मला तुमची दुख: देऊन आनंदी राहा आणि सेवा, सत्संग आणि साधनेत रमा !!

२२ जानेवारी २०१२

माझं इथे येण्याचं एकमेव कारण आहे कि तुम्हाला हे सांगणे कि देव आहे आणि तो तुम्हाला खूप प्रेम करतो. हिंदी मध्ये एक म्हण आहे, “जो इच्छा करीहो मनू माही, प्रभू परताप कछु दुर्लभ नाही”. म्हणजे “देवाच्या कृपेने, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळेल.” हे एक सत्य आहे. तरीही तुम्हाला सर्व प्रथम देवावर विश्वास ठेवावा लागेल. देव सगळीकडे आहे म्हणजे तो आपल्यात पण आहे. देव अनंत आहे म्हणजे तो इथे आहे आत्ता ह्या क्षणी आहे. आपल्याला फक्त हा विश्वास असणे गरजेचे आहे. कोणताही प्रयत्न करण्याची गरज नाही. विवेक, विश्वास आणि विश्राम ह्या तीन महत्तवाच्या वस्तू आहेत.
जिथे पण गडबड-गोंधळ आहे तिथे कीर्तन सुरु करा आणि तिथला गोंधळ कमी होईल. जेव्हा आपल्या देशा बरोबर असं झाला होतं तेव्हा असचं झालं. तेव्हा महात्माजिनी काय केलं? ते बऱ्याच ठिकाणी गेले आणि सत्संग करू लागले. सगळे गाऊ लागले ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ आणि संपूर्ण देश एकत्र आला. गोंधळ निघून तिथे क्रांती चा जन्म झाला. आज सुद्धा ह्याची गरज आहे. जिथे अज्ञान, अन्याय, टंचाई आणि अस्वच्छता आहे तिथे शांतीपूर्ण क्रांती आणली पाहिजे. देशात अज्ञान काढून, अन्यायाच्या विरुद्ध उभे राहून, टंचाई संपून जिथे स्वच्छता नांदेल असे करण्यासाठी कीर्तनाची गरज आहे. जेव्हा केव्हा ह्या देशावर संकट आलं तेव्हा ज्ञानी आणि महात्म्यांनी ह्या देशाला नवी उमेद दिली.
आजपण आपण एका चौरस्त्यावर उभे आहोत, जिथे आपल्या देशात अध्यात्मिक लहर आणली पाहिजे. अध्यात्मिक म्हणजे काय? कुठे तरी बसून काही वेळ कीर्तन करणे? नाही ! अध्यात्म म्हणजे आपुलकीची भावना असणे. ‘आत्मवत सर्व भूतेषु यः पश्यति स पंडितः’. जो स्वतःला दुस्र्यांमध्ये आणि दुसऱ्यांना स्वतःमध्ये बघतो त्याला आपण अध्यात्मिक किंवा भक्त म्हणू शकतो. अध्यात्मिक म्हणजे काय? आपुलकीची भावना परीपक्व होणे आणि ‘कोणी वेगळा नाही, सगळे माझे आपलेच आहेत’ अशी जर भावना आपल्यामध्ये आली तर मग त्यालाच अध्यात्म म्हणतात.
आपुलकीची भावना वाढली पाहिजे. जिथे आपुलकी संपते तिथेच भ्रष्टाचार वाढतो. आज पर्यंत एकाही व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांबरोबर भ्रष्ट नाही राहू शकत. तो हे करूच शकत नाही. भ्रष्टाचार वाढला आहे म्हणजेच कुठे तरी आपुलकि कमी आहे. गैरवागणूक, गैरव्यवहार, आणि भ्रष्टाचार हा कोणी आपल्या लोकांवर कधीच करत नाही. आणि हे नेहमी आपुलकीच्या नसलेल्या लोकांबरोबर केलं जातं. हो आपल्याला एक सशक्त कायदा आणला पाहिजे, पण फक्त कायदा आणून नाही चालणार. कायदा तर हवाच पण त्या बरोबर जनता जागरूक सुद्धा झाली पाहिजे. जर आपण सगळे जागरूक झालो तर आपण भ्रष्टाचार मिटवू शकू. हिंसाचार मिटवू शकू.
आज सकाळीच मी वाचत होतो कि नक्षलवाद्यांनी १३-१४ लोकांना ठार मारले. मी कालच त्यांना फोन केला होता. औरंगाबाद जिल्ह्यात कालच आम्ही गेलो होतो. मी ऐकले कि ४-५ लोकं समर्पण करणार होती, पण काही कारणांमुळे नाही करता आलं. मी त्या युवकांचं अभिनंदन करतो ज्यांनी अज्ञानामुळे नक्षलवादाचं समर्थन केलं आणि आता हे समजले आहेत कि हिंसाचार त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुम्हाला सांगू हि मुलं फार शूर आहेत कि ज्यांनी आपलं जीवन धोक्यात टाकून जंगलांमध्ये तपस्या केली. त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि हृदय दुखावलं आहे कारण त्यांना देशातून गरिबी आणि जातीवाद काढून टाकायचा आहे आणि सगळ्यांना समान दर्जा द्यायचा आहे. पण त्यांचा मार्ग बरोबर नाहीये. म्हणून मी त्यांना नेहमी म्हणत असतो कि तो हिंसेचा मार्ग सोडून द्या आणि पुढे या; आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. मला सुद्धा भारताला पुढे बघायचं आहे, सर्वात पुढे. मला भारताला सगळ्यात शक्तिशाली आणि सर्वोत्तम देश म्हणून बघायचं आहे.
