देशभक्ती आणि देवभक्ती हे काही वेगळे नाही
१७ फेब्रुवारी २०१२
आनंदीपणा हा सीमित हवा. जेंव्हा
आपण आनंदी असतो तेंव्हा तो आनंद योग्य
रीतीने मार्गस्थ करणे गरजेचे असते. “सुखात सेवा आणि दुःखात त्याग” हा मंत्र चांगला
घोकून पाठ करा.
जेंव्हा तुम्ही आनंदी असता
तेंव्हा काहीतरी सेवा करा आणि जेंव्हा तुम्ही दुखी, चिंताग्रस्त असता तेंव्हा
तुमचे दुखः समर्पित करा. जो पर्यंत तुमच्यात समर्पणाची वृत्ती जागृत होत नाही
तोपर्यंत दुखः तुमच्याबरोबर राहील. एखादा जर दुःखात पण समर्पण करू शकत नसेल तर
त्यांना दुसरा काहीच मार्ग शिल्लक राहत नाही. समर्पण आणि सेवा हे दोन्ही आयुष्यात
नेहमी बरोबर असतात.
आपण अनुभवत असलेल्या आनंदाला एक दिशा देणे जरुरी असते.
आज सकाळपासून करीत असलेल्या
साधनेमुळे आपण सर्वजण बघा कसे आनंदी झालो आहोत आणि सारे कसे छान वाटत आहे. आता हा
आनंद सर्वांना कसा अनुभवता येईल? याचा आपण विचार करायला पाहिजे.
सेवा करा, आपल्याला
भ्रष्टाचार-मुक्त, हिंसा-मुक्त आणि शोषण-मुक्त अश्या समाजाची निर्मिती करायची आहे.
त्यासाठी आपल्याला अज्ञाना विरुद्ध लढा द्यावा लागेल. आज आपल्या देशात अनेक
अंधश्रद्धा आहेत आणि आपल्याला त्या दूर करावयाला पाहिजेत. त्याचप्रमाणे निरक्षरता
दूर करायला पाहिजे, अज्ञान दूर करायला पाहिजे.
जे सर्वलोक वेब-कास्टच्या मदतीने
हा कार्यक्रम बघत आहेत, त्यांना मी असे सांगू इच्छितो कि त्यांनीपण दिवसातील काही
वेळ हा ध्यानधारणेसाठी द्यायला पाहिजे. ध्यान हे आनंद वाढविते, शरीराला आरोग्यदायी
स्थितीत ठेवते, बुद्धी कुशाग्र करते, आणि त्यामुळे तुम्ही सहज ज्ञानी होवून जे
काही घडणार आहे त्याचे प्रतिबिंब तुमच्या मनात त्या घटनेच्या आधी पडायला सुरवात
होते.
सर्व वाईट विचारांना आलिंगन
द्या. का? तर तुम्ही जर त्यांना पळवून लावायला लागलात तर ते तुमचा पिच्छा कधीच सोडणार
नाहीत. म्हणून जर तुम्ही त्यांच्याबरोबर हस्तांदोलन केलेत तर ते लगेच नाहीसे
होतील.
क्षणे क्षणे उपरामेती- हळू हळू
मन जसे विचारातून बाहेर पडेल, दोन-चार किंवा दहा-पंधरा मिनिटांनी ते शांत होईल. हि
क्रिया जर काही दिवस सातत्याने सुरु राहिली तर एक असा आनंद आणि शांती तुम्ही
अनुभवाल कि प्रामाणीकपणा हा तुमच्या जीवनाचा स्थायी भाव बनून जाईल. आणि मग
प्रामाणिक राहण्यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावयाची गरज राहणार नाही, तो
तुमचा एक स्वभाव होऊन जाईल. आपण त्यासाठी खुलेपणा/ मोकळेपणा आत्मसात करण्याची गरज
आहे.
आज येथे आण्णाजी (आण्णा हजारे)
आले आहेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांचे व्यक्तिमत्व हे एक खुले व्यक्तिमत्व आहे आणि
त्यांच्यात सर्वांसाठी आपलेपणा दिसून येतो. जसे आपण आज येथे जमलो आहोत तसा पूर्ण
खुलेपणा त्यांच्यात दिसून येतो!
