लक्षात ठेवा, आत्ताच्या या क्षणात तुम्ही निर्दोष आहात !
११ डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, जेंव्हा आपण या ज्ञान मार्गावर असतो तेव्हा आपण समाधानाची सीमा कशी ओळखावी ?श्री श्री श्री: मनाला कोणतीही परिसीमा नाही. जेंव्हा एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा मन पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करत नाही जसे, तुम्हाला छत्री हवी असेल आणि ती तुम्हाला मिळाली, तर तुम्ही परत छत्री चा विचार कराल ? जो पर्यंत छत्री मिळत नाही तो पर्यंत तुमचे मन ती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. जेंव्हा एखादी इच्छा पूर्ण होते तेव्हा मन पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करत नाही, ही मनाची स्वाभाविक वृत्ती आहे. मन असेच एका इच्छे वरून दुसरया इच्छे वर जाते. या ज्ञान मार्ग वर तुम्हाला जे हवे आहे ते आपोआप तुम्हाला मिळेल.

प्रश्न: असे म्हटले जाते कि गुरु, तुमच्यातील अयोग्य गोष्टी (नकारात्मकता) गोळा करतो. आम्ही आमचे विचार, भावना आणि काळजी तुम्हाला देतो. तुम्ही त्याचे काय करता? तुम्ही कसे आहात?
श्री श्री : गुरु हा अयोग्य गोष्टी जमा करत नाही तर तो त्या संपूर्णपणे काढून टाकतो, जसे कि अज्ञान. मी ह्या गोष्टींचे काय करतो याची काळजी तुम्ही का करता ?तुम्ही फक्त त्या मला द्या आणि आनंदी राहा. मला माहित आहे त्याचे काय करायचे. मी तुम्हाला कसा वाटतो ? मजेत, बरोबर?

प्रश्न: जर सरकारची तयारी असेल, तर तुम्ही सरकार साठी सल्लागार होण्याचा विचार कराल काय?
श्री श्री: होय, तुम्ही सगळे मिळून असे सरकार बनवण्या साठी प्रयत्न करू शकता. मी सल्ला देत असतो, पण पण काही लोक लागलीच तो ऐकत नाहीत, नंतर ऐकतात. पण ते हि चांगले आहे.

प्रश्न: उगवता सूर्य आणि दोन हंस यांचा "आर्ट ऑफ लिविंग" च्या लोगो मधील अर्थ काय आहे ?
श्री श्री : जेंव्हा विशालाक्षी मंडप बांधत होते, तेव्हा मुंबई मध्ये एका सत्संगा मधे कोणीतरी २ हंस आणले होते ते त्याने इकडे आणले आणि ठेवले. जेव्हा हंस आणले तेव्ह्ना त्यांच्या साठी पाणी हवे, म्हणून मग कारंजे बांधले. नंतर कोणीतरी इथे नंदी आणला, त्यांनी तो अमेरिकेत एका देवळा साठी आणला होता पण तो तिथे पोहोचू शकला नाही, तो त्यांनी इथे आणला. पुढे कोणीतरी एक गरुड आणला. एक टन चा गरुड इंडोनेशिया वरून आणला. मला नंतर लक्षात आले की ही तीनही "वाहने" आपोआप गुरु पीठा समोर आली आहेत. हे सर्व दैवी इच्छा ने झाले आहे, नाहीतर कोणीतरी इथे हंस का आणेल ? याचा अर्थ गुरु तत्व हे पाणी, जमीन आणि आकाश मार्गे प्रवास करून तुमचे रक्षण करते. तुमच्या आयुष्यात जे बदल गरजेचे आहेत ते होऊ शकतात. यांना इथे आणण्या मागे काहीतरी निश्चित कारण आहे. आम्ही ते इथे आणण्याचा कधी विचार केला नाही. एका मागोमाग एक ते इथे येत गेले, याचा अर्थ या पीठात सत्य आहे.

प्रश्न: मला नेहमी नकारात्मक विचार येतात. मी कितीही संयम ठेवला तरी ते वाढतच जातात
श्री श्री : निदान 'तुम्ही त्यांच्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर ते वाढतात', हे तुमच्या लक्षात आले आहे. संयम ठेवण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यांचा स्वीकार करा.

