सत्य एक आहे पण त्याच्या अनेक छटा आणि पैलू  आहेत
बंगलोर: दि. २ डिसेम्बर २०११

प्रश्न : जय गुरुदेव गुरुजी, आकर्षण आणि प्रेम यांत काय फरक आहे ? 
श्री श्री  : आकर्षण हो फक्त काही काळापुरते असते पण प्रेम हा आपला खरा स्वभाव आहे. आकर्षण हे सुखाशी सम्बंधीत असते आणि ते येते आणि जाते त्याउलट प्रेम हे आपोआप होते आणि ते आपल्याबरोबरच रहाते.प्रेमाशिवाय तुमचे अस्तित्व असूच शकत नाही.


प्रश्न : गुरुजी, दानाचे महत्व काय ? सर्वात उच्च प्रतिचे दान कोणते ? 
श्री श्री  : दानाने मनाची आणि ह्रदयाची शुद्धी होते. दान म्हणजे वाटून घेणे. पण दान हे सर्वश्रेष्ठ कार्यही समजले जात नाही कारण तुम्ही नेहमीच जो तुमचा आपला नाही त्यालाच दान देता.तुम्ही असे कधी म्हणत नाही की, “मी माझ्या मुलाला किंवा मुलीला दान दिले.” म्हणून पहिली पायरी आहे करुणा. दुसरी पायरी आहे दान, जे तुमच्याकडे आहे ते दुसऱ्या गरजवंतला देणे आणि मग तिसरी पायरी म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही वाटून घेता त्यांच्याबद्दल आपलेपणा जाणवणे कारण आपलेपणा असेल तरच तुम्ही वाटून घेऊ शकता. आणि तुम्हाला असे वाटतहि नाही की तुम्ही दान केले आहे आणि तुम्ही दान केलेले असते. ते खरे दान.
खरी सेवा म्हणजे, “मी सेवा केली”, असे वाटू न देता केलेली सेवा. समजा एखादी मुलगी खाली पडलेली तुम्हाला  दिसली तर तुम्ही जाऊन तिला उचलता, तिच्या जखमेवर पट्टी बांधता आणि तिची काळजी घेता.आणि त्यानंतर तुम्ही असे म्हणत नाही की, “मी त्या मुलीची केवढी मोठी सेवा केली.” करण माणुसकीच्या नात्याने तुम्ही मदत केल्या शिवाय राहूच शकत नाही. कुणालातरी lagale लागले आहे असं असताना तुम्ही निघून जाऊच शकत नाही. तसं शक्यच नाही. म्हणूनच सेवा करण हे अगदी स्वाभाविक असल पाहिजे.


प्रश्न : गुरुजी, मी स्वतःला असं कसं बनवू की जेणेकरून मी देवाची इच्छा असेल तेच करेन ?
श्री श्री  : त्यासाठी पूर्णपणे रिकामा हो आणि देवाची प्रार्थना कर की तसेच होऊ दे.


प्रश्न : गुरुजी, भक्त गुरूला शोधतो की गुरु भक्ताला शोधतो ? गुरु म्हणजे काय ? 
श्री श्री  : इंग्रजीतला ‘गाईड’ शब्द संस्कृत मधल्या ‘गुरु’ पासून तयार झाला आहे. ‘गुरु’ म्हणजे जो अज्ञान घालवतो आणि ज्ञान देतो. गुरु हे शिकवतो की नुसत्या पुस्तकी माहितीवर जगण्यापेक्षा अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानावर कसे जगावे. आई तुम्हाला अनुभवातून शिकवते, ती तुमची पहिली गुरु असते. मग तुम्हाला गणित, संगीत, फुटबॉल किंवा क्रिकेट शिकवणारे तुमचे गुरु असतात.त्यानंतर सद्गुरू जे तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान देतात जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुम्हीचं चेतना आहात.


प्रश्न : गुरुजी, मी काम वासनेच्या विचारांनी अस्वस्थ आहे. यातून माझी सुटका कशी होईल ? 
श्री श्री  : ‘ निस्सीम साधकासाठी एक अंतरंग वार्ता ’ नावाचे पुस्तक वाचा. त्यात कामवासना, क्रोध, हाव, मोह याबद्दल मी बोललो आहे. त्या पुस्तकात या सर्वांचा उल्लेख आहे.


प्रश्न : गुरुजी, माणूस कोमामध्ये गेल्यानंतर त्याच्या चेतनेचे काय होते ? 
श्री श्री  : चेतना असते पण बाहेरच्या जगाशी सम्पर्क करण्याचे कुठलेही साधन त्याच्याकडे नसते. जसे तुमच्याकडे टेलिफोन आहे पण सम्पर्क यंत्रणा तुटली आहे. 


