ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होण्यासाठी तुम्हाला ध्यान करायला हवे.ध्यान हे ज्ञानाचे अनुभवात रुपांतर व्हायला मदत करते.

१४ फेब्रुवारी २०१२
जरी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले आणि , कुणालाच तहान लागलेली नसली तर कोण पाणी पिणार ? होय की नाही ? त्याचप्रमाणे, प्रथम ‘मी कोण आहे ?’, ‘मला काय पाहिजे ?’ असे प्रश्न  आपल्या मनात निर्माण झाले पाहिजेत.
प्रत्येकाला  काय पाहिजे असते ? प्रत्येकाला मन:शांती,आनंद आणि समाधान हेच हवे असते. कोणाला आनंदी व्हायला नको असते ? मग आनंदी होण्याचा मार्ग काय ? मन जर भूतकाळ आणि भविष्यकाळ यात येरझाऱ्या घालीत  राहिले तर ते शांत कसे राहिल ? मनाला वर्तमान काळात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे. त्यालाच योग म्हणतात.
महर्षी पातंजलींनी म्हटले आहे, योग चित्तवृत्ती निरोध:” ( योगा हि मनाला त्याच्या वृत्तींपासून रोखण्याची किंवा मुक्ती  मिळवण्याची क्रिया आहे.) मनाच्या पाच प्रकारच्या वृत्ती असतात, ज्या क्लेशकारक असतात किंवा क्लेशकारक नसतात.
पहिली वृत्ती आहे ‘प्रमाण’- सतत असा विचार करणे की हे चूक आहे की बरोबर, प्रत्येक गोष्टीचे प्रमाण, पुरावा हवा असणे. मनाला तीन प्रकारचे पुरावे हवे असतात. प्रत्यक्ष – अनुभवातून मिळणारा पुरावा, अनुमान – अंदाजाने मिळणारा पुरावा आणि आगम – ग्रंथामधून मिळणारा मार्गदर्शनपर पुरावा.
दुसरी वृत्ती आहे ‘विपर्याय’ – गैरसमज. आपण आपला तीन चतुर्थांश वेळ केवळ विपर्यायात घालवतो.आपले लोकांबद्दलचे मत तरी चुकीचे असेल किंवा लोकांचे आपल्याबद्दलचे मत चुकीचे असेल. तुम्हाला वाटते की एक व्यक्ती चांगली आहे आणि दुसरी वाईट आहे पण काही काळानी तुमचे मत बदलते.गोष्टी जशा आहेत तशा त्या न जाणणे म्हणजे विपर्याय.
तिसरी वृत्ती आहे ‘विकल्प’ – काल्पनिक असणे ,भास होणे. जे अस्तित्त्वात नाही त्याची कल्पना करणे. काही लोक कल्पना करतात की त्यांना काहीतरी झाले आहे आणि घाबरतात. एक वीस वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता. तो अगदी तंदुरुस्त होता तरी त्याला वाटायचे की त्याला अनेक रोग झाले आहेत. डॉक्टरांनी त्याला तपासले, तर सगळे काही ठीक होते. पण तो विश्वासच ठेवेना. जे नाहीच ते आहे असे वाटणे म्हणजे विकल्प.  
चौथी वृत्ती आहे ‘निद्रा’ – झोप. जर तुम्ही काही करत नसलात तर तुम्हाला झोप येते. आजकाल लोक काम करतानाही झोपतात.लोकसभेत कित्येक लोक पेंगालेले  किंवा जांभया देताना दिसतात.
पाचवी वृत्ती आहे ‘स्मृती’ – आठवण. भूतकाळात जे काही झाले आहे त्याची आठवण ठेवणे..
या पाच वृत्तींपासून आपण मुक्त व्हायला हवे.तेंव्हा मन सुखावते. हे कसे शक्य आहे ? हे प्राणायामाने शक्य आहे आणि हे जाणणे की आतापर्यंत जे झाले ते स्वप्नवत होते. तुम्ही सकाळी दात घासले, आंघोळ केली, नास्ता केला.आत्ता या क्षणी तुम्ही मागे वळून पहा, तुम्हाला ते सगळे स्वप्नवत वाटेल.
