हे राष्ट्र रामकृष्ण मिशनच्या संन्यासींचे आभारी आहे.
नवी दिल्ली, १२  जानेवारी २०१२
ओम नम: प्रणावार्थय शुद्ध ज्ञानेक मुक्तये | निर्मालाय प्रशान्ताय श्री दक्षिणामुर्तये नम: |
मंचावर सुंदर कोरलेले पुतळे, आणि प्रेक्षकांत सुंदर कोरलेले पुतळे. ज्या प्रमाणे तुम्ही एखाद्या पुतळयाप्रमाणे ध्यानस्थ पणे संपूर्ण लक्ष देऊन बसले आहात, ते भारत जागा होतो आहे याचे लक्षण आहे. लोक करमणुकीसाठी जातात आणि बसतात, पण जेंव्हा ते अध्यात्मीक प्रवचनासाठी बसतात तेंव्हा अर्धेअधिक पेंगतात, त्यांचे डोके खाली असते किंवा अर्ध्यावेळेला ते दुसरीकडेच असतात. पण, ज्या एकाग्रताने तुम्ही इथे बसले आहात त्यावरून हेच लक्षात येत आहे कि, आपण योग्य दिशेने जात आहोत.
स्वामी विवेकानंदजी या देशातील तरुणांना एक स्वप्न देऊन गेले. आणि जेंव्हा आपण हे स्वप्न उराशी बाळगतो तेंव्हा या देशाच्या प्रगतीशिवाय दुसरा मार्ग असूच शकत नाही. या देशातल्या ६१२ जिल्हापैकी २०० जिल्ह्यात जो विकासाचा अभाव दिसतो त्याचे कारण रामकृष्ण मिशन तिथे पोहोचले नाही. ज्या भागात नक्षलवाद, किंवा हिंसक कारवाया होताना दिसतात, त्याचे कारण त्यांचे शिक्षण नीट झाले नाही.
तुम्हाला माहित आहे जेंव्हा किरण बेदी निवृत झाल्या तेंव्हा खूप लोकांना हायसे वाटले. त्यांना तुम्ही निवृत्त अधिकारी म्हणू शकत नाही. त्यांच्या साठी निवृत्ती नाहीच. त्या आता अधिक जोमाने अजून मोठ्या कार्यात व्यग्र आहेत. आज जे पारितोषिक वितरण झाले त्यात ६ पैकी ५ मुली आहेत. मुलींकडे उत्तम गतीदाई शक्ती असते, त्यामुळे त्या संपूर्ण वातावरण भारावून टाकू शकतात. लोकांना प्रेरणा देऊ शकतात. जर देशातील प्रत्येक स्त्री त्यांच्या मर्यादित क्षेत्रातून बाहेर पडली तर त्या खूप मोठा बदल घडवू शकतात.
जेंव्हा किरण बेदी याबद्दल बोलत होत्या तेंव्हा त्या जणू ‘आर्ट ऑफ लीविंग’ चा संदेश देत असल्यासारखे वाटले.
स्वामीजींचे आयुष्य हे प्रेरणा होते. स्वामीजी जे होते त्यामागे शारदादेवींची मोठी प्रेरणा होती. त्यांच्या छोट्या छोट्या शिकवणुकीतून स्वामीजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, हे सगळे अदभूत आहे.
या महिन्याच्या ९ तारखेला, ३ दिवसांपूर्वी मी कलकत्त्याला रामकृष्ण मिशनच्या स्वामींबरोबर होतो. इतकी वर्ष कठीण परिस्थितीत ज्या निष्ठेने ते हे कार्य करत आहेत ते विलक्षण आहे. आम्ही अरुणाचल प्रदेश मध्ये रामकृष्ण मिशन बरोबर काम करतो. इस्पितळे, शाळांत आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक बरोबरीने काम करतात. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो, पण राग, द्वेष, पश्चाताप यांचा तिळमात्रही लवलेश न होता ते काम करतात. कठीण परिस्तिथीत आणि वातावरणात त्यांनी जी सहनशीलता दाखवली आहे ती उल्लेखनीय आहे. संपूर्ण देशात याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
कृतीवादाची अध्यात्माशी सांगड घालणे जरूरीचे आहे. अण्णानमध्ये आपल्याला हेच आढळते, नाही का? ते अध्यात्मीक आहेत पण त्याच बरोबर नुसते बसून सगळे काही ठीक होईल असा विचार ते करत नाहीत. जे काय करायचे आहे ते देवाला करू देत, आम्ही बसून फक्त मजा करतो, असे होत नसत. तुमच्यातील देव तुम्हाला हे काम करायला सांगतोय.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो:
अद्वैत तत्वज्ञानचे गाढे अभ्यासक आदि शंकराचार्य म्हणाले ‘सगळे क्षणिक आहे, सगळे सतत बदलत आहे, ही सगळी माया आहे’ एकदा ते चालत असता एक मदमस्त हत्ती त्यांच्या मागे लागला, ते बघुन ते धावू लागले. तेंव्हा एक जण त्यांना म्हणाला ‘ही सगळी माया आहे. तुम्ही म्हणालात की हत्ती माया आहे, मग तुम्ही का धावताय.’ तुम्हाला माहित आहे आदि शंकराचार्य काय म्हणाले? ‘जर हत्ती माया असेल तर माझे धावणे सुद्धा माया आहे’. जर स्वप्नात तुमचा वाघाशी सामना झाला तर तुम्हाला वाघाला मारायला स्वप्नातील बंदूक लागेल. तुम्ही खरीखुरी बंदूक घेउन त्याला मारायचा प्रयत्न करणार नाही.