प्रश्न : गुरुजी, आपण ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा स्वीकार कसा करायचा ? 
श्री श्री  : ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना स्वीकारायची गरजच नसते. तिथे स्वीकारायचा प्रश्नच येत नाही. जर आव्हान असेल तर ते, तुम्ही ज्यांचा तिरस्कार करता त्यांचा स्वीकार करण्याचे. असे काही लोक असतात ज्यांच्या अज्ञानानामुळे ते तुमचा तिरस्कार करतात. ते तुम्हाला plakhatओळखत नाहीत म्हणून त्यांना तुम्ही आवडत नाही. तुम्ही काय करू शकता ? तुम्ही फक्त त्यांचा स्वीकार करता. तुम्ही त्यांचा स्वीकार केला नाही तर तुमच्या मनाला त्रास होईल. म्हणूनच ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करा. ते फक्त एक भूमिका करताहेत. या करोडो लोकांच्या जगात सर्वांना तुम्ही आवडायलाच पाहिजो असे काही नाही. असंही कुणीतरी असेल ज्याला तुम्ही आवडत नाही. म्हणूनच स्वीकार करा आणि तुमच्या मनाला वाचवा. त्यांना तुम्ही आवडत नसाल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही.


प्रश्न : कुणाचे ऐकायचे , डोक्याचे की हृदयाचे ?
श्री श्री  : कधी तुमच्या डोक्याचे तर कधी हृदयाचे. जेव्हा तुम्ही व्यवसाय करत असता तेव्हा डोक्याचे ऐका आणि जेव्हा सेवा करत असाल तेव्हा हृदयाचे. जेव्हा तुम्ही जीवनाचा आनंद उपभोगत असाल तेव्हा हृदयाचे ऐका त्यावेळी हिशोब करत बसू नका. तुम्ही तुमच्या ग्राहकाबरोबर असाल तेव्हा हिशोब करायला हरकत नाही.पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा कुटुंबियांसोबत हिशोब करायला लागलात तुम्ही त्यांना वैताग आणाल.


प्रश्न : गुरुजी, आय.आय.टी. मुंबईचे बोधवाक्य आहे ‘ ज्ञानं परम धीमही’. आम्ही कोणते ज्ञान मिळवावे ?
श्री श्री  : सर्व प्रकारचे ज्ञान आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही सगळे शिकावे. तामिळमध्ये एक जुनी म्हण आहे, ‘ चोरी कशी करायची हेसुद्धा शिकावे आणि मग विसरून जावे. राजे आणि राजकारणी यांनी सर्व ६४ कला शिकाव्या असे म्हणतात आणि त्यातली एक कला आहे , ‘चोरी कशी करावी’ म्हणजे त्यांना चोराची मनोभावना लक्षात येईल आणि करुणा भाव ठेऊन योग्य ती शिक्षा देतील. त्यामुळे शिकताना काय शिकायचे आणि काय नाही असे ठरवून शिकू नका. तुम्ही सर्वांकडून शिका. वाईट माणसाकडून शिका आणि चांगल्या मान्साक्दुन्ही शिका, लहान मुलाकडून शिका आणि वयोवृद्ध व्यक्ती कडूनही शिका.संस्कृत मध्ये आणखी एक म्हण आहे, दुर्जनं प्रथमं वन्दे’, दुर्जनाला प्रथम नमस्कार करा करण कसे वागू नये हे त्याने स्वतः किंमत मोजून तुम्हाला शिकवले आहे. चांगल्या माणसाला नंतर नमस्कार करा ज्याने आधी स्वतः त्या मार्गावर वाटचाल करून तुम्हाला आनंदाचा मार्ग दाखवला.


प्रश्न : मी आतापर्यंत आठ अडव्हान्सड कोर्स केले आहेत तरीही अजूनही बरेचदा सजगता रहात नाही . सतत काहीप्रमाणात तरी सजगता रहावी म्हणून काय करावे ? 
श्री श्री  : ऐका, स्वतःची अति जास्त तपासणी करू नका. तुम्ही तुमची सजगता घालवत असाल तरी ठीक आहे.ती परत येईल. स्वाभाविक आणि साधे रहा. अडव्हान्स्ड कोर्स किती केले यावर तुमची सजगता ठरणार नाहीये. पुन्हा पुन्हा ध्यान करा ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकत रहा. मग काही काळानंतर तसे होईल. कधी होईल आणि काय होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही बघा, तुमच्यात एक स्वाभाविक अशी प्रगती झालेली आहे. ही प्रगतीची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्हाला जास्त आनंदी आणि जास्त निवांत वाटू लागते. हे सायकल चालवायला शिकण्यासारखे असते. पहिल्यांदा शिकत असताना तुम्ही बरेचदा घसरून पडता आणि मग तुम्हाला तोल सावरायला जमते. पाच वर्षांपूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटत होत्या त्यांचा आता तुम्हाला त्रास वाटत नाही. तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आला आहे ? ज्या गोष्टींनी तुमच्या भावना उफाळून यायच्या त्या गोष्टींचे आता तुम्हाला काही वाटत नाही. कुणी टीका केली तरी आता तुम्हाला त्याचा त्रास होत नाही, तुम्ही ते हसत हसत स्वीकारता. माझ्या भावना या माझ्या आहेत आणि त्याच्यावर दुसरा कुणी हुकुमत गाजवू शकणार नाही. माझ्या आनंदाला, माझ्या मनाच्या स्थितीला कुणीही धक्का लावू शकणार नाही. ही तुमच्यातले स्वातंत्र्य पाहिजे आहे.


