या सृष्टीच्या तुलनेत आपण एका तीळाप्रमाणे आहोत.
१४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांती, मी आणि पुणं यांचा काहीतरी संबंध आहे. या काळात तुम्ही काहीतरी करता आणि मला इथे ओढून  आणता. मग मी पुन्हा म्हणतो, ‘तीळगुळ घ्या गोड गोड बोला’. आज माझ्या लक्षात आले की तीळ हा बाहेरून काळा असतो आणि आतून पांढरा. जर तो बाहेरून पांढरा आणि आतून काळा असता तर काहीतरी वेगळेच झाले असते. आज ह्या तीळगुळाने देशाला आतली शुद्धता टिकवण्याचा संदेश दिला आहे.
तुम्ही जर तिळ चोळला तर तो बाहेरूनही पांढरा होतो. आपण या सृष्टीच्या तुलनेत आपण एका तीळासारखे आहोत. तुम्ही बघितलं तर या सृष्टीमध्ये आपलं काय महत्व आहे ; जीव काय आहे ?काही नसल्या सारखेच, एका तीळाप्रमाणे, क:पदार्थ. आपण फक्त एक सूक्ष्म कण आहोत.हा संदेश आपण लक्षात ठेवायला हवा.
आपण अगदी बारीक आणि गोड आहोत. तीळगुळासारखेच स्वादिष्ठ. तर, तीळगुळासारखेच छोटे आणि गोड रहा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल. आणि जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही अर्थाने खूप मोठे आणि महत्वाचे झाल्यासारखे वाटायला लागले तर उतरती कळा लागायला सुरवात होईल. हे अनुभवसिद्ध सत्य आहे.
हजारो लोकांच्या आयुष्यात असे झालेले आपण बघतो. ज्या क्षणाला अहंकार वर येतो किंवा ‘ मी कुणीतरी आहे असा भास व्हायला लागतो त्याक्षणी उतरती कळा सुरु होते. “मी सामर्थ्यवान आहे”, असे वाटले की बस, सामर्थ्य कमी व्हायला सुरवात होते. 
इथे महाराष्ट्रात शक्ती आणि भक्तीचा संयोग झालेला आहे. शिवाजीची शक्ती आणि तुकारामाची भक्ती याणेच भारताचा उत्कर्ष झाला. ही गोष्ट लोक विसरले आहेत असे दिसते. आजकाल ते फक्त शक्ती प्रदर्शनातच मग्न असतात. शक्ती बरोबरच भक्तीही तेवढीच आवश्यक आणि अत्यंत गरजेची आहे. मी तर म्हणेन की चार गोष्टी गरजेच्या आहेत. शक्ती, भक्ती, युक्ती आणि मुक्ती. यातल्या एकाचा जरी अभाव असेल तरी जीवन यशस्वी होणार नाही.
समाजात यशस्वी होण्यासाठी शक्ती आणि युक्तीची गरज असते. आणि जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत किंवा आध्यात्मिक जीवनात यश अनुभवायचे असेल तर भक्ती आणि मुक्तीची गरज असते. आपल्याला या चारही गावष्टींच्या बरोबर पुढे जायचे आहे.
तर हा संदेश आहे : भक्ती आणि शक्तीचा संयोग. आपल्या देशात याचीच गरज आहे. याने देशातील लोकांमधला जोश वाढेल.
मी जिथे जाईन तिथे लोक मला विचारतात, “ गुरुजी या देशाचे काय होणार ?” शेतकरी खुश नाहीत. ते म्हणतात,   “आम्ही भाज्यां पिकवतो आणि भाव उतरतात.आम्ही कशाच्या भरवशावर भाज्या पिकवायच्या ? हे म्हणजे आमचे हातच तोडून टाकल्यासारखे आहे.”
व्यापारी खुश नाहीत; कारखानदार खुश नाहीत. कोणाला कधी तुरुंगात टाकतील याचा भरवसा नाही. वकील आणि न्यायाधीशही खुश नाहीत. ते म्हणतात, “ आता देवच या देशाला वाचवू शकतो.”