या प्रकारचा खुलेपणा जर तुम्ही
आत्मसात केलात- देशासाठी काही त्याग करून “ मला माझ्यासाठी काहीच नको आहे , माझे
जे काही आहे ते सर्व देशासाठी आहे.” देशातल्या प्रत्येक युवकात अशी जागृती झाली तर
आपला देश बदलायला वेळ लागणार नाही.
देश बदललाच पाहिजे आणि आपल्याला
हा बदल घडवून आणण्याशिवाय काहीपर्याय नाहीये.
तुम्ही सर्व त्यासाठी तयार आहात
काय?
बघा, अण्णाजी, तुमची सेना तयार
आहे! सेना तयार करण्याचा कारखाना आमच्याकडे आहे बघा.
अंतर्मुख झाल्याशिवाय आयुष्याला
योग्य दिशा देता येत नाही किंवा कामामध्ये यश मिळणार नाही, कारण त्यासाठी प्रत्येक
दिवशी थोडा वेळ अंतर्मुख होऊन ध्यान करण्याची गरज आहे. कामात यश मिळाल्यानंतर
आयुष्याला स्थिरता प्राप्त होते आणि मग आपण शांत होतो. मग आपल्या इच्छेप्रमाणे
सर्व काही घडायला सुरवात होते. हा अनुभव तुमच्यातील किती लोकांनी घेतला आहे?
संकल्प सिद्धी हा भारताच्या
आध्यात्मिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. मग पराजय आमच्याजवळ फिरकत नाही. कारण
काय? तर सत्व गुण वृद्धी. जेंव्हा सत्व गुण वाढतात, तेंव्हा जग जिंकणे सोपे होते.
मग तुम्ही कोठेही जा , अगदी जगाच्या पाठीवर कोठेही, तुम्ही कोणत्याही संकटाचा
सामना अगदी सहजपणे हसत हसत करू शकता.
हे कसे शक्य आहे? हे कोण एकाचे
किंवा कोत्या मनाचे काम नाही. तुम्ही जेंव्हा वैश्विक चेतना, ब्राम्ह्न्डीय चेतना,
सर्वोच्च शक्तीशी जोडले जाता तेंव्हा तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊन तुम्ही विजयी
होता.
उत्तर प्रदेशात एकम्हण आहे कि
“राम झरोके बैठे सबका मुजरा ले”. हे आयुष्यात सिद्ध झाले आहे कि तुम्ही
अध्यात्मशिवाय कोणती गोष्ट करायला गेलात तर तुम्हाला त्यात कधीच यश मिळत नाही.
आध्यात्मिकता हि आपली बैठक आहे, तो आपल्या जीवनाचा मजबूत असा पाया आहे. म्हणून
त्याची कास धरा आणि मग पहा सर्वांचे कसे मत परिवर्तन होते ते, अगदी दुष्ट लोकांचे
पण.
याज्ञानात एवढी शक्ती आहे कि कि
त्याला ब्रम्ह ज्ञान म्हटले आहे.
काल मला कोणी तरी विचारले कि “
हे सर्व भ्रष्ट लोक इथे कसे?”
मी म्हणालो कि “ तुम्ही सर्व
भ्रष्ट लोकांना आश्रमात घेऊन आलेले मला आवडेल, त्यांना येथे येउ देत, बसू देत,
इथल्या वातावरणाचा, आनंदाचा अनुभव घेउ देत. ते पैशाला एवढे महत्व देतात, कारण
त्यांनी आयुष्यात कधी प्रेम, त्याग, शांतता याचा अनुभव घेतलेला नसतो. एकदा का
त्यांना आनंदाचा अनुभव आला कि मग ते पैशाचे प्रेम विसरुन जातील. एकदा ते
तुमच्याप्रमाणे देह भान विसरुन, गायला, नाचायला लागले कि मग इतर सर्व गोष्टी
त्यापुढे फिक्या पडतील. धन, दारू यांची नशा यापुढे काहीच नाही आणि मग ते या जीवन
आनंद रसात मग्न होऊन जातील.
म्हणून, ज्याप्रमाणे तुम्हाला
जीवनातील हा आनंदचा सूर गवसला आहे, त्याप्रमाणे तुम्ही तो आनंद आणि जीवन रस
तुमच्या आजूबाजूला, सगळीकडे वाटायला लागा. त्यांना ते रस-पान करु देत, तुम्ही प्या
आणि इतरांना पण ते पाजा. बारमध्ये मदिरा तयार करून देणारा स्वतः न पीता इतरांना
पाजत असतो, पण इथे मात्र आम्ही आधी पितो आणि इतरांना पण पाजतो.
