सद्गुरु हे आरश्यासारखे असतात.

१५ फेब्रुवारी २०१२
सगळ्यांचे पुन्हा एकदा घरामध्ये स्वागत आहे!
तुम्ही सगळे फार लांबून आला आहात, तर छान पैकी विश्रांती घ्या.
खूप खूप वर्षानंतर आश्रमात आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. एरव्ही महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी मोठी जागा लागते परंतु आम्ही ठरवले की आपण कसेही करून मावून जाऊया आणि सगळ्यांसाठी जागा करू या. आपल्या मोठ्या जागेची गरज सदैव भासत राहते. जर हृदयात जागा असेल तर सगळीकडे जागा आहे. याचा अर्थ असा की तुम्हा सर्वाना थोडी थोडी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तर मग आपण उद्या ध्यान आणि त्याबाबतीत बोलू या आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्यावर आपण बोलू.
तुम्ही सर्व एवढे आनंदी दिसता आहात की मला वाटते की आता काही प्रश्न उरले नसतील!
भारतामध्ये चरणस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. यामुळे फार गोंधळ उडण्याची शक्यता आहे.म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की वाकू नका,फक्त दोन्ही हात जोडा आणि जिथे कुठे तुम्ही असाल तुम्हाला आशीर्वाद घरपोच मिळतील.तर गर्दी करण्याची जरुरत नाही.
प्रश्नगुरुजी,इथे रशियामध्ये काही लोक म्हणतात की त्यांना राशीयामाध्येसुद्धा वेद सापडले आहेत. यावर तुम्ही कृपा करून काही टिप्पणी कराल का?
श्री श्री : होय, ते शक्यता आहे.
कोणे एके काळी  वेद जगात सगळीकडे होते,ते दक्षिण आफ्रिकेत, मेक्सिकोमध्ये, पेरू देशात..ते या सर्व ठिकाणी होते. ओरु देशातील माया संस्कृती हे खरतर श्रीलंकेतून तिथे पोहोचलेली आहे. ऐतिहासिक काळात कधीतरी संपूर्ण जग जोडलेले होते.म्हणूनच वेद हे एकाच देशाचे किंवा भाषेचे नाही तर ते वैश्विक आहे.
जर तुम्ही तुम्ही रशियन भाषा ऐकली तर जाणकार म्हणतात की त्यातील अनेक शब्द संस्कृत आहेत.जर्मन भाषेतपण अनेक संस्कृत शब्द आहेत.
प्रश्न: संकल्प कसा सोडावा आणि आपला संकल्प बलवान आणि परिणामकारक करण्याकरिता एखाद्याने काय करावे?
श्री श्री : पोकळ आणि रिकामे व्हा!
जेव्हा तुमच्या हृदयात संकल्प येतो तेव्हा तो संकल्प घ्या आणि तुमच्या चेतनेला काळ आणि अवकाशाच्या संदर्भात संपूर्ण विश्वामध्ये प्रसारित करा.या भल्या मोठ्या विश्वात, या अमर्याद काळामध्ये, मला हा छोटासा संकल्प घडून आलेला पाहिजे आणि मला विश्वास आहे की तो देवाच्या कृपेने सत्यात अवतरणारच.हे असा करायला पाहिजे.
एक इच्छा जाणीवपूर्वक  घेतली  तर ती नक्कीच ऐकली  जाईल.
समजा तुम्ही एखाद्याला एक प्रश्न विचारता आहात आणि तुमच्या मनात शंका आहे की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल का नाही,तर तुम्ही तो संपूर्ण प्रश्न विचारणार नाही, बरोबर? तुम्ही प्रश्न विचरताना कचराल किंवा तुम्ही प्रश्न विचारताना चूक कराल.तर मग  माणसाला संपूर्ण माहिती आहे का आणि तो उत्तर देणारच आहे हे जमेस धरून मग प्रश्न विचारणे  हीच योग्य पद्धत  आहे.
हेच बघाना जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाता आणि तिथल्या माणसाला त्या परिसरातील जागी कसे जायचे हे तुम्ही विचारता तेव्हा पेट्रोल पंपावरील माणसाला ती माहिती आहे असा तुम्हाला  पूर्ण आत्मविश्वास असतो.त्याशिवाय तुम्ही विचारणार नाही,नाही का?
तो आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे.माझी ही विनंती आहे आणि तुमच्यातील त्या आत्मविश्वासाचे  वरदान मला मिळणारच.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही आत्मचरित्र लिहिण्याचा कधी विचार केला आहे का? कृ पा करून तुम्ही कधीही सांगितलेले किस्से तुम्ही आम्हाला सांगा.मला खात्री आहे की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्याल.
श्री श्री : कधीतरी नक्कीच सांगेन!
