जीवन हे लयबद्ध आणि सुसंवादी असलं पाहिजे !
श्री श्री रविशंकरजी यांच्या बरोबर महासत्संग, सोलापूर,महाराष्ट्र
१७ जानेवारी २०१२
किती सुंदर वातावरण आहे, नाही ! तालानिनाद ! सोलापूर बरोबर असलेला आर्ट ऑफ लिविंग चा संबंध बराच जुना आहे. ३० वर्षा पूर्वी आर्ट ऑफ लिविंग मी जेव्हा सुरु केलं तेव्हा मी शंकेत होतो, कि हे सुरु करावं कि नाही. मी हे बघू शकत होतो कि ह्याने बऱ्याच लोकांना फायदा होईल पण ह्या सगळ्यान मध्ये पडण्याकरिता मी जरा संकोचत होतो. मला वाटत होतं कि मी फक्त ध्यान केलं पाहिजे आणि देवाच्या भक्ती मध्ये पूर्णपणे बुडालं पाहिजे.
मग मला हुगळी रेल्वे स्थानकावर एक निर्णय घ्यायचा होता. नजीकच्या फलाटावर दोन गाड्या उभ्या होत्या एक बंगलोर कडे जाणारी आणि एक सोलापूर कडे जाणारी. जर मी बंगलोर ला गेलो असतो तर मी आर्ट ऑफ लिविंग सुरु केला नसतं, फक्त मी माझ्या लोकांबरोबर राहून योग आणि ध्यान केलं असतं. आणि सोलापूर ची ट्रेन पकडून ते सगळ मला सोडावं लागलं असतं.
म्हणून शेवटच्या क्षणी मी सोलापूर आणि बंगलोर मध्ये कुठे जायचा हे ठरवू शकत नव्हतो. माझ्या बरोबर तेव्हा ४ लोक अजून होते आणि त्यांनी कधीच मला अश्या दुविधेत पाहिलं नव्हतं; जायचा कि नाही जायचं. आणि त्या एका क्षणी मला ठरवावं लागलं आणि मी सोलापूरला आलो.
सोलापूरला आल्या नंतर सत्संग सुरु झाले. मी जिथे हि जातो तिथे लोक आता खूप आनंदी आहेत. त्यांचे अश्रू किती पवित्र आहेत, जे पकडण्यसाठी देवदूत पण आस धरून वाट बघतात. हे अश्रू आनंद, प्रेम आणि भक्ती ने भरपूर आहेत.
देवाची भक्ती हि राष्ट्राच्या भक्ती पेक्षा वेगळी नाहीये. एकाग्रता आणि बांधिलकी हे एकत्र असायला हवे. आपण जर आंतमधून सशक्त असू तर मग आपले काम व्यवस्थित करू शकू.
जीवनात एक लय असणे आवश्यक आहे. जर जीवन लयबद्ध नाहीये तर ते सुसंवादित नाहीये. आयुष्य हे लय बध्द आणि सुसंवादी असणं हेच ज्ञान आहे. आयुष्यात भक्ती असेल तर ज्ञान हे जीवनाला लयबद्ध बनवतं. कधी काय करावं, कस करावं, किती करावं आणि किती करू नये हे ज्ञान जीवनात अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या आयुष्याला बदलून विसंवादातून सुसंवादाकडे वळायला हवे. लयबध्द आणि सुसंवादित जीवन असेल तर ते आनंदी आणि शांत होईल. एक भकास जीवन म्हणजे लयबद्धता आणि सुसंवाददतेचा अभाव.
म्हणून जीवन जगणे हि एक कला आहे, नाही का? मग आपण आपल्या मनाला कसे सांभाळावे? स्वत:ला, कुटुंबाला, आणि समाजाला कसे सांभाळावे?
मला फार आनंद आहे कि सोलापूर च्या स्वयंसेवकांनी वातावरणासाठी बरेच केले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी एकत्र येऊन शेवाळ लागलेला तलाव स्वछ केला जो किती वर्षा पासून तशाच अवस्थेत होता, आणि बघा इतर संस्था पण ह्या कामात सामिल झाल्या. एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने एकत्र येऊन काम सुरु केलं तर इतर मदत देणारे हाथ पण पुढे येतात.
आपल्याला हेच करायचे आहे ज्याने आपला देश पुढे जाईल.
