तुम्ही परिपूर्ण आहात!
बंगलोर, १३ डिसेंबर २०११

मानवामध्ये २ सहजप्रेरणा असतात, अन्नाबद्दल आसक्ती आणि कामवासना. या गोष्टी तुम्ही मागच्या अनंत जन्मांपासून करत आहात, जेंव्हा तुम्ही प्राणी होतात आणि आता मनुष्य म्हणून. तुमचा जन्मच या दोन गोष्टींपासून झाला आहे. हे किती सुंदर गोष्ट आहे कि या देशात (भारत) या दोन्ही गोष्टींचा ईश्वराशी संबंध जोडला आहे. अन्न हे देवाशी जोडले आहे.
उपनिषदांमध्ये असे म्हंटले आहे "अन्न हेच देव". जेंव्हा तुम्ही अन्नाला देव मानाल, तेंव्हा तुम्ही जरुरी पेक्षा जास्त खाणार नाही, तुम्ही जेवण नुसते भरणार नाही तर ते आदरपूर्वक खाल. भारतातील कोणताही सण हा अन्ना शिवाय पूर्ण होत नाही. जेंव्हा तुम्ही देवळात जाता तेंव्हा तुम्हाला प्रसाद दिला जातो. प्रसाद हा थोड्या प्रमाणात दिलेलं अन्न असते. प्रसादाशिवाय यात्रा, सण पूर्ण होत नाहीत. अन्न हे देवाशी जोडले आहे.
याच प्रमाणे कामभावना ही सुद्धा देवात्वाशी जोडली आहे. नाहीतर तुम्ही कामभावना ही तुमच्या ऐहिक जीवनाशी जोडून तिला देवत्वापासून वेगळी समजाल. म्हणूनच राधा-कृष्ण, शिव-पार्वती ठेवले जातात. शिवलिंग हे त्याचेच प्रतिक आहे. म्हणूनच जेंव्हा तुम्ही कामभावनेचा आदर करता आणि त्याला देवत्वाशी जोडता तेंव्हा भावनातीरेक दूर होतो, लालसा नष्ट होते आणि पावित्र्याचा उदय होतो.
आक्रमक आणि लालसी वृत्तीचे निरपेक्ष प्रेमात रुपांतर होते. हा एक पुरातन विचार आहे, पण काही लोक योगाचा वापर त्यांच्या शारीरिक वासनेसाठी करतात हे अयोग्य आहे. ही घोडचूक आहे. हे वास्तविक उलटे हवे, जेंव्हा अशी अतीव शारीरिक सुखाची इच्छा होईल तेंव्हा त्याचे रुपांतर एका दैवी आंतरिक अनुभवात वाहयला पाहिजे. संस्कृत मध्ये एक सुंदर शब्द आहे "आत्म रती", स्वत्वाचे स्वतःशी मिलन.
प्रकृती आणि पुरुषार्थ या दोन गोष्टी आहेत. निसर्ग आणि चैतन्य हे एकमेकांशी सतत खेळत असतात. तुमचे शरीर आणि आत्मा, पैकी तुमचे शरीर ही स्त्री आणि तुमचा आत्मा हा पुरुष, त्यामुळे त्यांचे सतत युग्म्न (सायुग्मिकरण) होत असते. त्यांचे मिलन स्वत्वात बघणे म्हणजे समाधी.
म्हणूनच शारीरिक सुखा पेक्षा, समाधी ही १००० पटीनी जास्त आनंद देणारी असते. शारीरिक सुखाने जो आनंद मिळतो त्यापेक्षा १००० पट आनंद समाधी मध्ये मिळतो कारण त्यात प्रयत्न नाहीत, काहीहि कृती नाही. फक्त अंतरात्माम आहे. त्यामुळे ह्या चैतन्याचा, खेळ तुमच्या लक्ष्यात येतो आणि तुमचा अनुभव बनतो. हे खूप सुंदर आहे.
तुमच्या अस्तित्वाचा कुठलाही कोपरा दैवत्वापासून दूर ठेऊ नका. देवत्व हे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत गुंफले पाहिजे, त्यालाच ब्रम्हचर्य असे म्हणतात, म्हणजे अनंताकडे वाटचाल, अनंतात विलीन होणे. हे किती सुंदर आहे ना? हे खूप सखोल आणि उच्च ज्ञान आहे. जर तुम्हाला हे पहिल्यांदा समजले नाही तरी काही हरकत नाही, परत परत हे ऐकत राहा आणि समजण्याचा प्रयत्न करा, एक दिवस तुम्हाला कळेल "ओह, गुरुजी त्या दिवशी हे बोलत होते तर !"
त्यामुळे इथे भारतात तुम्ही कुठल्याही देवळात गेलात तर ही दोन्ही अंग सापडतील. शिव आणि पार्वती, प्रकृती-पुरुष, चेतना आणि पदार्थ (matter). प्रथम द्वित्व आणि मग एकत्व समजून घ्या. ते दोन नाहीत, वेगळे नाहीत, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही परिपूर्ण आहात.
याचा अर्थ काय? तुम्ही स्त्री आणि पुरुष दोन्ही आहात. "मी पुरुष आहे", "मी स्त्री आहे" या बिरूदा मधून बाहेर पडणे, तुमची ओळख सोडून देणे, हे वेदांत, विश्वाचे उच्चतम तत्वज्ञान आहे.
आपण स्वतःला "मी पुरुष आहे", "मी स्त्री आहे", "मी वयस्कर आहे", "मी तरुण आहे", "मी शिक्षित आहे", "मी अशिक्षित आहे" अशा बिरूदा मध्ये अडकवून ठेवतो. ही सगळी बिरुदे फेकून द्या. जे राहील ती निखळ चेतना. मी ही निखळ चेतना आहे हे सुद्धा म्हणू नका. मी निखळ चेतना आहे हे जाणून घ्या, ते बोलायची सुद्धा गरज नाही. ‘मी कोणीही नाही’, हे सांगत फिरू नका.
आदि शंकराचार्य एकदा म्हणाले होते, "जो स्वतःला एखादे बिरूद लावतो तो मूर्ख आहे, आणि जो मी कोणीही नाही आसे बिरूद लावतो तो महामूर्ख" जो मी कोणीही नाही असे मानतो तो बोलत नाही, शांत असतो. जेंव्हा तुम्ही काही बोलत असता तेंव्हा तुम्ही "कोणीही नाही" कसे असाल? "मी कोणीही नाही" असे म्हणणारा कोणीतरी असू शकत नाही.
त्यामुळे शांत राहा. तुम्ही कोणीही नसाल तर शांत रहा.
त्यामुळे तुम्ही अन्न आणि कामभावना या अंगभूत (आवश्यक) प्रवृतींकडे पवित्र(शुद्ध) भावनेने बघितलेत तर तुमच्यातील आक्रमकता जाऊन, समर्पित भावना जागृत होईल. तुमच्यात कृतज्ञता आणि प्रेम जागृत होईल.
असे जेंव्हा होते तेंव्हा भक्त आणि देव एक होतात. ते एकमेकात विलीन होतात. हे किती अदभूत आहे, नाही !
The Art of living
© The Art of Living Foundation