देव आहे ; तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्यामधे आहे.

आयुष्या अमुल्य आहे. ती देवाने दिलेली भेट आहे. आपण त्याची काळजी घेतली नाही तर आपण दुक्खी राहतो.  जेंव्हा आपण त्याची काळजी घेतो तेंव्हा आपल्याला हवे ते मिळू लागते. मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायला आलो आहे, तुम्हाला माहिती आहे काय? नाही, म्हणूनच मी तुम्हाला त्याची आठवण करून द्यायला आलो आहे (हशा). मी इथे का आलो आहे हे तुम्हाला माहीत नाही, बरोबर? मी इथे ही आठवण करून द्यायला आलो आहे की एक शक्ति आहे; देव आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर मला विचारा. मी म्हणेन देव आहे. आणि तो तुमच्यावर प्रेम करतो. मग तुम्ही विचारल, 'त्याने मला भोग का दिले?जर देव आहे तर दुक्ख का आहे? जेंव्हा आपण त्याचा विरुद्धा जातो किंवा क्रुतघ्न होतोतेंव्हा दुक्ख वाढते. जेव्हा आपल्याला त्रास होतो तेंव्हा आपल्याला देवाचा शोध घ्यायला लागतो. तेंव्हा आपल्याला कळते की दुक्ख असताना आपल्या बरोबर कुणी होते.

असे म्हणतात की देव आधी मोजून घेतो आणि मग प्रत्येक प्रान्याला शेपूट लावतो. त्याने हत्तीची शेपूट बकरीला लावली नाही, कारण ती शोभून दिसणार नाही. प्रत्येक प्रान्याला शोभेल अशी शेपूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अडचणी या त्यांचा शेपुट आहेत. तुम्ही संभाळू शकता अशाच अडचणी तुम्हाला देण्यात येतात. आणि तुम्ही सोडवू शकणार नाही अशा अडचणी मी सोडवायला आलाओ आहे. समाजातले सगळे गुरू आणि बुद्धिवादी हे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आले आहेत. सगळे जग, तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही एकटे नाही. तर, 'देव आहे. 'तुम्हाला याबद्दल आठवण करून देण्यासाठी मी आलो आहे. देव आहे आणि तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्यामधे आहे.
थोड्या थोड्या वेळसाठी आपण आपले मन थोडावेळासाठी शांत केले, तर आपण त्याचबरोबर संबंध जोडू शकतो. त्यानंतर तुम्हाला ज्या इच्छा होतील ते अशक्य राहणार नाही.  ‘जो इच्छा कारीहो मानू माही, प्रभू प्रताप कच्हू दुर्लभ नाहीं’ (उत्तर मध्य आणि पश्‍चिम भारतात म्हणाली जाणारी एक म्हण) ही सिद्धा केलेली गोष्ट आहे. आपण सगळे इथे सत्संग साठी जमलो आहोत. आत्ता तुमच्या चेहर्यावर जे हस्या आहे ते कधीच नष्ट न होणे हा फायदा झला पाहिजे. तुम्ही जे त्रास आणले आहेत त्याना इथेच ठेवा आणि एक हसू घेऊन घरी जा, आणि खात्री बाळगा की तुमचे काम होईल. ते पूर्ण होण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल पण ते नक्की पूर्ण होईल. थोडा वेळ लागेल पण जरूरी नाही की नेहमीच वेळ लागेल.

३० वर्षांपासून मी जगभर फिरत आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात भारतीय संस्कृती आणि अध्यात्मळा मान दिला जातो. उत्तर ध्रुवावरचे शेवटचे गाव ट्रोमसो, किंवा दक्षिण ध्रुवावरचे शेवटचे गाव तियेरा देल फ्युएगो, कुठेही जा तुम्हाला लोक कीर्तन, ध्यान, प्राणायाम करताना दिसतील. तुम्ही तिथे जाउन जय गुरुदेव म्हणाल तर तुम्हाला हजारो लोक भेटतील. भारत हा सुंदर देश आहे. देवाचे पाय या देशाला लागले आहेत (बोध गया, बिहार, भारत येथील सत्संग) 'विष्णू पाद' इथे जोडलेले आहेत. हे गया चे महत्व आहे. या ठिकाणी बुद्धाला द्न्यान मिळाले. सिद्धार्थ इथे बुद्ध झाला आणि द्न्यान जगभर पसरवले. तुम्ही इतक्या शुद्धा जागेत आहात.

