ज्ञानामुळे अज्ञानाचा अंधार दूर होतो !
१५ जानेवारी २०१२

ज्या शिक्षणाने मनुष्याला आत्मबल प्राप्त होते आणि तो दु:ख्खापासून दूर जातो, ते खरे शिक्षण. जर कोणी टीका केली तर माणूस निर्भयपणे त्याला सामोरा जातो आणि जर टीका करायची वेळ आली तर संयमाने आणि आत्मविश्वासाने न कचरता करतो. भित्रेपणा नसून आनंद आणि मानसिक समाधान असेल, हेच ज्ञान आहे. ज्ञान अज्ञानाचा अंधार दूर करतो, तुम्हाला आनंदी करते. ज्ञान नसेल तर आपण आयुष्यात निराश राहतो. जो कोणी निराश असेल त्याच्या आयुष्यात ज्ञानाचा अभाव आहे असे समजावे.

दु:ख्खाचे काय कारण आहे?तुम्ही जे काही मिळवले आहे ते एक न एक दिवस दूर जाणार आहे. इथे काहीच राहणार नाहीये; सर्व काही बदलणार आहे.इथे काहीच शाश्वत नाही, न आपले शरीर, न आपले घर, व्यवसाय, आपली कीर्ती; आपण एक दिवस या सगळ्याच्या पार जाणार आहोत.मग आपल्याला कशाची भीती आहे?

म्हणून अज्ञानाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.खूप खेड्यांमध्ये लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत.ते अभ्यास करत नाहीत.खेड्यांमध्ये, मागासलेल्या भागात सुशिक्षित लोकांची कमी जाणवते आहे.आपल्याला तिथे शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे.

