काहीही झाले तरी तुम्ही जेंव्हा आनंदी राहू शकाल, तीच खरी आध्यामिकता.
३१ डिसेंबर २०११ 

नवीन वर्ष हे समाधानाचे  वर्ष आहे.
वैदिक कालमापन पद्धतीप्रमाणे या वर्षाचे नांव "नंद" म्हणजेच "आनंद" आहे. हे वर्ष समाधानाचे  आहे. मागील वर्ष हे निश्चीततेचे होते. त्या मागील वर्ष हे गोंधळ आणि गैरसमजांचे होते.परंतु आता येणारे नवीन वर्ष हे आनंदाचे आणि समाधानाचे आहे.म्हणूनच यावर्षी आपण सर्वांनी समाजात जास्तीत जास्त आनंद निर्माण करण्याचे ठरविले पाहिजे.
तुम्ही जर आयुष्याकडे बारकाईने पाहिले, तर असे दिसेल कि त्याचे सर्व पैलू आनंद निर्माण करण्या करिता असतात.
करमणूक हि आनंदासाठी असते.राजकारण हे लोकांपर्यंत आनंद पोहोचविण्यासाठी असते.अर्थकारण हे सुद्धा आनंदासाठी असते, त्याचप्रमाणे ज्ञान हे सुद्धा आनंदासाठीच असते.तुम्ही मग कोणताही विषय घ्या किंवा जीवनाचे कोणतेही ध्येय बघा ते नेहमी आनंदासाठीच असते. पण हल्ली आपल्या समाजाला याचा विसर पडलेला दिसतोय.
ध्येयाचा विसर पडून आपण मधेच कोठे तरी भरकटलो आहोत. आपल्याला असे वाटू लागले आहे, कि साधन हेच साध्य आहे आणि साध्याकडे जाणारा मार्ग हेच आमचे घर बनू पाहत आहे.
महामार्गावरून तुम्ही वाहन चालवीत असतांना तुम्हाला कोठे जायचे आहे ते विसरून तुम्ही जर नुसते वाहन चालवीत राहिलात, तर जसे होईल तसे आत्ता होत आहे.
तुम्हाला जर पैसा, राजकारण आणि करमणूक हे जर साध्य वाटत असेल तर ते तसे नाहीये. आनंद मिळविण्याची हि तर साधने आहेत.खरे तर आनंदासाठी काही अटी नसतात.हे सर्वकाही असून सुद्धा काहीजण ध्येयापर्यंत पोहोचत  नाहीत तर काहीजण त्यांच्याजवळ यातले काही नसूनसुद्धा आपले ध्येय गाठू शकतात .
काहीही झाले तरी तुम्ही जेंव्हा आनंदी राहू शकाल, तीच खरी आध्यामिकता.
अगदी काहीही झाले, जीवनात कितीही चढ उतार आले तरी जेंव्हा तुम्ही आनंदी राहायचे ठरवू शकता, तेंव्हाच तुम्ही आनंदी होशकता.
अशी एक गोष्ट निदर्शनास येते कि, हल्लीच्या जगात लोक आता सकल राष्ट्रीय उत्पादना ऐवजी सकल राष्ट्रीय आनंदाविषयी बोलायला लागले आहेत.
मला असे वाटते कि प्रथम इंग्लंडमध्ये , नंतर अमेरिकेत , व नंतर सर्वदूर युरोपमध्ये या सकल राष्ट्रीय आनंदा विषयी लोक बोलू लागले आहेत.
बांगलादेश आणि भूतान सारख्या छोट्या देशात जेथे उत्पन्नाची साधने फार कमी आहेत, तेथे सकल राष्टीय आनंद हा स्कॅन्डीनेविया सारख्या जास्त आर्थिक प्रगती असलेल्या पण कमी आनंद असणाऱ्या  देशांपेक्षा खूप जास्त आहे. असे लक्षात घ्या कि येथे मुद्धा काय आहे आणि आपण त्यातून काय धडा घ्यायला पाहिजे?