आज अरविंद (अरविंद केजरीवाल) पण
आपल्याबरोबर बसलेले आहेत. ते खूप चांगले अभ्यासपूर्ण माहितीचा संग्रह असलेले एक
स्पष्टवक्ते आहेत. ते सर्व माहिती व ज्ञान बाळगून असतात. त्यांच्या हृदयात
देशप्रेम काठोकाठ भरलेले आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांना
भविष्यात देशासाठी बरेच काही करावयाचे आहे.
सत्याचा आवाज नेहमी निर्भीड असला
पाहिजे.तुमचा आवाज एवढा जोरदार असायला पाहिजे कि तो सर्वदूर पोहोचला पाहिजे.
देशप्रेम आणि देवप्रेम हे काही वेगळे नाही. तुम्ही जर देवावर प्रेम करीत असाल तर
देशावर पण प्रेम करीत असणार कारण ते सर्व देवानेच निर्माण केले आहे!!! ते काही
वेगवेगळे नाही.आणि जर तुम्ही जगावर प्रेम करीत असाल तर आपोआपच तुमच्या आतील त्या
सर्व-साक्षी परमेश्वराकडे वळाल आणि कधी तरी त्याचे पण आभार मानाल. तुम्ही जर तसे
करीत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही.
असे बघा कि आपण सर्वजण मक्याच्या
दाण्याप्रमाणे आहोत. मक्याचे दाणे कठीण असतात तर त्याच्या लाह्या ह्या शुभ्र आणि
मुलायम असतात. त्याचप्रमाणे ध्यान व इतर संलग्न प्रक्रियेतील उर्जा आपल्याला
मक्याच्या लाह्यांप्रमाणे गुबगुबीत करते. त्यामुळे तुमचे अंतःकरण मोकळे होऊन मन
साफ करिते. हे एक सुंदर असे ज्ञान आहे. आहे कि नाही हे सुंदर आणि सुलभ ज्ञान?
प्रश्न: गुरुजी, आपल्या
सर्वांच्या मनात आपण आयुष्य कसे जगावे या विषयी स्पष्ट कल्पना आहे असे वाटते, पण
काही लोक मात्र त्यांच्या स्वतःच्या आयुष्याविषयी काही वेगळ्या ठाम कल्पना बाळगून
असतात. असे का आणि आपणत्याबद्धल काय करू शकतो?
श्री श्री रविशंकर: आता तुम्ही कोणा विषयी
बोलत आहात, तुमच्या स्वतःविषयी, कि तुमच्या जोडीदाराविषयी कि आणखी कोणाविषयी? माझी
खात्री आहे कि तुमची पत्नी तुम्हाला तुम्ही कसे जगावे आणि काय करावे या विषयी
माहिती निश्चितच देत असणार, तुमची आई पण तुम्हालाया बाबतीत सल्ला देत असणार, तुमची
बहिण तुमच्यावर हक्क गाजवीत असणार आणि तुमची मुलगी पण सांगणार कि “बाबा, तुम्ही हे
असे करायला पाहिजे .”
हे बायकांच्या बाबतीत पण घडते.
तुमचे पतीदेव तुम्हाला सांगतील, तुमचे बंधू पण सल्ला देतील. तुम्हाला मग
सल्ल्यांच्या दलदलीत अडकल्यासारखे होईल, तुमच्यावर सल्ल्यांचा वर्षाव होईल. तुम्ही
ते ऐकून घ्या पण त्याचवेळी तुम्हाला काय पाहिजे ते दृष्टीआड होऊ देऊ नका. तुमच्या
उधीष्टांकडे काना डोळा करू नका.
तुम्ही स्वतःसाठी एक लक्ष्य ठरवा
आणि समाजासाठी एक लक्ष्य ठरवा, तुम्हाला समाजाला कोठे घेऊन जायचे आहे त्याबद्धल.
आता सर्वच सल्ले काही टाकाऊ
नसतात. तुम्ही ते सर्व टाकून देवून शकत नाही तसेच ते सर्व अमलात पण आणू शकत नाही.
त्यासाठी तुमचे मन खूप मोकळे पाहिजे. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आणि त्यासाठी
तुम्ही कुठवर प्रगती केली आहे हे पाहणे गरजेचे असते.
