मला तुम्हाला पकडून ठेवायची गरज नाही कारण तुम्ही माझ्यातच आहात !
१० जानेवारी २०१२
कैलाश या शब्दाचा अर्थच, जिथे फक्त आनंदोत्सव आहे, हर्ष आहे, या शिवाय काहीही नाही. त्याच प्रमाणे वैकुंठ, जिथे नारायण राहतो त्याचा अर्थ अशी जागा, जिथे कशाची ही कमतरता नाही. सगळे काही मुबलक आहे, वैभव आहे आणि आनंद आहे. कैलाश आणि वैकुंठ कुठे दूर आहेत का? कुठे आहेत? अगदी इथेच!!
जेंव्हा तुम्ही ‘विशालाक्षी’ हे गाणे म्हणता त्याचा अर्थ काय? ज्याचे डोळे मोठे आहेत, दृष्टी विशाल आहे.
प्रश्न: प्रिय गुरुजी,शिव सूत्रात असे म्हंटले आहे – ‘ज्ञानं बंध’. ज्ञान हे बंधन कसे?
श्री श्री: तुम्ही त्याचा अभ्यास करा. मी त्याबद्दल बरेच बोललो आहे. संपूर्ण शिव सूत्र वाचा.

प्रश्न: गुरुजी, साधेपणा आणि अहंभाव यांचे प्रमाण आयुष्यात कसे असावे? मी यांचा मेळ कसा घालू? कारण मी जेंव्हा साधेपणाने वागतो तेंव्हा लोक मला गंभीरपणे घेत नाहीत.
श्री श्री: तोच तुमचा विवेक, फरक करण्याची जाण आहे. तुम्हाला कुठे काय करायचे कळते. सगळ्यात चांगले जे करायचे ते उस्फुर्तपणे करा.
प्रश्न: गुरुजी, माझा परिवार काश्मीरचा आहे आणि आम्हाला दहशतवादामुळे तिथून जबरदस्तीने इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. काश्मीर मध्ये जर इतके अध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञान आहे आणि जर पुष्कळ संत आणि सुफी निर्माण झाले आहेत, तर तिथे इतका हिसाचार का?
श्री श्री: वेळ बदलत असते. काश्मीर मध्ये धर्मान्धता आली, पण आता पुढच्या पिढीला हे कळले आहे. त्यामुळे तुमचा पाया तिथे असू द्या. काश्मीर खोऱ्यात परत जा. अजूनही काही लोक इथे आहेत. आता लोकांना कळू लागले आहे की आपण इथे आपले पंडित गमावून बसलो आहोत. पूर्वी इतके चांगले वातावरण होते, पण आता तसे नाही. त्यामुळे ते आता स्वागत करत आहेत; तुम्ही परत काश्मीर ला जा,  जागा विकत घ्या, तिथे राहा किंवा कमीतकमी भेट तरी देत राहा. काश्मीर मधून खूप लोक जे बाहेर आले आहेत त्यांना परत जायचे नाही, ही समस्या आहे. आता परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्ही परत जाऊन तुमच्या हक्काची मागणी केली पाहिजे.
प्रश्न: गुरुजी, मला माझी नोकरी आणि ‘आर्ट ऑफ लिविंग’ दोन्ही मध्ये १००% राहायचे आहे. पण मी जेंव्हा एका ठिकाणी १००% लक्ष देतो तेंव्हा दुसरीकडे दुर्लक्ष होते. मी काय करू?
श्री श्री: असे होण्याचे कारण नाही!
तुम्हाला माहीत आहे, आपले संपूर्ण देशातील आर्ट ऑफ लिविंग मधले बरेच विश्वस्त, APEX चे लोक हे इतर बऱ्याच गोष्टी करत असतात. त्याचा स्वतःचा व्यवसाय, नोकरी आहे आणि तरीही ते यात व्यस्त आहेत. हजारो शिक्षक आपला व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय चांगला चालला  आहे आणि ते ‘आर्ट ऑफ लिविंग’ चे कोर्स पण घेतात, ते दोन्ही करतात. तुम्ही त्यांचा अनुभव ऐकला पाहिजे. आता ‘टीचर रिफ्रेशर मीटिंग’ ला देशभरातून शिक्षक आले होते. ३१५ उद्योगपती आले होते जे कोर्स घेतात. ते म्हणाले ‘गुरुजी, आधी आम्ही काही करत नव्हतो तेंव्हा आमचा उद्योग यथातथा चालत होता, पण आम्ही आर्ट ऑफ लिविंग कोर्स शिकवायला लागल्यापासून आमचे आमच्या व्यवसायकडे लक्ष दिले जात नाही पण तरीही तो चांगला चालला आहे. काही लोकांची उलाढाल ४ ते ५ पटींनी वाढली आहे. ते त्यांचे अनुभव सांगत होते.
त्यामुळे या दोन गोष्टी परस्परविरोधी समजू नका. या पैकी एकच, असा विचार करू नका. तुम्ही दोन्ही करू शकता. जेंव्हा तुम्हाला असे वाटेल कि आता मी देशासाठी, जगासाठी मोठी जबाबदारी घ्यायला तयार आहे, जेंव्हा तुमच्या स्वतःच्या गरजा कमीतकमी असतील तेंव्हा तुम्ही पूर्णवेळ काम करा, आणि आम्ही तुम्हाला ठिकठिकाणी पाठवू. पण जेंव्हा तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतील आणि काही गरजा असतील, तेंव्हा तुम्ही दोन्ही करा.
प्रश्न: गुरुजी, मला काही कारणाने आज खूप दुखी वाटत होते, पण तुम्हाला इंटरनेट वरून बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर खूप आनंदी वाटत आहे. तुमची जादू जगभरात जाळे विणत आहे. माझे आजचे विचार तुम्ही पकडलेत का?
श्री श्री: मी तुम्हाला पकडू शकतो, तुमचे विचार पकडण्याची गरज नाही!. विचार येतात आणि जातात त्यांना धरून बसू नका. त्यांना स्वतःचे करू नका आणि मी त्यांना आपले करत नाही. पण मला तुम्हालाही पकडायची गरज नाही, कारण तुम्ही माझेच आहात. जर तुम्ही माझ्यापासून वेगळे असाल तर मला तुम्हाला पकडायची गरज पडेल. तुम्ही माझेच एक अंग आहात.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही सांगितले आहे की सगळ्यांवर प्रेम करा. या सौद्यात सगळे जण माझ्यावर प्रेम करू लागले आहेत. त्यामुळे मला १ जोडीदार निवडणे कठीण झाले आहे. मी काय करू?
