प्रौढपणीदेखील  निरागसता जपणे म्हणजेच  अध्यात्म होय.

१३ फेब्रुवारी २०१२  
तुम्हाला सत्संगाचा अर्थ माहिती आहे का?
नैसर्गिक, अनौपचारिक आणि साधे असणे म्हणजेच सत्संग.
तुमचे हास्य माझ्यासाठी पुरेसे आहे.आणि माझ्या स्वागतासाठी फटाकेफोडण्याची काही गरज नाही.तुमचे हास्य आणि नैसर्गिक असणे हे माझ्यासाठी पुरेसे आहे. लहान मुलांच्या घोळक्यात,जर तुम्ही एकाला चिमटा काढला आणि जर तो रडायला लागला, तर त्या घोळक्यातली बाकीची मुलेपण रडायला लागतात.खर तर वेदना एकालाच झाली होती परंतु सर्वजण रडणे सुरु करतात. आपण सगळेच अगदी तसे होतो,होय की नाही? तुम्हाला  तुमच्या लहानपणीची आठवण आहे का? तुमच्या काळजाची प्रतिक्रिया तुमच्या लक्षात आहे का? जर कोणाला काही दुखापत झाली तर तुम्हालादेखील ती वेदना व्हायची.परंतु आपण जस जसे मोठे होऊ लागलो तस तसे आपण हे कसे हरवून बसलो? आपण काय झालो आहोत? हा सर्वात मोठा प्रश्न आपण  स्वतःला विचारायला पाहिजे.
अध्यात्माचा मार्ग काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मोठेपणी देखील निष्पाप असणे हा होय. जर आपण येव्हढे करू शकलो आणि जर आपण आपले हृदय स्वच्छ ठेवले तर आपल्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. फक्त आपल्यचं इच्छा पूर्ण नाही होणार तर दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची कुवत आपल्यात येते.
आपल्या काळजाने बालकाच्या निरागसतेने प्रतिसाद दिला पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये एक बालक दडलेले आहे.आपण त्याला जागे केले पाहिजे.
आता तुम्हाला एक प्रश्न पडेल.जर आपण तसे निरागस झालो तर लोक त्याचा गैरफायदा घेतील. हो की नाही? तुम्ही तसा विचार करू नका.कारण तसे काही होणार नाही,
इथले सगळे विजेचे बल्ब पेटलेले आहेत कारण या सर्वांमधून एकाच विजेचा प्रवाहाचा संचार आहे.त्याचप्रमाणे आपल्या आत जोडणी  व्हायला पाहिजे. त्या परम सत्याबरोबर आपली जोडणी झालेली पाहिजे. प्लग आणि सॉकेत आहे पण प्रवाहाचा जोडणीची  गरज आहे. जेव्हा तारा  जोडल्या जातील तेव्हा मनात कोणतीही काळजी नसेल आणि मन एकदम शांत होऊन जाईल.मला तुम्हाला तसे पाहायचे आहे.तुमच्या सगळ्या काळज्या मला देऊन द्या.मी इथे तुमच्या सगळ्या चिंता, काळज्या गोळा करायला आलो आहे.तुमच्या चेहऱ्यावर हास्य असले पाहिजे.
तुम्ही किती वर्षे जगणार आहात? प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. आजपासून पन्नास साठ वर्षानंतर कोणी नसणार आहे. या छोट्याशा अवधीत आपण प्रसन्न असले पाहिजे आणि आनंदी आयुष्य जगायला पाहिजे.
आनंदी आयुष्य कसे जगायचे? "जीवन जगण्याची कला"(दि आर्ट ऑफ लिव्हिंग) हे आपण नाव दिले आहे.
जर चिंता आल्या तर त्यांच्या पासून कसा सुटकारा मिळवायचा आणि काळजी करत बसण्यापेक्षा आपल्या  आयुष्याचे प्रयोजन काय यावर चिंतन करायचे. हे करायला तुमची आज तयारी आहे का? तुमच्या चिंता, काळज्या इथे सोडून देऊन जायला तुम्ही सज्ज आहात का?
तुमच्या चिंता,काळज्या इथे सोडून द्या.तुम्ही जर सेवा केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.सेवा करा,समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करा,थोडा वेळ ध्यान आणि प्राणायाम करा.या नंतर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणे हे माझे कर्तव्य बनते.
तुमच्यापैकी किती जण अंग दुखीने हैराण आहात? (बरेच लोक हात वर करतात)
पहा,कितीतरी जणांना अंग दुखीचा त्रास आहे.अंग दुखी चुकीचे अन्न पदार्थ सेवन आणि चुकीची जीवनशैली यामुळे होते. आपण काय जेवतो आणि खाण्याची काय सवय असायला पाहिजे याकडे आपण कधीही जास्त लक्ष देत नाही. हे चांगले नाही.