राजकारण्यांना विचारा.त्यांची काय परिस्थिती आहे कोणालाच सांगता येत नाही. ते स्वत:च गोंधळलेले आणि निराश आहेत. त्यांच्या स्वत:च्या पक्षातल्या लोकांबद्दल आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांबाद्दलही ते खुश नाहीयेत. त्यांच्या स्वत:मध्येही कितीतरी संघर्ष चालू आहेत.
मी म्हटलं , “ अजिबात नाही, मी तसं होऊ देणार नाही.”
म्हणून तर मी जाईन तिथे सांगत असतो की, लोकांनी अशी शपथ घ्यावी की ते लाच देणार नाहीत आणि घेणार नाहीत.जिथे आपलेपणाची भावना सते तिथे भ्रष्टाचार असूच शकत नाही. जिथे सूर्य आहे तिथे आंध्र असूच शकत नाही. जिथे आपलेपणा असो तिथे अनैतिकता किंवा हिंसा असूच शकत नाही.
पण आजकाल जे चांगल काम करू पहाताहेत त्याच्यावरही लोक दोषारोप करताहेत.ते तर करतीलच तेत्यांच्यासाठी स्वाभविक आहे. पण ह्याने काहीच होणार नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो तसा तो नक्की होईलच. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मला तुम्हा सर्वांना अशी ग्वाही द्यायची आहे की द देश पुढे जाईल, देशाची प्रगती नक्की होईल. जे लोक दुष्कृत्य, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यात गुंतलेले आहेत त्यांना त्याचे भोग भोगावे लागतीलच.त्यांना नक्की शिक्षा होईल.
तर भक्ती हे जीवनाचे सार आहे, या जाचा अर्क आहे, त्याला धरून ठेवा त्याला जाऊ देऊ नका. मग बघा आपल्या आत्मविश्वास कसा प्रचंड प्रमाणात वाढतो ते. सामर्थ्य येईल आणि जिथे सामर्थ्य असेल तेथे नवीन कल्पना सुचतात आणि नवीन कौशल्ये आत्मसात केली जातात आणि त्रास आणि काळज्या यापासून तुम्ही मुक्त व्हाल.
देव तुमच्यातच आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाहिये, या गोष्टीची आठवण करून देणे हाच माझा इथे येण्याचा हेतू आहे.काय झालं की गुरु ,’हे करा, ते करा’ असं सांगत राहिले आणि शिष्य विचार करत राहिले की काय करायचं आमी मग गुरु आणि शिष्य दोघेही हताश झाले. मी तुम्हाला सांगतो आहे की केवळ काही वेळ स्वस्थ बसा आणि त्याच्याशी नाते जोडा.
बघा, जेव्हा सु किंवा जावई तुमच्या घरात नव्याने येतात करतात तेव्हा त्याना आपलेसे करायला तुम्हाला किती वेळ लागतो ? पान मिनिटं मंगळसुत्र बांधलं की नाते जुळतं. काळपर्यंत ते अनोळख होते आणि आज ते एकमेकांचे होतात. हॉ की नाही ? देवाब्रोब्रही वेळ लागत नाही. नातं जोडायला खूप पैसा खर्च करावा लागतो. लाखो रुपये खर्च केल्यानंतर तुमी कोणाला तरी आपला जावी किंवा सून म्हणून कोणाला तरी स्वीकारता.पण देवाशी नातं जोडायला तेवढाही वेळ लागत नाही खरं म्हणजे काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला काय कराव लागतं तर फक्त विश्वास ठेवायला लागतो की देव माझाच आहे, माझ्यातच आहे आणि आत्ता, इथेच आहे. हा विश्वास असला की थोडा वेळ स्वस्थ बसलं की मन शांत होते, भीती नाहीशी होते, दु:ख दूर होते आणि मग चेत्नेत्ला आनंद, समाधान दिसू लागते.
