जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकत नाही !
५ डिसेंबर २०११
प्रश्न : गुरूजी, मला कधी कधी मी सर्वसामान्य गोष्टी मधे माझा वेळ घालवतो असे वाटते, जसे डिग्री मिळवणे , नोकरी, लग्न आणि मुले. मला या जगा साठी काही तरी करायचे आहे. पण त्याच बरोबर मला माझे आई-वडील आणि माझ्या जीवन साथी यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.
श्री श्री : होय, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घ्याची आहे आणि समाजा साठीहि काही तरी करायचे आहे. पण या गोष्टी परस्पर विरोधी आहेत असे तुम्ही समजत असाल, तर तुम्ही एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाही. प्रथम हे समजुन घ्या की या दोन गोष्टी परस्पर विरोधी नाहीत. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमची पत्नी, मुले यांची जबाबदारी घेउन तुम्ही या ज्ञानाचा प्रसार, धर्म या सारखी सामाजिक जबाबदारी सुद्धा घेऊ शकता. तुम्ही हे दोन्ही करू शकता.
जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला आपले आयुष्य १००% समर्पित करायचे असेल तर फारच छान. तुम्ही प्रवास करू शकता आणि समाजाची काळजी घेउन काहीतरी भव्य-दिव्य करू सकता.
प्रश्न : गुरूजी, मला कधी कधी सेवा, सत्संग आणि ज्ञान यांचा कंटाळा येतो. माझ्यात काही कमी आहे का, मी योग्य मार्गावर आहे ?
श्री श्री: या मार्गात (योग) ९ प्रकारच्या अडचणी येतात, मी पतंजलि योग सूत्रात त्या बद्दल बोललो आहे. व्याधि, स्त्याना, समस्या , प्रमाद , आलस्य , अविरति , भ्रान्ति दर्शन , अलब्ध भूमिकात्व आणि अनावास्थितात्त्व . या ९ अडचणी आहेत. शारीरिक रोग, मानसिक शिथिलता , मनात या मार्गा बद्दल संशय , आणि कशात रस न वाटणे . या सगळ्या तात्कालिक अडचणी कुठल्या ही साधकाला येतात. पण समर्पित वृत्ती, एकाग्रता याने तुम्ही या सगळ्या अडचणींवर मात करू शकता. अशा अडचणी येतात आणि जातात , यात विशेष काही नाही. तुमच्या पैकी अनेक लोकांना हा अनुभव आला असेल . कधी कधी अजिबात ध्यान करावेसे वाटत नाही आणि नंतर चांगले ध्यान लागते किंवा कधी खूप संशय मनात येतात आणि एक दिवस ते सगळे संशय निघून जातात.
प्रश्न: गुरुजी, 'मी सगळीकडे आहे आणि तरी कुठेही नाही, आणि कुठेही नाही तरीही सगळीकडे आहे' ही काय धारणा आहे ?
श्री श्री: Hollow and Empty ! (पोकळ आणि रिकामा). विनाप्रयात्न विश्राम. "मी" या सृष्टी पासून वेगळा आहे हा अहंकार आहे. यानेच पूर्णत्वाची भावना येत नाही.
प्रश्न: गुरुजी, मी माझ्या कृती च्या परिणामा पासून वेगळा कसा राहू शकतो ?
श्री श्री: जेव्हा तुम्ही तुमच्या भूत काळातील सर्व कृती समर्पित करता आणि त्यांचा परिणामांना सामोरे जायची तुमची तयारी असते. जर मी काही तरी चोरी केली आणि म्हणालो 'होय, मी चोरी केली आहे, मला जी काही असेल ती शिक्षा द्या, मी शिक्षेला तयार आहे' यालाच समर्पित वृत्ती म्हणतात.
मी चोरी केली पण मला शिक्षा नको, ही समर्पित वृत्ती नाही. जर तुम्ही शिक्षा भोगायला तयार असाल आणि शिक्षा देणारा जर म्हणाला 'मी तुला शिक्षा देणार नाही' तर तो तुम्हाला तुमच्या कृती पासून मुक्त करतो. जर तुमच्या हातून काही कृती (वाईट) घडली असेल आणि त्याचे परिणाम तुम्ही भोगले असतील तर त्याच्या वरचा उपाय म्हणजे काही तरी चांगली कृती, त्यालाच प्रायश्चित्त म्हणतात.
जर मी कमी जास्त बोललो ज्याने कोणाला वाईट वाटले असेल तर मी गुरूंनी सांगितल्यानुसार , ज्या माणसाला माझ्या मुळे वाईट वाटले असेल त्याने सांगितल्यानुसार किंवा माझ्या स्वयंस्फुर्तीने प्रायश्चित्त करीन.
