जीवनात दुख: कमी करण्यासाठी योग आणि ध्यान गरजेचे आहेत.

२७ डिसेंबर २०११

प्रश्न: गुरुजी, जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो तेव्हा उत्तर आपोआपच मिळतं, हे खरोखरीच होतं कि हि फक्त माझी कल्पना आहे?
श्री श्री: जर ते उत्तर बरोबर असेल तर ते हे खरोखरीच होतं आणि माझं बरच काम सुद्धा कमी होतं.

प्रश्न: प्रिय गुरुजी, अहंकारातून निर्माण झालेल्या अविचारी कृतीपासून ज्यांच्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागतो, स्वत:ला कसे काय स्वतःला सांभाळून ठेवावे?
श्री श्री: अनुभवामुळे. तुम्ही तुमचा अहंभाव कधी सोडता? जेव्हा त्यातून दुख: मिळते तेव्हा. जेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला असेल तेव्हा तुम्ही म्हणता खूप झालं, आणि मग तुम्ही सरळ अहंभावाचा त्याग करता. ज्ञान किंवा दुखा:मुळे तुमच्यातल्या संकुचितपणाचा तुम्ही त्याग करता. जर तुमच्या कडे एक मोठा दृष्टीकोन आणि ज्ञान आहे तर मग दुखा: भोगायची गरज नाही. पण जर जीवनात ज्ञान नसेल, तर दुख: आणि यातनांमुळे अहंभाव निघून जाईल.

प्रश्न: प्रिया गुरुजी, माझे आई-वडील माझ्यावर प्रेम करतात पण ते फार प्रेमळ नाहीयेत. जश्या पद्धतीने त्यांनी मला प्रेम दाखवायला हवं तसे ते नाहीयेत. मी त्यांच्या कृती पासून स्वत:ला कसा वेगळा ठेवू आणि भावनांना कसं सामोरा जाऊ?
श्री श्री: ह्याला फार महत्त्व देऊ नका. जीवनात पुढे वाढा! जीवनात अशे प्रसंग येतात आणि कधी नकारात्मक विचार आणि कधी सकारात्मक विचार येतात. म्हणून काय! कोणत्याच ह्या भावना सदैव राहणार नाहीत. त्या येतील आणि निघून जातील. जस मी सांगितलंय , योग आणि ध्यान हे दुख:,भीती आणि उदासीनता  कमी करण्या साठी गरजेचे आहेत. जेव्हा योग आणि ध्यान ह्यांची जीवनात कमतरता असते, तेव्हा दुख: मिळते . म्हणून ख्रिस्ती धर्मा मध्ये ते म्हणतात, दुख: आणि यातना ध्येयाकडे नेण्यासाठी गरजेचे आहेत. जेव्हा तुम्ही दुख: आणि यातना भोगता तेव्हा तुम्ही शिकता. पण पौर्वात्य देशांमध्ये ते मानतात कि दुख:टाळता येऊ शकते, ते जरूरी नाही. जीवन परम सुखदायी आहे ! माहित आहे का? कारण ज्ञान, ध्यान आणि योग ह्या मुळे भविष्यात येणारे दुख: टाळता येते . म्हणून योग आणि ध्यान मुळे दुख: कमी होतं.

प्रश्न: पतंजली म्हणतात कि प्राण हे श्वास घेतल्या शिवाय मिळू शकतं. हे मिळण्या साठी कोणत्या पद्धती आणि प्रक्रिया शिकून घेणे गरजेचे आहे? ह्या बद्दल संदर्भ किंवा साहित्य उपलब्ध आहे का?
श्री श्री: प्राण हा शरीरात आहेच. प्राण आणि श्वास हे संबंधित आहेत पण एक सारखे नाहीयेत. ५ मुख्य प्राण आणि ५ उपमुख्य प्राण आहेत. ह्यांच्या खोलात आपण नंतर कधी तरी शिरू. प्राण हे श्वास, वातावरण आणि तरंग यांच्याशी संबंधित आहेत. म्हणून अन्नात सकारात्मक, नकारात्मक किंवा अक्रिय उर्जा आहे असा आपण म्हणतो.  प्राण ह्याला इंग्रजीत दुसरा शब्द नाहीये. प्राणाचा संबंध ऊर्जेशी आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाशी संबंधित आहे. अन्न, श्वास, तरंग, उर्जा ह्या सगळयांशी प्राण हे संबंधित आहे आणि म्हणून प्राण हे फक्त श्वासाशी संबंधित नाहीये.