वेळो-वेळी आपण त्याचा आढावा
घेतला पाहिजे. “ आपण कुठे चाललो आहोत? मला काय पाहिजे आहे? मी जे केले ते योग्य
आहे काय? मी जे करू घातले आहे ते योग्य आहे काय?” हे आत्म-परीक्षण गरजेचे आहे.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही आताच
विचार-धारेविषयी बोललात.विचारांचा वर्षाव कमी करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी आपण
काही करू शकतो काय?
श्री श्री रविशंकर: विचार हा तुमच्या
चेतनेचा भाग असतात, ते येतात आणि जातात.
आता, विचारांपासून सुटका कशी
करावी? त्यासाठी चार मार्ग आहेत.
पहिले म्हणजे जेंव्हा तुम्हाला
झटका बसतो. जेंव्हा झटका बसतो, अगदी विजेचा झटकासुद्धा , तेंव्हा तुमचे मन कोरे,
रिकामे होते. तुम्हाला विजेचा झटका बसून तुम्ही तो अनुभवावा असे मला म्हणायचे
नाहीये. प्रत्येक झटका देणारी घटना तुमच्या मनात एकप्रकारची पोकळी तयार करते.
दुसरे म्हणजे संगीत. जेंव्हा
तुम्ही गात असता,संगीतात भाग घेता, तेंव्हा विचर कमी होतात. एखादी जोरकस भावना पण
विचारांचा आवेग कमी करू शकते. तिसरे म्हणजे व्यायाम. आणि चौथे म्हणजे प्राणायाम
आणि गहरे ध्यान.
आणि जर तुमच्या मनात विचारांचे
काहूर माजले असेल तर खात्रीने समजा कि तुमचे पोट साफ नाहीये. मग तुम्हाला
आतड्यांची शुद्धी करण्याने मदत होऊ शकते. त्याने तुमचे मन शांत होईल. पण प्राणायाम
आणि ध्यान हे सर्वात उत्तम.
प्रश्न:प्रिय गुरुजी, मुलतः आपण सर्वजण सारखे आहोत.मग असे का कि काही लोक
आध्यात्मिकता आणि आत्मज्ञान हे समजून घेण्याच्या मागे लागलेले असतात तर काहींना
त्याचीगरज भासत नाही. मग त्यांच्यात तर तोच आत्मा असतो नाही?
श्री श्री रविशंकर: ते व्यक्तिगणिक वेगळे
असते. वेगवेगळ्या लोकांच्या आवडी वेगवेगळ्या असतात. काहींना गणिताची आवड असते.
बावाला (खुर्शीद बाटलीवाला)विचारा, त्याला गणिताची खूप आवड आहे.त्यांनी गणितावर एक
दृक-श्राव्य कार्यक्रम केला होता पण त्या वेब-साईट वर एवढ्या लोकांनी गर्दी केली
ते गणकयंत्र काम करेनासे झाले. असे समजले कि अडीच लक्ष लोकांनी तो पाहायला गर्दी
केली होती. अशा तऱ्हेने बावा गणितात हुशार आहे आणि त्याचे त्यावर अजून काम चालू
आहे.
डी.के.हरीकडे पहा, त्याला
इतिहासात खास रुची आहे.त्याने भ्रष्टाचारवर एक “यू टर्न इंडिया” नावाचे पुस्तक
लिहिले आहे. त्यामध्ये भारतात आपण एक चांगली अर्थ व्यवस्था कशी निर्माण करू शकतो,
मुळापासून कसे बदल करू शकतो यावर विचार-पूर्ण असे नियोजन मांडले आहे. आपली अशी
धारणा आहे कि गंगाहि एक नैसर्गिक नदी आहे, पण त्याने पुराव्यासहित असे सिद्ध
केलेआहे कि ती एक मानव-निर्मित नदी आहे. तुम्ही जर हरी आणि हेमा यांच्या
भारत्ग्यान.काम ला भेट दिली तर याची माहिती मिळेल.
हा एक आवडीचा प्रश्न आहे आणि
काही लोक चिकित्सक वृत्तीने त्यातकाम करतांना दिसतात. मी कोण आहे? हि चेतना काय
असते? स्वत्व म्हणजे काय आहे? हा स्वतः काय आहे? मी जेवतो, झोपतो, पितो, आणि
इतरअनेकक्रिया करतो, पण मी कोण आहे? मी मेल्यावर काय होते व मेल्यावर मी कोठे
जातो? याबद्दल त्यांना नेहमी उत्कंठा असते.
