एक प्रेमी नेहमीच आनंदी, शांत आणि उदार असतो.
११ जानेवारी २०१२
सत्संग म्हणजे सत्याच्या बरोबर राहणे. त्यालाच साधना असेही म्हणतात. सत्संग म्हणजे काय? आपल्या आयुष्यात आत्ता या वर्तमान क्षणात सत्य काय आहे - याकडे लक्ष दिले पाहिजे.  सत्य काय आहे? 'मी आहे' हे सत्य. शरीराचे अस्तित्व आहे आणि श्वास चालू आहे. तुमच्या शरीर आणि श्वासाकडे लक्ष द्या. मनाकडे लक्ष द्या. सत्य काय आहे? मनात खूप सारे विचार येत आहेत आणि जात आहेत. येत आहेत आणि जात आहेत, उठत आहेत आणि शांत होत आहेत, ही मनाची प्रवृत्ती आहे.  बुद्धी कायम तर्क किंवा विचारामध्ये गुंतलेली असते. आयुष्यात काय निर्णय घेतले? त्याचामुळे काय झाले? त्यातून काय शिकलो आणि काय घेतले? या सगळ्याचा विचार म्हणजे सत्संग. फक्त भजन करणे म्हणजे सत्संग नव्हे. भजन करणे म्हणजे सत्संग आहे, पण तेवढेच नव्हे.  बसा आणि विचार करा, ' माझ्या आयुष्यात, मी काय सत्य शोधले? माझ्यात काय कमी आहे आणि माझी बलस्थाने काय आहेत?'कमीपणा कमी होताना आणि बलस्थाने वाढताना पहा. ही साधना आहे आणि या अशा सत्संगा मध्ये तुम्ही असले पाहिजे. तुमचा विवेक जागृत होत आहे; तो आधी कमी होता, आता एक टक्का जास्त आहे! म्हणजे आयुष्यात प्रगती आहे. हळू हळू किंवा वेगाने, ते होत आहे. तुमचे लक्ष जगाकडे असते, तेंव्हा तुम्हाला देव दिसणार नाही. आणि जेंव्हा देव दिसेल, तेंव्हा जग अदृश्य होते. तुम्हाला दोन्हीपैकी एकच दिसू शकेल.

