जो स्वतः आपल्या अंतरंगातील आवाज ओळखून वागतो तो खरा योगी
बंगलोर, डिसेंबर २०११ 

प्रश्न: गुरुजी, मला एखाद्या गोष्टीचे प्रकर्षाने आकर्षण असेल तर काय करू? अशा गोष्टींपासून स्वतःला कसे आवरायचे किवा यामधून कसे बाहेर यायचे

श्री  श्री : हे युद्धामध्ये धनुर्विद्या शिकण्यासारखे आहे
जेव्हा एखाद्या क्षणी आकर्षण वाटते, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुमचा प्रत्येक विचार हा भावनेच्या भरात केलेला असतो
भावना त्या क्षणी विचार प्रणालीपेक्षा शक्तिशाली असतात. पण तुम्हाला जेव्हा खरोखरच वाटते कि हे बरोबर नाही, आपण  जेव्हा स्वतःच प्रतिकार करतो, तेव्हा त्या आपोआपच  थांबतात
ते कार चालवण्यासारखे  आहे, तुम्हाला जेव्हा ब्रेक दाबावा असे वाटते  तेव्हा तुम्ही ब्रेक  दाबू शकता
अशा प्रकारची  इच्छाशक्ती निर्माण करायला हवी. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमची दृष्टी व्यापक करायला हवी.  तेव्हा तुम्हाला वाटणारी आकर्षणे कमी होत जातील आणि नंतर नाहीशी होतील

प्रश्न : गुरुजी, मी स्वतःलाच कसे बलवान बनवू कि ज्यामुळे लोकांच्या गैर वर्तणुकीचा माझ्यावर प्रभाव पडणार नाही

श्री श्री : सर्वात प्रथमतुम्ही कमकुवत आहात असे समजू नका. तुम्ही कमकुवत आहात असे जे विचार करता, तेथेच समस्या आहे
तुम्ही मागे वळून भूतकाळात पहा, तुम्ही आधी किती कमकुवत होता आणि  तुम्ही आता किती बलशाली बनला आहात. आज तुम्ही जे आहात त्याकडे लक्ष द्या, तुम्ही आधीपेक्षा जास्त शक्तिशाली बनला आहात

प्रश्न : कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करता कसे काम करत राहायचे
श्री  श्री : गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे, "अनाश्रीत: कर्मफलं  कार्म्याम कर्म  करोति  :". 
ज्याची वृत्ती सदैव समतोल असते, ज्याची वर्तमानातील कृती  त्याच्या भूतकाळातील कर्मांवर आधारित नसते, तो खरा योगी.  
अनाश्रीत: ’, म्हणजे जो प्रतिक्रिया देत नाही तो
तुम्ही जाणता कि आता जे काही आहे ते सर्व आपल्या पूर्व कर्माचे फळ आहे. तुम्ही हे जेव्हा जाणता आणि त्वरित जागे होता, आणि विचार करता किठीक आहे, मी आता माझा भूतकाळ  पाठीमागे सोडून देतो. आज मी वेगळा आहे. मी आता सर्व नवीन सुरुवात करणार आहे.' तेव्हा तुम्ही समतोल होत जाता
तुम्ही तुमची मागचे सर्व सोडा, हे विसरून जा कि तुम्ही इंजिनीर किवा डॉक्टर किवा  वाणिज्य  पदवीधर आहात. तुम्ही हि सर्व  शीर्षके बाजूला ठेवा, आणि तुम्ही जे काही करत आहात ते सुद्धा  बाजूला ठेवा. तेव्हा खडबडून जागे होता आणि तुम्ही त्याक्षणी एक नवीन व्यक्ती असता. समजा, तुम्हाला उद्या दुसऱ्या ग्रहावर नेऊन सोडले. तुम्ही त्या ग्रहावर आहात आणि तुम्ही तुमचे सर्व मागचे पदवी, सोबती, सर्व सोडून दिले आहे

आता जागे व्हा! आत्ता, याक्षणी, इथे फक्त 'मी ' आहे !

