भूतकाळाला
गाडून टाका आणि पुढे जा!
१९ डिसेंबर २०११
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणालात
कि हे वर्ष जगामध्ये मोठे बदल घडवून आणेल. मग आपण २०१२ च्या नवीन वर्षी जागतिक
ध्यानाचे आयोजन करायचे का? आपण हे वर्ष जगभर ध्यान करून सुरु करायचे का?
श्री श्री: का नाहि, आपण
करूयात.आपण जगभरात सर्वांनी ध्यान करण्यासाठी एक वेळ ठरवूयात.बघुयात कसे काय
करायचे ते.
प्रश्न: गुरुजी, कृपया मला सांगा सर्व विश्वाच्या
संदर्भामध्ये वेळ काय आहे?
श्री श्री: काळ हि एक मिती आहे, अवकाश हि एक मिती आहे,
चित्त हि एक मिती आहे आणि चित्त हे काळाशी जोडलेले आहे. मी काळाबद्दल खूप काही
बोललो आहे. ‘divineडीवाईन शॉप’ मध्ये ‘टाईम’ नावाचे
पुस्तक आहे.
प्रश्न: गुरुजी, द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये माझा
कायम गोंधळ होतो.मध्वाचार्य द्वैताबद्दल बोलले आहेत तर आदि शंकराचार्यांनी अद्वैतावर
भाष्य केले आहे. कृपया दोन्ही विस्ताराने सांगा.
श्री श्री : अद्वैत हे ‘भौतिकशास्तराप्रमाणे (quantum physics) तर द्वैत हे रासायानशास्त्राप्रामाने
आहे. रासायनाशास्त्रामध्ये तुम्ही म्हणता कि एवढी समसंगुये (isotopesisotopes)आहेत किंवा तुम्ही
आवर्तसारणी (periodic table) चा संदर्भ देता, जिथे सर्व
वेगवेगळी (element) विभागणी केलेली असते. पण जर तुम्ही
भौतिकशास्त्राचा (quantum physics) आधार घेतलात, तर ते म्हणतात ‘ हे
सर्व ‘तरंग फलन (wave function) आहे. भौतीकशास्त्राला
आवर्तसारणी माहित नाही.ते म्हणतात, ‘ सर्व काही फक्त अणु आहे., तारांगफलन (wave function)’. दोन्ही बरोबर आहे. रसायानशास्त्रामध्ये त्याचा
उपयोग आहे तर भौतीकशास्त्रामध्ये त्याची सत्यता आहे.
आदि शंकराचार्यांनी जे सांगितले ते अत्यंत तेजस्वी आहे आणि
मध्वाचार्य जे बोलले ते उत्कंठावर्धक आहे.
ते म्हणाले, ‘सर्व काही वेगवेगळया स्तरात असते आणि त्या
त्या स्तरात ते चांगले असते’. प्रत्यक्ष विचार केला तर मध्वाचार्यांनी प्रेम आणि
भक्ती वर जोर दिला आहे. प्रेमासाठी तुम्हाला ‘दोघांची’ गरज असते आणि भक्तीसाठी
तुम्हाला ज्याला समर्पण करायचे आहे त्याची, दैवी शक्तीची.
म्हणून मध्वाचार्यांनी म्हटले आहे,’ तमाचा सर्व त्रास आणि
प्रश्न समर्पण करा.’ शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘ अरे, जागृत व्हा आणि जाणा कि हे
सर्व म्हणजे ‘काहीच नाहीये’. हेच भगवान बुद्धांनीही सांगितले आहे.
प्रश्न: गुरुजी, असे म्हणतात कि आपण जेंव्हा रागात असतो, तेंव्हा
खोल श्वास घेतल्याने तुम्ही शांत होता. कृपया, रागामध्ये असताना हे लक्षात
ठेवण्याचा काही मार्ग सांगा.
