देवाचे तुमच्यावर प्रेम आहे याचा पुरावा मागू नका.
१८ फेब्रुवारी २०१२
प्रश्न : गुरुजी,कधी कधी तुम्ही सांगता की, ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ (कृती) आणि कधी तुम्ही आम्हाला
सांगता 'विश्राम
मे राम है' (आराम). मी आराम केला पाहिजे की
कृती?
श्री श्री: विरोधी मूल्ये परस्पर पूरक असतात. तुम्ही काम केलेत तर तुम्ही नीट आराम करू
शकाल; तुम्ही
विश्राम केलात तर तुम्ही नीट काम करू शकाल. काहीच काम न करता तुम्ही आडवे पडून
राहाल, तुम्ही
आरामही करू शकणार नाही आणि जर विश्रांती न घेता तुम्ही फक्त कामच करत राहाल तर
तुम्ही तुमचे कामही नीट करू शकणार नाही. म्हणून विश्राम आणि काम दोन्ही बरोबर
जातात.
प्रश्न : गुरुजी, एखाद्याला ज्ञान
त्याचा कर्मानुसार मिळते का?
श्री श्री : ज्ञान
मिळवण्यासाठी
ते मिळवण्याची इच्छा जागृत करावी लागते. आता जर तुम्ही मला विचाराल, की ज्ञान मिळवण्याची इच्छा
एखाद्याच्या कर्मावर अवलंबुन असते का? हो! पण ज्ञान कर्म नष्ट करते.
प्रश्न : गुरुजी, आयुष्यामधे शिस्त राहण्यासाठी काय करावे?
श्री श्री :पहिल्यांदा शिस्त असण्याची इच्छा मनात असायला हवी, आणि ती असेल तर असे मानून चला की
तुमचे काम झाले आहे.
शिस्त तीन करणामुळे येते
१. प्रेम. जरी प्रेमामध्ये शिस्त गरजेची नसली तरी प्रेमाने शिस्त मिळवता येते.
२. भीती. जर तुम्ही कुणाला म्हणलात की, ' शिस्त पाळली नाही, तर आजारी पडाल', तर तो माणूस आजाराच्या
भीतीने शिस्त पाळेल.
३. लोभ किंवा हाव: जर तुम्ही कुणाला असे म्हणलात की ,'तुम्ही शिस्त पाळली नाहीत तर
नुकसान होईल' तर त्यासाठी तो माणूस शिस्त पाळेल.
निर्व्याज प्रेमातून आलेली शिस्त असणे हे सगळ्यात चांगले.
प्रश्न : गुरुजी , असे खूप वेळा दिसून आले की तुम्ही एखाद्या शहरात येणार आहात या बातमीनेच
भांडणे सुरू होतात. सेवा इतकी भांडणे कशी भडकवू शकते?
श्री श्री : पहिल्यांदा भांडण सुरू होते, मगच गीता सुरू होते!
होय, मी शहरात येण्याआधी भांडणे
होतात. मी हे ऐकले आहे.
'गुरुजी कुठे राहतील, कुणाच्या घरी राहतील?'आणि प्रत्येक जण म्हणतो,
'माझ्या घरी.'
मी असे करेन आणि
मी तसे करेन.... असे सगळे सुरू होते. काय करायचे? मला आश्चर्य वाटते.
संघर्षाशिवाय प्रेम नाही आणि प्रेमाशीवाय संघर्ष नाही. इथे नाहीतर तिथे हे दोन
एकत्र येतातच.
प्रश्न : गुरुजी, ध्यान करताना मिळालेली अवस्था टिकवण्यासाठी मी काय करू?
श्री श्री : तुम्ही आत्ता जे करत आहात ते करत राहा. तुम्ही ते करत राहीले पाहिजे,
पुन्हा पुन्हा.'बार बार रघुवीर समाई'.
परत परत ध्यान
करा.
ध्यान, साधना आणि सत्संग करा आणि त्याबद्दल बोला. तुम्ही जे बोलता, विचार करता आणि कृतीत
आणता ते प्रत्यक्षात उतरते.
तुम्ही साधना कराल आणि एरव्ही वाईट
गोष्टींबद्दल बोलाल तर साधनेतून मिळालेला सगळा रस हळू हळू निघून जाईल. म्हणून आपल्या वाणी मधून त्याचा
पडताळा येऊ दे. जेंव्हा बोलाल तेंव्हा ज्ञान बद्दल बोला, प्रेमाबद्दल बोला. तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की या
गोष्टी तुमच्या आयुष्यात उतरत आहेत. हे सत्संगाचे महत्व आहे.
