आयुष्यातील पराकोटीचे बहरणे म्हणजे प्रेमात असणे!
२० डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, आजकालच्या पॉप आणि ट्वीटर च्या जमान्यात, भगवद गीतेसारखे जीवनगाणे प्रसिद्ध कसे बनवावे?
आपण ट्वीटर साठी सुद्धा गीता करू शकतो का?
श्री श्री: हो,नक्कीच.गीतेमध्ये प्रत्येक पिढीसाठी, कोणत्याही वयाच्या आणि विचारसरणीच्या लोकांसाठी काहीतरी आहे.

प्रश्न: गुरुजी, मी मानसोपचार तज्ञ आहे. अध्यात्म माझ्या ज्ञानात कशा प्रकारे भर घालून त्याला परिपूर्ण बनवू शकेल?
श्री श्री : ध्यानाने खूप काही मानसिक व्याधींमध्ये बदल घडू शकतो. चैतन्याच्या बाबतीत सखोल अभ्यास करा. भगवद गीता, योग वसिष्ठ यांचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला चेतना काय आहे हे कळेल. भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या शिकवणी अभ्यासा.त्यांनी चेतनेचे वेगळे प्रकार आणि वेगळी परिमाणे (module) याबद्दल भाष्य केले आहे.त्याचाही उपयोग होईल.

प्रश्न: गुरुजी, मला माहिती आहे कि मी देव आहे, पण मला त्याची अनुभूती येत नाही. असे का?
श्री श्री: तुम्ही ते अनुभवल्याशिवाय समजूच शकत नाही.तुम्ही ते फक्त कोणालातरी बोलताना ऐकले आहे. पण तेही ठीक आहे. हे तुमच्या मनाच्या एका बाजूला असू देत आणि फक्त साधेपणाने आणि स्वभाविकतेने आपले आयुष्य जगात रहा. आयुष्यातील पराकोटीचे बहरणे म्हणजे प्रेमात असणे आणि प्रेमाने वागणे, हेच आहे हे लक्षात असू द्या.प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी कदाचित् प्रेम वाटणारही नाही.खुपदा आपण प्रेम हे भावनेसारखे अनुभव करायचा प्रयत्न करतो.प्रेम हि एक भावना नसून ते साक्षात तुमचे आस्तित्व आहे.
म्हणून ‘देव म्हणजे प्रेम आहे ‘ हे ‘भावनिक होणे’ असे समजू नये.तुम्ही कोणालातरी बोलताना ऐकले आहे कि ‘देव म्हणजे प्रेम आहे’, ठीक आहे, असू देत! तुम्ही तुमच्या अनुभवातून जा. तुम्ही म्हणजे दुसरे कोणी नसून एक विस्तारीत जाणीव आहात, एवढे समजून घ्या.प्रथम तुम्ही काय नाही आहात हे जाणून घ्या, मग तुम्ही काय आहात हे तुम्हाला आपोआप लक्षात येईल.

प्रश्न: गुरुजी, मला तुमचे व्यसन लागले आहे. हा एक प्रश्न आहे का यातून पुढे काही प्रश्न निर्माण होतील?
श्री श्री: काळजी करू नको. निवांत रहा.