प्रश्न: आज काळ घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. नात्यांमध्ये सुसंवाद असण्यासाठी काय करावे?
श्री श्री: सगळ्यांना "आर्ट ऑफ लिविंग" चा कोर्स करू दे. पती आणि पत्नी यांनी एकत्र कोर्स करावा. फक्त एकदा नाही तर ३ महिने किंवा ६ महिन्यांत एकदा करावा. तुम्हाला कळेल की सगळा कडवटपणा निघून जाईल आणि सेवेची भावना जागृत होईल. जर तुम्ही सेवेत आणि आनंदोत्सवात मग्न असाल तर तुम्हाला भांडणाचा वेळ कधी मिळेल?

प्रश्न: गुरुजी, कृपया कर्मयोग, भक्ती योग आणि ज्ञान योग बद्दल काही सांगाल का? कोणता मार्ग आम्ही निवडावा?
श्री श्री : तुम्हाला काय आवडते. (उत्तर: भक्ती)
तुम्हाला कसे माहिती कि तुम्हाला भक्ती आवडते? ज्ञानामुळे.
आता तुम्हाला एकदा लक्षात आले कि तुम्हाला ते आवडते, मग तुम्ही शांत बसाल का?
तुम्ही ते प्राप्त करायचा प्रयत्न कराल. हा झाला कर्म योग. म्हणजेच एकाबरोबर दुसरेही आपसूकच येतात.

प्रश्न: जेंव्हा आपण सत्संगामध्ये असतो, तेंव्हा चित्त स्थिर आणि शांत असते. पण परत गेल्यानंतर, चित्त विचलित होते. असे का होते ?
श्री श्री: हे स्वाभाविक आहे. हे तुम्हाला परत परत सत्संग मध्ये येण्याची आठवण करून देण्यासाठी आहे. जेंव्हा तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत eअसता, तेंव्हा चित्त त्याप्रमाणे बदलते. जेंव्हा तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत असता, तेंव्हा चित्त स्वाभाविकपणे त्या दिशेने जाते.

प्रश्न: असे म्हणतात, कि गुरूच्या मार्गदर्शनाखालीच योगमार्गावर चालावे. एकलव्याप्रमाणे शिकणे शक्य आहे का, ज्याला द्रोणाचार्यांकडून दीक्षा मिळाली नाही पण त्याने तरीही त्यांना गुरु मानले होते?
श्री श्री: हो, शक्य आहे. एखादी गोष्ट तुम्ही गुरूंकडून शिकल्यानंतर त्यांचा फक्त फोटोसुद्धा पुरेसा आहे.

प्रश्न: मी CD च्या माध्यमातून शिकू शकतो का?
श्रीश्री : नको, प्रथम शिक्षकाकडून शिका. नंतर तुम्ही स्वत:चे स्वत: करू शकता. तुम्ही ध्यान CD द्वारे शिकू शकता, पण सुदर्शन क्रिया नाही. म्हणूनच ध्यानाच्या खूप CD उपलब्ध आहेत.

प्रश्न: मी तुमच्या पुस्तकांमध्ये वाचले आहे कि राधा कृष्णापेक्षा वयाने बरीच मोठी होती आणि विवाहिताही होती. राधा आणि कृष्ण यांचे प्रेम हा एक आनंदोत्सव आहे. हे एका विवाहित स्त्री साठी योग्य कसे?
श्री श्री: त्या काळामध्ये हे स्वीकारार्ह होते. द्रौपदीला सुद्धा स्वीकारले होते.
स्थलकालानुसार कायदे बदलतात. म्हणूनच द्वापार युगातले कायदे आज लागू होत नाहीत. युवतींची छेंडा छेडी त्या काळी मान्य होती, पण आज तो गुन्हा आहे.
प्रत्येक युगातील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. प्रत्येक युगात प्रश्न होतेच. इतिहासामध्ये प्रत्येक काळात काही कमतरता होत्याच.

प्रश्न: जेंव्हा मी ध्यानासाठी बसलो असतो, तेंव्हा जाणता अजाणता माझ्याकडून घडलेल्या चुकीच्या गोष्टी मला फार त्रास देतात.
श्री श्री : ते सर्व काही समर्पण कर. हे अनुभव कर कि तुमची काळजी घेण्यासाठी मी इथे आहे. तुझ्या सर्व चिंता सोडून दे आणि शांत हो.
लक्षात ठेव, आत्ताच्या या क्षणात तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही पूर्वी काही चुकीचे केले असेल, पण विश्वास ठेवा कि, या क्षणात तुम्ही निर्दोष आहात.

The Art of living
© The Art of Living Foundation