तुमच्या सर्व संकल्पना एका बाजूला ठेवा आणि जरा स्वतःच्या 
जीवनात डोकाऊन पहा; आयुष्यात तुम्ही काय शिकला? तुमचे अनुभव काय आहे?

१६ डिसेंबर २०११

त्या सर्व गोष्टींचा विचार करा ज्या आधी तुम्हाला सत्य असल्याचे वाटले पण नंतर ते असत्य ठरले. असे कोणते अनुभव आहेत ज्यांचे मोल त्यावेळी वाटले पण नंतर काहीच नसल्याचे जाणवले?
पाण्यावरील बुडबुड्या प्रमाणे कसे तुमचे निर्णय होते याचे निरीक्षण करा; त्यात काही तथ्य नव्हते, कोणता नैतिक दृष्टीकोन नव्हता.तुमचे मत होते आणि तुम्हाला वाटले तसेच असते. आणि नंतर वाटले, ‘ओ! ते माझे मत होते पण वस्तुस्थिती तशी नसते’.तेव्हा मग तुमची दृष्टी विस्तारते, तीक्ष्ण होते आणि उंचावते.
ज्याने तुमची दृष्टी विस्तारते, तीक्ष्ण होते, दृष्टी उंचावते त्याला ‘स्वाध्याय’ म्हणतात. स्व म्हणजे स्वतः, आपल्या स्वतःचे अध्ययन. आपल्या ‘स्व’वर प्रकाश टाकणे, तुमच्या ‘स्व’चे परीक्षण करणे, हे महत्त्वाचे आहे. ह्या आत्मपरीक्षणा मुळे तुम्ही खुलून निघता आणि तो अंतरात्मा मुक्त होतो. तेव्हा मग आपल्याला सर्वकाही उमजू लागते – एकाच प्रकाश आहे, जो माझ्यात आहे. तेव्हा तुम्हाला मार्ग सापडतो आणि सत्याचा उदय होतो आणि जे सर्व ग्रंथात आहे त्याची ओळख पटते.
अन्यथा नुसते ते ग्रंथ तोंडपाठ करून आणि पोपटपंची करून काही उपयोग नाही. त्याने आपल्या आयुष्यात जिवंतपणा आणला पाहिजे आणि त्याकरिता स्वाध्याय अत्यावश्यक आहे. तुमच्या मनाला, तुमच्या स्वतःच्या बुद्धीला, तुमच्या स्वतःच्या जीवनाला, आणि तुमच्या स्वतःच्या जीवनातील घटनांना उजळून टाका, ते खूप महत्त्वाचे आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल कि केवळ तुमच्या आयुष्यातील घटनांना उजळून टाकल्याने काय होते.
तुम्ही कसे होता, तुमच्या संकल्पना काय होत्या, तुमचे विचार किती संकुचित होते आणि आता किती विस्तीर्ण झाले आहेत. तुमचे वर्तणूक कसे होते आणि आता तुमचे वर्तणूक कसे बदलले आहे. तुमचा आपलेपणाचा भाव कसा होता आणि आता तो कसा बदललाय.
प्रश्न: परमप्रिय गुरुजी, मी गुरूंना न मानणार्यांपैकी एक होतो. पण ज्या प्रकारे योगायोगाने मी तुम्हाला भेटलो, केवळ आयुष्यच बदलून गेलंय. ज्या प्रकारे तुम्ही परिस्थितीना प्रतिसाद देता, ते अगदी अति आश्चर्यकारक आहे, बुद्धी पलीकडचे आणि सर्व वैज्ञानिक तर्कापलीकडचे आहे. जगभरातील इतक्या करोडोंना तुम्ही कसे प्रतिसाद देता? तुम्ही आम्हाला इतके चांगले कसे ओळखता? तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमच्यामुळे मी किती धन्य झालो!
श्री श्री: छान! तो प्रश्न नाही, ते आश्चर्य आहे. मलाही कधीकधी आश्चर्य वाटते.