तुम्ही म्हणाल की , “ गुरुजी हे सगळे ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही.” तुम्ही जसा विचार कराल तसेच होईल. जर तुम्हाला वाटले की ते खूप अवघड आहे तर ते तसेच असेल. जर मुलाला वाटले की दहावीची परिक्षा पास होणे अवघड आहे तर तो आठवी नववी पर्यंतही पोहोचणार नाही. तो सात्वितच नापास होईल.आय.ए.एस होणे तर त्याच्यासाठी दूरची गोष्ट असेल. काही लोकांना वाटते की आय.ए.एस. ची परीक्षा पास होणे फार अवघड आहे किंवा एखादा विषय खूप अवघड आहे. जर एखादी गोष्ट अवघड आहे असे तुम्ही धरून चाललात तर तुम्ही तिथपर्यंत कधीच पोहोचणार नाही. एखादी गोष्ट टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे, ती गोष्ट अवघड आहे असे म्हणणे. ती अवघड नाहिये फक्त तुम्हाला तशी आंस ती करण्याची इच्छा असणे गरजेचे आहे. आणि देव निसर्गापासून अलग नाहिये.तो निसर्गाचाच भाग आहे. जसे तीळात तेल आहेच तसेच सृष्टीत देव आहेच. प्रत्येक हृदयात तो आहेच. हेच स्वत: बद्दलचे ज्ञान आहे.
तुम्ही सकाळसंध्याकाळ काही वेळ स्वस्थ बसलात, शांततेचे निरीक्षण केलेत आणि विचर केलात की , “ हे जीवन म्हणजे काय आहे ? मी इथे किती काळ असणार आहे ? कदाचित दोन दिवस ,दहा, वीस किंवा अगदी पन्नास वर्ष ? मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मला या जगाकडून काय हवे आहे ?  आणि मी इथून जाण्यापूर्वी या जगाला काय देऊ शकतो ? असे प्रश्न मनात यायला हवे.
सुशिक्षित माणसाच्या मनात असे प्रश्न येतात.जर तुमच्या मनात असे प्रश्न आले तर मी म्हणेन की तुम्ही पदवीधर आहात. जेव्हा मुलाना शाळा कॉलेज मध्ये जाण्याची जबरदस्ती केली जाते तेव्हा ते नाखुश होऊन बाहेर येतात. सगळी नीती मूल्ये त्यांच्या मनातून पुसली गेलेली असतात.ते किती नाखुश दिसतात.
एक सुशिक्षित माणूस तो असतो जो सतत हसत असतो. आनंद त्याला सोडतच नाही आणि त्याला प्रेमाची कधी कमी नसते. अश्या माणसाला मी सुशिक्षित म्हणेन, विद्वान आणि ज्ञानी म्हणेन.जीवनातल्या सर्व क्षेत्रात विशेषत: शिक्षण क्षेत्रातआपल्याला अशा माणसांची गरज आहे.
नवीन वर्शाच्या सुरवातीला मी जर्मनीत होतो आणि तिथे मला सांगितलं गेलं की ४० टक्के शिक्षक वैफल्यग्रस्त आहेत. मी म्हटलं की जर ४० टक्के शिक्षक मानसिकरित्या आजारी असतील ते विद्यार्थ्याना काय शिकवतील ? त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मुलांना घरी पळून जावेसे वाटेल. देवा, सध्या भारतात अशी परिस्थिती नाहिये हे किती बरं आहे. जर शिक्षक वैफल्या ग्रस्त असतील तर मुलाना शिकण्यासाठी ते किती अयोग्य वातावरण असेल ? अति सुबत्ता असेल तेव्हा असे होते.
मागच्या महिन्यात जेव्हा मी खरगपूरला गेलो होतो तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की त्यातीकानी सर्वात जास्त खप असलेलं औषध म्हणजे वैफल्यावर घ्यावं लागणारं औषध.
सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पाल्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.त्यांच्यावर असे म्हणून दबाव आणू नका की, “ अभ्यास कर, स्पर्धा आहे तुला पहिलं यायलाच हवं .” या मुलांवर इतका दबाव येतो की त्यांना नैराश्य येऊन ते शाळा कोलेजात आत्महत्या करू लागतात.निकाल उत्तमच लागला पाहिजे म्हणून त्यांच्यावर दबाव आणू नका. त्याऐवजी त्यांना हे शिकवा की प्रभावी आणि हुशार व्यक्तिमत्व कसे बनवायचे ?