प्रश्न: मायकेल फिशमान यांच्या "स्टम्ब्लिंग इनटू इनफीनीटी"मध्ये मी गोलीवले बाबा यांच्याबद्दल वाचले आहे. मायकेल यांच्या मते गोलीवले बाबा यांना साक्षात्कार अपघाताने मिळाला.त्यांना कोणी गुरु नव्हते. सद् गुरुच्या कृपेशिवाय साक्षात्कार मिळणे शक्य आहे का?
श्री श्री : नाही. गुरुकृपा आवश्यक आहे. परंतु जीवन हे प्रचंड अफाट आणि अमर्याद आहे. आपण केवळ याच आयुष्यात इथे आलो आहोत असे नाही. ते गोलीवले बाबा नाहीये तर गोवले गुरुजी आहे.
दिल्लीमध्ये गोवले गुरुजी नावाचा सज्जन माणूस होता जो कोटला मुबारकपूर येथे मुक्कामाला होता.माझी त्यांच्याबरोबर ओळख करून दिली होती.ते छोट्याशा जागेत राहायचे.त्यांना गुरु होते,असे नाही की नव्हते.
तेव्हा मी सतरा,अठरा,एकोणीस का तशाच काही वयाचा होतो.
"यावे ,योगीराज!" असे ते मला म्हणायचे.ते मला खूप मान द्यायचे.मला सुरुवातीला वाटायचे की ते माझी चेष्टाच करीत आहेत.मी तर केवळ एक बालक होतो;आत्तासुद्धा मी एक बालकच आहे.
प्रश्न: गुरुजी,मी पूर्ण स्वातंत्र्याने जगू शकतो का? कित्येक वेळा माझे स्वातंत्र्य हे दुसऱ्यां साठी समस्या बनते.
श्री श्री : होय, परंतु तुमच्या स्वातंत्र्यामुळे दुसरे अडचणीत येणार नाहीत यावर लक्ष द्या.तुम्ही मध्यम मार्ग स्वीकारा. जर तुम्ही तुमचे लक्ष सतत दुसऱ्यांवर केंद्रित केले तर तुमच्यावर निराश होण्याची पाळी येईल आणि जर तुम्ही केवळ स्वःताचाच विचार करीत राहिलात तर दुसऱ्यांवर हताश होण्याची वेळ येईल.या दोन्हीच्या मध्ये एक  ओळखून;थोडे द्या आणि थोडे घ्या.समजा तुम्हाला ध्यान करावे असे वाटत आहे आणि दुसऱ्या कोणाला तुम्ही त्याचे काम करून द्यावे असे वाटत असेल तर ते अगदी निकडीचे काम असेल तर ते करणेच ठीक राहील.परंतु जर ते महत्वाचे काम नसेल,जर ते दैनंदिन काम असेल,तर प्रथम तुमचे ध्यान करा,स्वःतासाठी वेळ द्या.
प्रश्न : गुरुजी.श्रोता आणि साधू(संत) यांच्या मध्ये सगळे नेहमी साधुलाच महान समजतात जेव्हा की साधूला फार साधना आणि तपस्या करावी लागते आणि तेच ज्ञान श्रोत्याला नुसते ऐकुनच प्राप्त होत असते.असे का?
श्री श्री : हा मुद्दा कश्याप्रकारे व्यक्त होतो किंवा  समजला जातो यावर अवलंबून आहे.
साधू साधा,निष्पाप आणि प्रेमळ असतो आणि ज्याला स्वःताच्या काही गरजा नसतात.जो ऐकतो तो श्रोता असतो.ऐकून घेतल्यानंतर जर त्याने जर ज्ञानाचा  वापर केला तर तोच साधू बनतो.
प्रश्न: गुरुजी,जेव्हा कधी आम्ही  तुमच्याकडे बघतो तेव्हा काहीतरी होते.जेव्हा तुम्ही स्वःताला आरशात बघता तेव्हा तुम्हाला देखील तसेच होते का?
श्री श्री : (हसून) अरे खरच का! काहीतरी होत? मी स्वःता एक आरसा आहे.जर तुम्ही माझ्याकडे पाहाल,तर तुम्ही स्वःताचेच प्रतिबिंब पाहाल.जर तुम्ही प्रेमळ आहात तर तुम्हाला माझ्यात प्रेम दिसेल.सद्गुरु हा एक आरसा आहे.
प्रश्न: गुरुजी,जेव्हा आम्ही गुरुना सर्वस्व म्हणून स्वीकारले आहे,तर मग बाकीच्या देवांना पुजण्याचे काय प्रयोजन?
श्री श्री : नाही,अशी काही सक्ती नाही.ती फक्त एक परंपरा आहे जी चालू ठेवलेली आहे. केवळ एक देव,एक ब्रह्म आहे;पण काहीवेळा आपण त्याला गणपती,कधी शिव,कधी कार्तिकेय आणि कधी जगदंबा या स्वरुपात पुजतो.जेव्हा कधी तुम्ही पूजा कराल तेव्हा केवळ त्या एकामध्ये सर्व  ब्रम्हांडाला बघा.
