प्रत्येक वेळेला जेंव्हा तुम्ही संभ्रमित असता तेंव्हा तुम्ही एक पायरी वर चढता.
२ जानेवारी २०१२
प्रश्न: आपल्या
भावना वयाशी निगडीत आहेत का?
श्री श्री:होय. त्या शरीरातील संप्रेरक (हार्मोन) शी निगडीत आहेत, तसेच त्या वेळ, वय आणि इतर अनेक गोष्टींशी जोडलेल्या आहेत.
प्रश्न:गुरुजी, तुम्ही माझ्या शहरात कधी येणार?
श्री श्री: ओह, मला मी कधी येणार विचारू नका. माझ्या कडे वेळ सोडून सगळे
भरपूर आहे. मला खूप ठिकाणी जायचे आहे पण वेळ खूप कमी आहे. मी बऱ्याच ठिकाणी खूप दिवसात
गेलो नाही. मी आफ्रिकेला खूप दिवसात गेलो नाही. मी इंग्लंडला गेल्या ५ वर्षात गेलो
नाही. मला गाझा ला जायचे आहे, मी पोर्तुगाल ला
कधीही गेलो नाही, युक्रेन ला कधी गेलो नाही. मला या खूप ठिकाणाहून आमंत्रण
आहे.दक्षिण अमेरिकेतून, ते रोज विचारतात. काय करणार ?
प्रश्न:(श्रोत्या मधून कोणीतरी माईक न घेता उस्फुर्तपणे प्रश्न
विचारला. प्रश्न नीट ऐकू आला नाही )
श्री श्री: निदान कधी कधी लोलक थांबतो तरी, आणि जेंव्हा तो थांबतो तेंव्हा किती छान वाटते. म्हणूनच तुम्ही इथे आहात, नाही का? मन तीव्र इच्छा आणि विमुखता या मध्ये डोलत असते, आणि नंतर विमुखता आणि तीव्र इच्छा या मध्ये.मनाला कधीतरी विश्रांतीची गरज असते.म्हणूनचया सगळ्या गोष्टी (साधना, ध्यान) करण्याने मनाला शांतता मिळते. ज्ञानाने हळूहळू तुम्ही प्रथम विमुखता आणि नंतर तीव्र इच्छा या पासून मोकळे होता.
प्रश्न:(श्रोत्या मधून कोणीतरी माईक न घेता उस्फुर्तपणे प्रश्न विचारला. प्रश्न नीट ऐकू आला नाही )
श्री श्री: आपल्या शरीरात संवेदना अगोदरच आहेत. प्रत्येक सुखद विचाराशी एकसंवेदना, आणि प्रत्येक कटू विचाराशी सुद्धा एक संवेदना निगडीत असते.त्यामुळे जेंव्हा तुम्ही संवेदनाकडे लक्ष देता तेंव्हा कटू संवेदना नाहीशा होतात आणि सुखद संवेदना वाढतात.
प्रश्न: माझ्या नकारात्मक भावना मी कशा हाताळू ?
श्री श्री: सुदर्शन क्रिया हा नकारात्मक भावना हाताळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.उज्जयी श्वास, प्राणायाम, ध्यान, हे सगळ काम करत. करते की नाही ?!!!
प्रश्न: गुरुजी, मला कायम आळशी असल्यासारखे का वाटते?
श्री श्री: तुम्हाला कायम आळशी वाटू शकत नाही. जर काही आकर्षण (उत्साह)असेल तर आळस दूर होईल. जर दूरदृष्टी असेल तरीही आळस दूर होईल. जर साखर कमी असेल किंवा डी जीवनसत्व कमी असेल तर आळस येतो. आळस येण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. आळस येण्यासाठी अन्न हे मुलभूत कारण आहे.
प्रश्न: गुरुजी, आत्मे कुठून येतात ?
