प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही जीवनात आवश्यक आहेत !

१० मार्च २०१२
माणूस म्हणून आपल्या काही गरजा आणि काही कर्तव्य आहेत. जर आपण आपल्या गरजा आणि कर्तव्यांची यादी केली आणि जर गरजा जास्त असतील तर आपण दु:खी असतो आणि कर्तव्य जास्त असतील तर आपण आनंदी असू. हे रहस्य आहे आणि किती सोपं आहे. आजच बसून सगळ्या जबादार्यांची आणि गरजांची यादी करा.
देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे आणि तिचा आपण उपयोग पण करतो. एक हुशार व्यक्ती जाणून घेईल कि जेव्हा इतर आनंदी असतात तेव्हा तो स्व:त आनंदी असेल. ‘माझं कुटुंब सुखी तेव्हा मी सुखी’. मग काय करायला हवं? आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्या. कुटुंबाप्रती, समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्या. आपण समाजासाठी आणि देशासाठी काय करू शकतो हे समजायला हवं. तीन स्तरांवर हे करायला हवं, कुटुंब, समाज आणि देश. जितक्या जास्त आपण जबाबदाऱ्या घेतो तितके आपण वाढत जातो आणि आपली कार्य शक्ती वाढत जाते.
इच्छा असणे हे साहजिक आहे. जेव्हा आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे. आयुष्यात प्रार्थना आणि प्रयत्न हे दोन्ही गरजेचे आहेत. फक्त प्रार्थना आणि प्रयत्न नाही केले असं नाही चालणार. आणि काही प्रयत्न खूप करतात पण प्रार्थना करत नाहीत असं सुद्धा नाही चालणार.  
आपल्या पुराणांमध्ये पुरुषार्थ आणि प्रयत्न दोन्ही म्हटले आहेत. आपण जितके करू शकतो तितके करावे आणि मग देवावर सोडावे. माझे इथे येणे तुम्हाला ही आठवण करून देणे आहे. तुमच्या मध्ये दैवी शक्ती आहे आणि तुम्ही ह्या शक्ती बरोबर स्वत:ला जोडून घ्यावं. तुमचं आणि तुमच्या अंतर शक्तीचा संबंध झाल्यावर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.
एक श्रीमंत माणूस तुम्हाला पैसा देईल. पण जर ज्ञान नसेल तर ते तुम्हाला देईल कोण? तसेच ज्याला मोक्ष मिळाला आहे तोच दुसर्याना ह्या संसारिक बंधनातून मुक्त करू शकतो. जर कोणी बंधनात अडकला आहे, तर कोणी दुसऱ्याला बंधांतून कसा काय मुक्त करेल? आणि जर तो मुक्त करू शकत नाही तर मग प्रेम, ध्यान, आनंद कसा काय मिळवून देईल. पण जर तुम्हाला आंतमधून आनंद मिळत राहिला, तुमच्या मनापासून एक स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुमचं हसू कोणीच घेऊन जाऊ शकणार नाही. सगळे अश्याच आनंदा कडे बघत आहेत, जे कधीच कमी होणार नाही, हुरळून जाणार नाही. ह्या साठी काय करायला हवं? आपल्या मधील विश्वास वाढवायला हवा.
जे आनंदी आहेत ते हा आनंद पसरवू सुद्धा शकतात, आणि जे समाधानी आहेत ते दुसरयांना समाधानी करण्यात मदत करतात.
आपल्या देशात कोणतही चांगलं काम करण्या आधी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. का माहीत आहे? ह्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. जो समाधानी असेल त्याच्या मनात कोणतीही इच्छा येईल ती पूर्ण होईल, आणि त्यांचे आशीर्वाद खुपच फायद्याचे ठरतील. जर कोणी व्यक्ती स्वत: दु:खी असेल तर तो दुसर्याना कसा सुखी करेल आणि त्याचे आशीर्वाद दुसर्याना कसे काय फळतील. जो स्वत: समाधानी आहे तो दुसर्याना आशीर्वाद देऊन त्यांच्या इच्छा सहज रित्या पूर्ण करू शकतो. आपल्याला समाधान असणे गरजेचे आहे, थोड्या वेळा साठी तरी. समाधानी असल्याने दुसर्याना आशीर्वाद देण्याची पात्रता येते.
आपण गुरु आणि संतांकडे कश्याला जातो? कारण ते समाधानी असतात आणि जेव्हा ते आशीर्वाद देतात तेव्हा ते काम होऊन जातं. होत नाही का असं? कोणाला ते मिळत जे हवं आहे? बघा ! मग हे समाधान कधी आणि कसं मिळवावं ?
समाधान हे समाधानी माणसा बरोबर बसून किंवा सत्संग मध्ये बसून येत. जर तुम्ही निराश माणसाबरोबर बसल तर मग तुम्ही निराश व्हाल. एक अस्थिर व्यक्ती अस्थिरताच आणेल. सुखी आणि समाधानी सुख आणि समाधानच पसरवेल. आणि ह्या मागचं रहस्य आहे साधेपणा आणि सहजता. आता पर्यंत आपण अगदी औपचारिक पद्ध्तीने वागत आलोय.