"योग्य आणि सकस आहार हा निरोगी जीवनाचा आरसा आहे" अशी एक म्हण आहे.आपण काही व्यायाम आणि  योगासने देखील केली पाहिजे.योगासने केल्यामुळे शरीरात उर्जा,चेहऱ्यावर उजाळा,मनात स्फूर्ती आणि आयुष्यात उत्साह राहतो.हे सर्व आपोआप येईल.म्हणून थोडावेळ तरी तुम्ही  योगासने आणि प्राणायाम करायला पाहिजे.तुमच्यापैकी कितीजण तयार आहेत?
हे सगळे नाही केले तर आपण फक्त गोळ्या खाऊ आणि शरीराचा एक अवयव ठीक करण्याच्या नादात दुसरा खराब करून बसू.पोट ठीक करायला आपण औषध घेतो आणि त्या प्रतिजैविकांमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.मग यकृत ठीक करण्यासाठी उपचार घेतो आणि स्वादुपिंडावर विपरीत परिणाम होतो.
याचप्रमाणे एका अवयवावर उपचार केले तर दुसऱ्या अवयवाला नुकसान होते.म्हणून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदासारखे अतिशय सुंदर शास्त्र तयार केले.
ते  केवळ नाडी परीक्षा करून आजाराचे निदान  करायचे.आज जगाच्या काना कोपऱ्यातून लोक बंगलोरला येतात आणि  नाडी परीक्षेद्वारा बरे होतात.
आणि आपण  विलायती उपचार पध्दत्तीची औषधे पुन्हा पुन्हा घेऊन आपल्या शरीराचे नुकसान करीत आहोत.आपण असे करता कामा नये.आपण आयुर्वेदाच्या ज्ञानाकडे लक्ष दिले पाहिजे.
तसेच आपण आपले मन स्वच्छ ठेवले पाहिजे,आणि त्यासाठी आपला दृष्टीकोन व्यापक असला पाहिजे." सर्वजण माझेच आहे" ही भावना जोपासायला पाहिजे.
मी असे नाही म्हणत की तुम्ही हे आत्ताच्या आता, आजपासून सुरुवात करा.हळू हळू  करा.
क्षमाशीलता असली पाहिजे.जर तुम्ही कोणावर रागावलात तर त्यांना माफ करा.ज्यांचा कोणाचा राग येतो त्यांना माफ करण्याचा सराव करा.
 उदाहरणार्थ नव वर्ष (उगादी/गुढी पाडवा) लवकरच येत आहे. गेल्या वर्षी जे तुम्हाला अस्वथ करत होते किंवा ज्यांचा तुम्हाला राग येत होता त्यांना माफ करण्याचा संकल्प करा आणि पाटी कोरी करा. कोऱ्या पाटीने उत्साहाने नवी सुरुवात करा.आपण नैसर्गिक आणि स्वाभाविक असावे.
आठवड्याचे केवळ दोन तास वेळ समाज कार्याला  द्या आणि त्याद्वारे आपण परिसरात बदल आणि परिवर्तन घडवून आणू.आपण हे महानगरपालिकेवर सोडू या नको. चला तर मग दोन तास आपण समाज कार्यासाठी वाहून घेऊया.
मला सांगितले गेले की या भागात (बनस वाडी,बंगलोर)पाण्याचा त्रास आहे.१९७२ किंवा १९७३ च्या सुमारास मी इथे कॉलेजला होतो.त्यावेळेस इथे भरपूर झाडे,बागा आणि मोठे तलावसुद्धा होते.मला आता अंधुक आठवण आहे.
१९६०च्या सुमारास केवळ काही घरे असलेली  ही जागा जास्त सुंदर होती.जनसंख्या वाढल्यामुळे आता पाण्याचा  प्रश्न सुरु झाला आहे.आपण पाणी साठवून ठेवणे  शिकायला पाहिजे. सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.परंतु आपण त्या पाण्याचा योग्य वापर करत नाही.
तुम्ही सगळ्यांनी पावसाचे पाणी साठवण्याची योजना केली पाहिजे.पाण्यात कोणतेही रसायन अथवा खत टाकू नका.आपण जे साबण वापरतो त्यात  खूप रसायने असतात.आयुर्वेदिक साबण वापरा म्हणजे पाणी प्रदुषित होणार नाही.
तुमच्यापैकी किती जण स्वच्छ तलाव मोहिमेत भाग घेणार आहात?
मी तुम्हाला अधून मधून हात वर करायला लावतो म्हणजे तुम्ही जागे राहाल!
