मीच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे !

२१ फेबृवारी २०१२

प्रश्न: गुरुजी चित्त म्हणजे काय?
श्री श्री: चित्त म्हणजे आकाश जे सगळीकडे आहे. चेतनेला सुद्धा चित्त म्हणतात – चैतन्य शक्ती. चिती, चैतन्य, चित्त हे पाणी, बर्फ आणि वाफेसारखे आहेत आणि चित्त चे प्रकार आहेत. जेव्हा ते घनरूप होतं, तेव्हा ते चित्त आणि जेव्हा द्रवरूप होतं तेव्हा चिती.
प्रश्न: आपण मंदिरात घंटानाद का करतो?
श्री श्री: कारण तुमच्या मनात इतके विचार चालू असतात तेव्हा घंटानाद केल्या मुळे तुम्ही वर्तमान क्षणात येऊन पोहोचता. तुमचे वेगवान विचार थांबतात. ढोलक वाजवणारे मोठे ढोल वाजवतात, नादस्वरम, शहनाई, घंटा आणि शंख. हे सगळे स्वर तुमचं मन शांत करण्या साठी. तुमचं मन एका लहान मुलासारखं आहे. जेव्हा एक लहान मुलगा रडत असतो, तुमची त्याच्या पेक्षा जास्त जोरात रडल्याने तो मुलगा रडण्याचं थांबवतो. हे तुमच्या लक्षात आलं आहे का? तसच जेव्हा तुमच्या मनात खूप विचार चालू असतात, तेव्हा शंख, घंटा आणि इतर आवाजांनी मन शांत होतं. बाहेरच्या इतक्या आवजांमुळे, मन विचार करू शकत नाही, म्हणून असं केलं जातं. बाहेरील आवाज मनाला थोड्या वेळासाठी का होईना शांत करतात. ह्यामुळेच मनाला शांती मिळते. मन शांत आणि ध्यानात असल्यावर सगळे शब्द एका ओझ्यासारखे वाटू लागतात. जेव्हा मनात खूप शब्द चालू असतात, खूप विचार असतात, तेव्हा हे आवाज शांती देतात. बौद्ध विहार मध्ये तुम्ही ती मोठी घंटा बघितली आहे का? त्या घंटानादमुळे तुम्हाला मनाची शांती मिळेल. आवाजापासून शांतीकडे जाणारा प्रवास खूप महत्त्वाचा आहे.
प्रश्न: देवाने चांगले आणि वाईट दिसणारे लोक कशाला बनवले? हे त्या लोकांच्या पूर्व आयुष्यातलं कर्म आहे का?
श्री श्री: सुंदरता हे त्या व्यक्ती कडे बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुम्हाला असं वाटतं कि कोणी दिसायला सुंदर नाहीये? त्यांच्या आई किंवा आजीला विचारा. त्यांना त्यांची मुलं कधीच कुरूप वाटणार नाहीत. आणि सुंदर आणि कुरूप म्हणजे का? तुम्ही किती काळ जगू शकता? जे सुंदर आहेत ते काही काळानंतर तसे दिसत नाहीत. सौंदर्य दिसण्यात नसून आत्म्यामधे आहे. आत्म्या कडे बघा त्यात किती सौंदर्य आहे. आत्म्याची सुंदरता सदैव राहणारी आहे. ती दिवसेन्दिवस वाढतच जाते. आणि ती वयाने सुद्धा वाढते.  ज्ञान आणि परिपक्वता यांमुळे सौंदर्य वाढतं. सौंदर्य म्हणजे फक्त दिसण नव्हे. कोणी तरी चांगला मेकप करून सुंदर दिसू शकत. पण जर त्याचं मन कुटील असेल आणि त्यात खूप नकारात्मक उर्जा असेल, तर त्या व्यक्तीच्या तरंगामुळे तुम्हाला लगेच कळेल नाही? म्हणून मन तुम्हाला सुंदर बनवतं.
प्रश्न: सात चक्र आणि सात अस्तित्वाच्या स्तरांमध्ये काय संबंध आहे?
श्री श्री: फक्त सात हा आकडा सारखा आहे.
प्रश्न: गुरुजी, ह्या शुक्रवारी सायंकाळी बेंगळुर शहरामध्ये योग रेव आहे. तुम्ही सगळ्यांना आवर्जून यायला सांगाल काय?
श्री श्री: बेंगळुर मध्ये ‘ताज  सिटी’ मध्ये शुक्रवारी योग रेव आहे. उत्तम ! धमाल करा !
प्रश्न: गुरुजी, मृत्यू नंतर जीवन आहे का? असं म्हणतात कि सात जन्म असतात. हे सगळे सात जन्म मिळून मनुष्य जन्म मिळतो कि मनुष्य जन्म नंतर हे सात जन्म मिळतात?
श्री श्री: हो मृत्यू नंतर जीवन आहे. आपल्याला परत यावं लागेल. परत येत राहव लागेल. सात असं काही आकडा नाहीये, कितीही वेळा यावं लागेल.