आर्ट ऑफ लिविंग ने ह्या वर्षी बरोबर ३० वर्ष पूर्ण केलीत. तुम्ही जिथे जाल तिथे भारताची अध्यात्मिकता तुम्हाला दिसेल. २० नोव्हेंबर रोजी जेव्हा मी उत्तर ध्रुवाच्या शेवटच्या टोकावर ट्रोम्सो ला गेलो, मी विचारलं कि इथे सूर्य कधी उगवेल. ते म्हणले २० जानेवारी, दोन महिने इथे संपूर्ण काळोख राहिल. तिथे २ महिने सूर्योदय होतच नाही. तिथली जनसंख्या ६० हजार आहे. अश्या ठिकाणी सुद्धा २ हजार लोकं एकत्र येऊन ‘ओम नमः शिवाय’ चा जप करतात, ध्यान  आणि प्राणायाम करतात. त्या लोकांच्या जीवनात बदल घडला आहे. तसेच तुम्ही तेरा दिल फ्युगो, दक्षिण ध्रुवाच्या जवळ असलेल्या शहरात असाल तर तिथे सुद्धा लोकं प्राणायाम, ध्यान आणि सुदर्शन क्रिया करताना दिसतील. त्यांना ह्या मुळे फायदा होतोय.
मी एका कारणाने हे सांगतोय- हे अध्यात्मिक ज्ञान भारताची देण आहे माणुसकीला. पण आपण ह्या ज्ञानाची कदर करत नाही. पण आता आपण कदर करायला हवी. जो आदर मिळायला हवा तो मिळत नाहीये. जर आपण आदर देऊ लागलो तर मग बुद्ध, महावीर, सीता, जनक, अष्टवक्र जिथे जन्मले त्या जागेला परत पूर्वी सारखी कीर्ती लाभेल. एकेकाळी पाटलीपुत्र किंवा पटना हि  भारताची राजधानी होती. पण ती कीर्ती काळा मागे हरवली. परत एकदा ह्या भूमीचे पुत्र जागे होतील, ती कीर्ती परत आणतील आणि हिंसा त्यागून उंची गाठतील.
मी अशी पण इच्छा करतो कि बिहार मध्ये १००% साक्षरता येवो. मी नितीश्जी आणि मोदिजी (मुख्य आणि उपमुख्य मंत्री) चं अभिनंदन करतो. कारण इथे मला एक अमुलाग्र बदल झालेला दिसतोय. खेड्यातली लोकं आधी पेक्षा जास्त आनंदी आहेत. पण तरी अजून बरचं काही करायचं आहे. साक्षरता वाढून लोकं भीती न बाळगता रस्त्यावर चालू शकली पाहिजेत. आता इतकी भीती नाहीये पण प्रगती पथावर चालणे सुरु करायला हवे. खूप संकटे आलीत पण त्यातून धीराने बाहेर पडले गेले. धीर सोडू नका, पुढे चालत रहा आणि मला खात्री आहे बिहार एक सशक्त राज्य बनेल.
सगळ्यांनी एक प्रतिज्ञा केली पाहिजे, कि मी लाच देणार नाही आणि घेणार नाही. जर एखाद्याला लाच घेण्याची सवय असेल तर मी त्यांना म्हणेन कि एका वर्षाची सुट्टी घ्या. फक्त माझ्या साठी हि सुट्टी घ्या. काही फरक नाही पडणार जर तुम्हाला काही नुकसान झाले तर. पण तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. सगळ्या देणाऱ्यांनी आजीवन आणि घेणार्यानी संकोच असेल तर एका वर्षासाठी हि प्रतिज्ञा केली पाहिजे. आपण असे वातावरण सर्वत्र तयार करू. कायदा हा ह्या रोगासाठी इलाज आहे. पण हा रोग पसरू नये हे अध्यात्माचं काम आहे. आपण अज्ञान काढून अन्याया विरुद्ध लढलं पाहिजे.
जातीवाद ला समर्थन वेदांमध्ये सुद्धा नाहीये. भगवान शिव ला दलित मानलं गेलं आहे. आणि बरेच ऋषी मुनि पैकी फक्त काहीच सवर्ण जातीतले होते. दलितान्मधले बरेच ऋषी होते. असं म्हटलं गेलं आहे कि ‘जन्मना जयते शुद्र, कर्मणा जयते द्विज’. तुमची जात तुमच्या कर्माने  ठरवली जाते, तुमच्या जन्मानी नव्हे. सगळ्याच जाती सारख्या आहेत आणि ह्या देशात सगळ्यांना मान मिळालेला आहे. आपण ते विसरलो. आपण जेव्हा एका वैद्याकडे जातो तेव्हा विचारतो का कि तो कुठल्या जातीचा आहे? आपण नेहमी शहराच्या सर्वोत्तम वैद्याकडे जाण्याचे इच्छुक असतो, बरोबर कि नाही? आणि जेव्हा आपल्याला एका वकिलाची गरज असते, तेव्हा सुद्धा असे प्रश्न आपण विचारतो का? आपण त्याकडे जातो जो सगळ्यात चांगला आहे. फक्त मतदानाच्या दिवशी आपण जातीचं विचारतो. हे बरोबर नाहीये. जेव्हा उदरनिर्वाह आणि मुलीच्या लग्नाचं ठरतं तेव्हा जाती विचारली जाते. तीन वस्तूंमधून जाती वाद काढला पाहिजे. उदरनिर्वाह, मुलगी आणि राजनीती ह्यान्मधून. मग भारताचा विकास जोरात होईल आणि तो एक सर्वोच्च देश बनेल. आणि बायकांचा आदर करायला हवा. ज्या देशात बायकांची अवहेलना होते तो देश प्रगती करू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अन्याया विरुध्द उभे रहा.
