मिळते आणि इसम किंवा समूहा मधील संघर्ष मिटू शकतो. माध्यमे या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणू शकतात.

प्रश्न: आपण आर्ट ऑफ लिविंगच्या फायाद्यान्संदर्भात भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांपर्यंत कसे पोहोचू शकतो ?
श्री श्री: भारतीय माध्यमे याची नेहेमी दखल घेतात. आर्ट ऑफ लिविंग इतके सक्रीय आहे कि भारतीय माध्यमे नेहेमी काही न काही याबाबतीत दाखवत असतात.
उत्तर पूर्वेकडच्या राज्याकडचे अनेक आणि माओवादी ज्यांनी कोर्स केला त्यांनी हत्यारे टाकून दिली आणि हिंसा सोडून ते मुख्य प्रवाहात सामील झाले. या सगळ्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. मला वाटते इथे पाकिस्तानात सुद्धा माध्यमे लोकांपर्यंत बातम्या पोहोचवत असतात. माध्यमे इथे काही मोठे बदल घडवू शकतात. ते एक महत्वाची भूमिका पार पडू शकतात, उदाहरणार्थ तालिबान आणि काही कट्टरपंथी लोकांशी शांतता चर्चा सुरु करण्यात माध्यमे महत्वाची भूमिका पार पडू शकतात. दुसरे, भ्रष्टाचार निर्मुलन करून लोकांना सशक्त बनवणे. तिसरे, दोन्ही बाजूच्या चांगल्या बातम्या समोर आणणे.
जेंव्हा लोकांना कळले कि मी इकडे येतो आहे, तेंव्हा खूप लोक आले आणि सल्ले दिले ‘तुम्ही आता तिकडे जाऊ नका, खूप धोका आहे. निदान स्वतःच्या अंगरक्षकांना घेऊन जा. तिथे कोणीही सुरक्षित नाही आणि रोज कोणीतरी मारले जाते. लोक माध्यमातून इथे फक्त उग्रवाद आहे, सहिष्णुता अजिबात नाही, रोज विस्फोट होतात असेच ऐकतात. मी म्हंटले ‘असे काही नाही, मी ठरवले आहे कि मी जाणार’. अगदी काल रात्री काही उच्च अधिकारी, आणि काही सरकारी लोक माझ्या कडे आले आणि म्हणाले ‘गुरुजी, कृपया तुम्ही जाऊ नका’ मी म्हणले ‘माझ्या सुरक्षेची काळजी करू नका, माझी सुरक्षा वेगळी आहे. मला कोणी काही करणार नाही, मी जाणार’

इथे लोक एकमेकांचा आदर करतात, विविधता इथेही आहे या गोष्टी लोकांना सांगण्याची भूमिका माध्यमे पार पाडू शकतात. या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवून ते इथल्या पर्यटनाला चालना देऊ शकतात. इथे खूप ठिकाणे बघण्यासारखी आहेत, जसे तक्षशिला. इथे जर पर्यटनाला चालना मिळाली तर खूप महसूल जमा होऊ शकेल. ग्रीस हा एक अतिशय छोटा देश आहे पण तिथे दरवर्षी १२ लाख पर्यटक येतात, याला पर्यटन म्हणतात. 
भारतात ४ लाख पर्यटक येतात, आणि इथे पाकिस्तानात मला वाटते, काही हजार. पर्यटन इथे नगण्य आहे. पाकिस्तान पर्यटन उद्योगाला चालना देऊ शकते, देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. अलीकडच्या काळात श्रीलंकेने हेच केले आणि त्यांची अर्थव्यवस्था बरीच सुधारली. तुम्हाला माहित आहे त्यांनी काय केले? रामायणाशी निगडीत सगळी स्थाने त्यांनी पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली. १० वर्ष्यापुर्वीपर्यंत कोणालाही अशी ठिकाणे आहेत हे माहितीही नव्हते. आता श्रीलंकेत पर्यटनाचा ओघ वाढतो आहे. त्यांनी तिथे खूप चांगली व्यवस्था ठेवली आहे. थाईलंड सुद्धा छोटा देश आहे पण पर्यटन खूप विकसित आहे. बाली हे छोटे बेट आहे पण पर्यटनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माध्यमे पर्यटनाला प्रोत्साहन देऊ शकतात. चीन, जपान आणि कोरियातील अनेक बुध्द लोक इथे येतील. भारतातील हिंदू इथे गांधार, तक्षशिला पाहायला येतील. अर्थव्यवस्थेत एक विधायक प्रगती होईल.
भारतात चाणक्य चित्रपटानंतर प्रत्येकाला गांधार बद्दल उत्सुकता होती. तुम्ही चाणक्याबद्दल ऐकले आहे का? चाणक्य हा तक्षशिलेतील अतिशय हुशार आणि विद्वान मंत्री होता. चंद्रगुप्त मौर्यचे राज्यात त्याची फार मोठी जबाबदारी होती. चाणक्याने इथल्या एका गरीब मुलाला (चंद्रगुप्त मौर्य) या संपूर्ण खंडाचा राजा बनवले. त्याने ‘अर्थशात्र’ नावाचे पुस्तक लिहिले आणि आजही भारतात व्यवस्थापन शिकवणाऱ्या महाविद्यालयातून ते शिकवले जाते. अर्थशास्त्र वरील ते उत्तम पुस्तक आहे. हे सगळे इथले (पाकिस्तानातील) आहे. आयुर्वेद आणि योग यांचा उगम सुद्धा पाकिस्तानातील आहे. पहिला योग पाकिस्तानात शिकवला गेला. पाकिस्ताने हा सांस्कृतिक वारसा घेऊन त्याभोवती भव्य पर्यटन उद्योग उभा केल्यास समृद्धी येईल.