श्री श्री : असे म्हणतात, ‘युद्ध
काले शस्त्राभ्यास’. जर तुम्ही युद्ध स्थळावर जाऊन मग धनुर्विद्या शिकायची ठरवलीत,
तर तोपर्यंत तुम्हाला १० बाण आधीच लागले असतील. साधना करत राहा आणि तुमची क्रोधाची
पातळी कमी होत जाईल. तुम्हाला राग आल्यानंतर काहीतरी करण्यात काहीच अर्थ नाही.जरी
मी तुम्हाला काही सांगितले, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला
त्यासाठी आधीच काहीतरी करावे लागेल.
प्रश्न: गुरुजी, मी जेंव्हा म्हाताऱ्या माणसांच्या शरीराकडे
बघतो, तेंव्हा मला खूप त्रास होतो.जरी म्हातारपण टाळता येणे शक्य नाहीये, तरीही
मला त्याचा त्रास होतो.मी काय करू?
श्री श्री: जेंव्हा अंतरंगातले सौंदर्य निखरून येते,
तेंव्हा तुम्ही जसजसे वृद्ध होत जाल तसतसे जास्त सुंदर दिसलं. त्याग, प्रेम आणि
सेवा, या ३ गोष्टीना आयुष्यात स्थान असले पाहिजे.महात्मा गांधींचे उदाहरण घ्या. जे
म्हातारपणी जास्त आकर्षक दिसायचे कि नाही?त्यांचे हास्य खूप सुंदर होते आणि
वृद्धापकालीसुद्धा त्यांच्यात सौंदर्य होते. सुंदरता हे अंतरंगातून प्रतीत होते,
ती बाह्य घटना नाही.
प्रश्न: गुरुजी, विष्णू शक्ती कशी वाढवावी?
श्री श्री: तमाची सहनशक्ती वाढवून. आता हि कशी वाढवायची? ते
मी तुम्हाला पुढील वर्षी सांगेन.
प्रश्न: गुरुजी, सर्व अध्यात्मिक मार्ग सांगतात, ‘ कि तुम्ही एकटे नाही.एक ईश्वरी शक्ती आहे जी तुमची काळजी घेत असते.’पण मग आफ्रिकेतल्या लोकांचे काय? त्यांना भूकेनी मरण्यासाठी एकटे का सोडून दिले आहे?
प्रश्न: गुरुजी, सर्व अध्यात्मिक मार्ग सांगतात, ‘ कि तुम्ही एकटे नाही.एक ईश्वरी शक्ती आहे जी तुमची काळजी घेत असते.’पण मग आफ्रिकेतल्या लोकांचे काय? त्यांना भूकेनी मरण्यासाठी एकटे का सोडून दिले आहे?
श्री श्री: जगात दैन्य-दुख्ख: का आहे, हा एक मोठ्ठा प्रश्न
आहे.
३ प्रकारची दुख्ख: आहेत.
१.
नैसर्गिक आपत्तींपासूनचे दुख्ख:
२.
स्वत:च्या अज्ञान आणि आळसाने आलेले दुख्ख: हे
मानवाचा करणीचे फळ आहे.
३.
कार्मप्राप्त दुख्ख:, कि ज्याचे मूळ कारण
तुम्हाला माहिती नसते. ते सध्याच्या काळाच्या चौकटीच्या बाहेर जाते. तुम्हाला
चैतन्याच्या वेगळ्या पातळीत जाऊन ते जाणून घ्यावे लागेल.सकृतदर्शनी त्याचे काहीच
कारण दिसत नाही. ते कुठेतरी भूतकाळात दडलेले असते.ते तुम्हाला खणून काढावे लागते.हे ३ प्रकार आहेत. हे सर्व काही टाळता येते आणि त्यावर
उपाययोजनाही करता येते.
प्रश्न: गुरुजी, भगवद गीतेमध्ये
म्हटले आहे ,’ सर्वारम्भा परीत्यागी यो मद्भक्ता: स मे प्रिय:’, - जो कोणत्याही
गोष्टींची सुरुवात करत नाही आणि जो कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही तो खरा भक्त
असतो. जर त्यांनी काहीच नवीन सुरुवात केली नाही तर, माणूस आयुष्यात प्रगती कसा
करेल?