माझं एक स्वप्न आहे कि आपल्या देशाला जगात सर्वोत्तम (नंबर १) बनवायचं. तुम्हाला सुद्धा माझ्या बरोबर हे स्वप्न बघायला हवं.
जोपर्यंत तुम्ही सुद्धा राष्ट्राला सशक्त बनवण्याचं स्वप्न बघत नाही, आणि मद्य, जातपात यावर विजय मिळवत नाही, तोवर आपण विभक्त आणि अशक्त राहू.
आज सगळ्यांनि एक प्रतिज्ञा घ्यायला हवी. इथे जमलेल्यांनी आणि हा सत्संग बघत असलेल्यांनी अशी प्रतिज्ञा करायला हवी कि ‘मी मद्यपान करणार नाही आणि दारू कडे बघणार सुद्धा नाही’. हि पहिली प्रतिज्ञा करायला हवी.
जो आनंद तुम्हाला सत्संग मध्ये बसून मिळेल तो तुम्हाला मद्यापानातून मिळणार नाही. दारू आणि इतर व्यसनं सोडून द्या. हि पहिली प्रतिज्ञा. राष्ट्राची अधोगती ह्या व्यसनान मुळेच झालीये.
आणि दुसरं म्हणजे एक तणाव-मुक्त आणि हिंसा-मुक्त समाज. आपले बंधू आणि भगिनी हिंसाचारात आहेत तरी त्यांना इथे प्रेमाने आणा. आपण त्यांच्या मनाचं परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करू. आपले प्रयत्न ह्याच दिशेने असायला हवेत. त्यांच्या हृदयात काही जखमा असतील आणि आपण त्यांच्या जखमेवर मलमपट्टी करायला हवी आणि ते लोक किती आंतमधून सुंदर आहेत हे बघायला हवा. हे गरजेचं आहे.
आणि आपण जात-पात आणि धर्म ह्या गरजांचा त्याग केला पाहिजे. हे सगळं सोडून द्यायला हवं. आपण सगळे एका धर्माचे माणुसकीच्या धर्माचे आहोत. सोलापूर हे स्थान संत आणि ज्ञानी लोकांच ठिकाण आहे. इथे किती तरी संत आणि ज्ञानी लोकांचा जन्म झाला.
इथे सुद्धा किती तरि संत महात्मे बसले आहेत आणि ते सगळे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते सगळे एकच गोष्ट शतकांपासून सांगत आहेत, ‘जात-पात सोडून द्या कारण आपण सगळे एकच आहोत’.
आपण जेव्हा एका वैद्याकडे जातो तेव्हा विचारतो का कि तो कुठल्या जातीचा आहे? आपण नेहमी शहराच्या सर्वोत्तम वैद्याकडे जाण्याचे इच्छुक असतो, बरोबर कि नाही? आणि जेव्हा आपल्याला एका वकिलाची गरज असते, तेव्हा सुद्धा असे प्रश्न आपण विचारतो का? आपण त्याकडे जातो जो सगळ्यात चांगला आहे. फक्त मतदानाच्या दिवशी आपण जात विचारतो. हे बरोबर नाहीये.
सरकारने सुद्धा जात-पात टिकून राहावी ह्या साठी काम केलं आहे पण ती काढून टाकण्यासाठी काहीच नाही केलं. म्हणूनच आपला देश इतका मागे पडलाय.
राजनीतीत सुद्धा आपल्या जातीचा विचार नका करू. एका चांगल्या व्यक्तीची निवड करा. ज्याच्या डोळ्यात दुसऱ्यान बद्दल सहानुभूती आहे, हृदयात करुणा आहे, त्याग करण्याची भावना आहे अश्या माणसाला निवडून द्या. हे बघू नका कि तो कुठल्या जातीचा किंवा धर्माचा आहे. प्रत्येक जाती आणि धर्मा मध्ये अश्या व्यक्ती आहेत जे समाजासाठी काही करण्यासाठी तत्पर आहेत. अश्या व्यक्ती निवडून द्या आणि जाती मुळे भेद करू नका.