प्रश्न: तुम्हाला इथे पाकिस्तानात येऊन कसे वाटते आहे?
श्री श्री: या वेळी इथे खूप वेगळे आहे. मी इथल्या तरुणांशी बोललो आणि त्यांचा उत्साह आणि आपुलकीची भावना अगदी भारतातील तरुणान सारखीच आहे. इथे असलेले तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात आणि कुठेही संकुचित भावना नाही. मला वाटते जे समोर दाखवले जाते ते चुकीचे आहे. माध्यमे जिथे तंटे आणि त्रास आहे तेच ते दाखवतात. आपल्याला देशाची नवीन प्रतिमा बनवली पाहिजे, हा देश सुद्धा सहनशील आहे, आम्हीही विविधतेचा आदर करतो, सगळीकडच्या लोकांना सामावून घेतो, हा संदेश जगात पोहोचला पाहिजे. त्याने पाकिस्तानच्या पर्यटनाला चालना मिळून, अर्थव्यवस्था सुधारेल. मला इथे खूप चांगले वाटत आहे, लोक खूप छान आणि चांगले आहेत. माझी इथली भेट हाच संदेश भारतात घेऊन जाईल आणि चांगली लाट तयार होईल.
गुरुजींचे इथे चांगले स्वागत झाले, लोक खूप आनंदी आहेत, गुरुजी खुश आहेत हा संदेश माध्यमांनी पोहोचवालाच आहे. हा संदेश दोन्ही देशांना जवळ आणेल.
जसे मी मगाशी म्हणालो २१ व्या शतकाचे औषध हे आयुर्वेद असेल, आणि त्याचा उगम पाकिस्तानात झाला आहे. आयुर्वेद म्हणजे सगळ्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म असलेले शास्त्र हे तक्षशिलेत लिहिले गेले. इथल्या विद्यापीठात जगभरातून १०,०००  विद्यार्थी येऊन शिकत असत. आयुर्वेदाचा उगम जिथे झाला तिथे दुर्दैवाने ते फारसे वापरले जात नाही. भारतात आणि जगभरात आयुर्वेदाच्या फायद्यांबद्दल चर्चा होते आहे, आणि पाकिस्ताननेही यावर लक्ष्य केंद्रित करावे.