श्री श्री: ‘मी’ काहीतरी नवीन
सुरुवात करत आहे, हे सोडून द्या. ‘माझ्याकडून हे होते आहे’, हे ज्याला लक्षात येते,
तो खरा भक्त. भक्त हे जाणतो कि, ‘ मी काहीही करत नाहीये, पण माझ्याकडून हे करवून
घेतले जात आहे.’ जो अशा रीतीने, द्रष्टाच्या (प्रेक्षकाच्या) भूमिकेत असतो तो भक्त
असतो आणि असा भक्त हा मला प्रिय आहे.
प्रश्न: गुरुजी, मी तुमच्याशी खूप वेळेला बोललो आहे आणि तुम्ही
सांगितले आहेत कि, ‘हि सर्व माया आहे, सोडून दे’.हि ‘माया’ काय आहे आणि ती मला
विनाकारण त्रास का देते आहे? मी आत्ता तुमच्याकडे बघतो आहे, हीसुद्धा माया आहे का?
आणि हे जे सर्व घडते आहे तीही मायाच आहे का? असे असेल, तर मग सत्य काय आहे?
श्री श्री: ही सर्व माया आहे. सत्य काय आहे, हे जाणण्याची
तुमची इच्छा हि सत्याच्या शोधाची सुरुवात आहे.इथूनच प्रवास सुरु होतो.कोणीतरी
म्हणाले कि ही सर्व माया आहे म्हणून नव्हे तर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे,
कारण तुम्हाला हे उमगले आहे कि, हे सर्व काही क्षणिक आहे. ‘मी ज्याच्या मागे धावत
आहे ते सर्व २ किंवा ३ मिनिटांसाठी राहणार आहे आणि नंतर ते नाहीसे होणार आहे.’
तुम्ही जेंव्हा हे जाणता, तेंव्हा तेंव्हा तुम्ही शहाणे
होता आणि जेंव्हा आपण शहाणे होतो, तेंव्हा आपण समाधानी असतो. जर समाधान असेल, तर
अनुभवास येते कि ‘आह, पूर्ण वेळ गुरुजी हेच मला सांगत होते.’
प्रश्न: गुरुजी,बायबल मध्ये
सांगितले आहे कि, तुम्हाला सत्य समजले पाहिजे आणि त्यामूळे तुम्हाला मुक्ती मिळाली
पाहिजे’.तरीही आयुष्यात खूप प्रश्नांबद्दल खूप खोटेपणा आहे. अशा जगात कोणी
ज्यामध्ये इतके असत्य, अन्याय, हिंसाचार आणि दुख्ख: आहे?
श्री श्री: जेंव्हा आपण असे
प्रश्न विचारतो, तेंव्हा आपण अज्ञान, मानवी मुल्यांची पायमल्ली आणि लोकांमधील
अध्यात्मिक कमतरता याकडे लक्ष वेधू शकतो.
जर का माणूस संवेदनशील असेल तर
जे त्याला लोकांनी त्याच्याशी वागू नये असे वाटते, तसे
तो कोणाशीही असे काही वागणार नाही. एखादा माणूस गुन्हा का करतो? कारण तो संवेदनशील नाही आणि तो माणुसकी विसरला आहे. तो राक्षस बनला आहे. पण हे राक्षसीपण कायमचे नाही.म्हणूनच मी म्हणतो, कि प्रत्येक गुन्हेगारामध्ये एक अन्यायाला बळी पडलेला माणूस आहे. जर तुम्ही त्याच्या जखमेवर फुंकर घातलीत, तर त्याच्यामधील गुन्हेगार नाहीसा होईल.अशाच ठिकाणी अंतरात्मा जागृत करण्याची, अध्यात्मिक प्रगतीची, चैतन्याचा स्तर उंचावण्याची गरज आहे. आपल्या मुलांना संगणकतज्ञ बनवणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये मानवी मुल्यांबद्दल आस्था निर्माण करायला हवी.