त्याचप्रमाणे तुम्ही मागच्या वर्षी दिवाळी आणि उगादी/गुढी पाडवा आणि त्यापूर्वी इतर अनेक सण साजरे केले आहेत.तुम्हाला अनेक काळज्या होत्या, कठीण प्रसंग आणि आनंदाचे प्रसंग आले. तुम्ही त्या सर्वातून पार होऊन इथे आला आहात. आता या क्षणी तुम्हाला त्या सर्वाबद्दल काय वाटते आहे ? (प्रेक्षकांचा प्रतिसाद - ‘स्वप्नासारखे !’) हेच तर वैराग्य आहे.
त्याचप्रमाणे, आणखी काही वर्ष जातील, काही दिवस चांगले असतील , काही तितकेसे चांगले नसतील. आपण आपले निरीक्षण करून  बऱ्या वाईट स्थितीमध्ये मनाचा समतोल राखला पाहिजे.. हाच योग आहे. ‘ तदा द्रष्टा स्वरूपे अवस्थानाम्’ - द्रष्टा स्वरुपात स्थित होतो.
योग म्हणजे फक्त आसने करणे नव्हे. आसने हे योगाच्या अनेक अंगांपैकी फक्त एक अंग आहे. आसनांचा फायदा हा आहे की त्याने शरीर सुदृढ आणि बळकट बनते, श्वास कंप मुक्त होतो, मन प्रसन्न राहते , बुद्धी धारदार होते, चेतनेत स्वानुभूती होते, आणि अंतर्ज्ञान वाढते. असंख्य फायदे आहेत. म्हणूनच आपण रोज थोडावेळ योग आणि ध्यान केले पाहिजे.
आज जगातील सर्व कानाकोपऱ्यातील लोकांना याचा फायदा झाला आहे आणि ते इथे (सत्संग् च्या जागी) आले आहेत. हजारो लोक हे सगळे ‘वेबकास्ट’ द्वारे बघत आहेत.
आपल्या देशात सगळीकडे खूप अज्ञान आहे. खूप अंधश्रद्धा आहेत. काही  लोकांना असे वाटते की घरी शिवलिंग ठेवू नये, ते फक्त देवळातच ठेवायचे असते. कोण म्हणतं, शिवलिंग घरी ठेवता येत नाही ?
काही लोक फुलाच्या पाळळ्या करून त्या वेगवेगळ्या देवांच्या फोटोंना वहातात. त्याना असं वाटतं की त्यांनी जर एकाच फोटोला फुल वाहिलं तर बाकीचे देव रागावतील ! देव एकच आहे, नावं अनेक आहेत. आपण या गोंधळात कशाला अडकायला पाहिजे  ?
सूर्याच्या किरणातून जसे सात रंग दिसू शकतात तशीच  सर्व रूपं हि एकाच देवाची आहेत.मनात असा भेदभाव ठेवू नका.
देवाला तुम्ही अर्पण केलेले नारळ नको असतात. आपले जीवन नारळा सारखे असावे.नारळाच्या बाहेरचे आवरण नारळाचा कोणत्याही धक्या पासून, मग तो उंचावरून पडला तरी त्याचा बचाव करते. त्याचा ‘शॉक एब्सोर्बर’ सारखा उपयोग होतो. आपले वागणे तसेच असायला हवे. एखदी व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी आपल्या बाजूने आपली वागणूक चांगलीच असली पाहिजे. कुणी आपली टीका केली तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नये. ‘जशास तसे’ अशी वृत्ती नसावी. बूट आपल्याला चावला तर आपण बुटाला चावत नाही .
एखादी व्यक्ती वाईट वागत असेल तर ती तशी कां वागते हे जाणून घेतले पाहिजे. लगेच प्रतिक्रया देणे किंवा आपणही वाईट वागणे हे हुशारीचे लक्षण नाही. जे अशी अविचारी प्रतिक्रिया देतात त्याना तुरुंगात जावे लागते आणि मग पश्चाताप करत बसावे लागते.
आपण अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर केले पाहिजे. खेड्यापाड्यात जा आणि आणि तिथल्या लोकांना त्यांच्या मुलाना शाळेत घालायला सांगा. कर्नाटकात शत प्रतिशत साक्षरता असायला हवी.
आणखी एक प्रकारचे अज्ञान म्हणजे धर्मांतर करणे. बरच लोक धर्मांतर करतात कारण त्यांना त्याबद्दल पैसे मिळतात किंवा त्याना सांगितले जाते की, जर तुम्ही धर्मांतर केले तर तुमची सगळी पापे धुतली जातील आणि तुमचे सगळे रोग बरे होतील.
