बुद्धिमान लोक त्यांचा वेळ काव्य, शास्त्र आणि विनोदात व्यतीत करतात.

पुस्तक प्रकाशन : २०१२- द रिअल स्टोरी

या पुस्तकात बरीच शास्त्रीय माहिती आहे, खूप चांगली माहिती आहे.मला वाटतं प्रत्येकाकडे हे पुस्तक असायला हवे.तरुण, युवकानी हे पुस्तक जरूर वाचायला हवे. त्यात खूप चित्र आहेत आणि ते रंजकही  आहे. लोकांनाही हे पुस्तक द्या कारण ह्या वर्षाविषयी त्यांच्या मनात खूपच भीती आहे की जगाचा शेवट होणार आहे. असं काही होणार नाहिये. मी सारखा सांगत आलोय की जगाचा शेवट होणार नाहिये. काळजी करू नका !  
‘काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्’ संस्कृत मधल्या या सुभाषितात असे म्हटले आहे की बुद्धिमान लोक काव्य, साहित्य, शास्त्र, विनोद, मजा यांत घालवतात. आणि बुद्धिमान नसलेले लोक त्यांचा वेळ वाद घालणे, भांडण करणे, दु:खी होणे यांत घालवतात.इथे बरेच बुद्धिमान लोक आहेत तर आपण आता ड्रम्स ऐकूया !

आता एलीत्सा तोडोरोवा आपल्यासमोर ड्रम्स चे वादन सादर करणार आहेत.त्या बल्गेरिया येथील एक सुप्रसिद्ध धर्म वादक आहेत आणि त्यांनी बर्लिन मध्ये तीस वर्षांच्या वाघ्दिव्साच्या उत्सवातही वादन सादर केले होते. त्यानंतर लहान मुलांचा नृत्याचा कार्यक्रमही सादर होणार आहे. चला तर आपण आता बघुया आणि ऐकुया.
यानंतर संतसंग् मध्ये एलीत्सा तोडोरोवा यांच्या गायन व वादनाचा बहारदार आणि परिणामकारक असा कार्यक्रम सादर झाला.


The Art of living
© The Art of Living Foundation