प्रश्न: गुरुजी, जर सेवा, साधना आणि सत्संग चे अंतिम साध्य वर्तमान क्षणात जगणे असेल तर, कधी कधी वर्तमानात आम्हाला पीडा का होते आणि मग स्वतःला आठवण करून द्यावी लागते कि या पीडेमुळे तर आपण अधिक सहनशील बनतोय? आम्ही कशाची तयारी करीत आहोत?
श्री श्री: या पृथ्वीवर पीडा आणि आनंद एकत्र नांदतात.
या जगात पदार्पण करण्याचा पहिला अनुभव क्लेशदायक होता. तुम्ही आनंदाने तुमच्या आईच्या गर्भात तरंगत होता आणि अचानक सर्व द्रव्य निघून गेले आणि तुम्हाला एका अरुंद वाटेने जावे लागले. ते खूप अवघड होते आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला. म्हणून जणूकाही खूप मोठे काम आल्यासारखे मुल जन्म झाल्याबरोबर आपले सर्व अंग आकुंचित करते आणि रडते. तो वेदनेचा तुमचा पहिला अनुभव.
‘गतीतील ध्यानाप्रमाणे’ सुख आणि यातना येत राहतात पण दुःख (करणे न करणे) तुमच्या हातात आहे. कधी कधी यातना अपरिहार्य असतात. पण ज्यावेळी तुम्ही त्या यातना नाकारण्याचा प्रयत्न करता किंवा तुमच्या मनाचा एक पूर्वगृह असतो कि हा त्रास कधीच नसला पाहिजे तेव्हा दुःख होते. वर्तमान क्षणात भूतकाळ अडकवून ठेवणे म्हणजे दुःख.
म्हणून दुःख देखील वर्तमानात असते कारण तुमचे मन भूतकाळातील कुठल्या क्षणाला पकडून बसले आहे. पुन्हा, काही वेळा ते देखील अनिवार्य असते, परंतु ज्ञानामुळे त्याचा अवधी कमी होतो.

म्हणून महर्षी पतंजली म्हणतात, हेयं दुखं अनागतम्’; भूतकाळात येऊ शकणारे दुःख टाळायचे असेल तर त्यासाठी योग आहे. ती एक सावधगिरी आहे. जर तुम्ही जेवणाच्या बाबतीत खबरदारी घेतली आणि तुमच्या खाण्याच्या सवयी चांगल्या असतील तर तुम्हाला मधुमेह, रक्तदाबाचा किंवा हृदयाचा त्रास किंवा अन्य कोणत्या व्याधी होणार नाहीत.
ह्या व्याधी तुम्हाला का होतात? कारण काहीतरी, कुठेतरी तुम्ही हेळसांड करता. तसेच जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधांवर लक्ष नाही दिलेत, तरीही असे प्रश्न उद्भवू शकतात.कधीकधी जर काही कारणाशिवाय तुम्हाला वाटले कि तुम्ही त्रासात आहात, तर तो त्रास तुमच्या माहित नसलेल्या भूतकाळातून आला आहे.आणि जर तुम्ही ‘eternity process(मागील जन्मात जाण्याची पद्धत) केलीत तर खोल ध्यानात तुमच्या लक्षात येईल, ‘ याचे कारण भूतकाळात आहे आणि मी आत्ता त्याचे फळ भोगतो आहे.’ बस्! विषय संपवून टाका आणि पुढे चला.