प्रश्न : प्रिय गुरुजी, आदि शंकरांनी अद्वैताचा विचार मांडला. याचा अर्थ त्यांच्या आधी होऊन गेलेले ज्ञानी सिद्ध गुरुना  सत्याचे  निराळे स्तर जाणवले होतो का ? सत्य हे एकच असते नां ? 
श्री श्री  : सत्य एक आहे पण त्याच्या अनेक छटा आणि अनेक पैलू आहेत. तेच पैलू परंपरेतील निरनिराळ्या गुरुनी स्पष्ट केले.


प्रश्न : ‘ शरण जाणे ‘ आणि ‘ सोडून देणे ‘ यांत काय फरक आहे ? 
श्री श्री  : शरण जाण्याची काळजी करू नका निवांत रहा आणि घरच्यासारखे आरामात रहा . जेव्हा तुम्ही रागावलेले असाल किंवा निराश झाला असाल तर तुम्ही म्हणता, ‘ मी नाद सोडून देतो. ‘ पण जेव्हा तुम्ही म्हणता की ,’ हे खूप महत्वाचे आहे पण मी त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. आता देवालाच बघून घेऊ दे. ती दैवी शक्तीच आता काळजी घेऊ दे . अशा भावनेने जेव्हा तुम्ही निश्चींत होता तेंव्हा त्याला तुम्ही शरण जाणे असे म्हणू शकता. 


प्रश्न : गुरुजी, आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या फायद्याचे  एखादे कृत्य आपण करतो तेव्हा तेही भ्रष्टाचारी कृत्य असते का ? 
श्री श्री रविशंकर : भ्रष्ट कृत्य म्हणजे असे कृत्य जे, आपले स्वतःचे वाटतात त्यांच्या बाबतीत तुम्ही ते करणार नाही पण जे तुम्हाला आपले स्वतःचे वाटत नाहीत त्यांच्या बाबतीत तुम्ही ते करता. ते भ्रष्ट कृत्य आहे.


प्रश्न : गुरुजी, मी यु.एस.ए. मध्ये राहणारा एक आर्ट ऑफ लिव्हींगचा प्रशिक्षक आहे. आमचे वागणे कसे असावे जेणे करून लोकपाल विधेयाकासोबतच आम्ही भ्रष्टाचाराचेही  निर्मूलन करू शकू ? 
श्री श्री  : आपण असं करू शकतो की आपण शपथ घेऊ शकतो की मी लाच देणार नाही आणि घेणार नाही. बस , आणि एकदा शपथ घेतली की तुम्ही त्याला चिकटून रहाल. एकट्या व्यक्तीला हे कदाचित अवघड असेल. म्हणूनच एकत्र यायला हवे आणि एकत्रितपणे दबाव आणून तुमचे काम करून घेतले पाहिजे. एक कारखानदार कदाचित् असे काम करून घेऊ शकणार नाही कारण वेळ म्हणजे त्याच्यासाठी यश किंवा अपयश असते आणि फायदाही असतो. म्हणून तो लाच देतो आणि काम करुन घेतो. पण आश्रमात आपण कडक तत्व पाळू शकतो. कारखानदार काय करू शकतात तर एकत्र येऊ शकतात. ज्या कारखानदारांवर दबाव आणला गेला त्या सर्व कारखानदारांनी एकत्र येउन “नाही” म्हणण्याची गरज आहे. “’आम्ही तुम्हाला लाच देणार नाही. तुम्ही आम्हाला परवाना द्यायलाच हवा’.” म्हणूनच लोकपाल विधेयकाची गरज आहे. जर लोकपाला आले तर लोक लगेच लोकपालाकडे जातील आणि सांगतील की ही व्यक्ती लाच मागत आहे.



The Art of living
© The Art of Living Foundation