योग केल्याने परत तुम्हाला लहान मुलाप्रमाणे (निरागस) होता येते!
बातमीपत्र
आर्ट ऑफ लिविंग आश्रमामध्ये जगातील वेगवेगळ्या योग गुरूंच्या सानिध्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग शिखर संमेलन पार पडले.
श्री श्री रवी शंकर यांच्या प्रयत्नांमुळे सर्व जगभरातील योगगुरुना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यास मदत झाली.
योगगुरुनि खालील विषयावर चर्चा केली :
• ज्ञानामधील पवित्रता आणि विश्वसनीयता कायम ठेवून, जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये योगाचा प्रसार करणे.
• योगाद्वारे शारीरिक आणि भावनिक प्रसंन्नता प्राप्त करणे.
• योगाद्वारे मानसिक स्वास्थ्य प्राप्त करणे.
• योगागुरुद्वारा योगाचा प्रसार करताना आलेली आव्हाने.
श्री श्री रवी शंकर यांची बहुमूल्य टिप्पणी :
योगाला सर्व प्राचीन ध्रमग्रंथान्मधे उच्चा स्थान दिलेले आहे.
ज्योतिष, आयुर्वेद, वेदांत हे सर्व योगापासून आले आहेत. योगा हेच सर्वांचे मूळ आहे, ज्याच्यावर सर्व काही चालते आणि याचा संयोग वेदान्तामध्ये सविस्तर सांगितला आहे.
आज आपल्यामध्ये वेदांती आणि योगी येथे आहेत अजुन आपल्याला काय हवे आहे!
जिथे जिथे योग आणि वेदान्त आहेत तिथे कशाचाच अभाव (चणचण) नसते, तिथे काहीच अन्याय (किवा गैर) नसते. तिथे अज्ञान (अंधःकार) नसते, तिथे अशौच (अशुद्धता) नसते.
आपल्याला चार गोष्टी समाजातून नाहीश्या केल्या पाहिजेत, अज्ञान, अभाव, अन्याय आणि अशौच.
म्हणून योग आपल्याला लहान मुलाप्रमाणे बनवते.
बऱ्याच प्रकारचे योग सांगितले आहेत : कर्म योग, ज्ञान योग, भक्ती योग.
गीता हि सर्व सुरवातीपासून अंतापर्यंत योगच आहे. आणि याचा सार असा आहे कि जीवनामध्ये या सर्वाना बरोबर घेऊन जायला हवे आणि जीवनामध्ये सतत पुढे चालत राहिले पाहिजे, हे गरजेचे आहे.
आपल्यामध्ये किती तरी ज्ञानी आज इथे उपस्थित आहेत आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. योगींच्या फक्त उपस्थितिनेच बरीच कामे होऊन जातात .
आपल्याला खूप खूप आशीर्वाद मिळाले आहेत आणि बरेच अजून मिळणार आहेत.
तुम्ही जेव्हा इथून बाहेर जाल, तेव्हा तुमचे मन लहान मुलासारखे आणि निर्मळ असेल, हे सर्वात महत्वाचे, निर्मळ मन आणि शुद्ध हृदय आणि पवित्र, शुद्ध कृति.
भगवान कृष्ण म्हणतात ‘योगिनां अपी सर्वेसम मद-गातेनान्तारात्मना’, सर्व योगीमधला जो माझ्यामध्ये वास करतो तोच मला त्याच्या हृदयात ठेवतो. आणि जो मला हृदयात ठेवतो, सर्वामध्ये परमश्रेष्ठ असतो. म्हणून भक्ती हि खूप महत्वाची आहे.
आज, भक्ती योग, ज्ञान योग आणि भौतिक(विज्ञान ) योग, हे सर्व एकत्र आले आहेत. किती भाग्यवान दिवस आहे.
तुम्ही सर्वजण योग शिखर संमेलनाचा आनंद लुटा आणि लक्षात ठेवा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, हे ज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची. या जगातून हाल आणि वेदना नाहीश्या करा.
देव तुम्हा सर्वावर आशीर्वादाचे वर्षाव करीत आहे आणि यानंतर सुद्धा सदैव करत राहील!
सर्व योगगुरुनी एक जाहीरनामा पत्रकावर सही करून असे जाहीर केले कि २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून UN ने जाहीर करावा.

© The Art of Living Foundation