अशा वेळी आपण सर्व जगाला जागृत व्हायला सांगून, त्यांना आनंदी व समाधानी व्हा असा संदेश दिला पाहिजे.
आध्यात्मिक जागृती व माणुसकी यांची एक प्रकारची चळवळ उभी करण्याची गरज आहे. माणुसकी जर नष्ट झाली तर हे  माणसांचे सुंदर जग न राहता एक प्राण्यांचे वसतीस्थान जंगल होऊन जाईल.माणुसकी सारख्या मुल्यान्शिवाय या जगाला फक्त माणसांचे जग कसे म्हणणार? त्यांना तर प्राण्यांचे जग पण म्हणता येणार नाही कारण प्राण्यांच्या जगात पण त्यांचे काही नियम व पद्धती आहेत.
सिंहाला जर भूक नसेल तर तो शिकारीच्या मागे लागत नाही, शिकार अगदी त्याच्या जवळ असेल तरी.पृथ्वीवरचा कोणताच जंगली प्राणी जंगलात प्रदूषण करीत नाही.लक्षावधी वर्ष जुनी असलेल्या जंगलात तुम्हाला कोठेही प्रदूषण सापडणार नाही.जंगली प्राणी सर्व जंगल स्वच्छ ठेवतात.
मनुष्याच्या उपभोग व लालसी वृत्तीने पृथ्वीचा नाश होऊ पाहत आहे. अशाने हि पृथ्वी पुढील पिढ्यांना राहण्या योग्य राहणार नाही.आणि यासाठी हे वर्ष महत्वाचे आहे.
आर्ट ऑफ लिविंगचे सभासद या नात्याने तुमच्यावर एक मोठी जबाबदारी अशी आहे कि मानवी मूल्ये ,आध्यात्मिक मूल्ये आणि परिस्थितीजन्य मूल्ये या विषयी जागृती निर्माण करणे. या बाबतीत तुम्ही पुढाकार घेऊन जागृती निर्माण करणे व त्याचा प्रसार करण्याची गरज आहे.
वर्ष २०११ मध्ये आपण अनेक चढ उतार पाहिले.काही मुठभर लोकांचा स्वार्थीपणा, हिंसाचार आणि एकाधिकारशाही विरुद्ध त्या त्या दबावाखालील लोकांनी जागृत होऊन केलेला उठाव आपण पाहिला. २०११ मध्ये असे उठाव आपण अरब देशांमध्ये पाहिले.
येते नवीन वर्ष हे अशा लोकांच्या जखमांवर मग त्या शारीरिक , भावनिक व आध्यात्मिक असोत यावर  मलम पट्टी करणारे असेल अशी आपण आशा करीत आहोत.आपली हि एक मोठी जबाबदारी  आहे. आपण सर्वांनी जागृत होऊन भंगलेली हृदये सांधण्यासाठी समाजात आशेची नवी लाट निर्माण करण्याची गरज आहे.
मागील काही काळ आर्ट ऑफ लिविंग हिंसाचार आणि भय मुक्त समाज निर्मितीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करीत आहे. त्या दृष्टीने आम्ही काही चांगली वाटचाल केली आहे आणि आम्हाला त्या दृष्टीने काही यशही  मिळाले आहे.
कंपन्यांबरोबर आणि इतरांबरोबर या कामामध्ये आम्हाला जे यश मिळाले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम राबविले आणि त्यातून अनेक लोकांचे आम्ही अश्रू पुसले पण अजून बरेच काही करावयाचे आहे.आणि आम्ही ते आनंदाने करीत राहू.
आज आम्ही सुमारे चाळीस मिनिटांची एक सुंदर अशी ध्यानधारणा केली, जी सर्वांनाच एक स्थिर आणि चित्ताकर्षक अनुभूती देऊन गेली. जगातील अनेक लोक यात सहभागी झाले होते आणि माझी अशी खात्री आहे कि यातून जगात हवे असलेले बदल घडवून आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.


The Art of living
© The Art of Living Foundation