( श्री श्री आयुर्वेद ने बनवलेल्या शक्ती तेलाचे प्रात्यक्षिक श्री श्री रवी शंकर आणि दाखवले)
विषाचा एक थेंब तुमचे पूर्ण शरीर उद्वस्त करून शकतो हे तुम्हाला माहित आहे. जर विषाचा एक थेंब ७० किलोचे शरीर उधवस्त करू शकतो तर औषधाचा एक थेंब त्याला बळकट सुद्धा बनवू शकतो. तर हे (शक्ती थेंब) ३ औषधी वनस्पतींपासून बनवलेले मिश्रण तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जेणे करून तुमचे शरीर बळकट होते. सकाळी तुम्ही जर ३-४ थेंब पाण्यात टाकून घेतले तर तुम्हाला खूप उत्साही वाटेल. परीक्षेच्या काळात जर थोडे त्वचेवर चोळले तर तास २ तास थकवा न येता तुम्ही जागे राहू शकाल.
याच प्रमाणे बोन्विता सारखे ओजास्विता नावाचे उत्पादन आहे. ते ७ औषधी वनस्पतींपासून बनवले आहे, जे आपल्या मेंदू आणि चेता संस्थेला गुणकारी आहे. ते एक कप घेतले तर तुम्हाला छान उत्साही वाटेल.  
तुमच्या पैकी किती डॉक्टर आहेत? तुम्ही आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन आयुर्वेद इस्पितळाबद्दल माहिती घेऊ शकता. आपल्या इस्पितळात रक्ताचा एकही थेंब न सांडता, भूल न देता, काही वेदना न होता दात काढायची प्रक्रिया आहे. त्याच प्रमाणे नाडी परीक्षा, डॉक्टर फक्त नाडी तपासून तुमच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास काही सेकंदात सांगतात. तुम्हाला कुठल्याही क्ष किरण चाचणीतून जायची गरज नाही. या आयुर्वेदाच्या काही खासियत आहेत आणि मी हेच सांगतो आहे कि योग आणि आयुर्वेद यांचा उगम इथे पाकिस्तानात झाला आहे. इथे दुर्दैवाने ते कोणाला माहित नाही. वैद्यकीय क्षेत्रातील बऱ्याच शाखा लोकांना माहित नाहीत, आयुर्वेद लोकांना खूप लाभदायक ठरू शकतो.



प्रश्न: गुरुजी, जर आम्ही अॅलोपॅथीक औषधे घेत असू आणि त्याबरोबर जर आयुर्वेदिक सुरु केली तर काही अनिष्ट परिणाम होतील का?
श्री श्री: नाही ! आयुर्वेदीक औषधांचे वैषीठय हेच आहे कि त्याने कुठलेही अनिष्ट परिणाम होत नाहीत आणि त्याचे इतर कुठल्याही औषधाबरोबर वाकडे नाही.

प्रश्न: आयुर्वेदाचे अनिष्ट परिणाम नाहीत हे कसे मानावे ?
श्री श्री: काळानेच ते सिद्ध केले आहे. वनऔषधांची हीच सुंदरता आहे, यातील कशाचाही अनिष्ट परिणाम होत नाही. जगातील सगळ्या वनऔषधांच्या संकेतस्थळावर नजर टाकल्यास त्यांचे अनिष्ट परिणाम नाहीत हेच दिसून येईल. पण जर तुम्ही ते अतिरिक्त प्रमाणात घेतले तर तुमच्या साठी ते चांगले नसेल. उदाहरणार्थ त्रिफळा चांगला असला आणि त्याचे काही वाईट परिणाम नसले तरी ते तुम्ही खूप प्रमाणात घेतले तर तुम्हाला अतिसार होऊ शकतो, पण त्याला तुम्ही अनिष्ट परिणाम म्हणू शकत नाही.

प्रश्न: गुरुजी, वासना, दुखःकडे नेते का?
श्री श्री: वासना दुखःकडे नेतेच असे नाही. काही वासना पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते पण तेव्हढी ताकत नसते आणि ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही त्याने दुखः होते.

प्रश्न: यश म्हणजे काय ?
श्री श्री: यश हे वेगवेगळया लोकांसाठी वेगवेगळे असू शकते. माझ्या साठी यश म्हणजे तुमच्या चेहेर्‍यावरचे हास्य. जर तुमचे हे हास्य कोणीही हिरावून घेणार नसेल तर मी तुम्हाला यशस्वी म्हणेन. यशाचे अजून एक मापदंड म्हणजे कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास.