प्रश्न: जेंव्हा लोक माझे गुरु, माझा धर्मग्रंथ, किंवा माझ्या विश्वासावर टीका करतात, तेंव्हा माझ्यासारख्या श्रद्धावान माणसाने काय केले पाहिजे?
श्री श्री: फक्त एक स्मितहास्य करा.त्यांना सांगा कि तुम्ही त्यांच्या अजाणतेपणावर हसता आहात. त्यांच्यावर चिडण्यापेक्षा ह्या एका बोलण्याने जास्त प्रभाव पडेल. जर कोणी तुम्हला प्रिय असलेल्या गोष्टीच्या विरुद्ध काही बोलत असेल,तर म्हणा,’मला तुमच्या अज्ञानावर दया येते’. बास .तुम्ही काय करू शकता? तुम्ही कोणाचे चुकीचे विचार बळजबरीने बदलू शकत नाही. ते स्वीकार करणार नाहीत. अशा परिस्थितीत, उपरोधिक बोलणे हाच एक मार्ग आहे.
तुमचा उपरोधीकापणा एखाद्या बाणासारखा त्यांच्या डोक्यात जातो आणि त्यांनी स्वत:साठी जे अडथळे निर्माण केले असतात, ते गळून पडतात.त्यांना सांगा, ‘तुमच्या अज्ञानाचे मला वाईट वाटते’ आणि तेवढे पुरेसे आहे.
आत्ता रशियामध्ये बगवाद गीतेवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.आपल्याला तर तसाही भगवद गीतेचा फायदा होत आहे,पण रशियातील लोकांना भगवद गीतेपासून वंचित करणे हा त्यांच्याच स्वत:च्या लोकांनी त्यांच्यावर केलेला अक्षम्य अपराध आहे.आपले काही बिघडत नाही पण त्यात त्यांचे नुकसान आहे.

प्रश्न: गुरुजी,काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होतात कि ‘अर्जुना’ ची जागा अजून रिकामी आहे.मला त्या जागेसाठी अर्ज करायचा आहे. मी पात्र आहे का? मी तुम्हाला माझा अर्ज कसा देऊ?
श्री श्री: ते आधीच झाले आहे.हा प्रश्न हाच एक अर्ज आहे.आता आत्तापर्यंत जे ऐकले आहे, त्या सर्व ज्ञानाचा आपल्या आयुष्यात उपयोग कर.

प्रश्न: भारताकडे कित्येक काळापासून आध्यामिक संपत्ती होती, तरीही भारत एवढे दिवस ब्रिटीश लोकांच्या अधिपत्याखाली कसा राहिला?त्याला काही अध्यात्मिक महत्त्व आहे का?
श्री श्री: हो, बदलाचे चक्र त्याची जागा घेते.जेंव्हा शरद ऋतुमध्ये झाडांची पाने रंग बदलतात आणि शिशिर ऋतुमध्ये झाडांची पाने गळतात, पण झाड मात्र तसेच राहते.त्याच प्रकारे, कलियुगामध्ये अध:पतन झाले होते.हे बहुतेक सर्व देशांच्या बाबतीत झाले.जर का समग्र विचार केला, तर एके काळी भारत सर्वोच्च स्थानावर होता आणि नंतर तो कोसळला.त्याआधी, मंगोलिया सर्वोच्च होता आणि नंतर मंगोलिया खाली आला.तेथील नागरिक पार युरोप पर्यंत गेले आणि नंतर ते भारतातही आले. मुघल हे मंगोलिया मधून आले होते.नंतर भारत पुन्हा चमकत होता.भारताचे राज्य साउथ अमेरिकेतील पेरू पर्यंत गेले होते.मेक्सिको मध्ये शिवलिंग आणि गणपतीच्या मूर्ती सापडल्या आहेत. महाभारताच्या काळात भारताचे राज्य ऑस्त्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान पर्यंत पसरलेले होते. सर्वत्र भारताचेच राज्य होते. 
कॅनडातील एक राज्य, नोव्हा स्कॉटिया(नव कोश) चा उल्लेख महाभारतात सापडतो.’नव’म्हणजे नऊ आणि ‘कोश’ म्हणजे वेळेची गणना.भारत आणि नोव्हा स्कॉटिया मध्ये नऊ तासांचा फरक आहे.कॅलिफोर्निया ला कापिलारण्य म्हणायचे.जेंव्हा भारत दिवस असायचा तेंव्हा कापिलारण्यामध्ये रात्र असे, असे पुराणांमध्ये सांगितले आहे आणि कॅलिफोर्निया आणि भारतामध्ये बरोबर १२ तासांचा फरक आहे.
कोणे एके काळी संपूर्ण जगभर भारतीय वसाहत होती आणि नंतर ती कमी होत गेली.
त्यानंतर इंग्लंड आले. उत्तर युरोपातला एक छोटासा देश आणि त्याचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला, पार न्यूझीलंड पासून कॅनडा पर्यंत आणि अमेरिकेतसुद्धा.संपूर्ण आफ्रिकेवर ताबा मिळवला होत
नंतर इंग्लंड चाही प्रभाव कमी होत गेला आणि आज आता तो फक्त इंग्लंड पर्यंत सीमित आहे.एक काळ होता जेंव्हा इंग्लंड च्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसे. पण तेही काही दशकेच चालले.
त्याच वेळेस,पोर्तुगीझांच्या ब्राझील मध्ये वसाहती होत होत्या.स्पेन नि पूर्ण लाटिन आणि साउथ अमेरिका भर वसाहती स्थापल्या होत्या.त्यांची प्रादेशिक भाषा लोप पावली आणि स्पॅनिश भाषा साउथ आणि सेंट्रल अमेरिकेत पसरली
काळाचा आपला असा एक ताल असतो. या गोष्टी येतात आणि जातात.