असे प्रश्न साहजिक आहेत आणि असे
प्रश्न हे बुद्धीच्या प्रगल्भतेची चिन्हे आहेत. एक प्रगल्भ बुद्धीच अश्या
प्रश्नांकडे बारकाईने पाहू शकते आणि तिथूनच मग अध्यात्मिकातेला सुरवात होते.
भारत जेंव्हा समृद्ध देश होता
तेंव्हा आध्यात्मिकतेची सुरवात झाली. जेंव्हा भारत आध्यात्मिकतेच्या उंचीवर
पोहोचला होता, तेंव्हाच समृद्धी व संपन्नता होती. परंतु आज त्या दोन्हीत अधोगती
झाली आहे म्हणून “यू टर्न” ची गरज आहे.
प्रश्न: गुरुजी, मला चिंता
नेहमी सतावते, त्यावर काही खात्रीशीर इलाज आहे काय? घरातील छोट्या छोट्या गोष्टी
पण मला चिंताग्रस्त बनवतात.
श्री श्री रविशंकर: उज्जाई प्राणायाम करा.
आता तो सारखा करीत रहा आणि मग बघा अगदी पहिल्या बैठकीपासून तुमच्या चिंता कश्या
दूर पळतात ते. नेहमी ध्यान करणे पण गरजेचे आहे.
प्रश्न: प्रिय गुरुजी, एका
प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही असा उल्लेख केलात कि सिनेमा बघितल्यावर आपली उर्जा
कामी होते. पण जेंव्हा तुमचे दर्शन होते तेंव्हा मला उर्जा वाढल्याचा प्रत्यय
येतो.
श्री श्री रविशंकर: ठीक आहे, तो तुमचा
अनुभव झाला.
माझे असे म्हणणे आहे कि
सिनेमाच्या थेटरमध्ये जातांना नेहमी उत्साही आणि ताजेतवाने दिसतात. पण सिनेमा
सुटल्यानंतर त्यांचे चेहरे अगदी सुकून जाऊन ते निरुत्साही आणि मंद दिसतात. बाहेर
आल्यावर ते उत्साही न दिसता दमलेले दिसतात. असा अनुभव आहे कि नाही?
तुम्ही सिनेमा पाहू नका असे मी
म्हणत नाही.परंतु ते नेहमी आणि अनेक सिनेमे बघणे चांगले नाही.
तुम्ही नेहमी ताज्या बातम्या
जरूर पहाव्यात पण तोच तोच हिंसाचार, घरगुती भांडणे आणि तत्सम गोष्टी सारखे बघणे
चांगले नाही. तुम्ही जर नेहमीच ते बघत असल् तर डोळे मिटल्यावरही तुमच्या
डोळ्यांसमोर तोच हिंसाचार दिसतो. आणि साधकांसाठी हे चांगले नाही.
प्रश्न: गुरुजी, मला काही
प्रश्न विचारायचा नाहीये. मी तुमची भक्ती करितो आणि (माझ्या आयुष्यातील) सर्व
गोष्टींसाठी तुमचे आभार मानू इच्छितो. पण तुम्ही मला जर काही सांगू इच्छिता का?
श्री श्री रविशंकर: तर मग ऐका, मी असे
नेहमीच सांगत आलो आहे कि मला जे सांगायचे असते ते मी नेहमीच सांगतो, होय कि नाही?
प्रश्न: ( ऐकू आला नाही,
प्रेक्षकांपैकी कोणीतरी प्रश्न विचारतोय)
श्री श्री रविशंकर: असे पहा कि भविष्य
म्हणजे तुमचे कर्म किंवा प्रारब्ध असा विचार कधीही करू नका. भूतकाळ हा प्रारब्ध,
भविष्य हे तुमच्या हातात आहे,हे समजून वर्तमानकाळी आनंदी रहा.असा विचार करणे हे
शहाणपणाचे आहे. मुर्खलोक काय करतात माहितीये? ते नेहमीच भूतकाळ हा त्यांच्या हातात
होता असे समजून त्याबद्धल पश्चात्ताप करीत बसतात तर भविष्याला प्रारब्ध समजून
त्याबद्धल ते काहीही करीत नाहीत आणि वर्तमानकाळात दुखी राहतात. म्हणजे तुम्हाला
दोन पर्याय आहेत, आले लक्षात?