आणि जेव्हा पण मतदानाचा दिवस असेल तर तेव्हा वेळ काढून मतदान करणे हि आपली जबाबदारी आहे. काय होत कि ‘सगळेच भ्रष्ट, राजनीती मध्ये भ्रष्ट नेते आहेत, मग मी मतदान कशाला करावं?’ ‘घरी बसणे जास्त बरे आहे! बाहेर उन्हात कोण उभे राहील?’ ह्या दृष्टीकोणामुळे बरेच लोक मतदान करत नाहीत.
सोलापूर मध्ये बरेच लोक मतदानाला जातात, हे शहर फार जागरूक आहे. भारतात सुद्धा बरेच लोक मतदानाला जातात, अमेरिकेत फक्त २०% लोक मतदान करतात. कमीतकमी आपल्या देशात परिस्थिती इतकी वाईट नाहीये. ६०, ७० कधी कधी ८० % लोक मतदानाला जातात, कारण आपण जबादार लोक आहोत. भारत हा देश जबाबदार लोकांचा आहे. म्हणून आपण नक्कीच जाऊन मतदान केलं पाहिजे. आणि आपण स्वच्छतेच्या मोहिमेत सुद्धा भाग घ्यायला हवा.
चार प्रकारचे कार्य आहेत; पहिले अंधश्रद्धा सोडून अज्ञान पळवायला हवं. आपण धर्माच्या नावाखाली बऱ्याच अंधाश्रद्धा पाळून आहोत ज्यांचा धर्माशी काही संबंध नाही. अंधश्रद्धा आणि अज्ञान काढून टाकाव. आपल्याला मानवीय धर्म म्हणजेच दया, आणि जबाबदाऱ्या प्रती जागरुकता, ह्या सगळ्या आंतमध्ये उतरून उमलायला हव्यात.
ह्या वृत्ती सगळ्यांमध्ये आहेत. असा विचार नका करू, ‘माझ्या मध्ये सचोटी नाहीये’. सचोटी तुमच्या मध्ये आहे, फक्त त्या दिशेने थोडा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सचोटी आहे पण दडून गेली आहे. लबाडीमुळे  झाकलेली आहे.
म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून एक प्रतिज्ञा घ्यायला हवी कि आपण लाच घेणार नाही आणि देणार सुद्धा नाही. जे सगळे इथे बसले आहेत, जे लाच घेतात, त्या सगळ्यांना मी आव्हान करतो, कि फक्त एक वर्ष साठी लाच घेवू नका. माझ्यासाठी एका वर्षसाठी घेऊ नका. देशासाठी हा त्याग करा. त्या नंतर बघू, जर इथे असलेल्यांनी प्रतिज्ञा केली कि मी लाच देणार नाही आणि घेणार नाही तर काम इथेच फत्ते होईल. हे महत्त्वाचे आहे.
आपण जसे पुढे वाढतो तसा चांगुलपणा जगात वाढायला हवा, हा सुवास पसरायला हवा. जर आपण सगळे  अश्रू पुसण्यासाठी तत्पर असू तर मग देशात दुखा:चे अश्रू नसतील, फक्त मधुर भक्ती चे अश्रू वाहतील, जसे मी इथे येताना पहिले. इथे आलेल्या लोकांच्या डोळ्यात जसे आनंदाश्रू आहेत तसे मी सबंध देशाच्या जनतेच्या डोळ्यात बघू इछितो.
म्हणून सर्व प्रथम अज्ञान सोडून आपण अन्यायाच्या समोर उभं राहिलं पाहिजे. जिथे कुठे अन्याय असेल तिथे आपण तो सहन नाही केला पाहिजे. आपल्या देशात सहन शक्ती च्या नावाखाली बरेच अन्याय सोसले जातात असं व्हायला नको.
अन्यायाच्या विरुध्द उभे राहणे म्हणजे रागाने, बस किंवा मालमत्ता जाळणे नव्हे. अन्याय विरुद्ध हिंसा हे उत्तर असू शकत नाही. एक अन्याय मिटवण्यासाठी दुसरा अन्याय करणे बरोबर नाही. अन्याय विरुद्ध उभे राहण्यासाठी एक शांतीपूर्ण चळवळीची गरज आहे. आपण अन्याय सहन करणं गरजेचं नाहीये.