प्रश्न: गुरुजी, मागच्या २ दिवसां मध्ये तुम्ही ज्या ऋषींचा उल्लेख करत होता त्या ऋषीन्बद्दल सांगाल काय? ते कोण होते आणि त्यांचे जीवन कसे होते? आत्ताच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा संदेश त्यांच्या जीवनातून घेता येऊ शकतो का?
श्री श्री: नक्कीच! ऋषी ते ध्यान मग्न व्यक्ती होते, जे बऱ्याच वर्षांपूर्वी सखोल ध्यानात असायचे. त्या काळाचे ते शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्यामध्ये ज्ञात नसलेले जाणून घेण्याची उर्मी होती. आजकालचे ऋषी म्हणजे संत आणि शात्रज्ञ आहेत. संत आणि शास्त्रज्ञ हे दोन नसून एकच असत. आधीच्या काळी बरीच साधनं किंवा उपकरणं उपलब्ध नसल्याने ऋषी म्हणायचे, "जर मी पण ह्याच वस्तूंपासून बनलो असेन तर मला ध्यानात बसून चेतनेच्या खोलातून सगळी माहिती मिळवता येईल." हि माहिती कुठून मिळवणार ? हि माहिती अवकाशात उपलब्ध आहे आणि तिथून मिळवता येईल. म्हणून ३ प्रकारचे अवकाश आहेत : भौतिक अवकाश, चेतना अवकाश आणि महा चेतना अवकाश. म्हणूनच ह्यांना 'चिद आकाश', ‘चित् आकाश' आणि 'भूत आकाश' असं म्हणतात. म्हणून तुमच्या आतील आकाश आणि तुमच्या बाहेरचं आकाश आणि त्यामधील आकाश, जिथे सर्व ज्ञान आहे, हे जोडलेले आहेत हे जाणून घेऊन त्या ठिकाणाहून ते ज्ञान मिळवायचे.
आयुर्वेद हे तिथूनच अस्तित्वात आलं. ग्रह हे सूर्याभोवती फिरतात हे वेदिक काळी माहीत होतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे गलेलिओ ने शोधलं असे म्हणणे चूक ठरेल. हा शोध ऋषींनी बऱ्याच वर्षापूर्वी लावला. आईन्स्टाईन आणि गॅलेलिओ च्या हि आधी. ऋषी म्हणायचे कि सगळं काही तरंगांपासून बनलं आहे, एकाच शक्ती ने बनलं आहे. म्हणून तेव्हा ते म्हणाले होते कि गुरु ग्रहाला १२ चंद्र आहेत आणि त्यांचा हिशोब आजपण अगदिबरोबर आहे. जी दिनदर्शिका त्यांनी बनवली, त्यातून ग्रहण कोणत्या वेळी होईल हे अगदी अचूकपणे कळायचे अगदी मिनिट आणि सेकंदही. त्यांनी अगदी हजार वर्षा ची दिनदर्शिका आखली. हे इतक्या अचूकपणे कसे काय बनवले गेले? अगदी मिनिट, सेकंद अगदी हजार वर्षांपूर्वी? गुरु ग्रहावर बारावा चंद्र काही दशका पूर्वीच शोधला गेला,पण ऋषींनी त्याबद्दल हजारो वर्षांपूर्वीच लिहिले आहे. तसेच शनी ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा मारण्यासाठी किती वेळ लागतो हे सगळं १०००  वर्षांपासून लिहिल गेलं आहे. तसेच आयुर्वेद मध्ये कोणती वनस्पती कोणत्या शरीराच्या अवयवाला आणि कोणत्या आजारावर काम करेल आणि कुठे मिळेल हे सगळं साहित्य ऋषींनी लिहिलं आहे. अॅलोपाथिक वरचे पुस्तक लिहायला खूप दिवस लागले आणि ते अजूनही लिहिल जातंय आणि त्यात सुधारणा होत आहेत पण जुने साहित्य आजवर अगदी तंतोतंत खरे ठरले आहेत. हे खरच मजेदार आहे ! तसेच अणु, काळ, अंतराळ यांची गिनती आणि हे ब्रह्मांड कसे ५ महाभूतान पासून बनले आहे हे सगळं लिहिलं आहे. एक शिक्षक एकदा म्हणाला कि फक्त ४ महाभूत आहेत आणि मी म्हणालो कि पाचवा महाभूत सुद्धा आहे. त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि मी म्हणालो,’ हो त्याचा आत्ताच शोध लागलाय’. हे ज्ञान फार काळापासून आहे, 'आकाश हा पांचवा महाभूत आहे'. आजकाल म्हणून म्हणतात कि इतर चार महाभूत काहीच नसून पांचवा खरा महाभूत आहे.
प्राचीन काळी लोकांना हे माहित होतं, म्हणून विष्णू नेहमी फोटो मध्ये निळा दाखवला आहे. कारण निळा म्हणजे आकाश. विष्णू कडे चक्र म्हणजे अग्नी, शंख म्हणजे पाणी, फूल म्हणजे हवा, गदा म्हणजे माती या ४ महाभूतांची चिन्हे आहेत ज्यांना तुम्ही वेगळं करू शकता. चक्र, शंख, फूल, गदा यांना तुम्ही टाकून देऊ शकता पण आकाशाला कसं वेगळं कराल. हे हजार वर्षान पासून आपल्या समोर येत आहे. म्हणून वैदिक ऋषी खोल ध्यानात हे ज्ञान प्राप्त करायचे आणि जे हि त्यांच्या चेतनेत यायच, ते सगळं ते नमूद करायचे. आजचे शास्त्रज्ञ छाननी करून समजून घेतात. आणि आजकाल शास्त्राज्ञ हे ऋषी आहेत आणि त्या काळी ऋषी हे शास्त्र्ज्ञ होते.   