त्याचप्रमाणे आपल्याला सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे.कोणते अन्न कसे खावे याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीये.आपण फक्त कर्बोदके खात असतो, बटाटा, भात, पोळी, आपण फक्त हेच खात असतो.बटाटा म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदक, आणि तसेच भात आणि पोळीही. त्यामूळे आपल्याला जेवणात फक्त एकच सत्त्व मिळते. थोड्याश्या डाळीमुळे जेवण समतोल बनत नाही.म्हणूनच पित्ताचा त्रास होतो, लोक आजारी पडतात, त्यांना मधुमेह होतो.
उत्तरभारतामध्ये ते जास्तकरून वांगी, बटाटा आणि टमाटर खातात. याशिवाय दुसरी भाजी सहसा बनवत नाहीत.फक्त सणावारीच दुसरे काही बनते. या तिन्ही मध्ये पोषक असे काहीच नाही.त्यांच्यात कुठलेही जीवनसत्त्व नाही.भेंडी, तुरी, भोपळा, गाजर, पडवळ आणि इतर खूप भाज्या आहेत ज्या आपण विसरून जातो. भारतामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत. त्या उगवल्या पाहिजेत. प्रत्येकाला अन्नाचे ज्ञान असले पाहिजे.
म्हणून अज्ञानाचा नाश केला पाहिजे आणि दुसरे म्हणजे, अन्याय संपवला पाहिजे.जिथे जिथे जाती धर्माच्या नावाखाली अन्याय होत असेल तो थांबवला पाहिजे.आताच सरकार ने communal violence bill आणले आहे.तुम्ही पाहिले तर ते भयंकर आहे; a draconian bill. अगदी लोकपाल मधेही त्याचा समावेश आहे; जो तक्रार करतो त्याला २ वर्षांची सजा आहे आणि ज्याच्या विरुद्ध हि तक्रार आहे त्याला मात्र ६ च महिन्यांची शिक्षा आहे.
हा सर्व राष्ट्राच्या प्रती अन्याय आहे.ते लोकांचा आवाज ऐकत नाहीत. त्या ऐवजी ते फक्त वरीष्टांचे ऐकतात. प्रत्येकजण म्हणते, ‘ वरिष्ट म्हणतील तसे करायचे’. हे सगळे कुठून येते आहे?
आपल्या राष्ट्राचा मान आपण उंचावला पाहिजे. शेकडो वर्षांपूर्वीची आपली संस्कृती आहे. आपण त्याचा मान राखला पाहिजे. 
कोणी विचारले आपले कर्तव्य काय आहे? तर ते म्हणतात, ‘राष्ट्रध्वज उंचावणे’. राष्ट्रध्वज उंचावणे हे आपले कर्तव्य आहे का? धर्म किंवा कर्तव्य ते कि ज्यामुळे माणूस स्थिर होतो.जेंव्हा एखाद्याला आपल्या कर्तव्याची माहिती नसते, तो म्हणतो फक्त राष्ट्रध्वज उंचावणे हे आपले कर्तव्य आहे. लोकांना एवढी लाज का वाटते? या मातीतला धर्म काय एवढा कुचकामी आहे?
ताठ उभे रहा आणि अन्यायाला थारा देऊ नका. आपल्याला अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.
तिसरे म्हणजे कमतरता. आपल्याला या कमतरते विरुद्ध लढले पाहिजे.
संपूर्ण जगात भारतात सर्वात जास्त धान्य उगवते, सर्वात जास्त भाजीपाला उगवतो, सर्वात जास्त दूधदुभते आहे. हे सगळे असूनही, आपल्याकडे कायम कमतरता भासते.भाजीपाल्याच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या आणि २-३ महिन्यांमध्येच त्या एकदम खाली आल्या. त्यामूळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले.पंजाब मध्ये १ रुपया किलोने बटाटे विकायला लागले.
नियोजन बरोबर नाही. आपल्याकडे शेतीचे अजिबात नियोजन नाही.नाहीतर फक्त ३ महिन्यांमध्ये भावात एवढी चढ उतार कशी काय होते?
आपल्या वितरण पद्धतीमध्ये त्रुटी आहेत.काही लोक पद्धतशीरपणे हा गोंधळ करायचा प्रयत्न करीत आहेत.हे योग्य नाही. आपण या अभावाविरुद्ध लढले पाहिजे आणि देशात सुबत्ता आणली पाहिजे.
कालच माझे काही व्यापारी लोकांशी बोलणे झाले, ते म्हणाले,’ गुरुजी, सर्व काही थांबले आहे’. सगळे उद्योजक निराश आणि दु:ख्खी आहेत. कोणतेही काम होत नाहीये.
हे आपल्या सरकारचे धोरण बनले आहे. आपल्याला हा अभाव नष्ट केला पाहिजे. ज्या देशात व्यापाऱ्यांना चांगले दिवस असतात, तिथे कमी रहात नाही. म्हणून उद्योजकांनी याचा विचार केला पाहिजे.या महिन्याअखेरीस मला
World Economic Forum समोर बोलायचे आहे.
जगातल्या प्रत्येक देशापुढे वेगवेगळी आव्हाने आहेत.पण परिस्थितीचा विचार न करता सर्वांवर एकच कायदा लादला आहे. ह्याने काहीच साध्य होणार नाही. जे अमेरिकेत काम करेल ते भारतात काम करणार नाही.ज्याने भारतात काम होईल त्याने ऑस्त्रेलिया मध्ये होणार नाही. आपल्या देशाचा विचार करून येथील कमी दूर करण्यासाठी काय करावे लागेल याचा आपल्याला विचार करावा लागेल. असे नाही कि वॉशिन्गटन हून कोणी आपल्याला आज्ञा देत आहे आणि आपले मंत्री ते तत्परतेने मान्य करत आहेत. हे असे चालणार नाही.