आणि सगळ्यांनी एकत्र येऊन टंचाई मिटवण्यासाठी काम केलं पाहिजे. आळशीपणा आपल्या देशाला खातोय. मागच्या काही वर्षा पासून आपण बघतोय आपण आळशी होत चाललोय. मी जेव्हा पण एखाद्या गावात जातो, तेव्हा शेतकरी म्हणतात कि त्यांची मुलं काही काम करण्यासाठी इच्छुक नसतात. त्यांना तर शेतांमध्ये जाण्याची सुद्धा इच्छा नसते. असं ते म्हणत आहेत.
शेती हे पवित्र काम आहे. म्हणून आपल्या देशात कोणतेही काम करण्यापूर्वी जसे यज्ञ किंवा पूजा, सुरुवात करण्या आधी बिया जमिनीत टाकतात. नवरात्रीत सुद्धा आपण हेच करतो ! देवी आईचा धावा एक दिवस करण्याआधी, बिया जमिनीत टाकल्या जातात. बियांना कोंब फुटल्यावरच देवीचं आवाहन केलं जातं. कोणत्याही यज्ञा मध्ये किंवा पूजेत बिया टाकणे हे पहिले काम आहे. ह्याचा अर्थ सगळ्यांनी बिया जमिनीत टाकून धान्य  उगवलं पाहिजे. घरी काही न काही करता बिया टाकून काही भाज्या घरात उगवल्या पाहिजे ज्या मुळे घर- घरात भरभराटी येईल. देशात भरभराटी येईल. आळशीपणा मुळे टंचाई वाढली आहे आणि हि आपल्याला काढून टाकायला हवी. हे आपले कर्तव्य आहे!
मग आपण पावित्र्यआणलं पाहिजे. जिथे पण तुम्ही प्लास्टिक, कापड, कागद, इत्यादी वस्तू पडलेल्या बघाल, किंवा गटार वाहत असताना लोक बाजूने चालत असून त्या कडे लक्ष नाही देणार हे बघयला हवा. जसे आपण आपले घर स्वछ ठेवतो तसेच आपला परिसर पण ठेवायला हवा. आणि जशी स्वच्छता बाहेर आहे तशी आंत-मध्ये पण असली पाहिजे. आपल्या मनाला खराब नका करू, आनंदी आणि शांत राहा. ह्या साठीच प्राणायाम, क्रिया आणि ध्यान करा.
आपण म्हणतो कि मनात राग, इर्ष्या, अश्या भावना येतात, थोडा वेळ बसा आणि क्रिया, ध्यान, प्राणायाम  करा, मग बघा चेहरा आणि हृदय कसं उजळू लागतं.
आणि तुमची काम होऊ लागतील. ‘जो इच्छा करीहो मनू माही, प्रभू प्रताप कछु दुर्लभ नाही.’ जी पण तुमची इच्छा असेल ती देवाच्या कृपेने पूर्ण होऊन जाईल. देव कुठे अवकाशात नाही बसलेला, तो आपल्या मनात आहे. आणि जर आपण आपले हृदय स्वछ केलं तर मग दैवी शक्ती आपल्या मनामध्ये येईल. जे पण पाहिजे ते आपल्याला मिळेल, आपण त्या साठी इच्छा करण्या आधीच. जर काही लगेच नाही झालं, तर मग थोडा वेळ लागू शकातो त्याला पूर्ण व्हायला, पण तुमचं काम होईल, लवकर किंवा नंतर. फक्त थोडा संयम हवा.
काही बिया लगेच उमलतात पण काही बिया जश्या आंब्याच्या बिया २,४ किंवा जास्त वर्ष लावू शकतात फळ देण्यासाठी. म्हणून काही संकल्प लगेच पूर्ण होतात काहीना काही वेळ लागतो पूर्ण होण्यासाठी आणि म्हणून धीर गरजेचा आहे.
आज मला तुम्हाला हि हमी द्यायची आहे कि जर तुमचा संकल्प बरोबर असेल, ज्या मुळे लोकांचं कल्याण आणि तुमचा आत्म्या चा फायदा होणार असेल तर तर तो नक्कीच पूर्णत्वास येईल. आणि ह्या साठी काय करावं? तुम्हाला थोड्या थोड्या वेळासाठी ध्यान करणे आणि सेवा करणे गरजेचे आहे. देशाचा विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या देशात सगळ्या क्षेत्रांमध्ये युवकांची गरज आहे. मी इथे बरेच युवक बसलेले बघतो. आजकाल लोक म्हणतात युवक तबला, पखवाज आणि मृदंगम च्या ऐवजी ड्रम चा उपयोग करतात. नाही! इथे जमलेल्या लोकांकडे बघा ३ हजार लोक इथे बसले आहेत आणि आनंदाने वाद्य वाजवत आहेत. भारतीय सभ्यता हि एकमेव आहे आणि ती देशाच्या कान्याकोप्र्यात जतन केली जात आहे.