मला तुम्हाला परत खात्री पटवून द्यायची आहे की ती शक्ति तुमच्या मधे आहे, जी तुम्ही वापरत नाही आहात. जर तुम्ही ती वापरळित तर तुम्हाला दुक्खी राहायचे काहीच कारण नाही. ‘दुख मैं त्याग, सुख मैं सेवा’; दुक्ख असताना समर्पण आणि आनंदात सेवा. जर आपण केले तर एक भक्तीची लाट तुमच्यामधे उसळेल. आपण जर आनंदात असु तर सेवा केली पाहिजे. आणि दुक्ख असेल तर समर्पण करून विश्वास ठेवला पाहिजे की आपले काम होईल. आज, तुम्ही दोन याद्या बनवा, एक तुम्हाला काय हवे आहे आणि दुसरी तुम्ही कोणत्या जबाबदार्‍या घेऊ शकता. जर आपल्या जबाबदार्‍या आपल्या गरजे पेक्षा कमी असतील तर आपण दुक्खि राहू. पण, जबाबदार्‍या गरजे पेक्षा जास्त असतील तर आपण आनंदी राहू. जर मला माझासाठी काही नको अशी भावना असेल तर, एक जादुई शक्ति तुमच्यामधे येते जिच्यामुळे तुम्ही इतराना सुद्धा आशीर्वाद देऊ शकता. तेंव्हा आपले संकल्प पूर्ण होऊ लागतात. आपल्यामधे सुद्धा इतरांच्या इच्छा पूर्ण करायची शक्ति आहे. हे पुराव्यासह सिद्ध केलेले विद्यान आहे, अंधश्रद्धा नाही.

तर आपण काय केले पाहिजे? आपल्या जबाबदार्‍या काय आहेत? पहिले, आपण बीन रासायनिक शेतीला उत्तेजन दिले पाहिजे. जे लोक इथे शेती करणारे आहेत त्यानी सेंद्रिय सेंद्रिय शेती केली पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्हाला बाजार मिळवून देईल. तुम्ही म्हणता की तुमच्या उत्पन्नाला योग्या भाव मिळत नाही. ते होणार नाही. ठीक आहे? दुसरे, इथे किती युवकाना नोकर्‍या नाहीत? आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे एक रोजगार केंद्रा सुरू केले आहे. ज्याना नोकर्‍या नाहीत त्यानी आपापले नाव या केंद्रामधे नोंदवा. तुमचे नाव, शिक्षण आणि अपेक्षा सांगा, आपण नक्कीच काही करू. तुम्हाला माहिती आहे, बिहार मधून अनेक लोक बेन्गाळुरु मधे प्रशिक्षणासाठी आले. ते तिथे आश्रम चालवत आहेत. बिहारचे युवक खूप मेहनती आणि शूर आहेत. मेहनती, शूर आणि विश्वासू; हे तीन गुण त्यांचामधे बिंबवले आहेत.