लोकांना आम्ही फूल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करतोय आणि आदर देतोय. ह्या औपचारिक वस्तूंची आयुष्यात जागा आहे, नाही असं नाही. पण आपण ह्यां मध्ये अडकून पडता कामा नये. जसं तुम्ही पुष्पगुच्छ विकत घेताना थैली घेता. आता थैली हि मुख्य गोष्ट नसून थैली मधली वस्तू महत्तवाची आहे. आपण थैली च्या आंत मध्ये डोकवायला हवं. तसचं आयुष्यात सुद्धा आपण हेच करतो, प्लास्टिक थैलीलाच आपण मुख्य गोष्ट समजतो. जसे आपण आयुष्यात औपचारिक होतो आणि आपुलकी राहात नाही. जेव्हा आपुलकी वाढते तेव्हा भ्रष्टाचार संपतो आणि सगळे आपलेसे वाटतात. कोणीच परका वाटत नाही.
जेव्हा आपुलकी असते, तेव्हा आयुष्य सुंदर होतं. आणि जेव्हा प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सुंदर होतं तेव्हा समाज सुंदर होतो. कारण समाज हे तत्वज्ञाना मुळे पुढे वाढत नाही, प्रत्येक व्यक्तीच्या विकासामुळे आपण पुढे चालतो आणि अश्या लोकांमुळेच समाज समृध्द होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपुलकीच्या भावनेने बघणे गरजेचे आहे. जर आपुलकी असेल तर एक मोठा बदल घडू शकतो आणि लोकांच्या आयुष्यातून रुक्षता कमी होते.
रुक्षता आणि निरपेक्षतेमुळे इच्छा आणि अपुरेपणा येतो. पण आनंद आणि परमानंद जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा सगळं काही तुम्हाला सहजपणे मिळेल.
आयुष्यात आनंद आणि परमानंद मिळण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे.
१.      ज्ञान
२.      ध्यान
३.      गान
ह्या तिन्ही वस्तू तुमच्या आयुष्यात सामील करा. थोडा वेळ कीर्तन आणि सत्संग करा. ज्ञान मिळवा आणि सेवा करा आणि ध्यान करा. १५-२० मिनिटे शांत बसल्यामुळे खूप फायदे होतात. शरीर शक्तिशाली, वागणूक उत्तम, मन शांत, बुद्धी तल्लख, स्मृती वाढते आणि आत्मा परमानंदमयी होते.
तुम्हाल अजून काय हवं आहे?
तुम्ही हि म्हण ऐकली असेल, “एक साधे सब साधे, सब साधे सब जाये”. ज्या एका गोष्टीच्या तुम्ही मागे राहू शकता ती म्हणजे तुमची आत्मा. शांत बसा आणि ध्यान करा. गीते मध्ये म्हटलं आहे, “योगस्थ कुरु कर्माणि”, म्हणजे जो योग नियमित पणे करतो तो जास्त पात्र होतो त्याचे गुण वाढतात आणि तो यशाचं शिखर लवकरच गाठतो.
म्हणून आज आपण तिन्ही गोष्टी इथे करू. आपण गाऊ, ध्यान करू आणि ज्ञान वाटू आणि देशासाठी काही प्रतिज्ञा घेऊ.
आपण सगळ्यांनाच भारत एक शक्तिशाली देश म्हणून बघायचा आहे. मला पण असं होताना बघायचं आहे. आपण सगळे झोपेत गेलो आहोत पण आता आपल्याला जागरूक होणे गरजेचे आहे. देशाचे तरुण जागे झाल्यवर मग कोणीच देशाची प्रगती थांबवू शकत नाही. जर युवा व्यसन, हिंसाचार, जातीवाद, छोटा दृष्टीकोन घेऊन बसले असतील तर मग देशाची प्रगती होणार नाही.
माझे स्वप्न आहे एक दैवी समाज बनवण्याचं. माझ्या लहानपणी मला असं वाटायचं कि हे ज्ञान मी सगळ्या जगात घेऊन जाईन. परदेशातले क्लब भारतात आले, आणि लोकं रोटरी क्लब मध्ये जाऊ लागले. मग भारतातून सुद्धा काही संस्था परदेशात जायला हव्या. आज आर्ट ऑफ लिविंग ला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि १५२ देशांमध्ये हि संस्था कार्यरत आहे. हे सगळ आपोआप घडलं, मी काही नाही केलं. माझा फक्त एक हेतू होता, आणि पुढे सगळ घडून आले.
भारतातलं ज्ञान किती छान आहे! आपण हे ज्ञान असं दिलं पाहिजे ज्या मुळे युवकांना त्या मध्ये रुची येईल. आणि हेच होतं आहे. हजारो लाखो युवकांनी आर्ट ऑफ लिविंग कोर्स केला आणि अजून पण करत आहे आणि त्याचं जीवन खुलून गेलं आहे. पण हे पुरेसं नाहीये आणि आपल्याला अजून युवकांना हे ज्ञान द्यायचं आहे.
व्यसन आणि हिंसाचार हे समाजातून काढून टाकले पाहिजेत. मला अश्या दिव्य समाजाचं स्वप्न बघायचं जिथे तणाव, हिंसाचार आणि भ्रष्टाचार नाहीये. किती लोकांना ह्या मध्ये सहभाग करायचा आहे? आपले हात वरती करा? आपल्या सगळ्यांना हे मिळवण्या साठी काहीतरी करायचं आहे. आपण सगळे मिळून समाजात एक मोठा बदल घडवू शकतो.