श्री श्री: हे सगळे ग्रह कुठून येतात? ही फुले कुठून येतात? प्राणी कुठून येतात? तुम्ही कुठून आलात? विश्वात इतक्या प्रकारची माणसे, इतकी फुले, फळे, इतके प्राणी, खूप प्रकारचे डास, विषाणू. हे एक अदभूत विश्व आहे, बरोबर ?!
प्रश्न:मला अजून आत्मविश्वास कसा मिळेल?
श्री श्री: तुम्ही अगदी योग्य जागी आहात. आसने, प्राणायाम, ध्यान या गोष्टी करत राहा, त्याने आत्मविश्वास वाढेल.
श्री श्री: निदान कधी कधी लोलक थांबतो तरी, आणि जेंव्हा तो थांबतो तेंव्हा किती छान वाटते. म्हणूनच तुम्ही इथे आहात, नाही का? मन तीव्र इच्छा आणि विमुखता या मध्ये डोलत असते, आणि नंतर विमुखता आणि तीव्र इच्छा या मध्ये.मनाला कधीतरी विश्रांतीची गरज असते.म्हणूनचया सगळ्या गोष्टी (साधना, ध्यान) करण्याने मनाला शांतता मिळते. ज्ञानाने हळूहळू तुम्ही प्रथम विमुखता आणि नंतर तीव्र इच्छा या पासून मोकळे होता.
प्रश्न:(श्रोत्या मधून कोणीतरी माईक न घेता उस्फुर्तपणे प्रश्न विचारला. प्रश्न नीट ऐकू आला नाही )
श्री श्री: आपल्या शरीरात संवेदना अगोदरच आहेत. प्रत्येक सुखद विचाराशी एकसंवेदना, आणि प्रत्येक कटू विचाराशी सुद्धा एक संवेदना निगडीत असते.त्यामुळे जेंव्हा तुम्ही संवेदनाकडे लक्ष देता तेंव्हा कटू संवेदना नाहीशा होतात आणि सुखद संवेदना वाढतात.
प्रश्न: माझ्या नकारात्मक भावना मी कशा हाताळू ?
श्री श्री: सुदर्शन क्रिया हा नकारात्मक भावना हाताळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.उज्जयी श्वास, प्राणायाम, ध्यान, हे सगळ काम करत. करते की नाही ?!!!
प्रश्न: गुरुजी, मला कायम आळशी असल्यासारखे का वाटते?
श्री श्री: तुम्हाला कायम आळशी वाटू शकत नाही. जर काही आकर्षण (उत्साह)असेल तर आळस दूर होईल. जर दूरदृष्टी असेल तरीही आळस दूर होईल. जर साखर कमी असेल किंवा डी जीवनसत्व कमी असेल तर आळस येतो. आळस येण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. आळस येण्यासाठी अन्न हे मुलभूत कारण आहे.
प्रश्न: गुरुजी, आत्मे कुठून येतात ?
श्री श्री: हे सगळे ग्रह कुठून येतात? ही फुले कुठून येतात? प्राणी कुठून येतात? तुम्ही कुठून आलात? विश्वात इतक्या प्रकारची माणसे, इतकी फुले, फळे, इतके प्राणी, खूप प्रकारचे डास, विषाणू. हे एक अदभूत विश्व आहे, बरोबर ?!
प्रश्न:मला अजून आत्मविश्वास कसा मिळेल?
श्री श्री: तुम्ही अगदी योग्य जागी आहात. आसने, प्राणायाम, ध्यान या गोष्टी करत राहा, त्याने आत्मविश्वास वाढेल.
प्रश्न:गुरुजी, देवाने हे जग बनवले, पण देवाला कोणी बनवले?
श्री श्री: मी या
प्रश्नाचे उत्तर देईन, पण प्रथम मला सांगा टेनिस चेंडूचा प्रारंभिक बिंदू कोणता? आपले विचार एकरेषेय आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीची कुठेतरी सुरुवात असली पाहिजे आणि कुठेतरी शेवट.