नंतर, आपल्याला आपले  चित्त अंतर्बाह्य शुद्ध केले पाहिजे. आपण आपल्या डोक्यात खूप कचरा भरून ठेवला आहे.आपण त्या रागद्वेशामध्ये आणि बंधनामध्ये अडकून न पडता स्वताला मुक्त केले पाहिजे. आपण या सगळ्याचा वर उठले पाहिजे.
म्हणून लक्षात ठेवा कि आपल्याला या ४ गोष्टी समाप्त करायच्या आहेत : अज्ञान, अन्याय, अभाव आणि अशुद्धी.
जेंव्हा तुम्ही चालत असता तेंव्हा पहा कि कोणती नाकपुडी चालू आहे, उजवी का डावी? जी चालू असेल, तो पाय पहिल्यांदा पुढे टाका.जर तुम्ही नाकपुडीचे परीक्षण करून गाडीमध्ये बसलात आणि त्यानुसार प्रथम पाउल आत टाकलेत, तर तुमचा कधीच अपघात होणार नाही. हे ज्ञान शास्त्रांमध्ये दिले आहे, त्यांच्याबद्दल गुप्तता बाळगली जाते आणि ते कोणालाही देता येत नाही. पण मी ते उघड करून सगळ्यांना सांगतो.
जर उजवी नाकपुडी चालू असेल तर तुंम्ही अन्नग्रहण केले पाहिजे आणि जर का डावी चालू असेल तर पाणी प्यावे. जर तुम्ही उलट केलेत, तर तुम्ही आजारी पडाल. जर डावी नाकपुडी चालू असताना कोणी जेवले आणि उजवी नाकपुडी चालू असताना जेवले तर ते ३ महिन्याच्या आत आजारी पडतील- डोकेदुखी, पाठदुखी किंवा तत्सम काही आजार. मग आपण काय केले पाहिजे? जेवण झाल्यांनतर, तुम्ही जेंव्हा उजव्या कुशीवर झोपाळ, तेंव्हा डावी नाकपुडी चालू असेल.
तुम्ही रोज थोड्या वेळासाठी का होईना, प्राणायाम केला पाहिजे. तसे रोज भस्त्रिका केली पाहिजे. दोन्ही महत्त्वाचे आहे.
किती लोक समाजाच्या भल्यासाठी काम करायला तयार आहेत? (जवळजवळ सगळ्यांनी आपले हात उंचावले होते) सगळे जन तयार आहेत, छान छान! जसे मी काल सांगितले, कि जर तुम्ही ६ महिने देशासाठी दिलेत, तर देशात जनजागृती होण्याची सुरुवात महाराष्ट्रापासून होईल. किती लोक आमच्याबरोबर ६ महिने काम करायला तयार आहेत? तुम्हाला माहितीये, तुम्हाला काय करायची गरज आहे? ४ ग्रुप तयार करा, अज्ञान, अभाव, अन्याय आणि अशुद्धी आणि खेडोपाडी पदयात्रा काढून दिव्य समाजाच्या निर्मिती मध्ये त्यांना सहभागी करून घ्या. सर्वांना सदस्य करून घ्या.सगळ्यांना मोठ्ठ्या क्रांतीचा भाग होण्याची इच्छा असते.ते खूप सोप्पे आहे. त्यांना सांगा, ‘ आपण सगळे मिळून ते करूयात. संपूर्ण देशभरातून १० करोड लोकांची माहिती गोळा करूयात.’
निव्वळ मते मिळवण्यासाठी सर्व राजकारणी जातीधर्मांचा वापर करून घेतात. आपण प्रामाणीकपणा वर आधारित मते का मागू नयेत? आपण प्रामाणिक लोकांची मते गोळा करूयात. मग सर्व प्रामाणिक लोक मतदानाला येतील आणि प्रामाणिक लोकांना निवडून आणतील.
आजकाल अप्रामाणिक, समाजविघातक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली जाते, कारण त्यांच्याकडे मते असतात.जर चांगल्या लोकांची मते गोळा केली तर चांगले, सात्विक प्रवृत्तीचे लोक निवडून येतील. ते सर्वांशी न्यायाने वागतील आणि देशाची प्रगती होईल. आज माझ्या मनात हाच विचार आला.
परवाच मला दिल्लीतल्या उद्योजकांसमोर बोलण्यासाठी बोलावले होते.काही आघाडीचे उद्योजक तिथे उपस्थित होते.लोकांना धाकधूक होती कि हे उद्योजक मान्य होतील का नाही, काय होईल? आयोजकही घाबरले होते. मी उभा राहिलो आणि कृत्रिमपणे म्हणालो,’ सभ्य स्त्री आणि पुरुषहो, मी इथे किती गाढवे आहेत हे मोजायला उभा राहिलो आहे.’ यजमान भीतीने थरथर कापू लागले,’ कि गुरुजी हे काय बोलत आहेत?’ मी म्हणालो, ‘ हो, तुम्ही गाढव आहात. जेंव्हा तुम्ही अनैसर्गिक आणि अज्ञानाच्या स्थितीमध्ये असता, तेंव्हा मी काय सांगणार? आणि तुम्हाला ज्ञानाची लाज वाटते. म्हणून तुम्ही गाढव आहात.’
जरी माझा स्वभाव नसला तरी मी त्यांना चांगला ओरडलो, पण त्यांना ते आवडले आणि काही प्रमाणात तरी ते जागृत झाले. सर्वजण आनंदित झाले होते.
ज्ञानामध्ये असताना, तुम्ही जरी ओरडलात, तरी ते फायद्याचेच असते.आणि अज्ञानात प्रेम जरी केले, तरी तुमचे नुकसानच असते.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही एका शक्तिशाली चुंबकाप्रमाणे आहात.कितीही वेळा तुम्हाला बघितले आणि भेटलो तरीही आमचे मन भरत नाही.हे असे का?
श्री श्री : ते मला माहीत नाही.तुम्हीच सांगा कि तुम्ही असे का करता, तुम्ही माझ्याभोवती गर्दी आणि धक्काबुक्की का करता. मी जो आहे, तेच तुम्ही आहात; आणि तुम्ही जे आहात तोच मी आहे!