प्रश्न: गुरुजी, एक लग्न झालेल्या स्त्री साठी, आई-वडील आणि पती यांच्यामधील समतोल कसा राखता येईल? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री : प्रथम हा विचार सोडून द्या कि ते परस्पर विरोधी आहेत. असे सकृतदर्शनी जरी दिसत असले, तरीही मान्य करू नका कि तिथे विसंवाद आहेत. जेंव्हा तुम्ही विचार करता कि तेथे कलह आहे, तेंव्हा तुमची ओढाताण सुरु होते. जर तिथे कलह असेल तर कुशलतापूर्वक त्यांना एकत्र आणा.तुमच्या आई-वडिलांबद्दल पतीला आणि पतीबद्दल आईवडिलांना चांगल्या गोष्टी सांगा.
खुपदा मुली अजाणतेपणे आपल्या सासरच्या लोकांबद्दल किंवा नवऱ्याबद्दल आईवडिलांकडे तक्रार करतात आणि आई-वडील अजून काळजीत पडतात. कुपदा तेयेऊन सांगतात, कि ‘गुरुजी, माझ्या मुलीला खूप त्रास आहे हो’.मी त्यांना सांगतो, ‘ ती जे सांगेल ते १००% सत्य मानू नका. ती फक्त तिचे मन मोकळे करते आहे.तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही मन मोकळे करता पण खरोखर तो तेवढा मोठा प्रश्न नसूही शकतो.लोकांना बोलायला आवडते आणि त्यांनी एकदा सुरुवात केली, ते कुठे भरकटत जातात त्यांचे त्यांना कळत नाही.त्यांची कल्पनाशक्ती वारेमाप धावते.
कधीकधी तुम्हाला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते किंवा काही सहानुभूती हवी असते आणि म्हणून तुम्ही तक्रार करता, जसे एखादा आजारी माणूस ते तुमच्याशी बोलताना ते फुगवून सांगतो.
खुपदा साधना न करणारे लोक असे करतात.ज्यांच्याकडे पुरेसे ज्ञान नाही, ते प्रश्न फुगवून ठेवतात कारण त्यात एक प्रकारचे समाधान मिळते कि लोक त्यांच्याकडे लक्ष देत आहेत. आणि आई-वडील तो प्रश्न खुप्मोथा समजतात कारण त्यांना आपल्या मुलांची काळजी असते.
तुम्हाला घटनेच्या दोन्ही बाजू माहित करून घेतल्या पाहिजेत. जेंव्हा तुम्ही तुमच्या व्याह्यांना भेटता, तेंव्हा त्यांना विचारा, ‘ माझी मुलगी व्यवस्थित वागते ना?’. जर ते सुसंकृत असतील तर सांगतील, ‘ हो, ती ठीक आहे’.
लोक जेंव्हा आणि ज्याबद्दल तक्रार करतात, ते स्वत:सुद्धा त्यावर १००% विश्वास ठेवत नाहीत. तिथे थोडी जागा ठेवावि लागते आणि त्याच जागेत ‘सत्य’ असते.

प्रश्न: गुरुजी, आडमुठ्या लोकांबरोबर कसे वागावे, खासकरून बायकोशी?
श्री श्री : एकदा तुम्हाला कळले कि ती आडमुठी आहे , तिथेच तुमचा प्रश्न सुटला. तुम्हाला जे सांगायचे असेल त्याच्या विरुद्ध बोला. संपले! तुम्हाला आता युक्ती माहीत आहे.
जर तिचे वागण्याचा अन्द्दाज करता येत नसेल तर मात्र अवघड आहे. जर ती नेहमीच आडमुठेपणाने वागत असेल, तर तुम्ही जे म्हणता त्याच्या विरुद्ध ती करेल.तुम्ही विरुद्ध बोला आणि आपले काम करून घ्या.

प्रश्न: गुरुजी, माझ्या मनात मी वरकरणी शात बसलो कि खूप विचार येतात. माझे चित्त अशांत असते.एकामागोमाग एक विचार येत रहातात.हे नेहमीच असे होते का असे व्हायला नको.कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री : विचारांना येऊ देत.बऱ्याच काळापासून जे आतमध्ये आहे ते बाहेर येत आहे. मनाला जेथे जायचे आहे तिथे जाऊ देत.भूतकाळात, भविष्यकाळात किंवा इथे काही. तुम्ही शांत बसून त्याचे निरीक्षण करा. या सर्व विचारांचे निरीक्षक बना.
आज कोर्स चा पहिलाच दिवस आहे.पुढचे २-३ दिवस पहा, तुम्हाला फरक जाणवेल.

