ईश्वराचा अनुभव करण्यासाठी तुम्हाला अंतर्मुख व्हावे लागेल  !
१८ डिसेंबर २०११

जर तुम्ही बाहेरील जग बघत राहिलात, तर तुम्हाला परमेश्वर दिसणार नाही. जर तुम्हाला ईश्वराचा अनुभव करायचा असेल तर तुम्हाला अंतर्मुखी व्हावे लागेल.
बाहेरील जग म्हणेज काय? मर्यादित ओळख, आयुष्याबद्दलची मर्यादित अशी समाज आणि लोकांच्या बाहेरील वागण्यावरून त्यांच्याबद्दल मत बनवणे. आपण माणसाचा ' अंतरात्माबघत नाही. उदाहरणार्थ, इथे खूप रंगीबेरंगी दिवे आहेत. जर तुम्ही फक्त दिवेच बघत राहिलात, तर तुम्ही या दिव्यांमधून वाहणारी वीज बघू शकाल का? तसेच, जर तुम्ही माणसांचे फक्त वरवरचे वागणे बघितलेत, तर तुम्ही हे बघू शकणार नाही कि या सर्वांमध्ये एकाच चैतन्य आहे.  म्हणून, जर तुम्हाला ईश्वराला पहायचे असेल, तर तर तुम्हाला अंतर्मुख व्हायला लागेल. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही पळून जाऊन अरण्यात रहा.
काही काळासाठी अंतर्मुख बना. तुमच्यातील गोंधळ आणि उलटसुलट विचार, यामधून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. यालाच 'ध्यान' म्हणतात. फक्त  थोड्या वेळासाठी, अनुभव करा कि भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे एक स्वप्न आहे.
जेंव्हा तुम्हाला माहित असते कि सर्व काही बदलते आहे, तेंव्हा तुम्हाला काहीतरी 'जे बदलत नाही', त्याची एक झलक अनुभवता येईल. तुम्हाला चांगल्या झोपेनंतर जसे ताजेतवाने वाटते, तसेच थोडा वेळ ध्यान केल्याने, तुमच्यामध्ये उर्जा आणि आयुष्याच्या प्रती उत्साह निर्माण होईल आणि चिंता मिटून जातील.


प्रश्न: मी एक 'अनेस्थेसिओलोजिस्त' आहे आणि मी इतर 'सर्जनबरोबर काम करतो. मी बघितले आहे कि ते फक्त पैशासाठी तरुण स्त्रियांचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करतात. हा गुन्हा मला स्त्रीभृणहत्येपेक्षाही मोठा वाटतो. मी या विषयी तक्रार पण केली आहे पण माझे मित्र म्हणतात कि या प्रकरणात पडू नये. मला काळात नाही कि मी या गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवू का स्वत: ला वाचवून ठेवू?
 श्री श्री : याला विरोध हा केलाच पाहिजे. आपण अन्यायाविरुद्ध लढलेच पाहिजे. आपण अज्ञान, अंधश्रद्धा आणि अंधविश्वास याविरुद्ध लढलेच पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटते कि रासायनिक खते वापरल्याने चांगले पीक येईल. आपण त्यांना  सेंद्रिय आणि रासायनमुक्त शेतीबद्दल सांगितले पाहिजे. आपण दारिद्र्य नष्ट करण्यासाठी काम केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये भाजीपाला उगवला पाहिजे. आपण स्वच्छता  आणि आरोग्य राखले पाहिजे.

प्रश्न: मला खूप राग येतो आणि त्याच्यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे. मी ३ दिवसांपूर्वी सुदर्शन क्रिया शिकलो. मी क्रियेनंतर काही तास शांत राहते , पण त्यानंतर काय होते कळत नाही. मी माझ्या पतीशी  उगाच भांडते. मला आत्महत्या करावीशी वाटते आहे.
 श्री श्री : काळजी करू नकोस. तुझी साधना चालू ठेव. सर्व काही ठीक होईल.आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. असे वाटू लागले कि विचार कर, 'तुला काहीही पावले उचलण्याच्या आधी गुरुजींची परवानगी घ्यायची आहे.


