ईश्वरी सत्त्तेचे तुमच्यावर अतूट प्रेम आहे.
२२ डिसेंबर २०११

आर्ट ऑफ लिविंग म्हणजे काय? ते म्हणजे जीवनामध्ये सत्य काय आहे हे जाणून घेणे. आणि काय सत्य आहे? जीवन हे सर्व परस्पर विरोधी मूल्य, चढाव आणि उतारांनी भरलेले आहे. जरी चढ आणि उतार आले तरी मन शांत ठेवा. जेव्हा आव्हाने उभी असतात, तेव्हा त्याग करायची वृत्ती ठेवा, त्याला सामोरे जाज्ञानासोबत रहा, जे बदल घडवायला मदत करेल. जेव्हा चांगली वेळ असेल तेव्हा, सेवा करायची वृत्ती ठेवा आणि तुमच्याकडून जितके होईल तितकी सेवा करा. हा पहिला मुद्दा आहे.

लोकांना ते जसे आहेत तसे स्वीकारा. लोकांनीही आपल्यासारखेच असावे अशी आपली इच्छा असते. तुमच्यासारखे कितीजण तुम्हाला आता पर्यंत भेटले? जर अशी व्यक्ती आढळली, तर पाच मिनिटे सुद्धा आपण त्यांच्यासोबत राहू शकत नाही. तुम्ही त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करता. म्हणून, जशी व्यक्ती आहे, तिचा स्वीकार करा. हा दुसरा मुद्दा.

अजून एक महत्वाचा मुद्दा जीवनाविषयी असा आहे, तुमचे मन हे दुसऱ्यांच्या अभिप्रायाचे  किवा विचाराचे फूटबाल बनणार नाही हे पहा. आपण नेहमी असा विचार करतो: 'हा मनुष्य आपल्याविषयी काय विचार करतोय?' 'तो मनुष्य आपल्याविषयी काय विचार करतोय?'

सत्य हे आहे कि, कुणालाही तुमच्याविषयी विचार करायला वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या व्यापामध्ये गुंतलाय. तुम्ही उगीचच काही कारण नसताना काळजी करत बसता कि लोक आपल्या विषयी काय विचार करतील म्हणून. लोकांना जे विचार करायचे आहे ते त्यांना मुक्तपणे करू द्या. अभिप्राय हे नेहमी बदलत असतात.हे तिसरा मुद्दा.

जर एखाद्याने चूक केली असेल, तर त्यांनी ती चूक मुद्दामून केली असे गृहीत धरू नका. तुम्ही जशा चुका करता, तशीच चूक त्यांच्या हातून झाली असेल असे म्हणा आणि पुढे जा. हा चवथा मुद्दा.

पाचवा मुद्दा, जीवन हे वर्तमानामध्ये जगा. तुम्ही जर भूत काळात अडकून पडलात, तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही आणि दुसऱ्यांना पण सुखी होऊ देणार नाही. लहान मुलाप्रमाणे जगा, वर्तमानकाळात.

आपले जीवन हे निष्कलंक असले पाहिजे. ते कसे शक्य आहे? ते फक्त ईश्वराच्या भक्तीने शक्य आहे.

तुम्ही जेव्हा सकाळी उठता, तुम्ही तुमचे तळहात पहा 'माझ्या हातून आज काहीही वाईट घडू नये', 'माझे हात पूर्ण भरलेले असू देत, आणि माझ्याकडून दुसऱ्यांना सुद्धा देता येऊ दे'. हि पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आपल्या देशात. आपण जेव्हा उठतो तेव्हा, आपल्या तळहाताकडे पाहत आपण म्हणतो, 'हे लक्ष्मी(संपत्तीची देवता) माझ्या हातामध्ये वास कर', या करकमलातून माझ्याकडे संपत्ती येवू दे'.

लक्ष्मीचा एक हात खालच्या दिशेने आहे, जे देणे आहे असे दर्शवितो. आणि दुसरा हात दर्शवितो अभय हस्त,'म्हणजेच ईश्वरी सत्ता आपल्यासोबत आहे आणि आपल्याला भ्यायची काही गरज नाही'.
आपण अशी सुद्धा प्रार्थना करतो कि, आपल्या हाताची आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी मदत होवू दे.