प्रश्न: गुरुजी, धीटपणा आणि निर्णयक्षमता यामध्ये काय फरक आहे आणि आजच्या काळात काय चांगले आहे?
श्री श्री : निर्णयक्षम रहा आणि धीटपणे जागा. वाईट कृत्य करण्याची लाज वाटली पाहिजे; पण न्याय आणि कर्तव्य यासाठी उभे राहताना तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे.

प्रश्न: गुरुजी, ख्रिस्ती धर्मामध्ये, देवदूत आणि वाट दाखवणारे देवदूत अशी संकल्पना आहे. असे काही हिंदू धर्मामध्ये आहे का?
श्री श्री: हो हो. अशा बऱ्याच संकल्पना हिंदू धर्मातही आहेत. ख्रिस्ती धर्मात असे मानतात कि, ‘येशूने सर्वांची पापे धुवून टाकण्यासाठी क्रोस वर मरण स्वीकारले.’ भगवान कृष्णानेही हेच म्हटले आहे, ‘ मी तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्त करेन. तुम्ही माझ्यामध्ये शरण घ्या.’ त्याचप्रमाणे, सर्व देवदूतांचे. हे देवी आणि देवता काय आहेत? उर्दू मध्ये त्यांना ‘ फरिश्ते’ म्हणतात. तसेच सारे यक्ष, यक्षिणी, देवता; हे सगळे देवदूतच आहेत.

प्रश्न: गुरुजी, आत्मसाक्षात्कार झालेल्या माणसाची लक्षणे काय असतात आणि मला आत्मज्ञाओष्ट आहे.न वव्हावे अशी तीव्र इच्छा आहे.
श्री श्री : हि चांगली गोष्ट आहे. तिला तसेच राहू देत. तुम्ही बरोब्बर ठिकाणी आला आहात.

प्रश्न: ऐकू आला नाही. हा स्त्रियांच्या कोन्फरन्स बद्दल होता.
श्री श्री : पुढच्या माहिन्यात आर्ट ऑफ लीवींग ची स्त्रियांची कोन्फरन्स आहे. खूप जागृती झाली आहे पण अजून बरीच होणे गरजेचे आहे. काल दिल्लीमध्ये मी पाहिले, कि खूप स्त्रिया कुंकू लावत नाहीत. हि फाशन आहे. साम्प्पोर्ण जगात असा एकाच देश आहे कि जेथे स्त्रिया कुंकू लावतात आणि तो म्हणजे भारत. आपण भारताची ओळख अभिमानाने उंचावली पाहिजे.पाकिस्तानात सुद्धा आपण त्यांना कुंकू लावण्यासाठी मान्य करीत आहोत आणि इथे तर तुम्हीच ते करत नाही आहात.

