ज्ञानासाठी निरीक्षण आणि निरीक्षणासाठी संवेदनशीलतेचे असणे आवश्यक आहे !
८ डिसेंबर २०११
प्रश्न:"आसक्ती" म्हणजे रस, ओढ, किंवा संकल्प पण "निरासक्ती" म्हणजे रस किंवा ओढ यांचा अभाव. जेव्हा (एखाद्या कामात) रस किंवा ओढ नसेल तेव्हाहि कार्य करण्यास कसे प्रेरित होता येईल?
श्री श्री: मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही दररोज आंघोळ करता. तुम्हाला दात घासायला आणि आंघोळ करायला खूप रस वाटतो का? नाही. करण्यासाठी तुम्ही ते करता, अगदी सहजपणे. जे सहज आहे त्याला प्रयत्न लागत नाही. जेव्हा तुम्ही स्मितहास्य सहजपणे करता तेव्हा त्याला प्रयत्न लागत नाही, पण जेव्हा तुम्हाला स्मितहास्य करावं लागतं तेव्हा तेच स्मितहास्य जड वाटायला लागतं. जे काम करण्या साठी प्रयत्न लागतो ती "आसक्ती". पण "निरासक्ती" म्हणजे ज्या साठी प्रयत्न लागत नाही आणि ज्या मुळे मनाला शांती मिळते. उदाहरण द्यायचे झाले, तर स्त्रियांना जेवण बनवणे सहज जमते पण पुरुषांना म्हटलं तर पाक शास्त्राचे पुस्तक वाचावे लागेल. पुरुषांना तिखट,मीठ,मसाला, बघण्यासाठी जेवणाची चव सतत बघावी लागेल. जिथे प्रयत्न तिथे "आसक्ती" आणि त्या मुळे चिंता. जर तुम्ही म्हैसूर ला जायचे म्हणून अस्वस्थ असाल, तर ती ‘आसक्ती’ आणि कार चालवून सहजपणे तिथे जाणे हि "निरासक्ती". "निरासक्ती" हि अरसिकता नसून,सहज काम करण्याचा दृष्टीकोण आहे.
प्रश्न: गुरुजी, आम्हाल संजय बद्दल सांगा. अर्जुनाच्या आधी संजयला श्री कृष्णाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या दूर दृष्टी बद्दल पण सांगा.
श्री श्री: तुम्हाला खुपदा आत मधून वाटतं, असं होणार आहे किंवा मी असं करायला हवं. जेव्हा हि अंत: प्रेरणा वाढते तेव्हा मन जास्त ज्ञान मिळवू शकतं तसेच भविष्यकाळात काय होणार आहे ते उमजू शकतं. आधी हे एक झलक स्वरुपात समोर येतं. सगळ्यांकडे ही क्षमता आहे. कधीतरी सगळ्यांना ह्या झलक स्वरुपात दिसलेल्या गोष्टी पुढे काय होणार आहे याची जाणीव करून देतात. आणि ह्या पाचही इंद्रीयापासून वेगळ्या सहाव्या इंद्रीयापासून मिळवलेल्या असतात. संजय कडे ह्या सहाव्या इंद्रियाची देणगी होती. त्याने बरंच ध्यान केलं आणि ह्या ध्यानातून त्याला युद्ध दिसला जे त्याने ध्रीतराष्ट्र ला सांगितला.
आज अमेरिकेत बरेच भौतिक शास्त्रज्ञ आहेत, पण त्यांची कारणमिमांसा पूर्णपणे बरोबर नाही. ते त्यांच्या आत मधल्या सहाव्या इंद्रिया पर्यंत न गेल्यामुळे त्यांची वर्णने अर्ध सत्य बनून राहतात. तुम्ही जेव्हा पूर्णपणे रिते ( रिकामे आणि पोकळ) होता आणि इच्छा किंवा अरुची पासून मुक्त होता तेव्हा अंत प्रेरणा हि स्पष्ट होते.
प्रश्न: शिव लिंग म्हणजे काय?
श्री श्री: 'लिंग' म्हणजे प्रतिक.
बाळ हे पुरुष किंवा स्त्री हे तुम्ही लगेच एका चिन्हामुळे ओळखता. जे प्रजोत्पादक इंद्रिय त्याला आपण 'लिंग' असे म्हणतो कारण त्यामूळे लिंग कळते. 'लिंग' म्हणजे ह्या सृष्टी आणि त्याच्या पित्याचे एक असण्याचे प्रतिक आहे. जसे 'शिव' आणि 'शक्ती' हे सृष्टीचे २ घटक, व्यक्त आणि अव्यक्ताच्या संगमाचे द्योतक आहे 'शिव लिंग' असे म्हणतात, शिव लिंग म्हणजे फक्त शिव नसून पूर्णत्व, परम्ब्ह्म आहे.
प्रश्न: उत्कंठा आणि लालसा ह्यात काय फरक आहे? मला उत्कंठा(ओढ) किंवा लालसा आहे असे कसे कळेल?