तो कोणाशीही असे काही वागणार नाही. एखादा माणूस गुन्हा का करतो? कारण तो संवेदनशील नाही आणि तो माणुसकी विसरला आहे. तो राक्षस बनला आहे. पण हे राक्षसीपण कायमचे नाही.म्हणूनच मी म्हणतो, कि प्रत्येक गुन्हेगारामध्ये एक अन्यायाला बळी पडलेला माणूस आहे. जर तुम्ही त्याच्या जखमेवर फुंकर घातलीत, तर त्याच्यामधील गुन्हेगार नाहीसा होईल.अशाच ठिकाणी अंतरात्मा जागृत करण्याची, अध्यात्मिक प्रगतीची, चैतन्याचा स्तर उंचावण्याची गरज आहे. आपल्या मुलांना संगणकतज्ञ बनवणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये मानवी मुल्यांबद्दल आस्था निर्माण करायला हवी.
आपल्यातल्या तरुणांना इतरांबद्दल
करुणा वाटली पाहिजे, त्यांनी हिंसाचाराचे उच्चाटन केले पाहिजे. आणि हे ते कधी करू
शकतात? जेंव्हा ते तणावमुक्त असतात तेंव्हा. जेंव्हा ते तणावाखाली असतात, ते हिंसक
बनतात.
हिंसेची २ कारणे आहेत : एक
म्हणजे तणाव आणि दुसरे म्हणजे अज्ञान किंवा चुकीची शिकवण.
प्रश्न: रशियाच्या सैबेरीअन कोर्टात भगवद गीतेबद्दल चुकीची
विधाने करण्यात आली आहेत. कृपया आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करा.
श्री श्री : रशिया मध्ये भगवद गीतेवर निर्बंध घालण्यासाठी
चळवळ सुरु आहे. हे अत्यंत दुर्दैवी आणि अयोग्य आहे.
कृष्णाने अर्जुनाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले
होते आणि ह्या पुस्तकामुळे अतिरेकी कारवायांमध्ये वाढ होईल, म्हणून काही लोक या
धर्मग्रंथावर निर्बंध घालायचा प्रयत्न करत आहेत. श्रीमत भगवद गीता वाचून कोणीही
अतिरेकी बनल्याचे एकाही उदाहरण ५००० वर्षांच्या इतिहासात नाही.महात्मा गांधी हे
गीतेचे चाहते होते आणि त्यांनी गीतेवर एक विवेचनही केले आहे. भगवद गीतेवर कमीत
कमीत १००० विवेचने तर नक्कीच असतील. आणि तुम्ही अधलामधला उतारा काढून वाचलात जिथे
सांगितले आहे कि, ‘ होय, युद्ध करा. अन्यायाविरुद्ध संघर्ष करा.’ आणि त्याला
अतिरेकी धर्मग्रंथ म्हटलेत, तर ते योग्य नाही.
तसे तर बायबल मध्ये येशुनेही म्हटले आहे कि, ‘ मी इथे शांतता प्रस्थापित करायला नाही तर आग लावायला आलो आहे. मी इथे वडिलांना मुलाविरुद्ध आणि आईला मुलीविरुद्ध उभे करायला आलो आहे.’
तसे तर बायबल मध्ये येशुनेही म्हटले आहे कि, ‘ मी इथे शांतता प्रस्थापित करायला नाही तर आग लावायला आलो आहे. मी इथे वडिलांना मुलाविरुद्ध आणि आईला मुलीविरुद्ध उभे करायला आलो आहे.’
म्हणून तुम्ही त्याला अतिरेकी ग्रंथ म्हणू शकत नाही.
कुरण मधेही अशाच आशयाच्या पंक्ती आहेत, ‘ जर कोणी अश्रद्ध
असेल, तर त्याची बोटे तोडा.’ कुराणमध्ये २५ पंक्ती आहेत ज्या अश्रद्ध
लोकांसाठीच्या शिक्षेबद्दल सांगतात.म्हणून तुम्ही या पौराणिक ग्रंथांना ‘अतिरेकी
ग्रंथ’ म्हणून निर्बंध घालू शकत नाही.