सत्संगमध्ये आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलतो, ज्ञाना बद्दल, ध्यानाबद्दल आणि
चमत्काराबद्दल बोलतो.
कुणाच्या तरी आयुष्यात घडणार्या चमत्कारा बद्दल तुम्ही बोलता- तुम्ही हीच
चर्चा करता नाही का? तुमच्या पैकी किती जण फक्त चमत्काराबद्दल बोलता?जेंव्हा तुम्ही फक्त
चमत्काराबद्दल बोलता तेंव्हा काय होते? दररोज काहीतरी नवीन घडते आणि तुम्हाला रोज नवीन
काहीतरी शिकायला मिळते.
अशा प्रकारच्या चर्चांमुळे मन अधिक ताकदवान बनते. होय!
प्रश्न : गुरुजी, मी मला हवे तेंव्हा मौनात जाऊ शकतो का? मला त्याचा फायदा होईल असे मला
वाटते.
श्री श्री :
होय! इतराना विचारा आणि बघा; तुमच्या कुटुंबीयांना विचारा!
असे मौन ठेवू नका की ज्यामुळे इतराना गैरसोय किंवा त्रास होईल. कमी बोला आणि
जितके गरजेचे आहे तेव्हडेच बोला.
तुम्ही मीत भाषी, गीत भाषी, प्रिय भाषी आणि सत्य भाषी असावे. कमी बोला, कामाचे तेवढेच बोला, आनंददायी बोला आणि
सत्याबद्दल बोला.
प्रश्न : गुरुजी, सत्गुरुंकडून काय मागावे? सत्गुरु असताना प्रार्थनेची गरज असते का?
श्री श्री: जशी गरज असेल तसे तुम्ही मागा, म्हणूनच त्याला गरज म्हणाले आहे.
तुम्ही बसून विचार करू शकत नाही की मी काय मागू? तुमची जी गरज आहे, मागणी आहे तेच प्रश्न म्हणून, विनंती म्हणून पुढे येईल. होय!
प्रश्न: गुरुजी, जर चैतन्य निराकार आहे,
तर साकारावर
विश्वास ठेवावा की फक्त निराकारावर
विश्वास ठेवावा?
श्री श्री : जर
तुम्ही निराकारापर्यंत पोचला असाल तर ठीक आहे! रूपे ही निराकाराचाच भाग आहेत.
तुम्ही निराकाराशी जोडले जाऊ शकत नाही, म्हणून तुमचे डोळे उघडे असतात
तेंव्हा तुम्ही साकाराशी जोडले जाऊ शकता. पण जेंव्हा तुम्ही डोळे बंद करून ध्यानात
जाता, तेंव्हाच
तुम्ही निराकाराशी
जोडले जाऊ
शकता.
अशाप्रकारे सुरूवात होते पण नंतर तुमच्या असे लक्षात येईल की डोळे बंद असतील
किंवा उघडे तुम्ही निराकाराबरोबर असाल.
प्रश्न : गुरुजी, जेंव्हा मी साधना किंवा कामाकडे लक्ष
देतो तेंव्हा माझे नाते अडचणीत येते. मला साधनेकडे लक्ष देत असतानाच आजूबाजूचे
सर्व लोक आनंदात हवे आहेत. मी हे कसे मिळवू?
श्री श्री: कौशल्याने! तुम्हाला दोन्ही संभाळावे लागेल. ते उत्स्फूर्तपणे येईल.
प्रश्न : गुरुजी, मला कधी सेवा करायला वेळ नसतो. देणगी ही पण सेवा समजली
जाऊ शकते का?
श्री श्री: होय! ती पण सेवाच आहे.
हे पहा, तुम्हाला जे शक्य आहे ती सेवा आहे.
समजा, तुम्ही जर दगड उचलू शकत नाही, तर तुम्ही ते करायची गरज नाही. तुम्हाला जे शक्य नाही ते
तुम्ही करू शकत नाही. जर दुसरे कोणी करू शकत असेल, तर त्याना ते करायला लावणे हा पण
सेवेचाच भाग झाला. त्याचप्रमाणे जर तुम्ही स्वतः जाऊन विद्यार्थ्याला शिकवू शकत
नसाल, तर
तुम्ही दुसर्या शिक्षकाकरवी मदत करू शकता. ते शिकवतील.
तर, सेवा
म्हणजे जे तुम्ही करू शकता, होय!
तुमच्याकडे वेळ असेल तर वेळ द्या. पैसा असेल तर पैसा द्या. ज्या कुठल्या
मार्गाने तुम्ही दुसर्याला मदत करू शकता ती सेवा आहे.
प्रश्न :.
