होळी प्रमाणे आयुष्य रंगीत असावे, कंटाळवाणे नव्हे. जेंव्हा प्रत्येक रंग स्पष्टपणे दिसतो, तेंव्हा ते रंगीत असते.
होळी हा रंगांचा उत्सव आहे. हे संपूर्ण जग
रंगीबेरंगी आहे. निसर्गामध्ये जसे
वेगवेगळे रंग असतात तसेच आपल्या भाव भावनान्मधेही वेगवेगळे रंग असतात : क्रोधाचा रंग लाल, द्वेषाचा हिरवा, उत्साह आणि
आनंदाचा पिवळा, प्रेमाचा गुलाबी, विस्तीर्णतेचा निळा, शांतीचा पांढरा, त्यागाचा भगवा आणि ज्ञानाचा जांभळा.
प्रत्येक व्यक्ती हे एक रंगांचे कारंजे
असते.
पुराणांमध्ये खूप रंगीत चित्रकथा आहेत आणि
होळी चीही अशीच एक कथा आहे. राक्षसांचा
राजा हिरण्यकश्यपू, याला वाटायचे कि सर्वानी त्याची पूजा करावी. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा,
जे हिरण्यकश्यपुचा कट्टर शत्रू होते, त्यांचा भक्त होता. त्यामूळे चिडलेल्या
राजाने त्याची बहिण होलीकाला प्रल्हादाला संपवण्याचा आदेश दिला. होलीकेला
मिळालेल्या वरामुळे अग्नी तिला जाळू शकत नसे. म्हणून ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन
जळत्या चितेवर बसली. पण प्रल्हाद सुखरूप बाहेर आला आणि होलिका मात्र जळून गेली.
येथे हिरण्यकश्यपू हे ऐहिक जीवनात
गुंतल्याचे प्रतीक आहे. प्रल्हाद म्हणजे निरागसता, विश्वास आणि सच्चिदानंद. आत्मा
हा स्थुलातेपुरता मर्यादित नाही तर फक्त प्रेम आहे. हिरण्यकश्यपू ला सर्व आनंद हा
ऐहिक जगातून हवा होता. पण तसे होत नाही. प्रत्येक जीवात्मा हा कायम स्थुलतेबरोबर राहू
शकत नाही. पुढे जाऊन नारायणा प्रत, उच्चते कडे जाणे हे स्वाभाविक आहे.
होलिका म्हणजे भूतकाळातले ओझे ज्याने
प्रल्हादाची निरागसता मारण्याचा प्रयत्न केला. पण नारायणाच्या भक्तीमध्ये रंगलेला
प्रल्हाद सर्व भूतकाळातील संस्कार जाळून टाकू शकला. जो भक्तीमध्ये रंगून गेला आहे
त्यासाठी नवीन रंगांबरोबर आनंद आनंदाची उर्मी येते आणि आयुष्य हा एक उत्सव बनून
जातो. भूतकाळाला गाडून टाकून नवीन सुरुवात करा. तुमच्या भावना अगीप्रमाने तुम्हाला
जाळीत असतात. पण ते म्हणजे रंगांचे कारंजे आहे, ते तुमच्या आयुष्यात मौज आणतात.
अज्ञाना मध्ये भावना म्हणजे त्रासदायक असतात पण ज्ञानामध्ये त्याच भावना रंग भरतात.
होळी प्रमाणे आयुष्य रंगीत असावे, कंटाळवाणे
नव्हे. जेंव्हा प्रत्येक रंग स्पष्टपणे दिसतो, तेंव्हा ते रंगीत असते. जेंव्हा
सर्व रंग एकत्र होतात तेंव्हा काळा रंग दिसतो. तसेच आयुष्याचे आहे. आपण वेगवेगळ्या
भूमिका बजावत असतो. प्रत्येक भूमिका आणि भावना स्पष्ट असली पाहिजे. भावनांचा गुंता
आयुष्यात प्रश्न निर्माण करतो. जेंव्हा . तुम्ही वडील असता तेंव्हा तुम्हाला
वडिलांची भूमिका करावी लागते. तुम्ही ऑफिस मध्ये वडील असू शकत नाही. जेंव्हा
तुम्ही तुमच्या आयुष्यातील भूमिकांची सरमिसळ करता, तुम्ही चुका करायला सुरुवात
करता. तुम्ही आयुष्यात जि भूमिका करत असता त्यामध्ये संपूर्णपणे रंगून जा. विविधतेमध्ये
सुसंवाद असेल तर आयुष्य उत्साही, आनंदी आणि रंगीत होऊन जाईल.
© The Art of Living Foundation