सर्व धर्म एकच प्रेमाचा संदेश देतात.
आपल्या देशाच्या सर्व परंपरांमध्ये एक खूपच महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ‘बसवण्णा वचन’मधील सांगितलेले ज्ञान आणखी कुठेच सापडणार नाही. (बसवण्णा हे कर्नाटकातील विसाव्या शतकातील एक तत्वज्ञानी होते). कर्नाटकात जन्म होण्याचे भाग्य  म्हणजे तुम्हाला  वचनांची (बसवण्णाचे लिखाण ) देणगी मिळाली आहे. या वचनात खूपच मूल्यवान ज्ञान सांगितले आहे . या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होण्यासाठी तुम्हाला ध्यान करायला हवे.
आपण अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा. भ्रष्टाचार इतका धोकादायक पातळीवर पोहोचला आहे की असे वाटायला लागते की आता याच्याहून वाईट होऊ शकत नाही.एक सी.बी.आय अधिकारी म्हणाले की भारतातला चोवीस लाख कोटी रूपये इतका काळा पैसा परदेशातील बैन्का मध्ये आहेत. आपण म्हणतो की भारत हा गरीब देश आहे आणि आपण लोकांना इथे येऊन धंदा करायला प्रोत्साहन देतो. काही लोक इथून पैसे घेतात आणि परदेशी बैन्कात गुंतवतात आणि देशावर सत्ता गाजवतात. गरीब बिचारे लोक त्यांच्या बोलण्याला भुलतात त्यांनाच पुन्हा पुन्हा निवडून देतात.
जर सगळा काळा पैसा आपल्या देशात परत आला तर दारिद्र्य रहाणारच नाही.काही लोक मला सल्ला देतात की, गुरुजी तुम्ही आध्यात्माच्या मार्गावरच रहा, राजकारणात येऊ नका.” मला सांगा, मी बोलायला हवे की गप्पा बसायला हवे ? (श्रोत्यांकडून मोठ्या आवाजात – हो, कृपया आम्हाला सांगा.)
इतर देश त्यांच्या बैन्कामध्ये किती काळा पैसा साठवला आहे याची माहिती द्यायला तयार आहेत, पण आपले त्यांना तशी सरकार परवानगी देत नाहिये. 
खेड्यांपासून ते केंद्र सरकारपर्यंत, भ्रष्टाचार सगळीकडे आहे. ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठीची एक फाईल पुढे सरकायला किती वेळ आणि कष्ट पडतात.चांगले अधिकारी आणि राजकारणीही आहेत पण ते हतबल झाले आहेत. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण सर्वानी, लाच न देण्याची व न घेण्याची शपथ घेतली पाहिजे. जर इथे कोणी अधिकारी बसले असतील तर त्यांनी शपथ घ्यावी की ते निदान एक वर्ष लाच घेणार नाहीत. जर कुणी लाच मागितली तर दहा लोकांचा गट करून जा. जर आपला  देश सुधारायचा असेल तर हाच एकमेव मार्ग आहे.
निवडणुकीच्या वेळी चांगले  उमेदवार निवडून द्या. पैसा किंवा दंडेलीचा, बळाचा वापर करणे चूक आहे. ते जो पैसा देतात तो त्यांच्या निढळाच्या घामाचा पैसा नसतो, ते देतात तो आपलाच पैसा असतो. ह्याने आपल्याला मूर्ख बनवता कामा नये. असे नाही की सगळेच राजकारणी वाईट असतात. असे चांगले अधिकारी आणि राजकारणीही असतात, कि ज्यांना आपला आधार पाहिजे असतो.  
जात आणि धर्माच्या सीमेपलीकडे जाऊन आपण समाज सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला आधार द्यायची आपली तयारी हवी. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो.तेव्हाच आपण स्वत:ला भक्त म्हणवू शकतो. देवाच्या भक्ताची देशावरही भक्ती असते. देशभक्त व्यक्तीने देवाचेही भक्त व्हावे तरच त्याची देशभक्ती सच्ची म्हणता येईल.