काहीतरी सुरुवात होते आणि कशाचा तरी शेवट. त्यामुळे या उत्पतीची सुरुवात झाली आणि
ते एक दिवस संपणार.यालाच एकरेशाय (एकांगी) विचार महणतात.
पण पूर्वेकडे एकरेशाय
(एकांगी) विचार नाहीत, तर गोलीय (सर्वांगी) विचार आहेत. असे मानतात ३ गोष्टी
कोणीही बनवल्या नाहीत, आणि त्या कधीही मरणार नाहीत. कोणत्या गोष्टी ?
दैवी शक्ती
(उर्जा), तुम्ही त्याला देव म्हणू शकता. त्याला कोणीही बनवले नाही, आणि तो कधीही संपणार नाही, जसे अवकाश. अवकाशाचा प्रारंभ बिंदू कोणता आणि शेवट कुठे हे तुम्ही सांगू शकता
का? नाही !! त्याच प्रमाणे या विश्वाचा आशय (पदार्थ). हे विश्व 'अनादी' म्हणजे सुरुवात नसलेले आणि 'अनंत' म्हणजे शेवट नसलेले आहे. तसेच आत्मा आणि जीवन यांना सुरुवात
आणि शेवट नाही. त्याचा शेवट झाला असे फक्त वाटते, पण ती परत सुरुवात असते. हे समुद्राच्या लाटेसारखे आहे, एक लाट येते आणि ती संपल्यासारखी वाटते, पण ती परत येते. तेच पाणी जाते आणि परत येते. म्हणून
आत्म्याला सुरुवात आणि शेवट नाही, देव, दैव यांना सुरुवात, शेवट नाही आणि या विश्वालाही सुरुवात आणि शेवट नाही.वास्तविक या तीनही गोष्टी
एकच आहेत.
त्यामुळे तुम्हाला
देवाला पाहायचे असेल तर हे जग पाहायचे सोडून द्यावे लागेल.
तुम्हालामाहित आहे
कोणासारखे? एका प्रमात्र (quantum) संशोधकासारखे. जर प्रमात्र (quantum) संशोधकाला एका
फुलाकडे बघायला सांगितले तर तो म्हणेल की पाने, फुल आणि खोड यात काही फरक नाही कारण ते सगळे अणु पासून बनले आहेत. ते वेगळे नाहीत, सगळे सारखे आहेत. फुलाच्या कोणताही एका बिंदू कडे पहिले तरी
चालेल.याच प्रमाणे एक प्रमात्र (quantum) संशोधक म्हणतो की
तुमचा DNA शोधूनकाढण्यासाठी तुमच्या लाळेचा एक थेंबही पुरेसा असतो, त्वचेचा एक चिमुट तुकडाही पुरेसा आहे. हे सगळे सारखे आहे, असे संशोधक म्हणतील.
हेच प्रमात्र (quantum) सायन्स आहे. पण दुसऱ्या बाजूला पाकळ्या या खोड नाहीत, आणि खोड पाने नाहीत ते वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला जर
देव बघायचा असेलतर बस, हे संपूर्ण विश्व एक उर्जा स्वरूप बघा.
प्रश्न: जे लोक
आपल्याला आवडत नाहीत त्यांच्यावर प्रेम कसे करावे?
श्री श्री: ओह, मला
याचा अनुभव नाही पण तरीही मी याचे उत्तर द्यायचं प्रयत्न करतो! त्यांच्यावर प्रेम
करायचा प्रयत्न करू नका, त्यांचा तिटकारा करणे बंद करा. आता कल्पना करा त्यांच्यात
हे गुण का आहेत; शिकवण नसल्यामुळे. ते सुद्धा या जगात एक लहान मुल म्हणून आले,
तुमच्या सारखे आनंदी म्हणून. पण त्यांचात ह्या नकारात्मक भावना का आहेत, चांगली
पार्श्वभूमी नसल्यामुळे, शिकवण नसल्यामुळे, खूप असुरक्षितता यामुळे, बरोबर.