 
प्रश्न: मला जेंव्हा तुमची खूप आठवण येते,तेंव्हा मी काय करू?
श्री श्री : ज्ञान ऐका आणि सेवामग्न राहा. सृजनशील व्हा, काहीतरी लिहा.असे बरेच काही आहे जे तुम्ही करू शकता.
ओढ आणि प्रेम, दोन्ही बरोबरच असतात.एकावाचून दुसरे असू शकत नाही.

प्रश्न: गुरुजी,जेंव्हा माणसाचा पुनर्जन्म होतो, मागच्या जन्मातून कोणते ज्ञान पुढच्या जन्मात प्रक्षेपित जाते?
श्री श्री :बरेच काही पाठवले जाते. ते समजायचे काही परिमाण नाही. तुमच्या मनात सर्वात सखोल जो ठसा असेल, तो पुढील जन्मात प्रक्षेपित होतो.

प्रश्न: गुरुजी, विज्ञान भैरव काय आहे? कृपया त्यावर काही प्रकाश टाका.
श्री श्री:’विज्ञान भैरव’ हा काश्मिरी शैवांचा एकमेव ग्रंथ आहे. फक्त योगी किंवा हुशार माणूस त्याचे सार सांगू शकेल. थोडक्यात सांगायचे तर,हे सर्व चैतन्य आहे आणि ते चैतन्यातूनच निर्माण झाले आहे.
ध्यानाच्या सहाय्याने या चैतन्यामधे आकंठ भिजा, जेणेकरून तुमच्या अस्तित्वाचा कण न कण या चैतन्यामधे जागृत होईल.हे त्याचे सार आहे. ते फक्त अनुभव करा.

प्रश्न: गुरुजी, नातेसंबंध आपल्याला बलवान बनवतात का कमकुवत करतात?
श्री श्री : हे आपल्या मनावर आहे. आपल्या मनानुसार, नातेसंबध बलवान किंवा कमकुवत बनवतात. जर तुम्ही मनाने घट्ट असाल, तर नाती हे आपल्यासाठी एक वरदान आहे,पण तुम्ही मनाने कमकुवत असाल आणि तुमचा जर (स्वत:च्या) मनावर ताबा नसेल, तर नातेसंबध हे एक बंधन ठरू शकते.

प्रश्न: गुरुजी,तुम्ही आम्हाला सल्ला दिला होतात कि आपली पात्रता वाढवण्यासाठी सेवा, साधना आणि सत्संग करीत राहणे. ते मी केले. आता मला वाटते आहे, आता मी खूप काही करू शकतो,पण पण मी खूप कमी गोष्टी प्राप्त केल्या आहेत. हयामुळे मला खूप दुख्ख: होते. माझ्याकडून कुठे चूक झाली?
श्री श्री: नाही, तुम्ही आपली पात्रता वाढवत राहा, आणि आपोआप तुमची किंमत वाढत जाईल.
देणारा खुप काही देतो आहे,पण तुम्हाला फक्त ते घेण्याची गरज आहे.
देणारा १००० हातांनी देत आहे,, पण तुमच्याकडे फक्त दोनच हात आहेत.तुम्ही दोन हातांनी किती काय घेऊ शकता?
म्हणूनच म्हटले आहे, कि तुम्ही आपली झोळी पसरा.का? कारण इतके काही दिले आहे,कि जे तुमच्या दोन हातात मावणार नाही.असे समजून घ्या कि तुम्ही घेऊ शकणार नाही इतके तुम्हाला मिळते आहे.