देशातला सर्व प्रकारचा कमीपणा आपण घालवला पाहिजे. इथल्या सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती केली पाहिजे. तुमच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळवून देणारे तज्ञ आपल्याकडे आहेत. ते रासायनिक खते न वापरता शेती करण्याबद्दलही  सल्ला देऊ शकतील. बियाणे, पाणी आणि जमीन यांना विषारी रसायनांपासून आपण वाचवले पाहिजे. भाज्यांचे भाव अल्प काळातच खूप वर खाली जातात.हे योग्य नियोजनाच्या अभावामुळे होते.
आपल्याला अस्वच्छताही घालवायला हवी. सगळीकडे इतकी घाण आणि गलिच्छ असते. मन आणि परिसर दोन्ही स्वच्छ असायला हवे. इतर देशात परिसर स्वच्छ असतो. आपल्या देशात लोकांची मने जरी स्वच्छ असली तरी परिसर गलिच्छ असतो. तुम्ही बघितलं आहे कां की कोणताही प्राणी किंवा पक्षी पर्यावरण दुषित करत नाही. सर्व जंगलांमध्ये कितीही प्राणी असले तरी ती सर्व जंगले स्वच्छ आहेत. माणसे मात्र स्वत:ला दुषित करतात आणि परिसरही.असे म्हणू नका की हे सरकारचे काम आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण त्यांच्या बरोबर काम केले पाहिजे. दर पंधरवड्याला दोन तास द्या. पन्नास ते शंभर लोकांचा एक गट तयार करा आणि तुमचा परिसर साफ करा.
संतसंग मध्ये भाग घ्या. त्याने तुमची आतून शुद्धी होईल त्याचप्रमाणे वातावरणातही परिवर्तन होईल.सेवेमुळे बाहेरची स्वच्छता होते तर ध्यानाने आतली स्वच्छता होते. दोन्हीची गरज आहे. 
अशी नोंद आहे की ब्रिटिशांनी आपल्या देशातून नऊशे जहाजे भरून सोने लुटून नेले. पहिले विमान कुणी बांधले माहीत आहे ?बंगलोरच्या अनेकल जिल्ह्यातील, सुब्राय्या शर्मा शास्त्री यांनी. ते मुंबईला गेले आणि तिथून त्यांनी पहिले विमान उडवले.ब्रिटीशांनी त्यांना आणि दादाभाई नवरोजी यांना, ज्यांनी त्याना आर्थिक सहाय्य केले होते त्या दोघाना तुरुंगात टाकले. राईट बंधूंनी त्यानंतर तीस वर्षांनी विमान उडवले. भारताबद्दल अशी बरीच माहिती आहे, जी BharatGyan.com  वर उपलब्ध आहे.  
ब्रिटीशांनी त्यावेळी इतके सोने लुटले आणि आता आपल्याच देशबांधवानी परदेशी बैन्कामध्ये प्रचंड काळा पैसा ठेवला आहे. जर आपल्याला हा पैसा परत मिळाला तर कर द्यावाच लागणार नाही. तीन पिढ्या आयुष्यभर चैनीत राहू शकतील. मला वाटतं यासाठी मोठी क्रांती व्हायला हवी.
आपल्या देशाबद्दल विचार करण्याची आपली कुवतच नाहीशी झाली आहे की काय असे वाटते. आपण नाव प्रसिद्धी आणि स्थान यांच्या लहानशा आश्वासनांना भुलतो. देशाच्या भल्याच्या मोठ्या चित्राकडे लक्ष केंद्रित केले तर त्यात आपले भलेही आलेच. हे आपण कां विसरतोय ? जर आध्यात्माचा पाया नसेल तर आपले आयुष्य निरस आणि शुष्क होऊन जाईल.
माझ्या शालेय जीवनात आमच्या अभ्यासक्रमात  संस्कृत सुभाषिते आणि इतर बरेच काही ज्ञान असायचे. आता बऱ्याच राज्यांत ते सर्व काढून टाकले आहे. हे आपल्या मुलांना शिकवायला हवे. हे परत आणायला हवे.
भगवद्गीता अभ्यासक्रमात आणण्याच्या कल्पनेला मध्यप्रदेशमध्ये विरोध झाला होता. त्यांनी कोर्टात केस दाखल केली की हे फक्त एका विशिष्ठ धर्माशी निगडीत आहे. नशिबाने उच्च न्यायालयाने सांगितले की भगवद्गीतेत फक्त हेच सांगितले आहे की माणसाने जीवनात प्रगती कशी करावी. आपल्या मुलांना हे ज्ञान दिले पाहिजेत.मगच हिंसामुक्त समाज निर्माण होईल.