प्रश्न: गुरुजी, या विश्वाचा उगम काय आहे आणि देवाचे आस्तित्व सिद्ध करता येते का?
श्री श्री : नक्कीच! विश्वाचा उगम शोधण्याआधी पहिल्यांदा मला सांगा कि टेनिस च्या चेंडूची सुरुवात कोठे आहे? हे बघा तुम्ही जर सरळ रेषेत विचार केलात, तर सर्व काही कुठेतरी सुरु होऊन कुठेतरी संपणे अपेक्षित आहे. पण तुम्ही जर, गोलाकार विचार केलात, तर त्याला सुरुवात आणि शेवट दोन्ही नाहीये. ३ गोष्टी कधीच सुरु झाल्या नाहीत आणि त्या कधीच संपणार नाहीत: निसर्ग, जीव, आणि परमेश्वर. या ३ गोष्टींना आदी आणि अंत दोन्ही नाहीये.
जसे कि तुम्ही जे दागिने घालता, ते सर्व काही सोने आहे. पण तुम्ही त्याला वेगवेगळया दागिन्यांच्या रूपात बघता, हे द्वैत, पण तुम्ही त्याला एकाच सोन्याच्या रूपात पाहिले तर ते झाले ‘अद्वैत’. हे सर्व लाकूड हे अद्वैत. पण दरवाजा निराळा, खुर्ची वेगळी, तबले वेगळे.जर कोणी तबलावर बसून जेवण खुर्ची वर ठेवले तर तुम्ही त्याला वेडा म्हणाल.
द्वैत म्हणजे सर्व काही वेगळे आहे आणि अद्वैत म्हणजे सर्व काही एकच आहे. हे दोन्ही एकत्र कसे. मूर्ख लोक दोन्ही मध्ये असा भेदभाव करतात आणि विनाकारण वाद घालतात आणि असे लोक देशाला बिघडवतात.

प्रश्न: गुरुजी, आपल्या देशात खूप संतमहात्मे आहेत जे धर्म प्रसार करत असतात.तरीही आपल्या देशाची परिस्थिती का सुधारत नाही?
श्री श्री : ते असूनही हे अशी परिस्थिती आहे.जर ते नसते तर देशाचे काय झाले असते? कल्पनाच करू शकत नाही. २० वर्षांपूर्वी पिंपरी मध्ये १ किंवा २च दवाखाने होते.आज कित्येक हॉस्पिटल्स आहेत आणि तरीही इतके लोक आजारी पडत आहेत. मग या आजारपणासाठी हॉस्पिटल्स जबाबदार आहेत का? जर ति नसती, तर अजून आजार वाढले असते, हो कि नाही?

प्रश्न: गुरुजी, हे आयुष्य काय आहे?
श्री श्री : खूप चांगला प्रश्न आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. ते असेच राहू देत! एक दिवस मी त्याचे उत्तर देईन. तुम्ही त्याची वाट पहा आणि मी हि हे उत्तर देण्याची तोवर वाट पाहीन जोवर तुम्ही ते समजण्यासाठी पात्र होत नाही.

प्रश्न: गुरुजी, आपल्या देशात १००० मधली ९९९ माणसे अप्रामाणिक आहेत.एवढ्या थोड्या लोकांना घेऊन आपण आपल्या देशात बदल कसा घडवून आणणार?
श्री श्री : १००० मधली ९९९ माणसे अप्रामाणिक आहेत असे मानून चालू नका. तुम्ही एकटेच प्रामाणिक आहात, असे समजू नका. जे लोक असा विचार करतात, ते क्रोधित राहतात आणि त्याचा काही उपयोग नसतो. असा विचार करू नका.
मी याच्या अगदी विरुद्ध विंचार करतो.९९५ मधील ५ अप्रामाणिक आहेत.त्रेता युगामध्ये, ५ लोक प्रामाणिक असायचे आणि १०० अप्रामाणिक. पण कली युगाचा परिणाम असा आहे कि आता फक्त ५ अप्रामाणिक लोक आहेत आणि १०० चांगले लोक आहेत.गरिबीमुळे, हे १०० लोक निद्रिस्त आहेत आणि ते ५ कुठेतरी चढून बसले आहेत. आता वेळ आली आहे कि त्या ५ लोकांना खाली आणून त्यांना ज्ञान देण्याची. तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे.
इथे जे सगळे लोक आहेत, ते चांगले नाहीयेत का? तुम्ही कोणाच्याही नजरेत बघा.ते सर्व चांगले लोक आहेत.त्यांनी एखाददुसऱ्या चुका केल्याही असतील.कोणी एखादी चूक केली असेल तर तुम्ही त्याला कायमचे अप्रामाणिक ठरवाल का?हे चुकीचे आहे.
आजूबाजूला पहा. हजारो चांगले लोक आहेत.काळ मी बघितले, लाखभर लोक सत्संगाला आले होते.खूप उत्साह आणि प्रेम होते. सगळ्यांना सेवा करायची इच्छा आहे. बघा कि सर्वजण हात उंचावत आहेत. हे सगळेजण अप्रामाणिक असतील का? जे लोक सेवा करायला तयार आहेत, त्यांना तुम्ही अप्रामाणिक कसे म्हणू शकाल?