श्री श्री: लालसा हि क्षणिक आणि क्षुद्र गोष्टींसाठी असते पण उत्कंठा उच्च गोष्टींसाठी आणि सदैव असते. जसे कि लालसा(तीव्र
इच्छा) हि साखर खाण्याची, यशाची किंवा सामागमासाठीची असू शकते पण उत्कंठा हि प्रेमाशी संबंधित आहे. ती हृदयातून उत्पन्न होते.
प्रश्न: अंधश्रद्धे चे काय महत्त्व आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात तिला किती महत्त्व द्यावे?
श्री श्री: अंधश्रद्धा म्हणताच सगळे संपले. त्याचे विवेचन करण्याची गरज नाही. तुम्ही कचऱ्याचा अभ्यास करत नाही, त्याला सरळ कचराकुंडीत टाकावं. झालं.
प्रश्न: गुरुजी, मी जेव्हा शंकेत किंवा संभ्रमात असतो आणि ती दूर करायला कोणीच नसतं, तेव्हा काय करावं?
श्री श्री: चीन मध्ये एक म्हण आहे : जेव्हा संभ्रमात असाल तेव्हा उशी घेऊन झोपायला जा. सगळे आपोआप घडेल. चेतना कमी असल्यामुळे शंका निर्माण होते. भास्त्रीके मूळे आणि जेवण व व्यायामामुळे चेतना वाढते. व्यायामामुळे रक्त संचार व्यवस्थित होतो आणि संभ्रम निघून जातात.
प्रश्न: देव आणि गुरु ह्यात काय फरक आहे?
श्री श्री: जर देव प्रेम आहे तर आपण सगळेच प्रेमाने बनलेलो आहोत. जर कल्पकता देव आहे तर सगळ्यामध्ये कल्पकता आहे. तसं नसेल तर, सगळ्यांकडेच प्रजोत्पादाकता आहे. देव म्हणजेच 'सत्चीतानंद' सत्य, अस्तित्व, निर्मळ चेतना. तुम्हाला अस्तित्व आहे आणि निर्मळ चैतन्य आहे. जिथे देव तिथे आत्मा आणि जिथे आत्मा नाही तिथे देव नाही. देव प्रत्येक चेतनेमध्ये व्याप्त आहे. देव त्या जागेत व्याप्त आहे जिथे आपण सगळे आहोत.
उपनिषदांमध्ये एक कहाणी आहे एक लहान मुलगा आपल्या वडिलांना विचारतो. "देव काय आहे?"
वडील मुलाला घर बाहेर आणतात आणि म्हणतात, "बघ, घराआधी इथे काय होते?"
मुलगा म्हणाला "रिकामी जागा",
"मग घर सध्या कुठे उभं आहे?" वडील म्हणाले
मुलगा म्हणाला, "रिकाम्या जागेत"
"उद्या जर घर जमीनदोस्त झाला तर काय उरेल?"
मुलगा म्हणाला, "रिकामी जागा (रितेपणा) "
वडील लगेच म्हणेल "तोच देव आहे'
जिथे सगळं आहे आणि जिथून सगळं आले आहे, आणि ज्यामध्ये सगळे विरघळून जाईल (एकरूप होईल),तेच दैवी आहे. तेच प्रत्येकाच्या अस्तित्वाचं केंद्र आहे. देव प्रत्येकामध्ये आहे आणि जेव्हा तुम्ही समतोल होता, किंवा साक्षात्कारी
होता, म्हणजेच तुमच्यामधली हि जागा खिडकीतून स्वच्छ दिसू लागते.
भिंती आणि खिडकी च्या मागची जागा सारखीच असते, पण फक्त खिडकी मधूनच मागची जागा,आकाश दिसू शकते.
प्रश्न: गुरुजी, आज दत्तात्रेय जयंती. आम्हाला दत्तात्रेय विषयी काही सांगा.
श्री श्री: आज हनुमानजयंती आणि आज पिताजींचा वाढदिवस. हे पाहिलं वर्ष आहे जेव्हा ते इथे प्रत्यक्ष दृष्ट्या उपस्थित नाही पण आत्मारूपाने ते आहेत. वाढदिवस हे लोकांच्या चांगल्या गुणांना आठवून साजरे करण्या साठी असतात. दत्ता त्रेय हे सृष्टी तून शिकले. अत्री ऋषींना मुल नव्हतं आणि त्यांनी दत्तात्रेयांना दत्तक घेतलं. दत्ता म्हणजे दत्तक किंवा दिलेले किंवा घेतलेले. म्हणून जेव्हा कोणी मुल दत्तक घेतात तेव्हा म्हणतात 'दत्ता स्वीकारा'. अत्री आणि अनुसूया यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला दत्तात्रेय म्हणायचे आणि त्यांच्या कडे ब्रह्म, विष्णू आणि शिव शक्ती होती.
खूप लोकांमध्ये कल्पकता असते आणि ते खूप गोष्टी सुरु करतात पण टिकवून ठेवू शकत नाही. ती ब्रह्म शक्ती. तुम्ही सुरुवात करता पण टिकवून ठेवू शकत नाही.