त्याना योग, ध्यान, प्राणायाम शिकवा आणि मग तुम्हाला त्यांच्यातले गुण उभरताना दिसतील.तुमच्या मुलांना यस प्लस चा कोर्स करायला सांगा. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करण्याचा हाक फायदा आहे की ती व्यक्ती आतून फुलून येते आणि सर्व बंधनं गळून पडतात.
बघा इथे किती लोक आनंदी दिसताहेत.जर कुणी आनंदी आणि खुश दिसले तर समजा की तो कुठल्यातरी कोर्सला गेला आहे. ही खरी गोष्ट आहे. आणि जर कुणी दु:खी चेहरा करून बसले असेल तर समजा की त्याने कोर्स केला नाहिये किंवा गुरुजींनी काय सांगितले ते त्याने ऐकले नाहीये.
काही वर्षांपूर्वी जेव्हा इस्रायलने लेबेनॉन वर हल्ला केला होता तेव्हा आपणही तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र चालवत होतो.मी माझ्या माणसांना सांगितले की तिथल्या स्वयांसेवकांना आणि प्रशिक्षकांना फोन करून त्यांची खुशाली विचारा. जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा तेव्हा तिथले लोक संतसंग करत होते. सगळीकडे बॉम्ब वर्षाव सुरु होता आणि हे लोक संतसंग करत होते. त्यांनी मला सांगितले, “ ओ गुरुजी आम्ही मजेत आहोत!” मी त्यांच्या काळजीत होतो आणि ते म्हणत होते , “आम्ही मजेत आहोत.” कधी कधी असे वाटते की हे किती अनैसर्गिक आहे. हे असे होऊच शकत नाही. ते म्हणत होते , “ आम्ही सेवेत गुंग आहोत. बॉम्ब वर्षाव होत असला तरी आम्हाला भीती वाटत नाही.”
कां ? कारण त्यांचा विश्वास आहे की देव आहे. मला असेच ऐकायचे होते. जो चांगल्या, वाईट सर्व परिस्थितीत हसत रहातो त्याने आयुष्यात खरंच काहीतरी कमावलं आहे. लहान सहान अडचणींवर रडत बसू नये किवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांचा जीव घेऊ नये. आशा सोडू नका. आशा आणि धैर्याने जीवनात शांती आणि प्रगती निर्माण करा. जीवन हा एक झगडा आहे पण हा झगडा आपल्याला आणखी वर जायला मदत करतो. काही लोक झगडतात आणि त्यातून विध्वंस करतात. आपला झगडा झगड्याशी झगडण्याचा आहे जेणेकरून आपल्या देशाची उन्नती होईल. देवाब्द्दल्चे प्रेम आणि देशाबद्दलचे प्रेम दोन्ही सारखेच आहे. आपण त्यांच्यात फरक करू शकत नाही.काही लोक म्हणतात, “ गुरुजी तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल कशाला बोलता ? तुम्ही निवांत रहा ध्यान क्र आणि इतरांना ध्यान करण्यात मदत करा आणि भजनं म्हणा. हेच तुमचे काम आहे. तुम्ही ह्या इतर प्रश्नांकडे कशाला लक्ष देता ? ते दुसऱ्यांना करू दे.” 
नाही. जीवनाची अशी विभागणी करता येत नाही. कुणाच्या डोळ्यात पाणी आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता भजनं म्हणताय, हे बरोबर नाही. जर तुम्ही त्या अश्रूना गोड आश्रू मध्ये बदलू शकत असलात तर निदान ते पुसा तरी. सत्संगात खारे अश्रू गोड अश्रू होतात.जर लोकांच्या डोळ्यात गोड अश्रू असतील तर ठीक आहे. जेव्हा हृद्य मोकळं होतं आणि माणूस रडतो तेव्हा ते गोड अश्रू असतात. रागाला हसण्यात बदलणे आणि अश्रुंना गोड अश्रुत बदलणे हे आपले ध्येय असायला हवे. हेच माझे स्वप्न आहे.