प्रश्न: गुरुजी, माझी वृत्ती सहजपणे जमेल ते करायचे अशी आहे आणि मी भविष्याचे मनोरे बांधतो. या वृत्तीमधून कसे बाहेर पडावे?
श्री श्री : शपथ घ्या, कि ‘मी हे असेच काम करणार’.तुम्ही कधी हे वाचन मोडलेत, तर पुन्हा घ्या. निराश होऊ नका.

प्रश्न: गुरुजी,  भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात, जर आपल्या कुटुंबातील लोकच भ्रष्ट असतील तर त्यांना कसे बदलावे?
श्री श्री : तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा आणि बघा, तेही तुम्हाला येऊन मिळतील.या जगात, जो यशस्वी असेल सर्वजण त्याच्या मागे जातात. तुम्ही जर का संयमाने आणि शांतपणे या मार्गावर चाललात, तर सर्वजण बरोबर येतील.

प्रश्न: गुरुजी, काही ऐहिक प्रश्नांमुळे मला आत्महत्या करावीशी वाटते.
श्री श्री : कधीच नाही ! हे करण्याआधी माझ्याकडे ये, माझी परवानगी घे आणि मगच कर !मी तुम्हाला सांगेन कुठून उडी मारायची आणि कशी आत्महत्या करायची ते.हा निर्णय तुम्ही स्वत: घेऊ नका.
मला तुमची गरज आहे! तुम्ही का तुमच्या आयुष्याचा त्याग करता आहात. तुम्हाला काय पाहिजे, मला सांगा? अन्न, वस्त्र आणि निवारा? मी हे तुम्हाला तुमच्या आयुष्यभर देऊ शकतो. तुम्ही फक्त बसून रहा. काळजी करू नका आणि माझे काम करा. तूम्हाला मानमरातब, ज्ञान, तुम्हाला पाहिजे ते सर्वकाही मिळेल. तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटायला काय कारण आहे? तुमचे लग्न होत नाही म्हणून? का लग्न झालेय म्हणून? दोन्ही परिस्थितीत मी तुमची मदत करेन.काळजी करू नका. तुमचे लग्न झाले नसेल तर मी ते लावून देईन. जर तुमचे लग्न झाले असे तर तुमच्या जोडीदाराशी मी बोलेन.जर ते समजत नसतील तर मी तुम्हाला सन्यास घेण्याचा सल्ला देईन.आत्महत्त्या करून तुम्हाला काय मिळेल?
आजिबात आत्महत्या करायची नाही. ज्यांना थोडाही असा विचार मनात असेल, त्यांना ताबडतोब माझा फोटो दाखवा आणि सांगा ,’ हे बघ, यांच्या परवानगीशिवाय जाऊ नकोस. नाहीतर स्वर्गातही प्रवेश मिळणार नाही’.
तुम्ही मधेच लटकून रहाल, न या जगात न त्या जगात. अशी कृती कशाला करायची? पहिल्यांदा परवानगी घ्या.