शेवटी, आपण आपल्या हातून फक्त मंगलदायक कार्य होवू दे अशी प्रार्थना करतो. हि प्रार्थना आपण ह्रदयापासून दररोज सकाळी उठल्यावर केली, तर ते खरे होते. जरी तसे होत नसले तरी आपण भगवंताला प्रार्थना करतो कि आमची काळजी घे म्हणून आणि पुढे भविष्यामध्ये असे होणार नाही याची.

भूतकाळ अर्पण करणे हे खरे कृष्णार्पण आहे.

भगवंताला तुमच्याकडून काहीहि भेट नको आहे. भगवंताला तुमच्या सर्व चिंता हव्या आहेत. प्रसाद जो तुम्हाला मिळतो, तो आनंदी मन असण्याचा. भगवंत तुम्हाला तुमच्या आईवडीलान्पेक्षाही १०० पटीने जास्त प्रेम करतो. मी येथे फक्त तुम्हाला हे सांगण्याकरिता आलो आहे कि 'ईश्वरी सत्त्तेचे तुमच्यावर अतूट प्रेम आहे'.

आपण सर्वजण एक दिवस मरणार आहोत. आपण आपले सर्व दागदागिने लॉकर मध्ये ठेवले असतील आणि त्याच्या चाव्या आपल्या जवळ व्यवस्थितपणे ठेवल्या असतील, पण जेव्हा आपण मरू, तेव्हा आपण लॉकर आणि त्याच्या चाव्या येथेच ठेवून जावू. आपण आपल्याबरोबर काहीही घेवून जाणार नाही. तुम्ही जेव्हा बसने, आगगाडीने किवा विमानाने प्रवास करता, तेव्हा ते तुमचे घर आहे असे समजता का?

तुम्ही तुमच्या प्रवासाच्या काळात सर्व सेवेचा आनंद लुटला असेल, पण जर तुम्ही ते तुमचे घर आहे असे समजाल तर काय होईल? तुम्ही जेव्हा तुमच्या शेवटच्या कार्यस्थली पोहोचता, तेव्हा तुम्हाला बळजबरीने खाली उतरवतात. तुम्ही किती जरी विरोध केलात तरी, तुम्हाला खाली उतरविले जाते. तुम्ही असे म्हणू शकत नाही, कि तुमची आगगाडी किवा तुमचे विमान आहे म्हणून.

तुम्ही तुमची कार चालवीत असणार, पण तुम्ही गॅरेज मध्ये पोहोचल्यावरतुम्हाला कार मधून खाली उतरावे लागते. तुम्ही जर करता खाली उतरला नाहीत तर तुम्हाला मूर्ख म्हणतात! जीवनाचे अंतिम सत्य हे आहे कि, ‘आपण सर्व पाठीमागे सोडून जातो. समजा, दोन माणसे मानस सरोवर बद्दल बोलत होती (एक जागृत क्षेत्रस्थान भारतामध्ये आहे).
एकजण तेथे गेला होता आणि तो त्याचा अनुभव सांगायला लागला आणि दुसरा फक्त त्याबद्दल त्याला असलेली माहिती सांगत होता. तुम्ही कोणावर जास्त विश्वास  ठेवाल? नक्कीच, ज्याच्याकडे अनुभव आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. म्हणूनच, मी तुम्हाला सांगतोय 'ईश्वरी सत्त्तेचे तुमच्यावर अतूट प्रेम आहे'. तुम्ही कशाचीही काळजी किवा चिंता करू नका. मी येथे फक्त तुम्हाला हे अनुभव देण्यासाठी आलो आहे.

पुस्तकेहि उपयोगी आहेत, पण अनुभूती देण्यासाठी नाही. अनुभवानेच हे सत्य आपल्यामध्ये सखोल रुजते.(सत्संग मधील थंड हवेचा संदर्भ देत), मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, या थंडीचा मुकाबला करण्यासाठी. तुम्ही तुमचा अंगठा गरम ठेवला तर तुम्हाला नेहमी गरम वाटेल.