यामधे काहीतरी चुकले. काही वर्षांसाठी ते तिथल्या ताण-तणाव, भांडणे यासाठी ओळखले जात होते. पण मला आतली गोष्ट माहीत आहे. बिहारचे युवक आनंदी आणि ताकदवान आहेत आणि मला असे युवक हवे आहेत. हा देश उभारण्यासाठी युवा शक्तीची गरज आहे. आपण इतक्या भ्रष्टाचारला तोंड देत आहोत. भ्रष्टाचार का सुरू होतो ते माहीत आहे का? जिथे एक असल्याची भावना संपते, तिथे भ्रष्टाचार सुरू होतो. जिथे अध्यात्मिकता नसते, तिथे भ्रष्टाचार आणि स्वार्थ सुरू होतो. आपल्या सगळ्याना भ्रष्टाचाराचा कंटाळा आला आहे, आणि तो नष्ट करण्यासाठी आपल्या सगळ्याना काही मेहनत घ्यावी लागेल. हे कसे करायचे? पहिल्यांदा, आपण सगळ्यानी शपथ घ्यावी की मी लाच देणार नाही आणि घेणार नाही. जरी इथे लाच घेणारा अधिकारी बसला असेल, तर मला सांगायला आवडेल की इतके वर्षा तुम्ही लाच घेतली आहे आणि ते काय आहे याचा अनुभव घेतला आहे. त्याने स्वतहाचे नाव खराब केले आहे आणि इतरांच्या व स्वतहाच्या मनात कडवटपणा भरून ठेवला आहे. आणि एवढ्या पैशाचे आपण काय करतो?आपण पैसे गोळा करतो, बेन्केत ठेवतो आणि मारुन जातो. आपल्या मृत्यूनंतर आपली मुळे त्या पैशांसाठी कोर्टात जाउन भांडतात. राम आणि लक्ष्मण सारखे असे भाउ बनवलेत की जे तुमच्या वेट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीसाठी एकमेकांशी भांडतात. असे करू नका. एक वर्षासाठी लाच घेणे थांबवा. मी जास्त काही मागत नाही. फक्त एक वर्ष. प्न जर गोष्टी तशा झाल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता. आणि इथले सगळे युवक, जे देशासाठी सहा महिने, एक वर्ष देउ शकतात, तुमचे स्वागत आहे.

या देशासाठी करण्यासारखे खुप आहे. अहिंसा असलेला समाज बघायला आपल्याला सगळ्याना आवडेल. मला आठवते आहे, मी इथे बारा वर्षांपूर्वी आलो होतो. त्यावेळी इथे गंभीर परिस्थिती होती. लोक म्हणायचे,'तिथे जाउ नका, तुम्ही जाउच शकत नाही, तिथे खूप धोका आहे.' बिहार म्हणजे भीती. ही परिस्थिती होती. 'लोकांचा एकत्र कार्यक्रम अशक्य होता. कोणाला माहीत की कधी काय होईल?'पण आता तशी परिस्थिती नाही. तेंव्हपेक्षा बरीच सुधारणाझली आहे. लोक मोकळेपणाने फिरत आहेत आणि ही एक चांगली गोष्ट घडली आहे. आपल्याला अजुन खूप करायचे आहे. अजुन बरेच औधे जायचे आहे.