आपण सगळ्यांनीच वातावरणासाठी काही तरी केले पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा. आपल्या देशात कोणतेही नियोजन नाहीये. बटाट्यांचे भाव कधी खूप जास्त असतात तर कधी फारच स्वस्त मिळतात. शेतकऱ्याची सगळ्यात जास्त अवहेलना होते. खूप मेहनत करूनसुद्धा जास्त फळ मिळत नाही. मी गया मध्ये होतो आणि महाराष्ट्रात जेव्हा होतो तेव्हा लोक मला हेच म्हणाले कि जो मुलगा शेती करतोय त्याला कोणी पण मुलगीच देत नाहीये. असे त्यांनी मला सांगितले. जर शेतकरी आनंदी आहे तर मग त्याच्या आनंदाचं  पिक आपण सगळ्यांनाच आनंदात ठेवतं. जर शेतकरी आनंदी नाही तर मग आपलि प्रकृती सुद्धा चांगली राहणार नाही.
ज्या सगळ्यांनी गीता वाचली नाहीये, त्यांनी एकदा तरी ती वाचावीच. एकेकाळचे महान शास्त्रग्य ऐन्स्तेईन म्हणून गेले आहेत कि, ‘माझे जीवन गीता वाचून बदलून गेले आहे’. महात्मा गांधी गीता दररोज वाचायचे. एके काळाची गोष्ट सांगतो, कोणालाच माहित नसेल कदाचित. माझे गुरु पंडित सुधाकर चतुर्वेदी महात्माजीं बरोबर रेव्रा येथे होते. ते त्यांचा बरोबर चाळीस वर्षांपासून होते. चारही वेदांचं ज्ञान असल्यामुळे त्यांना चतुर्वेदी म्हणत. कस्तुरबा गांधी वारल्या नंतर, महात्माजींच्या डोळ्यात अश्रू होते, आणि ते पंडित चतुर्वेदिना म्हणाले. (त्या काळी पंडितजींना लोकं बेन्गलुरी म्हणत). महात्माजी म्हणाले, ‘ बेन्गलुरी, आज गीतेचा दुसरा अध्याय वाचा, बापूंची परीक्षा आहे आज, मी स्थितप्रग्य आहे कि नाही’. म्हणून त्यांनी दुसरा अध्याय वाचला, “स्थित प्रजन शक् भाषा समाधिस्थस्य केशव, स्थीततीधी: किम प्रभाशेत: किमसीता व्रजेत किम (अ. दुसरा, ओळ. ५४)’ डोळे बंद करून त्यांनी ते ऐकलं, आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले. ते म्हणाले ‘आज माझ्या परीक्षेचा दिवस आहे. आणि गीतेच्या आधाराने मी हे दुख: सहन करू शकतो’. ज्या सगळ्यांनी ती वाचली नाहीये त्याने एकदा तरी त्याला वाचलचं पाहिजे. जास्त जास्त एक आठवडा लागेल.
गीते मध्ये सगळ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. मन, अन्नाचे प्रकार, सात्विक, राजसिक आणि तामसिक, आणि तुमच्या स्वभाव बद्दल सुद्धा. काही लोकांना काही काम दिलं तर ते त्याला पुढे ढकलतील. बाकीचे म्हणतील आम्ही नाही करू शकत. आपण वेगळ्या लोकांचे वेग-वेगळे दृष्टीकोन बघू शकतो. एका मन:स्थितीत तुम्ही होकारार्थी असता आणि म्हणता ‘हो ! हे काम होईल’. हा सात्विक दृष्टीकोन आहे ह्याला धृती म्हणतात. आणि मग राजसिक आणि तामसिक दृष्टीकोन आहे. तुमचा कोणता दृष्टीकोन आहे हे तुम्हाला स्वत:मध्ये बघता येईल. एक काम दिल्यावर तुम्ही ते करायला किती उत्सुक असता किंवा त्याला टाळता ह्याने तुमच्या चारित्र्याची परीक्षा होते. ह्यालाच ‘स्वाध्याय’ म्हणतात.
आर्ट ऑफ लिविंग चा कोर्स हा ५ मुख्य सूत्रांवर बनलेला आहे. विपरीत परिस्थिती आपल्या भोवती होत राहते. आपण आपल्याला अश्या प्रसंगांमध्ये समतोल ठेवलं पाहिजे. दुखा: मध्ये एकदम बुडून नाही जाता आणि आनंदाने अति उत्साहित नाही होता आपण आपला संयम बाळगला पाहिजे. हे पहिले सूत्र. दुसरे असे कि लोकांचा स्वीकार करा. आपल्याला नेहमीच आपल्या परीने लोकं वागली पाहिजेत असे वाटते. असे कधी होतं का? नाही असे शक्य नाहीये. सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसरे सूत्र आहे, लोकांचा स्वीकार करा आणि मग बदल घडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्याच क्षणी तुम्ही म्हणता. ‘मी जसे म्हणतो तसे करा’. असे सगळ्या घरात होतं. नवरा-बायको, बहिण-भाऊ, सासू-सून, वडील-मुलगा मध्ये ह्या मुळेच तंटे होतात. दुसऱ्या व्यक्तीला समजून नाही घेण्याची धडपड आपण ज्ञान पसवरून हलकी करू शकतो. शेकडो लोकांनी हि गोष्ट जेव्हा समजून घेतली तेव्हा त्यांच्या जीवनात बदल घडला.
तिसरा, ‘आपण जेव्हा चूक करतो तेव्हा आपण म्हणतो ‘आता काय करायला हवं?’ ते असचं होऊन गेलं’ आपण हतबल असल्याचा आपल्याला भास होतो. पण जेव्हा लोक चुका करतात तेव्हा आपण त्या मागे हेतू शोधतो. हे बरोबर नाहीये. आपण ह्याचा विचार केला पाहिजे. चौथं म्हणजे दुसऱ्यांचा मतांचा फुटबाल बनू नये. दुसर्याना तुमच्या बद्दल जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या. जे चांगले काम करतात त्यांची सुद्धा लोकं आलोचना करतात आणि जे चूक काम करतात त्यांची सुद्धा लोकं स्तुती करतात. आपण आपलं जीवन लोकांच्या मतांवर अवलंबून ठेवून नाही जगू शकत. आणि पाचवा म्हणजे वर्तमानात जगणे. भूतकाळाला विसरून, भविष्यासाठी काम करणे पण वर्तमानात जगणे. ह्या पाच तत्तावांच्या मदतीने आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा खोल जाऊ शकतो जिथे आपल्याला ‘मी प्रेमाचा स्त्रोत आहे’ अशी अनुभूती होते. माझ्या प्रत्येक कणाकणा मध्ये ओम आहे हा आपल्याला अनुभव होतो.