असा भारत असावा जिथे गैरवर्तणूक नाही, दुष्टपणा नाही,हिंसा नाही,तणाव नाही,सगळीकडे फक्त हसरे चेहरे आहेत. सालीकडे भजन कीर्तन चालू आहे आणि आपलेपणाची भावना आहे. पुढच्या पिढ्यांसाठी माझे हे स्वप्न आहे. आपण असा भारत करून सोडायला हवा जिथे लोक भयमुक्त जीवन जगत आहेत. तुम्हाला काय वाटतं ? कुणा कुणाला या स्वप्नात सामील व्हायचयं ? 
आपला या पृथ्वितालाव्र्च्म आयष्य फार थोड्या काळासाठी आहे. पण जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंतआपण न घाबरता काही सत्कृत्य केले पाहिजे.महाराष्ट्र हा शूर लाध्वैय्यांसाठी प्रसिद्ध आहे. इठीनच भरतातील क्रांतीला सुरवात झाली आणि मला खत्री आहे की अशीच क्रांती पुन्हा एकदा या महाराष्ट्रातूनच सुरु होईल. सदाचार आणि पप्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे जी संपूर्ण देशभर पसरेल.
आता तुम्ही मला विचारलं, “ गुरुजी, आम्ही यासाठी काय करायला हवे ?”
सर्वात फिल्म म्हणजे तुम्ही स्वत:ला सामर्थ्यशील बनवायला हवे आणि तुमचे मन आणि अंत:करण शुद्ध ठेवायला हवे. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे रहायला हवे. तुम्हाला अस वाटेल की हे अशक्य आहे. हे सगळं बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्ष जीवनात तसे होत नाही. नाही. आपण असा विचार करता कामा नये. कमीत कमी एक वर्ष मेहनत करुया आणि बघुया काय होतं ?  मी बघीन आणि तुम्ही सुद्धा बघा. जर उपयोग झाला नाही तर मी सुद्धा नाद सोडून देईन आणि मग देवाची प्रार्थना करीन की आता त्यानेच काळजी घ्यावी. पण आपण निदान एक वर्ष प्रयत्न करून बघुया. आणि तुम्ही सर्वांनी मतदान नक्की करायला हवे. निवडणुकीच्या वेळेला आपल्याला वाटते, “ सगळे पक्ष सारखेच आहेत, बेकार. मग आपण कशला जायचं ? आपले मूल्यवान मत उगीच कुणालातरी कशाला द्यायचे ? ते आपल्या जवळच ठेवलेले बरे. बरेच लोक जातच नाहीत.
मला माहिती आहे, खूप वेळ रांगेत उभं राहून ते वैतागतात.त्यांना असेही वाटते की जाण्यात काही अर्थ नाही कारण आजकाल लोकांना लाच देऊन मते विकत घेतली जातात. नाही आपण असा विचार करता कामा नये. जर कुणी तुम्हाला त्यांना मत देण्यासाठी पैसे देत असेल तर पैसे घ्या पण मत त्यांना देऊ नका. तो त्यांचा घामाचा पैसा नाहिये. तो तुमचाच पैसा त्यांच्याकडे आहे जो तुम्ही कराच्या रूपात दिला होता. त्यामुळे जर ते देत असतील तर घ्या आणि ठेऊन द्या. जे पैसे देऊन मत मागतात त्याना निवडणुकीत हरवले पाहिजे.
आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठीही कां केले पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
मी नेहमी म्हणतो की, “ गुरु हा कचरा गोळा करणारा आहे.” तुमच्या ज्या खी समस्या असतील, कुणाबद्द वाटणारा   कडवटपणा असेल,वासना, शत्रुत्व सगळं मला देऊन टाका. तुम्हाला जेकाही दु:ख असेल ते मला देऊन टाका. मी पण कचरा गोळा करतो. मी जिथे जिथे जाते तिथे लोक मला फुलं देतात आणि त्याच्या बरोबर एक पत्र. त्या पत्रात तीन गोष्टी असतात.