आयुष्य ही एक जटील भेट आहे, आपण त्याला शिक्षा मानता कामा नये. या सीमित जगात ही अनंत जटील गोष्ट आहे. शांतता आणि जोश, प्रेम आणि कृती, मौन आणि सेवा.
रामकृष्ण मिशनच्या संन्याशीनि वेदान्तिक शिकवण आणि भजन हे त्यांचे कार्य इतके वर्ष चालवले आहे, त्या बद्दल हे राष्ट्र त्यांचे आभारी आहे. एक संस्कृत सुभाषित आहे ‘काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमातम’
विद्वान लोक गाणे (भजन), आनंद, निष्ठा या द्वारे समाज प्रबोधनाचे काम सहज करत असतात. ज्ञान तुम्ही प्रत्यक्षात आणू शकत नाही असे नाही, जे तुम्ही सहज आत्मसात करून तुम्हाला त्याचा उपयोग होतो त्याला ज्ञान म्हणतात.
आपल्या देशातील आणि धर्मातील अनेक अंधश्रद्धा आणि कल्पित गोष्टी ज्या अगदी मुळापर्यंत खोल रुजल्या होत्या त्यांचे स्वामीजींनी समूळ उच्चाटन केले, जसे वाळूतून साखर वेगळी करावी. या देशातील युवक त्यांचे शतशः ऋणी आहेत.
आज मला हे सांगताना खूप उत्साह आणि आनंद वाटतोय की स्वामीजींचे हे स्वप्न साकार करणे आपले कर्तव्य आहे.
आपल्याला या देशाला भ्रष्ट्राचारपासून वाचवायचे आहे. जिथे आपुलकीची भावना संपते तिथे भ्रष्टाचाराचा उगम होतो. अध्यात्म म्हणजे काय? तर आपुलकीची भावना जागृत करणे, सगळे आपले आहेत ही भावना निर्माण करणे. विशाल दृष्टीकोन आणि हृदय, खुले मन आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्याची वृत्ती याने हे साध्य होऊ शकते. गेली १५० वर्ष स्वामीजी या देश आणि युवकांसाठी एक प्रेरणास्रोत होते आणि पुढेही राहतील. 
माणसाचे गुण हे त्याला मानणाऱ्या लोकात दिसून येतात. ज्या समर्पण भावनेने आणि शांत चित्ताने हे सन्यासी देशात क्रांती घडवू पाहत आहेत ते अनुकरणीय आहे. ते कर्तव्य, अहिंसा, सत्य आणि न्याय यांचा एक भक्कम पाया राचातायेत. मी खात्रीने सांगू शकतो जर शाळा, महाविद्यालात कर्तव्य, ज्ञान,विश्वास आणि श्रद्धा यांचा पाया भक्कम झाला तर आयुष्यात संतुलन येईल, समाजात सुधारणा होईल.
जर तुम्ही भ्रष्टातल्या भ्रष्ट माणसाला विचारलेत की त्यांचे शिक्षण कुठे झाले आहे, तर त्यातील बऱ्याच लोकांचे  शिक्षण सरकारी शाळेत झाले आहे, जिथे नैतिकतेला थोडा फाटा दिला जातो. मी असे अजिबात म्हणत नाही कि जे सरकारी शाळेत शिकले ते सगळे अनैतिक आहेत. आपण सगळ्यांना एकाच तराजूत तोलू शकत नाही, ती चूक ठरेल. या देशातल्या साधू संतामधेही या गोष्टी आढळतील. आपण प्रत्येक परिस्थितीचा उपयोग देश उभारणी, स्वतः आणि जगाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.
बरेच लोक म्हणतात जे वेदांती किंवा सन्यासी आहेत त्यांच्या साठी सगळे देश सारखे आहेत, तर मग ते एका देशाबद्दल देशाभिमान
कसा दाखवतात? जेंव्हा आपण ‘माझा देश’ असे म्हणतो तेंव्हा आपण संकुचित होतो. मी म्हणतो हे संपूर्ण जग आपले आहे.
देशाबद्दल अभिमान किंवा समर्पण तुमच्या वैश्विकतेबदल अडथळा बनूच शकत नाही. आपला देशाभिमान वैश्विक चेतनेच्या आड येऊ शकत नाही.
स्वामी विवेकानंदानी देशभक्ती ठेऊन तुम्ही वैश्विक कसे होऊ शकता याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. दैवत्वातून या जगाची उत्पत्ती झाली, आणि हे विश्व म्हणजेच देव. देव आणि निसर्ग या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे नद्या, पर्वत, झाडे, गाई, वासरू, कुत्रा हे सगळे देवाचाच अविष्कार आहेत असे मानले जाते.
'या प्रकृती लीनास्या या परस्य महेश्वरा'
जो या निसर्गाशी एकरूप आहे तो महेश्वर, देव आहे. आपल्याला निसर्गाबद्दल अनुकंपा असली पाहिजे.
देशभक्ती आणि देवभक्ती वेगळी नाही. जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण संकल्प करू या, असा भारत जो संपूर्ण जगाचे अध्यात्मिक नेतृत्व करेल.
जे वयाने आणि मानसिकतेने तरुण आहेत त्या इथे बसलेल्या आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. तुमच्या पैकी  बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने, तुम्ही सगळ्यांनीच आज हा संकल्प करा. स्वामी विवेकानंदानी तुम्हाला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या. 



The Art of living
© The Art of Living Foundation