गुरुदेव, तुमचे
इतके सारे शिष्य आहेत. तुम्ही प्रत्येक शिष्याच्या अध्यात्मिक प्रगतीचा माग कसा ठेवता?
श्री श्री : ते माझे गुपित आहे. (गुरुजी हसत
म्हणतात!)
प्रश्न :
प्रिय गुरुजी, जगातील कोणीही प्रेमी त्याच्या जोडीदाराचे लाड
करतो, त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देतो. असेच समाधान दैवी प्रेमातून कसे मिळवता
येईल?
श्री श्री: देवाने तुमचे आधीच इतके लाड केले आहेत. लक्षात घ्या की तुमचे आधीच इतके लाड
केले आहेत आणि ते होत राहतील.
प्रश्न : गुरुजी, रोजच्या आयुष्यात आपण 'कर्म बंधन' कसे टाळावे?
श्री श्री: जेंव्हा
लालसा किंवा द्वेष असतो तिथे कर्म बंधन येते. द्वेष आणि लालसा हे दोन्ही 'कर्म बंधन' आहेत.
कुठलीही कृती जेंव्हा लालसा किंवा द्वेष यांच्याशिवाय असते, एक हास्य ठेवून, मोकळ्या मनाने आणि
स्वच्छ हृदयाने केली जाते तेंव्हा बंधन नसते. अशी कृती आतले स्वातंत्र्य मिळवून
देते.
प्रश्न:
जे दृष्टिहीन आहेत अशा लोकांसाठी तुम्ही कृपया काही बोलाल का?
श्री श्री: होय! दृष्टिहीन असणे हा तुमच्या प्रगती मधील अडथळा नाही. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे.
सुरदास, मोठे संत हे दृष्टिहीन होते. धृतराष्ट्र हा मोठा राजा होता ज्याने भारतावर
राज्य केले तो सुद्धा अंध होता. अशी बरीच उदाहरणे आहेत.
स्वामी श्रद्धानंद हे या शतकातील एक मोठे संत अंध होते. काही दशकांपुर्वी ते
नीर्वरतले.
स्वामी श्रद्धानंद हे ब्रिंदावन मधे मंदिरात रोज जायचे. कुणीतरी त्याना म्हणले
की, ' स्वामिजी,
तुम्ही पाहु शकत
नाही, मंदिरात
इतकी गर्दी असते, तुम्ही तिथे का जाता? तुम्ही काय बघता तिथे?' ते हसले आणि म्हणाले, ' मी बघू शकत नसलो तरी
भगवान मला बघतात. त्याना मला बघायचे असते म्हणून मी तिथे जातो. मी बघू शकत नसलो
तरी फरक पडत नाही, तुम्हाला असे वाटते का की तो मला बघू शकत नाही? त्याला मला बघू देत. मी तिथे
जाण्याने त्याला आनंद होतो.'
तर, ही
भक्तीची खोली आहे, प्रेम आणि आत्मविश्वासाची खोली आहे - की देवाचे माझ्यावर प्रेम आहे. देवाचे
तुमच्यावर प्रेम आहे याचा पुरावा तुम्ही मागू नका. तुम्ही ते कधीही विचारू नये.
नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्यावर प्रेम करतो, बस्स! पूर्ण विराम! त्यापुढे
प्रश्न चिन्ह नाही.
तुमच्या आयुष्यात असणार्या प्रत्येकाबद्दल हे खरे आहे, इतरांच्या तुमच्यवर असणार्या प्रेमावर शंका घेऊ नका.
गुरुजी माझ्यावर प्रेम करतात का? हा प्रश्नच नसला पाहिजे.
त्याचप्रमाणे माझा मित्र माझ्यावर प्रेम करतो की नाही, माझा पती माझ्यावर प्रेम करतो की
नाही, किंवा
माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते की नाही - प्रेमासमोर प्रश्नचिन्ह ठेवू नका. ते
तुमच्यावर प्रेम करतात यावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. त्यांची वागणूक कशीही असु
देत.
प्रेममधे सगळे स्वाद आहेत. हे सगळे स्वाद प्रेमाचच भाग आहेत आणि ते अनुभवताना
तुम्ही आरामात असले पाहिजे.
प्रश्न : गुरुजी, देव हा या सृष्ट्रीचा संचालक आहे आणि आपला पिता. मग दुक्ख, दारिद्र्य आणि दुर्लक्ष
का आहे?