२४ तास जगालाच धरून बसण्यापेक्षा, देवाचा २४ मिनिटे जरी विचार केला, तर त्याने कितीतरी शांतता आणि आराम मिळेल. तुम्ही काहीही करत असाल, चोवीस तासामधले  फक्त चोवीस मिनिट शांत बसा आणि विचार करा, ' हे जग म्हणजे काही नाही; मला त्याचाकडून काहीही नको. या जगाकडून मला काहीही अपेक्षा नाहीत.' - हा एवढाच विचार मनाला अंतर्मुख करतो. जोपर्यंत आपल्याला  स्थान, मान आणि श्रीमंतीची किंवा कुणाकडून कौतुकाची इच्छा आहे तोपर्यंत मन मागे फिरणार नाही. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत व्याकुळता आहे. अगदी थोड्या वेळासाठी सुद्धा आपण जर असे म्हणले की, ' मला या जगाकडून काहीही नको ', त्याच वेळी विवेक जागृत होतो आणि मन आनंदी आणि शांत होते. हे देवाच्या दृष्टीचे सूचक आहे: प्रसंत  -मानसं  ह्य एनं  योगिनां सुखं  उत्तमम उपैति संत-राजसं ब्रह्मा -भूतं  आकालमासम.'ब्रम्ह चेतना, जिथे अशुद्धी, दुर्लक्ष, गोंधळ  नाही - अशी जागरुकता, थोड्या वेळासाठी आपल्याला अनुभवता येते. तर तुम्ही इथे तीन चार दिवस आहात, भौतिक जगातल्या गोष्टी, आसक्ती आणि द्वेष  अजिबात धरून बसू नका. जर त्या आल्या,  तर लक्ष देऊ नका. जेंव्हा त्या येतात, त्यांना समर्पित करा. हे जाणून घ्या की त्या जाण्यासाठी आलेल्या आहेत. हे जाणून घ्या, आणि आपल्या स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळे ठेवा, स्वतःमध्ये आराम करा.
जर आपण ही जागरुकता घेऊन बसलो तर एक दोन तीन प्रयत्नात नाही पण थोड्या वेळाने तरी मन नक्कीच शांत होईल.
प्रश्न : गुरुजी , सत्य आहेच, तर मग त्याच्या प्रमाणीकरणाची गरज काय?
 श्री श्री: पुरावे मागणे हा मनाचा गुणधर्म आहे. भावना पुरावे मागत नाहीत, मन मागते. मनाच्या समाधानासाठी आणि शांतीसाठी पुराव्याची गरज आहे. पण फक्त त्यालाच धरून बसणे हा ही एक अडथळाच आहे. म्हणूनच प्रमाण, विपर्यय,विकल्प, निद्रा, स्म्रीतायः यांना मनाच्या प्रवृत्ती समजले जाते. त्यांना योग हे नियंत्रण आहे. तुम्ही पुरावे नष्ट करू शकत नाही. जोपर्यंत बुद्धी आहे, ती पुरावे मागणारच. आणि त्याला नष्ट करायची गरज नाही. फक्त त्याबद्दल सजग व्हा आणि पुढे चला.
'
योग बुद्धी परतत्त्व सह ', स्व किवा देव हे बुद्धीच्या पलीकडे आहे.
प्रश्न : गुरुजी, मध्यप्रदेशातील मुस्लीम नेत्यांनी सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा  काढला आहे. तुम्ही यावर काही बोलाल का?
श्री श्री: बहुतेक ते सूर्याला देव किंवा अल्ला पासून वेगळे समजत असतील. तसे नाही आहे. नमस्कार  म्हणजे काय? आभार मानणें. याचा अर्थ असा काढला पहिजे. सूर्य आणि पृथ्वीचे आभार मानणें. निसर्गातील प्रत्येक गोष्ट, गावा पासून सूर्यापर्यंत जगण्यासाठी आवश्यक आहे. आपण आयुष्यासाठी उपयोगी असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही सूर्याला देव म्हणालेच पाहिजे असे नाही. तरीपण, सूर्य ती शक्ती आहे जी प्रत्येक गोष्टीला आधार देते, आणि त्या सूर्याला बनवणारा तोच देव आहे. आपण म्हणतो की टेलिफोन किंवा मोबाईलच्या शोधामुळे खूप सोप्पे झाले आहे. आपण फोनचे जेंव्हा आभार मानतो, तेंव्हा आपण त्या वस्तूबद्दल आभार मानत नाही, तर ज्या व्यक्तीने शोध लावला त्याचे आभार मानतो. म्हणूनच आपण म्हणतो, ' सर्व देव नमस्कारं केशवं प्रती गच्छति|]. तुम्ही कुणाचे आभार मानता याने फरक पडत नाही, सर्व आभार एका आणि एकच देवापर्यंत पोचतात
सूर्य नमस्कार  हा आसनांचा संच आहे जो सूर्योदयाचा वेळी करतात, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, तब्येत चांगली राहते आणि आपण निरोगी राहतो. सूर्य नमस्कारांचे असंख्य फायदे आहेत- हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, गळा, पाय. डोक्यापासून नखापर्यंत, शरीराच्या प्रत्येक भागाला सूर्य नमस्कारांचा फायदा होतो. कित्येक मुस्लिमांना सूर्य नमस्कारचे फायदे मिळाले आहेत. जग भर लोक सूर्य नमस्कार घालून त्यांची तब्येत सुधारत आहेत. त्यांची दृष्टी सुधारते आहे. त्यामुळे मुस्लीम लोकांना यापासून वंचित ठेवणे योग्य नाही असे मला वाटते. ज्याने तब्येत सुधारते अशा गोष्टीपासून कुणाला दूर ठेवणे हे योग्य नाही. जगात फक्त एकच देव आहे, हे समजणे गरजेचे आहे, तिथे दुसरे नाही. जेंव्हा दोन नाहीत, पण प्रार्थनेच्या फक्त वेगळ्या पद्धती आहेत. जरी तुम्ही त्याला प्रार्थनेची पद्धत समजत नसाल, तर याला एक शारीरिक व्यायाम म्हणून बघा आणि मला नाही वाटत की ती देवाची निंदा असेल.