प्रश्न: गुरुजी, गीतेनुसार, जे घडलं आहे, पुढे घडणार आहे आणि आत्ता घडतंय ते चांगल्या साठीच घडतंय मग चांगलं आणि वाईट ह्यात फरक काय?
श्री श्री: मी तुमच्या कडे दोन व्यक्ती पाठवतो एक प्रशंसा करेल आणि दुसरा तुमची निंदा करेल. तुम्हाला चांगलं आणि वाईट ह्या मध्ये फरक लगेच कळेल. एक तुम्हाला त्रास देतो, तो त्रास कोणालाच नको असतो. एक किड्याला सुद्धा त्रास नको असतो. जे दु:ख कारक आहे ते वाईट आणि जे छोट्या काळासाठी आनंद देईल पण दीर्घकालीन दु:ख ते वाईट. जे तुम्हाला कमी काळासाठी दु:ख पण मोठ्या काळासाठी आनंद ते चांगलं हि मोजपट्टी आहे.


प्रश्न: जर मला माझ्या करिअर मध्ये घरच्यांची निवड किंवा माझी निवड ह्यांपैकी एक धरायची असेल तर मग मी काय करावे?
श्री श्री: काही अंशी त्यांच्या बरोबर बोलणी करा. त्यांना सांगा कि जी त्यांची निवड आहे ती तुम्हाला मान्य नाहीये. आणि जे तुम्हाला ते सांगत असतील ते सुद्धा एक मोठ्या दृष्टीकोनातून येत असेल. जर त्यांना त्यांच्या घरचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि ते तुम्हाला एम.बी.ए करायचे म्हणत असतील.  जर तुम्ही वेगळ्या व्यवसायामध्ये जात असाल आणि त्यांच्या कडे कोणी पण स्वत:च्या व्यावसायाकडे बघण्यासाठी नसेल तर काळजी पोटी ते तुम्हला म्हणत असतील. बऱ्याचदा आपण छंद आणि पेशा मध्ये गफलत करतो. आपण छंदांना व्यवसाय करतो आणि व्यवसायाबरोबर निष्काळजी होतो. तुमच्या आई-वडिलांशी बोला आणि तुमच्या एखाद्या शिक्षकाशी सुद्धा बोलून बघा.

प्रश्न: जेव्हा मी तुम्हाला भेटू शकत नाही तेव्हा मनाला इतकं दु:ख का होतं?
श्री श्री: जेव्हा हृदय जुळले आहेत, तेव्हा मिठी मारण्याची काय गरज. आपल्या सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे आणि आपण सगळे एक आहोत. मी इतक्या देशा मध्ये गेलो आहे, मला कुठेच असं नाही वाटत कि मी एका अनोळखी व्यक्तीला भेटतोय. जे मला भेटतात ते मला आपलेसे वाटतात आणि त्यांना हि माझ्या प्रती तेच वाटत. म्हणून तुम्ही सुद्धा सगळ्यांना त्याच नजरेने बघा आणि स्वीकार करा. हेचं सत्याच ज्ञान आहे, जिथे कोणीच परका नाहीये.

प्रश्न: गुरुजी, आम्ही कोण आहोत आणि आमचं अस्तित्व कशाला आहे?
श्री श्री: हा फारच उत्तम प्रश्न आहे, आणि हा प्रश्न कोणालाच देऊ नका. हा प्रश्न स्वत:ला विचारत राहा. हा एक फारच मोलाचा प्रश्न आहे. त्यांना थोडयासाठी देऊ नका आणि छोट्या मोठ्या उत्तरांनी समाधान मानू नका. जे तुम्हाला उत्तरं देत आहेत, ते तुमच्या बरोबर अन्याय करत आहेत. जे लोकं ह्याचं उत्तरं देणार नाहीत कारण हे एक चिन्ह आहे तुमच्या मेंदू आलेल्या वितार्काचे. वितर्के पासूनच आत्मज्ञान फुटत. ज्यांना माहित आहे त्यांना फार आनंद आहे तुमच्या मध्ये असं होण्याचा. ज्यांना माहित नाही ते तुमच्यावर अपेक्षेचं ओझं लाद्तील.