प्रश्न: गुरुजी, जर आयुष्य हे एक स्वप्न आहे, तर या क्षणी, या स्थळावर या स्वप्नाचे साक्षी कोण आहे.? मी का इथले सर्वजण जे त्याच एका स्वप्नाचे साक्षीदार आहेत का अजून काही?
श्री श्री : ठीक आहे,कालपर्यंत जे झाले ते स्वप्न होते का? तुम्ही कॉलेज मध्ये गेलात,घरी आलात, अन्नग्रहण केले, तुम्ही हे सर्व केलेत. आज ते स्वप्नवत वाटते कि नाही?
हे कोणाचे स्वप्ना आहे? तुमचे स्वत:चे. त्याचप्रकारे, आत्तासुद्धा,हे तुमचे स्वत:चे स्वप्न आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न आहे आणि आपण सर्व एकमेकांच्या स्वप्नात असू शकतो.
प्रश्न: गुरुजी,काळ तुम्ही ३ प्रकारच्या दुखान्बद्दल बोललात ज्यामध्ये मानवाच्या कृतीनुसार आणि कर्मानुसार प्राप्त दुख्ख: आहेत. पण काही बाबतीत मात्र माझा गोंधळ उडाला आहे,उदाहरणार्थ, बालमजुरी आणि बंधानकारक मजुरी.हे  मानवाच्या कृतीमुळे  का कार्मप्राप्त दुख्ख: आहे?
श्री श्री: हे संमिश्र असू शकते.काही कार्माप्राप्त आणि काही त्यांची स्वत:च्या कृतीमुळे असू शकते. म्हणूनच म्हटले आहे कि, ‘गहना कर्मणो गती|’. कर्माचे परिणाम इतके गुंतागुंतीचे आहेत,कि खूप हुशार माणसालाही ते समजून घेणे अशक्य आहे.सर्वामध्ये,थोडे हेही खरे आहे आणि थोडे तेही खरे आहे.
मूल त्याच्या कर्मानुसार अशा कुटुंबात जन्म घेते हे सत्य आहे, आणि असंवेदनशील माणूस त्याला मदत करण्यासाठी मजूर बनवते, हे मानवनिर्मित सत्य आहे.

