जगातल्या सर्व सुंदर गोष्टींमध्ये देवत्व ओळखायला शिका !
१० डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, या पृथ्वीतलावर जगणे हा एक स्वप्नं आहे. ध्यान, साधना, आणि सत्संग करताना यांची मदत या स्वप्नामधून बाहेर येण्यासाठी  कशी होते?
श्री श्री : तुम्ही झोपेत आहात, स्वप्नामध्ये तुम्हाला साप चावला तर  तुम्ही लगेच किंचाळत जागे होता. म्हणून स्वप्नामधल्या  अशा काही गोष्टी सुद्धा आपण जागे होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
म्हणून  'नेकी कर और कुये में दाल' असे म्हणतात. चांगल्या गोष्टी करा व ते पण एक स्वप्नांचा भाग आहे म्हणून विसरून जा. तुम्ही जेव्हा हे विसरता आणि ध्यान करता, तेव्हा खरे जागे होता.
साधनेचे दोन भाग आहेत : निश्रेय आणि अभ्युदय.
एक आहे जागे होणे व दुसरे म्हणजे आराम .
साधना समाधान  देते जे आपल्या सर्वाना हवे असते आणि त्यामुळे मुक्तपणा सहजच येतो. आपण स्वप्नामधून जागे होतो व त्यातून बाहेर येतो. म्हणून साधनेचे दोन भाग आहेत : निश्रेय आणि अभ्युदय.

प्रश्न: गुरुजी, कृपा करून 'पुरूषार्थाविषयी' काही सांगा. ते म्हणजे आम्ही जे प्रयत्न करतोसाधना, सेवा आणि सत्संग, ते आहे का? कि काही दुसरे?
श्री श्री: पुरूषार्थ म्हणजे आत्मसात करण्याच्या ४ गोष्टी: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे स्वतःचे जबाबदारी ओळखून काम करणे. काम म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करणे. अर्थ म्हणजे धन प्राप्ती आणि मोक्ष म्हणजे या सर्वांपासून मुक्ती  प्राप्त करायची. हे चारही जरुरीचे आहेत.
हाच पुरूषार्थ आहे.

प्रश्न: गुरुजीअसे म्हणतात कि बुद्धी, स्मरणशक्ती, आणि अहंकार सतत बदलत असतात. सर्वकाही स्वयंस्फूर्तपने बदलत असते आणि आपण यामध्ये कुठेच नसतो. कुणाला मुक्त व्हायचं आहे आणि कुणाला सीमीत राहायचे आहे?
श्री श्री : होय, हे सर्व बदलत आहे, पण हे सर्व कोण जाणते कि हे बदलते म्हणून ? तोच आत्मा आहे, जो साक्षी आहे.
हे सर्व जो  जाणतो तो सीमित राहतो. पण, जो हे जाणतो कि सतत जग हे बदलत आहे, पण मी काही बदलत नाही - मी हे नाही, मी फक्त साक्षी आहे या सर्वांचा. तेव्हा मुक्ती हि मिळालीच.

प्रश्न: गुरुजी, कृपया चंद्रग्रहण याबद्दल काही  सांगा आणि कोणती पथ्ये या काळात पाळायची. ग्रहणाच्या मध्ये  चंद्राकडे बघायचे  नाही असे म्हणतात, ग्रहणाच्या आधी काही तास जेवण खायचं नाही, नाहीतर अन्न पचत नाही. कृपा करून विस्ताराने सांगा.
श्री श्री : होय, तुम्ही उघड्या डोळ्याने चंद्रग्रहण बघू शकता. काही बंधन नाही. तो एक दिव्य सोहळा आहे. फक्त सूर्यग्रहण उघड्या डोळ्याने बघू नये. तुम्ही काही ठराविक काचेचे चष्मे घालून सूर्यग्रहण पाहू शकता कारण त्याची सूर्यकिरणे डोळ्याला हानिकारक असतात.
आपल्या पूर्वजांनी ग्रहणाच्या आधी  जेवा असा सांगायचे  कारण कि अन्न पचायला मदत होते आणि त्याकाळात ध्यान करता येते. ग्रहण चालू असताना तुम्ही नाम, ध्यान, आणि प्रार्थना करू शकता.त्याचे १०० पटीने जास्त महत्व असते. असे सांगितले आहे.
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच रेषेमध्ये असतात. आणि वैश्विक किरणे या सरळ रेषेमधून अशी वाहत असतात कि त्यामुळे साधना करत असताना अनेकविध परिणाम आपल्याला अनुभवता येतात.
म्हणून ग्रहण चालू असताना ध्यान करा, ओम नमः शिवाय किवा ओम नमो नारायणाय चा जप करा.ग्रहण चालू असताना जर तुम्ही १०८ वेळा जप केलात, तर १० हजार वेळा जप केल्याइतके सामर्थ्य आहे. 
हा काळ साधकासाठी मंगलदायक असतो. तो वाईट काळ नाहीये. तो  चैन, भोग, मजा यासाठी वाईट काळ आहे आणि ऐशोआरामासाठीही  वाईट आहे.