आज एक काम करा, पहिली तुमच्या गरजांची एक यादी करा आणि मग तुमच्या जबाबदाऱ्यांची करा. जर तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्या गरजा पासून कमी आहेत तर तुम्ही एक असंतुष्ट जीवन जगत आहात. पण जर ह्याचं उलट आहे तर मग तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी आहात. अजून एक गुपित असं कि जर तुम्हाला स्वत:साठी काहीच नको असेल तर तुमच्या आंत मधून दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती येईल. जर तुम्हाला काही नको आहे तेव्हा तुम्ही दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करू शकता आणि त्याचं काम होऊंन जाईल. नवरात्रीच्या वेळी आपण लहान मुलींची अष्टमीला पूजा करतो(कन्यका आणि कन्या पूजन). तुम्हाला माहित आहे का कि हे आपण का करतो? कारण देवाची झलक लहान मुलांच्या मनात दिसते, त्यांच्या भोळेपणा मध्ये दिसते. तिथे शक्ती राहते. सगळ्या मध्ये हि शक्ती आहे पण आपल्या इच्छा, आकांक्षा, आणि टेन्शन मुळे ती शक्ती बंदिस्त झाली आहे. जर तुम्ही लहान मुलांना सहजपणे विचाराल कि तुला काय हवे आहे तेव्हा ते लगेच म्हणतील कि मला काहीच नकोय. त्या वेळेस जेव्हा तुम्हाला स्वत:साठी काही नकोय तेव्हा तुमचे आशीर्वाद नक्कीच लाभतील. म्हणून तुम्ही मोठ्या माणसांकडे जाऊन आणि संतांकडे जाऊन आशीर्वाद घेता कारण त्यांना काही नकोय. मला स्वत:साठी काही नकोय, आणि सगळे आनंदी राहू देत’. जर अशी तुमची मन:स्थिती असेल तर तुमचे आशीर्वाद उपयोगी ठरतील.
मी लाखो लोकं बघितले आहेत जे टंचाई मुक्त जीवन जगत आहेत कारण ते एका दिशेने एक पाउल उचलत आहेत. अज्ञान, अन्याय आणि टंचाई वाहून गेली आहे. मग स्वच्छता येते. आपण आंत मधून स्वछ राहिलं पाहिजे आणि मग वातावरण सुद्धा स्वछ ठेवलं पाहिजे. इथे असे बरेच लोकं आहेत जे स्वत:चे वाश-बेसिन सुद्धा नीट धुवत नाही. मग स्वत:चे घर स्वछ ठेवण्याचं आपल्या डोक्यात का येत नाही? आणि जरी लोकं घर स्वछ ठेवतील पण कचरा रस्त्या वर फेकतील, ते रस्ते स्वछ नाही राहणार. जर इथे बसल्याने २ तास जरी महिन्यातून काढले तर पटना स्वछ होईल. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हे काम करा.
आमचं पाहिलं असं काम जालना, महाराट्रापासून  सुरु झालं. प्रत्येक व्यक्ती हातात झाडू घेऊन आला आणि ३ तासंमध्ये सबंध जालना स्वछ झालं. महापौरांना सुद्धा आश्चर्य झालं. ते म्हणाले ‘अश्या सुद्धा गोष्टी समाजामध्ये होतात?’. आणि कॉम्मोन्वेल्थ खेळांच्या वेळी जेव्हा सरकारने हात टेकून दिले, तेव्हा ५ हजार आर्ट ऑफ लिविंग स्वयं सेवकांनी पुढे येऊन दिल्ली स्वछ केली. ‘मेरी दिल्ली मेरी यमुना’ ह्या मुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या. मी त्यांना म्हटलं कि आपण ह्या दिशेने १ पाउल उचलाल तर प्रकृती १० पाऊले आपल्या वतीने येईल. मी म्हटलं कि मला यमुने मध्ये मासे बघायचे आहेत. यमुना एक कचरा वाहणारी नदी बनून गेली होती. मथुरे मध्ये जेव्हा यमुनेत लोकं पाणी हातात घ्यायचे तेव्हा त्यांना किडे दिसायचे. ५०० ट्रकने भरून घाण  यमुनेतून काढण्यात आली. आणि हे सगळं कोणी केलं आपण सत्संगि आणि साधकांनी. आणि त्या नंतर पुरामुळे यमुनेत मासे परत दिसू लागले. प्रकृतीने यमुनेला अगदी स्वच्छ करून टाकलं. मी तर म्हणेन कि जर पटना मध्ये राहण्यारया लोकांनी २ तास जरी दर महिन्या मध्ये दिले तर हे शहर स्वच्छ होऊ शकत. हा चौथा मुद्दा घाण काढणे. म्हणून चार मुद्दे होते, अज्ञान,अन्याय, टंचाई आणि अस्वछता. ह्याला सत्संग म्हणतात.
एका सेल फोने ला व्यवस्थित चालण्यासाठी काय गोष्टी लागतात? सीम कार्ड, बटरी, आणि नेटवर्क. तीन वस्तू आहेत, विश्वास, बुद्धी, आणि विश्राम. शांत बसून ध्यान करणे हे विश्राम आहे. देवाची अनुभूती काही फार दूर नाहीये. जर तुमच्या कडे ह्या चार वस्तू आहेत तर देवाशी तुमचं नातं जमेल.