जर कोणी वाईट,
उन्मत्त असेल तर ते असुरक्षित असल्यामुळे. त्यांना आयुष्यात प्रेम न मिळाल्यामुळे.
जर कोणी लालची असेल, तर ते असुरक्षित आणि भीतीमुळे. भीती कश्यामुळे वाटते? कारण
प्रेम नाही. जेंव्हा तुम्ही त्यांच्यात या नकारात्मक भावना बघता त्या योग्य
शिकवणीअभावी असतात. त्यांना अध्यात्माची जाण नसते, आयुष्यात प्रेम नसते आणि मन
संकुचित असते.
त्यामुळे प्रथम
तुम्ही त्यांचा तिटकारा करणे थांबवा. ठीक आहे.हे सत्य आहे. एखादा माणूस असा का
आहे, किंवा क्रूर का आहे? एखादा माणूस हिंसक का आहे? कारण ते खूप तणावाखाली असतात,
आणि संकुचित वृत्तीचे. ते मोठा विचार करू शकत नाहीत. आणि कारण काय? अध्यात्माचा
आणि शिकवणुकीचा अभाव. त्यांना हि संधी दिली गेली नाही. त्यांना प्रेम, अहिंसा,
आनंद याची शिकवण दिली गेली नाही, बरोबर !
त्यामुळे त्यांचे मन
आणि हृदय बंद होते. तुम्हाला जेंव्हा हे कळेल तेंव्हा तुम्ही त्यांचा तिटकारा करणे
थांबवाल. आणि पुढची गोष्ट तुम्हाला कणव वाटेल ‘ओह, बिचारा’ !
त्यांच्याकडे
आयुष्याकडे आणि इतरांकडे बघण्याची दृष्टी नाही. ते सतत चुकीचे आडाखे बांधतात,
इतरांबद्दल चुकीचे विचार करतात, वाईट वागतात आणि इतरांना दुखावतात. जेंव्हा
तुम्हाला कळेल कि या सगळ्या गोष्टी त्यांच्या वागण्याला कारणीभूत आहेत तेंव्हा
तुम्हाला त्यांची कणव येईल.
त्यामुळे
त्यांच्यावर प्रेम करायचा प्रयत्न करू नका, त्यांचा तिटकारा करू नका, त्यांच्या
बद्दल कणव असू द्या. त्या नंतर तिसरी पायरी म्हणजे आपोआप तुम्हाला सगळ्यावर प्रेम करण्यावाचून
पर्याय नाही. जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर त्याच्या वर प्रेम करायची स्वतःवर
जबरदस्ती करू नका. तुम्हाला हे करायची गरज नाही.
प्रश्न: जेंव्हा
तुम्ही चिंता आणि भीती या चक्राच्या अवस्थेतून जात असता, तेंव्हा त्यातून बाहेर
पडण्याचा उत्तम मार्ग कोणता?
श्री श्री: फक्त
तुमचा अनुभव. ‘ठीक आहे मी यातून अनेक वेळेला गेलो आहे, अजून एकदा’ ही गोष्ट
तुम्हाला वेदानाहीन करेल. हे वरचे वर होत राहिले तर तुम्हाला याची सवय होईल.
आपल्यातील लालच,
अधिकारवृत्ती, आक्रमकता यामुळे ही वेळ येते. जर तुम्ही समाधानी, आनंदी आणि संयमित
असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. तुम्हाला कुठे जायची आणि काही हस्तगत करायची
जरुरी नाही, गोष्टी तुमच्या कडे येतील. तुमच्या लक्षात येतय, मी काय म्हणतो आहे ?
म्हणूनच या जगाला ‘माया’ असे म्हणतात. तुम्हाला ‘माया’ म्हणजे काय माहित आहे?