म्हणूनच कोणताही मंत्र किंवा कोणतीही पूजा ही गुरु पुजेनेच सुरु होते "गुरुभ्यो नमः हरिः ओम"-या प्रकारे सुरु होते. गुरूचा मान पहिला आणि नंतर देव पूजा होते.
एकात्मतेची भावना असावी-सर्वप्रथम गुरु आणि देव यांच्याशी एकात्मता,आणि नंतर अहम,गुरु आणि देव यांच्याशी तादात्म्यता.देव आणि माझ्यात काही फरक नाही. मी,गुरु आणि देव हे एकाच आहेत.यालाच म्हणतात अद्वैत. "सर्व काही एक आहे" असे म्हणत राहा,हे समजून घ्या याच्याच समाधीमध्ये विश्राम करा;ध्यान करा.
प्रश्न: गुरुजी,शिव-पुराणात भगवान शंकराला सर्वोच्च मानले आहे आणि देवी-भागवतामध्ये देवीला सर्वोच्च मानले आहे.तर यापैकी कोणते पुराण सर्वाश्रेठ आहे?
श्री श्री : ज्यावेळी तुम्ही जे वाचत आहात ते सर्वश्रेष्ठ आहे.जेव्हा तुम्ही भागवत वाचत आहात,तेव्हा कृष्ण सर्वस्व आहे. त्याच्याशिवाय दुसरे काही नाही. जेव्हा तुम्ही देवी भागवत वाचत आहात,तेव्हा तेच फक्त सर्वस्व आहे.तेच काय ते आहे.आज माझ्या ताटात जे अन्न आहे तेच आजच्या दिवसाचे सर्वोत्कृष्ट जेवण आहे.
प्रश्न : गुरुजी,आज आयुर्वेदाने सगळ्या व्याख्या बदलल्या आहेत.जर कोणी रागावले,तर ते म्हणतात ,"आज पित्ताचा प्रभाव फार जास्त आहे".जर कामामध्ये चुका झाल्या तर ते वातामुळे होत आहे आणि जर कोणी माझे वाईट केले तर ती  तमसाची भानगड आहे.गुरुजी,आयुर्वेदाने फार मोठी समस्या निर्माण  केली आहे.आता कोणी कोणाला काहीच म्हणू शकत नाही.
श्री श्री : नाही! उलट आयुर्वेदाने तुमच्यासाठी सगळ सोपे केले आहे.इतके सुलभ केले की त्यामुळे संताप आणि तिरस्कार यांना  तुमच्यात  येण्यापासून थोपवून ठेवले आहे!समस्या असलेल्या लोकांना तुम्ही समजून घेऊ शकता आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेणे तुम्हाल आता सोपे झाले आहे.तुम्ही आभार मानायला पाहिजे,धन्यवाद म्हणायला पाहिजे. आयुर्वेदाने तुम्हाला असा काही दृष्टीकोन दाखवून दिला आहे की  तुमचे लोकांमध्ये दोष शोधणे बंद होईल.
कोणाला घृणा आणि शत्रुत्व भाव आहे तर तो अज्ञानाच्यामुळे,तमोगुण आणि रजोगुणामुळे.तो अपरिपक्व आहे आणि म्हणून त्याला घृणा वाटते.
असा आहे बघा,ज्याच्याकडे जे आहे तो फक्त तेच देऊ शकतो.ज्याच्या मनात फक्त कचरा आहे तो फक्त कचराच देऊ शकतो,ज्याच्याकडे  संताप आहे तो केवळ संतापच देईल,ज्याच्याकडे शिव्या आहेत तो शिव्या देईल.
तुम्ही जेव्हा या दृष्टीकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा राग येणार नाही.निदान तुमचे मन तर शांत असेल.
प्रश्न : गुरुजी,बरेच मनोचिकित्सक म्हणतात की प्रेम ही  निव्वळ कल्पना आहे.मी असे पण वाचले आहे की खरे प्रेम हे फक्त सत्यातुनच जन्माला येते.प्रेम आणि सत्य यांचे परस्परात काही नाते आहे का?
श्री श्री : प्रेम असे काही आहे जे सगळीकडे असते. कधी ते कल्पनेत असते,कधी उत्स्फूर्त असते काही कारण नसताना.कधी ते कोण व्यक्तीला बघून उदय पावते तर कधी विश्रांती घेताना.कधी संध्याकाळी फिरायला जाताना किंवा सूर्यास्त होताना तुमच्या मनाच्या आत खळबळ होते किंवा ध्यान करताना देखील तसे घडते.
प्रेम हा तुमचा मूळ स्वभाव आहे;ते तुमच्या आत आहे आणि सदैव तुमच्या भवताली.तर मग हे प्रेम फुलायला काय कारण होईल ते सांगणे  कठीणआहे.



The Art of living
© The Art of Living Foundation