लोकांची विचारांची दिशा, इतरांबद्दल असहिष्णुता हा आतंकवाद
आहे. असहिष्णुता हे आतंकवादाचे मूळ आहे, मग तो कोणताही धर्म असो. जर लोकांमध्ये
असहिष्णुता असेल, तर ते मोठे होऊन अतिरेकी बनतील. आपण त्याला वेळीच आळा घातला
पाहिजे. धर्मग्रंथांवर बंदी घालून जगात काही चांगले होणार नाही. खरे तर लाखो लोक
आणि आईनस्टाईन सारखे विख्यात शास्त्रज्ञ
सुद्धा भगवद गीतेने प्रेरित झाले होते. त्याने म्हटले आहे,’जेंव्हा मी भगवद गीता
वाचली, तेंव्हा माझ्या संपूर्ण आयुष्यात परिवर्तन झाले’.
म्हणून जर असे निर्बंध घातले तर रशिया च्या जनतेचे नुकसान
होईल. मला खात्री आहे भारत सरकार याबद्दल कडक धोरण आखेल. फक्त १.२ अब्ज लोकच
नाहीत, तर इतर धर्मियातालाही बराच मोठा वर्ग भगवद गीतेचा चाहता आहे. असे असताना,
भारताबरोबर चांगले संबंध असलेल्या सरकारने अशी पावले उचलू नयेत.
प्रश्न: गुरुजी, मला तुम्ही नैराश्यातून बाहेर काढाल का?
प्रश्न: गुरुजी, मला तुम्ही नैराश्यातून बाहेर काढाल का?
श्री श्री : असे होऊच शकत नाही
कि तुम्ही सत्संग मध्ये आहात आणि निराश आहात.बऱ्याचदा असे होते कि तुम्ही
मानसोपचार तज्ञांकडे जाता आणि ते तुम्हाला सांगतात कि तुम्हाला ‘नैराश्य’ आले आहे
आणि नंतर ते तुमच्याही मनात घर करून बसते कि मला नैराश्य आले आहे. जे कायमस्वरूपी
नाहीये, त्याला तुम्ही घट्ट धरून बसता आणि म्हणता कि, ‘हो, मला नैराश्य आले
आहे’.जेंव्हा लोकांना माणसाच्या बुद्धीबद्दल, मनाबद्दल आणि ध्यानधारणा किंवा मानवी
चैतन्याबद्दल, नीट माहिती नसते आणि मानासोपाचाराच्या नावाखाली सल्ले देतात,
तेंव्हा हे खूप घातक आहे. हे अत्यंत त्रासदायक आहे. मानसोपचार तज्ञांमुळे आई-वडील
आणि मुलांमधले संबंध खराब झालेले मी पाहिले आहेत. आधी मुलाचे आपल्या आईवडिलांबरोबर
खूप चांगले संबंध होते आणि मानसोपचार तज्ञांकडे जाऊन काही समुपदेशन झाल्यांनतर काहीतरी
झाले आणि नंतर तो आपल्या आई-वडिलांचा द्वेष करू लागला.
इथे आश्रमामध्ये मागच्या दीड महिन्यापासून एक उद्योगपती
होते , ते पार पॅरीस हून आले होते. यांना निद्रानाशाचा त्रास होता.खूप औषधपाणी
केले. सर्वसाधारणपणे, झोपेसाठी डॉक्टर १० मिलीग्राम चा डोस देतात. हे १५०
मिलीग्राम घेत होते, नेहमीच्या १० पट जास्त. ते झाम्बि सारखे दिसायचे आणि त्यांना
भीतीची भावना (panic attack) येत असे. त्यांचे शारीरिक आणि मासिक संतुलन
पूर्णपणे बिघडले होते.मी त्यांना सांगितले, “आता मी सर्व औषधे बंद करणार आहे.” आणि तसेच केले. पण ते म्हणाले, ‘ मला झोप येणार नाही.’
इथले डॉक्टर्स, प्रशिक्षक सर्वांनी त्यांच्यावर उपचार केले. नंतर ते जोरजोरात घोरत
होते. तुम्ही जेंव्हा घोरता, तेंव्हा तुम्ही गाढ झोपेत असता. ४ तास घोरल्यानंतर ते उठून बसले आणि म्हणाले, ‘मला
झोपच लागली नाही. मला निद्रानाश आहे.’
