ध्यानाने आत्म्याची शुद्धी होते
२६ डिसेंबर, २०११

तुम्हाला देव बघायचा आहे कां ? तुमच्यापैकी कितीजणांना देव बघायचा आहे ? त्याला फार वेळ नाही लागत. तुम्ही जगाकडे बघायचे सोडा . तुम्ही जगाकडे बघितले तर तुम्हाला देव दिसणार नाही. तुम्हाला एक तर, देव तरी दिसेल किंवा जग. तुम्हाला दोन्ही दिसू शकणार नाही. तुम्हाला एकाची निवड करावी लागेल.जर तुम्हाला देव बघायचा असेल तर मी तुम्हाला आत्ता दाखवतो. फरक, भेद बघायचे थांबवा. जग बघायचे थांबवा.
(क्वांटम) परमाणु भौतिक शास्त्राला देव दिसतो. हे लक्षात घ्या की सगळं  काही एक आहे आणि सगळं एकापासुंच तयार झालं आहे. हा एक भ्रम आहे की हा एक माणूस आहे आणि तो एक माणूस आहे. हा एक भ्रम आहे की ही एक वस्तू आहे, ती एक वस्तू आहे . सर्व वस्तू एका पासूनच बनलेल्या आहेत. आपण हॉलोग्राम सारखे आहोत.प्रकाशाच्या एका किरणाने हॉलोग्राम बनतो. ती वस्तू असल्यासारखे भासते पण ती वस्तू नसते. तो फक्त एक प्रकाशाचा खेळ, देखावा आहे. संपूर्ण विश्व हे प्रकाशाचा खेळ, देखावा आहे आणि जे असतं त्यापेक्षा वेगळं आहे असं वाटतं. या विश्वात देवाशिवाय दुसरे काहीच नाही.
जर तुम्ही सिनेमा बघत असलात तर तुम्हाला पडद्यावर जे दिसते तो फक्त पडद्यावर दिसणारा प्रकाश असतो, बस. एका हलत्या चीत्राफितीवर प्रकाश पडत असतो आणि आपल्याला निरनिराळ्या गोष्टी आहेत असे वाटते. निरनिराळे लोक आणि निरनिराळे प्रसंग. अगदी तसेच हे संपूर्ण जग म्हणजे एकाच चेतनेचा खेळ, देखावा आहे. जड वस्तू नाही आणि उर्जाही नाहिये. तुम्ही नाही, मी नाही, हे नाही आणि तेही नाहिये. सगळं फक्त ‘एक’ आहे.
हे असं आहे ! तुम्ही स्वस्थ रहा.
बायबल मध्ये म्हटले आहे की ‘ स्वस्थ रहा आणि जाणा की मी देव आहे.’ मनालाच सगळा फरक दिसतो. बुद्धीला फरकाचे आकलन होते.बुद्धीच्या पार जा आणि स्वस्थ रहा. इथे फक्त ‘एक’ आहे.
‘एक’ आहे असेही तुम्ही म्हणू शकता नाही करण एक म्हणायला दोन असावे लागतात.काही ‘पूर्ण’ आहे असे म्हणण्यासाठी तुम्हाला त्याच्या बाहेर राहून म्हणावे लागेल की ते पूर्ण आहे.प्राचीन लोक इतके प्रज्ञावान होते की तुम्हाला आश्चर्य वाटेल.ते म्हणाले अद्वैत, दोन काहीच नाही. एक म्हणणेही चुकीचे आहे. फक्त दोनच म्हणू शकेल की ते एक आहे. ‘दोन काहीच नाही’ असे म्हणणे जास्त योग्य होईल.त्यालाच अद्वैत म्हणतात.पण द्वैत म्हणजे दोन.
हे (क्वांटम) परमाणु भौतिक शास्त्राप्रमाणेच शुद्ध विज्ञान आहे. तुम्ही अनुभव घेऊ शकता, तुम्ही जाणून घेऊ शकता पण प्रत्यक्ष जीवनात तुम्हाला एक पायरी खाली उतरावे लागते. तुम्हाला द्वैताची, या सृष्टीतल्या बाहुल्याची दखल घ्यावी लागते. इथले टेबल, खुर्ची, छत, दरवाजा हे सगळं लाकडापासून बनलं आहे आणि हेच सत्य आहे. पण तुम्ही खुर्चीचा उपयोग दरवाज्यासारखा करू शकत नाही आणि दरवाज्याचा खुर्चीसारखा. त्या स्तरावरूनच तुम्हाला द्वैतामध्ये काम करायला हवे.
म्हणजे रसायन शास्त्रातील नियतकालिक तक्ताही (पिरीऑडिक टेबल) खरा आहे आणि (क्वांटम) परमाणु भौतिक शास्त्रही खरे आहे. दोन्हीमध्ये त्याच जड वस्तू बद्दल बोलले जाते.