प्रश्न ५: देव आम्हाला सुरक्षित कसं ठेवतो?
श्री श्री: हे अद्भूत आहे ! तुम्ही जेव्हा पासून जन्मलात तेव्हा पासून त्याने तुम्हाला संभाळलं आहे. आई आणि वडील ह्यांच्या प्रेमाच्या रुपात तुम्हाला सुरक्षित ठेवलं आहे. ज्या कोणापासून तुम्ही प्रेम मिळवत आहात ते सगळ दैवी आहे. देव तुम्हाला सगळ काही देत आहे.

प्रश्न ६: आपण देवासाठी मुख्य वेळ दिला पाहिजे. मग कृपया सांगा कि हा मुख्य वेळ कोणता आहे?
श्री श्री: ह्याचा अर्थ कि फालतू वेळ देवाला देऊ नका. जेव्हा तुम्हाला अजून काही नाही करायचं आहे, चित्रपट नाही बघायचे, काम नाही संपवायच, आणि तेव्हा तुम्ही भजन करण्याच म्हटलं त्याचा काही उपयोग नाही. उरलेला वेळ देवाला देऊ नका. दर-रोज १० मिनिटे ध्यान करा सकाळ आणि संध्याकाळ. हे तुम्ही देवासाठी करत नाही आहात, देवाला तुमच्या कडून काही नकोय. हे फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही ध्यान करा आणि गरीब आणि दिन ह्यांची मदत करा. तुमचे श्रम सेवे साठी वापरा.

प्रश्न ७: सगळ्यांना मोक्ष हवं आहे? पण २१व्य शतकात मोक्ष मिळण्यासाठी काय करावं?
श्री श्री: हो सगळेच मोक्ष मिळवू पाहत आहेत. भोगण्यासाठी सुद्धा एक मर्यादा आहे ती मर्यादा पोहोचल्या वर मग मोक्ष मिळण्याची इच्छा दांडगी होऊ लागते. जर तुम्ही कोणाला १० पराठे खायला सांगितले तर तो नाही खाऊ शकणार. ६-७ पराठ्यानंतर तो म्हणेल पुरे झाले. मोक्षसाठी तहान साहजिक आहे. प्रत्येक व्यक्तीला आत मधून मुक्ती हवी आहे. हि एक साहजिक भावना आहे !

प्रश्न ८: गुरुजी, तुम्ही पाकिस्तान ला चालला आहात. तिथे फार हिंसाचार आहे. पाकिस्तान च्या भवितव्य बद्दल तुम्हाला काय वाटतं?
श्री श्री: माझ्या येण्याची खबर तिथे पोहोचली आहे. बऱ्याच दिवसांनी त्यांनी एक आतंकवादी संघटनेला बंदी घातली आहे, ज्यांनी बऱ्याच शिया मुसलमानान मारलं आहे. पाकिस्तान स्वत: आतंकवादाला बळी पडलेला आहे. मी परवा तिथे ३ दिवसां साठी चाललो आहे. तिथे आपले बरेच श्रद्धाळू आहेत आणि त्यांनी मला तिथे बऱ्याच प्रेमाने बोलावलं आहे. जेव्हा मी तिथे २००४ साली गेलो होतो तेव्हा ते म्हणाले. ‘गुरुजी, आम्ही ५ वर्षे थांबलो आहोत, आता आम्हाला अजून ५ वर्षे नका थांबवू”. पण आता मी तिथे ७ वर्ष्यानी चाललो आहे. तिथे एक ‘शांती भवन’ स्थापित करायचं आहे.
मी युवकांना पुढे येऊन योग आणि ध्यान शिकण्यासाठी आग्रह करेन. किती लोकांना शिक्षक बनायचं आहे? आम्ही तुमच्या साठी इथे टीचर ट्रेनिंग चे आयोजन करू.
ध्यान शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज जगभरात आहे. पाकिस्तान मध्ये आर्ट ऑफ लिविंग एक लाख लोकां पर्येंत पोहोच्लेला आहे. जेव्हा सिंध प्रांतात पूर आला होता तेव्हा आर्ट ऑफ लिविंग ने तिथे जाऊन लोकांची भरपूर मदत केली होती.
मी म्हणेन जितका पैसा भारत आणि पाकिस्तान आपल्या सुरक्षे साठी खर्च करत आहेत, तितक्या पैश्यान मधला १ टक्का जरी शांती ठराव पुढे आण्यासाठी खर्च केला तर आणि जर दोन्ही देशांच्या लोकांनी एकमेकांशी चांगले संबंध ठेवले तर मग आतंकवादा साठी जागा उरणार नाही.
जेव्हा आपल्याला एक चांगला डॉक्टर किंवा वकील हवा असतो तेव्हा आपण त्याची जात किंवा धर्म विचारत नाही. पण जेव्हा प्रश्न मतदानाचा असतो तेव्हा आपण जातीवाद करतो. जर भारताला पुढे वाढायच असेल तर आणि सगळ्यांना आर्थिक न्याय मिळायला हवा, तर मग आपण ह्या छोट्या दृष्टीकोनातून बाहेर यायला हवं, आपण बदलायला हवं.