त्यांच्याजवळच्या डॉक्टरांनी मला सांगितले कि, ‘ गुरुजी, ते जोरजोरात घोरत होते.’ पण या सद्गृहास्थांच्या डोक्यात पक्के बसले होते, कि मला निद्रानाश आहे आणि मला औषधे घ्यायलाच पाहिजेत.त्याशिवाय मी झोपूच शकत नाही’.
त्यांच्याजवळच्या डॉक्टरांनी मला सांगितले कि, ‘ गुरुजी, ते जोरजोरात घोरत होते.’ पण या सद्गृहास्थांच्या डोक्यात पक्के बसले होते, कि मला निद्रानाश आहे आणि मला औषधे घ्यायलाच पाहिजेत.त्याशिवाय मी झोपूच शकत नाही’.
कधीकधी तुम्हाला वाटते, कि डॉक्टर हेच बरोबर असतात. डॉक्टर
सांगतात, ‘ हि गोळी घे, तुला बरे वाटेल’. तुम्ही साखरेची गोळी घेता आणि म्हणता,
‘खरच, हे फारच प्रभावी आहे.’ एक साखरेची गोळी तुमची डोकेदुखी पळवून लावू शकते.’ जर
डॉक्टरांनी सांगितले,’ तुम्हाला नैराश्य आले आहे’, तुम्ही तेच धरून बसता. तुमचे मन
हे वाहत्या नदीसारखे आहे, प्रत्येक क्षणी बदलणारे.म्हणूनच बुद्धाने म्हंटले
आहे, ‘तुमचे चित्त हे प्रवाही नदीसारखे
आहे.’
पूर्वजांनी चैतन्याचा अभ्यास करून म्हटले आहे, ‘तुम्ही एकाच
नदीमध्ये दोनदा डुबकी मार शकत नाही.’ म्हणून, असे समजू नका कि तुम्ही अधिसारखेच
नंतर आहात.तुमचे मन हे सतत बदलत असते.
तुम्ही या क्षणात जगा, आत्ता, आत्ता, आत्ता ! भूतकाळाला
गाडून टाका आणि पुढे चला. कुठे आहे नैराश्य? तुम्ही निराश आहात कारण तुम्ही
भूतकाळाला पकडून ठेवले आहे किंवा तुम्ही अति महत्त्वाकांक्षी आहात. तुमच्यात एक
शाळा चालवण्या इतकीच पात्रता आहे पण तुम्हाला देशाचे पंतप्रधान बनायचे आहे.
जेंव्हा तुम्हाला वाटते कि हे अप्राप्य आहे, तेंव्हा तुम्हाला नैराश्य येते. भूतकाळाला
धरून बसू नका किंवा भविष्याबद्दल अति महत्वाकांक्शीही असू नका.
प्रश्न: गुरुजी, मे जे काही करतो त्यामध्ये अपयशी ठरतो. मी
हे कसे मोडून काढू?
श्री श्री: प्रत्येक अपयश कि यशाची पहिले पायरी असते, हे
लक्षात ठेव. आणि व्यवहारी राहा.
२ कारणांमुळे अपयश येते,
१. तुमचे खूप उच्च
विचार आहेत, पण ते कृतीत येत नाहीत.मग अपयश येते.
२. तुम्ही सर्व प्रयत्न
करता, पण विचार करत नाही कारण तुम्ही ध्येयाने किंवा एका विशिष्ट फळाच्या
अपेक्षेने भारले गेले असता आणि तुम्ही परिणामांचा सर्वांगीण विचार करत नाही.
तुमच्याकडे लवचिकता नसते, ताठरपणा असतो.त्यानेही अपयश येते.
एकतर फारसा विचार न करता तुम्ही कृती करता किंवा काहीच कृती
न करता खूप विचार करता, त्यामुळे अपयश येते. कधीकधी आपण नुसतेच बसून दिवास्वप्न
बघतो, पण प्रत्यक्षाचा विचार करत नाही. तुमचे स्वप्न आणि वास्तविकता यांची सांगड
घाला.तुम्हाला जर वास्तविकतेचे भान असेल आणि तुमची स्वप्न त्याच्याशी जोडता येत
असतील, तर अपयश कमी येईल, नाहीतर असेच चालू राहील.

© The Art of Living Foundation