प्रश्न : हनुमान आणि त्याच्यासारखे सगळे कुठे गेले ? ती माकडं होती की काय होती ? माकडांची ही श्रेष्ठ जात अशी नाहीशी कशी झाली ?                                                                      श्री श्री : तुम्ही मानव वंश शास्त्रज्ञाला विचारायला हवे. ते तुम्हाला सगळा इतिहास सांगतील. जगात सारखे बदल होत असतात. गोष्टी बदलत असतात.जगातली कायम टिकणारी गोष्ट एकच आहे आणि ती म्हणजे सगळे काही बदलत असते.

प्रश्न : आमच्या दैनंदिन जीवनात तुमचे अस्तित्व जास्तीत जास्त जाणवावे म्हणून काय करायला हवे त्याबद्दल काही सांगू शकाल कां ?                                                                  श्री श्री : स्वस्थ रहा. निदान एक मिनिट किंवा अर्धा मिनिट तरी.

प्रश्न :प्रिय गुरुजी, तुमची रोजची साधना काय असते ? तुम्हालाही आमच्या प्रमाणेच, खूप सारे विचार, काळजी अशा गोष्टी समोर येतात की तुम्ही सतत तुमच्या स्वाभाविक स्थितीमध्ये रहाता ?                         
श्री श्री : शिक्षकांनी त्यांचे अनुभव दुसऱ्यांना न सांगण्याचा नियम आहे. कां,ते तुम्हाला माहिती आहे कां ? कारण त्याच्या विद्यार्थ्याला वाटायला लागेल की , “ हे माझ्याकडे कसे नाही ? मला हे हवे आहे.” हे स्वत:लाच प्रश्न विचारत रहाणे चालूच राहिल.सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही तुमच्या अनुभावासोबत रहाणे.पायरी पायरीने तुमची प्रगती होत राहिल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा सगळं काही ध्यानच असेल.

प्रश्न : माझ्या पैशांचं काय करू ? तुम्ही मला सल्ला देऊ शकाल कां ?                                   श्री श्री : तुम्ही एका गुंतागुंतीच्या जगात रहाताय. या ना त्या प्रकारे तुम्ही जगातल्या कशावर तरी अवलंबून असता. तुम्ही स्वतःला पूर्णपणे अलग करू शकत नाही. आता बघा, जर्मनीने त्यांचे डच मार्क हे चलन बदलून युरो केले. तुम्ही असे म्हणू शकला नाहीत की, “ मला युरो नको, मला तो डच मार्कंच माझ्याकडे ठेवायचाय.” तुम्ही तसे म्हणू शकला नाहीत आणि जर तसे केले असते तर तुम्ही मोठे मूर्ख ठरला असतात. म्हणूनच जगात जे होते आहे त्यापासून पूर्णपणे बाजूला किंवा अलग रहाता येत नाही. तुम्ही हुशार असू शकता पण हावरट नाही. जे हावरट असतात ते बहुतेक त्रासात अडकतात. ते अशा जाहिराती बघतात ज्यात म्हटलेले असते, “ फक्त तुमचे पैसे गुंतवा आणि तुम्हाला त्यावर २०० टक्के व्याज मिळेल.” तुम्ही असा शास्त्रोक्त विचार करत नाही की तो २०० टक्के का देईल ? तुम्ही त्या वलयात अडकता की, “ ते मला भरपूर पैसे मिळवून देणार आहेत.” त्या क्षणाला तुम्ही इतके बेचैन झालेले असता की तुमच्या डोक्यात काही शहाणपण शिरत नाही.मी बऱ्याच लोकांना असे करताना बघितले आहे आणि केवळ हावरटपणामुळे त्यांची सर्व संपत्ती घालवल्याचे ऐकले आहे. त्यामुळे कुठे गुंतवणूक करणे चांगले हे ठरवण्यासाठी तुम्ही जरा हुशारी दाखवली पाहिजे. मी तुम्हाला ते सगळं नाही सांगू शकत. ते नितीतत्वाच्या विरुद्ध आहे. तुम्हाला जिथे सुरक्षित वाटेल तिथे गुंतवा.