प्रश्न: गुरुजी तुम्ही इतकं फिरता. किती तरी कार आणि प्लेन बदलता. तुम्हाला तर जेवायला आणि झोपायला सुद्धा वेळ मिळत नाही. तुम्हाला हे सगळ करायला कस काय जमते?
श्री श्री: जेव्हा काम करण्याची इच्छा असते तेव्हा शक्ती आपोआप येते. जेव्हा तुमच्या घरी उत्सव असतो तेव्हा तुम्हाला सुद्धा जेवायचा वेळ नसतो. तसेच माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे.

प्रश्न: गुरुजी, उत्तर प्रदेश मध्ये एक युवा मुख्यमंत्री बनतो आहे. त्याने असं म्हटलं आहे कि तो गरिबी आणि अराजक सत्ता काढून टाकेल तुम्हाला असं वाटत का कि एक युवा देशाचं भविष्य बदलून टाकेल?
श्री श्री: नक्कीच ! युवकांना असा बदल हवा आहे. मी अखीलेशजीचे अभिनंदन करतो ज्यांनी उत्तर प्रदेश इथवर आणले, आणि त्यांना आदर्श मानून इतर युवकांनी पुढे याव. युवकांनी मंत्री मंडळात असावं हि एक फार छान गोष्ट आहे. अराजक सत्ता जी पैसा आणि शक्ती च्या बळावर चालवली गेली आहे ती नाहीशी झाली पाहिजे. जिथे जाल तिथे अध्यात्म घेऊन जा कारण अध्यात्मामुळे अराजकता मिटू शकते. अराजकते च्या विरुध्द चे कायदे फारच कडक असायला हवे.

प्रश्न: गुरुजी तुम्हाला प्रत्येक देशाच्या, धर्माच्या सगळ्या लोकांशी आपुलकी वाटते. हि तुमची महानता आहे. पण त्यांना सुद्धा तुमच्या साठी आपुलकी वाटावी ह्याचं काय रहस्य आहे?
श्री श्री: जे आपल्या मध्ये आहे तेच आपल्याला बाहेर दिसतं. हे जग एक आरसा आहे. जर आंत मध्ये वाईट असेल तर मग आपल्याला वाईटच दिसेल. जे आपल्याला चांगलं वाटतं तेच आपल्याला बाहेरून चांगलं वाटेल आणि जरी ते वाईट असले तरी ते तुमच्या साठी चांगले होऊन जातील.
प्रश्न १२: गुरुजी काही रेपिड फायर प्रश्न आहेत.
श्री श्री: हो !
तुम्ही?
मी तुमचा आहे !
मी?
तुम्ही माझे आहात.
जीवन?
मौल्यवान आहे.
बंधन?
ज्याच्यातून तुम्ही बाहेर यायला हवं.
अंधश्रद्धा?
जोवर पर्यंत तुम्ही त्यांच्या वर विचार करता तोवर त्या अंधश्रद्धा वाटत नाही.
खेळ?
जीवन हा एक खेळ आहे.
माया?
आदरातीथ्य
परमानंद?
तुमचा स्वभाव.
लग्न?
तुमची मर्जी.
स्वाभिमान?
लक्ष्य.
समाधान?
गम्य.
कृपा?
धन
शक्ती?
प्रयत्न
सत्संग?
एक उपकरण
राजनीती?
जे माणसाच्या भल्या साठी झटते.
अध्यात्म?
जीवनाचा एक अंग
यौवन?
नेहमी स्वत:मध्ये यौवन जपून ठेवा.
आशीर्वाद?
खूप आहेत.
भक्त?
सगळी कडे आहे.
एक गृहस्थ एकदा म्हणाले, ‘ जिथे एखादे वेळेस जेवण आणि पाणी मिळणार नाही, पण तिथे सुद्धा एक भक्त नक्कीच मिळेल’. चांगलं आहे जर सगळीकडे भक्त असतील तर ते सुगंध पसरवतात.

प्रश्न: गुरुजी, आज आम्हाला कळले कि तुम्ही एका कारागृहाला भेट दिलीत. हे तुमचं कर्म होतं का ज्या मुळे तुम्ही गेलात?
श्री श्री: हो ! आजच नाही मी बऱ्याच वेळी तिथे गेलो आहे. श्री कृष्ण कारागृहातच जन्मले होते. उदैपूर च्या कारागृहात हजारो लोकांनी आर्ट ऑफ लिविंग आणि मौन कोर्स केला आहे. ते खूप वर्षांपासून साधना करत आहेत म्हणून आज मी त्यांना भेटायला गेलो होतो. ते खूप आनंदात होते आणि त्यांना आनंदात बघून मला सुद्धा खूप आनंद झाला. २ लोकं तिथून सुटल्यावर शिक्षक बनले आहेत.