आज ‘व्हालेनटाईन डे ’  आहे.
तुम्हाला माहीत आहे कां ? प्राचीन समाजात, प्राचीन काळी, “आज ‘फादर्स डे ’( पितृ दिन, मातृ दिन ) आज ‘मदर्स डे”’असं कधी म्हणत नसत. उलट ते म्हणत रोज काही वेळ तुमच्या वडिलांना, आईला देत जा. आणि म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर पहिल्या तासातली काही मिनिटे, ‘फादर्स मिनिट्स’, ‘मदर्स मिनिट्स’ ( वडिलांची मिनिटे, आईची मिनिटे) म्हणून द्या.
मग निसर्गाला तुमचा ‘व्हालेनटाईन’ बनवा. सकाळी सूर्य तुमचा व्हालेनटाईन’ बनवा.आणि संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा इतके रम्य असते की जेव्हा तुम्ही संपूर्ण सृष्टीकडे बघता तेव्हा तुम्हाला असे वाटेल की हे दिव्यत्वच  तुमचे ‘व्हालेनटाईन’ आहे.म्हणजे दररोज ‘व्हालेनटाईन’ तास किंवा मिनिट आहेच. म्हणजे प्रत्येक घरात मुलांना वाटले पाहिजे की , ‘माझी ही वेळ, खास माझ्या आई वडिलांबरोबरची आहे ‘. मग तो अर्धा तास असेल किंवा काही मिनिटे असतील. मुलांनी सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा, एक तास आपल्या पालकांबरोबर व्यतीत करायला हवा.कमीत कमी एक जेवण एकत्र करत असाल तर तुम्ही यशस्वीपणे तुमचा ‘फादर्स डे ’( पितृ दिन,)‘मदर्स डे ’(मातृ दिन) साजरा केला असे म्हणता येईल.
असेच तुम्ही सकाळी जागे झाल्यावर ,सगळी सृष्टी माझी ‘व्हालेनटाईन’ आहे, माझा देश माझा ‘व्हालेनटाईन’ आहे, दिव्यत्व माझे ‘व्हालेनटाईन’ आहे,ज्ञान माझे ‘व्हालेनटाईन’ आहे असे म्हणता तेव्हा मग तुमच्यासाठी ‘व्हालेनटाईन डे ’ कधी संपतच नाही.सगळे ३६५ दिवस ‘व्हालेनटाईन डे ’ असतात. मला असेच वाटत असते, रोजच ‘व्हालेनटाईन डे ’ .
अर्थातच आश्रमात रोजच ‘व्हालेनटाईन डे ’ असतो आणि भक्तांसाठी हे साहजिकच आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की,     ‘आज व्हालेनटाईन डे ’ आहे, तेव्हा ते फक्त एक निमित्त असते. पण जर कुणी तुमच्या डोळ्यात बघितले तर त्यांना कळेल की तुम्ही कायमच्याच ‘व्हालेनटाईन’ मिनिटात आहात. प्रत्येकाच्या चेह्र्यातून, वागण्यातून इतके प्रेम उतू जात असते. तुमच्याकडे बघून लोक म्हणतील, “ तुम्ही आज ‘व्हालेनटाईन डे ’ साजरा करताय वाटतं ? हो नां ?
बिचारे गरीब लोक सण वर्षातून एकदाच साजरे करतात, कारण त्यांना तेवढेच परवडते.पण श्रीमंत लोक प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट साजरा करतात. आणि तुम्हीही श्रीमंत आहात. आध्यात्मिक ज्ञानाने श्रीमंत आणि या सुंदर अशा सूज्ञपणाने श्रीमंत.
मी म्हणतोय, ‘ सुंदर सुज्ञपणा’ पण सहसा सूज्ञपणा हा खूप कठीण, खूप अवघड आणि मिळवायला कठीण समजला जातो,आणि सौंदर्य हे दुर्लभसमजले जाते. पण मी म्हणेन की, हा एक सुंदर सूज्ञ विचार आहे , डोक्यासाठी सूज्ञ आणि हृदयासाठी सुंदर.



The Art of living
© The Art of Living Foundation