प्रश्न : प्रिया गुरुजी, मी सोडून देऊ शकत नाही . काय करू ?                                         श्री श्री : धरून ठेव ! श्वास आंत घे आणि धरून ठेव. बघ किती वेळ धरून ठेवता येते. तुमच्याकडे दुसरा मार्ग नाहिये. तुम्ही तुमचे वय धरून ठेऊ शकता कां ? तुम्ही असे म्हणू शकत नाही की , “ मी पुढच्या वर्षाच्या नंतर ४९ होईन.” तुम्ही असे म्हणू शकत नाही, ” मी जरी या वर्षी ४९ वर्षांचा होत असलो तरी मी पुढच्या वर्षापर्यंत ते थांबवतो. मी विचार करीन मला ५० वर्षांचं व्हायचं आहे की नाही,” तुमची जन्मतारीख बदलण्याची तुम्हाला मुभा आहे ?नाही ! तुम्ही तसे केले तर ते खरे नाही. तुम्ही पासपोर्ट मध्ये तसे कराल पण ते कायदेशीर नाही आणि  बरोबरही नाही. तुम्ही एके दिवशी जन्मलात आणि तेच खरे.

प्रश्न : कुणीतरी माझ्यावर प्रेम करेल याच्या मी सतत शोधात असतो. माझ्यावर कुणी प्रेम करतंय आणि मझ्यावर प्रेम करायला मी लायक आहे हे मला कसे कळेल ?
श्री श्री : माझ्या लाडक्या, मी किती वेळा सांगितले आहे की तूच प्रेम आहेस ! प्रेमाची वाट पाहू नका पण प्रेम द्या. जेव्हा तुम्ही द्यायला लागता तेव्हा ते खूप जास्त पटींनी तुमच्या कडे परत येते.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझे वडील नुकतेच वारले. माझी आई एकटीच आहे. दुबळी , दिशाहीन, जीवनात काही ध्येय नसलेली. मी तीला कशी मदत करू शकतो ?
श्री श्री : ज्ञानाने फरक पडू शकेल. तिच्याशी ज्ञानाबद्दल बोला. तिच्याजवळ बसून ज्ञान वाचा. धार्मिक ग्रंथ काही गोष्टी किंवा योग वशिष्ठ वाचा. या सर्वाहून जास्त तुमचे तिच्या आसपास असणे जास्त उपयोगी होईल. काळ हेच उत्तम औषध आहे. खरं म्हणजे काळ हेच एकमेव औषध आहे.

प्रश्न : तुम्ही म्हणता की कर्म बदलता येत नाही. केवळ कृपाच कर्माच्या बंधनातून मुक्त करू शकते. कृपा म्हणजे काय आणि कोणत्या कुतीने कृपा  मिळते ?
 
श्री श्री : ज्या सर्व गोष्टी उत्क्रांती करणाऱ्या असतात त्या आणि जीवनाला आधार देणारे जे काही असते ते, निस्वार्थीपणे केलेली सेवा. असे नाही की मी काही सेवा केली आणि मला आता त्यातून काय मिळेल ? नाही, त्याला सेवा म्हणत नाहीत. सेवा म्हणजे निरपेक्षपणे केलेली कृती. ही कृती खूप महत्वाची आहे.              
सेवेने तुमच्या कर्माची शुद्धी होते. भारतात एक म्हण आहे, ‘भातावर वाढलेल्या चमचाभर तुपाने भाताची शुद्धी होते.’ तुम्हाला महिती आहे, असे कां ? कारण तुम्ही जर असाच भात खाल्ला तर तो लगेच पचून जातो आणि सागेच त्याची साखर बनते. बरेच लोक जे असा बिनतुपाचा भात खातात त्यांना डायबेटीस झालेला असतो. एका ह्रद्य रोगतज्ञाने मला सांगितले होते की , “ जेव्हाही तुम्ही सिरीयाल खाता तेव्हा त्याच्या बरोबर थोडातरी स्निग्ध पदार्थ खावा. त्याच्यावर एक चमचाभर तूप घातल्याने पचनक्रिया थोडी मंदावते. त्याचे अनेक स्तरांचे प्रथिन तयार होते आणि साखरेचे प्रमाण संतुलित करण्यात मदत करते आणि त्यामुळे ह्रद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळेच प्राचीन लोक म्हणायचे की, “ चमचाभर तुपाने भाताची शुद्धी होते,”                                                       ज्ञानाने बुद्धीची शुद्धी होते. तुमच्यापैकी कितीजणांना अनुभव आहे की ज्ञानाने बुद्धीची शुद्धी होते ? सगळा राग, हाव, इतर लोकांचा तिटकारा सगळे ज्ञानाने नाहीसे होते.                                                संगीताने भावनांची शुद्धी होते.                                                                   दानाने तुम्ही कमावलेल्या पैशाची शुद्धी होते. तुम्ही कमावलेल्या पैशातले कमीतकमी ३ ते ४ टक्के दान कार्यन टाकावे. जर आपण कमावलेले सगळेच आपण स्वतःवरच खर्च केले तर तो शुद्ध किवा चांगला पैसा समजला जात नाही.दानाने पैसा शुद्ध होतो आणि मग उरलेला पैशाचा तुम्ही उपभोग घ्या. नाहीतर उरलेला पैसा दवाखाना किंवा अशाच कुठल्यातरी गोष्टीत खर्च होऊन जातो.                                                                                         प्रार्थनेने हृदयाची शुद्धी होते.                                                                  ध्यानाने आत्म्याची शुद्धी होते.
आयुर्वेदिक त्रिफळा चुर्णाने शरीराची शुद्धी होते आणि कोठा साफ होतो. आपणा आपल्या शरीरात सतअन्न कोंबत असतो पण आधुन मधून पचन संस्था साफ करणे जरुरीचे असते. झोपण्यापूर्वी चर पाच गोळ्या खाल्या की सकाळी तुमचे पोट साफ होते.                                                                           तर आयुर्वेद , योग, प्राणायाम आणि व्यायाम याने शरीराची शुद्धी होते.                                 प्राणायामाने सम्पूर्ण शरीर संस्थेची शुद्धी होते. त्यामुळेच सुदर्शन क्रिये नंतर तुम्हाला शुद्ध वाटते. त्याने तुमच्या सर्व कर्मांची शुद्धी होते. आणि सुस्पष्टता येते. 
                                                                              