प्रश्न: गुरुजी, जर माझे सगळे काम तुमच्या कृपेने होत असेल तर मग माझे प्रयत्न घालण्यात काय उपयोग?
श्री श्री: मग स्वत:ला सेवेत रमवून घ्या.
सुख मे सेवा दु:ख मे त्याग. हा जीवनाचा उद्द्येश्या असला पाहिजे. जेव्हा आनंदी असाल तेव्हा सेवा आणि जेव्हा दु:ख असेल तेव्हा त्याग. जर तुम्ही दु:खाला सोडू नाही शकत तर मग आनंद कसा काय सोडू शकाल? आनंद तुम्ही सोडू नाही शकत. म्हणून आनंदी असताना तुम्ही सेवा करा दु:खात असताना आराम करा.

प्रश्न: गुरुजी, तुमच्या फोटोग्राफ मध्ये बघितल्यावर, तुमचे नाव घेतल्यावर आणि तुमच्या येण्याच्या बातमीनेच सगळी काम होऊन जातात. मी स्वत: हेच कसं करू शकतो?
श्री श्री: मला पण माहित नाही. मी एक लहान मुलगा आहे जो मोठा व्हायला तयार नाहीये. तुमच्या मध्ये सुद्धा एक लहान मुलगा दडलंय, तुमच्या आतील लहान मुलाला जागं करा आणि तुमच्या मध्ये असलेलं म्हातारपण सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, आजचे युवक संगणक वर बसतात किंवा टी.व्ही बघत बसतात किंवा पार्ट्यांना जातात. अजून कुठे आम्ही त्यांची शक्ती वळवू शकू?
श्री श्री: जर ह्या काम मध्ये ते रमत असतील तर काही हरकत नाही पण त्यांनी समाजासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. त्यांनी देशाच्या लोकांना जागरूक करायला हवं. त्यांनी जागे होऊन पुढे यायला हवं आणि राजकरणात जायला हवं.
किती तरी लोकं मतदान करताच नाहीत कारण त्यांना वाटत कि सगळ्या पार्ट्या एक सारख्याच आहेत आणि मग सगळीकडे भ्रष्टाचार होतो. असे लोक निवडून येतात आणि काही उपयोग होत नाही. असं करू नका !
ह्या समाजात चांगले लोकं जास्त आहेत पण ते शांत बसले आहेत. समाज वाईट लोकांमुळे नव्हे तर चांगल्या लोकांच्या शांत राहण्यामुळे खाली गेलाय. अशा लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी युवकांनी पुढे यावं. मग देशाची उन्नती मोठ्या अर्थाने होईल.
जेव्हा आपल्या देशात अध्यात्मिक शक्ती प्रखर होती तेव्हा देश खूप समृध्द होता. कोणत्याही गोष्टीची कमरतता नव्हती. एक तृतीयांश जी.डी.पी. भारतातून यायचा. आपल्या देशात इतकं धन होतं. आता आपण खूप नुकसान झालेले बघतोय आणि म्हणून युवकांनी पुढे यायला हवं. अंधश्रद्धा आणि अज्ञान हे मिटवून टाका. दर-रोज कितीतरी मंदिरात पशु हत्या होते, हे थांबायला हवं. जातीवाद थांबवायला हवा. आपले कितीतरी संत आणि साधू खालच्या जाती मध्ये जन्म घेतलेले आहेत.
चरणांची पूजा हि आपल्या देशामधली पद्धती आहे. पाय हे कधीच कमी दर्ज्याचे समजले गेले नाहीत.  पाद पूजा आपल्या देशात केली जाते, जिथे इतकी डोक्याची नव्हे परंतु पायांची पूजा केली जाते. परदेशात ‘माय फूट’ म्हणजे शिवि समजली जाते. पण भारतात पाय हे डोक्यापेक्षा जास्त पूजनीय समजले गेले आहेत. म्हणून मग जर क्षूद्रना पायांबरोबर समजलं गेले तर मग ते जास्त आदरणीय आहेत. सगळ्या धर्मानी आणि जातींनी एकमेकांकडे आदराने बघायला हवं.

प्रश्न: त्रेता युग मध्ये राम अवतार रावणा विरुद्ध आणि द्वापर युग मध्ये कृष्ण अवतारामध्ये कौरावन विरुद्ध तर मग कलीयुगात तुम्ही कोणा विरुध्द लढताय?
श्री श्री: माझे युध्द आहे अज्ञान, अन्याय, कमतरता आणि अपवित्रता. मी काही लोकांना असं म्हणताना बघितलाय कि सत्य युग मध्ये आत्मा अतिशय पवित्र होता, मग कलियुग पर्यंत पवित्रता जात राहिली. हे एकदम बकवास आहे. असं काही नाहीये. सत्य युग मध्ये सुद्धा राक्षस होते हिरण्यकशा आणि हिराण्याकाश्यपू जे कोणी देवाचे नाव घ्यायचा त्याला त्रास द्यायचे आणि देवाला चार वेळा अवतार घेऊन त्यांचा नाश करावं लागला. प्रत्येक युगा मध्ये आत्मा हा पवित्र आहे आणि वेळेच्या पलीकडे आहे. आत्मा हा पवित्र नाहीये असं विचार करण हे चूक आहे. कलियुग पण चांगलं आहे. वेळेला दोष देऊ नका. तुम्ही हि म्हण ऐकली असेल, ‘कलियुग केवळ नाम अधरा’. म्हणजे कलियुग मध्ये देवाचं फक्त नाव घेतल्याने देव मिळून जातो. म्हणून असं म्हणू नका कि सत्य युग कली युगापेक्षा चांगलं आहे.
वेळेवर अवलंबून न राहता साधकांनी साधना केली आहे आणि परमोच्च शिखर प्राप्त केलं आहे. मग तुम्ही सुद्धा तिथे पोहोचू शकता.