निसर्गाने त्या प्रमाणेच संकल्पन केले आहे. तुम्हाला जेव्हा थंडी वाजतेतेव्हा तुमचे आपोआपच हात काखेमध्ये जातात. नाही का? मी जेव्हा स्वीत्झेर्लंड किवा नॉरवे, या देशामध्ये जातो, मी थंडीचे गरम कपडे वापरत नाही. लोकांना आश्चर्य वाटते कि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये मला थंडी कशी वाजत नाही म्हणून. थंड हवामान माझा मित्र आहे.माझा त्यांच्याशी करार आहे. माझा निसर्गाशी पण करार आहे. मला काही फरक पडत नाही. फक्त १० मिनिटांकरता  दररोज, काही व्यायाम करा, काही आसने करा.  प्राणायामाने  मन शुद्धी होते. सर्व नकारात्म क्रियाशत्त्कि नाहीशी होते. तुम्हाला याचा
अनुभव आला आहे का? जेव्हा तुम्ही काही लोकांना पाहता, तेव्हा त्यांच्याशी बोलावेसे वाटते. काही लोकांशी, जरी तुम्हाला माहीत नसले तरी त्यांच्यापासून दूर जावेसे वाटते. याचे कारण त्यांच्या शरीरातून येणारी ऊर्जा. जी ऊर्जा आपण निर्माण करतो, ती चांगली असण्यासाठी, आपल्याला प्राणायाम आणि ध्यान करायला हवे, मग आपले काम काही प्रयास न करता अगदी सहजरीत्या होते.
तुम्ही जर रागावले असला किवा काळजी करीत असाल, तर बाकीचे पण तुमच्याबद्दल तसाच विचार करतील. ते तुमच्यापासून दूर राहणे पसं करतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल यांना आपल्यापासून का लांब रहावेसे वाटते. आपल्या घरामध्ये किवा आपल्या शाळेमध्ये आपल्याला 'आपल्या शरीरामध्ये ऊर्जा हि कशा स्वरूपात बदलणे शक्य आहे'  हे शिकविले नाही. म्हणूनच, ध्यान, प्राणायाम, सत्संग हे सर्व खूप महत्वाचे आहेत आपली चेतना अभ्युत्थान करण्यासाठी. भोवातालचा प्रदेश स्व:छ ठेवा. सर्वत्र हिरवळ असेल याची काळजी घ्या. तुमचे शरीर स्व:छ ठेवा. आयुर्वेदाचा वापर करा. दर आठवड्याला ३ ते ५ त्रिफळा गोळ्या घ्या. ते तुमचे पचन चांगले व्हायला मदत करेल. तुमची पचनक्रिया चांगली असेल तर, तुमचे मन पण चांगले राहील. तुमचे पाय हे गरम असले पाहिजेत, तुमचे पोट मऊ हवे, आणि डोक शांत पाहिजे. हे लक्षण निरोगी माणसाचे आहे. अनारोग्यकारक असणे म्हणजे जेव्हा तुमचे पाय थंड आहेत, डोक गरम आहे, आणि पोट दगडासारख टणक आहे. जर तुमची वाईट कर्मे जायची असतील, तर तुम्हाला प्राणायाम करावा लागेल.  नसती तपः प्राणायामात परम’. प्राणायाम करण्यासारखी दुसरी तपस्या नाही. ध्यान धारणेने, चेतना शुद्ध होतेभजनाने, भावना शुद्ध होतात. म्हणून संगीत ऐका. ज्ञानाने, बुद्धि शुद्ध होते, (हे ज्ञान कि सर्वकाही आणि प्रत्येकजण इथे तात्पुरता आहे)
-दानाने, संपत्तीची शुद्धी होते, २-३% तुम्ही तुमच्या उत्पन्नातील बाजूला काढून ठेवा.
- तुपाने अन्न शुद्धी होते, एका प्रसिध्द हृदयशास्त्रज्ञने मला सांगितले
कि 'आपल्या देशातील लोक भात तुपाविना खाल्ल्यामुळे आजारी पडत आहेत'. तूप हे संमिश्र कर्बोदके बनायला मदत करते आणि लवकर त्याची साखर बनत नाही. तूप हे खूप सावकाशपणे अन्न पचायला मदत करते.  मधुमेहासारखे रोग नाहीसे होतात.
मी म्हणालो, आपले प्राचीन ऋषीमुनीनि पण हे आधीच सांगितले आहे. म्हणून, एक चमचा तुपाचा तुमच्या अन्नावर नेहमी वापरा.नियमित व्यायाम आणि आयुर्वेद, यामुळे शरीर शुद्ध होते.तुमच्यापैकी किती लोकांनी गौरवशाली आणि समृद्ध भारताचे स्वप्न पहिले आहे,हिंसारहित देश? इथे जे युवक आहेत, त्यांनी देशाकरिता ६ महिने ते १ वर्ष आपल्या देशाला दिले पाहिजे. तुमच्यापैकी किती जण तयार आहात? आपल्या देशामध्ये खूप भ्रष्टाचार वाढला आहे. आपला सुसंस्कृत पणा आणि मूल्य याचं अध:पतन झालेलं दिसतंय. आपला सुसंस्कृत पणा आपल्याला जपून ठेवता आला पाहिजे. हे फक्त अध्यात्माद्वारे शक्य आहे. भ्रष्टाचार, हा आपलेपणा जिथे संपतो तिथे सुरु होतो. जर आपण सर्वांशी आपलेपणाने  वागले तर कोणीही भ्रष्ट असूच शकत नाही. आपल्या सर्वाना एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्याला एक दिव्य समाज घडवायला हवा. आपल्या येणाऱ्या  पिढीसाठी आपण चांगला समाज देवू याची खात्री करायला पाहिजे. आपल्या मुलांना चांगला समाज मिळाला पाहिजे, ज्यामध्ये सत्यगुण, दयाधर्म आणि आपलेपणा असेल. 
बंगलोर हे वृद्ध लोकांकरिता खूप असुरक्षित बनले आहे. त्यांच्यावर खूप हल्ले होतायेत. आपण समाज असा निर्माण करायला हवा कि जिथे लोक भीती न बाळगता राहू शकतील. मागे काही पोलीस  अधिकार्यांनी काही गुंडांना आश्रमात त्यांचात सुधारणा व्हावी म्हणून आणले होते. फक्त ३ दिवसामध्ये, त्यांच्या वृत्तीमध्ये पूर्ण बदल झालेला पहिला. इथे बंगलोर मध्ये ४० ठिकाणी झोपडपट्टीमध्ये खूप काम सुरु आहे. भरपूर बदल झालाय तिथे. तुम्ही समूह निर्माण करा आणि रविवारी झोपडपट्टीमध्ये जा. त्यांना शिक्षण द्या, काही भजने म्हणा, आणि प्रसाद वाटा. आपल्या देशाची स्थिती हि वाईट लोकांमुळे झालेली नाही, तर चांगले लोक शांत बसतात म्हणून झालेली आहे आणि ते त्यासाठी काहीच करत नाहीत.  वाईट लोकांची संख्या खूप कमी आहे. फक्त २ तासांकरिता एक समूह तयार करून रविवारी जवळच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टी मध्ये जावून  परिसर स्वच्छ करा. लहान मुलांना शिक्षण द्या जे शिक्षण घेण्यापासून वंचित आहेत. सर्व डॉक्टर लोकांनी वैद्यकीय शिबीरे घ्यावीत.तुमच्याकडून जे काही शक्य असेल तेवढे करा. तुम्हाला तुमच्या मार्गापासून
लांब जावून काही करायचे नाही.