प्रश्न: शिव-लिंग यामागे काय
तत्व आहे? समजावून सांगा.
श्री श्री रविशंकर: प्रेम म्हणजे शिव. शिव
हे एक असे तत्व आहे कि जे सर्वत्र आहे. जी गोष्ट सर्वत्र असते
त्याला आपण कसे ओळखणार? त्याची
ओळख पटविण्यासाठी त्याला काही एक चिन्ह दिले, एक विशिष्ट आकारातील मूर्ती केली, हे
इतके सोपे आहे.
देव हा त्या आकारात नाही, तर
देवाची आठवण करून देण्यासाठी तो आकार आहे.तुम्ही तुमच्या आजोबांच्या फोटोकडे बघून
म्हणता हे माझे आजोबा आहेत. फोटो तुम्हाला तुमच्या आजोबांची, आजीची, आईची आठवण
करून देतो. पण तो फोटो म्हणजे तुमचे आजोबा किंवा आजी आहे काय? तर नाही. तो फोटो
फक्त तुम्हाला आठवण करून देण्यासाठी असतो. त्याचप्रमाणे त्या आकाराची माध्यमातून
आपण त्या आकारापलीकडील तत्वाची पूजा करीत असतो.
प्रश्न: असे म्हणतात कि इस्लाम
आणि ख्रिस्ती तसेच ख्रिस्ती आणि हिंदू यात साधर्म्य आहे. तसेच हिदुत्व आणि बौद्ध
यात काही साधर्म्य आहे काय?
श्री श्री रविशंकर: होय निश्चितच आहे. गौतम
बुद्ध हे जन्माने हिंदू होते , मग त्यांनी संन्यास घेतला. गौतम बुद्धांनी जे
सांगितले आहे आणि उपनिषदांमध्ये जे सांगितले आहे त्यात काही फरक नाहीये. ते अगदी
सारखे आहे. हिंदू धर्मात अनेक चालीरीती व कर्मकांडे सांगितली आहेत, गौतम बुद्ध
म्हणतात कि त्यांची गरज नाहीये. बळी म्हणून प्राणी-हत्या करता काम नये. यज्ञाची
गरज नाहीये. म्हणून बुद्धाने लोकांना यापासून ध्यानाकडे नेले आहे. बुद्धाने
ध्यानाविषयी बरेच काही सांगितले आहे.
बुद्ध-धर्मात असे सांगितले आहे
कि सर्वांनी सुखी राहावे, सर्व देव आपली काळजी घेत आहेत. आणि उपनिषदात हेच
सांगितले आहे.
प्रश्न: अजूनपर्यंत श्रीलंकेत
तमिळ लोक का दुखः सहन करीत आहेत? हे सर्व नकारात्मक कर्मांमुळे तर नव्हे?
श्री श्री रविशंकर: हे असे का विचारणे हा
पण एक प्रश्नच आहे. ते अजून का दुःख सहन करताहेत हेच समजत नाहीये. आपण
त्यांच्यासाठी काय करू शकतो असे विचारा. आपण ते दुखी का आहेत असे विचारण्यापेक्षा श्रीलंकेतील
तमिळ लोकांसाठी काय करू शकतो असे विचारा. त्यादृष्टीने काम करण्याची गरज आहे.
स्वामीजी सद्योजाथा आणि त्यांचे आश्रमातील स्वयंसेवक हे त्यासाठी एकत्र काम करीत
आहेत. तुम्ही जर त्यांच्यात सामील झालात तर लवकरच आपण ती परिस्थिती सर्व-साधारण
करू शकतो.
प्रश्न: गुरुजी, मी तुम्हाला
आणि अण्णांना हि मोर-पिसे देऊ इच्छितो.
श्री श्री रविशंकर: ते पंख तुम्ही
तुमच्याजवळ ठेवा, तुम्हाला ते उडायला मदत करतील. आम्ही अगोदरच उडत आहोत. तुम्हाला
त्यांची गरज आहे,ते तुमच्याजवळ ठेवा आणि
उडायला शिका. मी पंख घेत नाही तर दुसऱ्यांना ते देत असतो!

© The Art of Living Foundation