आज जे काही तुमची दुख: आहेत ती मला देऊन जा. मला तुमच्या चेहऱ्यावर एक कधी पण नाही जाणार हसू बघायचं. मला तुमाच्या व्यथा देऊन जा आणि आपलं जीवन सेवा, सत्संग आणि साधने मध्ये व्यतीत करा.
मागच्या महिन्यात मी अमेरिकेत होतो तिथे एकाने ‘ओम’ ह्या शब्दावर बरीच माहिती काढून ठेवली होती. त्याने ‘ओम’ ह्या शब्दाचा उच्चार रेकोर्ड केलं आणि त्याला कळलं कि ‘ओम’ तोच स्वर आहे ज्यावर पृथ्वी स्वत:भोवती फिरते. म्हणून प्राचीन काळापासून बौद्ध, जैन, थावो, शिंतो, सिख, हिंदू प्रथांमध्ये  ‘ओम’ ह्या शब्दाला खूप महत्त्व दिलं आहे. त्याला ‘अनाहत नाद’ असे म्हणतात. आणि जर तुम्ही ध्यानात खोल वर शिरलात तर तुम्हाला हाच शब्द हाच स्वर ऐकू येईल. इस्लाम आणि ख्रिस्ती समाजांमध्ये ‘आमीन’ किंवा ’एमेन’ म्हटले जाते. ‘ओम’ हा स्वर मन शांत करण्या साठी खूप उपयोगी आहे.
मी नेहमी म्हणत आलो आहे, ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि भारतात ह्या गोष्टीची सुरुवात झाली. मी जेव्हा चीन मध्ये गेलो तेव्हा ते म्हणाले कि आमचे शासन कसे हि असले तरी भारत आणि चीन हे फार जुन्या काळापासून मित्र राहिले आहेत. बौध्ह धर्म भारतावरून इथे आला आणि तत्तवग्यान दृष्टीने सुद्धा हे दोन्ही देश जवळ आहेत. त्यांनी माझे असे स्वागत केले. मानवियता तिथे थोडी कमी होतेय म्हणून ते म्हणाले तुम्ही इथे या आणि इथे तुमची शाखा खोला.
जेव्हा इराक चे प्रधानमंत्री मला तिथे बोलवत होते, तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले कि त्यांना भारतातून काय हवे आहे? तेव्हा ते म्हणाले कि मला भारतातून अध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान हवं आहे. ‘तुम्ही किती शांतीपूर्ण जगता, जिथे वेग-वेगळ्या जाती-जमातीचे, धर्माचे लोकं एकत्र राहतात’. हा आपला एक चांगला मुद्दा आहे आणि हे आपल्या देशात सुद्धा हवं आहे. तुमच्या शिकवलेल्या प्राणायाम, ध्यान ह्या वस्तूंन मुळे आमची लोकं नेहमी आनंदी राहतात आणि कोणत्याही कसोटीसाठी तयार उभे राहतात. मला सगळ्या लोकांना असेच बनवायचे आहे’. तसेच ते म्हणाले कि त्यांना असं वाटतं कि भारताच्या उद्योगपतींनी तिथे जाऊन तेल काढून घ्यायला हवं. त्यांना ते अमेरीकेप्क्षा भारतातला तेल द्यावासा वाटत होत. आणि तिसर म्हणजे ‘माहिती तंत्रज्ञान’. त्यांना भारतीयांनी इरक़ च्या लोकांना माहिती तंत्रज्ञाना संबंधी ट्रेनिंग द्यायला हवं. त्याने ५० युवकांना शांतीदूत बनण्ण्यासाठी बंगलोर मध्ये पाठवलं. त्यांना तीन महिने ट्रेनिंग दिल गेलं तसेच मोरोक्को च्या लोकांना सुद्धा ट्रेनिंग दिलं गेलं. मग ते सगळ्यांना शिकवू लागले आणि प्राणायाम, योग आणि ध्याना मुळे बऱ्याच लोकांचं फायदा झाला. तुम्ही सुद्धा प्राणायाम, योग असणं करावा.
प्रश्न: गुरुजी, आजकालच्या जीवनात तड-जोड करावी लागते. महात्तावाकांशी लोकांनी कोणत्या मानवीय भावनांच जतन केलं पाहिजे?
श्री श्री: तुमच्या विश्वासाने. तुमचे ध्येय साध्य होईल, इतकी घाई का आहे. मानवीय भावना म्हणजे आपल्या बरोबर नाही झाल्या पाहिजे अश्या वस्तू आपण दुसऱ्यान बरोबर नाही करणे. आणि दुसऱ्यान बरोबर तसेच वागणे जसे आपल्या बरोबर लोकांनी वागले पाहिजे.
प्रश्न: गुरुजी, आज सगळी कडे राजनीती चालू आहे. अध्यात्मिक लोकांनी राजनीती पासून दूर राहावे का?
श्री श्री: राजनीती म्हणजे काय? ते म्हणजे त्या जागेच्या लोकांच्या गरजे साठी दळण-वळण, शैक्षणिक, सुरक्षा. म्हणजे राजनीती. अध्यात्मिक वेगळ आहे. लोकांच्या भल्या साठी केलं गेलं ते अध्यात्म. शासक सुधारक नाही आणि सुधारक कधी शासक नाही. ह्या दोन्ही जबाबदाऱ्या लोकांनी एकमेकांच्या सहयोगाने पुढे वाढावे. राष्ट्राने एका अध्यात्मिक गुरु कडून सल्ले घ्यावे. म्हणूनच पत्रकार किंवा गुरु हे नेहमी तटस्थ भूमिका देऊ शकतात. त्यांना कोणत्या एका पक्ष मध्ये नाही जायचंय. ते देवाचे आहेत आणि सत्यासाठी उभे राहतात आणि तशेच सल्ले देतात. असे करायला हवे.