ह्या जाणीवेने  प्रचंड उर्जा मिळते जिच्यामुळे समतोल राहणे शक्य होते.

तुम्ही जे भूतकाळातील विचार घेऊन जगत होता ते सर्व गेले आहे. तुम्ही जे काही ऐकले आहेबघितले आहे याबद्दलची  किवा भविष्यात कल्पलेल्या गोष्टींची लालसा नाहीशी होते आणि तुम्ही फक्त या क्षणामध्ये संपूर्ण जगात असता!

आपल्याला असे म्हणता येईल कि, आज जे काही आपल्या हातात आहे ते सर्व पाठीमागच्या कर्माची फळे आहेत. तुम्ही डॉक्टर आहात कारण तुम्ही वैद्यकीचा  अभ्यास केला आहे. तुंम्ही इंजिनिअर  आहात, कारण भूतकाळात इन्जिनिअरिन्ग चा  अभ्यास केला आहे. म्हणून जर आज  तुम्ही नाखूष आहात, तर ते तुमच्या भूतकाळातील  कर्मामुळे
म्हणून पाठीमागील सर्व विसरून जाणे आणि आता याक्षणी जगणे यालाअनाश्रीत: ’,असे म्हणतात
मी असे म्हणत नाहीये कि सर्व तुमची पूर्व कर्मे खोडून काढा आणि तुमच्या कर्माची फलेसुद्धा. ते शक्य नाहीये. तुम्ही कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही. आपले शरीर हे पूर्व कर्माचे फळ  आहे. आपले मन हे पूर्व कर्माचे फळ आहे. आपली बुद्धी  हे पूर्व कर्माचे फळ आहे. आणि आपला अहंकार, शरीर, मन सर्व काही आपल्या पूर्व जन्माचे  फळ आहे

त्यावर अवलंबून राहता, आपल्या अंत:स्फुर्तीमधून एखादी गोष्ट केली असता, अंतर्मुख होऊन, नवीन विचारनवीन कार्य करणे  म्हणजेच संन्यासी किवा योगी असणे होय. तुम्हाला जर तसे वागता आले तर एक दिवशी तुम्ही योगी बनाल, तुम्ही वाकबगार आहात आणि तुम्ही याक्षणी कार्यरत  आहात

तुम्हाला जर कोणी दोष दिला असेल, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत याआधी काही झालेच  नाही असेच तुम्ही त्यांना सामोरे जाता आहात ,त्यांच्याशी  बोलत आहातहे झाले 'मागील  कर्मावर आधारित नसणे'  

जर तुमच्या भूतकाळात तुम्हाला कोणी दाद दिली असेल आणि तुम्ही उपकृत असता त्यांची दाद परत करण्यासाठी. हे झालेपूर्व कर्मावर आधारित असणे' . 
पूर्व कर्मांवर आधारित नसणे म्हणजे, ' आज, आत्ता,  जसे आहे तसे कर्मफळ स्वीकार करणे'. आत्ता, याक्षणी! हे सर्वात कौशल्यपूर्ण आहे
हे सांगणे सोपे आहे आणि करणे अवघड. मला माहिती आहे ते थोडेसे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही

प्रश्न : गुरुजी, हिंदू धर्मामध्ये पती आणि पत्नी यांचे जन्माचे नाते असते असे सांगितले आहे. मला कसे कळेल कि मी सध्या कोणत्या जन्मात आहे म्हणून

श्री  श्री : तुम्ही जरकरता आता प्रेमात असाल तर, हा तुमचा पहिला जन्म आहे. आणि तुम्ही अजून जन्म पुढे एकत्रितपणे जगणार आहात. तुम्हाला जरकरता या नात्याचा कंटाळा आला असेल तर असे समजा कि हा सात जन्म पूर्ण झाले आहेत आणि हा शेवटचा आहे

हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही निर्णय घ्या हा कितवा जन्म आहे. किवा विचार करा कि ना इथे ना तिथे, कुठेतरी मध्यभागी