विष्णू शक्ती म्हणजे पोसणे किंवा सांभाळणे. “मॅनेजर’ मध्ये हा गुण असतो. ते सुरुवात नाही करू शकत पण गोष्ट दिल्यास सांभाळू शकतात. जे बनवलं त्याला पोसण्याची गरज असते तीच हि विष्णू शक्ती.
शिव शक्ती हि परिवर्तन किंवा नाविन्य आणते. फक्त पोसणे सोडून जेव्हा नाविन्य लागतं तेव्हा ते नसेल तर उपयोग होत नाही म्हणून शिव शक्ती सुद्धा लागते. जेव्हा तिन्ही शक्ती एकत्र येतात तीच गुरु शक्ती. एका गुरूकडे ह्या सगळ्या शक्ती असतात.
दत्तात्रेय हे गुरुशक्तीचे प्रतिक आहेत ज्या मध्ये गुरु, कल्पकता, सांभाळणे आणि नाविन्य ह्या शक्ती समाविष्ट आहेत. दत्तात्रेय ह्यांनी संपूर्ण सृष्टी कडून शिकून, ज्ञान मिळवलं.
श्रीमद भागवत मध्ये म्हटले आहे, "राजहंस कडे बघून ते शिकले; आणि कावळ्याकडून शिकले; वृक्षांपासून शिकले आणि वृद्ध स्त्री कडून हि शिकले". ज्ञान त्यांच्या साठी सगळी कडून येत होतं. त्यांचे मन आणि हृदय ज्ञाना साठी उघडा होतं आणि म्हणून ते ज्ञान आयुष्यात आणू शकले.
ज्ञानासाठी निरीक्षण आणि निरीक्षणा साठी संवेदनशिलातेचे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर स्वतः मध्येच बंदिस्त असाल तर तुम्हाला येणाऱ्या संकेतांची जाणीव होणार नाही. तेव्हा तुम्हाला इतरांचा दृष्टीकोन दिसणार नाही आणि अशा लोकांना माझाच दृष्टीकोन बरोबर असं वाटल, जरी ते खर नसतं.
मुल्ला नसिरुद्दीन ची एक कहाणी आहे. त्याला एकदा वाटले कि ते मृत आहेत आणि ह्या विषयामध्ये ते कोणाचेही हि काही ऐकायला तयार नव्हते.
पत्नी काही म्हणल्यास म्हणत होते, 'मृत व्यक्ती उत्तर कसे देईल?'
पत्नीने काही काम सांगितल्यास, 'मृत व्यक्ती कसे काम करेल?' असे म्हणायचे.
शेवटी कंटाळून पत्नी त्यांना मानसोपचार तज्ञाकडे घेऊन गेली. तज्ञाने मुल्लांना विचारले, "मृत शरीरात रक्त असते?"
मुल्ला म्हणाले "रक्त पाण्यामध्ये परिवर्तीत होते".
खुश होऊन तज्ञाने मुल्लांना पिन टोचली आणि रक्त येताच म्हणले "तुम्हाला रक्त येतंय ह्याचाच अर्थ तुम्ही जिवंत आहात."
मुल्ला म्हणाले "तुम्हाला काय मी मूर्ख वाटलो कि काय, आज मला कळले कि मृत लोकांमध्ये सुद्धा रक्त असतं".
लोकांच असच होतं. त्यांची मतं पक्की असतात आणि ते त्यांच्या संकुचित जगात जगतात. आपल्याला त्या जगा बाहेर बघायला हवं.
प्रश्न: स्वार्थ आणि निस्वार्थ ह्या मध्ये समतोल कसा ठेवावा?
श्री श्री: हे तुमच्या वर अवलंबून आहे. जे गरजेचे आहे ते बघावे. जे तुम्हाला करता येईल ते करावे. तुम्ही घातलेला कुडता दान नाही करू शकणार पण जर पानात २ इडल्या असतील आणि शेजारी कोणी उपाशी असेल तर एक इडली त्याला तुम्ही नक्की द्याल. हे तुमच्यामध्ये आहे. जेव्हा तुमचा दृष्टीकोन विशाल होईल तेव्हा तुम्हाला इतरांची मदत करता येईल.
तुमच्या कडे जर ५०० रुपये आहेत आणि एखाद्याला गरज आहे, तर तुम्ही त्याची नक्कीच मदत कराल. कारण तुम्ही जास्त कमवू शकता किंवा तुमच्या कडे जास्त पैसे आहेत. पण जर तुम्हाला बस साठी पैसे लागणार असतील तर तुम्ही स्वत:ची गरज पूर्ण कराल आणि त्यात काही गैर नाही. ह्यालाच 'आपाद धर्म' म्हणतात.
फ्लाईट मध्ये सुद्धा असेच म्हणतात 'आधी स्वत:वर ऑक्सिजन मास्क लावा आणि मग लहान मुला वर'. कारण जर तुम्ही तिथे नसाल तर लहान मुल तुमच्या वर मास्क कसा घालेल.
एका संन्याशासाठी साठी जो पूर्णतः लालसे पासून मुक्त आहे, इतका फरक पडत नाही पण एका संसारी व्यक्ती साठी 'आपाद धर्म' पाळणे गरजेचे आहे.

© The Art of Living Foundation