१.        त्यांनी केलेली चूक
२.      त्यांना असलेल्या समस्या आणि
३.      त्यांच्या इच्छा
मला वाटतं मी माझ कां बरोबर करतोय. आध्यात्मात इतकी शक्ती आहे आणि य देशाच्या ज्ञानात इतकी  शक्ती आहे की फक्त आपल्या इच्छाच पूर्ण होतात असे नाही तर दुसऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्तीही आपल्यात आहे की ज्यामुळे त्यांच्या इच्छाही पूर्ण होतील. आणि तशा त्या होतात. ही ज्ञानाची शक्ती आहे.
फक्त गुरुजीच आशीर्वाद देऊ शकतात असे नाही. जे जे साधना करतात त्यांच्यात पण ही शक्ती येईल कारण ते सेवा, साधना आणि सत्संग यात मग्न असतात. हे तिन्ही आवश्यक आहे. या तिन्ही पैकी एकाचा जरी अभव असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही जर म्हणलात की मी साधना करतो, सेवा नाही, तर उपयोग होणार नाही. 


प्रश्न : मकर संक्रांतीचा अर्थ काय ? आणि आपण आपले सण कां विसरतोय ?
श्री श्री रविशंकर : मकरसंक्रांतीचा अर्थ सूर्याचा मकर राशी मध्ये प्रवेशआणि उत्तरायण सुरु होते म्हणजे सूर्य उत्तरे दिशेकडे वळतो, थंडी संपते. वर्षातले एक पिक काद्गून झालेले असते आणि दुसऱ्या पिकाची तयारी सुरु होते. वर्षभरात बारा संक्रांती येतात, त्यापैकी मकर संक्रांती महत्वाची समजली जाते कारण या वेळेपासून उत्तरायण हा पुण्यकाळ सुरु होतो आणि उत्तरायण हा देवतांचा काळ मानला जातो.जरी पूर्ण वर्ष शुभ असले तरी हा काळ जरासा जास्त शुभ मानला जातो. बाकीचे सर्व सन याच्या पाठोपाठ येतात.  
 
प्रश्न : गुरुजी, आपल्या इच्छा आणि विचारांना कुठून सुरवात होते ? त्यांना कसे हाताळायचे किंवा सोडून द्यायचे ?
श्री श्री रविशंकर : तर , हा विचार सोडून द्यायची तयारी आहे कां ? जर मी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर काय कराल ? प्रश्नाला धरून ठेवाल ? तुमच्या मनात खूप विचार येतात. शोधून काढा की हे विचार कुठून येतात ? काही वेळ स्वस्थ बसा आणि बघा, हे विचार तुमच्यातूनच येतात. बघा कुठून येतात. तुम्हाला काहीही उत्तर मिळणार नाही आणि त्या तिथूनच विचार येतात. ती काही नसलेली, शून्याची जागा. तुम्ही ध्यानात खोलवर गेलात तर आणखी जास्त कळेल. 
प्रश्न : गुरुजी, मी नेहमी कोणताही निर्णय घेताना अडखळतो. मी काय करावे मी नेहमीच गोंधळलेला असतो.
श्री श्री रविशंकर : हे बघा, ‘नेहमीच’ असे म्हणू नका. तुम्ही जर नेहमीच करत असाल तर तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही तसे अंतरा अंतराने करता म्हणून तुम्हाला कळते. तुम्ही जेव्हा द्वैताच्या पार जाता तेव्हा तुमच्यात सुज्ञपणाचा उगम होतो. आपण सहसा सगळे अनंत आहे असे ठरवून टाकतो. जसे, “मी नेहमीच चूक करतो.” जर एखादा नेहमीच चूक करत असे तर तो त्याला चूक समजणारच नाही. कोणी म्हणतो, “गावात सगळे आजारी आहेत.” गावात सगळे कसे आजारी असू शकतील? लोक सगळ्याला अनंत, सामान्य करून टाकतात. असे करू नये.
  
प्रश्न : गुरुजी, माझे जीवन जास्त अर्थपूर्ण करण्यासाठी मी काय करावे ?