प्रश्न : गुरुजी , जर आपण मागच्या जन्मातील कर्मांची फळे आत्ता भोगत असू, तर या जन्मातील कर्मांची फळे कधी मिळणार?
 श्री श्री: ते तसे नाही! आपल्या काही कृत्यांची फळे या जन्मातही मिळतात. मी एक उदाहरण देतो: जर तुम्ही मुग डाळ भिजवलीत, तर २-३ दिवसात कोंब येतात. जर तुम्ही शेंगदाणे पेरलेत तर ३-४ महिने लागतात शेंगदाणे येण्यासाठी. पण जर तुम्ही नारळाचे झाड लावलेत, फळे येण्यासाठी ३-४ वर्षे लागतील आणि आंब्याचे झाड लावलेत तर आणखी वेळ लागेल. त्याच प्रमाणे, काही कर्मांची फळे लगेच मिळतात - जर तुम्ही तुमचा हात आगीवर ठेवलात तर लगेच भाजेल, उद्या नाही. पण डाळिंबाचे झाड शेतात लावलेत, तर फळे यायला काही वेळ लागेल. त्यामुळे काही कर्मांची फळे लगेच मिळतात तर काहींची उशिराने. जर तुम्हाला कारखाना उभारायचा असेल, तर देवालाच माहिती किती वर्ष लागतील. आजकाल परवाना मिळायलाच किती वेळ लागतो. तुम्ही एक कारखाना बांधा आणि दहा परवाने लागतील. यात काही लोकांना लाच पण द्यायला लागते. आपल्यासारखे लोक, जे लाच देत नाहीत. त्यांना वीस वर्ष लागतील परवाना मिळायला. एक माणूस जो अथक श्रमाने कारखाना उभा करत असतो, त्याच्या मुलांना त्याचा कष्टांची फळे मिळतात. त्याच्या आयुष्यात त्याला खरच भागवणे अवघड होते. चांगल्या आणि प्रामाणिक उद्योगपतीचे उद्योग फार कमी वेळा लगेच उभे राहतात. खूप उद्योगांना स्थापित व्हायला अनेक दशके लागतात. दहा, वीस, पन्नास वर्षानंतर त्याची फळे चाखायला मिळतात.

प्रश्न : गुरुजी, नवरा बायकोचे नाते सात जन्मापर्यंत टिकते हे खरे आहे का? जर तसे असेल तर मला या जन्मताच मोक्ष हवा आहे कारण सातव्या जन्मापर्यंत मी खूपच निराश होईन!
श्री श्री: अरे, तुला हे कसे माहित की हा तुझा सातवा जन्म नाही म्हणून! हा सहावा किंवा पहिला असू शकतो. प्रार्थना कर!
तुझा बायकोलाही विचार की ती कसे तोंड देते आहे. तू इतका निराश आहेस, तर तुझ्या साथीदाराला विचार की ती किती निराश किंवा आनंदी आहे. एकाने निराश असणे आणि दुसरा आनंदी असणे, हे अशक्य आहे. दोघेही निराश होतात. जे काही आहे, ते साजरे करा.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही देव आहात. तुम्ही पण क्रिया करता?
श्री श्री: कधी कधी! जर कुणाला शिकवायचे असेल तर, मला निदान लक्षात तरी असले पाहिजे!

श्री श्री : हो, अगदी पहिल्यांदा, तेंव्हा खूप कमी लोक होते, पन्नास च्या जवळपास. ते सगळे आले आणि अनुभव घेतला.

प्रश्न : गुरुजी, माझे मन दुविधेत आहे आणि अशांत आहे. जेंव्हा डोळ्यांनी तुम्हाला बघायचे असते तेंव्हा तुम्ही डोळे बंद करायला सांगता. इथे येण्या आधी तुम्ही आम्हाला मौनात जायला सांगता आणि आम्ही मौन सोडायचा आधी तुम्ही जायला निघता. आमचा विचार करा गुरुजी, मनाला खूप त्रास होतो.
श्री श्री: तीव्र इच्छा म्हणजेच देव. तीव्र इच्छा असणे चांगले आहे. आणि हे असे आहे की ज्याला काही उत्तर नाही. ते कधीही कमी होत नाही. ही तहान अशी आहे की जी कधी भागवता येणार नाही.

प्रश्न : गुरुजी, तुमच्या आईने तुम्हाला कधी रागावले आहे का? कृपया मला माझा राग कसा आवरायचा ते शिकवा. मी माझ्या आईवर बऱ्याच वेळा रागावतो.
श्री श्री:  हो, माझी आई मला खूप ओरडायची! एक काम करा. रोज जाऊन आईला नमस्कार करा. जरी तुम्ही आज रागावलात तरी उद्या तुम्हाला तसेही नमस्कार करायचाच आहे. जर तुम्ही आईचे पाय धरून तिचे आशीर्वाद मिळवलेत, तर त्या दिवसाचा राग तिथेच वितळून जाईल.