प्रश्न: अकेंद्रित असे जग, जे काही विशिष्ट लोकांच्या अधिपत्याखाली नसेल, कधी होईल का?
श्री श्री: जेंव्हा सर्व सुशिक्षित असतील, तेंव्हा हे चांगले आहे. जेंव्हा लोकांमध्ये सदसद्विवेकबुद्धी असेल, तेंव्हा अकेंद्रित जगाची निर्मिती होईल. जेंव्हा जनता जास्त अध्यात्मिक होईल, त्याचे आपोआप हे फळ मिळेल.पुरातन भारतीय ग्रंथांमध्येही हेच म्हटले आहे. जेंव्हा सर्वजण ज्ञानाने जगात होते, तेंव्हा राजाची गरजच नव्हती, कारण प्रत्येकजण आपापले काम प्रामाणिकपणे करीत असे.पोलीस,जवान, सैन्य किंवा उद्योगापतींचीही गरज नव्हती, कारण आयुष्याचे प्रत्येक अंग हे समृद्ध होते.
पण जेंव्हा असे नाही आहे आणि जगात सामाजिक,आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये प्रत्येक क्षेत्रात मतभेद आहेत, तेंव्हा हि वर्गवारी होते.
पुरातन वेदिक संस्कृतीमध्ये कोणचे काय कर्तव्य आणि काय अधिकार आहेत, याबद्दल लिखीत आहे. ते म्हणतात, अधिकारांचा वापर करू नका, पण आपल्याला प्रत्येकाला काही कर्तव्य आहेत. म्हणून प्रत्येकाने आपापली कर्तव्ये करीत रहा, पण कोणीही कोणाचे नियमन करण्याची गरज नाही. पण जेंव्हा लोक त्यांच्या कर्तव्याला मुकतात, तेंव्हा वरिष्ठांची गरज पडते. हे स्वाभाविक आहे. कोस्टा रिका मध्ये  पोलिसच नाहीयेत.तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी बेंगलोर मधेही वाहतुकीच्या नियमांचे अजिबात उल्लंघन होत नसे किंवा बेंगलोर आणि म्हैसुर मध्ये गुन्हेही घडत नसत.साधारण ४०-५० वर्षांपूर्वी,पोलिसांची गरज पडत नसे. क्वचित कुठेतरी पोलीस दिसत असत.आणि हि फार पूर्वीची गोष्ट नाही.
४०-५० वर्षांपूर्वी, म्हैसुर मध्ये फक्त एक हॉटेल होते. प्रत्येक घर म्हणजेच अतिथीगृह होते.पाहुण्यानसाठी लोकांच्या घराची दारे कायम उघडी असत. पाहुणे येऊन विनाशुल्क घरी राहायचे. यजमान त्यांना देवाप्रमाणे मानून त्यांचे आदरातिथ्य करीत असत. त्यांना पंचपक्वान्ने करून घालत. आणि त्यांनी भेटवस्तू दिल्या तरी घेत नसत. लोक गच्चीवर तंबू टाकून तिथे बिछाना ठेवायचे कि कोणीही येऊन तिथे झोपू शकेल.
आज हे सर्व संपूर्णपणे लोप पावले आहे. गुन्हेगारीमुळे आता हे राहिली नाही. लोकांना घराचे दार उघडण्याची भीती वाटते.जेंव्हा अशा प्रकारचे संस्कार आणि अध्यात्मिक शक्ती जेंव्हा उदयास येईल, तेंव्हा अधिकार हा वैयाक्तीक कर्तव्यामध्ये बदलून जाईल. जेंव्हा गुन्हेगारी वाढते तेंव्हा अधिकाऱ्यांची गरज पडते आणि अद्धीकारामुलेच नंतर गुन्हेगारी अजून वाढते.हे एक दुष्टचक्र आहे. ज्या लोकांकडे अधिकार आहेत, ते समाजातील प्रवृत्तींचे कारण बनते.तसेच जर समाजात गुन्हेगारी असेल तर त्यांच्याशिवाय हि होत नाही.प्रश्न असा आहे कि अधिकार कोणाकडे जातात.

लोकशाही हि एक चांगली गोष्ट आहे. पण जेंव्हा गुन्हेगार सत्तेवर येतात आणि ते कायदे बनवतात, त्यावेळेस लोकशाहीचा गैरवापर होतो. जो कायदा मोडतो तोच कायदा बनवतो.
हुकुमशाही हि अजूनच वाईट आहे, कारण तिथे कोणीच कोणाला जबाबदार नसते. पण संसदीय लोकशाहीमध्ये हा एक मोठ्ठा प्रश्न आहे. पैशाने आणि इतर उपकारांनी किंवा ताकदीच्या बळावर मते खरेदी करता येतात.
म्हणून आपल्याला या सर्व पद्धतीचा पुनर्विचार करायला हवा.
सर्वच कार्यपद्धतींमध्ये काहीतरी चांगले आणि काही चूक आहे.
पण जर अधीपत्य कमी केले तर अराजकता माजेल. दडपशाही सुरु होईल आणि जर योग्य दृष्टीकोन, योग्य ते प्रमाण आणि योग्य त्या हातात अधिकार नसतील, तर प्रगती खुंटेल.
 