जेंव्हा तुम्ही जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करता तेंव्हा ते लांब पळते. जर
तुम्ही स्थिर, शांत आणि संयमित असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या कडे येतील. म्हणूनच
मी अगदी पहिल्यापासून सांगत आलो आहे, जर तुम्ही आनंदच्या पाठी लागलात तर दैन्य
तुमच्या पाठी लागेल आणि जर तुम्ही ज्ञानाच्या मागे लागलात तर मौज (आनंद) तुमच्या
मागे येईल.
प्रश्न: संघटीत
प्रयत्नाचे मूळ काय आहे?
श्री श्री: संघटीत
प्रयत्नाचे मूळ लोकांना जसे आहेत तसे स्वीकारण्यात आणि आपला होरा ताकदीने पुढे न
रेटण्यात आहे. कधी समजूतदारपाने घ्या, नाहीतर तुम्ही समूहात काम करू शकणार नाही.
खुलेपणाने आणि समजुतीने घ्या.
प्रश्न: जर तुम्ही
कर्माच्या फळाशी संलग्न नसाल, तर तुम्ही लोकांना कसे सोडून देऊ शकता? हे
माझ्यासाठी एक कोडे आहे.
श्री श्री: जर
तुम्ही कर्माच्या फळाशी संलग्न असाल, तर तुम्हाला त्याची कडकड (चिंता) वाटेल.
शेतकरी काय करतो माहित आहे? तो जमीन नांगरतो आणि बियाणे पेरतो. तो रोज प्रत्येक बी
उचलून ती उगवालीय का याची चिंता करत नाही, नाहीतर ती कधीच उगवणार नाही. त्यामुळे
तुम्हाला जेंव्हा आत्मविश्वास असेल तेंव्हा तुम्ही स्वतःला कर्माच्या फळाशी जोडत
नाही.
याचा अर्थ उदासीनता
नाही, तुमच्या लक्षात येताय मी काय म्हणतो आहे?
शेतकरी बियाणे पेरतो
आणि घरी येऊन छान झोपतो. त्याला काळजी नसते की सगळे बी गायब होईल, किंवा उगवणारच
नाही. तसे झाले तर तो घरी जाणारच नाही, तो तिथेच बसून ते बी उगवण्यची वाट बघेल. तो
रोज माती उकरून बघेल कि ते उगवालेय कि नाही. त्याने काहीही होणार नाही.
त्यामुळे शेतकरी हे
उत्तम उदाहरण आहे. तो शेतात दाणे पेरतो आणि घरी जाऊन छान झोप काढतो. नंतर तो येऊन
बघतो छान फुले आली आहेत, सूर्यफुले उमलली आहेत. याला थोडा वेळ लागतो ती दुसऱ्या
दिवशी येत नाहीत. पण तो जेंव्हा दुसऱ्या महिन्यात येऊन बघतो काही दाणे उगवालेत,
काही नाही, म्हणून काय!! त्याने जर १ किलोग्राम बी पेरले तर ते सगळेच उगवणार नाही,
बरोबर. त्याने तो रडत बसत नाही ‘काही दाणे उगवलेच नाहीत’. जे फुलांमध्ये उमलले
आहेत त्यांचा तो आनंद घेतो.
प्रश्न: गुरुजी,
धर्म आणि कर्म यात काय फरक आहे?
श्री श्री: धर्म हा
तुमचा स्वभाव आहे आणि कर्म हे कर्तव्य. समजा स्वयंपाक हा तुमचा स्वभाव आहे, किंवा
शिकवणे का तुमचा स्वभाव आहे, किंवा लोकांना मदत करणे, उद्योग करणे, हा तुमचा धर्म.
तुम्ही आयुष्यात जे करता त्याची क्रिया म्हणजे तुमचे कर्म.
प्रश्न: गुरुजी, मी
जेंव्हा तुमचा विचार करतो, तेंव्हा मला तुमचे स्वप्न पडते. मला जेंव्हा तुमचे
स्वप्न पडते तेंव्हा तुम्ही माझ्या बद्दल विचार करत असता का?