प्रश्न : गुरुजी, जेंव्हा पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंग साठी जास्त वेळ द्यायला लागलो तेंव्हा पासून माझ्या बायकोला त्याबद्दल जास्तच ईर्ष्या होऊ लागली आहे असे वाटते. यावर उत्तर काय?
श्री श्री: तुम्हाला सायकल कशी चालवायची ते माहित आहे का? त्याचप्रमाणे आयुष्याचे वाहन चालवले पाहिजे. समतोल ठेवा: तुम्हाला जे आवडते ते करा, पण इतरांना आवडते ते पण करा.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही अष्टावक्र गीता सांगितलीत त्याचप्रमाणे योग वसिष्ठ पण सांगाल का? खूप वेळा मी वाचते त्यातील काही भाग समजायला अवघड जाते.
श्री श्री: हो, तुम्ही वाचत राहिले पाहिजे. योग वसिष्ठ एका वाचण्यात समजणे अवघड आहे. जशी तुमची जागरुकता वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त समजत जाईल. त्यामुळे तुम्ही ते सातत्याने वाचले पाहिजे. परत परत वाचल्यामुळे, नवीन कल्पना येऊ लागतात.

श्री श्री: सगळ्यात पहिल्यांदा ही कल्पना तुमचा मनातून मुळापासून काढून टाका. प्रत्येक जागा ही एकमेव आहे. जर कुणी तुम्हाला वर ठेवले असेल तर ते खाली असलेल्यांची मेहनत आहे. ते आधार आहेत. इमारतीमध्ये वरचा मजला तळ मजल्या इतका महत्वाचा नसतो. जर पाया मजबूत असेल तर वर कितीही मजले चढवता येतात. जर तुम्ही वर असाल, तर नम्र असा. ती नम्रता असलीच पाहिजे, तेंव्हा तुम्ही वरती असता. जेवढे वर चढल,  तेवढे तुम्ही नम्र होता. नम्रता हे सफलतेचे लक्षण आहे. आणि जेंव्हा नम्रता असते तेंव्हा अडचणी राहत नाहीत. सर्व काही नैसर्गिकरित्या होत राहते.

प्रश्न : मला नेहमी विस्मय वाटतो की देवाने आपल्याला एवढे गुंतागुंतीचे का बनवले आहे. आपल्याला मन दिले आहे की जे इकडे तिकडे भटकत राहते आणि आपण त्याला काबूत आणतो. आपल्याला काबूत असलेले मन का नाही दिले?
श्री श्री : तुम्ही एवढे आळशी का आहात की तुम्हाला काहीच करायचे नाही? निसर्गाला तुम्हाला काहीतरी बनवायचे आहे, काही जबाबदारी घ्या. हे असे विचारण्यासारखे आहे की, ' तुम्ही जीग्सो कोडे का बनवता? ते तयारच घ्या, एकदमच बसवलेले.'जीग्सो कोडे तुम्हाला खेळण्यासाठी बनवले आहे, त्यापासून काहीतरी बनवण्यासाठी. आयुष्य तसेच आहे. तो एक खेळ आहे. आणि मन हे मोठे खेळाडू आहे.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही आम्हाला नात्यात कसे असावे हे सांगितले आहे. त्यातून बाहेर कसे यावे हे कृपया सांगा.
श्री श्री : तुम्ही त्यातून बाहेर पडलेलेच आहात. जेंव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असते तेंव्हा ते झालेले आहे! हो की नाही? महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही विश्वाशी नाते जोडा, देवत्वाशी. तुमचे देवाशी नाते असेल, तर तुमचे प्रत्येकाशी नाते आहे. तेंव्हा कुणाशीही नाते जोडायचा किंवा तोडायचा प्रश्नच येत नाही. तोडण्याच्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही अडकून राहू शकता. जेवढे मन तोडायचा प्रयत्न करते तेवढे ते त्याच्याकडे ओढले जाते आणि त्रास होतो. तुम्हाला राहायाचेही नाही आणि सोडायचेही नाही.
सोडताना काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते, आणि राहण्यामध्ये दु:ख्ख  इतके वाढते की ते सहन करणे अवघड होते. तेंव्हा त्या एका बरोबर नाते टिकवणे हे सुरक्षित आहे. याने प्रत्येकाबरोबर तुमचे नाते स्थापित होते.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही असे म्हणता की आपण या जगात अनेक वेळा एकत्र आलो आणि वेगळे झालो; आम्ही विसरलोय आणि तुम्हाला लक्षात आहे. या वेगळे होण्यात तुम्हाला त्रास नाही झाला?
श्री श्री :  मी तुमच्यापासून वेगळा कुठे आहे? अन्यथा तुम्ही माझे कसे असता? इथे बाहेरचा कुणीही नाही. इथे फक्त मी आणि मीच आहे.