जेंव्हा अनागोंदी करणाऱ्या माणसाकडे अधिकार येतो किंवा सामाजवादी व्यक्तीकडे कोणतेही अधिकार नसतील, तर ते काही करू शकत नाहीत.
काही तिसऱ्या जगातील देशान्मादाह्ली प्रगती संसदेवर खूप जास्त अवलंबून राहिल्याने खुंटली आहे. एक रस्ता बनवण्यासाठी संसदेपर्यंत जाऊन ते बऱ्याच पातळ्यांवर मंजूर व्हावे लागते कारण कोणीही कृतीचा अधिकार किंवा जबाबदारी घेण्यास तयार नसते.
एक प्रकारे प्रत्येक गोष्ट पुढे ढकलण्याची किंवा टाळण्याची प्रवृत्ती असते.गोष्टी प्रत्यक्षात कधीच पुढे जात नाहीत.म्हणून कणखर नेतृत्त्वाची गरज असते.
त्याचवेळेस, खरोखरच कशाची गरज असेल तर ती ज्ञानाची,लोकांचा एक सेवक असण्याची ना कि लोकांवर अधिकार गाजवण्याची. अध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यासकट उद्योगपती असो, राजकारणी असो किंवा अधिकारी असो, त्यांनी कायम हे लक्षात ठेवले पाहिजे,

बऱ्याचदा एखाद्या समूहाचे धर्मगुरू त्यांना  निक्षून सांगतात, कि ‘तुम्हाला एका विशिष्ट पक्षाला, किंवा विशिष्ट यांत माणसालाच मत दिले पाहिजे.’ हे अत्यंत चुकीचे आहे.हे म्हणजे लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखे आहे.खूप वेळेस उत्तर पूर्वेमध्ये जर तुम्हाला योगाचा कोर्स घ्यायचा असेल, तर तेथील धर्मगुरूंची परवानगी घ्यावी लागते. आणि त्यांना लक्षात आले कि लोक योग करीत आहेत,तर ते त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करतात. ‘ तुम्ही पापी आहात. तुम्ही सैतानि काम करीत आहात.’हे असे योग्य नाही.

म्हणूनच पूर्वीच्या काळी, या देशातील पूर्वजांची पद्धत वेगळी होती. त्यांनी कधीच अधिकार जमवण्याचा प्रयत्न केला नाही.ते कायम त्यागाबद्दल बोलले.
बऱ्याचदा लोक मला विचारतात,कि जसे कॅथोलिक लोकांमध्ये किंवा मुस्लीम धर्मात असतात, तसे हिंदू धर्मामध्ये हि सर्व देशासाठी एकाच धर्मगुरू का नाहीत ?
मी त्यांना सांगतो,’येथील राचाच वेगळी आहे. ती एका अधिकाराची नाही तर प्रेरणेची आहे.’तुम्ही आजपासून संत आहात’ अशी इथे कोणी मला पदवी देण्याची गरज नाही. ते तुमच्या कृतीमधूनच प्रतीत होते. जेंव्हा तुम्ही जे बोलता, तेच तुमच्या कृतीत येते, तेंव्हा तुम्ही आपोआप एक प्रेरणादायी व्यक्ती बनता.
महात्मा गांधी कोणतेही अधिकारी नव्हते, पण खुप्लोंसाठी त्यांचे आयुष्य हेच एक आदर्श होते. असेच ‘ऑरोबिन्दो’ बाबतीत.कोणीही त्यांना सांगितले नाही कि, ‘आजपासून तुम्ही याचे अधिकारी आहात’.नाही!पण त्यांच्या शिकवणुकीचा खूप जणांवर प्रभाव होता.

प्रश्न: गुरुजी, नावाचे काय महत्त्व आहे? जर काही नाही, तर स्वामी आणि ऋषींना ते स्वामी आणि ऋषी झाल्यावर नवीन नाव का मिळते?
श्री श्री : हे एक पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. नाव हि एक प्रेरणा असते. स्वामी आणि ऋषींना दुसरे नाव दिले जाते कारण त्यांच्या आयुष्याचा एका नवीन अध्याय सुरु झालेला असतो, कोणीतरी असण्यापासून ते ‘काहीही नसण्या पर्यंत.’