'मी काही लोकांना आनंदी करीन, काही चांगले काम करीन'.
प्रश्न: गुरुजी, भगवत गीतेत कृष्णा ने म्हटले आहे "अनन्याश्चीन्ता यंतो मम ये जन परी उपासते तेषां नित्य भी युक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम" याचा अर्थ काय ?
श्री श्री : जो केवळ माझा आणि माझाच विचार करतो, जो मला त्यांच्या मनात आणि हृदयात ठेवतो, त्याला मी मुक्त करतो, त्याच्या जवळ जे आहे त्याचे रक्षण करतो आणि त्याला ज्याची गरज आहे ते देतो.
प्रश्न: गुरुजी, मंगळसूत्राचे महत्त्व काय आहे? ते लग्नानंतर कधीही काढू नये असे का म्हणतात? ते नाही घातले तरी चालेल का?
श्री श्री : एकदा मी प्यारीस विमानातालाहून येत असताना, विमानात चढत होतो. एक महिला माझ्याकडे आली आणि तिची अंगठी मला दाखवून म्हणाली, ' हि घालणे आवश्यक आहे का?'
मी तिच्याकडे बघून म्हणालो, 'नाही, आवश्यक नाही, तू अंगठी नाही घातलीस तरी चालेल'. माझ्यासाठी ती फक्त एक अंगठी होती. पण ती परत गेली आणि तिच्या पतीला तिने घटस्फोटाचे पत्र पाठवले. तिच्या पतीने मला e-mail पाठवली कि, 'गुरुजी, तुम्ही माझ्या बायकोला माझ्यापासून घटस्फोट घ्यायला सांगितला का?
मी म्हणालो, "मी असे काहीच केले नाहीये, तिला फोन दे". त्यावर ती म्हणाली, "गुरुजी, विमानतळावर तुम्हाला विचारले, कि अंगठी घालणे आवश्यक आहे का, तर तुम्ही नाही म्हणालात".
ती तिची 'लग्नाची अंगठी' (लग्नाचे चिन्ह) होती.
पाश्चात्य देशात, तुम्ही जर का लग्नाची अंगठी काढली तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या एकेकाळच्या प्रिय (पतीपासून) वेगळे होत आहात.
विवाहामध्ये एक पावित्र्य आहे. त्या पवित्र्याच्या जाणीवेसाठी मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्र म्हणजे एक मांगल्याची दोरी जिला धरून तुम्ही धर्माच्या मार्गावर चालता, म्हणून ती काढायची नसते आणि ती कायम तुमच्याबरोबर असते.
तुम्हाला ते पावित्र्य तुमच्या जवळ हवे असते, म्हणून त्याला भावनिक आधार देऊन ते घातले जाते.
त्याचबरोबर, त्याच्याशी काही अंधश्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत. ओपरेशन च्या वेळेस डॉक्टरांनी सर्व दागिने काढायला सांगितले तरी हे म्हणतात ' हे मंगळसूत्र मला काढता येणार नाही'.
त्यासाठी एवढा मना:स्ताप. करून घ्यायची गरज नाही. मंगळसूत्र हे इतर गळ्यातल्या दागीन्यासारखेच असते. म्हणून जेंव्हा खरोखरच गरज असते त्या वेळेस तुम्ही ते काढू शकता, काही हरकत नाही. पण सर्वसाधारपणे त्याला शुभ समजले जाते आणि म्हणून मंगळसूत्र घातलेले चांगले.
प्रश्न: गुरुजी, मी बऱ्याचदा फसवला जातो. शहाणपण येण्यासाठी मी काय केले पाहिजे?
श्री श्री : तुम्ही फक्त शहाणपण नसल्यानेच फसवले जाता असे नाही तर लोभामुळेहि तुम्ही फसता. माझ्या असे लक्षात आले आहे कि 'लोभी लोक खूप पटकन फसवले जातात.' तुम्ही जर अति महत्त्वाकांक्षी असाल किंवा लोभी असाल तर तुम्हाला मूर्ख बनवणे सोप्पे आहे, पण जर तुम्ही शांत आणि स्थिर असाल, तर मात्र तुम्हाला फसवणे अवघड आहे.
प्रश्न: गुरुजी, आपण दुसऱ्यांकडून काही अपेक्षा ठेवू नये हे मान्य आहे. पण आपण स्वत:कडूनही अपेक्षा ठेवणे चूक आहे का?
श्री श्री : अपेक्षा ठेवण्यात काही चूक नाही, पण जर त्या पूर्ण नाही झाल्या तरी काही हरकत नाही, तुम्ही निवांत राहा.