प्रश्न : गुरुजी, अस म्हणतात कि जर सरकारने शेतकीय क्षेत्रामध्ये आणि शेतकिय उपजिविकेवर अवलंबून असण्यारवर ठोस पावले उचलली नाहीत तर, जागतिक बँकेच्या अहवालानुसार विकसनशील देशामध्ये उदा: भारत, आफ्रिका, या देशामध्ये २०१५ पर्यंत अन्न साम्रग्रीची कमतरता भासू शकतेयाकालामध्ये असे दिसते कि बरीच कुटुंबे ग्रामीण भागातून शहरी भागात वास्तव्यासाठी जात आहेत. गुरुजी, तुमचं सरकारला आणि लोकांना काय उपदेश /  सल्ला आहे.?
श्री  श्री  : आपण परत शेतीकडे वळले पाहिजे. लोकांनी शेती केली पाहिजे. माझा असा  सल्ला आहे कि, जे शेतकीय विज्ञान घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी परत शेतीकडे वळावे आणि परत जास्त अन्न उत्पादन करावे. ते खूप जरुरीचे आहे
त्यासाठीच आश्रमामध्ये आम्ही शेतकीय व्यापार विषयक अकॅडेमी सुरु केली आहे
म्हणून शेतकी हा सुद्धा एक व्यापार आहे, आणि विद्यार्थ्यांनी हे शेती विषयक ज्ञान जाणून घेणे आवश्यक आहे जेणेकरून जगामध्ये ऊर्जित शेती व्यापार कसा येईल

चीनने बरीच एकर जागा आफ्रिकेमध्ये घेतली आहे आणि  ते चांगले उत्पादन तिथे घेत आहेत. आपण चीनकडून शिकले पाहिजे, बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे चांगले शेतीमध्ये उत्पादन कसे घ्यायचे ते
मी इथिओपिया या देशामध्ये होतो आणि मला असे सांगण्यात आले कि इथिओपिआमधे  खूप जमीन आहे म्हणून. तिथे काही भारतीय लोकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत आणि आफ्रिकन देशामध्ये सुद्धा. ते तिथे पामची झाडे आणि अजून अशीच काही झाडे वाढवत आहेत.  

म्हणून आपण इथे अन्नाचे उत्पादन वाढविले पाहिजे. प्रत्येकाने पहिले पाहिजे कि कसे भाजीपाला किवा इतर लहान मोठी पिके कशी घेता येतील. प्रत्येकाने शेतीमध्ये छोटे मोठे काहीतरी उत्पादन केले पाहिजे

प्राचीन आध्यत्मिक भारतामध्ये, शेती हा एक आपला अंगभूत भाग होता. कोणतीही पूजा किवा संस्कार करताना काही बीजे रोऊन 'अन्कुरर्पणकरीत असत
तुम्ही जर चंडी हवन पहिले असेल तर पहिल्यांदा काही बीजे  पेरली जातात, आणि कोंब  आले  कि आपण इतर उत्सव करतो.  
म्हणून हे खूप महत्वाचे आहे कि लोकांनी खूप धान्य पिकविले पाहिजे. आज, सर्वजण खेडी सोडून शहरामध्ये जात आहेतशेती करणे हे खूप खूप महत्वाचे आहे

प्रश्न : जेंव्हा इतर  लोक आर्ट ऑफ लिविंग कोर्स  करतात, त्यांच्याबद्दल मला मत्सर, हेवा, किवा असूया वाटते,  यामधून बाहेर कसे यायचे?
श्री  श्री  : तुम्ही लोकांना आर्ट ऑफ लिविंग कोर्सेसबद्दल सांगा . ते जेव्हा कोर्स करतील आणि तुम्हाला धन्यवाद देतील, तेव्हा तुम्हाला अजून खूप छान वाटेल. आणि परत तुम्हाला अजून जास्त करावेसे वाटेल
जर लोकांनी तुमच्याकडे येउन धन्यवाद दिले की  'तुमच्यामुळे आम्हाला या कोर्सेबद्दल माहिती मिळाली आणि माझे संपूर्ण जीवन बदलून गेले', तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला मत्सर, वाटेल का? कसे शक्य आहे तुम्हाला मत्सर निर्माण होणे?
तुम्ही कोर्सेसमध्ये लोकांना जर आणत नसालतर तुम्हाला  मत्सर वाटेल
खासकरून जवळचे  मित्र  जर खुश असतील आणि आनंदी असतील आणि वर खाली उड्या मारत असतील, तर मत्सर  वाटण्याचे कारण नाही
जर तुम्हाला मत्सर  वाटत असेल तर तुमच्या मानसिकतेमध्ये काहीतरी  चूक आहे