प्रश्न: गुरुजी, आयुष्यात ध्येय काय असलं पाहिजे, पैसा, कीर्ती, पद किंवा काहीतरी वेगळ?
श्री श्री: समाधान !
प्रश्न: गुरुजी बिहार मध्ये बरेच कॉलेज आहेत, त्यातल्या एका विद्यार्थ्याने असं विचारले आहे कि, ‘पुराणांमध्ये बऱ्याच देवतांचे लहान वाहन गणेशजी आणि उंदीर आहेत, ह्यांचा अर्थ काय?
श्री श्री: गणेश रहस्य म्हणून मी एक सीडी बनवली आहे. हत्ती, उंदीर आणि इतर बर्यचं गोष्टीचं रहस्य. आपण नंतर कधी बोलू त्यावर. आपण म्हणतो कि देवी आणि देवता हे प्रत्येक प्राण्यात आहे. प्रत्येक प्राणी आपल्या बरोबर काही शक्ती, तरंग आणतो. म्हणून शास्त्रज्ञ म्हणतात कि एक जरी प्राणी नाही राहिला तर जगबुडी होईल.
प्रश्न: आपण घेतलेला निर्णय बरोबर कि चूक आहे हे कसे ठरवावे?
श्री श्री: वेळ सांगेलं तुम्हाला. बुद्धीचा वापर करा.आत्म्यामधून एक आवाज येईल आणि त्या मुळे कळेल कि ते बरोबर कि चूक. जर चूक असेल तर चिंता पुढे चुका करू देणार नाही. जर बरोबर असेल तर आनंद, शांती आणि समाधान मिळेल.
प्रश्न: गुरुजी, असे नेहमी म्हटले गेले आहे कि सकारात्मक विचार करा, पण मन हे नेहमी नकारात्मक विचार करतं? ह्या साठी काय करावं ?
श्री श्री: तुमचा शरीर स्वच्छ करा. ‘त्रीफळा चूर्ण’ आठवड्यातून २-३ वेळा घ्या. तुमची जेव्हा पचन शक्ती चांगली असेल तेव्हा मन पण बरोबर काम करेल. जर तुम्हाला बद्धकोष्टता असेल तर मन पण सगळीकडे जाईल. शरीर स्वच्छ करण्यसाठी आठवड्यातून एकदा तरी त्रिफळा घेणे बरे राहिल. आयुर्वेद मुळे शरीर स्वछ राहत. प्राणायामामुळे प्राण पवित्र होतो, भजनांमुळे मन पवित्र होतं. ज्ञानामुळे बुद्धी स्वछ राहते आणि धारदार होते. दानामुळे मालमत्ता पवित्र होते.
२-३ टक्के आपल्या आपण जे कमावतो ते सामाजिक कामासाठी वेगळ ठेवलं पाहिजे. जर तुम्ही हजार रुपये कमावता आणि ते सगळेच स्वत:वर खर्च करता तर ते बरोबर नाहीये. २,३, किंवा ४ % सुद्धा तुम्ही सामाजिक काम साठी बाजूला ठेवलं पाहिजे. इस्लाम ‘झकात’ द्यायला सांगत म्हणजे कमीत कमी १०% कमाई सामाजिक कामासाठी खर्च करा. आपल्या पुराणात सुद्धा असं म्हंटल गेलं आहे कि २०% कमाई सामाजिक कामासाठी खर्च करा. २०% फार जास्त आणि फार कठीण होऊन जाते करतना. म्हणून ३% करणे ठीक आहे. कलीयुगात इतके जरी केलेत तरी भरपूर आहे.
जसे दान कमाई साठी तसेच जेवणासाठी तूप. मैथिली ब्राह्मण म्हणायचे कि अर्धा/ १ चमचा तूप भातावर त्याला पवित्र करतो. काही लोकांना वाटत कि हि एक अंधश्रद्धा आहे जी आपण पाळतो. पण एका हृदयरोगतज्ञ च्या मते फक्त जर भात खाल्ला तर ते लगेच ‘साखर’ बनून जाते. आणि मग डाइबेटीस आणि हृदय रोग होतात. जर एकच चमचा तूप वापरलं तर ते जेवण समिश्र साखर बनून पचन हळू होत आणि डाइबेटीसं आणि हृदय रोग होण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच आपले जे पूर्वज म्हणायचे ते बरोबर होत.
हे हळदी बाबतीत सुद्धा खरे आहे. तुम्ही त्याच्या शिवाय जेवण बनवू शकत नाही. काश्मीर ते कन्याकुमारी सगळेच हळदी वापरतात. ३० वर्ष्यान्पुर्वी लोकं म्हणायचे कि हळदी चा काही उपयोग नाहीये. अमेरिकेने त्या वर काम केलं आणि त्यात कळलं कि हळदी मध्ये ‘एन्टी-ओक्सिदेंत’ किंवा कर्क रोग होऊ नाही देण्यासाठी चांगल आहे. आणि म्हणून सगळे त्याला परत वापरू लागले आहेत. पुराण्या काळी कर्क रोगाचे प्रमाण आपल्या देशात नव्हतच. पण आज सगळीकडे कर्क रोग सापडतो. आधी हळदी भरपूर वापरली जायची. त्याला आयुर्वेद मध्ये ‘व्यवस्थापक’ असे म्हणायचे. म्हणून आपल्याला आयुर्वेद कडे परत जावे लागेल. त्यात असे बरेच गुण आहेत ज्याला जगात आज मान्यता आहे.
प्रश्न: गुरुजी तुम्ही म्हणता कि तुम्ही मतदान द्या पण कसे कळावे कि कोण व्यक्ती बरा आहे. सगळे सारखेच वाटतात.