प्रश्न: प्रेम म्हणजे काय?
श्री श्री: लहान मुलाच्या निष्पाप डोळ्यात बघा, त्यालाच प्रेम म्हणतात ! तुम्ही घरी आल्यावर तुमचा पाळीव कुत्रा कसा शेपटी हलवत तुमच्या भोवती खेळतो, तुमच्या अंगावर उङया मारतो, त्यालाच प्रेम म्हणतात ! जेंव्हा तुम्ही कोणाच्या प्रेमात पडता, आणि त्याची आठवण काढत असता, तेंव्हा स्वतःचा चेहेरा आरशात बघा, तुम्हाला तेच प्रेम तुमच्या डोळ्यात दिसेल. प्रेमामुळे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो.
ज्या प्रमाणे आपले शरीर अमिनो अॅसीड, पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट), प्रथिने आणि जीवनसत्वे यांनी बनले आहे त्याच प्रमाणे आपली चेतना प्रेम आणि सुंदरता यांनी बनली आहे.

प्रश्न: अहंकार म्हणजे काय?
श्री श्री: जो प्रेमाला नष्ट करतो तो अहंकार. जसे तुम्ही आत्ता आहात तसे सरळ आणि नैसर्गिक राहिल्याने अहंकारावर मात करता येते.

प्रश्न: जेंव्हा मी विचार करतो कि “मी कोण आहे?” किंवा “मी इथे का आलो आहे?” तेंव्हा मला खूप अस्वस्थ वाटते?
श्री श्री: खूप छान !! ही आस (उत्कंठा) खूप आवश्यक आहे. हि उत्कंठा तुमचा उद्धार करेल. मी कोण आहे? हे सगळे काय आहे? मी इथे का आलो आहे? हे सगळे खूप सुंदर प्रश्न आहेत, त्यांना जोपासा. इतर कोणालाही ते विचारू नका, तर स्वतःलाच विचारत राहा. 
जेंव्हा तुम्ही हे प्रश्न विचारता आणि आतून शांत असता, तेंव्हा तुम्हाला कळेल कि तुम्ही प्रकाश आहात, जो सगळीकडे आणि सगळ्यांचात आहे. तुम्ही कोणत्याही सीमेच्या पलीकडचे आहात याची तुम्हाला अनुभूती होईल.
आपल्याला असे वाटते की मन शरीरात आहे. नाही!! तर शरीर मनात आहे. तुमचे मन हे शरीराच्या १ फूट सभोवती आहे. जसे मेणबत्तीवर वात असते आणि त्यावर ज्योत तसेच आपले शरीर हे वातीप्रमाणे आहे आणि मन ही ज्योत आहे. आपल्या शरीराभोवती एक जीवउर्जा आहे. त्यामुळे केवळ स्पर्शाने काही गोष्टी होतात, जसे टच स्क्रीन. २० वर्षा पूर्वी लोकांना सांगितले असते कि फक्त स्पर्शाने iPad  काम करेल तर कोणीही विश्वास ठेवला नसता. फोनला  नुसता स्पर्श करून तो काम कळेल किंवा स्क्रीन उघडेल असे कोणी सांगितले असते तर कोणीही विश्वास ठेवला नसता. ते म्हणाले असते ‘उगाच काहीतरी वेड्यासारखे सांगू नका’ आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे फक्त स्पर्श केला की स्क्रीन उघडते. याचाच अर्थ आपल्या सगळ्यांकडे एक विशीष्ट उर्जा, स्पंदने आहेत. तुम्ही जीव्संख्याशास्त्रने बनवलेल्या कुलपाबद्दल ऐकले आहे का? त्यात तुमची उर्जा साठवलेली असते, आणि फक्त तुमच्या हातानेच ते उघडू शकते, दुसऱ्या कोणाच्याही हाताने नाही. प्रत्येक जण हा एक उर्जास्त्रोत आहे हा प्राचीन विचार आता तंत्रज्ञानाने सिद्ध होत आहे. आपण सगळे उर्जास्त्रोत आहोत आणि आपल्यात प्रचंड क्षमता आहे.

प्रश्न: योगी लग्न का करत नाहीत?
श्री श्री: त्यांनी लग्न करू नये असा काही नियम नाही, पण एकदा योगी झाले कि ते लहान मुलांप्रमाणे होतात आणि बालविवाह कायदेशीर नाही!!

प्रश्न: तणाव म्हणजे काय?
श्री श्री: मला माहित नाही. ज्यांना तातडीने विमान पकडायचे आहे आणि ते रहदारीत अडकले आहेत, त्यांना विचारा तणाव म्हणजे काय? 
The Art of living

© The Art of Living Foundation