श्री श्री: ठीक, मी हे आव्हान तुमच्यावर सोपवतो. मला बघू दे तुम्ही काय करता, आणि कोणाला निवडता. तुम्ही कोणाला निवडता की कोणी तुम्हाला निवडते, बघू. पण खूप उशीर करू नका. एक ६२ वर्षाचे सद्गृहस्थ आले आणि मला म्हणाले ‘गुरुजी, मला लग्न करायचे आहे. मी एका योग्य मुलीच्या शोधात होतो आणि मला ती गेल्या ६० वर्षात मिळाली नाही. मी त्यांना सांगितले ‘ठीक आहे, तुम्ही अजून १५ वर्ष शोधा. कदाचित तुम्ही एकमेकांना स्वर्गात किंवा नरकात भेटाल!!‘
जर तुम्हाला ६२ वर्षात या पृथ्वीवर एक जोडीदार सापडला नसेल तर अजून काही वर्षात तो सापडेल याची काय खात्री ? !!
प्रश्न: गुरुजी, मी जेंव्हा आश्रमात असतो/असते तेंव्हा मी खूप खुश आणि उत्साही असतो, पण जेंव्हा घरी जातो तेंव्हा लगेच सगळे गळून पडते. मला त्याच्या कमीतकमी अर्धे तरी खुश आणि उत्साही राहवे म्हणून मदत करा.
श्री श्री: तुमच्या घरातल्या सगळ्यांनी कोर्स केला आहे का? नसेल तर त्यांना करायला लावा. ज्ञान, प्रवचन ऐका, भजन गात जा. तुम्ही निश्चय करा, काहीही झाले तरी मी हे आव्हान स्वीकारेन; माझा उत्साह कमी होऊ देणार नाही.
तुम्हाला माहित आहे तुमचा उत्साह का गळून पडतो? कारण तुम्ही दुसऱ्याबरोबर वादविवाद करता, दुसरेही तुमच्या सारखे असावेत अशी अपेक्षा करता, जो अनुभव तुम्ही इथे घेतला आहे, तसेच तेही समजूतदार असावेत अशी अपेक्षा करता. या गोष्टी होणार नाहीत. तुम्हाला ‘आर्ट ऑफ लिविंग’ चे पहिले तत्त्व अमलात आणावे लागेल ‘लोक आणि परिस्थिती यांचा जसाच्या तसा स्वीकार करा’.
प्रत्येक परिस्थितीत मला यातून काहीतरी सुख, मजा यांचा अनुभव येईल या दृष्टीकोनातून त्यात अडकून पडू नका. जेंव्हा तुम्ही मौज आणि सुखाच्या मागे जाल तेंव्हा कुठेना कुठे तुम्हाला दु:खाचा अनुभव येईल. फक्त मौजमजा आणि सुख हा जीवनाचा उद्देश नाही. लोकांना जसे आहेत तसे स्वीकारा आणि गाढ ज्ञानात राहा. याने प्रचंड फरक पडेल.
प्रश्न: प्रिय गुरुजी, आज अभियांत्रिकी महाविद्यालात पदवी मिळविण्यासाठी आम्हाला जवळपास ५४ विषय शिकावे लागतात. पूर्वीच्या काळी, जसे नालंदा विद्यापीठात, विद्यार्थ्यांना इतके विषय शिकावे लागत का? कृपया यावर काहीतरी करा.
श्री श्री: होय, तेंव्हाचे लोक खूप अभ्यासु होते. त्याकाळी विद्यार्थ्यांना करमणुकीसाठी कधीच वेळ मिळत नसे. एक म्हण आहे ‘जर तुम्ही विद्यार्थी असाल तर सुख, हर्ष तुमच्यासाठी नाही, आणि जर तुम्ही मौजमजेच्या मागे लागलात तर तुम्ही विद्यार्थी नाही’
तुम्हाला कठोर मेहनत घ्यावीच लागेल. त्या काळी लोक कठोर मेहनत घेत होते. आता संगणक, कॅल्क्युलेटर आहेत. मागच्या पिढीकडे हे नव्हते. सगळे पाढे पाठ करावे लागत, कितीतरी गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या लागत.
वास्तविक त्या काळी मेंदूचा खूप वापर होत असे, हल्ली आपण मेंदू फार वापरत नाही. तुम्हाला आठवतं काही वर्षापूर्वी जेंव्हा मोबाईल फोन नव्हते, तेंव्हा तुम्हाला लोकांचे फोन क्रमांक लक्षात ठेवावे लागत? आपल्यकडे तेंव्हा फक्त Landline phone होते, आपण लोकांचे फोन क्रमांक लक्षात ठेवत असू. आज मोबाईल फोन मुळे कोणीही क्रमांक लक्षात ठेवत नाही. एकदा तो तुम्ही फोन च्या मेमोरी मध्ये ठेवला कि झाले. तुम्ही फक्त नावाचे बटन दाबले कि क्रमांक आपोआप येतो. बरेचदा तुम्हाला तुमचा स्वतःचा क्रमांकही माहित नसतो.
आपण आपली स्मरणशक्ती कमी आणि तंत्रज्ञान जास्ती वापरतो. काही वेळेला अशी भीती वाटते की आपण आपली स्मरणशक्ती हरवून बसू, आणि हे वेगाने घडत आहे.
कोणीही तरुण जर आठवड्यातून २ सिनेमे बघत असेल आणि ३ महिन्याने तुम्ही त्याला कोणत्याही एका सिनेमाचे कथानक विचारले तर त्यांना काही आठवणार नाही. ते एका सिनेमाचे कथानक दुसऱ्यात मिसळतील. त्यांना पूर्ण कथानक सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवण्याच्या कमतरतेचे लक्षण दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रश्न: गुरुजी, योग सूत्रांमध्ये  व्याधी (शारीरिक आजार) एक अडचण समजली गेली आहे. हि व्याधी माझाच एक भाग नाही का?
श्री श्री:  व्याधी म्हणजे एक अडचण ! व्याधी, सत्याना, समस्या, प्रमाद, आलस्य, अविरति, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनावस्थितत्त्व ह्या ९ अडचणी सांगितल्या गेल्या आहेत. आणि त्यांना दूर करण्या साठी सांगितलं गेलं आहे कि एका वेळी एकच मार्ग घ्या आणि त्या मध्ये खोल वर जा.