प्रश्न: गुरुजी, मी ज्यावर खूप प्रेम करते,अशी व्यक्ती खूप नकारात्मक असेल आणि मी त्याला बदलण्यासाठी असमर्थ ठरत असेन, तर मी काय करू?
श्री श्री: आशा सोडू नका.थोडा वेळ वाट पहा, अजून थोडे प्रयत्न करा. जा त्यांच्यात बदल घडून आला तर चांगलेच आहे.नाहीतर पुढे चला.

प्रश्न: गुरुजी, चांगला मित्र कोणता आहे?
श्री श्री: तुम्ही ज्याच्याबरोबर बोलण्याने तुमचा त्रास हलका होतो,तो चांगला मित्र. ज्याच्याकडे तुम्ही छोटासा प्रश्न घेऊन गेलात आणि त्याच्याकडून निघताना तोच प्रश्न तुम्हाला खूप मोठ्ठा वाटायला लागतो,तो चांगला मित्र नव्हे.

प्रश्न: मला काही लोकांशी जुडल्यासारखे वाटते आणि काहिंशी तसे वाटत नाही. असे का?
श्री श्री : काही हरकत नाही !
तुमचे व्यक्तिमत्व विस्तारत राहा आणि मग एके दिवशी तुम्हाला सगळ्यांशी जुडल्यासारखे वाटेल. ध्यानामध्ये अजून खोल जा.

प्रश्न: गुरुजी,मला माहिती आहे, कि सत्याचा मार्ग हा सर्वोच्च आहे. तरीही व्यवसायामध्ये थोडेफार खोटे बोलावेच लागते.
श्री श्री: हो! व्यवसायात काही प्रमाणात खोटे बोलू शकता, तेवढेच जेवढे अन्नात मीठ असते. तुम्ही  जर खूप खोटे बोललात, तर संकटात सापडाल. आणि जर मीठ घातले नाहीत, तर अन्न खाताच येणार नाही.जर खोटेपणाची हद्द पार केलीत, तर मोठ्ठे संकट येऊ शकते. तुम्ही बनवलेली  वस्तू विकताना, ती दुय्यम दर्जाची आहे, हे माहित असूनही तुम्ही त्याला पहिल्या दर्जाची म्हणून विकणे किंवा तिची योग्यता माहित नसताना चांगल्या प्रतीची म्हणून विकणे हे ठीक आहे.
असे म्हणतात कि पंडित, गुरु, संत आणि प्रशिक्षक यांना खोटे बोलण्याची सकता मनाई आहे; तसेही तसे काही होतही नाही! राजासाठी थोडेफार असत्य माफ आहे आणि व्यावसायीकासाठी त्याहिक हून थोडे जास्त असत्य ठीक आहे.
म्हणून व्यापारी तितके खोटे बोलू शकतात जेवढे अन्नात मीठ असते.

प्रश्न: गुरुजी,उद्यापासून ‘टीचर ट्रेनिंग’ सुरु होत आहे.त्याबद्दल काही सांगा.
श्री श्री: प्रशिक्षक होणे हे एक खूप पवित्र काम आहे. मला खात्री आहे तुम्हाला ते आवडेल. तो एक आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव आहे.

प्रश्न: मोक्ष हि चित्ताची मृत्यूच्या आधीची स्थिती आहे का नंतरची?
श्री श्री: जिवंत असतानाही मृतासारखे असणे, याला ‘मोक्ष’ म्हणतात. जेंव्हा तुम्ही जिवंत असतानाहि मन मृतावस्थेत असते, तो ‘मोक्ष’.

प्रश्न: गुरूच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस असणे हे चुकीचे आहे का?
श्री श्री : तुम्ही त्याचा निवाडा( बरे-वाईट असा विचार) कशाला करता. जे आहे ते ठीक आहे.


The Art of living
© The Art of Living Foundation