प्रश्न : प्रिय गुरुजी, जोपर्यंत इच्छा आणि कर्म पुसली जात नाहीत तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागतो कां ? या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे ? सिद्धी प्राप्त होणे हा एकच मार्ग आहे कां ? 
श्री श्री : अगदी बरोबर ! तहान भागवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काहीतरी पिणे. भूक भागवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काहीतरी खाणे. त्याचप्रमाणे या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सिद्धी प्राप्त होणे किंवा ध्यान. पूर्ण समाधान !

प्रश्न : आधी झालेल्या चुका लक्षात ठेऊन लोक लोक कौशल्याला कमी कां लेखतात ?
श्री श्री: तुम्ही स्वतःच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.तुमच्याकडे कौशल्य आहे पण तुमच्या हातून जेव्हा चूक होते तेव्हा लोकांना भीती वाटते कारण एक चूक कंपनीला किंवा व्यक्तीला खूप महाग पडू शकते.मग तुम्ही त्यांची खात्री पटवून द्यायला पाहिजे की यापुढे  चूक होणार नाही आणि तुम्ही तुमचे कौशल्य खूप चांगल्या प्रकारे वापराल. आजकाल लोकांना इतका मोठ धोका पत्करायचा नसतो.

प्रश्न : ज्ञानाच्या मार्गावर रहाण्यासाठी काही योग्य दिशा आहे कां ? आपल्या आयुष्यात महत्वाच्या असणाऱ्या व्यक्तींबद्दलचे आपल्याला मनाला भेडसावणारे विचार आणि संस्कार यांचे काय करायचे ?                                                             श्री श्री : भूतकाळ कसाही असला तरी त्याच्याबद्दल चिंता करू नका. वर्तमानात तुमच्या निष्पाप असण्यावर  विश्वास ठेवा. वर्तमानात तुम्ही निष्पाप आहात. भूत्कालातीला चुका तुमच्या अज्ञानामुळे झाल्या. पण व्र्त्मानातले सत्य हे आहे की तुम्ही निष्पाप आहात.

प्रश्न : फलज्योतिष योग्य आहे कां ? आपल्याला कधी पुरेशी माहिती मिळेल कां ?
श्री श्री : फलज्योतिष हे एक शास्त्र आहे पण ते हरवलेले शास्त्र आहे. त्यातले पूर्ण ज्ञान उपलब्ध नाही. त्यांच्याकडे जे ज्ञान उपलब्ध आहे ते फक्त ७० ते ८० टक्के आहे. त्याने ते काही गोष्टींबद्दल भविष्य वर्तवू शकतात.पण फलज्योतिषी एक गोष्ट नेहमी सांगतात की या सगळ्याच्या मागे एक मोठी शक्ती आहे.उच्च शक्ती आहे जी ह्या सगळ्याला वरचढ ठरू शकते.ती श्रेष्ठ शक्ती स्वतंत्र आहे आणि तीच दैवी आहे, दैवी कृपा आहे. दैवी कृपा कधीही काहीही बदलू शकते.