प्रश्न: प्रिय गुरुजी, स्वामी आणि ऋषी कसे बनावे? पाश्चात्य देशातल्या लोकांना हे शक्य आहे का आणि त्याला किती वेळ लागतो आणि त्या साठी काय योग्यता लागते?
श्री श्री: तुम्हाला जर ते बनायचे आहे तर सरळ माझ्याकडे या. आम्ही तुम्हाला त्यासाठी पात्र बनवू. आणि स्त्रिया पण येऊ शकतात. बऱ्याच जागा रिकाम्या आहेत, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर. स्वामी किंवा ऋषी म्हणजे ते जे आपला जीवन ज्ञानासाठी किंवा समाजासाठी देऊ इच्छितात. त्यांना स्वत:च्या गरजा नसतात आणि स्वत:चे हेतू साध्य करायचे नसतात. सरळ येऊन समाजासाठी काम करतात आणि देवाचं काम करतात. एका मोठ्या कामासाठी तुमचं जीवन अर्पण करता. जर तुम्ही समाज सेवक आहात, तर तुम्हाला सगळ्या गरजा, इच्छा, आवडी, नावाडी यांना बाजूला करावं लागतं. 'मी समाजाच्या भल्यासाठी सदैव तयार आहे' या भरवश्याने तुम्ही पुढे वाढत जाता. जर तुम्ही तयार आहात, तर हीच जीवनशैली आहे. तुम्ही येऊन देवाचा काम समजून समाजासाठी काम करू शकता. फक्त हेच आहे, स्वत:चे जीवन एका मोठ्या कार्यसाठी अर्पण करणे. इथे येण्या पूर्वी दोनदा विचार करा. उद्या तुम्ही इथे आल्यावर असे नाही म्हणू शकणार कि तुम्हाला हे आवडत नाही किंवा तुम्हाला हे आवडतं आणि तुम्हाला हेच करायचे आहे. तुम्ही फक्त एका चांगल्या कार्यसाठी उपलब्ध आहात, एव्हढंच.        