श्री श्री : कुणीतरी एका संताला हाच प्रश्न विचारला,'जगामध्ये दुक्ख का आहे?' संत म्हणाले,' देवाने ते माझ्यासाठी
ठेवले आहे. का? कारण जगात इतके दुक्ख असूनही मी जग सोडू शकत नाही, जर दुक्ख नसते तर मी ते कसे
सोडले असते? आणि जर मी ते सोडले नाही तर मी माझे लक्ष देवाकडे कसे वळवू?'
देवाकडे लक्ष कधी जातच नाही.
म्हणून संत म्हणाले, ' मी जगात अडकू नये अशासाठी दुक्ख आहे. इतके दुक्खअसूनही मी
यात इतका अडकलो आहे आणि मी देवाकडे वळतच नाही. म्हणूनच देवाने हे जग दुक्खमय बनवले
आहे, त्यामुळे
थोडावेळासाठी याची मजा घेऊन ते सोडून द्यायचे आणि देवाकडे वळायचे.' म्हणूनच असे म्हणतात की,
'दुख मे सुमिरन
करे, सुख
मे करे न कोय, सुख मे सुमिरन जो करे, दुख काहे को होये.'’
प्रश्न : गुरुजी, गुरू, धर्मगुरू आणि सत्गुरु
यामध्ये काय फरक आहे?
दुसरा प्रश्न असा की, असे म्हणले जाते की या विश्वात, कुठल्याही युगात, फक्त एकाच सत्गुरु असतो;
असा सत्गुरु कोण
आणि ते जर तुम्ही आहात का, कृपया उत्तर द्या?
श्री श्री : असे म्हणतात की, 'मेरे गुरुही जगत् गुरू
है - मेरे नाथ ही जगत् नाथ के है' (माझे गुरू जगाचे गुरू आहेत.) - यावरच सगळ्यानी विश्वास
ठेवला फीजे आणि हेच सत्य आहे.
धर्म गुरू, जगत् गुरू आणि सत् गुरू - ही फक्त वेगवेगळी नावे आहेत - तुम्हाला काय पाहिजे
आहे - ते घ्या आणि पुढे चला. जो सत्याबद्दल बोलतो तो सत् गुरू. सत्गुरु हे कुणाचे
नाव असु शकत नाही. सत्गुरु कोण - जो तुम्हाला सत्य दाखवतो.
जसे संगीत गुरू.,तसेच सत् गुरू. सत्गुरु तो की जो तुम्हाला सत्य आणि असत्य, जग काय आहे, आत्मा काय आहे याबद्दल
जागृत करतो. जो तुम्हाला फरक ओळखायला शिकवतो तो सत्गुरु.
प्रश्न:
जर सर्वकाही आधीच ठरलेले आहे तर माणसाने काही करायची गरज काय?
श्री श्री : जरी सर्वकाही आधीच ठरलेले असले तरी माणसाने त्याला जे आवडते आणि जे हवे आहे
ते मिळवण्यासाठी थोडे कष्ट घेतलेच पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या घरात
सूर्यप्रकाश हवा असेल तर तो पाहण्यासाठी तुम्हाला खिडक्या आणि दारे उघडावी लागतील.
तुम्ही खिडक्या बंद ठेवून सूर्यप्रकाश आत येईल अशी अपेक्षा ठेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे मध्यरात्री दारे आणि खिडक्या उघडून सूर्यप्रकाशाची अपेक्षा ठेऊ शकत
नाही.
तुमच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केलेच पाहिजेत आणि मग जे
व्हायचे ते होईल. तुमचे प्रयत्न आणि नशीब दोन्ही एकत्र जातात.
प्रश्न : प्रिय गुरुजी, मी कितीही ध्यान केले तरी मी माझा राग आवरू शकत नाही. मी काय करू?
श्री श्री : तुमचा राग काबूत ठेवण्याचा प्रयत्न करू नका, नियमीत प्राणायाम करा. या जगात
जे लोक आहेत त्याना स्वीकारा, त्याना बदलायचा प्रयत्न करू नका तर स्वीकार करा.
ध्यान करत राहा, तुम्ही ध्यान करूनही राग काबूत ठेवू शकत नसाल, तर कल्पना करा ध्यान न करता
तुमचा राग कशा प्रकारचा असेल. तर, नियमीन ध्यान आणि प्राणायाम करा, राग हळू हळू कमी होईल.
प्रश्न :गुरुजी , मी तुम्हाला गेली ४ वर्षे अगदी मनापासून अनुसरतो आहे. मी दाढी वाढवली आहे आणि
पांढरे कपडे घालायला सुरूवात केली आहे. माझे आईवडील आणि पत्नीला हे पसंत नाही.