प्रश्न: आकर्षणं ने भरलेल्या ह्या दुनियेत, प्रथा आणि परंपरा कशी बनवून ठेवावी?
श्री श्री: आपली चेतना आनंदाने भरलेली आहे. आपल्याला असं वाटत कि अध्यात्म हे कंटाळवाण आहे आणि ह्यात रस नाही. तर तसे नाही ! अध्यात्म म्हणजे आयुष्य पूर्ण आनंदाने जगणं. एक आयुष्य शांती, आनंद आणि समाधानाचं. असं अनुभव होणे म्हणजेच ध्यान करणे. एकदा ध्यान केल्यानंतर बाकी सगळ रुक्ष वाटू लागत. एकदा तुम्ही स्वत:मध्ये स्थपीत झालात कि मग बाहेरच सगळ रुक्ष वाटतं.

प्रश्न: देवाला, तुम्हाला आणि माझ्या आई-वडिलांना मी एक चांगला माणूस बनवसं वाटतं. मग देवाने दुष्ट बनवलं कशाला?
श्री श्री: कोणी तुम्हाला म्हटलं तुम्ही वाईट आहात? मी कधीच असं म्हणालो नाही कि तुम्ही चांगले बना. तुम्ही आधीच चांगले आहात. फक्त उठा आणि बघा कि तुमच्या मध्ये लहान सहन वाईट सवयी सोडण्याची क्षमता आहे. ठीक आहे, म्हणून सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिक शिक्षक आणि भक्तांमध्ये वाढ झाल्यावर सुद्धा समाजात गुन्हाच प्रमाण सुद्धा का वाढतंय?
श्री श्री: अध्यात्मिक शिक्षक काही गुन्हे आणि भ्रष्टाचारच्या वाढीमध्ये मदत करत नाहीये. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन १० वर्षांपूर्वी भारतात इतकी इस्पितळ नव्हते जितके आज आहेत. इस्पितळ वाढले म्हणून लोकं आजारी पडले का? इस्पितळ वाढले आणि रोग राई सुद्धा वाढली. तुम्ही इस्पितळांना त्यासाठी जबाबदार धरणार का? नाही. इस्पितळ वाढून सुद्धा रोग वाढतच चालले आहेत. तसेच अध्यात्मिक संत अस्तित्वात असूनही गुन्हे वाढत आहेत तर मग भारतात किंवा जगात जर ते नसते तर काय झाले असते ह्याचा विचार करा. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते? प्रत्येक गावात एक संत हवा. एक पुरोहित हवा जो लोकांना बांधून ठेवील आणि त्यांची उन्नती करेल. जो सगळ्यांच्या भल्याचा विचार करेल आणि कोणत्याही गोंधळात त्यांना समजावून स्थित शांत करण्याचा प्रयत्न करेल. एक व्यक्ती जो कमतरता कमी करेल अशी व्यक्ती हवी.
आज भारतात ७ लाख गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये २ लोकं असतील जे लोकांच्या भल्यासाठी काम करू शकतील त्यांना योग आणि ध्यान शिकवतील तर मग आपला देश खूप प्रगती करेल. आपल्याला १४ लाख सेवाकारणारे योग आणि ध्यान शिकवणारे शिक्षक हवेत. मग तुम्ही सुद्धा एक असे शिक्षक बनू शकता. स्वत: शिकवा आणि दुसर्याना सुद्धा योग शिकवा.

प्रश्न: गुरुजी, ग्रहांचा आणि वेळेचा आपल्या जीवनावर काय असर पडतो?
श्री श्री: जे काही असेल ते, तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता आणि भक्ती आणि ध्यान केल्यामुळे सुद्धा ते कमी होते. अजून कशाची गरज नाहीये. ह्या जगात प्रत्येक वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो. असं म्हटलं आहे कि जर दक्षिण अमेरिकेत फुलपाखराने पंख फडफडवले तर चीन मध्ये ढगांवर परिणाम होतो. असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणून असं साहजिक आहे कि सूर्य, चंद्र आणि ग्रहांचा तुमच्या जीवनावर असर होईल पण इतका नाही कि तुम्ही दु:खी आणि गोंधळलेले राहाल. बऱ्याचदा आपण ज्योतिषांशी बोलतो आणि मग हवं ते फळ नाही मिळाल्यावर उदास होतो. असं करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट दिवस हे सगळ्यांच्या जीवनात येतात. ते शरीर, मन बुद्धी या गोष्टींवर फरक पडतात. पौर्णिमेच्या आणि अमावस्या च्या रात्री चंद्रामुळे आपल्या शरीर आणि मनावर फरक पडतो ह्या साठी प्राणायाम, ध्यान आणि योग करणे महत्त्वाचे आहे.