प्रश्न: गुरुजी, आई-वडील आणि मुलां मधल्या पिढीच्या अंतरामुळे झालेल्या विचारांच्या फरकाला कसे दूर करावे?
श्री श्री: म्हणून त्यांना येस!+ आणि आर्ट एक्सेल अश्या कोर्स ना आणा आणि मग लगेच फरक जाणवेल.

प्रश्न: उत्तराखंड मध्ये परंपरे नुसार देवी आणि देवता लोकां मध्ये संचार होतात. हे खंर आहे का?
श्री श्री: हे खंर आहे पण बऱ्याच वेळी त्यांचे मन सुद्धा गुंतून जाते. म्हणून जर तो व्यक्ती साधक असेल, जो ज्ञानात खोल गेला असेल तोवर तुम्ही म्हणून शकत नाही कि तो देवतांच ज्ञान पूर्णपणे मांडतोय. देवतांचा आवाज असेल पण त्याचं मन पण असेल आणि दोघांचे मिश्रण असेल. म्हणून तो बोलेल ते बरेच काही खरेही असेल, पण काही गोष्टी खऱ्या नसतीलही. सूर्याकडे बघताना धूळ बसलेल्या काचेतून बघितले कि किरण अस्वच्छ दिसतात. किंवा निळ्या काचेतून दिसणारे किरण निळेच दिसतील. म्हणून देवी देवतांचा आवाज बनणारा व्यक्ती जर निरागस आणि पवित्र नसेल, तर मग तो जे काही म्हणतो ते सगळं बरोबर नसेल. पण जर तो निरागस आणि पवित्र असेल तर मग तो जे म्हणेल ते सगळं बरोबर राहील.