श्री श्री: ओह, शक्य
आहे !! उद्या किंवा परवा आपण ५ प्रकारच्या स्वप्नांबद्दल बोलू.
प्रश्न: मी जेंव्हा
डोळे बंद करतो तेंव्हा मला दृष्टांत येतात.
श्री श्री: येऊ देत,
काही काळजी नाही.
प्रश्न: एखाद्याला
बेसिक कोर्स करायला कसे सांगावे, जेंव्हा मला माहित आहे कि ते त्याच्या साठी
चांगले आहे.
श्री श्री: होय, मला
हि माहित नाही !
तुम्ही त्याला कसे
समजून सांगायचे याच्या वेगवेगळया मार्गाचा विचार करा. खूप काही समजून न सांगणे उत्तम,
फक्त सांगा कि हे चांगले आहे आणि हे कर. २ वाक्य पुरेशी आहेत. ‘हे खूप चांगले आहे,
मी केले आहे आणि तुही कर, मी तुला हे काय आहे हे सांगणार नाही’. श्वास कसा चांगला
आहे, आणि फक्त श्वास घेतल्यामुळे तुम्ही जिवंत आहात वगैरे समजावण्यापेक्षा याने
कुतूहल निर्माण होईल. लोकांना जरी माहित असले कि हे त्यांच्या साठी चागले आहे तरी
ते करत नाहीत. पण जेंव्हा तुम्ही सांगता कि ते चांगले आहे आणि आश्चर्यकारक, ते आश्चर्य
त्यांना पकडून ठेवते. त्यामुळे त्यांना सांगा ‘यात काही आश्चर्यकारक आहे, मी फार काही सांगणार नाही फक्त जा आणि
करा’. त्यामुळे मनाला कुतूहल वाटते, आणि ते शोधायचा प्रयत्न करतात.
त्यामुळे आपण सगळे
हेच करू, बेसिक कोर्स बद्दल काहीही समजावून सांगू नका, कि तुम्ही काय केले. तुम्ही
फक्त आश्चर्य तयार करा ‘मी काहीतरी आश्चर्यकारक केले आहे, आणि ते खूप मस्त आहे,
तुम्ही ही करा’
मग ते विचारतील ‘काय
आहे? मला सांगा!!’ पण तुम्ही सांगा ‘मी सांगू शकत नाही, तुम्ही ही करा’ ते परत
विचारतील ‘कृपा करून सांगा’, त्यांना सांगा ‘मुळीच नाही, मी सांगू शकत नाही, हे
सांगणे खुपच अवघड आहे, तुम्ही ही करा, खुपच मस्त आहे’
प्रश्न: शारीरिक
वेदना आणि मनाचा संबंध आहे का?
श्री श्री: शारीरिक
वेदना आणि मन यांचा नक्कीच संबध आहे. माहित आहे का, कारण जेंव्हा तुम्ही झोपता
किंवा भूल दिलेल्या अवस्थेत असता तेंव्हा तुम्हाला काही जाणवत नाही. जेंव्हा
तुम्ही झोपता तेंव्हा तुम्हाला काही जाणवत नाही. झोपेत तुमचे मन काम करत नाही. भूल
देताना ते तुमच्या चेतासंस्थेत काही खंड टाकून मनाला काही जाणवू देत नाहीत, बरोबर.
त्यामुळे वेदनेच्या व्यवस्थेत मनाचा कार्यभाग असतो. जे डॉक्टर वेदनेच्या
व्यवस्थापनात पारंगत आहेत ते सांगतात की मन, श्वास, ध्यान ह्यांचा यात खूप महत्वाचा
कार्यभाग आहे.
प्रश्न: जेंव्हा
मनाची कवाडे ज्ञान घेण्यासाठी बंद असतील, तेंव्हा अविश्वास आणि खूप चिंता यांचे
काय करावे?