प्रश्न: प्रिय गुरुजी, ज्याला सुरुवात नाही आणि अंत नाही आणि मग वेळ पण अस्तित्वात नाही मग वेळ काय आहे?
श्री श्री: आधी काय अस्तित्वात काय आहे ते माहित करून घ्या. जर वेळ अस्तित्वात नाही तर मग तुम्ही पण अस्तित्वात नाही. मग कोणाचं अस्तित्व आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर कशाला हवं आहे जेव्हा वेळ अस्तित्वात नाहीये. समजला का?

प्रश्न: तुम्ही आम्हाला सत्य युगाची एक झलक दाखवू शकाल काय, तेव्हा लोक कसे असायचे?
श्री श्री: आपण इथे तेच करतोय. तुम्हाला काय वाटत आपण काय करतोय? आपण सगळे मजेत नाहीयोत का? आपण सगळे आनंदी नाही का? सगळ्यांच्या चेहऱ्या कडे बघितल्या वर स्मितहास्य दिसेल. एखाद्याच्या चेहऱ्या वर नसेल तर ते काही काळ जगापासून लांब आहेत. हेच सत्य युग आहे. सात्विक अन्न आहे ज्याने उत्तम ताळमेळ बसून, चेतनेची उन्नती होत आहे. इथे ज्ञान आहे, संगीत आहे. सत्य युग तेच जिथे उत्तम ताळमेळ आहे आणि सुसंवाद आहे. मौनात सुद्धा तुम्ही चालू फिरू शकता कोणी तुम्हाला बोलायला भाग पाडत नाहीये. मौनात आणि सगळ्यान बरोबर बसून छान वाटत का ? किती लोकांना छान वाटतंय? बाहेर समाजात तुम्ही असे नाही वागू शकणार. जर तुम्ही बाहेर शांत असाल तर ते तुम्हाला त्रास देऊन सारखं विचारतील 'तुम्ही शांत का?' मी एका मनुष्याच सांगतो, ‘तो जेव्हा उभा होता तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला 'तू इथे उभा का?' तो इसम म्हणाला बर 'मी चालतो'. चालायला लागल्यावर कोणी विचारलं 'कुठे चालला आहेस?' कशाला चालतो आहेस?' तो म्हणाला ,’बर, मी पाळतो' आणि पळू लागला. मग परत कोणी त्याला विचारला 'अरे पळतो कशाला आहेस?' कंटाळून म्हणाला 'अरे देवा' आणि रडू लागला तर कोणी त्यला विचारला 'अरे रडतो कशाला आहेस?' म्हणाला 'अरे देवा, मी ह्या जगात उभा राहू शकत नाही, चालू शकत नाही, पळू शकत नाही रडू शकत नाही आणि काही केल्यावर विचारतात हे का करतोय?' पण इथे तुम्ही काय करताय त्याची कोणाला पडलीय. तुम्हाला शांततेत पूर्ण मुभा आहे. तुम्ही जर खूप बोलत असाल तर लोक विचारतात, 'अरे तू इतका का बोलतोस?' आणि शांत बसल्यावर विचारतात 'अरे तू इतका शांत का?' इथे कोणी तुम्हाला काही विचारणार नाही फक्त तुमच्या वर प्रेम करतील. तुमच्या साठी उभे राहतील. सगळी कामं होतात आणि एक शब्द पण बोलायची गरज भासत नाही. हेच सत्य युग आहे. तुमच्या इच्छा निर्माण होण्या आधीच पूर्ण होतात, जिथे तहान लागण्या पूर्वी पाणी मिळतं तेच सत्य युग आहे. त्रेता युग मध्ये तहान लागते आणि लगेच पाणी मिळतं. द्वापार युग मध्ये तहान लागल्यावर पाणी मिळायला प्रयत्न करावा लागतो आणि कलीयुगात तहान लागल्यावर पाणी मिळवण्याचे बरेच प्रयत्न करून सुद्धा पाण्याचा एक थेंब पण मिळत नाही.       