प्रश्न : गुरुजी, माजे अगदी जवळचे मित्र जेव्हा दुसऱ्याना दुषणे देत असतात तेंव्हा मी काय करावे. ते म्हणतात की फक्त एकमेकांना सांगणे आहे, पण मला ते अजून ऐकायचे नाही. काय करू?
श्री श्री  :  कानात बोळे घालून त्यांना ऐका. त्यांना ते सांगायचे आहे कारण त्याने हलके वाटते. ते त्यांना करू देत. तुम्ही ते अजिबात घेऊ नका. हे महत्वाचे आहे.
प्रश्न : गुरुजी, तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता. तरी मला असे का वाटते की तुम्ही माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करता?
श्री श्री :  ते एक गुपित आहे. कुणाला सांगू नका! हे खरे आहे, पण सगळ्यांना सांगण्यासाठी ते नाही! एक पूर्ण सत्य!

प्रश्न : गुरुजी, मी एका मुलीवर प्रेम करतो जिला माझ्या प्रेमाचा पुरावा महागड्या भेटवस्तूतून हवा आहे. तुम्ही म्हणता की प्रेम फुकट आहे, पण हे माझ्यासाठी खूपच महाग ठरते आहे!
श्री श्री ये मुला, धडा शिक! प्रेम आणि मैत्री काय आहे हे तू काही दिवसात शिकशील, जसा तू मोठा होशील. तू किती त्याग करू शकतो हे ती कदाचित पारखून पाहत असेल. प्रेम त्याग मागते. तू किती कंजूस किंवा उदार आहेस हे तिला पहायचे असेल. खरा प्रेमी कधीच लालची नसतो. प्रेमी आनंदी, शांत आणि उदार असतो. पण याचा अर्थ असा नाही की आहे ते सगळे उडवावे. तुमचा विवेक वापरा.

प्रश्न : (ऐकू नाही आला)
श्री श्री : तुम्ही विचारात आहात आणि मी काय सांगितले ते ऐकत पण आहात. जर तुमच्या मध्ये चेतना नसती तर तुम्ही प्रश्न कसे विचारले असते?
तुम्ही पहिले, ऐकले किंवा समजले कसे असते? जे तुमच्या आतून ऐकत आहे, समजते आहे, पाहत आहे, अनुभवत आहे ते म्हणजे चित्त. मन, स्मृती, बुद्धी, अहं, शरीर, प्राण यांचे मुख्य उर्जास्रोत;शक्तीचा झरा जो स्वतःच चेतना आहे. जे आहे तच सत्य आहे. तुम्ही आहात, बरोबर? इमारत आहे? इमारत सत्य आहे. पण ते खांब जे बोलले जात आहे ते ऐकत आहेत असे वाटत नाही म्हणून इमारतीमध्ये चेतना नाही. आपण तसे म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकामध्ये ती थोडीफार असतेच; ती दगडातही असते. पण तुमच्यामध्ये ती जास्त स्पष्ट आहे. जरी झाडे ऐकत असली तरी झाडांमध्ये ती थोडी कमी जाणवते. पण तुमच्यामध्ये ती चेतना जास्त मोठी आहे. जेंव्हा ती चेतना परम आनंदात बदलते, तो परमात्मा असतो. विश्वात एकच सत्य आहे. चेतनेमध्ये जीवन आणि विश्व दोन्हीही असतात. आणि देवामध्ये सत्य, चेतना आणि परम आनंद हे तीनही असतात. आणि आनंद आपल्यामध्ये लपून बसला आहे. साधनेने हा आनंद वाढतो. देव तुमच्यामध्ये लपलेला आहे, झोपला आहे - त्याला जागे करा.
त्यालाच जागरण म्हणतात. मातेला, तुमच्या आतील देवीला जागे करा!
शिवजी आत बसले आहेत, त्यांना जागे करा. श्रीहरी आत बसले आहेत, त्यांना जागे करा.