एकदा कोणीतरी एका संताला विचारले,"आम्ही जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा आम्हाला झोप येत नाही परंतु आम्ही जेव्हा तुमच्या व्याखानाला बसतो तेव्हा आम्हाला झोप येते,असे का?"
"हा फुलांचा बिछाना आहे,म्हणून झोप येते.चित्रपट काट्यांचा बिछाना आहे ,मग तिथे झोप कशी लागेल,"संताने उत्तर दिले.
मी इथे काही व्याखान देण्यासाठी आलेलो नाही. तुमच्यात एक तत्व आहे ज्याला ईश्वर तत्व म्हणतात.मी फक्त त्याच्याबद्दल सांगण्यासाठी आलेलो आहे.त्याचे  तुमच्यावर फार प्रेम आहे. तुम्ही काही काळजी करू नका.
ते शोधणे आणि त्याच्याशी संपर्क  प्रस्थापितकरणे फार सोपे आहे.मी हेच सांगण्यासाठी आलो आहे.बंगलोरमध्ये विजेची जोडणी मिळवणे फार कठीण आहे परंतु दैवी जोडणी सहजपणे मिळते.
राष्ट्रप्रेम असले पाहिजे,हिंसाचार रहित समाज हे आपले स्वप्न असले पाहिजे.आजकाल तर छोट्याशा जमावात देखील लोकांचे  बटवे आणि फोन चोरी होतात.आपला देश असा आधी नव्हता.आजकाल चोरी आणि गुन्हेगारी वाढू लागली आहे.
माझ काय स्वप्न आहे तुम्हाला माहिती आहे? अहिंसात्मक आणि गुन्हेगारी मुक्त समज. आपल्या कार्यकर्त्यांपैकी एक काठेवाडी (महाराष्ट्र) नावाच्या कुप्रसिद्ध गावात गेला.त्याने सगळ्यांना सत्संग आणि ध्यान करायला लावले आणि तीन चार महिन्यात लोकांनी घराच्या दाराला कुलुपे लावणे बंद केले.तिथे एका दुकानात एक डबा ठेवलेला आहे आणि लोक त्यात पैसे टाकतात आणि जे काही विकत घ्यायला आलेले आहेत ते घेतात.
जर तुम्ही जर्मनीला गेलात तर तेथील गावांमध्ये असे दिसेल की एक डबा असतो ज्यात लोक वस्तूच्या किमतीप्रमाणे पैसे टाकतात आणि ती वस्तू घेऊन जातात.हेच रामराज्य आहे. आपला देश देखील असाच होता.म्हैसूर आणि बंगलोर असे होते.आपण असा समाज आपल्या मुलांना पुन्हा एकदा द्यायला पाहिजे.आपण पावन,दैवी आणि अध्यात्मिक समाज निर्माण करायला पाहिजे जो गुन्हेगारी मुक्त,लाच लुचपत मुक्त आणि हिंसाचार मुक्त असेल.असे झाले तरच आपला देश उन्नती करू शकतो.मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असे करू शकाल.कराल ना?
असे समजू नका की या गोष्टी  बोलायला फार छान आहेत परंतु असे होणे शक्य नाही का? जर आपण सगळ्यांनी मिळून काम केले तर आपण निश्चितच हे करू शकतो.
आम्ही बऱ्याच टॅक्सी आणि रिक्षा चालकांना हे शिबीर करायला लावले आहे.वाहनात राहिलेले पैसे परत केल्याच्या एव्हढ्या कथा आहेत.आजदेखील चांगल्या लोकांची कमी नाही आहे.तुमचा विश्वास बसतो?चांगल्या लोकांची कमी नाही परंतु त्यांचा आवाज पोहोचत नाही आहे.आपण त्यांचा आवाज ऐकला पाहिजे.
लाच देणे हे एक पाप आहे.जे कोणी लाच घेत आहात,त्यांनी कमीत कमी एक वर्ष लाच घेऊ नये.लाच घेऊ अगर  देऊ नये.चला आपण सगळे शपथ घेऊ या की आपण लाच देणार नाही आणि जे लाच घेतात त्यांनी एक वर्ष लाच घेऊ नये.सुंदर,दैवी समाज निर्माण करून आपल्या देशाला उन्नत करण्याचे माझे स्वप्न आहे.तुम्ही सगळ्यांनी यात मदत करायला हवी.कराल ना मदत?
रोज थोडा वेळ काढून वीस ते तीस मिनिटे ध्यान करा.यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.आणि मग कोणीही तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य हिरावून घेऊ शकणार नाही.जर तुम्ही रोज ध्यान केले तर तुमच्यात खूप मोठे परिवर्तन घडून येईल.