प्रश्न: कधी कधी स्वप्नामध्ये भविष्यात काय होणार आहे हे मला दिसतं. कमनशिबाने परीक्षेतली प्रश्न पत्रिका नाही दिसली. पण ह्याने असं वाटू लागलं आहे कि काही घटना आयुष्यात होणारच असतात. हे बरोबर आहे काआयुष्यात सगळ्याच घटना होणार ठरवल्या प्रमाणे घडतात का?
श्री श्री: बरोबर. काही घटना ज्या ठरल्या आहेत त्या घडणारच आहेत ते पक्कं आहे. काही घटना नाही घडत ठरल्या प्रमाणे.

प्रश्न: कृपा म्हणजे काय आणि ती कशी वाढवावी?
श्री श्री: जे तुम्हाला तुमच्या स्वत: च्या प्रयत्नाने मिळालेले नाही, त्यला तुम्ही कृपा म्हणता. जे काही तुम्हाला मिळालं ते तुमच्या योग्यते पेक्षा जास्त मिळाल्यावर तुम्ही त्यला कृपा म्हणता. जे काही तुम्हाला फक्त तुमच्या प्रयत्नांपेक्षा जास्त आणि तुमची पात्रता नसताना मिळाल्यास, तुम्ही त्यला भेट किंवा कृपा समजता. आणि कृपा हि कृतज्ञतेने वाढते. जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा कृपा होत नाही, पण जेव्हा तुम्ही कृतज्ञ  असता तेव्हा ती भरपूर मिळते.    

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी असं ऐकलं आहे कि २०१२ च्या शेवटी खूप लोक ज्ञानोदय पावतील जसे श्री कृष्णाच्या काळी झाले होते. हे खरं आहे का?
श्री श्री: ज्ञानोदय म्हणजे विजे सारखं नाहीये कि तुमच्या डोक्यावर एकदा पडेल आणि तुम्ही ज्ञानोदय मिळवाल. तुमच्या आयुष्यात बघा कसा अंधार निघून गेला आहे. जेव्हा सूर्य चमकतो, अचानक प्रगट होऊन प्रखर होत नाही. सूर्योदय होण्या पूर्वी आकाशात प्रकाश येवून लालसर होऊन मग उजेड होतो. तसंच तुमच्या जीवनात डोकावून बघा. आध्यात्मिक पथावर येण्या आधी तुमचं जीवन कसं होतं? तुमचा मन कसं होतं? तुम्ही कसे होता? जगाला कोणत्या दृष्टीने बघायचा? मागे जा आणि स्वत:ला आणि जगाला त्या दृष्टीने बघा तुम्हाला आश्चर्य होईल आणि धक्का सुद्धा बसेल कि तुम्ही तेच व्यक्ती नाही आहात. तुमची विचार सारणी बदलली आहे, तुमच्या भावना बदलल्या आहेत. तुमचं वागणं बदलले आहे आणि तुमचं दृष्टीकोण बदलला आहे आणि तुमची अभिव्यक्ती बदलली आहे. हे झाले आहे कि नाही? आधी लहान सहन गोष्टी सुद्धा ज्या तुम्हाला हव्या होता त्या व्हायच्या नाहीत. तुम्ही त्याचं किती दुख: करायचा. पण आत्ता मोठ्या गोष्टी जरी तुम्हाला पाहिजे तशा नाही झाल्या, जे क्वचितच होतं म्हणा,  तरी तुम्हाला फरक पडत नाही. आधी लहान गोष्टींसाठीही श्रम घ्यावे लागायचे पण आत्ता तर लगेच होऊन जातात. इथे किती लोकां बरोबर असं झाल आहे? जे तुम्हाला हवं आहे ते होतं. त्यालाच ज्ञानोदय म्हणतात. तुम्हाला एके दिवशी जाणवेल काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही आनंदी असाल. आणि तुम्हाला वाटेल मी हे शरीर
नसून परम आत्मा आहे, हे ज्ञान हळुवार येईल. ते अचानक सुद्धा येऊ शकता आणि नाट्यपूर्ण रुपात सुद्धा येऊ शकत. पण ते गरजेचं नाहीये. जरा लक्ष देऊन बघा कि लहान सहान गोष्टींबद्दल तुमचा मोह कमी झाला आहे. तुम्हाला प्रकर्षाने आवडणाऱ्या आणि नावाद्णाऱ्या गोष्टी कमी झाल्या असतील आणि तुमची कुरबुर कमी झाली असेल तर तुम्ही ज्ञानोदयाच्या मार्गावर आहात. आणि कोणत्याही दिवशी तुम्ही म्हणू शकता कि मला काही फरक पडत नाही आणि मला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. मी विना कारण आनंदी आहे आणि मला सगळ्यांशी निरपेक्ष प्रेम आहे. जर तुम्ही उभे राहून असे म्हणू शकलात, तर कोणत्याही दिवशी ज्ञानोदय होईल.      