तुम्ही दुसरयांच्या  आनंद मानायला हवा  आणि त्यांच्या दुखामध्ये सहभागी असले पाहिजे

आर्ट ऑफ लिविंग हे लोकांच्या जीवनामध्ये कितीतरी आनंद आणते. कृपाकरून जागे व्हा आणि इतर लोकांना कोर्सेस मध्ये घेऊन या आणि तुमच्या जीवनामध्ये बदल पहा

प्रश्न : महिला असणे हे जीवनामध्ये शिक्षा आहे का
श्री  श्री  : नाही, कोण म्हणते असे? पुरुष स्त्रीशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक पुरुष हा स्त्रीपासून जन्मलाय
 त्यामुळे  ते दोन्हीबाजुनी  आहे.  स्त्री पुरुषा शिवाय राहू शकत नाही. त्यासाठीच प्रकृती आणि पुरुषार्थ हे  उत्पत्तीचे मुलभूत अंग आहेत
तुम्ही कसे म्हणू शकाल कि एक पाप आहे किवा चांगला नाही?  नाही, ते चुकीचे आहे


प्रश्न : गुरुजी, माणसाच्या मुलभूत गरजा शिक्षण, अन्न, आणि निवारा जगामध्ये सर्वाना मिळेल याची आम्ही कशी  खात्री करून घ्यायची? असे किती तरी लोक आहेत कि जे या मुलभूत गरजेव्यातिरिक्त राहत आहेत

श्री  श्री  : तुम्हाला नक्की हे माहित करून घेतले पाहिजे की माणसाच्या फक्त इतक्याच गरजा नाहीत
या मुलभूत गरजा कशाही भागविल्या जातात. पण प्रत्येकालाच यापेक्षा अजून काहीतरी हवे असते. आता ते तुम्ही ठरवायचे आहे कि काय मुलभूत गरजा आहेत म्हणून
(माणसाच्याअन्तरंगामधे शांति  हि अति महत्वाची आहे
तुम्हाला सर्व मुलभूत गरजा आहेत आणि तुम्ही आजारी असाल तर, तुम्ही बौद्धिकदृष्ट्या कणखर नसाल, तर ते चांगले आहे का?  
तुम्हाला जर  चांगले अन्न दिले आणि पचनशक्ती बरोबर नसेल तर? तुम्हाला चांगला बिछाना दिलाय आणि तुम्हाला निद्रानाश असेल तर, तुम्हाला झोप येणार नाही. तुमच्यापाशी सर्व काही संपत्ति आहे पण तुमच्याजवळ मित्र नसतील तर, तुमचा परिवार  नसेल तर, तुमच्याजवळ उत्साह नसेल तर आणि प्रेम  नसेल तर, तुम्ही जीवनामध्ये काय कराल?    

जीवनामध्ये प्रत्येकाची  स्वतःची  अशी  स्वतंत्र जागा असते आणि तिची जाणीव ठेवली पाहिजे

प्रश्न : सदैव नकारात्मक कंपने असलेल्यंशी कसे वागायचे? कि त्यांना टाळायचे
श्री  श्री : अस विचार करू नका कि कोणीतरी प्रत्येकवेळी सदैव नैराशेमध्ये, नकारात्मक असतो म्हणून. प्रत्येकामध्ये काहीना काहीतरी चांगुलपणा असतो. तुम्हाला तो चांगुलपणा कसा वाढविता येइल याकडे लक्ष द्या




The Art of living
© The Art of Living Foundation