"२०१२"नावाचा चित्रपट आहे ज्यामध्ये जग नष्ट होणार असे दाखवले आहे.लोकांमध्ये घबराट पसरवणारा हा एक बकवास आहे.लोक आधीच घाबरलेले आहेत,आणि या चित्रपटामुळे त्यांची भीती वाढली की प्रलय होऊन जग बुडणार आहे.म्हणून मी श्री डी. के. हरी यांना या बाबत संशोधन करून पुस्तक लिहिण्यास सांगितले.
"माया" दिनदर्शिकेची सुरुवात भारतात झाली.हे सर्व ज्ञान कोणे एके काळी भारतात होते.तर मग तुम्ही २०१२ बद्दल घाबरू अगर चिंता करू नका हे समजवायला  "२०१२-वास्तव कथा" हे पुस्तक लिहिले आहे.
भारतात जेव्हा अध्यात्म परमोच्च शिखरावर होते तेव्हा भारताची आर्थिक  स्थितीचांगली होती.परंतु जेव्हा देशाचा  आध्यात्मिक ऱ्हास झाला तेव्हा आर्थिक अस्थैर्य झाले.शंभर  वर्षापूर्वी  भारताचा स्थूल विकसन निर्मिती दर तेहतीस टक्के होता.त्यावेळी अध्यात्माचा प्रकाश होता.आपल्याला अध्यात्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक उन्नती करायला पाहिजे.इथे सगळ्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे आणि कमीत कमी खर्चात आयुष्य जगायचे आहे, हो की नाही?
तुमच्यापैकी किती जण कार्यकर्ते व्हायला तयार आहात? आपण सगळे मिळून काम करू या.सरकार तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करेल.काय झाले आहे की तो किंवा ती चांगली नाही असे म्हणून आपण दुषणे देत राहिलो.यातून काहीच चांगले निष्पन्न होत नाही.आपण दुसऱ्याला दुषणे देत राहतो आणि  स्वतःला सुद्धा.आपण दुसऱ्यावर आरोप  करणे बंद करून कामाला लागले पाहिजे.
प्रश्न : गुरुजी,आज जगात इतकी अशांतता आहे.एका गर्भवती स्त्रीने समाजात निरोगी बालक जन्माला घालण्याकरिता काय काळजी घ्यायला पाहिजे?
श्री श्री : मन प्रसन्न ठेवा.रोज संगीत ऐका.                                                                                                             शास्त्रानुसार हिरवा रंग पाहावा.हिरवा रंग शांत करतो तर लाल रंग प्रक्षोभित करतो.लाल रंग दृष्टीस पडला तर लगेच डोळे बंद करण्याची गरज नाही.                                                                                                                                              सकस आहार घ्या आणि हिंसात्मक चित्रपट पाहू नका.
प्रश्न : अध्यात्म म्हणजे काय? आत्मा आणि दिव्यत्व यांचे मिलन कसे होईल? स्वःताला अध्यात्माच्या मार्गावर आपण कश्याप्रकारे आणू शकतो?
श्री श्री : ध्यान.
प्रश्न : मला फक्त अभ्यासातच नाही तर सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष्य केंद्रित (एकाग्रता) करण्यात अडचण होते.मी काय करू?
श्री श्री : प्राणायाम कर. येस/आर्ट एक्ष्सेलच्या शिक्षकांबरोबर बोल.ते तुला लक्ष केंद्रित कसे करायचे ते शिकवतील.
प्रश्न : मी तब्येतीसाठी  विलायती औषध चिकित्सेकडे जाऊ का आयुर्वेदाकडे?
श्री श्री : मी याबाबत आधीच बोललो आहे.अपत्कालामध्ये  विलायती औषध चिकित्सेची गरज आहे. सकल औषधांची गरज आहे.
प्रश्न : माझी मनःस्थिती दोलायमान का असते?
श्री श्री : शरीरात काही रसायनांची किंवा खनिजांचा असमतोल झाल्यामुळे असेल.ध्यान,प्राणायाम आणि योग्य आहारामुळे मदत होईल.बाकी कशापेक्षा आशिर्वादाने(ब्लेसिंगने) खूप फरक पडेल.
प्रश्न : निसर्गामध्ये कहर आहे.समाजात हिंसाचार आहे.आम्ही ही परिस्थिती कशाप्रकारे हाताळावी?
श्री श्री : म्हणूनच तर आपण हे काम हातात घेतले आहे.चांगले लोक जागृत नाहीत.या कलीयुगात केवळ वीस टक्के लोक वाईट आहेत पण दयावान लोक सगळे झोपलेले आहेत.जर चांगले लोक जागे झाले तर बरेच परिवर्तन घडून येईल.



The Art of living
© The Art of Living Foundation