प्रश्न: प्रिय गुरुजी, मन: स्थिती कशामुळे होते?
श्री श्री: लाटा कश्या मुळे येतात? मन म्हणजेच मन: स्थिती पण तुम्ही मना पेक्षा मोठे आहात.

प्रश्न: गुरुजी, मला नेहमीच छान वाटत आणि मी सगळ्या प्रसंगी आनंदी असतो, जरी कोणी माझ्या शी वाईट वागलं तरीहि. पण लोक माझा गैर फायदा घेऊ लागले आहेत?
श्री श्री: एक गोष्ट आहे कि तुम्हाला खरच कसं वाटत. आणि दुसर म्हणजे तुम्ही कसं बघता आणि वागता. जर तुम्हाला वाटत असेल कि कोणी तुमचा गैर फायदा घेत असेल, तर त्यांना सामोरे जा त्यांना समजणाऱ्या भाषेत त्यांना समजवा. आणि त्याच वेळी भ्रमित होऊ नका.

प्रश्न: प्रिय गुरुजी, कुरणात म्हटलं आहे, 'तुम्ही देव आहात, तुम्ही एक आहात, तुम्ही चिरंतन आहात. तुम्ही जन्माला नाहीत आणि तुम्ही कोणाला जन्म दिला नाहीत. कोणी आणि काहीच तुमच्या सारखं नाहीये.' जेव्हा ते म्हणतात  'कि कोणीच आणि काहीच तुमच्या सारखं नाहीये' हे गोंधळात टाकणारं आहे. ह्या बद्दल काही सांगाल का आम्हाला.
श्री श्री: हे उत्तम आहे. वेदां मध्ये हेच म्हटलं गेला आहे. संस्कृत मध्ये 'एकम' म्हणजे तुम्ही एक आहात तुम्ही चिरंतन आहात. तुम्ही जन्मला नाहीत आणि तुम्ही जन्म दिला नाहीत. जेव्हा काहीच जन्मले नाही तेव्हा काहीच संपले नाही, तुम्ही चिरंतन आहात. हे दैवी चेतनेचे वर्णन आहे. देव एक आहे आणि अवकाश एक आहे. जे जन्मले नाही ते अनंत आहे, ती शांती आहे, प्रेम आहे, आनंद आहे, परमानंद आहे आणि तेच सगळे आहेत. एका ठिकाणी म्हटलं आहे कि, चेतना म्हणजे शरीर नव्हे आणि मग म्हटले आहे कि सगळीकडे चेतना आहे जे जन्मला आहे ते सुद्धा आणि मग एके ठिकाणी असं म्हटलं आहे कि चेतना कधी जन्मलीच नाही आणि तिने काही बनवलेच नाही. आणि मग आपण म्हणतो कि, चेतना म्हणजेच सगळे  काही आणि शरीर चेतनेने बनलेलं आहे. चेतने चे वर्णन करण्याचे म्हणजे २ वेगळ्या पद्धती आहेत. एक म्हणजे चेतना अवकशा सारखी रिकामी आहे किंवा सागरा सारखी पूर्ण आहे. कुराण मध्ये रिकाम्या बाजूने चेतने कडे बघितले आहे, निराकार म्हटले आहे. वेदां मध्ये निराकार आणि आकार दोघांना घेतले आहे. जे निराकार ते सुद्धा आकार आहे, पाण्याचे बुडबुडे पाण्याचाच भाग आहेत.