प्रश्न: गुरुजी राजस्थान मध्ये शौर्यला मोठे स्थान  आहे. पण आज युवक हे विसरून गेले आहेत आणि पाश्चिमात्य विचारसरणीची भूल पडत चालेले आहेत. आपण त्यांच्या मध्ये भारतीय गुण कसे काय टिकून ठेवू शकू?
श्री श्री: नक्कीच हे गुण जपणे गरजेचे आहे. जर तुम्ही पाश्चिमात्य झालात तर तुम्हाला परत फिरून मुळ भारतीयतेकडे यावे लागेल. आजकाल तर परदेशी लोकं सुद्धा भारताकडे येत आहेत. त्यांना भारतीय सभ्यतेचे आकर्षण आहे आणि त्यांना भारतीय परंपरेनुसार लग्न करायचं असतं इत्यादी. पृथ्वी गोल आहे, पश्चिमेकडे गेलात तरी तुम्हाला इथेच परत यावे लागेल. लवकर परत येणे हि खरी युक्ती आहे.

प्रश्न: गुरुजी, बऱ्याच लोकांनी इथे आपले त्रास आणि समस्या पाठवले आहेत.
श्री श्री: हो, सगळे त्रास आणि समस्या इथे सोडून द्या. मी असं ऐकलं आहे कि चांगल्या घरातून सुद्धा आत्मा हत्येचं प्रमाण वाढलं आहे. जर तुमच्या मनात असं काही दु:ख किंवा त्रास असेल तर मग हे माहित करून घ्या कि तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या बरोबर आहे. तुमचे सगळे दु:ख आणि त्रास मला देऊन टाका. साधना, सेवा आणि ध्यान करा. पुढे या आणि देशा साठी काही तरी करा. घरी जाताना आनंदाने जा आणि झोपण्यापूर्वी ध्यान करा आणि सगळ्या इच्छा समर्पित करा आणि आनंदाने झोपा. संकल्प घेण्याची हि एक पद्धत आहे. तो संकल्प घ्या आणि सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही असं म्हटलं आहे कि योगा मध्ये यश साधना आणि अनाग्रही बनल्याने येत. मी साधना करतोय पण मी विवाहित असल्याने माझ्यामध्ये अनाग्रही पणा नाहीये. मी योगामध्ये कशी प्रगती करू?
श्री श्री: नाही ! आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे सुद्धा अनाग्रही असण्याचे लक्षण आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा. जे तुम्हाला करायचं आहे ते पूर्ण करा आणि आराम करा. जे तुम्हाला सोडायचं आहे ते सोडा आणि आराम करा आणि तेच अनुग्रही बनणे आहे.
तुम्हाला तुमचं घर सोडण्याची किंवा कुठे जाण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमच्या जबाबदारी पार  पाडता योगपथावर चालू शकता. घरी बसून सुध्धा तुम्ही सत्या पर्यंत पोहोचू शकता. ह्यात काहीच हरकत नाही.

प्रश्न: उदैपूर च्या लोकांसाठी ३ संदेश द्या.
श्री श्री: हजारो लोकं इथे आज आले आहेत. सगळे स्वयंसेवक बनून एकत्र येवून काही करू शकता. २ आठवड्यात २ तास समाजासाठी द्या. दर रविवारी सकाळी ९ ते ११ सगळे एकत्र या आणि शहर स्वच्छ करा आणि झाडे लावा आणि लोकांना व्यसन मुक्ती आणि मुलींचा बळी ह्यांच्यावर आळा


घालण्यासाठी काम करा. १५ ते २० लोक मिळून जवळच्या गावात जाऊन सत्संग करा. त्यांना चांगल्या गोष्टी सांगा आणि आपण सगळे एक कुटुंबातले आहोत असं सांगा. आपण सगळ्यांनी एकत्र येवून असं काम केलं तर मग काही मोठ्ठ करू शकू. एक भक्ती, ज्ञान आणि अध्यात्मिकतेची  लाट येईल.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही राजनीती मध्ये कधी येताय?
श्री श्री: राजनीती मध्ये येऊन मी चांगल्या लोकांना एका बाजूला नाही करू इच्छित. सत्ताधारी आणि विपक्ष मध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. एक पत्रकार, संत आणि समाजसेवक ह्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना पुढे ठेवलं पाहिजे. जाती, पैसा किंवा शक्ती च्या जोरावर नव्हे. म्हणून मी एका समाजसुधारकाची भूमिका करतोय, आणि जर युवकांना पुढे यायचं आहे राजनीती, आध्यात्मिक आणि सेवेकडे कल असणाऱ्यांना जास्त प्रोत्साहन देईन. राजकारणाला व्यवसाय बनवु नये. देश मग पक्ष आणि शेवटी मी असा दृष्टिकोन असला पाहिजे.

The Art of living
© The Art of Living Foundation