प्रश्न: गुरुजी, मी एका नातेसंबंधात पार गुरफटून गेलो आहे. पण आता माझ्या लक्षात आले आहे कि त्याच्यामुळे मी सेवा करू शकत नाहीये. आता मला यामधून बाहेर पडायचे आहे, पण ते सोपे नाही. मी आता काय करू?
श्री श्री: नामस्मरण करा! तुम्ही जर जप करत राहिलात तर तुम्हाला कधीच नैराश्य येणार नाही.
जेंव्हा तुम्ही 'ओम' चा जप करता, त्यावेळेस तुमच्या भावनांचे केंद्रस्थान शांत होते आणि एकदा ते शांत झाले कि उदासीनता दूर पळून जाते.
या ऐहिक जगात गुंतल्यामुळे तुम्ही उदास आहात. रात्रंदिवस माझे काय होईल या विचाराने तुम्ही निराश होता.
तुम्ही काय करायला पाहिजे, कि रोज सकाळी उठल्यावर विचार करा कि तुम्ही काय सेवा करू शकता. असा विचार करा कि मी आजूबाजूच्या लोकांसाठी, जगासाठी काय करू शकतो, या ज्ञानाच्या प्रसारासाठी किंवा या संस्थेसाठी (आर्ट ऑफ लिविंग) काय करू शकतो. जर यापैकी कशाचेच उत्तर नाही मिळाले तर विचार करा कि मी गुरुजींसाठी काय करू शकतो. कमीत कमी एवढा तरी विचार करा.
जर तुम्ही याकडे लक्ष दिले आणि तुम्ही नामस्मरण आणि ध्यान करत असाल तर तुम्ही कधीच उदास होणार नाही. हे जाणून घ्या, कि हि सृष्टी नश्वर आहे आणि येथील सर्व लयास जाते आणि 'ओम नमः शिवाय' चा जप करत राहा. उदासीनता, नकारात्मकता संपूर्णपणे नाहीशी होईल.
म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक तीन वेळेला संध्यावंदन करीत असत.
सकाळी तुम्ही उठून सूर्याकडे पहा आणि येणाऱ्या छान दिवसाचा विचार करा आणि सूर्याचे आणि भूमातेचे या आयुष्याबद्दल आभार माना. आपले जीवन आणि हि सृष्टी हे दोघेही सूर्यावर अवलंबून आहेत, म्हणून सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तुम्ही संध्यावंदन करा, सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि संपूर्ण विश्वाशी एकात्मतेचा अनुभव करा.
हे केल्यानंतर उदास राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेंव्हा तुम्हाला माहित नसते कि तुम्ही सगळ्या विश्वाशी एकरूप आहात आणि तुम्ही विचार करता कि तुम्ही एक छोट्यामोठ्या गोष्टींची अपेक्षा करणारी क्षुद्र व्यक्ती आहात आणि तुम्ही तुमचा कमकुवतपणा कुरवाळत बसता कि मला हे मला अमुक गोष्ट माहिती नाही आणि माझ्यापाशी तमुक गोष्ट नाही, मी ध्यानाला बसतो, मी क्रिया करतो पण तरीही काहीच होत नाही.
अशा प्रकारची कुरकुर करणे हे संकुचित मनोवृत्तीचे द्योतक आहे. तुम्हाला यामधून बाहेर पडावे लागेल. तुम्ही जबाबदारी घ्या कि मी यातून बाहेर पडून माझे आयुष्य सार्थकी लावेल. ज्यांना आत्महत्या करावीशी वाटते त्यांना मी सांगेन कि तो मूर्खपणा आहे. तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते कारण तुम्ही फक्त तुमच्या स्वताच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करताहात. तुम्ही एखाद्या चांगल्या कार्यासाठी स्वत: ला वाहून घ्या आणि बघा कि नैराश्य तुमच्या आयुष्यातून निघून गेले आहे. जेंव्हा तुम्ही विचार करता कि मी माझा जीव घेणार नाही, तर या जगासाठी, मानवतेसाठी, माझ्या देशासाठी मी त्याचा सदुपयोग करेन, तेंव्हा तुम्हाला खूप सारा आनंद मिळतो. काहीही झाले तरी मी त्याचा सामना करेन.
सर्व वैफल्यग्रस्त लोकांना हे सत्य दाखवून दिले पाहिजे आणि नामस्मरणाने त्यांचे पुनरुत्थान होईल.
तुम्ही स्वत:ला या जगासाठी, या देशासाठी, संस्कृतीसाठी, धर्मासाठी किंवा देवासाठी, परमात्म्यासाठी, या पवित्र अशा ज्ञानासाठी वाहून घ्या. ते समर्पणच तुम्हाला या चिखलातून बाहेर काढेल.

© The Art of Living Foundation