प्रश्न: गुरुजी, माझ्या एका मित्राने मला ६ लोकांसमोर झापड मारली. मी कसा त्याचं प्रतिउत्तर देऊ आणि त्या बरोबर कसा वागू?
श्री श्री: ते काम आधीच झालंय! लागलीच स्वयाम्स्फुर्तीनेच कृती होते. जेव्हा तुम्हाला तुमच्या मित्रांनी मारलं तेव्हा तुम्ही काय केले? तुम्ही स्मितहास्य करून त्याच्या डोळ्यात बघू शकलात? जर हो तर मग तुम्ही त्याला जास्त जोरात मारलंत. पण जर तुम्ही चिडून त्याला मारलंत तर मग एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्या वेळी जसे वागलात आणि तुमचं प्रतिउत्तर कस होत, त्या वर दुख: करू नका, पुढे चला. जर तुम्ही प्रतिउत्तर दिलं नाही तर मग त्याला फार वाईट वाटले असेल. जर तुम्ही त्याला मारलत, तर तो रागाने तडफडत असेल आणि तुम्ही त्याला मारलेले परत तुम्हाला मारण्यासाठी तयारी करत असेल. कोणत्याही क्षणी ह्या घटना गंभीरपणे घेऊ नका. जीवनात अश्या गोष्टी होतात. तुम्ही जर दयावान असाल किन्वा त्याला धडा शिकवण्या साठी तत्पर असाल किंवा सरळ दुर्लक्ष्य कराल. तुम्हाला कसं वागायचं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी म्हणेन पहिल्यांदा दुर्लक्ष्य करा, दुसऱ्यांदा धडा शिकवा आणि तिसऱ्या वेळी परत द्या.

प्रश्न: आदर्श भक्त कोण आहे?
श्री श्री: जो प्रश्न विचारात आहे तोच! स्वत:वर फार जबरदस्ती नका करू आणि भक्ती वर संशय घेऊ नका. मी तर म्हणेन कि भक्ती वर कधीच संशय घेऊ नका. भक्ती आहे असं धरून चला. कोणतही मूल आई ला विचारात नाही 'तुझं माझ्या वर प्रेम आहे का?' किंवा आई पण असं काही विचारात नाही. मूल आणि आईला एकमेकांवर प्रेम करण्यावाचून गत्यंतरच नाहीये. तशीच भक्ती आपल्यात उपजतच असते. कधी कधी ती अज्ञान, संकोच, संशय, असुरक्षितता मुळे झाकलेली असते. स्वताची असुरक्षितता स्वताची भक्ती झाकून ठेवते. बरोबर वेळ आली कि आपोआप अज्ञान आणि अहंभाव निघून आतील भक्त उठून दिसतो.


  


The Art of living
© The Art of Living Foundation