प्रश्न: गुरुजी, तुळस  वनस्पती पृथ्वीवर कशी आली. आणि ती कृष्णाला का प्रिय आहे?
श्री श्री:कारण आपण कसे पृथ्वीतलावर आलो, तसेच पृथ्वीवर पहिल्यांदा वनस्पती आल्या आणि आपल्याला पृथ्वीतलावर येण्यासाठी मदत झाली.
आपल्या देशामध्ये जे काही जीवन जगण्यासाठी पूरक आहे आणि जे प्राण-शक्ती वाढण्यासाठी  मदत करते, ते पवित्र मानले आहे. तुळस तसेच लिंबू सुद्धा पवित्र मानले आहे. कडीलिंब  सुद्धा खूप पवित्र मानले आहे. रोगसंसर्गा पासून मुक्तता मिळविण्यासाठी लिंबू आणि नीम खूप उपयुक्त आहेत.
देवी या सर्वामध्ये वास करते असा धृढ विश्वास आहे.
तुळस  हि छातीच्या भागासाठी उत्तम आहे जेथे विष्णूचा वास आहे. छाती हि संरक्षण करते आणि उपजीवन सुद्धा आणि त्यामुळेच असे  म्हणतात कि विष्णू आणि तुलसी यांचा विवाह झाला आहे. याचा अर्थ दोघांमध्येहि खूप जवळचे संबंध आहेत. तुम्हाला जर खोकला झाला  असेल तर तुम्ही तुळशी चा  काढा प्या.
तसेच बेलाची पाने तुमच्या चित्तासाठी  आणि शरीरातील चेतासंस्थेसाठी (nervous  system)  खूप छान आहेत. त्याच्यामुळे शांती मिळते. जर तुम्हाला पोटाच्या व्याधी असतील तर  बेलाची पाने खूप उपयुक्त आहेत. म्हणून असे लक्षात आले आहे कि , आपण जे जे पवित्र मानले आहे ते शरीराच्या कुठल्या न कुठल्या भागासाठी उपयुक्त आहेत.

प्रश्न: गुरुजी, कुणाचं सौंदर्य पाहणं ठीक आहे ना? हे एक शारीरिक आकर्षण नाही का?
श्री श्री:तुम्ही सर्व सुंदर वस्तू पाहता आणि इथली प्रत्येक वस्तू हि दैवी चमत्कार आहे. मग सुंदरता हि आपोआपच एक प्रार्थना बनते. हेच सौंदर्य लहरी आहे.
आदि शंकराचार्य यांनी खूप छान आणि सुंदर संस्कृत श्लोक  लिहिले आहेत. (सौंदर्य  लहरी म्हणून काव्यसंग्रह आहे). त्यामध्ये ते म्हणतात जे दृश्य आहे ते मला सर्व दैवी वाटते. त्या सुंदरतेच्या लहरी आहेत. ते त्यांना दैवी आविष्काराच्या आठवणी करून देतात.
तुम्ही जे सौंदर्य बघता ते तुम्हाला जर प्राप्त करण्याची इच्छा असेल तर मात्र  ती वासना.

प्रश्न: गुरुजी, युवकांना तुमचा संदेश काय आहे?
श्री श्री : हा देश तुमचा  आहे. जागे व्हा, तुम्ही त्याची काळजी आतापासून घ्या.