प्रश्न: गुरुजी, काय बरोबर आहे आणि काय चूक हे कसे ठरवावे? एखादी सोपी युक्ती सांगा.
श्री श्री: एक सोपी परिभाषा आहे हे जाणण्यासाठी कि काय बरोबर आहे आणि काय चूक
१. जे तुम्हाला लोकांनी तुमच्या साठी करायला नको असे वाटते, ते वाईट आहे आणि जे दुसरे तुम्हाला करू इच्छितात ते दुसर्यांना तुम्ही करू इच्छिता ते चांगले आहे
२. जे कमी काळ आनंद देऊन जास्त काळ दुखी: ठेवेल ते वाईट आणि जे जास्त काळ आनंदी आणि कमी काळ दुखी: ठेवेल ते चांगलं आहे.

प्रश्न: लहानपणी आई-वडिलांची मग शिक्षकांची आणि मग देवाची भीती. भीतीची आपल्या आयुष्यात काय गरज आहे? हि गरजेची आहे काय?
श्री श्री: अजिबात गरज नाही ! भीती कशाला? प्रेम जेव्हा उलट उभं असेल तेव्हा ती भीती असते. म्हणून त्या भीतीला सुलट उभं करा. भीती हि प्रेमामुळे  होते. जेव्हा प्रेम नसेल तेव्हा भीती पण नाही होणार. तुलसीदास म्हणून गेले आहेत, 'भय भीत होत प्रेम गोसाई'. प्रेम आणि भीती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे प्रेम आहे तिथे भीती नाही, आणि जिथे भीती तिथे प्रेम नाही. हे अश्या दोन गोष्टींमध्ये अभिव्यक्त होते.

प्रश्न: गुरुजी, जाणीव असताना पण माझ्या हातून चुका होतात, असे काही सांगू शकाल काय ज्यामुळे ज्ञाना ने वेळेवर जागरुकता येईल आणि ती चूक परत होणार नाही?
श्री श्री: फक्त मनात हा विचार असणे भरपूर आहे, कि मला त्या चुका परत परत नाही करायच्या आहेत ज्या मी भूतकाळात केल्या होत्या. हि भावना हळू हळू रुजू लागेल. पुढे वाढा आणि जितक्या होतील तितक्या चुका करा. मग तुम्ही थकून जाल. मी तुमच्या साठी थांबेन. तुम्ही तोवर चुका करत राहा जोपर्यंत थकून आणि कंटाळून पडणार नाही. मग सगळं काही ठीक होऊन जाईल. त्या लोकांकडे बघा जे लोक त्याच चुका सतत करत आहेत. त्यामुळे त्यांना किती दुख: भोगावे लागत आहे. ती चूक एकदा, दोनदा, तीनवेळा, दहा वेळा करून शेवटी कंटाळून म्हणाल, 'पुरे झाला! आता अजून काही नको!' पण हे आयुष्य संपण्याच्या आगोदर हे उमजायला हव. हे सबंध आयुष्यामध्ये होत नाही राहिलं पाहिजे. जर तुम्ही ह्या आध्यात्मिक मार्गावर आहात तर मग असं होणार नाही. तुम्हाला जागरुकता लवकरच येईल. म्हणून म्हणायचे, ' स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात' तुम्ही जर ह्याच्या अनुषंगाने पुढे वाढाल तर मोठ्या भीती पासून मुक्त राहाल. कोणत्याही भीती पासून लांब राहाल.  

प्रश्न: गुरुजी, जुन्या काळापासून एक प्रथा आहे कि कोणतेही नवीन काम राहू कालं मध्ये सुरु नाही करायचं. त्याला भरपूर महत्त्व दिलं आहे? हे बरोबर आहे का? ह्या मागे वैज्ञानिक बाजू काय आहे?
श्री श्री: राहूकालं हि वेळ प्रार्थना करण्यासाठी उपयुक्त मानली गेली आहे. कोणत्याही आध्यात्मिक कामा साठी चांगली मानली गेली आहे. म्हणून कोणतेही संसारिक काम त्या वेळी सुरु करणे हे इष्ट नाही, असे मानलं गेलं कारण त्या वेळी शरीरात नाडी बदल होतात. पण तरीही त्याला इतकं महत्त्व देणं गरजेचं नाहीये. जर अगदी तुम्हाला त्या वेळी काम करावच लागत असेल, तर सरळ 'ओम नम: शिवाय' म्हणा आणि पुढे चला.




The Art of living
© The Art of Living Foundation