प्रश्न: गुरुजी, मौनाचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि दररोज मौन कसं पाळलं जाऊ शकत्?
श्री श्री: दररोज मौन पाळण्याची गरज नाहीये आणि खूप बोलण्याची पण गरज नाहीये. जर तुम्ही मौन पाळत असाल तर बोलण्या आधी विचार करून बोलाल. जर तुम्ही सारखे बोलत राहाल तर स्वत: बोललेले तुम्हाला समजणार नाही.
प्रश्न: गुरुजी, मला फक्त सेवा, साधना करायची आहे आणि ज्ञान मिळवायचं आहे. पण माझं मन सगळीकडे जातंय आणि पुरुषांकडे आकर्षित होतंय. मला तिथे नाही जायचंय. मला माझं मन तुमच्याकडे वळवायचं आहे. मी काय करू?
श्री श्री: तुम्हाला लग्न करायचं? उत्तम ! पुढे चला आणि बरोबर नवरा शोधा. आर्ट ऑफ लिविंग विवाह सुचक मंडळात नाव नोंदवा किंवा स्वत:च एकादा पसंत करा.
प्रश्न: गुरुजी, ध्यानात बसलेल्या लोकांचे फोटो काढण्यात आले आहेत. आणि पांढरे ठिपके दिसले आहेत. कोणी असही म्हणतात कि ते धुळीचे कण आहेत.
श्री श्री: ते ठीक आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा सगळे देवी-देवता आणि देवदूत आपल्या आजू बाजूला असतात.
प्रश्न: गुरुजी, मला लग्न नाही करायचं.
श्री श्री: ठीक आहे. जर तुम्हाला लग्न नाही करायचं तर मग ठीक आहे.
प्रश्न: गुरुजी, असं म्हटल आहे कि अमावास्ये च्या रात्री बाहेर पडू नये. असं का?
श्री श्री: जुन्या काळी अमावास्येचा रात्री अतिशय काळोख असायचा आणि वीज सुद्धा नव्हती. लोकं म्हणून बाहेर जायला नाही सांगायचे, कारण चुकून सापावर पाय पडू नये किंवा खड्ड्यात व्यक्ती पडू नये. अमावास्येच्या रात्री ग्रहांची रचना सुद्धा इतकी सोयीची नसते.
प्रश्न: गुरुजी, जीवनाचं सार काय आहे?
श्री श्री: तुम्हाला जीवनाचं सार माहिती करून हवय? उत्तम ! इथे येऊन बसत राहा आणि एक दिवस तुम्हाला उमजेल.
प्रश्न: गुरुजी, मी माझे विचार व्यवस्थित रित्या कसे पोहोचवू? मी एक काही विचार करतो आणि काही वेगळच बोलून जातो?
श्री श्री: तुम्ही हा प्रश्नच उत्तम रित्या विचारलेला आहे जेणे करून तुम्ही तुमचं मत प्रदर्शित करत आहात. अजून अडवान्स कोर्स करा. तुमच्या मध्ये बदल झाला आहे असं तुम्हाला नाही का वाटतं? तुमच्या मध्ये किती बदल झाला आहे? ५०%? म्हणून तुम्हाला माहिती आहे कि तुम्ही अजून बदल घडवू शकता कोर्स केल्याने. आणि बेसिक कोर्स परत घ्या, असं नका समजू कि एकदा केलं कि झालं. जर तो तुम्ही परत घ्याल तर परत एक नवीन दृष्टीकोन मिळेल.
प्रश्न: गुरुजी, जर एक मुलगा आणि मुलगी लग्न करत असतील तर मग लग्नपत्रिका जुळवावी का?
श्री श्री: लग्नपत्रिका जुळवू शकता, चालेल. जर स्थळ उत्तम असेल आणि पत्रिका नसेल जुळत तरी ठीक आहे. प्रार्थना करा. सगळ काही चालेल.
प्रश्न: गुरुजी, आम्ही एक गोशाला बांधण्यासाठी काम करतोय पण यश मिळत नाहीये.
श्री श्री: जे काही सुरु कराल तिथे अडचण येईल. शेती मध्ये सुद्धा बऱ्याचदा मेहनत घेऊन सुद्धा यश मिळत नाही. थोड्या फार अडचणी येतील.
प्रश्न: नेत्रदान करण्याचे काय महत्त्व आहे?
श्री श्री: महत्त्व हे कि तुम्ही नसल्यावर सुद्धा तुमचे डोळे कोणाच्या कामास येऊ शकतात.
प्रश्न: गुरुजी, एकदा कोर्स केल्याने लोकं हळू दूर होऊन जातात. त्या सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी काही उपाय सांगा. मी उद्या घरी चाललो आहे. माझ्या बरोबर राहा.