प्रश्न: तुम्ही सांगितलेत कि भगवान कृष्ण हे आनंदस्वरूप होते. ते कुठल्याही परिस्थितीत आनंदी असत. पण आजच्या परिस्थितीत, मी तसे जगू शकत नाही.
श्री श्री : पण काही वेळा तरी तुम्ही हे आचरणात आणताय, बरोबर? असे म्हणतात कि ' कृष्ण सारखा विचार करा आणि रामासारखे आचरण करा'. जर तुम्ही कृष्णासारखे वागू लागलात तर संकटात सापडलं ! कृष्णाची तत्व आणि रामाचे चारित्र्य यांचे आचरण करा. कुठलाही तणाव असेल तर तो इथे सोडून द्या. आनंद आणि समाधान हि आपली सहज वृत्ती आहे, पण जसे ढगांनी आकाश झाकोळले जाते तशी आपली वृत्ती थोड्या वेळासाठी काळजीने घेरली जाते.

प्रश्न: जर संपूर्ण अस्तित्व एकाच आहे तर मग कार्माचेही 'joint account ' आहे का?
श्री श्री : होय, कर्म खूप प्रकारची असतात.
१. सांघिक  कर्म
२. वेळेचे कर्म
३. स्थळाचे कर्म
४. कुटुंबाचे कर्म
५. व्यक्तीचे कर्म
वैयक्तिक कर्म असते, मग कुटुंबाचे कर्म असते ज्याला 'DNA ' म्हणतात. मग त्या भागाचे, राज्याचे आणि देशाचे कर्म असते. वेळेनुसार(काळानुसार) कर्म असते. २ ऱ्या महायुद्धाच्या वेळेस, सर्व लोकांचे सारखे कर्म होते आणि म्हणून संपूर्ण जगभरात युद्ध झाले.  नंतर एके काळी जागतिक मंदी होती. कर्माचे वेगवेगळे स्तर आहेत. म्हणूनच कृष्णाने म्हंटले आहे, ' गहना  कर्मणो  गतिः ’. कर्माची व्याप्ती आपण कल्पनाही करू शकत नाही एवढी आहे. कर्माचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करू नका. आपले कर्तव्य करा आणि पुढे चला. हृदयामध्ये प्रेम आणि प्रार्थना असू द्या. जे आहे हे असे आहे, हे स्वीकारून पुढे चला.  फक्त ज्ञानच तुम्हाला या कर्माच्या पार नेऊ शकेल. एक विमान कोसळले आणि सर्वजण ठार झाले. जर एका माणसाचे कर्म या अपघातातून वाचण्याचे असेल, तर तो विमानाच्या बाहेर निघून येईल.
हृशिकेषच्या एका साधूंनी मला सांगितले कि, ते बाकीच्या लोकांबरोबर बस मधून जात असता बस नदीत पडली. एक बाळ आणि हे साधू सोडून सर्वजण मृत्युमखी पडले. बाळाला छातीशी घेऊन ते तेथून बाहेर निघाले. नदीत पडणे हे त्यांचे कर्म होते, पण काही कारणाने ते वाचले. कर्माची व्याप्ती आपण समजू शकत नाही, ती अमर्याद आहे.

प्रश्न: गुरुजी, जेंव्हा जवळच्या कोणाला Cancer होतो, तेंव्हा त्यांचे सांत्वन कसे करावे आणि त्यांना मदत कशी करता येईल?
श्री श्री : त्यांना 'ओम नमः शिवाय' चा जप करायला सांगा. जर दुसरी किंवा तिसरी स्टेज असेल, तर काळजीचे कारण नाही. आजकाल खूप काही उपचार माहित आहेत.  सौर्सोप फळा हेहि  'केमोथेरपी' सारखेच औषध आहे आणि त्याचे इतर काही दुष्परिणाम नाहीत. आपण त्यापासून काही औषधे बनवत आहोत. योग, प्राणायाम आणि आयुर्वेदामुळे लक्षणीय फरक पडेल. बरेच जण इथे येऊन बरे झाले आहेत. देवावर विश्वास ठेवा. 

 प्रश्न: गुरुजी, कृपया जप आणि संकीर्तन याबद्दल काही सांगा.
श्री श्री:  जेंव्हा एखादा कोणाच्या प्रेमेअत पडतो, ते त्यांच्या प्रियकराचे/प्रेयसीचे नाव सतत घेत राहतात, यालाच 'जप' म्हणतात. आणि जेंव्हा ते त्यांच्या प्रिया व्यक्तीच्या नावाचे (गुण) गान करतात, त्याला संकीर्तन म्हणतात. 
प्रत्येकजण काहीतरी गुणगुणत असते, अंघोळ करताना किंवा इतर दैनंदिन कामे करताना, यालाच संकीर्तन म्हणतात, हृदयातून स्फुरलेले  गाणे. जेंव्हा मनात कोणाचातरी नामघोष होत असतो, त्याला जप म्हणतात. जरी त्यामध्ये लक्ष असो किंवा नसो, 'जप' करणे चांगले, त्याचे एक वेगळे असे खास महत्त्व आहे.