प्रश्न . गुरुजी, जीवनमुक्ती म्हणजे काय? या जन्मामध्ये ते कसे मिळवायचे?
श्री श्री : जीवन मुक्ति मिळाली पाहिजे हि पहिली पायरी आहे.
दुसरी पायरी हि कि, इथे काय कायमचे आहे आणि काय सतत बदलत आहे. तुम्हाला जेव्हा कळेल कि जगामध्ये सर्वकाही सतत बदलते आहे कारण, जो पाहतोय तो बदलत नाही. हे अनुमान पहिल्यांदा येईल. मग, तुमच्या नकळतच तुम्हाला मुक्तपण आणि प्रेम जाणवेल. हे  तुमच्यामध्ये स्वयंस्फूर्त आणि नैसर्गीकरित्या होईल.

प्रश्न: . गुरुजी, खूप लोक असे आहेत कि जे मांसाहार करतात. ते वाईट कर्माचे
गाठोड बांधत नाहीत का? हे पातकी कृत्य नाही का?
श्री श्री : मांसाहार हा अध्यात्मिक उन्नतीसाठी (प्रगतीसाठी) चांगला नाही. तुम्ही जगामध्ये पहिले असेल जेव्हा लोकांनी अध्यात्मिक वाटचालीकडे सुरुवात केली तेव्हा आपोआपच ते शाकाहारी बनले आणि मांसाहार थांबवला.
आज लाखो लोक अमेरिकेमध्ये, रशियामधे, पोलंड मध्ये, आणि जगात इतर ठिकाणी खूप लोक शाकाहारी बनले आहेत. खूप ठिकाणी लोक शाकाहारी आहेत. आपल्या देशामध्ये ५६०० शाकाहारी पदार्थ आहेत. आपल्याला त्याचा प्रसार केला पाहिजे.


The Art of living