श्री श्री: सगळीकडे प्रोग्राम आणि सत्संग करा आणि त्या लोकांना जबाबदारी द्या. जबाबदारी दिली तर ते लोकं काम करतील. जे पाहुण्यांसारखे येतात, आपण त्यांना पाहुण्यांसारखे वागवतो आणि मग ते पाहुण्यांसारखे निघून पण जातात. जर आपण त्यांना जबाबदार लोकं समजलं तर मग ते येतील. घरी जाताना आनंदी राहा. मी सदैव तुमच्या बरोबर आहे – श्रीलंकन आणि तमिळ लोकांनो.     
प्रश्न: गुरुजी, असं म्हटलं गेलं आहे कि जेव्हा कृपा असते, तेव्हाच आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि कोणी म्हणतात की जो पर्यंत उत्तरं नाही मिळत तो पर्यंत तुम्हाला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. मग काय बरोबर आहे? तुमच्या कडून उत्तरं कशी मिळवावी?
श्री श्री: आता जे तुम्ही विचारलं आहे, तर मीच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. मी काय उत्तरं देऊ? तुमच्या मनामध्ये मी समोर आल्यावर कोणताही प्रश्न उरतो का? सगळ स्वच्छ होऊन जातं. ठीक आहे ना मग ! हृदय उघड्ल्यावर सगळे प्रश्न अदृश्य होतात असं उपनिषद मध्ये म्हटलं आहे. मी हेच चार दिवसांपूर्वी म्हटलं होतं. नाही? म्हणून मग आपण काही प्रश्न आहे तो काढायचा प्रयत्न चालू आहे. नाहीतर मला काही बोलायचं नाही तुम्हाला काही ऐकायच नाही, आणि तुम्ही आनंदी आणि मी पण आनंदी. आपण एका आनंदी जीवनात आहोत. मग आपण शब्दांनी नव्हे तर शक्तीने बोलतो, नाही का?
प्रश्न: गुरुजी, राजस्थान मध्ये सती माता मध्ये खूप विश्वास केला जातो. शिवा ची सती. राजस्थान ची सती माता आणि शिवा ची सती हे एकच आहेत का? की वेगवेगळे आहेत?
श्री श्री: शक्ती च्या सगळ्या स्वरूपामध्ये एकच सती आहे. शिवाच्या शक्ती ची पूजा लोकं वेगवेगळ्या रूपांमध्ये करतात. पण हि प्रथा ज्या मध्ये कोणी सती बनते (प्रथा जिथे बायको पतीच्या जळत्या चिते मध्ये उडी घेते) कुठेच नाहीये. जर असं असतं तर महाभारत मध्ये कुंती सती बनली असती. अशी बरीच  उदाहरणे आहेत जिथे बायका नवरा मरण पावल्यावर जिवंत राहिल्या आणि सती नाही गेल्या. काही मधील काळांमध्ये हे सुरु झालं. हे व्हायला नको. हे बरोबर नाहीये. शास्त्रांमध्ये आणि वेदांमध्ये असं कुठेच नाही म्हटलं आहे कि पुरुष स्त्रियांपेक्षा उच्च आहे किंवा स्त्रिया पुरुषांपासून निम्न आहेत. सगळे सारखे आहेत. जाती, धर्म आणि लिंगावरून भेद करू नका. सगळ्यान मध्ये एकाच देवाला बघा. सगळ्यांमध्ये एकचं देव आहे, एकच आत्मा, असचं मी म्हणेन.
प्रश्न: आपल्या देशात किती तरी आध्यात्मिक संघटना आहेत पण ते एकत्र येऊन काही काम का नाही करत? जर हा भेद राहिला तर मग हे जग एक कुटुंब कसं बनेल?
श्री श्री: हो ! आम्ही तयार आहोत आणि आम्ही इतर संघटनांना बोलावतो. रविंद्रनाथ टागोर म्हणतात ‘ऐकला चलो रे’ म्हणजे एकटे चालू लागा, कोणी तुमच्या बरोबर आलं तर उत्तम, पण तुम्ही चालू लागा.
प्रश्न: गुरुजी, मला माहित करून घ्यायचे आहे कि गुरु सुद्धा भक्तांपुढे हतबल होतात काय?
श्री श्री: नक्कीच ! ते त्यांच्या भक्तांचे नोकर असतात.
प्रश्न: गुरुजी, आम्ही आपल्या सेवे मध्ये यम आणि नियम कसा आणावा?
श्री श्री: दररोज ध्यान करा. मनामध्ये एक संकल्प करा कि तुम्हाला यम आणि नियमाने सेवा करायची आहे. संकल्प ठेवा आणि एकदा दोनदा तो मोडला तरी चालेल.
प्रश्न: गुरुजी, तुम्हाला आमचे प्रश्न विचारण्या आधीच कसे कळतात? काही करण्या आधीच त्याचे उत्तर मिळून जाते आणि मला माहित आहे की हे सगळ तुमच्या मुळेच आहे. मला जरूर सांगा कि हे कसं होतं?
श्री श्री: माझे गुपित कसं काय सांगू?
     


The Art of living
© The Art of Living Foundation