प्रश्न : गुरुजी, अध्यात्माच्या मार्गावर वैराग्य आणि जोश यातील कुठला मार्ग योग्य आहे
श्री श्री: दोन्हीही महत्वाचे आहे. म्हणूनच श्री कृष्णाने अर्जुनामध्ये ' पहा लोक काय म्हणतील? ते म्हणतील की हा किती भित्रा आहे'. असे म्हणून उत्साह जागवला. 'अपमानाचे जगणे काय उपयोगाचे; त्यापेक्षा मेलेले चांगले'.नंतर ते म्हणाले, ' क्षत्रीयासाठी असे बसून राहणे योग्य आहे का? एका बाजूला तू रडतो आहेस आणि दुसऱ्या बाजूला तू उच्च शिक्षित माणसाप्रमाणे बोलत आहेस. कुणीही धर्माबद्दल बोलताना असे कापते का?'भगवान कृष्ण पुढे म्हणाले, ' तू कशा प्रकारचा माणूस आहेस? मी तुला धाडसी आणि शूरवीर समजलो. आणि तू असा वागतो आहेस? तू म्हणतोस की तुला हे नको!'अशा टोमण्यांना वापरून भगवान श्री कृष्णाने अर्जुनामधील जोश जागृत केला. नंतर भगवान कृष्ण पुढे म्हणतात, ' हे सगळे काहीच नाही.'अनित्यं असुखम लोकं' - हे जग अस्थिर आहे, हे राहत नाही. सर्वकाही नाशाकडे चालले आहे. या जगाकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस.'हे सर्व सांगून भगवान कृष्णाने अर्जुनाला हळू हळू वैराग्यात आणले. त्याने उत्साह आणि वैराग्य दोन्हीही जागवले, आणि मग म्हणाले, ' आता जा आणि लढ.' त्यांनी अर्जुनामध्ये किती योग्य मनोभाव निर्माण केला. उत्साहामध्ये काम करण्याचा जोश असतो - तो वैराग्याबरोबर जोडून, जो मार्ग दाखवला तो अद्भुत आणि एकमेव आहे!

प्रश्न : गुरुजी, ज्यांना या जन्मात गुरु मिळाला, आणि काही करणामुळे त्यांना मुक्ती मिळणे शक्य नसेल, तर त्यांना पुढच्या जन्मात गुरु मिळतो की ते असेच लक्ष्यहीन भटकत राहतील?
श्री श्री  :  नाही, नाही! अर्जुनाने हाच प्रश्न विचारला, जर मी योगाचा मार्ग या जन्मात अनुसरु शकलो नाही तर काय?'तर कृष्ण उत्तरले, ‘नही कल्याण  करीत कश्चित दुर्गतिं तातं गच्छति - जो महान कार्य करतो तो या जन्मात किंवा पुढच्या जन्मात खाली कधीच जाणार नाही, कधीच दु:ख्खी राहणार नाही. तुम्ही अस्तित्वाच्या वरच्या पातळ्यांवरच नेहमी चढाल. तू महान आणि श्रीमंत कुटुंबात जन्म घेशील, आणि पूर्व जन्मीच्या कृतींचा स्मृतीवरून तू जिथे सोडलेस तिथून पुढे चालू लागशील. तर काळजी करू नका. तुमची क्रिया आणि साधना वाया जात नाही.
टिप्पणी : गुरुजी, स्वप्नात मी स्वर्ग बघितला, आणि मला असे वाटायचे की पृथ्वी सोडल्यावर मी स्वर्गात जाईन. पण आश्रमात येईपर्यंत मला पृथ्वीवरच स्वर्ग सापडेल अशी अपेक्षा नव्हती.
श्री श्री  अगदी बरोबर! संतुष्ट राहा. हे स्वर्गापेक्षाही चांगले आहे. असे म्हणतात की सगळे असले तरी, स्वर्गामध्ये प्रेम नाही. इथे प्रेम आणि ज्ञान दोन्ही आहे



The Art of living
© The Art of Living Foundation