श्री श्री: तुम्हाला हे सगळे करायची गरज नाही. तुमची दाढी काढून टाका आणि नेहमीप्रमाणे
रंगीत कपडे घाला आणि सामान्य राहा.
आदर्श असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तसेच कपडे वगैरे घाला. नाही! दयाळू
राहा, प्रेमळ
राहा आणि जे चांगले काम होऊ शकते ते करा.
प्रश्न : गुरुजी, तुम्ही शिवरात्री आणि त्याच्या महत्वाबद्दल बोलू शकाल का?
श्री श्री : महाशीवरात्री या दिवशी शिव तत्व जमिनीला, पृथ्विला स्पर्श करते. चैतन्य हे
भौतिकतेच्या नेहमी दहा इंच वर असते; औरा, आकाशीय जग हे पृष्ठभागाच्या दहा इंच वर असते, ते महाशीवरात्रीच्या
दिवशी पृथ्वी तत्वाला स्पर्श करते.
त्यामुळे त्या दिवशी जागे राहणे आणि ध्यान करणे हे लोकांच्या फायद्याचे आहे.
खूप खाऊ नका, अगदी थोडे खा आणि ध्यान करा, इच्छा पूर्ण होण्यासाठी याची मदत होते. हा पूर्वीचा विश्वास आहे.
तुमचे अस्तित्व अजुन मजबूत होण्यासाठी ते मदत करते. हे साधकासाठी नवीन वर्ष
आहे, अध्यात्मिक
प्रगतीसाठी, अध्यात्मिक प्राप्ती आणि भौतिक प्राप्ती, म्हणून हा दिवस शुभ मानतात.
या दिवसाची रात्र जेंव्हा नक्षत्र एका ठराविक स्थिती मधे असते, ती ध्यानासाठी अतिशय
महत्वपूर्ण आहे. हा पुर्विपासूनचा विश्वास आहे.
याचा अर्थ असा नाही की ते इतर दिवशी होत नाही. जेंव्हा तुमचे हृदय मोकळे असेल,
मन शांत आणि स्थिर
असेल प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो. शिवरात्रीचा दिवस पूर्वकालीन मंत्र म्हणून साजरा
केला जातो आणि उत्सव साजरा केला जातो, अध्यात्मिक ओढ असणार्यांसाठी हा अतिशय महत्वपूर्ण
दिवस आहे.
हा भौतिकाचा अध्यात्माशही विवाह आहे.
आठ पदरी भौतिक जग हे आठ पदरी अवकाशीय जगाच्या समीप आले.
आठ पदरी प्रकृती म्हणजे काय? पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहं; हे सर्व सूक्ष्म आठांच्या म्हणजे शिव तत्वाच्या जवळ
येतात.
सामान्यतः लोक खूप कमी खातात, फळे किंवा असेच काही आणि उपवास करतात. काही न खाता उपवास
करायला मी सांगणार नाही. काही फळे किंवा तसेच काही पचायला हलके खा आणि पूर्ण दिवस
जागा आणि रात्री ध्यान करा. रात्रभर ध्यान करायची गरज नाही, थोडावेळच करा.
आपण थोडावेळ सत्संग करू आणि उत्सव करू. एव्हडेच!
खरेतर प्रत्येक दिवस हा महत्वपूर्ण आहे कारण आपण रोजच सत्संग करतो. पूर्वीच्या
काळी लोक म्हणायचे की ठीक आहे, रोज जमात नाही तर कमीतकमी वर्षातून एकदा शिवरात्रीला ध्यान
करा आणि जागे राहा.
तुमच्या आतील खोल असलेल्या दैवत्वाला जागे करा. हाच संदेश आहे. देवत्व
तुमच्यामधे आहे, ते जागृत होऊ देत!
प्रश्न : पूर्ण रात्रभर झोप न येण्याचा काही अर्थ आहे का? आपण किती उशीरपर्यंत जागू शकतो?
श्री श्री : नाही. स्वतःला इतका त्रास देऊ नका. नैसर्गिक राहा.
प्रश्न : महाशिवरात्री ला महाशिवरात्री का म्हणतात? महाशिवदिवस का नाही?
श्री श्री : होय, मी याबद्दल बोललेलो आहे. पुस्तक
वाचा, रात्री
म्हणजे जे तुम्हाला सुख देते, आराम देते; कशापासून? तापापासून (दुक्ख) आराम देते ती रात्री. आदी भौतिक
(शारीरिक), आध्यात्मिक, आणि आदी दैविक.
तापत्रय म्हणजे अडचणी/ त्रास. असा काळ जो दुक्खापासून विश्रामाकडे घेऊन जाते तो म्हणजे
रात्री.

© The Art of Living Foundation