श्री श्री: अध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला सगळेच सारखे वाटले तर ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही सगळ्यांनाच सारख म्हणणार नाही. दर क्षेत्रात काही अयोग्य लोकं आहेत. काही लोकं संताचे कपडे घालून, काही पुस्तके वाचून ज्ञान देतात पण पाप सुद्धा करतात. डॉक्टर लोकां मध्ये सुद्धा काही अशे आहेत जे किडनी चोरून विकतात. काही वकील सुद्धा असे आहेत. सगळ्याच ठिकाणी असे लोकं असतात. पण जर तुम्ही म्हणाल कि सगळे संत, वकील, डॉक्टर आणि राज्यकर्ते चूक आहेत तर मग ते बरोबर नाहीये. सगळे पदाधिकारी चूक नाहीयेत तसेच सगळे पोलीस भ्रष्ट नाहीयेत. काही पोलीस खर्च खूप चांगले आहेत. जर आपण सगळ्यांना एकाच गोष्टीमध्ये बघितले तर ते चूक राहिल. म्हणून जो व्यक्ती तुम्हाला सगळ्यात योग्य वाटेल त्याला शोधा आणि हृदयातून कळेल. तो व्यक्ती बरोबर आहे कि नाही हे तुम्हाला कळून जाईल.
प्रश्न: गुरुजी मन आणि हृदया मध्ये कोणाचं ऐकावे? मन काही वेगळ म्हणत आणि हृदय काही वेगळ म्हणत.
श्री श्री: व्यवहार करायचा असेल तर मनाचं ऐका आणि जीवन जगायचं असेल तर हृदयाच. जर तुम्ही व्यवहारात हृदयाच आणि जीवनात डोक्याच् ऐकल तर तुम्हाला अपयश येईल.
प्रश्न: गुरुजी, साधारण माणूस समाज परिवर्तनात काय मदत करू शकतो?
श्री श्री: जो स्वत:ला साधारण माणूस समजतो तोच बदल घडवू शकतो. जो स्वत:ला विशेष सजतो तो बदल नाही आणू शकणार. आणि असं विचार नका करू कि तुम्ही साधारण आहात म्हणून काही करू नाही शकणार. तुम्ही बरेच करू शकता. आता पर्यंत मी जे काही सांगितले आहे ते तुम्ही करू शकता.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणता प्रत्येक व्यक्ती मध्ये देवाला बघा. मला तुमच्यात देव दिसतो पण मग दुसऱ्यान मध्ये देव कसा दिसेल?
श्री श्री: सूर्य जो खिडकीतून दिसतो, पण भिंतीच्या मागे, आहे तो सूर्यचं. स्वीकार करा. ‘कुच्छ जान के चलो कुच मान के चलो, प्रेम से सबको गले लागते चलो. जीवन चंद दिनो कि बात है’. काही गोष्टी जाणून घ्या, स्वीकार करा, आणि सगळ्यांवर प्रेम करा. जीवन थोड्या दिवसांचाच आहे.
प्रश्न: गुरुजी, राग कसा आवरावा? बऱ्याचदा प्रतिज्ञा घेऊन सुद्धा माझा राग अनावर होतो.
श्री श्री: बिन्चुक्पणा  तुम्हाला अति प्रिय आहे. काही जागा चुकांसाठी सुधा ठेवली पाहिजे. सगळं काही एका स्वप्ना सारखं बघा. सगळ्काही स्वप्न आहे. स्वत:च्या आयुष्याच बघा, तुम्ही शाळेत गेलात, कॉलेज मध्ये आणि आता कामावर. इथे येताना ट्राफिक जाम मध्ये तुम्ही अडकलात आणि त्रागा करत होतात. पण इथून जाताना हसून निघा. इथे येताना ट्राफिक होतं आणि परत जाताना तुम्हाला तोच ट्राफिक मिळेल. म्हणून जाताना आनंदी होऊन जा. सगळं काही तुमच्या मन:स्थितीवर अवलंबून आहे.
प्रश्न: गुरुजी, सगळ काही सोसणे म्हणजे समाधान आणि स्वीकारुवृत्ती का?
श्री श्री: नाही! मी तुम्हाला समाधान काय आहे ते सांगू शकणार नाही. जर तुम्हाला आत्ता पर्यंत कधीच समाधान झाले नाही तर ह्या पुढे तुम्हाला ते होणार नाही. तुम्ही त्याला नक्कीच अनुभवला असेल. जरा मनाला शांत होऊ द्या. तुम्हाला काय काळजी आहे? ती इथे घेऊन या. इथे या आणि त्याला १० मिनिटे बसून समर्पित करा. जेव्हा मन विश्राम करतं तेव्हा तुम्हाला  माहित आहे कि समाधान काय आहे. सगळं काही इथेच राहिलं आणि तुम्हालाचं सोडून जावे  लागेल. जे काही आधी इथे होते ते सगळे सोडून गेले आहेत. आठवत नाही का तुम्हाला? म्हणून बरेच लोकं गेले आहेत आणि तुम्हाला पण जावे लागेल. इतक जरी ज्ञान पदरात पडल तरी समाधानाची अनुभूती होईल.          
प्रश्न: गुरुजी, नात्यांना आपल्या आत्मसम्माना समोर कमी पडू द्यावे का?
श्री श्री: मी ह्या प्रश्नाला बळी नाही पडणार आहे. तुम्ही काही वेगळा विचार करत आहात, प्रश्न काही वेगळा विचारत आहात, मी एक उत्तर देईन, तुम्ही ते सरळ किंवा वेगळ्या मार्गाने आपल्या जीवनात उतरवाल, आणि मग म्हणाल गुरुजी म्हणाले म्हणून मी हे केलं! नाही ! आत्म सम्मान एक आहे आणि अहंकार एक. अहंकाराने कृतीम्पणा जन्माला येतो पण आत्म सम्मान तो आहे जो तुमच्या पासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही. जर तुम्हाला आत्म सम्मान असेल तर लाख लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्यात तरी सुद्धा तुम्ही हसत राहाल. टीकेचा स्वीकार कराल. हा दुसऱ्या व्यक्तीची निवड आहे काय बोलाव आणि काय नाही. कोणीतरी मला काहीतरी सांगितल. मी म्हणालो, सगळ्यांना हक्क आहे आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करायला. आहे कि नाही? मग आपण आपला मन कश्याला खराब करावं?