प्रश्न: गुरुजी, आजही आपल्या देशात खूप जातीभेद आहेत.हे आपल्या भ्रष्ट राजकारण्यांमुळे आहे का शास्त्रानुसार आहे?
श्री श्री : नाही, शास्त्रानुसार नाही.तुम्ही पाहिले तर भारद्वाज आणि वशिष्ठ ऋषी दोसून बाकीचे सर्व ऋषी खालच्या जातीत जन्माला आले होते. वेद व्यास, वाल्मिकी ऋषी हे दलित होते.हे सर्व माहान ऋषी, ज्या गोत्राचे तुम्ही आहात, ते सर्व वेगवेगळया जातींचे होते; कोणी क्षत्रिय, कोणी कुंभार.
इथे, महाराष्ट्रामध्ये खूप भक्त होऊन गेले जे वरच्या जातीचे नव्हते तर इतर जातीचे होते.
आपल्याला जेंव्हा चांगल्या वकिलाची गरज पडते, आपण त्यांची जात विचारत नाही.जेंव्हा डॉक्टर हवा असतो, तेंव्हा त्याची जात बघत नाही.जेंव्हा आपल्याला उद्योगधंदा करायचा असतो तेंव्हा जात बघत नाही.जर प्रोजेक्ट चांगला असेल आपण त्यांच्याबरोबर काम करतो.फक्त जेंव्हा मत देतो तेंव्हाच विचार करतो कि हा आपल्या जातीचा आहे किंवा नाही.जेंव्हा उमेदवारी दिली जाते तेंव्हा विचार करतो कि या भागात कोणत्या जातीला उमेदवारी मिळाली पाहिजे.असे करू नका !
जोपर्यंत राजकारणा मधून जात नाहीशी होत नाही तोवर जातीनिहाय विभागणी या देशातून जाणार नाही. राजकारणामुळे हि विभागणी जिवंत आहे. हे काढून टाकले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी, आपल्या देशात अशी मानसिकता आहे कि सर्व काही नशीबाने आणि देवाच्या मर्जीने होत असते आणि आपण आपले कर्म करीत नाही. काय महत्त्वाचे आहे?
श्री श्री : नशिबावर विश्वास आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणीकपणा. दोन्ही बरोबर घेऊन चला.

प्रश्न: गुरुजी, सध्याचे तरुण या देशाची अवस्था पाहून निराश झाले आहेत.तुमचा त्यांना काय सल्ला आहे?
श्री श्री : देशाची अवस्था बघून निराश झालात पण माझ्याकडून बघून तरी तुमच्यात आशा निर्माण झालीये कि नाही? नसेल तर कमीत कमी जे सर्व लोक इथे आले आहेत त्यांना बघून तरी तुमची आशा पल्लवीत करा.
जागे व्हा! मला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे, जे या देशासाठी काहीतरी करू इच्छितात.तुम्ही पुढे या. आपण एकत्रितपणे महाराष्ट्राच्या खेड्यांमध्ये जाऊन ज्ञानाचा प्रसार करूयात. सगळीकडे संतोषाची एक लहर उमडू देत.

प्रश्न: गुरुजी, भगवान कृष्णाला ‘उच्च विश्वाची देवता’ असे का म्हटले जाते? आणि तुमच्याकडे पाहिल्यावर आम्हाला तसेच का वाटते?
श्री श्री : असे म्हणतात, कि माझे गुरु हेच सर्वांचे गुरु, माझे गुरु हे संपूर्ण व्ईश्वाचे गुरु, माझा आत्मा हा सगळ्यांचा आत्मा. असे वाटणे हे योग्य, साहजिक आणि सर्वमान्य आहे.

प्रश्न: गुरुजी, मी ऐकले आहे कि जेंव्हा तुमचे हृदय प्रेमाने भरले आहे, जेंव्हा गुरुबद्दल तुम्हाला आस्था आहे, मग तुम्ही जेंव्हा गुरुंबद्दल विचार करता तेंव्हा जरी शरीराने ते तिथे नसले तरीही आपोआप डोळ्यात अश्रू येतात.अश्रू मौल्यवान असतात आणि हे अश्रू तर इतके अमूल्य आहेत कि ते गोळा करायला देवदुतही येतात.तुम्ही केंव्हा देवदूत होऊन माझे अश्रू गोळा करण्यासाठी माझ्याकडे धाव घ्याल.
श्री श्री : ह्यावरून कळते कि तुम्ही किती चांगले आहात ते. छान आहे हे !




The Art of living
© The Art of Living Foundation