प्रश्न: गुरुजी, शबरीने कधी यज्ञ केले नाहीत, वेद पडले नाहीत. तरीही ती देवाला कशी भेटली?
श्री श्री : प्रेम आणि भक्तीमुळे. तिची देवावर एकचित्त श्रद्धा होती. देवाशी जवळीक आणि प्रेम होते.
म्हणूनच भारतात अशा खूप गोष्टी आहेत. तिथे बरेच मार्ग आहेत.म्हणजेच ज्ञानाचा, सेवेचा किंवा प्रेमाचा. तुम्ही तीनही मार्गांनी जाऊन एकाच ठिकाणी पोचाल.
पाश्चिमात्य देशात लोक हे समजत नाहीत. त्यांना हि संकल्पना नवीन आहे. एकदा, अयातुल्ला खोमेनींचा उजवा हात असलेले इराणचे नेते इथे आले.हि १५-२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेंव्हा मी जुन्या कुटीर मध्ये होतो. हे इस्लामचे गाढे अभ्यासक होते आणि ते ८३-८४ वर्षांचे होते. त्यांच्यातली ज्ञानाची  ओढ त्यांना तेहरानहून येथे घेऊन आली. त्यांना कोणी सांगितले होते कि येथे एक संत आहेत म्हणून. ते म्हणाले,’जर सत्य एकच आहे, तर त्याकडे जाणारा मार्गही एकाच असायला हवा.जर एक मार्ग सत्याचा आहे, तर बाकीचे सर्व खोटे आहेत.’
ते म्हणाले, ‘ मी माझ्या लहानपणी शिकलो आहे, कि हेच सत्य आहे. मग दुसरे काही कसे सत्य असू शकते? प्रश्नाचे एकाच योग्य मार्ग. एकाच योग्य उत्तर असू शकते, देवाकडे जाणारा एकच मार्ग असू शकतो.कोणता आहे योग्य रस्ता?’
मी हसून त्यांना म्हटले, ‘ठीक आहे, तुम्ही उत्तरेकडून इकडे आलात.तुम्हाला कोणीतरी दिशा सांगितली’. त्याकाळी इथपर्यंत बस नव्हती आणि कनकपुरा रोड रिकामा असायचा. तिथे काहीच नव्हते. मी विचारले, ‘त्यांनी तुम्हाला कोणती दिशा सांगितली?’ ते म्हणाले,’बनशंकरी पासून त्यांनी सरळ येऊन उजव्या हाताला वळायला सांगितले.’मी म्हणालो,’ ठीक आहे, पण जर का तुम्ही कनकपुराहून येत असलात, तर त्याचा पत्ता सरळ जाऊन डावीकडे वळ असा होतो. तुम्हाला वाटते का हे चूक आहे?’. ते शांत बसले. मी म्हणालो,’ तेहरान ला जाण्यासाठी, मी म्हणेन उत्तर पूर्वेकडे जा आणि ते बरोबर आहे. पण जर्मनी हून तुम्हाला ते दक्षिण-पश्चिमेकडे जायला सांगतील. हे पूर्ण विरुद्ध आहे, पण बरोबर आहे. आणि पाकिस्तानहून तुम्हाला मी पश्चिमेकडे जायला सांगेन आणि तेही बरोबर आहे.या सर्व सूचना बरोबर आहेत का ते चूक आहेत?’
ते म्हणाले, ‘बरोबर आहेत.जरी सत्य एकाच असले तरी त्याकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि ते सर्व योग्य आहेत.’ते म्हणाले ,’सलाम, तुम्ही माझे डोळे उघडलेत.आज मला माझा पुनर्जन्म झाल्यासारखा वाटतो आहे.’
जेंव्हा साधाकासाठी प्रश्न इतका गहिरा बनतो, तो उत्तरासाठी इतरत्र शोध घेतो.जरी सत्य एक असले तरी मार्ग अनेक आहेत.हे भारताची खासियत आहे.कबीर सत्याप्रत ज्ञान आणि ध्यानाने, तर शबरी प्रेम आणि देवाला भेटायच्या ओढीने पोचली. हे ओढ तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. मीराबाई भजनाने तिथवर पोचल्या.शबरी कधी भजन म्हणत नसे.फक्त अंतरंगामध्ये ओढ होती.एक ज्ञानी माणूसही पोचू शकतो आणि एक कर्मयोगी सुद्धा. हे सर्व वेगवेगळे मार्ग एकाच सत्याकडे घेऊन जातात आणि ते सर्व योग्य आहेत.मला विचारलेत, तर मी एक मार्ग निवडायला सांगेन, बाकीचे आपोआप बरोबर येतील. हि आर्ट ऑफ लीवींग ची खासियत आहे, जिथे सर्व काही मिळून येते: भाव, भक्ती, ज्ञान, खेळ आणि थोडीशी खोडी सुद्धा !

प्रश्न: गुरुजी, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.मला २ वर्षांपूर्वी समाधी चा अनुभव आला होता आणि परत कधीही तसा अनुभव आला नव्हता. असा अनुभव का येतो आणि तो पुन्हा येण्यासाठी काय करावे लागेल?
श्री श्री : शांत व्हा. अनुभवाच्या मागे जाऊ नका. तुम्ही अनुभवांच्या पलीकडले, ‘अनुभव करणारे’ आहात. म्हणून विश्राम करा.