प्रश्न: गुरुजी, कधी कधी आईवडिलांच्या जगण्याची तत्त्व हि मुलांच्यापेक्षा खूपच वेगळी असतात. आणि जरी मुल हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असले, तरीही त्याच्या तत्त्वांमुळे, वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याचे नुकसान होते आणि आईवडिलांचे जगणे अवघड होऊन जाते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे?
श्री श्री : लोकांमध्ये ज्ञान आणि सजगता आण. अध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे हे घडते. ते एकमेकांमध्ये आणि आजूबाजूच्या घडामोडींमध्ये गुंतून पडतात. ते ना स्वत:ला समजू शकत ना एकमेकांना आणि दोघांनाही त्रासात पाडतात. म्हणून लोकांना धर्माच्या मार्गावर घेऊन या. मुलांना अध्यामिक शिक्षण देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण त्यांना यापासून वंचित करतो आणि मग ते ऐहिक अशा दैनंदिन गरeजांमध्ये अडकून जातात, जीवन शुष्क आणि अर्थहीन होऊन जाते आणि मग भांडणतंटे सुरु होतात.
म्हणून आपण योग आणि ध्यानाद्व्यारे मुलभूत बदल घडवून आणला पाहिजे.
ते बदलतील, पण ज्ञान हा एकच मार्ग आहे.

प्रश्न: गुरुजी, आनंद हि निव्वळ चित्ताची एक अवस्था आहे, हे जाणल्यावारही ,  कोणी झाडूवाला होण्या ऐवजी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होणे का पसंत करतो ?
श्री श्री : मग कोणी विचारेल कि ' झाडूवाला होण्या ऐवजी शास्त्रज्ञ का नाही व्हायचे?. या २ वेगळ्या गोष्टी आहेत, जो प्रसिद्ध होतो त्याला फक्त प्रसिद्धीची हाव नसते, पण ते काहीतरी चांगले करतात आणि म्हणून ते प्रसिद्ध होतात. जसे कि जर तुमच्यामध्ये चित्रकार होण्याची उत्कट इच्छा असेल आणि तुम्ही चांगले चित्र काढत असाल तर आपोआप तुम्ही प्रसिद्ध व्हाल. पण जर तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी चित्र काढत असाल तर तुम्ही अपयशी व्हाल. जो कोणी काहीतरी सृजनात्मक किंवा उपयुक्त करतो किंवा काही समाजासाठी चांगला असा शोध लावतो, तो आपोआप प्रसिद्ध होतो.

प्रश्न: गुरुजी, जेंव्हा लोक शाकाहारी होतात तेंव्हा त्यांच्यामध्ये बी १२ विटामिन ची कमतरता निर्माण होते.
श्री श्री : हो, जर का त्यांनी दही आणि दुध खाल्ले नाही, तर शाकाहारी लोकांमध्ये  बी १२ विटामिन ची कमतरता होते. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे थोड्या प्रमाणात का होईना पण शाकाहारी .लोकांसाठी आवश्यक आहेत.

प्रश्न: गुरुजी, मला तुम्हाला विचारायचे आहे कि चांगले काय आहे आणि वाईट काय आहे? आणि मला हे कसे कळेल कि मी जे करतो आहे ते चांगले आहे का वाईट?
श्री श्री : चांगले काय आणि वाईट काय याची साधी सोपी व्याख्या आहे.
१. जे दुसऱ्यांनी तुमच्याबरोबर वागू नये असे वाटते ते वाईट आणि जे इतरांनी तुमच्याशी आणि तुम्ही इतरांशी  वागावे असे वाटते, ते चांगले.
२. जे तुम्हाला अल्पकालचा आनंद आणि दीर्घकाळाचे दुख्ख: देते  ते वाईट. ते जे तुम्हाला दीर्घकाळाचा आनंद आणि अल्पकालाचे  दुख्ख: देते, ते चांगले.


 The Art of living

© The Art of Living Foundation