आपण सगळ्यानी शपथ घेतली पाहिजे की लाच देणार आठवा घेणार नाही. जर कोणी जन्माच्या दाखल्यासाठी लाच मागितली तर अजुन दहा लोक घेऊन जा,एकटे जाउ नका. त्याना सांगा, 'आम्ही गुरुजींच्या सत्संग मधे शपथ घेतली आहे की आम्ही लाच देणार नाही, म्हणून आम्ही तसे करू शकत नाही.' आणि धर्म ही अशी गोष्ट आहे, तुम्ही सत्संग मध्ये शपथ घेतलित की तुम्हाला त्याला पाळावेच लागेल. दुसरे, दारू या देशाचा नाश करत आहे. दारूचे व्यसन पाहून आम्हाला खूप त्रास होत आहे. गेल्या काही महिन्यात दारूचा खप तिप्पट वाढला आहे. लाखो रुपयाना ते विकले जात आहे आणि लोक आणखी गरीब होत आहेत. जो पर्यंत दारूच्या नद्या या देशात आहेत, तोपर्यंत या देशात समृद्धी येणार नाही. देशाला समृद्ध होऊन गरीबी हातवायची असेल तर दारूची दुकाने पहिल्यांदा बंद केली पाहिजेत. दारूचे व्यसन लागलेल्या सर्वाना मी मजा 'बार' मधे बोलावतो आहे, इथला नशा कधीच उतरणार नाही. सत्संगच्या नशेत एकदा नृत्या कराल तर बाकीची सगळी व्यसने तुम्हाला फिकी वाटायला लागतील. लोक लग्नात, कुणी जन्मले अथवामेल्यावर दारू पितात. जर पक्ष निवडणूक जिंकला तरी दारू पितात, हारला तरी दुक्ख विसरण्यासाठी पितात. फायदा किंवा तोटा, काही झले तरी पितात. काही झले तरी दारू पिणे सुरुच राहते. आपल्याला ही परिस्थिती बदलायला पाहिजे. प्राणायाम, ध्यान आणि क्रिया करा, तुमच्यामधे किती शक्ति आहे ते तुम्हाला कळेल. तुम्ही आपसूकच दारू पिणे थांबवल. तब्येतीची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टी वापरल्या पाहिजेत. डोके दुखाल्यास आपण एलोपेथिक औषधे घेतो.  आयुर्वेदिक औषधे घ्या, ध्यान ,प्राणायाम करा सगळी दुखणी पळून जातील.

श्रोता: आपण भारतातील दारूचे उत्पादन थांबवले पाहिजे.
श्री श्री रवि शंकर: म्हणूनच मी इथे आहे. जर खरेदी करणारेच नसतील तर ते कुणाला विकणार.
डोकेदुखी का होते हे माहिती आहे का?रसायन मिश्रित अन्न ज्यात युरीया आणि इतर खते असतात असे अन्न खाल्ल्यामुळे. जर आपण रसायन विराहित शेती केली, तर पोटात जाणारे अन्न दुक्ख निर्माण करणार नाही, तुम्ही आनादी राहाल आणि बुद्धी तीक्ष्ण राहील. म्हणून रोज थोडा वेळ योग आणि प्राणायाम केला पाहिजे. तुमचे शरीर आनंदी आणि ताकदवान राहील. माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्याबरोबर राहतील. कमतरता असणार नाही. ही योगाची जादू आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करायची क्षमता योगमध्ये आहे. मी एकाले आहे की बोध गया येथे छोटा द्न्यान  मंडप आश्रम सुरू करण्यात आला आहे. मी त्याचा उद्घाटना साठी आलो आहे. आज चीन, जपान आणि इतर देशमधून जवळपास दोनशे लोक आले आहेत. चीन मध्ये सुद्धा भारतातील अध्यात्मीकतेला मन दिला जातो. आपले शारीरिक अडचणी नष्ट होतात, आपण आरोग्यपूर्ण होतो, समाजात आनंद पसरतो, अडचणी दूर होतात, लोकाना मेंदूच्या क्षमता वाढल्याचा अनुभव आला. हे इतके सुंदर आणि गोड द्न्यन आहे पण आपण त्याचा आदर न करता, दुर्लक्ष करून ते बाजूला ठेवले आहे. ही आपण सगळ्यानी चुक केली आहे. किती जाणाना थंडी वाजते आहे? जर वाजत असेल तर, तुमचा अंगठा गरम राहील अशा रीतीने पकडा. तुम्ही अंगठा गरम ठेवलात तर तुमचे संपूर्ण शरीर गरम राहील. मी जेंव्हा स्विट्ज़र्लॅंड सारख्या देशात जातो तेंव्हा याच कपड्यांमधे जातो आणि ते म्हणतात, ' तुम्हाला थंडी वाजत नाही का? आणि मी म्हणतो नाही. तुम्ही पण हे करू शकता. थोडे प्राणायाम, ध्यान आणि योगा करा, आणि उष्णता किंवा थंडी तुम्हाका त्रास नाही देऊ शकणार. तुम्ही ताकदवान बनाल!



The Art of living
© The Art of Living Foundation