आर्ट ऑफ लिविंग ने ह्या वर्षी ३० वर्षे पूर्ण केली. उत्तर ध्रुवच्या शेवटच्या शहरात (ट्रोम्सो) मध्ये आणि दक्षिण ध्रुवाच्या शेवटच्या शहरात तुम्हाला लोक प्राणायाम, ध्यान आणि भजन गाताना दिसतील.
आपल्या संत आणि साधूंच एक स्वप्न होतं, ‘वसुधैव कुटुंबकम’. हे जग एक कुटुंब आहे. आज हे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय.
शहराचे माजी-महापौर म्हणत होते कि १० करोड टाकून सुद्धा तलाव स्वच्छ नाही झाला जो स्वयंसेवकांनी काही पैसे नाही लागू देता पूर्ण केलं. तसच जर तुम्ही १५ ते २० लोक एकत्र आलात तर मग तुम्ही एक स्वच्छतेची मोहीम हातात घेऊ शकता. ह्यामुळे स्वच्छता शहरा-शहरा मध्ये नांदू लागेल. आम्ही जागो जागी वृक्षारोपण करून फुलं लावतोय, आणि स्वच्छता जतन करतोय. सरकारचं काम आहे असा विचार करून नाही चालणार. हे आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही करू असं समजायला हवं. जेव्हा आपण एकत्र काम करू तेव्हा देशात एक मोठी क्रांती घडेल. आरोग्याची घसरण कमी होईल आणि मन पण स्वछ राहील.
भ्रष्टाचार हा आपल्या देशात एक मोठ्ठी समस्या आहे. जिथे आत्मीयता संपते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. आध्यात्मिक्तेने आपण हि आत्मीयता वाढवू शकतो. ‘कोणीच परका नाही, कोणीच बाहेरचा नाही’. अश्या भावनेने जर आपण पुढे वाढलो आणि संकल्प घेतला, तर एक मोठा बदल घडवू शकू.
आपल्या कडे एक चांगला कायदा असायला हवा ह्यात वाद नाही. पण जर आपण एक अश्या परिस्थिती वर आलो जिथे कायदयाला काही करण्याची गरज नाही मग ते सर्वात छान होईल. आणि हे फक्त नागरिकांच्या परिश्रमाने नाही होणार, नेत्यांनी सुद्धा भक्ती, ज्ञान आणि ध्यान मध्ये रमणे आवश्यक आहे. जर असं झालं नाही तर ते स्वार्थी होऊन देशाचं वाटोळं करतील. जे फक्त समाजसेवेसाठी नि:स्वार्थ वृत्तीने पुढे येतील तेच देश पुढे नेऊ शकतात. म्हणूनच आध्यात्मिकता हा जीवनाचा पाया आहे. आपण हे सगळं विसरून गेलो आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्या समस्यांना सामोरं जाव लागतं.
संगीतकारांकडे वळून गुरुजी म्हणतात, ‘तुम्ही तबला वाजवायला हवा ज्या मुळे अंधकार निघून जाईल. एक नंतर एक काळा ढग देशावर आणि मनावर येतोय. जेव्हा मन हे निराश असतं तेव्हा ते खिन्नतेकडे वळत्. काही करण्याची इच्छा उरत नाही. सगळं काही चूक आहे, काहीच बरोबर नाही असं वाटू लागतं सतत. कोणालाच कळत नाही आपण कुठे चाललो आहोत. ते नकारात्मक दिशेने वाटचाल करू लागतात आणि सदैव नकारत्मक विचारांनी भरलेले असतात. म्हणून तबला, ढोलक आणि डमरू वाजवा. भगवान शिव आपल्या हातात डमरू धरतात. ते प्रतिक आहे कि ज्या मुळे नैराश्याजनक वृत्तीचे उत्थान होऊन प्रसन्नता येते.     
         
The Art of living
© The Art of Living Foundation