प्रश्न: मी नेहमी खूप उर्जेने आणि उत्साहाने नवीन सुरुवात करतो. पण, थोड्या काळानंतर, मला त्यात मजा येत नाही आणि त्याचे काहीच फळ मिळत नाही.
श्री श्री : हे खूप जणांच्या बाबतीत होते. कोणी साक्षात्कारी असल्याशिवाय आयुष्यभर एकाच काम सारखीच मजा घेत करू शकत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी असाल तर तेच ते भाषण तुम्ही लाखो वेळेला करू शकता आणि तरीही उत्साही असता, कारण तुम्ही त्याच्या आठवणीत जगत नाही, तुम्ही आत्ताच्या क्षणात जगता किंवा तुम्ही त्याच त्या गोष्टीत मजा घेणारे आणि न कंटाळणारे लहान मूल असता.
म्हणून तर बांधिलकी हा शब्द या पृथ्वीतलावर आला. फक्त  आनंद  मजा येते किंवा नाही यावर जाऊ नका. तुम्ही बांधील आहात म्हणून तुम्हाला ते करायला पाहिजे. आयुष्यात बांधिलकी आणि मौज, दोन्ही असणे जरूरी आहे.मौजमजा तुम्हाला थोडा आनंद देते पण बंधीलकीमुळे त्या कामांमध्ये प्रगती होते. बांधीलकीच आयुष्याला पुढे घेऊन जाते.

प्रश्न: गुरुजी, हे जग एक सुंदर स्थळ कधी बनेल.
श्री श्री : फक्त डोळे उघडून बघा, ते आधीच सुंदर आहे.
जर तुम्हाला असे वाटतेय कि ते सुंदर नाहीये, तर सुंदर बनविण्यासाठी तुम्ही काहीतरी काम करा.आम्ही जे करतोय ते करा, ध्यानधारणा, ज्ञान हेच जगाला सुंदर बनवतील.माझ्या नजरेतून हे जग सुंदर आहे आणि ते अधिकाधिक सुंदर होते आहे. इथे फुले आहेत आणि कळ्याही आहेत आणि कळ्या काही वेळात उमलणार आहेत.तुम्ही काम करा, ‘कर्म योग’ करा.

प्रश्न: गुरुजी, मी जेंव्हा नवीन काम सुरु करतो, तेंव्हा नकारात्मक विचार करतो. असे का होते?
श्री श्री : तुम्ही ‘नेहमी’ असे का म्हणता? कधीकधी तुम्ही विचार करता.ठीक आहे. तुम्ही एवढे समजून घेतले आहेत. आता यापुढे सकारात्मक विचार करा.

प्रश्न: दानधर्म केल्याने मनाला शांती का मिळते?
श्री श्री : दान केल्याने सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि सकारात्मक उर्जा नेहमीच शांत करते. तुम्ही सर्वानी दानधर्म केला पाहिजे, तुमची कमाई कितीही असो. तुमचे जर १००० रुपये कमाई असेल, तर त्यातले ३% बाजूला ठेवा. ते धर्म स्तंभ योजनेमध्ये घाला.सगळ्यांनी! आणि मग पहा कि तुम्हाला किती बरे वाटते आणि तुमची उर्जा कशी बदलते ते.

प्रश्न: मी ईश्वरी प्रेमाचा अनुभव करू? माझ्या जोडीदारावरचे माझे प्रेम ईश्वरावरचे प्रेम कमी करते आहे.मला असे वाटते कि तुमच्या सेवेसाठी १००% देत नाहीये.
श्री श्री : नाही, ते अजिबातच परस्परविरोधी नाहीत. असा विचार करू नका.सूर्य सगळ्यांच खिडक्यांमधून संपूर्णपणे तळपतो. पण तुम्ही जर दुसर्या स्त्रीच्या प्रेमात पडलात, तर मात्र हे स्पष्टीकरण देऊ नका, कि ‘माहितीये गुरुजी काय म्हणाले? सूर्य सगळ्याच खिडक्यांमधून संपूर्णपणे तळपतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे  आणि माझे तिच्यावरही प्रेम आहे.नाही! ज्ञानाचा अयोग्य वापर करू नका.’


The Art of living
© The Art of Living Foundation