श्री श्री: जेंव्हा
तुम्ही एखाद्या गोष्टीची सतत छाननी करता तेंव्हा तुम्ही आधीच त्यातून बाहेर पडला
आहात. जेंव्हा तुम्ही म्हणता कि मी खूप निवाडा करतो याचाच अर्थ तुम्ही त्यातून
अगोदरच बाहेर पडला आहात, समजले. वय, अनुभव आणि ध्यान यामुळेच तुम्ही त्यापेक्षा
मोठे होता. मागे वळून बघा, ५ वर्षपूर्वी तुम्ही किती निवडा करत होता आणि आज तुम्ही
कसे आहेत. यात खूप फरक आहे, बरोबर?!
प्रश्न: ध्यान
करताना, काहीही न विचार करणे हा उद्देश असावा का?
श्री श्री: बरोबर.
तुम्ही फक्त दिलेल्या सूचना पाळा आणि तुम्हाला ध्यानाचा चांगला अनुभव येईल. तुम्ही
काहीही विचार करायचा अथवा कशावर लक्ष्य केंद्रित करायचा प्रयत्न करू नका, फक्त
बसा.
प्रश्न: करुणा
म्हणजे काय ?
श्री श्री: ओह, जर
तुम्हाला हे माहित नसेल, तर ते कळण्याचा काही मार्ग नाही. तुम्हाला ते माहित आहे,
तुम्हाला फक्त करुणेची व्याख्या हवी आहे, आणि करुणा ही कुठल्याही व्याखेच्या
पलीकडे आहे. त्यामुळे मी तिची व्याख्या करू शकत नाही.
प्रश्न: मी तुमचे
पुस्तक वाचले ज्यात तुम्ही म्हंटले आहे ‘जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला
निर्णय घ्यायचा आहे, तर तुम्ही संभ्रमित आहात’ मी अजूनही संभ्रमित आहे, काय करू?
श्री श्री: होय, जर
तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तर तुम्ही संभ्रमित आहात, आणि तुम्ही
निर्णय केलेला नाहीत. जर तुम्ही निर्णय केला असेल, तर ‘तुम्हाला निर्णय करायची गरज
आहे’ असे तुम्ही म्हणणार नाही. जर तुम्ही म्हणताय ‘मला भूक लागलीय’, याचाच अर्थ
तुम्ही खाल्ले नाही. जर तुम्ही खाल्ले तर तुम्ही भुकेले असणार नाही, बरोबर. माझे
काम तुम्हाला समजावणे नाही तर संभ्रमित करणे आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही संभ्रमित होता तेंव्हा तुम्ही एक पायरी वर
चढता, त्यामुळे चांगले आहे.
प्रश्न: तुम्ही आज म्हणालात, कि तुमच्या कडे वेळ सोडून सगळे
अगदी भरपूर आहे. मी हे कसे हाताळू?
श्री श्री: ओह, मला माहित नाही. मला तुम्हीच सांगा मी हे
कसे हाताळू? माझ्याकडे वेळ नाही, मला सगळीकडे यायला सांगितले आहे. माझे २०१२ चे
कॅलेंडर संपले आहे, सगळे वर्ष संपले आहे, तारखा संपल्या आहेत. फक्त मीच नाही तर
आपल्या काही शिक्षकांच्या २०१३ च्या पण संपल्या आहेत. ते माझ्या एक पाउल पुढे
आहेत. आपल्या काही स्वामी आणि ऋषींचे २०१३ चे कॅलेंडर पूर्ण व्यस्त आहे. काय
करणार?!
प्रश्न: मी हे ठरवण्याचा प्रयत्न करतो की अंतर्स्फुर्ती कोणती आणि मनाचे खेळ कोणते?
श्री श्री: जे योग्य होते ती अंतर्स्फुर्ती, तुम्हाला
थांबावे आणि पहावे लागेल.
प्रश्न: मौन म्हणजे काय?
श्री श्री: (गुरुजी काही सेकंद शांत राहिले).... समजले?!

© The Art of Living Foundation