प्रश्न: आयुष्यात यश हे कसं मोजावे? खूप मेहनत घेवून सुद्धा फळ मिळत नाही तेव्हा काय करावं?
श्री श्री: यश मिळण्यासाठी ५ महाभूतांची गरज आहे फक्त परिश्रम कामाचे नाहीत. परिश्रम, आशीर्वाद, भाग्य, काम करण्याची वस्तू, आणि बरोबर मन:स्थिती. हे सगळ असेल तर तुम्ही काही करू शकाल.
प्रश्न: मला माहित आहे कि मी जे करतोय ते चूक आहे पण तरीही मी स्वत:ला थांबू शकत नाही. का?
श्री श्री: कारण तुमच्या मध्ये एक आशा आहे कि मला तिथे आनंद मिळेल. पण जेव्हा तुम्ही ध्यानात मोठ्या आनंदाला सामोरे जाल, तेव्हा आपोआप सोडून द्याल. म्हणून प्राणायाम, ध्यान करायला हवं. लाखो लोकांनी आपल्या वाईट सवयींचा त्याग हे केल्या नंतर केला. काळजी नका करू !
प्रश्न: आपला विधी वर विश्वास असावा का?
श्री श्री: आपण स्वत:ची विधी स्वत: बनवतो. जर तुमच्या मध्ये विश्वास असेल तर तुम्ही स्वत: तुमचं भाग्य बनवू शकता.
प्रश्न: व्यक्तीला जीवनामध्ये यश मिळाले असे केव्हा समजावे?
श्री श्री: जास्त हसा आणि जेव्हा तुम्ही दुख:त पण हसत असाल तेव्हा समजा तुम्ही जीवनात यश कमावलत.
प्रश्न: काय जास्त महत्त्वपूर्ण आहे कर्म कि भाग्य?
श्री श्री: पहिले तुम्हाला टी.व्ही बघायचा आहे कि ऐकायचा आहे. ह्या गोष्टी बरोबर जातात. जर दोन दुकान आजू-बाजूला असतील तर एक कमावतो आणि दुसरा गमावतो. असे का? एक गोष्ट दिसत नाही. पण ती अदृश्य वस्तू आपण बाधू शकतो. भाग्याला दोष देऊ नका. तुम्ही तुमचा भाग्य बदलू शकता. भारताचे युवक इतके शक्तिशाली आहेत कि स्वत:चे भाग्य बदलू शकतील. आशा हरून जाण्याची काहीच गरज नाही. जर तुम्हाला कोणाला असं वाटला कि काही राहिल नाही आणि नैराश्य आलं तर कोणाही आर्ट ऑफ लिविंग च्या टीचर्स शी संपर्क साधा. जर कोणाला आत्महत्या करण्याच वाटल तर पहिले येऊन माझी समती घेवून जा आणि मग पाउल उचला. नाहीतर इथे नाही आणि तिथे पण तुम्हाला जागा मिळणार नाही. मध्ये अडकून राहाल. आणि तुम्हाला हे पण माहित आहे कि मी तुम्हाला संमती देणार नाही.
प्रश्न: विद्यार्थी आत्महत्या करत आहेत का?
श्री श्री: कारण त्यांना कोणी पण अध्यात्म शिकवला नाहीये. कोणी त्यांना प्राणायाम आणि ध्यान शिकवला नाहीये. आम्ही ते शिकवायला तयार आहोत. एस!+ कोर्स सगळ्या ठिकाणी शिकवला जातो आणि तो सगळ्यांनी करावं. इथे इईत मधले शिक्षक आहेत जे सगळीकडे जाऊन शिकवतात. तुमचा जीवन बदलून जाईल. मन नैराश्य कडे वळल्यावर आणि आत्महत्येचा विचार येत असेल तर ते कधी नाही करू. आणि जर काही त्रास असेल तर तो मला देऊन टाका. आणि तुम्ही त्यातून निघून याल लगेचच.
प्रश्न: यशाची एक गुरुकिल्ली काय आहे?
श्री श्री: अपयश पचवता येणं हि यशाची गुरुकिल्ली आहे.
प्रश्न: जीवनाचे ध्येय काय असलं पाहिजे?
श्री श्री: ज्याला माहित आहे तो हे सांगणार नाही, आणि ज्याने सांगितला त्याला माहित नाहीये!
प्रश्न: ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे का?
श्री श्री: ज्योतिषशास्त्र एक विद्या आहे पण ज्योतीश्शास्त्राग्य वैज्ञानिक नाहीयेत. नेहमी काही न माही सांगतील. जर तुमच्या कुंडली मध्ये दोष आहे तर ते ज्ञान, सत्संग आणि सेवा मुळे निघून जाईल.  तुम्ही सगळं काही बदलू शकता. हे माहिती हवं कि भूतकाळ आपले भाग्य होत आणि भविष्य काळ आपण घडवू शकतो.
प्रश्न: मला अभ्यास करावासा नाही वाटत.
श्री श्री: थोडा प्राणायाम आणि ध्यान करा आणि मग तुम्ही अभ्यासात लक्ष घालू शकाल.
प्रश्न: भारत अध्यात्मिक क्षेत्रात इतका पुढे आहे तरी जगात इतका मागे का?
श्री श्री: कोण म्हणत कि भारत मागे आहे? तुम्हाला माहित आहे, आज अमेरिका सगळ्यात जास्त कर्ज-बाजरी देश आहे. आर्थिक स्थिती तिथे बिकट आहे आणि देशावर खूप खर्च आहे.
           
        

    The Art of living

© The Art of Living Foundation