प्रश्न: गुरुजी, मनेजर   साठी  त्याच्या बरोबर काम करणाऱ्यांची  मनस्थिती कशीही असली तरी त्यांच्याकडून काम करून घेणे महत्वाचे आहे का त्यांचे सुखी असणे महत्वाचे आहे?
श्री श्री: त्याच्या सहकार्याकडून काम करून घेणे महत्वाचे आहे.
मन हे सतत बदलत असते. बेडकाला एका तराजू मध्ये वजन पाहायला ठेवले तर ते उडी मारतच राहते, तुम्हाला त्याचे वजन कधीच करता येत नाही कारण ते सतत उड्या मारत असते.

प्रश्न:  आत्मज्ञान प्राप्ती म्हणजे काय? एकदा आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर पुनर्जन्म आहे का?
श्री श्री: होय, ते निश्चित खर आहे आणि तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
नेहमी लोक चुकीच्या जागी असतात. त्यांना चहा किवा कॉफ्फी हवी असते व कापडाच्या दुकानात आपण त्यांना पाहतो. पण तुम्ही योग्य ठिकाणी आला आहातथोडा धीर ठेवा.

प्रश्न : जर एखादा  माणूस दैनंदिन व्यवहार उत्तम सांभाळत असेल, पण त्याच्याकडे करुणा, दया आणि सत्य या सर्वांचा अभाव असेल तर त्याला जीवनात किती महत्व आहे?
श्री श्री:  शून्य, त्याला काही अर्थ नाही. कोणताही मनुष्य या तिन्हीशिवाय कृती करूच शकत नाही.
आपल्या देशामध्ये आपल्याला पूर्वजांनी या गोष्टी शिकवल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.
हि जीवनाची महत्त्वाची  मूळ सूत्रे आहेत.
तुम्ही तुमच्या प्रगतीकडे पहा, दुसर्यांच्या  नाही.
कोणी जर करता काही चूक करत असेल, तर तुम्ही तुमच्याकडून चूक सुधारण्यासाठी काही मदत करता आली तर करा. मदत  करत राहा आणि सेवा करत राहा.
बाकीच्यांवर  चिखलफेक करून काही फायदा नाही. नाही तर तुम्ही भगवान कृष्णाला, भगवान रामाला, भगवान बुद्द्धाला आणि  सर्व जणांना दोष देत राहाल.  तुम्ही जर करता दुसर्यामधील चुका शोधत राहिलात तर तुम्हाला चुकाच दिस्त्तील.
समोरच्यामधील चांगुलपणा  आणि त्यांच्यातील दैवी गुण बघा, हे गुण सर्व माणसांमध्ये  असतात. त्याबद्दल विचार करा.
मी दुसर्या माणसामधील  दैवी गुण वाढण्यासाठी कशी मदत करू शकेन याचा विचार करा.
अन्यथा , आपली मनोवृत्ती नकारात्मक बनेल आणि हे सर्व जग वाईट आणि दुष्ट लोकांनी भरले आहे असे वाटू लागेल.
त्यापेक्षा, असा विचार करा या जगामध्ये सर्व चांगले आणि प्रेमळ लोक आहेत.
इथे वाईट लोक कमी आणि चांगले लोक खूप अधिक आहेत. सर्वांमध्ये चांगले पहा आणि तुमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी सर्वाना मदत करा.

प्रश्न: ऐकता आला नाही.
श्री श्री: जो पाहतो तो आत्मा  आणि जे त्याच्या पलीकडले आहे ते परमात्मा. जशी समुद्रामध्ये लाट. 
जेव्हा लाट हि शांत असते, ती समुद्रामध्ये असते. त्याचप्रमाणे, जेव्हा मन शांत असते तेव्हा ते परमात्म्याबरोबर असते.

प्रश्न: आम्हाला तुम्हाला तुमच्या कुटीरा पर्यंत  येऊन का भेटता येत येत नाही? मध्ये साखळ्या का घातल्या आहेत, अजून  अडथळा ?
श्री श्री : तो रस्ता जरी वेडावाकडा असला तरी तुम्ही थेट माझ्यापर्यंत येऊन पोहोचता.


The Art of living
© The Art of Living Foundation