प्रश्न : माझी बायको विनाकारण माझ्याशी वाईट बोलते. तीला मी कशी थांबवू ?                           श्री श्री रविशंकर : तेच तर आव्हान आहे ! ती जर विनाकारण तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर तीला सांगा तुमी तीला कारण द्याल.

प्रश्न : अष्टावक्र गीतेत तुम्ही सागितले आहे की जीवन हे तीन गोष्टींपासून निर्माण झाले आहे. बी, अंडे आणि आवकाश. अवकाशापासून जीव कसा तयार होतो ?
श्री श्री रविशंकर : सगळे काही अवकाशातच येते, अवकाशात रहाते आणि अवकाशातच विरून जाते. तुम्ही अवकाशाच अभ्यास करायला हवा. मग तुम्हाला कळेल की अवकाश सोडून दुसरे काहीच अस्तित्वात नाहीये. सगळे अवकाशातच तयार झाले आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला वाटते मागच्या तीन वर्षात मी खूप चुका केल्या आहेत आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागतील याची मला भीती वाटते. हे परिणाम कमी करण्यासाठी मी खी करू शकतो कां ?
श्री श्री : तुम्ही आता योग्य मार्गावर आहात आणि त्यामुळे ते परिणाम कमी होतच आहेत. आणि परिणामांना तुम्ही स्वीकारले आहे हीच दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याने तुम्ही पुन्हा एकदा वरच्या स्तरावर जाता.

प्रश्न : प्रिय गुरुजी, गेली तीन वर्षे मी खूप मेहनतीने काम केले पण माझ्या सुपरवायझरने विचार नकरता माझी  कारकीर्द धुळीला मिळवली. आता मला नोकरी नाही माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच हरवली. माझ्या बॉसबद्दलच्या  नकारात्मक विचारांचे मी काय करू ?
श्री श्री : ऐक , भूतकाळात  झालेल्या गोष्टींबद्दल कुढत बसण्यात काही अर्थ नाही. जागे व्हा. पूर्ण शक्तीनिशी पुढे जा.एक नोकरी गेली तर काय झाले ? जगात अजून लाखो नोकऱ्या आहेत. तुम्ही दुसरी घेऊ शकता. या नोकरीत पूर्वीच्या नोकरीपेक्ष कमी पगार मिळाला तरी हरकत नाही. पुढे जात रहा.भूत काळात काय झाले याबद्दल कुढत बसून तुमची शक्ती आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा आयुष्यात अजून बरेच काही आहे. ते तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे झाले असेल किंवा तुम्हाला तुमची भूतकाळातली चूक दिसली नसेल. हे कदाचित पुनर्जन्मामुळे असेल पण जाऊ दे . भूतकाळाबद्दल चिकित्सा करत बसण्यात काही अर्थ नाही. पुढे बघून चालत रहायचे. कोणत्याही कारणाने तुमचा उत्साह घालवू नका.

प्रश्न : काही दिवसांपूर्वी तुम्ही सत्वाबद्दल बोलत होतात की पाणी सर्वात चांगले वाहक आहे. सत्व मोजण्याचा काही मार्ग आहे कां ?
श्री श्री : उर्जा मोजण्याचा काहीतरी मार्ग असला पाहिजे. आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रशिक्षकांपैकी एक जण शास्त्रज्ञ सुद्धा आहे.त्यांनी उर्जेच्या लहरी मोजण्याचे एक यंत्र तयार केले. ते व्यक्तीने ध्यान करण्याच्या आधी व नंतर मोजणी करत असत आणि त्यांना त्या व्यक्तीची आभा (ऑरा) वाढलेली दिसून आली. हे खूप रंजक आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी, शरीराला इजा पोहोचली की व्यक्ती मरते आणि आत्मा शरीर सोडतो.आत्म्याचा शरीराशी इतका हलका संबंध आहे कां ? आत्मा दुखावल्याशिवाय बाहेर जाऊ शकतो कां ?
श्री श्री रविशंकर : आत्मा दुखावला जात नाही. तो पुढे जात रहातो. तुम्ही अवकाशाला दुखवू शकत नाही. तुम्ही या सृष्टीच्या जितके सूक्ष्मात जाल तेवढे तिथे ते खुपच आश्चर्यकारक आहे काही दुखावले जात नाही.तुम्ही त्याचे विभाजन करू शकत नाही.



The Art of living
© The Art of Living Foundation