श्री श्री रविशंकर : ज्या अर्थी तुम्हाला ज्ञानामध्ये रुची निर्माण झाली आहे त्या अर्थी तुमचे जीवन अर्थपूर्ण झाले आहे, याचा स्वीकार करा. जर तुम्हाला सत्संगामध्ये  बसायचे आहे तर हे लक्षात घ्या की तुमच्या जीवनाची यशाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

प्रश्न : गुरुजी, मी एक गृहिणी आहे आणि माझे कार्य माझे घर आणि कुटुंबिय यांच्यापुरतेच मर्यादित आहे.तुमचे आशीर्वाद जरी कायम माझ्यासोबत आहेत तरी, मी असे बघितले आहे की ज्या लोकांमध्ये माझ्याहून अधिक दोष आहेत ते माझ्याहून जास्त समृद्ध आहेत. आणि इतके कष्ट घेऊनही आम्हाला ते मिळवता येत नाहिये. असे कां ?
श्री श्री रविशंकर : असे वाटू शकते की जे लोक चुकीच्या गोष्टी करत आहेत ते खुश आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाहिये. फक्त तसे वाटते. तो एक भास आहे. तसे काही काळ वाटू शकते पण एक दिवस ते कोसळतील आणि स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.

प्रश्न : गुरुजी, सत्य जाणण्यासाठी ध्यान हा एकमेव मार्ग आहे कां ?
श्री श्री रविशंकर : तहानलेल्याला जसे पाणी तसे ध्यान आहे. ध्यान हा आतल्या शांततेचा आत्म्याची उन्नती करण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही मला विचारलेत की ,” पाणी हा तहान भागवण्याचा एकमेव मार्ग आहे कां ? भूक भागवण्याचा जेवण हा एकमेव मार्ग आहे कां ?” मी काय म्हणू ? होय ! झोप हा थकवा घालवण्याचा एकमेव मार्ग आहे कां ? हो नक्कीच.

प्रश्न : गुरुजी, तुमच्या स्मितहास्याचे रहस्य काय आहे ?
श्री श्री रविशंकर : मी आता ते रहस्य ठेवलेले नाही. मी सगळ्यांना तेच तर देतोय. जीवन जगण्याची कला.

प्रश्न : गुरुजी, इतक्या जबाबदाऱ्या असूनही इतके जोशपूर्ण कसे जमवायचे ?
श्री श्री रविशंकर : ध्यान ! आणि भक्ती, युक्ती, शक्ती आणि मुक्ती या चारीना तुम्ही बरोबर ठेवायलाच हवे.

प्रश्न : गुरुजी, चटकन्‌ उत्तर देण्याचे काही प्रश्न आहेत.
श्री श्री रविशंकर : हो हो , विचारा.


गुरुजी काय आहेत ?
एक लहान मूल ज्याला मोठ व्हायचंच नाहिये.
राजकारण ?
अटळ.
धर्म ?
जीवनरेषा किंवा मृत्युरेषा असेल.
राग ?
टाळता येणारा .
भीती ?
वरचे खाली आणि खालचे वर असे उलटे झालेले प्रेम.
हर्ष ?
तुमचा स्वभाव
ज्ञान ?
ज्याने आनंद मिळतो.
दारू ?
ज्याने दु:ख मिळते.
भक्त ?
नशीबवान.
गोंधळ ?
परमानंदाची जननी
तुमचे स्मितहास्य ?
अविस्मरणीय
प्रार्थना ?
काम करते.
नाते संबंध ?
नेहमीच चांगले नसतात.
तरुण ?
जबाबदारी. जो कोणी जबाबदारी घेतो तो तरुण असतो.
बुद्धिमान ?
जो जबाबदारी पार पाडतो.
जग ?
मानवजातीला मिळालेली भेट.
सत्य ?
देव.
प्रेम ?
दुसरे रूप .
तंत्रज्ञान ?
आराम देण्यासाठी.
सेवा ?
जी तुम्ही चुकवू शकत नाही.
भविष्य ?
जे तुम्ही उजळवू शकता.
देव ?
प्रेम .
जीवन ?
तेच , अगदी तसेच.

 http://www.youtube.com/watch?v=RxGsHdOolCU&feature=plcp&context=C3777a7bUDOEgsToPDskJBrmiwKhBsTyDFGF51XeJW



The Art of living
© The Art of Living Foundation